अ-भारतीय शेजार्यांना देण्यासाठी गुलाबजामचा डबा आणला होता. ही मंडळी पाक नको म्हणत फक्त गुलाबजाम हाणून गेली, आता डबाभरून पाक शिल्लक आहे, फेकून द्यायचं जीवावर आलंय, काही करता येईल त्याचं?
पाकातल्या पुर्यांची किंवा सुधारसाची पाककृती मिळेल का?
इतरही काही सोप्या आयडिया असतील तरी चालतील, फक्त करणारा आणि खाणारा सध्या एकटा जीव आहे -म्हणजे पूर्वतयारीचा आणि स्वच्छतेचा उत्साह मर्यादितच आहे- हे लक्षात ठेवावे ही विनंती ;)
सहमत..
अजुन गुलाबजाम बनवने हाच उत्तम पर्याय..
इतर पर्याय..
१. मैदा, दही व तेल असेल घरात तर जिलेबी बनवा.
२. बेसन व तेल असेल तर गोड बुंदी बनवा.
३. साखरभात
गुलाबजामचा पाक कच्चा असतो तो एका नॉन्स्टीक पॅनमधे घालून पाचेक मिनिटे उकळवून घ्या.
तो वाटीने मोजा. भारतीय ग्रोसरीच्या दुकानात फ्रिजर मधे असलेली खव्याची वीट
रूम टेंप. ला आणून पाकाएवढ्याच प्रमाणात घ्या. नॉनस्टिक पॅनमध्ये खवा दोनेक मिनिटे भाजून
त्यात हा पाक मिसळा. मिश्रण हलवत रहा. कडेने तूप सुटू लागेल व मिश्रणाचा गोळा होत येइल
तेंव्हा ताटलीत थापा. गार झाल्यावर वड्या पाडा.
हि टिप माझ्याकडच्या पुस्तकातील आहे.
पण चतुरंग आणि सुनील यांचे वैधानिक इशारे शिरोधार्य मानून (पन्नाशीतल्या माझ्यापुरता!) धनंजयांचा सल्ला मानून मी रोजच्या कॉफीत 'चमचा-दोन चमचे पाक घालून' संपवायचा विचार करतोय. त्यातल्या त्यात कमी घातक हो!! (पण ती कॉफी दिवसाला एकच कप प्यालो तरच ठीक, नाहीतर केला तुका अन् झाला माका;))
पण या निमित्ताने बर्याच नवीन पर्यायांचा विचार झाला हे फलित काही वाईट नाही!
१) विकतचा गूलाबजामचा पाकात प्रिसर्वेटीव असेल तर सरळ फेकून द्या. प्रकृतीस वाईट.
२)गोड पुर्या/शंकरपाळ्या(पण पुन्हा कॅलरीज वाढवणे आलेच. आणि पुन्हा उरलेल्या तूपाचे/तेलाचे काय करू अस नवीन प्रश्ण मिपावर व मिपांकरांना डोके चालवणे आले);)
३)थोडेफार तूप उतरले असल्याने शिर्यात टाका आणि ओवन मध्ये सेट करा. हा एक अफगाणि पदार्थ तयार होइल्.(मजाक नाय करत हां).
रेसीपी न विचारत देतेय,
रवा नुसता भाजा. दूध शिंपडून घ्या. मग अफगाणे स्टाईने भरपूर काजू, किशमिश्,केसर टाका. हवेच असेल तर तूप टाका एकदम चमचे. मग हा पाक ओता. थाळीत थापून १० मिनीटे अवन मध्ये १७५ वर सेट करा.
पुढला एक आठवडा वरील १ वा २ काहीही बनवले तर वजन बघू नका आणि नुसते पाणी,फलोहार घ्या १ महिना. (फुकट सल्ला).
:)
एव्हढं काय टेंशन घेताय त्यात?
सरळ रोज पोळीसोबत खायला वाटीमध्ये घ्या... आठवड्या-दोन आठवड्यात सगळ्या पाकाचा फन्ना :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
अरे लिंबु पिळून सुधारस करा कि त्याचा. मला तर भाजी वगैरे काही लागत नाही नुस्ता सुधारस व पोळी खाल्ले कि झाले जेवण
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
तुमच्या आवडीची कोणतीही फळे ( केळी, सफरचंद, स्ट्रॉबेरी) फोडी करून वाफवून घ्यावीत. पाकात घालून उकळी आणावी. मी प्रतिक्रीया देईपर्यंत बहुतेक पाक संपला असेल, पुढच्या वेळी करा.
प्रतिक्रिया
2 Jun 2009 - 1:00 am | चतुरंग
बाकी तुमचे शेजारी 'ना पाक' दिसतात! ;)
(वैधानिक इशारा - रंगाचे सल्ले आरोग्यास अपायकारक ठरु शकतात! ;) )
चतुरंग
6 Jun 2009 - 9:03 am | टारझन
च्यायला .. प्रतिक्रिया गायब ? कोणाला मुंग्या लागल्या ? =))
२ लायनीचे छपरी धागे रहातात , पण आम्ही थोडं काही लिवलं तर गायप ?
असो , चालायचंच
(तराजु)टार्या सोणार
2 Jun 2009 - 1:33 am | नंदन
सुधारस करता येईल असं वाटतं. बाकी जाणकार लोक सांगतीलच.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
2 Jun 2009 - 1:52 am | बहुगुणी
पाकातल्या पुर्यांची किंवा सुधारसाची पाककृती मिळेल का?
इतरही काही सोप्या आयडिया असतील तरी चालतील, फक्त करणारा आणि खाणारा सध्या एकटा जीव आहे -म्हणजे पूर्वतयारीचा आणि स्वच्छतेचा उत्साह मर्यादितच आहे- हे लक्षात ठेवावे ही विनंती ;)
प्रतिसादाबद्दल आभार!
2 Jun 2009 - 2:38 am | धनंजय
असा पाक उरला, की मी रोजच्या चहात चमचा-दोन चमचे पाक घालून संपवतो. चहाला वेलदोड्याचा वास येतो.
फ्रीजमध्ये पाक ठेवलेला असला तर तूप थिजते, आणि बाजूला होते - चहात पडत नाही.
2 Jun 2009 - 3:06 am | बहुगुणी
That's a thought! मी कॉफी-वाला आहे, पण कॉफीलाही वेलदोड्याचा वास हरकत नाही...धन्यवाद!
2 Jun 2009 - 3:49 am | दिपाली पाटिल
गिट्स चे लगेच बनतात.
दिपाली :)
2 Jun 2009 - 4:14 am | मितालि
सहमत..
अजुन गुलाबजाम बनवने हाच उत्तम पर्याय..
इतर पर्याय..
१. मैदा, दही व तेल असेल घरात तर जिलेबी बनवा.
२. बेसन व तेल असेल तर गोड बुंदी बनवा.
३. साखरभात
2 Jun 2009 - 6:35 am | सुनील
डबाभरून पाक प्रकृतीला घातक असतो (विशेषतः पन्नाशीत!)
;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
2 Jun 2009 - 6:55 am | स्वामि
पीता येइल. :)
2 Jun 2009 - 6:58 am | रेवती
गुलाबजामचा पाक कच्चा असतो तो एका नॉन्स्टीक पॅनमधे घालून पाचेक मिनिटे उकळवून घ्या.
तो वाटीने मोजा. भारतीय ग्रोसरीच्या दुकानात फ्रिजर मधे असलेली खव्याची वीट
रूम टेंप. ला आणून पाकाएवढ्याच प्रमाणात घ्या. नॉनस्टिक पॅनमध्ये खवा दोनेक मिनिटे भाजून
त्यात हा पाक मिसळा. मिश्रण हलवत रहा. कडेने तूप सुटू लागेल व मिश्रणाचा गोळा होत येइल
तेंव्हा ताटलीत थापा. गार झाल्यावर वड्या पाडा.
हि टिप माझ्याकडच्या पुस्तकातील आहे.
रेवती
23 Jan 2013 - 2:53 pm | विलासिनि
रेवतीताई छान टिप.
2 Jun 2009 - 7:14 am | बहुगुणी
पण चतुरंग आणि सुनील यांचे वैधानिक इशारे शिरोधार्य मानून (पन्नाशीतल्या माझ्यापुरता!) धनंजयांचा सल्ला मानून मी रोजच्या कॉफीत 'चमचा-दोन चमचे पाक घालून' संपवायचा विचार करतोय. त्यातल्या त्यात कमी घातक हो!! (पण ती कॉफी दिवसाला एकच कप प्यालो तरच ठीक, नाहीतर केला तुका अन् झाला माका;))
पण या निमित्ताने बर्याच नवीन पर्यायांचा विचार झाला हे फलित काही वाईट नाही!
2 Jun 2009 - 7:10 am | विनायक प्रभू
नाही संपत तर आजुबाजुच्या 'कडुकर" ना द्या थोड थॉडासा.
2 Jun 2009 - 7:14 am | चित्रादेव
१) विकतचा गूलाबजामचा पाकात प्रिसर्वेटीव असेल तर सरळ फेकून द्या. प्रकृतीस वाईट.
२)गोड पुर्या/शंकरपाळ्या(पण पुन्हा कॅलरीज वाढवणे आलेच. आणि पुन्हा उरलेल्या तूपाचे/तेलाचे काय करू अस नवीन प्रश्ण मिपावर व मिपांकरांना डोके चालवणे आले);)
३)थोडेफार तूप उतरले असल्याने शिर्यात टाका आणि ओवन मध्ये सेट करा. हा एक अफगाणि पदार्थ तयार होइल्.(मजाक नाय करत हां).
रेसीपी न विचारत देतेय,
रवा नुसता भाजा. दूध शिंपडून घ्या. मग अफगाणे स्टाईने भरपूर काजू, किशमिश्,केसर टाका. हवेच असेल तर तूप टाका एकदम चमचे. मग हा पाक ओता. थाळीत थापून १० मिनीटे अवन मध्ये १७५ वर सेट करा.
पुढला एक आठवडा वरील १ वा २ काहीही बनवले तर वजन बघू नका आणि नुसते पाणी,फलोहार घ्या १ महिना. (फुकट सल्ला).
:)
2 Jun 2009 - 7:30 am | Nile
गुलाबजाम, अथवा पुर्या करा, आणि आम्हाला (पाकासकट) पाठवा, प्रश्न मिटेल. ;)
2 Jun 2009 - 8:55 am | सँडी
शेजार्यांना पाकच द्यायचा होता(गुलाबजाम खाऊन घेऊन).
3 Jun 2009 - 9:04 am | नर्मदेत ला गोटा
पाक उकळायला ठेवा. त्यात लिम्बाचा रस घला. ( आवडेल इतका अम्बट गोड करावा) काजु - बदाम घाला. दाट होइ पर्यन्त उकळा. (साधारण भज्याच्या पीठा इतके दाट करा). झाला सुधारस.
:)
5 Jun 2009 - 8:04 pm | तिमा
पाक रोज थोडाथोडा ओतून द्या आणि फ्लश करा. पोटात घालणे हे आरोग्यास धोकादायक!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
23 Jan 2013 - 8:11 pm | शुचि
मस्त!!
5 Jun 2009 - 8:11 pm | धमाल मुलगा
एव्हढं काय टेंशन घेताय त्यात?
सरळ रोज पोळीसोबत खायला वाटीमध्ये घ्या... आठवड्या-दोन आठवड्यात सगळ्या पाकाचा फन्ना :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
6 Jun 2009 - 8:52 am | प्रकाश घाटपांडे
अरे लिंबु पिळून सुधारस करा कि त्याचा. मला तर भाजी वगैरे काही लागत नाही नुस्ता सुधारस व पोळी खाल्ले कि झाले जेवण
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
6 Jun 2009 - 4:14 pm | परिकथेतील राजकुमार
पाकातले वडे करा. लै भारी लागतात.
साहीत्य :- गुलाबजामचा पाक, बर्फ, हळद,उकडलेले ४ बटाटे, मिरच्या, मिठ, कोथींबीर, आल, लसुण.
कृती :-
प्रथम साखरेचा पाक गरम करायला ठेवा.
आता उकळी आली की त्यात बर्फाचा चुरा घाला.
त्यानंतर बचकाभर हळद घालुन २२० तापमानापर्यंत उकळवा.
आता उकडलेले बटाटे कोथींबीर, हळद, मिठ, आले लसुण पेस्ट घालुन एकजीव करुन घ्या.
आता ह्या मिश्रणाचे चपटे गोळे (वडे) बनवुन घ्या.
आता हळुवार हातानी हे वडे पाकात सोडा. पाक चांगला मुरु द्या. घ्या हादडायला.
परा कपुर
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
23 Jan 2013 - 12:53 pm | घाशीराम कोतवाल १.२
पाकातले वडे
ठ्ठोSSSSSSSSS परा कपुर मानल बॉ..
25 Jan 2013 - 12:51 pm | मुक्त विहारि
बा बो...
23 Jan 2013 - 1:04 pm | तर्री
ठो ....
23 Jan 2013 - 1:17 pm | अद्द्या
=)) =))
घरी गेलो कि आईला दाखवतो परा ची हि पोस्ट
..जर लाथ घालून बाहेर नाही काढलंन .. तर
प्रयत्न करायला हरकत नाही
26 Jan 2013 - 12:06 pm | अनन्न्या
तुमच्या आवडीची कोणतीही फळे ( केळी, सफरचंद, स्ट्रॉबेरी) फोडी करून वाफवून घ्यावीत. पाकात घालून उकळी आणावी. मी प्रतिक्रीया देईपर्यंत बहुतेक पाक संपला असेल, पुढच्या वेळी करा.
26 Jan 2013 - 12:21 pm | मुक्त विहारि
मादक उपाय आहे.. दिला असता.. पण जावू दे.. नकोच..