तुम्ही कधी प्रेम केलय का? तुम्हाला प्रियकर्/प्रेयसी आहे किंवा होता/होती का?
हे करायलाच हवं का? कुणी काही विचारलं तर होकार द्यायलाच हवा का?
होकार दिल्यास विवाहाचं बंधन "मस्ट" आहे का? विवाहाशिवायही खर खुरं , जेन्युइन नातं असु शकता का?
प्रेम विवाह न केल्यास आयुष्यं म्हणजे वैराण आहे का?
आपल्यासाठी अमुकच एक जण अगदी अचुक, अनुरुप आहे हे ओळखायचा काही राजमार्ग कुणाला माहित आहे का?
आज आवडलेली व्यक्ती जन्मभर अशीच आवडु शकते का? नंतर आवड कमी झाली तर सुटायचा काही बिन गुंतागुंतीचा मार्ग आहे का?
तिच्याशी जन्मभर हे सगळं अस्सच मनापासुन जमेल का?
सगळ्यांनाच हे प्रश्न पडतात की माझा मलाच भ्रम होतोय का?
थोडासा वेळ घेतला मागुन तर काही प्रलय होण्याचा संभव आहे का? नाही केली मागणी कबुल तरी नातं शाबुत राहु शकतं का?
भ्रमात पडलोय मी कुणी मदत करणार का?
कुणी केलीच मदत तर या बाबतीत त्या मदतीचा उपयोग आहे का?
आला आहे मला तो वेडाचा झटका आहे का?
सांगा....
सांगा मला कुणी मला मदत करणार का?
प्रतिक्रिया
13 Jun 2009 - 9:17 am | Nile
तुम्ही आज सकाळी सकाळीच घेतली आहे का? ;)
13 Jun 2009 - 9:29 am | स्व
हे असं एवढं सगळं असल्यावर काही घ्यायची गरज आहे का?
तिला "हो" म्हटलं तर कुणी वाचवायला येणार आहे का?
बाय द वे,
तुम्ही हे लिखाण एका लयीत, गझले सारखा वाचायचा प्रय्त्न केला आहे का?
वाचुन तुम्हला त्यातली काही लय सापडली का?
प्रतिसादा साठी वेगळे आभार मानायची गरज आहे का?
जीवन आणि प्रेम माझं हे सगळंच थट्टा आहे का?
का का आणि का?
13 Jun 2009 - 9:36 am | Nile
माझा प्रतिसात त्या लयीतच नाही का?
तिला "कुणाच्या नादी लागलीस" असं विचारुन पाहीलंय का? ;)
13 Jun 2009 - 9:41 am | स्व
विचारला ना...
बोललो मी....
बोलुन थकलो मी.......
तिच्या डोक्यात हे सगळं कधी जाणार आहे का?
शुद्धीवर येउन ती कधीतरी माझं मोजमाप करेल का?
नसेल येणार सध्या तर येउच नये तिला शुद्धी जन्मभर.
अशेच जगु आम्ही आमचं जीवनच किती?-- ओंजळभर!!
13 Jun 2009 - 9:30 am | अनामिक
हा हा हा... काय बरोबर ओळखलंस रे नाईल!
स्व... तुम्हाला वेडाचा झटका आला नसला तरी मला आता नक्की वेडाचा झटका येईलसे वाट्टेय!!
:O
-अनामिक
13 Jun 2009 - 9:37 am | स्व
अनामिक,
इथं प्रेमात पडातोय मी आणि वेडे तुम्ही होणार का?
येव्हढे हुशार तुम्ही काही उपाय नाही सांगणार का?
तुमच्या क्रांतिकारकांच्या लेखाचा फ्यान मी,
माझी हीच किंमत करणार का?
मेलो आहे मी....
कुणी संजीवनी देणार का?
13 Jun 2009 - 11:49 am | पर्नल नेने मराठे
:S
चुचु
13 Jun 2009 - 9:49 am | Nile
यांची कामातुन गेलेली केस दिसतेय का?
यांना विप्रंकडे पाठवु या का? :D (ह.घ्या हो गुर्जी! :) )
13 Jun 2009 - 12:03 pm | विनायक प्रभू
विज येण्याची वाट बघत आहे.
अंतीम यात्रा खोळंबलेली आहे.
13 Jun 2009 - 9:49 am | मराठमोळा
अहो "स्व" राजे, हे नुसतच मुक्तक म्हणुन लिहिलं आहे तर मग ठिक आहे, परंतु खरच त्या परिस्थितुन जात असाल तर मग हे प्रश्न दुसर्या कुणालाही न विचारणे योग्य. कधी ना कधी हे प्रश्न सर्वांनाच पडतात पण त्यांची उत्तरे सुद्धा स्वतःच शोधावी लागतात. दुसर्याला लागु पडलेले औषध आपल्याला ही लागु पडेलच असे नाही.
जे होईल ते चांगल्यासाठीच असे मानुन चालत रहा. आयुष्याची मजा घ्या.
(कोणताही निर्णय घेतलात तरी दृष्टीकोन सकारात्मक ठेवा. ;) )
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
13 Jun 2009 - 10:14 am | टारझन
काय हो तुमचाही बोळा तुंबला आहे का ?
त्यासाठी तुम्ही गटणेंचे माग्लदर्षण घेतले होते का ?
इथे काथ्याकुट टाकण्यापुर्वी काही विचार केला होता का?
सकाळ सकाळ उठून "होत नाही म्हणून" हा कुंथणारा काथ्याकुट टाकला आहे का ?
प्रेमात दुसर्याचे सल्ले घेणे योग्य आहे का ?
उगाच मिळाले लिहायला म्हणून रेघोट्या मारणे चालते का ?
इथे हुशार लोकं आहेत मग त्यांजकडून दिशाभुल करून आपला "राजे" करण्याचा मानस नसेल का ? (राजे बाबा माफ कर रे ;) )
प्रतिसाद वाचण्याआधी सगळे हलकेच घेतले आहे का ?
(काका ? वाचून झालंय आता वाचवून काही फायदा नाही )
टारोबा पेशवे
13 Jun 2009 - 10:56 am | दशानन
आवशीचा गो !
=))
अग्ग्गाअग्ग्गा
काय लिव्हलं य काय लिव्हल यं रे तु ;)
थोडेसं नवीन !
13 Jun 2009 - 11:56 am | परिकथेतील राजकुमार
टार्याखविसाच्या तावडीत हा लेख सापडलाच का ?
च्यायला टार्या आपल्याला तुझी गझल लै आवडली बॉ !! एकदम तरल आणी भावस्पर्शी का काय म्हणतात त्याच्या बरोब्बर विरुद्ध अशी झाली आहे.
वेताळकाकांकडून ह्याला चाल लावुन घेउन देवबाप्पांना खुन्नस देउया काय ? ;)
विचारवंत
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
18 Jun 2009 - 8:27 am | विसोबा खेचर
हम्म!
अ केस ऑफ सिरियस इंटेलेच्युअल मास्टरबेशन!
तात्या.
18 Jun 2009 - 5:41 pm | सूहास (not verified)
<<<अ केस ऑफ सिरियस इंटेलेच्युअल मास्टरबेशन!>>>
ह्या ह्या ह्या...ह्या ह्या ह्या...ह्या ह्या ह्या...
सुहास