ओला कचरा,गांडूळखत,ठाणे, आणि चौकशी

कोंबडी's picture
कोंबडी in काथ्याकूट
19 Jun 2009 - 1:39 pm
गाभा: 

ओला कचरा
आमचा ओल्या कचयाचा प्रयोग वर्षभर चालू आहे. स्वयंपाकघरात तयार होणारा बराचसा ओला कचरा आधी दिवसभर वाळवून मग दोनेक महिने कुंड्यांमध्ये कुजवून तयार होणारं काळं कंपोस्ट हे मातीला छान पर्याय आहे हे अनुभवलं.

गांडूळ खत
याआधी एकदा गांडुळं आणून पाहिली होती, पण काही दिवसातच गांडुळांची अख्खी फौज गारद झाली. काय बिनसलं होतं कोणास ठाउक! दोनेक महिन्यापूर्वी पुन्हा "दोनशे ग्रॅम" गांडुळं आणली "इनोरा" तून ... ती नुसती जगलीच नाहीत तर त्यांनी आमच्या ओल्या कचयाचं काळं सोनं केलं! कालच गांडुळं असलेल्या कुंड्यांतला कचरा चाळला आणि हाती एक-दीड किलो मऊ, काळंभोर, दाणेदार, चहाच्या पावडरीसारखं गांडूळखत हाती आलं! आता हे कायमसाठी करणं आलं, आणि म्हणूनच माझी सध्याची "कुंडी-दिवसाआड थोडं पाणी-दिवसाआड चाळवणी-आणि सरतेशेवटी चाळण" ही पद्धत चालणार नाही कारण ती वेळेच्या दृष्टीने "स्केलेबल" नाही.

ठाणे
मागे एकदा वाचनात आलं होतं की ठाण्याला एका ग्रॄहस्थाने एकावर एक बसणार ट्रे वापरून "अक्षय पात्र" म्हणवणारी रचना केली आहे. खालच्या ट्रे मध्ये खत तयार झालं (म्हणजेच त्यांचं अन्न संपलं)की गांडुळं आपसूक वरच्या ट्रेमध्ये जातात, वगैरे. मात्र त्यावेळी त्या व्यक्तीचं नाव-पत्ता-फोन लिहून ठेवायचं राहून गेलं.

चौकशी
ठाण्यातल्या या व्यक्तीचं नाव-पत्ता कोणाकडे आहे काय? किंवा अशाप्रकारच्या दुसया एखाद्या "यंत्राची" माहिती आहे काय?

धन्यवाद!

- कोंबडी

प्रतिक्रिया

अवलिया's picture

19 Jun 2009 - 1:42 pm | अवलिया

ठाण्यात एक व्यक्ती आहे आम्हाला माहित, जी गांडुळे तयार करण्याच्या कामात पटाईत आहे. बघा तिचा काही उपयोग झाला तर ... ठाण्यात वर्ल्ड फेमस आहे... कूणालाही विचारा लगेच पत्ता मिळेल :)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

विनायक प्रभू's picture

19 Jun 2009 - 2:46 pm | विनायक प्रभू

ऑर्गॅनिक फार्मींग मधे गांडुळ खताला फार महत्व असते.

विसोबा खेचर's picture

19 Jun 2009 - 2:15 pm | विसोबा खेचर

कोंबडी,

ठाणे
मागे एकदा वाचनात आलं होतं की ठाण्याला एका ग्रॄहस्थाने एकावर एक बसणार ट्रे वापरून "अक्षय पात्र" म्हणवणारी रचना केली आहे. खालच्या ट्रे मध्ये खत तयार झालं (म्हणजेच त्यांचं अन्न संपलं)की गांडुळं आपसूक वरच्या ट्रेमध्ये जातात, वगैरे. मात्र त्यावेळी त्या व्यक्तीचं नाव-पत्ता-फोन लिहून ठेवायचं राहून गेलं.

चौकशी
ठाण्यातल्या या व्यक्तीचं नाव-पत्ता कोणाकडे आहे काय? किंवा अशाप्रकारच्या दुसया एखाद्या "यंत्राची" माहिती आहे काय?

त्यांचे नाव -

कौस्तुभ दिलिप ताम्हनकर,
पहिला मजला, धैर्य सोसायटी
भास्कर कॉलनी, मोहन गांधी रस्ता,
ठाणे (प), पिन ४०० ६०२.

दूरभाष-
भ्रमणध्वनी - ९८१९७४५३९३
निवासी - २५४२४३९४.

'शून्य कचरा' प्रकल्पावर ताम्हनकर साहेब ज्या कळकळीने काम करताहेत ते पाहिलं की मन थक्क होतं. त्यांचे माझे अगदी जिव्हाळ्याचे, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते आणि र्त्यांचे संपूर्ण कुटुंब माझे अशील असून त्या सर्वांचे विम्याचे काम आणि शेअर बाजाराचे काम मी पाहतो..

त्यांना अवश्य दूरध्वनी करा आणि 'शून्य कचरा' प्रकल्पासंबंधात हवी ती माहिती मिळवा. आपण ज्या अक्षय पात्राचा उल्लेख केला आहे ते अक्षय पात्र ताम्हनकर साहेब अत्यंत वाजवी दरात (केवळ कॉस्ट) स्वत: बनवून देतात अशी माझी माहिती आहे..

त्यांच्या दारावर,

येथे कचरा बनत नाही..

We do not produce garbage..

अशी अगदी मोठ्या आणि ठळक अक्षरात पाटी लिहिलेली आहे. परंतु आजपर्यंत त्याबद्दल साधी चौकशीही कुणी केलेली नाही, आणि आजही कचरा होऊ नये किंवा कचरा निर्मुलन या संदर्भात आपला समाज किती बेफिकीर आहे याचे ताम्हनकरांना दु:ख आहे!

असो,

पत्ता, फोन दिलेला आहे. आपण अवश्य चौकशी करा. वाटल्यास अभ्यंकरांचा मित्र बोलतोय असा माझा संदर्भ द्या. नाही दिलात तरी चालेल. ताम्हनकर हा अत्यंत सहृदयी, सज्जन मनुष्य आहे. ते विना कुणाच्या संदर्भाशिवायही आपल्या सर्व शंकाचे निरसन अगदी आनंदाने करतील आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती पुरवतील..

आपला,
(ताम्हनकरांचा मित्र) तात्या.

कोंबडी's picture

19 Jun 2009 - 2:33 pm | कोंबडी

तात्या, धन्यवाद!
- कोंबडी

शैलेन्द्र's picture

19 Jun 2009 - 4:51 pm | शैलेन्द्र

तुमचे बोलणे झाले कि मलाही सांगा. मलाही या विषयात रस आहे.

प्रतिसाद लिहीण्याआधीच वाटलं होतं की ताम्हनकरांचां संपर्क कुणीतरी दिलेला असेलच. मी तोच देणार होतो. :)
जरूर संपर्क साधा.

मुक्तसुनीत's picture

19 Jun 2009 - 4:56 pm | मुक्तसुनीत

ताम्हनकरांबद्दलची माहिती : लई भारी !

त्यांना जरा इथे मिपावर पाचारण करा राव. येऊन त्याना प्रकल्पाची थोडी अधिक माहिती देऊ द्या. या गोष्टीचा प्रसार कसा करता येईल याबद्दल सुद्धा थोडे बोलता येईल. घ्या त्यांना जरा घोळात ! :-)

चतुरंग's picture

19 Jun 2009 - 10:51 pm | चतुरंग

शहाणे करुन सोडावे सकळजन!

(सेंद्रीय)चतुरंग

नितिन थत्ते's picture

19 Jun 2009 - 3:37 pm | नितिन थत्ते

ताम्हनकरांनी या विषयावर एक पुस्तिकाही छापली आहे. मी ती वाचून खूप प्रभावित झालो आहे. त्यातील उपाय करून पाहण्याचा विचार आहे.
(घरातील लोकांना असे करा तसे करा असे सांगण्यापेक्षा स्वतः करण्याचा विचार आहे म्हणून घरी परत जाण्याची वाट पहात आहे).
त्यांचे काही उपाय तर सहज करण्यासारखे आहेत.
उदा. घरातील जुन्या वस्तू (प्लॅस्टिकच्या) वगैरे आपण कचर्‍याच्या डब्यात टाकतो. नंतर तो कचरा कचरा कुंडीत जातो. त्यानंतर कोणीतरी कचरा वेचक कचराकुंडीपाशी बसून तो कचरा सॉर्ट करतात आणि रिसायकल करतात. त्यावस्तू आपल्या घरात साठवून नंतर त्या कचरावेचकांना घरी बोलवून देता येतील. यात त्या कचरावेचकांना कचराकुंडीच्या घाणीत बसून ते काम करावे लागू नये हा मानवतावादी दृष्टीकोनही साध्य होईल.

खराटा
(रंग माझा वेगळा)

रम्या's picture

19 Jun 2009 - 4:21 pm | रम्या

कोंबडी,
कचर्‍यामुळे उंदरांचा किंवा घाण वासाचा त्रास झाला नाही का?
असा एखादा प्रयोग करण्यास उत्सूक आहे.
राणीबागेत असंच एक उपकरण विक्रीसाठी ठेवलेलं पाहीलं आहे. पण त्याचं किंमत रु ७०० सांगितली होती! त्यामुळे तो नाद तिथेच सोडून दिला.
तुम्ही केलेला प्रयोग सोपा आणि स्वस्त होता का?
मला वाटतं गांडूळ खताची घरच्या घरी निर्मिती करून घरच्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची कल्पना तेव्हाच रूळेल जेव्हा हे अतिशय स्वस्तात किंवा फुकट होईल!
आम्ही येथे पडीक असतो!

विकास's picture

19 Jun 2009 - 4:39 pm | विकास

बरेच दिवस या विषयावर लिहायचे होते पण काही स्वानुभवावरील फोटो काढण्याच्या नादात राहीले...

मॅसॅच्युसेट्स मधे पानगळीच्या कचर्‍याचे घरात अथवा स्थानिकशासनाला कंपल्सरी काँपोस्टींग करावे लागते. त्यासाठी आम्ही "अर्थ मशिन" नावाचे (मशिन नसलेले) एक साधे उपकरण वापरतो. त्यात पानगळ, अंड्याची टरफले (एग शेल्स) आणि ओला कचरा (थोडासा कागद) असे टाकून ठेवले की दोन गोष्टी घडतात: एक म्हणजे यार्डवेस्टचा व्हॉल्यूम पूर्ण खाली जातो (आधी तिथेच कचर्‍याचे प्रमाण कमी होते) आणि उत्तम खत मिळते.

सुरवातीस या प्रकल्पाला $२५ ने हे मशिन खरेदी करताना वर्षाला चाळीस वगैरेच आमच्या गावात खरेदी केली गेली होती. पण हळू हळू लोकशिक्षण झाले, जागृकता आली आता कधी कधी आठवड्याला चाळीस मशिन्स ना नफा तत्वावर विकली जातात! (तुमचे कधी अमेरिकेत येणे झाले आणि बॉस्टन भागात आलात, आणि मला भेटलात तर आमच्या घरामागचे हे कॉम्पोस्टबीन / अर्थ मशिन नक्की दाखवू शकेन :-) ) (खालील चित्र हे त्या कंपनीच्या वेबसाईटवरचे आहे माझ्या घरचे नाही ;) )

लिखाळ's picture

19 Jun 2009 - 4:55 pm | लिखाळ

आपला उपक्रम छान आहे.
रोज तयार होणारा ओला कचरा झाडाच्या कुंड्यांत वरतीच विभागून टाकला तरी त्याचे खत बनते आणि उपयोग होतोच. मातीमध्ये गांडुळाचे कोष (ककून) असतातच - नसले तर दोन गांडुळे कुंडित सोडली तरी काम होते. त्यातून प्रजा तयार होते आणि ओल्या कचर्‍याचे खत होणे सुरु होते. पण घरातल्या कुंड्या, कुडीतील जागा याला मर्यादा असल्याने मोठ्या प्रमाणावर ओला कचरा जिरत नाही आणि अजून काही उपाय आहे का ते पहावे लागते. त्यासाठी बागेत एखादा खड्डा अथवा घारात मोठी कुंडी खत निर्मितीसाठी ठेवणे चांगलेच आहे.

तयार झालेले खत शेजारपाजार्‍यांना देता येईल अथवा इतर झाडांच्या कुंड्यात उपयोगाला येईल. त्या खतामध्ये मोठ्या प्रमाणावर गांडुळांचे कोष (ककून) असू शकतात म्हणून तयार झालेले खत चाळून मगच त्याचा उपयोग केला जातो असे ऐकून आहे. गांडुळ खत तयार करुन ते विकले जाते आणि त्याला बरी किंमत येते असेही ऐकून आहे.

ओला कचरा विघटित होताना त्यातून ऊर्जा बाहेर पडते आणि तापमान वाढते. या स्थितीमध्ये गांडुळे मरण्याची शक्यता असते. मातीने भरलेल्या कुंडीत आपण वरती ओला कचरा टाकला तर त्या वेळी गांडुळे खोल मातीत जाऊन वाढलेल्या तापमानापासून आपले रक्षण करतात. त्यामुळे मातीचे थर आणि कचर्‍याचे थर आणि पाणी यांत योग्य संतूलन आवश्यक असते. (थोडा अनुभव आणि थोडी वाचीव-ऐकीव माहिती :) )

चहाच्या चोथ्यामुळे चिलटे आकृष्ट होतात तसेच फळे, भाज्या यांमुळे माश्या सुद्धा येऊ शकतात. ओला कचरा टाकला की त्यावर थोडी माती पसरावी म्हणजे यावर उपाय होऊ शकतो. झुरळे वगैरे होतात की नाही याची कल्पना नाही. मी हे प्रयोग बागेत केल्यामुळे कीटकांचा कधी त्रास जाणवला नाही.

घरातल्या खत निर्मितीसाठी कचरा वाळवून मग त्याचा वापर हा पर्याय मी आपल्याकडून प्रथमच ऐकला. घरातल्या खतनिर्मितीसाठी हा उपाय चांगला ठरत असावा असे आपल्या अनुभवातून दिसते.

''अक्षय पात्राची'' माहिती मिळाली की मिपावर फोटोसहित जरुर द्या.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

विकास's picture

19 Jun 2009 - 6:01 pm | विकास

चांगली माहीती लिखाळराव!

>>>''अक्षय पात्राची'' माहिती मिळाली की मिपावर फोटोसहित जरुर द्या.<<<

हेच म्हणतो!

कोंबडी's picture

19 Jun 2009 - 6:36 pm | कोंबडी

ताम्हनकरांशी संपर्क झाला आणि माहिती इमेल वर मिळाली. इतरांना पाठवण्याची परवानगीही मिळाली. ते लवकरच करीन.

- कोंबडी

चतुरंग's picture

19 Jun 2009 - 10:55 pm | चतुरंग

तुमच्या माहितीची वाट बघतोय!

चतुरंग

कुलदीप चव्हाण's picture

11 Mar 2015 - 7:58 pm | कुलदीप चव्हाण
कोंबडी, ब्राउज करता करता या पेजवर आलो. कृपया या दोन पीडीफ खालील ईमेल आय डी वर पाठवा, ही विनन्ती. kulmail@gmail.com
भाग्यश्री's picture

19 Jun 2009 - 11:03 pm | भाग्यश्री

अतिशय उपयुक्त माहीती इथे मिळेल..
http://www.maayboli.com/node/5886

http://www.bhagyashree.co.cc/

लोकहो,

ताम्हनकरांनी दिलेली माहिती (दोन पीडीएफ फाइल्स) इथे ठेवल्या आहेत. वाचता न आल्यास सांगणे.

विकासराव,
दोनच आठवड्यांपूर्वी पुणे ते बॉस्टनमधील तुमच्या घराच्या स्वयंपाकघरापर्यंत प्रवास घडला होता. अजून दहा एक फुटावरच असलेल्या तुमच्या अविरत पात्राचं दर्शन मात्र नशिबात नव्हतं म्हणायचं :)!

भाग्यश्री,
मायबोलीवरची माहिती छानच आहे. नीट वाचीन. त्यांतील काही व्यक्तींशी आधीच संपर्क झालेला आहे.

लिखाळराव,
तुमची पद्धत माझ्या पद्धतीशी जुळते.

मी कचरा आधी दिवसभर परातीत उघड्यावर ठेवतो. भाज्यांची पानं साली वगैरे फार मोठी असतील तर त्याचे जरा बारीक तुकडे करतो. दिवसभरानंतर आर्द्रता आणि जास्तीचे पाणी आपोआप कमी होते. मग कचरा मातीच्या उभ्या कुंडीत रचतो. दोनेक दिवसांनी एखादी तार किंवा बारीक काठी घेऊन थोडी उचकाउचकी/चाळवाचाळव केली की आत तयार झालेली उष्णता बाहेर पडायला मदत होते आणि आतल्या कचर्‍याला कुजायला हवा मिळते. सुकत गेला की कचरा खाली खाली बसत जातो आणि एक कुंडी बरेच दिवस पुरते.

कचरा पुरेसा कुजला की मगच त्याची रवानगी गांडुळं असलेल्या कुंड्यांत होते. हेतू हा, की सुरुवातीच्या दिवसांत कुजताना तयार झालेल्या उष्णतेमुळे गांडुळं मरू नयेत. गांडुळांच्या कुंडीवर झाकण ठेवून आत अंधार झाला, की गांडुळं वरपर्यंत निर्धास्तपणे येतात. सुरुवातीच्या काही दिवसांत तळातळाशी असलेली गांडुळं आतलं अन्न पचवून संपू लागलं की वरवरही दिसायला लागतात. दिवसाकाठी एकदा थोडं पाणी शिंपून आतला ओलावा कायम ठेवावा लागतो. कुंडीतला कचरा भुसभुशीत दिसायलाला लागला की मग तो चाळून खत काढून घ्यायचं आणि उरलेले लंप्स आणि गांडुळं परत आत टाकायची!

एकदा स्वतः करून बघण्यास पर्याय नाही. एकदोन प्रयत्नांत ओल्या-कोरड्याच्या प्रमाणाचा अंदाज यायला लागेल. माझे प्रयोग दोनदा चुकले. कचर्‍यातील पाण्याचं प्रमाण जास्त झाल्याने गटारासारखा वास आणि अळ्या वगैरेंची शिक्षा मिळाली. मग लायनीवर आलो.

ताम्हनकरांच्या बोलण्यातून जाणवलं (अजून त्यांचं इ-पुस्तक वाचलेलं नाहीये) की त्यांनी शेवटच्या चाळणी प्रक्रियेली चाट दिली आहे. रोजच्या रोज जरा अधिक पाणी घालून गांडुळांनी तयार केलेलं घन आणि द्रव खताचा बाहेर निचरा करायचा आणि ते द्रावण झाडांसाठी रोजच्या रोज वापरायचं अशी आयडिया आहे!

- कोंबडी

विसोबा खेचर's picture

20 Jun 2009 - 12:36 am | विसोबा खेचर

ताम्हनकरांनी दिलेली माहिती (दोन पीडीएफ फाइल्स) इथे ठेवल्या आहेत. वाचता न आल्यास सांगणे.

या निमित्ताने ताम्हनकरांची शून्य कचरा ही पुस्तिका जालावर उपलब्ध झाली याचा आनंद वाटतो..

मी नेहमी ताम्हन्करांच्या घरी जातो. नेहमी चांगली धष्टपुष्ट, जाडजूड गांडुळे त्यांच्या घरी पाहायला मिळतात. त्यांच्या बाल्कनीमध्ये काही कुंड्या, रोपवाटिकाही आहेत.

घरचं गांडूळखत खाऊन खाऊन त्यातली सर्व रोपं नेहमी चांगली टरारलेली असतात! :)

ताम्हनकरांचं खरंच कौतुक वाटतं!

आपला,
(धष्टपुष्ट, जाडजूड आणि टरारलेला) तात्या.

विकास's picture

20 Jun 2009 - 12:48 am | विकास

ताम्हनकरांच्या दोन्ही पिडीएफ उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!

त्यांची शुन्य कचर्‍यावरील पुस्तिका आवडली.

पक्या's picture

20 Jun 2009 - 12:34 am | पक्या

छान उपयुक्त माहिती. धन्यवाद.

धनंजय's picture

20 Jun 2009 - 2:10 am | धनंजय

चांगली माहिती. धन्यवाद.

ताम्हनकरांच्या कामाचे अप्रूप वाटते.

दिपाली पाटिल's picture

20 Jun 2009 - 6:44 am | दिपाली पाटिल

आपण जर कचरा कुंडी च्या वर च टाकला आणि त्यात गांडुळ सोड्ले तर ...
१) कचर्‍या चा वास येत नाही कां?
२) कचर्‍यातील अन्न संपलं की गांडुळ बाहेर निघुन जातात कां?
इकडे अमेरिकेत मी पहील्या मजल्यावर राहते आणि माझ्या बाल्कनी ला लाकडी फळ्या आहेत , त्या फळ्यांमध्ये १ इंच मोकळी जागा आहे नाहीतर गांडुळं बाहेर पडली तर मला बाहेर पडावं लागेल. :)

दिपाली :)

विकास's picture

20 Jun 2009 - 6:57 am | विकास

>>>इकडे अमेरिकेत मी पहील्या मजल्यावर राहते आणि माझ्या बाल्कनी ला लाकडी फळ्या आहेत , त्या फळ्यांमध्ये १ इंच मोकळी जागा आहे नाहीतर गांडुळं बाहेर पडली तर मला बाहेर पडावं लागेल.<<<

अमेरिकेत आपण कुठे राहता यावर अवलंबून आहे पण थंडप्रदेशात असाल (दक्षिणे कडे अथवा कॅलिफोर्नियात नसाल) तर गांडूळांच्या ऐवजी आपोआप एक वेगळीच "इ़कॉलॉजी" तयार होते ज्यात "स्थानिक किडे (बग्ज)" येऊन ते अन्न म्हणून वापरतात.

मात्र आपण जर अपार्टमेंट काँम्प्लेक्स मधे रहात असाल तर मी शक्यतो (असे विचारणार्‍यांना) लँडलॉर्ड/प्रॉपर्टी मॅनेजमेंटची आधी परवानगी घेयला सांगतो नाहीतर येथील कटकटी वेगळ्या असतात... बाकी फळ्यांमधली मो़कळी जागा काही "प्रॉब्लेम" करणार नाही किंबहुना ते उपयुक्त ठरण्याची शक्यताच जास्त.

त्या व्यतिरीक्त काही दिवसांपुर्वी मी "होल फुड्स" या ऑर्गॅनिक ग्रोसरीच्या दुकानात $१५ ला अन्न काँपोस्ट करायला कंटेनर्स पाहीले होते ज्यात त्यांनी वास निघून जाण्यासाठी कार्बन फिल्टर्स वापरले होते. आत्ता जालावर शोधायचा प्रयत्न केला पण पटकन दिसले नाही. जवळ पास होलफूड्स असल्यास चौकशी करून पहा.

सहज's picture

20 Jun 2009 - 8:41 am | सहज

१९९३ ते २००२ चे जवळजवळ एक दशक आमच्या पुण्यातील घरातील बाल्कनीत आम्ही हा प्रकार केला होता. घरातील ओलाकचरा अश्याप्रकारे रिसायकल व्हायचा.
१) कचर्‍याचा वास येत नाही कां?
बाल्कनीत असल्याने नाही येत.

२) कचर्‍यातील अन्न संपलं की गांडुळ बाहेर निघुन जातात कां?
अशी वेळ येउ देउ नका :-) का उपासमार करायची घरातील पाहुण्यांची. जोक्स अपार्ट, गांडूळे कधीच बाहेर आली नाहीत. अर्थात आमच्याकडे दोन बॉक्स होते त्यामुळे आलटुन पालटून काळीशार माती झाली की अनुभवाने कळले होते. ती काढून इतर रोपांना व खाली बागेत वापरायचो. आता विसरल्याने नक्की किती दिवस लागायचे इ. विसरलो आहे तसेच ते सगळे काम बहीण बघायची म्हणुनही :-)

जरुर करुन बघा. त्यावेळी मधे पुण्यात बहुदा उदय भवाळकर नावाचे एकजण होते त्यांची संस्था या क्षेत्रात कार्यरत होती.

नितिन थत्ते's picture

20 Jun 2009 - 10:40 am | नितिन थत्ते

कचर्‍याच्या वासावर ताम्हनकरांनी माती पसरणे हा उपाय सांगितला आहे. तसेच झेंडूची फुले (अत्र्यांची नाही) पसरून टाकली असता चिलटांचा त्रास होत नाही असे म्हटले आहे. इतर सर्व कीटकनाशकांप्रमाणेच कीटक झेंडूच्या वासाला सरावतात असेही त्यांनी म्हटले आहे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

जागु's picture

20 Jun 2009 - 11:46 am | जागु

मला आधी खुप आवड होती गार्डनिंग ची. तेंव्हा मी हे असले उद्योग करत होते. आता वेळ कमी पडतो.

कोंबडी तुम्हाला खत कशासाठी हवे आहे कुंड्यांमध्ये टाकण्यासाठी की मोकळ्या जागेतील झाडांसाठी ?

कोंबडी's picture

20 Jun 2009 - 2:54 pm | कोंबडी

खरं तर कचरा घराबाहेर टाकायचा नाहीये. खत मिळालेच तर ते घरातल्या कुंड्यांसाठी.

जागु's picture

20 Jun 2009 - 3:21 pm | जागु

मग हा कचरा कुंड्यांमध्ये टाका. जर नॉनव्हेज खात असाल तर नॉन्व्हेज धुतलेल पाणि पण ह्या कुंड्यांमध्ये घाला हे सुद्धा खुप परिणामकारक खत आहे.

मैत्र's picture

22 Jun 2009 - 2:07 pm | मैत्र

कोंबडी... तुम्ही पुण्यात आहात असं दिसतंय.
मग ठाण्यापर्यंत जाण्याऐवजी उदय भवाळकरांशी संपर्क साधू शकता.
ते या क्षेत्रात बरीच वर्षे काम करत आहेत.

Bhawalkar's Earthworm Research Institute
A-1, Padma Park
Behind Padmawati Temple
Pune-Satara Road
Pune- 411009
INDIA

Tel: +91-20-2422 6916, +91-20-2422 5208
Email: bvpl@vsnl.com
www.ecoguru.org

संस्थळ चालू आहे की नाही माहीत नाही. पण पत्ता व दूरध्वनी बरोबर आहे.

एस's picture

12 Mar 2015 - 9:59 am | एस

वाचनखूण साठवली आहे. उपयुक्त धागा. या विषयावर मिपाकरांचे आणखी अनुभव वाचायला आवडेल.

त्या पीडीएफ काही दिसत नाहीत दुव्यावर क्लिक केल्यावर.
www.ecoguru.org ही साईट मात्र चालू आहे.

मलाही बर्याच दिवसापासुन ही माहिती हवी होती.धागा वर आणणार्याना धन्यवाद.
शुन्य कचरावर अजुन वाचायला आवडेल.