गाभा:
मराठी मधे अनेक शब्द वापरले जातात्.त्यातले काही टिकतात्.काही विसरले जातात.
उदा: अंमळ आणि खुश्की हे दोन शब्द कोठे गेले
अंमळ हा जरा/ थोडेसे या अर्थाने वापरला जायचा तो ही दे जरा अंमळ थोडेसे...किंवा मी जरा अंमळ झोपतो थोडसा. अशा प्रकारे वापरात होता.
हा शब्द कोणत्या भाशेतुन मराठीत आला? त्याचा नक्की अर्थ काय?
खुश्की हा फारशी शब्द्..जमीन(कोरडे ठिकाण) या अर्थाने वापरला जायचा .इतिहासात तुर्कानी इस्तान्बुल शहाराचा ताबा घेतला आणि युरोपियन लोकना भारातात येण्याचा खुश्कीचा मर्ग बन्द झाला.( या एकमेव वाक्याशिवाय हा शब्द मी कोठिही ऐकला नाही)
असे आणखिही काही शब्द तुम्हाला महित असले तर लिहा
आपला विजुभाऊ
प्रतिक्रिया
25 Feb 2008 - 4:56 pm | अवलिया
अडचण - हल्ली लोक सर्रास प्रोब्लेम असा आंग्ल शब्द वापरतात
मंडळी - मिसेस (उच्चार मिशेस)
कुटुंब - फ्यामिल्ली
सोडुन दे - ड्रोप कर
भोजन, जेवण - लंच डिनर
भेटायला कुणी आले आहे - गेस्ट आले आहेत
पाहुणे - रिलेटिव
डोके दुखत आहे - डोक्याला हेडेक आहे
नाना
25 Feb 2008 - 5:05 pm | विजुभाऊ
नाना आपण मराठी शब्दांबद्दल बोलुया....
उदा:मातेरं...... त्याने चांगल्या गोश्टीचे मातेरं केलं ( मातेरं नेहमी चांगल्या गोश्टीचे च होते.....वाइट गोश्टीचे होत नाही)
मातेरं हा शब्द कोणत्या भाशेतुन मराठीत आला? त्याचा नक्की अर्थ काय?
25 Feb 2008 - 7:20 pm | जुना अभिजित
माझ्या माहितीप्रमाणे चांगलं कापड वापरून जूनं झालं की पाय पुसणी म्हणून किंवा फरशी पुसायला वापरतात त्याला मातेरं म्हणतात.
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
25 Feb 2008 - 8:53 pm | चतुरंग
पोतेरं! (मातेरंचं पोतेरं करु नकोस रे अभिजिता!;)
चतुरंग
31 Jul 2009 - 7:42 pm | फ्रॅक्चर बंड्या
पोतेरं : घरातल्या भिंतीना कापडाच्या सहाय्याने मातीचा लेप देणे..
बहुतेक वेळा चुलीच्या खोलीत देतात कारण तिथे भिंत काळी होते
31 Jul 2009 - 7:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पोचारा : असाही शब्द वाचण्यात आहे. चुलीभोवती पांढर्या मातीने लेप दिल्या जायचा.
-दिलीप बिरुटे
26 Feb 2008 - 1:31 pm | सृष्टीलावण्या
म्हणजे कुठल्याही गोष्टीला मुठमाती देणे, ती गोष्ट पूर्ण मातीत गाडणे...
मातेरं नेहेमी चांगली गोष्ट वाईट होण्याबद्दल म्हटले जाते पण जर एखादी गोष्ट चांगली झाली तर त्याला त्या गोष्टीचे सोने झाले असे म्हणतात.
25 Feb 2008 - 5:55 pm | वडापाव
हा शब्द सर्वजण विसरलेच आहेत जणू. आता तर कपाट हा शब्द सुध्दा 'कप्बोर्ड' या नावाने संबोधला जातो. अर्थातकपाट हा शब्द याच इंग्रजी शब्दामुळे अस्तित्वात आला.
25 Feb 2008 - 6:53 pm | धनंजय
कपाट शब्द महाभारतात सापडतो. तिथे आणि जुन्या मराठीत, अर्थ दरवाजा. (म्हणजे द्वार नव्हे, तर जे उघड-बंद होते ते.)दरवाजे असलेल्या फडताळाला कपाट म्हणू लागले असावेत.
1 Aug 2009 - 1:53 am | मस्त कलंदर
कपाट म्हणजे दरवाजा नाही.. तो शब्द कवाड आहे...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
1 Aug 2009 - 2:49 am | धनंजय
मोल्सवर्थच्या शब्दकोशाचे दुवे बघावेत :
कपाट
कवाड
*
25 Feb 2008 - 6:26 pm | विजुभाऊ
मित्रानो आपण फक्त मराठी शब्दांबद्दल बोलुया
कपाट याला फडताळ हा अस्सल मराठी शब्द आहे.
पण फडताळ हा शब्द तरी कोठुन आला?
पण अंमळ आणि खुश्की हे दोन शब्द हल्ली वापरातच नाहीत
कोडगा : मारावयाचे एक साधन(Hunter)
हा शब्द निगरगट्ट या अर्थाने केंव्हा पासुन वापरायला सुरुवात झाली?
रोडगा म्हणजे काय? आणि तो मरिआई ला का वहातात?
25 Feb 2008 - 7:02 pm | धनंजय
कोडगा म्हणजे लाथाबुक्क्यांचा मार, चाबकाचा नव्हेचाबकासाठी "कोरडा" असा शब्द प्रचलित आहे. कोडगेखाऊ म्हणजे मार=कोडगे खाऊन निर्ढावलेला, निर्लज्ज. कोडगा शब्दाचा तोही अर्थ - लघुकरण असावे. रोडगा रोट शब्दापासून, कणकेत थोडे बेसन आणि मसाले घालून त्याची जाडी पोळी. तो मरीआईला का वाहातात माहीत नाही - एकनाथांच्या भारुडात तसा उल्लेख आहे.
25 Feb 2008 - 8:52 pm | सुधीर कांदळकर
तस्मै नमः। दुसरे काय? ज्ञानेश्वरांच्या काळचे शब्द आता अस्तंगत झालेले आहेत. शतपत्रांतील भाषा, टिळक आगरकारांची भाषा आठवा. किती वेगळी आहे. आपले वय ठाऊक नाही. पण किमान २५ धरतो. १५ वर्षापूर्वीची भाषा आता तशीच कशी राहील. जशी शेकस्पीअरची इंग्रजी बदलली तशीच ज्ञानदेवांची मराठी देखील बदलली. तिने मोगलाईत फारसी शब्द उचलले. इंग्रजांच्या राज्यात इंग्रजी शब्द उचलले. गोव्यात तिने पोर्तुगीज शब्द उचलले. उदा. शेटजी या अर्थाने बोलला जाणारा पात्रांव हा शब्द. भाषा बदलणारच. बदल हे जिवंतपणाचे लक्षण आहे. नाही बदलली तर ती मृत होईल. काळजी करू नये. आता तर मराठी बोलणारांची कॉल सेंटर्स उघडत आहेत. या बदलाला सम्यक दृष्टीने सामोरे जायला हवे. नव्हे बदलाचे स्वागतच करायला हवे.
25 Feb 2008 - 9:33 pm | प्राजु
सुधिर कांदळकर म्हणतात ते खरंच आहे. बदल हे जिवंतपणाचे लक्षण आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
25 Feb 2008 - 9:51 pm | चतुरंग
बी.बी.सी. रेडियोच्या अनेक भाषातील वाहिन्या आहेत त्यातल्या हिंदी वाहिनीवर एकदा एका चर्चेत एक इंग्लिश माणूस हिंदीतून बोलत होता अचानक त्याने असा एक शब्द वापरला की जो हिंदी वाटावा, पण तो हिंदी नव्हता. लगेच तिथल्या हिंदी भाषक भारतीयाने त्याला सांगितले "आप ने जो शब्द अभी इस्तेमाल किया उस तरह का शब्द हिंदी में नहीं हैं." ताबडतोब इंग्लिश माणसाने उत्तर दिले "नहीं हैं तो होना चाहिये!" आणि ते खरं आहे. इंग्लिश भाषा वेगाने विकसित होण्यामागचे एक मोठे कारण त्या भाषेने स्वीकारलेले नवनवीन शब्द - धोती, कुर्ता, पजामा, गुरु असे कितीतरी शब्द आज इंग्लिश भाषेने आत्मसात केलेले आहेत.
चतुरंग
25 Feb 2008 - 11:33 pm | पिवळा डांबिस
किंबहुना = परंतु = पण
पोशाख
मतलई = खारे वारे आणि मतलई वारे
एकसमयावेच्छेदेकरून = ?
वस्तुतः
सध्या इतकेच आठवतात, आज रात्री "पण लक्षात कोण घेतो?" उघडून बसतो, बख्खळ शब्द मिळतील! :))
26 Feb 2008 - 9:44 am | प्रमोद देव
किंबहुना = परंतु = पणहा अर्थ योग्य नाही.योग्य अर्थ खालीलप्रमाणे आहे.किंबहुना= बहुधा, किंवा
27 Feb 2008 - 2:23 am | पिवळा डांबिस
आपण म्हणता तो अर्थ असू शकेल.
चू. भू. द्या. घ्या.
-पिवळा डांबिस
26 Feb 2008 - 1:16 am | चतुरंग
माझे आजोबा वापरत ते काही शब्द -
काळोख (अंधार)
रुची (चव) (आज तोंडाला रुची नाही.)
भुरका (कढीचा वैगेरे मारतात तो भुरका, घोट मधे ती मजा नाही:)
कढत (गरम. पण कढत ह्या शब्दात एक वाफाळलेपणाची छटा आहे उदा. ऊनून भातावर कढत पिठले वाढले!:)
थट्टा (चेष्टा, मस्करी.) ह्या मधे मित्रत्वाने केलेली असल्याचा भास आहे.
स्नेही (मित्र). ह्या मधे आपलेपणा, जिव्हाळा अशाही छटा जाणवतात.
चतुरंग
26 Feb 2008 - 1:51 am | धनंजय
"मळभ" - ढग भरून आलेले आकाश (बहुतेक पावसाळी ढग नव्हेत)"आंबोण" - म्हशीला घालायचे आंबलेले अन्न
26 Feb 2008 - 6:37 am | प्राजु
माझ्या आजीचे शब्द :
मोरी : बाथरूम्/न्हाणीघरशिंकाळं : वरती टांगून ठेवलेलं मडकंपरसदार : बॅक यार्डचुलवण : चूल्(बहुतेक)
- (सर्वव्यापी)प्राजु
26 Feb 2008 - 9:27 am | जुना अभिजित
ह्या चित्रात बाजूची कढई ज्यावर ठेवली आहे त्याला चुलवण म्हणतात.
जाळाच्या नुसत्या धगीवर कढई गरम राहते. स्लो हीटींग.
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
26 Feb 2008 - 7:02 pm | धनंजय
छान आठवण आली चित्र बघून. आमच्याकडे त्या शेजारच्या जागेला "वैल" म्हणतात.
3 Aug 2009 - 2:20 pm | रम्या
आणि आमच्या कोल्हापूरात त्याला "वाईल" म्हणतात. माझी आत्ती म्हणते "भात मुरायला वायलावर ठेव".
आम्ही येथे पडीक असतो!
26 Feb 2008 - 11:00 am | विजुभाऊ
भुरका (कढीचा वैगेरे मारतात तो भुरका, घोट मधे ती मजा नाही:)
घोट घोट घेतात ते वेग्ळेच असते रे चतुरंगा
उसासे टाकणे म्हणजे काय?
माळवद म्हणजे काय?
वानगी म्हणजे उदाहरण्...उदः वानगी दाखल.
दाखल.....दखल आणि दाखला हे समानार्थी शब्द आहेत काय?
त्यांचे नक्कि अर्थ काय? ते कोणत्या भाषेतुन आले?
26 Feb 2008 - 8:49 pm | चतुरंग
उसासे टाकणे म्हणजे काय? उसासे टाकणे = म्हणजे तात्या आणि डांबिसकाका छानपैकी मैफिल जमवून 'घेत' बसले आहेत आणि विजुभाऊ नुसतेच बघत बसले आहेत त्यावेळी जे सुस्कारे टाकतील त्याला म्हणतात ;)
ह्या शिवाय शिवकालीन किंवा पेशवेकालीन खापरी नळांमधून जे पाणी गावात आणीत असत त्या नळांतून मधे अडकलेली हवा बाहेर निघून जाण्यासाठी नळांवर उंच जागी दीपमाळेसारखे झरोके ठेवलेले असत त्याला 'उसासे' म्हणत (आजच्या तांत्रिक भाषेत "एअर रिलीज वॉल्व")
माळवद म्हणजे काय?माळवद = गच्ची (हा शब्द अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक इ. भागात प्रचलित आहे)
वानगी म्हणजे उदाहरण्...उदः वानगी दाखल.
दाखल.....दखल आणि दाखला हे समानार्थी शब्द आहेत काय?दाखल = हजर होणे / भरती करणे (शिपाई सैन्यात दाखल झाला),(रोग्याला इस्पितळात दाखल केले)
दखल = नोंद घेणे (इस्पितळात आलेल्या रोग्याची डॉक्टरांनी दखलही घेतली नाही)
दाखला = उदाहरण/सर्टिफिकेट (हा महाराजांच्या मुत्सद्देगिरीचा दाखला होता) (त्याने जन्माचा दाखला मागितला).चतुरंग
27 Feb 2008 - 2:28 am | पिवळा डांबिस
उसासे टाकणे = म्हणजे तात्या आणि डांबिसकाका छानपैकी मैफिल जमवून 'घेत' बसले आहेत आणि विजुभाऊ नुसतेच बघत बसले आहेत त्यावेळी जे सुस्कारे टाकतील त्याला म्हणतात ;)
क्या बात है चतुरंगजी, आज नुसती फटकेबाजी चाललीये!! :))
26 Feb 2008 - 11:02 am | विजुभाऊ
मुमुक्शू :- याचा अर्थ काय?
26 Feb 2008 - 1:24 pm | सृष्टीलावण्या
म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा (आणि अर्थातच त्यासाठी कठोर तपाचरण
करणारा असा)
असाच एक सध्या निर्वापरातला शब्द म्हणजे निर्जळा जो संकष्टी, एकादशीला उपासासाठी वापरत असत.
पूर्वी उपास साबुदाणा खिचडी, शेंगदाणा आमटी, वेफर्स असा चविष्ट न करता शरीराला झीज होईल असा केला जायचा, निर्जळा एकादशी ही त्यापैकी एक.
निर् +जल = पाणी सुद्धा न घेता.
26 Feb 2008 - 1:34 pm | विजुभाऊ
धन्यवाद सृष्टीलावण्य
तुम्हाला मायंदाळ धन्यवाद.
असेच आमच्या टकुर्यात जरा भर घालत जा.
26 Feb 2008 - 1:46 pm | रिकामटेकडा
चुलीच्या बाजूला आहे तीला वैल म्हणतात.सध्या किल्ली या ऐवजी चावी आणि कुंचा या शब्दा ऐवजी झाडू हे शब्द प्रचलित आहेत
26 Feb 2008 - 4:23 pm | विजुभाऊ
दळभद्री : ह शब्द खरेतर हद्दपार झालेला....पण तो टिकवण्याचे श्रेय मात्र थोरल्या ठाकर्यांचे.
पण हा शब्द ही कसा कोठुन आला?
26 Feb 2008 - 4:23 pm | विजुभाऊ
दळभद्री : ह शब्द खरेतर हद्दपार झालेला....पण तो टिकवण्याचे श्रेय मात्र थोरल्या ठाकर्यांचे.
पण हा शब्द ही कसा कोठुन आला?
26 Feb 2008 - 4:24 pm | विजुभाऊ
दळभद्री : ह शब्द खरेतर हद्दपार झालेला....पण तो टिकवण्याचे श्रेय मात्र थोरल्या ठाकर्यांचे.
पण हा शब्द ही कसा कोठुन आला?
26 Feb 2008 - 9:24 pm | सुधीर कांदळकर
दोन शब्द आताच कळले. चुलवण वाचला होता. पण अर्थ आता कळला. माळवद हा शब्द अडगळ ठेवलेला पोटमाळा या अर्थाने वाचल्याचे आठवते. एका कथेत आजी नैवेद्यासाठी फराळ शिजवईत असते. त्यात आजोबा हात घालू नये म्हणून ती आजोबांना माळवदावर चढून काहीतरी काढायला सांगते. व ते चढले की शिडी काढून घेते. शेजारचा ८ वर्षाचा मुलगा तेथे असतो. शिडी लावावी म्ह्णून आजोबा वरून तर लावू नये म्हणून आजी खालून त्याला दटावत असतात. अशी गंमतीदार गोष्ट होती. म्हणून खास लक्षात राहिली.
26 Feb 2008 - 9:25 pm | सुधीर कांदळकर
वरील बाकी सर्वांस धन्यवाद.
26 Feb 2008 - 11:17 pm | प्रभाकर पेठकर
मॅनिला = सदरा = शर्टविजार = पँटश्मश्रू = केस कापणेजाजम = गालिचा = कार्पेटओगराळं = आमटी वाढण्याचं पात्रडोया = माठातून पाणी काढण्याचा डाव किंवा दांडी असलेलं भांडंपरस = घराची मागची बाजूघडवंची = तिवई = तीनपायी (ज्यावर माठ, छोटे पिंप ठेवतात)छबिना = आरसा (?)चंची = कमरेला अडकवायची पानाची कापडी पिशवी.कसा = कमरेला अडकवायची पैशाची कापडी पिशवी.चंबू = लहान मुलांचे विशिष्ट आकाराचे पाण्याचे भांडे.गुडदाणी = गुळ आणि दाण्याची चिक्की (?).छकडा = अच्छादित बैलगाडी.पांगुळगाडा = लहान मुलांस चालायला शिकण्यास मदत करणारा गाडाअवजारं = व्यावसायिक हत्यारं (शेतीची, सुताराची, नाव्ह्याची इ.)
31 Jul 2009 - 7:35 pm | फ्रॅक्चर बंड्या
छकडा = बैलगाड्यांच्या शर्यतीत वापरला जाणारी हलकी बैलगाडी
27 Feb 2008 - 8:45 am | प्रमोद देव
घडवंची(स्त्री): चार पायांची व वर फळी असलेली लाकडी वस्तू(राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थकोश... प्रमाणे)
27 Feb 2008 - 12:59 pm | विजुभाऊ
चंबू = लहान मुलांचे विशिष्ट आकाराचे पाण्याचे भांडे.त्याला गडु हाही शब्द आहे.
गडगा हाही शब्द आहे......तो बहुधा समानाअर्थी असावा
27 Feb 2008 - 1:05 pm | प्रमोद देव
म्हणजे...दगडावर दगड रचून तयार केलेला बांध.
27 Feb 2008 - 1:00 pm | विजुभाऊ
गुडदाणी = गुळ आणि दाण्याची चिक्की (?).
होका.मी गुड्दाणी म्हणजे गुडगुडी समजायत होतो....
27 Feb 2008 - 1:11 pm | विजुभाऊ
छबिना = आरसा (?)
छबिना = देवाचा छबिना असतो......त्याची पालखीत मिरवणुक कढतात
27 Feb 2008 - 1:12 pm | विजुभाऊ
छबिना = आरसा (?)
छबिना = देवाचा छबिना असतो......त्याची पालखीत मिरवणुक कढतात
27 Feb 2008 - 1:19 pm | प्रमोद देव
म्हणजे..... १. देवाच्या पालखीची मिरवणूक. २. राजाची मिरवणूक.३. घोडेस्वाराचा रात्रीचा पहारा.
27 Feb 2008 - 4:03 pm | लिखाळ
छान चर्चा !
खण = कप्पा किंवा ड्रॉवर
खरेतर फडताळ हा शब्द शेल्फ या शब्दाला वापरला जातो असे मला वाटते. ज्या फडताळाला दारे आहेत ते कपाट. उघडे असेल तर फडताळ. किंवा मांडणी.
-- लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
27 Feb 2008 - 9:39 pm | llपुण्याचे पेशवेll
झब्बा: हा सदर्यासारखा पुरुषांनी परीधान करायचा कुडत्यासदृश कपडा
पुण्याचे पेशवे
17 May 2008 - 3:25 pm | विजुभाऊ
फोकलीच्या या शब्दाचा अर्थ काय.
शिंदळी हा शब्द फक्त शिवी साठे राहीला आहे.
शिंदळी म्हणजे चहाडी चुगली
चहाडी हा अस्सल देशी शब्द.
चुगली हा शब्द चुगाली असा हिंदी मध्ये वापरला जातो .पण चुगाली चा अर्थ रवंथ करणे असा होतो
28 Feb 2008 - 1:30 am | भडकमकर मास्तर
जाजम ... ते गालिच्यासाऱखं खाली अंथरतात ते??
28 Feb 2008 - 3:06 pm | विजुभाऊ
जाजम = सतरंजी
सोवळे म्हणजे काय माहीत आहे...पण
ओवळे म्हणजे काय?
उदा: तिने ओवळ्याने सगळा स्वयंपाक केला.
28 Feb 2008 - 6:24 pm | धनंजय
प्रत्यक्षात अंघोळ न करता, ती स्वयंपाकाला लागली. या शब्दात अमंगलता आणि अस्वच्छता दोन्ही ध्वनित होतात.
28 Feb 2008 - 6:41 pm | विजुभाऊ
हरताळ :पूर्वी सावकारांच्या पेढ्यांवर जे हिशोब लिहिले जायचे त्यात कही भाग खोडुन दुरुस्त करायचा असेल तर त्या लिखाणावर पिवळी पावडर फासली जायची.त्या पिवळ्या पावडर ला हरताळ म्हणत.
आपण मात्र हरताळ फासणे...शब्द संप्/बंद या आर्थाने वापरतो..
मंडळी....हा विषय मस्त चालला आहे........झकास प्रतिसाद आहे.....सर्वांचे धन्यवाद्........छान माहिती आणि मनोरंजन होतय्.....अजुन शब्द येउद्यात....मराठी मनोरंजन कोश बनवुया.....
28 Feb 2008 - 9:23 pm | llपुण्याचे पेशवेll
हा शब्द कोणाला माहीत आहे का?
'किंतान' म्हणजे तागाच्या कापडापासून तयार करतात. त्याचाही उपयोग बसण्यासाठीच होतो. कोणाला अधिक माहीती आहे का?
पुण्याचे पेशवे
29 Feb 2008 - 11:32 am | विजुभाऊ
किंतान = गोणपाट
याला पोते असे ही म्हणतात..
जरत्कारू...... म्हणजे काय
1 Aug 2009 - 2:02 am | मस्त कलंदर
जरत्कारू म्हणजे बायको.... गजानन महाराजांच्या ग्रंथात हा शब्द वाचला होता...
नि किंतान म्हणजे अनेक गोणपाटे एकत्र जोडून बनवलेले आच्छादन... शेतकरी हे मल्टीपर्पज म्हणून वापरतात.. हवे तर बसायला.. हवं तर धान्य, कडबा किंवा तत्सम वस्तू झाकायला....
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
3 Aug 2009 - 12:51 pm | प्रमोद देव
जरत्कारू म्हणजे बायको नाही.
जरत्कारू चा शब्दकोशातील अर्थ आहे....अशक्त व हडकुळा(मनुष्य)
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
29 Feb 2008 - 11:36 am | विजुभाऊ
जाणता.......याचा अर्थ सगळे जाणतात
याच्या जोडिने येणारा शब्द म्हणजे "नेणता"
काहिवेळा " नेणिवेच्या पलिकडले " असाही शब्द प्रयोग करतात
नेणता / नेणीव म्हणजे काय
29 Feb 2008 - 11:38 am | प्रमोद देव
म्हणजे अशक्त आणि हाडकुळा मनुष्य
31 Jul 2009 - 7:39 pm | फ्रॅक्चर बंड्या
नेणता म्हणजे प्रौढ किंवा वयाने थोराड
उदा. एवढा नेणता झाला तरी तुला काही कसे समजत नाही ( असे मला घरी सुनावतात )
1 Mar 2008 - 9:47 am | विजुभाऊ
मळभ = ढग ? मळभ दाटले .....
मळवट या शब्दाचा नक्की अर्थ काय?
माळणे = गजरा माळणे........याच्याशी काही संबंध आहे का?
1 Mar 2008 - 10:10 am | पिवळा डांबिस
मळवट = माथ्यावर भरलेला भंडारा वा कुंकू
1 Mar 2008 - 10:51 am | मदनबाण
गावो गाव जाणारी एसटी ही कुठल्या ना कुठल्या आगारा तुन येते वा जाते...
आगार या शब्दाचा नेमका अर्थ काय?
1 Mar 2008 - 11:24 am | विजुभाऊ
आगार = कोठार
डेपो = कोठार.........
1 Mar 2008 - 9:21 pm | संजय अभ्यंकर
वाघिण = मालगाडीचा डब्बा (इंग्रजी वॅगन वरुन)
शिस्त = systematics (शिस्त मॅटिक चा अपभ्रंश)
अपभ्रंश = चूकीचा उच्चार
यच्च्यावत = सर्व (पूर्ण समूह)
एकसमयावच्छेद = एकाचवेळी
व्यतिरीक्त = ...च्या शिवाय (...ला सोडुन)
उपरोक्त, उपरोल्लेखित, उपरनिर्दीष्ट = वर लिहिलेले, आधी सांगितलेले
पेला = पाण्याचे भांडे
लोटी = पाण्याचे पात्र
घंगाळ = पाणिसाठवण्याचे मोठे भांडे (पात्र)
माठ = पाणी साठवण्याचे मातीचे पात्र.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
1 Mar 2008 - 9:58 pm | लिखाळ
शिस्त = systematics (शिस्त मॅटिक चा अपभ्रंश)
अरेच्या ! असे आहे होय हे. कमालच आहे.
मला वाटले होते की शास्ता = शासन करणारा अश्या कोणत्यातरी शब्दातून शिस्त, शिस्तप्रिय हे शब्द आले असतील.
शिस्त हा शब्द इंग्रज येण्या आधी नव्हताच का म्हणजे?
कृपया अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
31 Jul 2009 - 7:44 pm | फ्रॅक्चर बंड्या
रांजण = पाणी साठवण्याचे मातीचे मोठे पात्र
2 Mar 2008 - 3:20 am | भडकमकर मास्तर
माझा अंदाज ----------
जाणीव = कॉन्शस
नेणीव = सबकॉन्शस
2 Mar 2008 - 4:20 am | मगो
माजघर, ओटी, पडवी, दिवाणखाना हेही शब्द प्रचलित नाहित.
बहुदा घराच्या मुख्य दरवाजान॑तरची जागा पडवी , न॑तर ओटी- जीथे आसनव्यवस्था असते, माजघर म्हणजे सध्याचा hall आणि दिवाणखाना म्हणजे 'बेडरूम'...
पूर्वि बाहेरील लोका॑चा वावर जास्तीतजास्त ओटी पर्यन्त असायचा.
शिवाय तुळई-भाल॑(घराचे आधारस्त॑भ), तसराळ॑ (कडईसारख॑ पसरट॑ मोठ॑ भा॑ड॑), कु॑चा (झाडु), सारवण (शेण), फाटी (लाकडाचे उभे तुकडे), पायताण(चपला), पायजमा (ले॑गा), मोची (चा॑भार), गवळी (दूधवाला), कडी-कोय॑डा (दाराची कडी, कुलुप), खापर॑ (नळीची कौल॑, मडक्याचा तुकडा), चोपडी (हिशोबाची वही), बोळ॑ (गल्ली), दुचाकि (सायकल), घ॑गाळ॑ (आ॑घोळीच॑ भा॑ड॑), चेन्डुफळी (क्रिकेट), फलक॑ (बोर्ड ), फाटक॑ (दार, गेट)शिकवणि (क्लास), स॑दूक (पेटारा), दौत्(शाई), खु॑टी (काही अडकवण्यासाठी लाकडी हूक),चिमणी (लहान दिवा) ......ई. ई. ई आठवत॑ बसलो तर॑ खुप आठ्वतील असे शब्द॑....
...पण॑ आठवताना माझ॑ मन॑ मात्र नकळत॑ माझ्या गावात एक फेर॑फटका मारुन॑ आल॑...
असो, खुप मजा येतेय॑ ...
- मोकळ्या मनाचा मगो (महेश गोविलकर)
2 Mar 2008 - 12:02 pm | चतुरंग
कडी-कोयंडा मधली कडी म्हणजे एकमेकात अडकवलेल्या सर्वसाधारणपणे तीन लांबट दुव्यांची असे.
आणि कोयंडा म्हणजे आजच्या भाषेत 'बोल्ट' जो आडवा सरकवून दरवाजा लावला जातो आणि त्यामधून नंतर कुलूप लावतात.
ओघातच आठवलेला आणखी एक शब्द म्हणजे 'आडसर' - पूर्वी वाड्यांमधे अनेक बिर्हाडे असत. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी वाडयाला एकच मुख्य मोठे दार असे ते रात्रीच्या वेळी बंद केले जाई आणि त्याला आतून एक मोठा जाडच्या-जाड लाकडाचा ओंडका सरकवून लावला जाई त्याला म्हणत. तो दाराच्या पाठीमागेच भिंतीत सरकवून बसवण्याची सोय असे.
चतुरंग
3 Mar 2008 - 1:26 pm | विजुभाऊ
तसराळ॑ नाही...तरसाळे.....
मराठीत काही शब्द जोडिजोडीनेआले कि त्यान्चे अर्थ बदलतात.
दळण म्हणजे काहीत आहे
वळण म्हणजे काहीत आहे
दळणवळण याचा अर्थ मात्र संदेशवहन /प्रवास (वाहून नेणे)असा होतो...
हे असे का?
3 Mar 2008 - 1:49 pm | प्रमोद देव
हा शब्द बरोबर आहे. तसराळे असेही म्हणू शकतो.
दळण: दळण्याची क्रिया ; जे दळायचे ते धान्य
वळण: वाकडे होणे,वळणे(रस्त्याचे वळण); विशिष्ट पद्धतीने आकार देणे अथवा सवयी लावणे( मुलाला अथवा मुलीला चांगले वळण लावणे)
3 Mar 2008 - 1:29 pm | विजुभाऊ
शिस्त = systematics (शिस्त मॅटिक चा अपभ्रंश) हे चूक आहे.
शिस्त हा शब्द शास्ता = शासन करणारा ("कंट्रोल "या अर्थाने)आणि त्याला शासन करण्यसाठी आवश्यक घटक
3 Mar 2008 - 4:36 pm | सृष्टीलावण्या
पूर्वी तेलाचा अथवा तुपाचा दिवा विझला की एक उग्र जळकट वास नाकात शिरायचा तेव्हा माझी आजी
म्हणायची दीपुष्टणाचा वास सुटलाय... दीप+उष्टावण असा मूळ शब्द असावा बहुदा...
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
4 Mar 2008 - 12:21 pm | विजुभाऊ
दळणवळण याचा अर्थ मात्र संदेशवहन /प्रवास (वाहून नेणे)असा होतो...
हे असे का?
6 Mar 2008 - 1:00 pm | विजुभाऊ
वदतोव्याघात म्हणजे काय
6 Mar 2008 - 3:08 pm | प्रमोद देव
म्हणजे.. प्रतिपादनातील स्पष्ट विसंगती
6 Mar 2008 - 4:50 pm | विजुभाऊ
वदतोव्याघात... मला वाटत होते की वदतोव्याघात म्हणजे बोलायला आणि ती गोष्ट व्ह्यायला एकच गाठ ( कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ)
8 Mar 2008 - 11:01 am | विजुभाऊ
पारणे म्हणजे काय? डोळ्याचे पारणे फिटणे........म्हणजे नेत्रसूख अनुभवणे ( फर्गुसन रोड वर अनुभवास होते तसे नव्हे)
पारणे म्हणजे काय? पारणे फिटते म्हणजे काय होते?(पारणे हे नेसूचे वस्त्र आहे असे एक खौट पुणेकर म्हणतो....तो चूक असावा)
8 Mar 2008 - 9:24 pm | llपुण्याचे पेशवेll
(पारणे हे नेसूचे वस्त्र आहे असे एक खौट पुणेकर म्हणतो....तो चूक असाव)
सहीच मस्त. हे पारणे सुधा फिटले तर डोळ्याचे पारणे फिटत असेल. ;) च्यामारी फार झाला वात्रटपणा.
(ह.घ्या.)
पुण्याचे पेशवे
9 Mar 2008 - 9:22 am | प्रमोद देव
पारणे: १.उपास सोडणे. २ समाधान
पारणे फिटणे(क्रि.)
9 Mar 2008 - 12:08 am | चतुरंग
त्याला पारणे फेडणे असे म्हणतात. त्यावरुन अर्थ ध्यानात यावा.
चतुरंग
8 Mar 2008 - 9:29 pm | llपुण्याचे पेशवेll
संदूक = छोटी पेटी ज्यात मौल्यवान वस्तू वगैरे ठेवतात. उदा. दागिने, ठेवणीतले उंची कपडे, अत्तरे इ.
हडपा = मोठा पेटारा ज्यात साठवणूकीच्या वस्तू किंवा मोठ्या कार्यक्रमाच्या दिवशी लागणार्या वस्तू ठेवतात. देवाची पालखी, मोठी पातेली, तपेल्या, गणपतीचे चौरंग, मखर इ.
पुण्याचे पेशवे
18 Mar 2008 - 12:08 pm | विजुभाऊ
छप्पन टिकल्यांची
किंवा छप्पन छूरी म्हणजे नक्कि काय?
21 Mar 2008 - 6:33 pm | सुधीर कांदळकर
नवरे असलेली स्त्री म्हणजे चवचाल स्त्री.
परंतु छप्पन्न टिकल्यांची आवा असे म्हणतात. आवा म्हणजे कजाग स्त्री.
२. पारणे फेडणे म्हणजे उपकाराच्या ओझ्यातून मुक्त होणे. पूर्वजांच्या/देवाच्या उपकाराच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी कठोर व्रत करतात. त्या व्रताची सांगता पूजाअर्चा करून नंतर अन्नभक्षण करून करतात. यालाच पारणे फेडणे असे म्हणतात. यावेळी पौरोहित्य करणारे भटजी व मेहुण म्हणून दांपत्य बोलावण्याची व या दांपत्याचा भेटवस्तु देऊन आदरसत्कार करण्याची रीत आहे. ज्ञानसंपन्न पुरूष व त्याची पत्नी किंवा गरीब दांपत्य बोलावितात.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
22 Mar 2008 - 3:58 pm | आंबोळी
पायताण = पादत्राण = चपला
बारदाण = गोणपाट = पोते
लुगड = साडी = पातळ (नेसायचे)
फोक = लवचीक काठी (हा साधारण चिन्चेचा आसतो, २-३ पिढ्यामागे शिक्शा करण्यसाठी घरी वडिल व शाळेत गुरुजी याचा वापर करीत असत)
परस = घराची मागची बाजू इतिहासजमा झाल्यने परसाकडला जायची सोय राहिली नाही.
तम्बाखू पुडीतून मिळायला लागल्यापासून चन्ची सुध्धा इतिहास जमा होत आहे.
18 May 2008 - 2:46 am | ईश्वरी
विसण = आंघोळीसाठी तापवलेल्या अति गरम पाण्यात गार पाणी घालून ते भाजणार नाही इतपत ठेवतात. त्या गार पाण्याला विसण म्हणतात.
ताटली = जेवणाच्या ताटापेक्षा थोडी लहान
सांडशी = चिमटा.. गरम भांडे धरण्यासाठी वापरतात
कुंचला = चित्रकाराचा रंगवायचा ब्रश
हाळी = हाक मारणे / आवाज देणे
रांजण = आकाराने मोठा असलेला पाण्याचा माठ
गंठण = मंगळसूत्र (बहुतेक )
वरवंटा = ओला मसाला वाटण्याचे साधन
पारोसा = आंघो़ळ न करता ..(आज पारोशानेच बाहेर जावे लागले)
टपाल = पत्र
दिवेलागणी = संध्याकाळची वेळ ..देवासमोर दिवा लावण्याची
आमोशा पोटी = काहीही न खाता , उपाशी
आवंढा = ?
तोबरा भरणे = तोंडात मोठा घास घेणे
वामकुक्षी = दुपारची झोप, दुपारचे जेवण झाल्यानंतर काढलेली डुलकी
ईश्वरी
31 Jul 2009 - 6:19 pm | llपुण्याचे पेशवेll
विसण = आंघोळीसाठी तापवलेल्या अति गरम पाण्यात गार पाणी घालून ते भाजणार नाही इतपत ठेवतात. त्या गार पाण्याला विसण म्हणतात.
त्याला आमची आजी विसावण म्हणते.
वाईनः (प्यायची नव्हे) मुसळाचा वापर करून कुटण्यासाठीचे दंडगोलाकृती दगडी भोक. वायनाचे तोंड शक्यतो जमिनीच्या समपातळीत असते आणि उर्वरीत भाग जमिनीखाली.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
3 Aug 2009 - 12:40 pm | सातारकर
हे आमोशा पोटी अस आहे का अनुशा पोटी असं आहे ?
-----------------------------------------------------------------------------------------
I have seen GOD. He bats at no. 4 for India
Matthew Hayden
31 Jul 2009 - 4:28 pm | विजुभाऊ
अलगूज = पावा = बासरी
भडीमार करणे हा शब्द कशावरून आला असावा?
आम्बोण याचा नक्की अर्थ काय?
विदर्भात एखाद्या मतीमंदाला भैताड असे म्हणतात. भैताड हा शब्द कशावरुन आला?
हारा = टोपली
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
2 Aug 2009 - 1:11 pm | पक्या
>>पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
मिंग्लीश किंवा इंग्राठी :D
31 Jul 2009 - 5:40 pm | ललिता
कशिदा = भरतकाम = embroidery
उदा.: आशाताईंचं भावगीत....
घालू कशी "कशिदा" मी
होती किती सांगू चुका
बोचे सुई फिरफिरुनी
येथ उभे राहू नका
डोळे हे जुलमी गडे......
3 Aug 2009 - 2:46 pm | रम्या
बोचे सुई फिरफिरुनी
वाचून हसू आलं. :D ठळक शब्द अनेकवचन असल्या सारखं वाटतंय!!!
आम्ही येथे पडीक असतो!
31 Jul 2009 - 8:07 pm | दत्ता काळे
१.कह्यात वागणे ( एखाद्याच्या अंमलाखाली राहणे )
२. कुपाटी काढणे - ( निष्कारण खोडी काढणे )
३. लांगालुंगा गोळा करणे - (शेतातल्या तोडणीनंतर राहिलेल्या उरल्यासुरल्या पिकांची वाढे, चारा, वाळलेले शेण इ. आणि जे विकून पैसे मिळतील अश्या गोष्टी गोळा करणे. )
४.निपुर - (एखादा निकाल विरुध्द जाणे किंवा माघार घ्यावी लागणे )
५. बेबुदी - (पोटापाण्यापुरती किंवा तात्पुरती सोय करणे )
( एखाद्या शेतकर्याला काळी म्हणजे जमीनअजिबात नसली किंवा त्याच्या खटल्याला निपुर आली तर गांवकरी दुसर्याच्या शेतातून त्याला जमीन मिळवून देत आणि त्याची व त्याच्या मुलाबाळांची बेबुदी करीत.
६. वाटखर्ची नसणे - (भटकंती करणार्याकडे पैसा नसणे).
1 Aug 2009 - 2:44 am | अजिंक्य पोतदार
नवरा = धनी
अरे अरे फरच लांब गेलो !! जाउ द्या !!
नवरा = अहो
हा शब्द पण एइकायला मिळत नाही
2 Aug 2009 - 2:30 pm | तर्री
१. बेगमी करणे
२.आगोट
३. सराई (लग्न सराई )
४. घरट
५.समारत्न
६.लळित
3 Aug 2009 - 1:30 pm | प्रमोद देव
१. बेगमी=तरतूद,पुरवठा,साठा
२. आगोट(ठ)=पावसाळ्याची सुरुवात किंवा सुरुवातीचा काळ
३. सराई=धर्मशाळा,विश्रांतीस्थान
४. घ(घि)रट=भात भरडण्यासाठी वापरावयाचे मोठे जाते.
५. लळित=देवाच्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सोंगे आणून सादर केलेला कार्यक्रम.
वरील सर्व शब्दार्थ ’राजहंस व्यावहारिक शब्दार्थ कोशा’तून साभार.
लग्न सराई=लग्नाचा हंगाम
समारत्न= समापन,समाराधना=व्रताची/उत्सवाची सांगता
हे दोन शब्दार्थ माझ्या समजूतीप्रमाणे दिलेत. चुभूदेघे.
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
2 Aug 2009 - 9:18 pm | श्रीयुत संतोष जोशी
सपक : मिळमिळीत , अतिशय नीरस.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
21 Aug 2009 - 8:48 pm | चित्तरंजन भट
प्रकाटाआ