१७६०

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in काथ्याकूट
15 Feb 2008 - 10:00 am
गाभा: 

मी एकदा शिवडी पुलावरून चालताना सोंगट्या (गोट्यांची बहिण) विकायला ठेवलेल्या पाहिल्या, सहज मनांत विचार आला "सोंगटी" शब्द कशावरून आला असेल. मग लक्षात आले,
"सोम+गोटी" चा बोलीभाषेतील उच्चार सोंगटी झाला. सोम म्हणजे पांढरा किंवा चंद्र. पांढरी किंवा चंद्रासारखी दिसणारी गोटी ती सोंगटी.

तसेच आपण सहज म्हणतो, "ती मला १७६० गोष्टी सांगत होती". आता हा १७६० कुठून आला असेल असा विचार बरेच दिवस करत होते. पण उत्तर मिळत नव्हते.

परवा सहज वाचले कि १७६० साली पानिपतची लढाई झाली. मनांत विचार आला की पूर्वी म्हणत असतील, "१७६० च्या गोष्टी सांगत बसू नकोस (पाल्हाळ नको, मुद्द्याचे बोल)." त्यावरूनच कदाचित् वाक्प्रचार झाला असेल, "१७६० गोष्टी सांगणे".

सध्या धानी हा रंग कसा असेल व कुठल्या धान्यावरून आला असेल या वर विचार चालू आहे.
आपल्याला भेडसावतात का असे शब्द?

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

15 Feb 2008 - 10:08 am | भडकमकर मास्तर

पानिपत माझ्या माहितीप्रमणे १७६१...

अजून काही शब्द....आणि ते अठरा विश्वे (दारिद्र्य) या शब्दाची व्युत्पत्ती ..... त्यातले विश्वे हे विश्वे नसून विसवे आहे..म्हणजे अठरा विसवे... म्हणजे एटीन टाईम्स ट्वेन्टी...म्हणजे टोटल ३६० ... म्हणजे वर्षातले ३६० दिवस म्हणजे सगळेच दिवस दारिद्र्य.... :).... २४ * ७ दारिद्र्य...

सृष्टीलावण्या's picture

15 Feb 2008 - 5:45 pm | सृष्टीलावण्या

१७६० हेच पानिपतच्या युद्धाचे वर्ष असे लिहिले होते, वेगळे असेल तर माहित नाही. १८ विश्वेबद्दल विचार करावा लागेल. सध्यातरी तुमचे विचारच योग्य वाटत आहेत.

छोटा डॉन's picture

15 Feb 2008 - 6:18 pm | छोटा डॉन

ते १८ विसवे असेच आहे .........

विकास's picture

16 Feb 2008 - 10:35 am | विकास

त्यातले विश्वे हे विश्वे नसून विसवे आहे..म्हणजे अठरा विसवे... म्हणजे एटीन टाईम्स ट्वेन्टी

चांगली माहीती आणि बरोबर वाटणारी....तरी पण अठरा आणि वीस हे क्रमांकच का? १२ आणि ३०, ३६ आणि १० का नसावेत?

अन्या दातार's picture

28 Feb 2008 - 6:55 pm | अन्या दातार

हा खुलासा मी दूरचित्रवाणीवर शन्नांच्या तोंडून ऐकला होता.
आता 'अठरा विसवे'च का ते पाहू. पाढे मराठीत म्हणताना एखादी संख्या गुणिले दहा हे ......दाहे....... असे म्हणतात. त्याचप्रमाणे अठरा दाहे ऐंसासे, अठरा अकरे.............अठरा विसवे तीनशे साठ.
एका वर्षातील दिवस= ३६५
म्हणजेच साधारण ३६० मानायला हरकत नाही. अठरा विसवेचे पुढे अपभ्रंश होऊन अठरा विश्वे झाले.

भडकमकर मास्तर's picture

10 Mar 2008 - 9:58 am | भडकमकर मास्तर

अहो तेच तर विचारताहेत ते..की अठराचाच पाढा का? ?? ३६ दाहे का नाही?
या गोष्टीचा मी विचारच केला नाही..ठाउक नाही बॉ ;;;

नंदन's picture

15 Feb 2008 - 10:30 am | नंदन

१ मैल = १७६० यार्ड. दोन्ही प्रमाणे जुन्या काळी प्रचलित होती. याचा काही संबंध असू शकेल का? बाकी अठरा विसवे ची व्युत्पत्ती सही आहे.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

सृष्टीलावण्या's picture

15 Feb 2008 - 5:46 pm | सृष्टीलावण्या

म्हणजे मैलभर उत्तर नको. थोडक्यात सांग असे काहितरी.

विसोबा खेचर's picture

15 Feb 2008 - 10:47 am | विसोबा खेचर

परवा सहज वाचले कि १७६० साली पानिपतची लढाई झाली. मनांत विचार आला की पूर्वी म्हणत असतील, "१७६० च्या गोष्टी सांगत बसू नकोस (पाल्हाळ नको, मुद्द्याचे बोल)." त्यावरूनच कदाचित् वाक्प्रचार झाला असेल, "१७६० गोष्टी सांगणे".

हम्म.. Good Guess! :)

तात्या.

इनोबा म्हणे's picture

15 Feb 2008 - 6:12 pm | इनोबा म्हणे

मुंबईच्या भेंडीबाजारची ही गोष्ट एका मासिकात वाचली होती:
पुर्वी या ठिकाणी इंग्रजांची छावणी होती त्याच्याच मागील बाजूस आठवड्याचा बाजार भरायचा त्यामुळे या छावणीतील अधिकारी पत्रव्यवहार करताना 'Behind The Bazar' असा उल्लेख करायचे,कालांतराने त्याचा 'भेंडीबाजार' झाला. अलेक्झांडरचा 'शिकंदर' असाच झाला होता.

आमच्या पुण्यातील वडगाव मावळ मधे इश्टूर फाकडा नामक व्यक्तीच्या नावाने ऊरुस(जत्रा) भरतो. हा इश्टूर फाकडा म्हणजे मूळचा स्टूअर्ट फोर्ड-इंग्रज लष्करातील एक अधिकारी. त्याने या गावात बरीच समाजकार्ये केली त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर गाववाल्यांनी त्याची इथेच समाधी बांधली आणि दरवर्षी त्याच्या नावाने जत्रा भरू लागली.

कलकत्त्याच्या बाबतीत वाचलेली ही गोष्टः(किती खरी किती खोटी? माहित नाही)
एक इंग्रज अधिकारी वाट चूकून या गावात आला.जवळच एक शेतकरी गवताच्या गंज्या एकावर एक रचून ठेवत होता,या इंग्रज अधिकार्‍याने त्याला गावाचे नाव विचारले(अर्थात इंग्रजीमधून) मात्र त्याची भाषा न समजल्याने शेतकर्‍याने तो गवताच्या गंजीबद्दल विचारत असावा असा समज करुन घेतला आणि त्याने इंग्रज सायबाला उत्तर दिले-कोल काटा(काल कापले).याच कोलकात्याचे इंग्रजांनी त्यांच्या सोयीनुसार कॅलकटा केले आणि काही काळापूर्वी बंगाली जनतेच्या आग्रहास्तव त्याचे पुन्हा कोलकाता झाले.

आणखी बर्‍याच गमतीदार गोष्टी आहेत सवडीने लिहीन.

अमित.कुलकर्णी's picture

15 Feb 2008 - 6:58 pm | अमित.कुलकर्णी

मुंबईतील हार्बर लाईन वरील कॉटन ग्रीन स्टेशनचे नाव तिथे असलेल्या सुताच्या गिरण्यांमुळे आले असावे का? (ह्. घ्या.)

-अमित
------------------------------------------
Doing what you don't like is being employed and not liking what you do is common human nature!

इनोबा म्हणे's picture

15 Feb 2008 - 7:14 pm | इनोबा म्हणे

अमितराव,
पुर्वी या हार्बर लाईन जवळ आजूबाजूच्या झोपड्यातले लोक खाटा (कॉट) टाकून झोपायचे आणि वर हिरव्या (ग्रीन) गोधड्या पांघरायचे म्हणून त्याला 'कॉट एन ग्रीन' म्हणायचे,काही काळानंतर त्याचे 'कॉटन ग्रीन' झाले.( हे पण ह. घ्या.)

अजून काहीतरी गमतीदार वाचायला मिळावे... हीच अपेक्षा

(इनोदी) -इनोबा

प्राजु's picture

15 Feb 2008 - 8:04 pm | प्राजु

लंकेची पार्वती..

म्हणजे नक्की काय? तर काहीही आभूषणे न घातलेली अगदीच साधी होऊन एखाद्या शुभ कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेली स्त्री... पण पार्वतीच का? कारण पार्वती कधी लंकेत गेली होती? तिथे अशोक वनात तर सीता होती..
नेहमी भेडसावणारा प्रश्न..

- प्राजु

सुधीर कांदळकर's picture

15 Feb 2008 - 10:57 pm | सुधीर कांदळकर

मजा आली.

आणखी अशाच गंमती जंमती येऊ द्यात.

विजुभाऊ's picture

28 Feb 2008 - 6:29 pm | विजुभाऊ

उत्ताप्पा : खूप खाउन झाल्यावर लहान मुलाने त्याच्या वडिलाना सान्गितले कि उठा अप्पा.....