साहित्य :
पाव किलो लाल भोपळयाचे छोटे तुकडे
किसलेल ओल खोबर पाव वाटी
चविपुरते मिठ
फोडणी : तुप २ चमचे, जिर, २ मिरच्यांचे तुकडे
प्रथम वरील फोडणी द्यायची व भोपळ्याचे तुकडे घालायचे. वाफेवर शिजवत ठेवायचे. अर्धवट शिजल्यावर मिठ टाकायचे. जास्त शिजवू नयेत शिजले की वरून खोबर टाकायच.
ह्या भाजीत हळद हिंग घालत नाहीत त्यामुळे ही उपवासालाही चालते व भोपळ्याचा आणि तुपाचा छान वास येतो.
प्रतिक्रिया
1 Jun 2009 - 1:08 pm | परिकथेतील राजकुमार
फोटू ???
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
1 Jun 2009 - 4:46 pm | अनंता
सदस्यांना आणि वाचकांना होणार्या त्रासाबद्दल दिलगीर आहोत.
प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
1 Jun 2009 - 1:09 pm | पर्नल नेने मराठे
फोतो हवच
चुचु
1 Jun 2009 - 1:09 pm | जागु
आजच केली आहे पण फोटू नाही हो काढला. आमचे फोटू काढण्याचे साधन बिघडलेय.
1 Jun 2009 - 1:10 pm | अनंता
इथे भाजीचा वास नाकात भरुन घेत असल्याची स्मायली कल्पावी :)
प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
1 Jun 2009 - 5:18 pm | चकली
उपासाच्या बटाटा भाजीसारखीच दिसतेय. छान आणि सोप्या पाकृ साठी धन्यवाद.
चकली
http://chakali.blogspot.com
1 Jun 2009 - 5:58 pm | अवलिया
फटु नसल्यास आम्ही कोणतीही बरी वाईट प्रतिक्रिया देत नाही. क्षमस्व.
--अवलिया
1 Jun 2009 - 6:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>फटु नसल्यास आम्ही कोणतीही बरी वाईट प्रतिक्रिया देत नाही. क्षमस्व :)
1 Jun 2009 - 6:56 pm | रेवती
ही भाजी चविष्ट लागते.
त्यात चारोळ्या (पदार्थ) पूड करून घातल्यास वेगळी चव लागते.
बरं झालं जागुनं आठवण करून दिली भाजीची....... विसरले होते हा पदार्थ.....बाखरभाजी म्हणतात त्याला.
रेवती
1 Jun 2009 - 7:51 pm | समिधा
खरचं ही भाजी खुप खमंग लागते..
उपास नसताना हया भाजी साठी फोडणी करताना मेथीचे दाणे घालावेत
आणि शिजत आल्यावर खोबर आणि तिळाचे कुट घालावे खुपच खमंग चव लागते..
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)