पुण्यात धर्मांतर

गणा मास्तर's picture
गणा मास्तर in काथ्याकूट
29 May 2009 - 10:05 am

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

29 May 2009 - 10:08 am | विनायक प्रभू

पुण्यात सुद्धा?

वेताळ's picture

29 May 2009 - 10:30 am | वेताळ

ये तो होना ही था.मला एक आश्चर्य वाटत आहे. आजची तरुण पिढी काय शोधत धर्माच्या इतक्या आहारी जात आहेत कुणास ठाउक?माझ्या एका खिर्स्ती मित्राचा भाउ गेली एक महिना माझे डोके खात आहे.त्याला देखिल धर्म बदलायचा आहे.पण त्याला मुस्लिम व्हायचे आहे.असे का म्हणुन त्याला विचारले तर तो मला म्हणाला की त्याचा मानसिक कोंडमारा होत आहे. त्याला ख्रिस्ती धर्मात मनःशांती मिळत नाही ,आता त्याला वाटते ती मनःशांती त्याला मुस्लिम धर्मात मिळेल.पण ह्या गोष्टीचा धर्माशी काही संबध असेल असे मला तरी वाटत नाही.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

पिवळा डांबिस's picture

29 May 2009 - 11:15 am | पिवळा डांबिस

काय पुण्यात? आणि धर्मांतर?
कसं शक्य आहे ते?
:)

विकास's picture

29 May 2009 - 4:52 pm | विकास

काय पुण्यात? आणि धर्मांतर?
कसं शक्य आहे ते?

अवांतरः या वाक्यावरून दमामिंनी केलेले अत्र्यांच्या कथेचे कथाकथन आठवले? "नारदमुनी? आणि ते ही गुत्त्यात? हे कसे काय शक्य आहे?" :-)

असो. धर्मांतराचे मला आश्चर्य वाटले नाही. मात्र राज्य-केंद्र सरकारे आणि पोलीस त्याची दखल घेत आहेत आणि पुणेकर सकाळने पण योग्य भाषेत ती बातमी देऊन आश्चर्य वाटायला लावले असे म्हणावेसे वाटते. (यावरून मला अमेरिकन "निंबी" शब्द आठवला - not in my backyard. थोडक्यात मानवतावाद वगैरे इतरत्र आमच्या आंगणात आले की खपणार नाही :-) )

डॉ. झकीर नाईकांचे बीनलेडन आणि इतर ज्वलंत विषयावरील वक्तृत्वआणि वक्तव्य युट्यूबर पहाण्यासारखे आहे. ;)

काजुकतली's picture

29 May 2009 - 11:18 am | काजुकतली

धर्म बदलुन मनशांती मिळेल हे काही खरे नाही..

माझ्या ऑफिसमधल्या एका ब्राम्हण मुलाने, ख्रिश्चन मुलीशी लग्न करण्यासाठी धर्मबदल केला. मला जेव्हा कळले तेव्हा मनात एक प्रश्न आला की धर्म बदलला की देवही बदलतात का?? मी इतकी वर्षे प्रभादेवीच्या मंदिरासमोरुन जाते. मनोमन नमस्कार केला जातोच जातो. मग उद्या मी धर्म बदलला तर हे अचानक थांबेल्??इतक्या वर्षांची शरिराला आणि मनाला झालेली सवय एका दिवसात, 'आता तुझा देव येशु, तिथेच नमस्कार करायचा, इथे नाही' असे मनाला सांगुन बदलेल?? आणि जर येशुला नमस्कार केला काय आणि गणपतीला केला काय, दोन्हीकडे सारखीच भावना येत असेल मनात तर मग धर्म बदलायचा कशाला??

बाकी ख्रिश्चन धर्मात कोंडमारा होतोय म्हणुन मुस्लिम व्हायचे हे म्हणजे रोगापेक्षा उपाय जालीम असे झाले :)

साधना

चिरोटा's picture

29 May 2009 - 12:04 pm | चिरोटा

त्याची केंद्र व राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे

का बॉ? ज्याला ज्या धर्मात जायचे आहे त्याला जावू द्या की.

हा धर्म स्वीकारताना आपल्यावर कोणतीही जबरदस्ती केली जात नसल्याचे त्या वेळी त्यांनी जाणीवपूर्वक सांगितल्याचे चित्रफितीत दिसते

प्रश्न ईकडेच मिटला.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

धमाल मुलगा's picture

29 May 2009 - 6:33 pm | धमाल मुलगा

आता पीस(???) टिव्ही/आयआरएफसाठी पुण्यातच कार्यकर्ते मिळतील. शिकल्यासवरलेल्या सुधारणावादी मुस्लीम समाजाचं कसं अधःपतन(!) चालू आहे ह्यावर चर्चा करुन आणि धर्मातल्या कालपरत्वे अर्थशुन्य झालेल्या रुढींना झुगारुन देणार्‍या जनमानसाला ते कसे पाश्चिमात्य विचारांचे पाईक होऊन धर्माचा मोठा गुन्हा करताहेत हे सांगायला आणखी चार डोकी मिळतील.

ह्या घटनेवर चर्चा करताना कोणी विरोधी सुर लावतील तर कोणी काय फरक पडतो/व्यक्तीस्वातंत्र्य असे सूर लावतील. ज्याचा त्याचा वैयक्तिक विचार हा असतोच. मान्य!

मुळात हे असं का होतंय? ही धर्मांतरं कशी होतात, का होतात ह्याबद्दल किती जणांना माहिती असते हा एक मोठा प्रश्न आहे. आपण सरळमार्गी मध्यमवर्गीय मानसिकतेचे सहिष्णु विचारांचे अधिक्य असलेले बरेचसे लोक, "मला काय त्याचं?" किंवा हे किती उदात्त वगैरे विचारांनी गुरफटून अशा घटनांकडे दुर्लक्ष करतो किंवा त्याव्रच्या कारवाईवर विरोध करतो/निषेध व्यक्त करतो..

अशा धर्मांतरांमागची गणितं काय हे कधी कोणी पडताळून पाहतं का? निरनिराळी आमिषं दाखवून धर्मांतर करवून घ्यायचं आणि नंतर त्यांना वार्‍यावर सोडायचं. जेव्हा काही मोठी गरज पडते तेव्हा 'धर्माचा वास्ता' देऊन रान पेटवायचं ही खेळी आपण कधी समजणार?

सद्यस्थितीतील समाजाला मध्ययुगिन काळात ओढून नेण्याचा विचित्र प्रकार चालु दिला जातो हेच मुळात अचंबित करणारे आहे. बरं जिहाद वगैरेबद्दलचे ह्या महाशयांचे जाहीर विचार ऐकले तर सर्वसामान्य मुस्लीमेतराला झीटच येईल. ह्या/अश्या पध्दतीचं शिस्तबध्द 'ब्रेनवॉशिंग' (मराठी?) हेच तालीबान, अल कायदा, लिट्टे (इथे धर्म नव्हे तर असुरक्षिततेची भावना हे ध्यानी घ्यावे.) ह्यासारख्या संघटनांनी करुन कित्येक तरुणांचं जीवन नासवलं, देश सडवले.

मुद्दा धर्मांतराचा नाही, तर त्यामागच्या 'ड्रायव्हिंग फोर्स'बद्दलचा आहे. खरी ग्यानबाची मेख आहे ती तिथे!
पोलीस, गुप्तचर यंत्रणा ह्यांना काय कारण असावं बरं ह्या वर्षाभरापुर्वी घडलेल्या घटनेच्या शिळ्या कढीला ऊत आणण्याचं? मुद्दा विचार करण्यासारखा आहे की नाही?

तात्पर्यः आगीशिवाय धूर निघत नसतो म्हाराजा :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

अनामिका's picture

29 May 2009 - 7:06 pm | अनामिका

धमु यांच्या मताशी सहमत................
ही तर फक्त सुरुवात आहे अजुन बरच काही घडायच व बघायच बाकी आहे.........
डोक्यावरुन पाणी वहायला लागेल तेंव्हा तरी आपण जागे होऊ कि नाहि माहित नाही!

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

अनामिका's picture

29 May 2009 - 7:07 pm | अनामिका

धमु यांच्या मताशी सहमत................
ही तर फक्त सुरुवात आहे अजुन बरच काही घडायच व बघायच बाकी आहे.........
डोक्यावरुन पाणी वहायला लागेल तेंव्हा तरी आपण जागे होऊ कि नाहि माहित नाही!

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

धमाल मुलगा's picture

29 May 2009 - 7:26 pm | धमाल मुलगा

डोक्यावरुन पाणी वहायला लागलं की आपणही धर्म बदलणार बघा...
मग ज्या हातांनी इतकी वर्षं आई भवानीला नमस्कार केले तेच हात तिच्यावर घणाचे घाव घालायला सळसळणार...अहो, आपला इतिहासच आहे तो!

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

हुप्प्या's picture

29 May 2009 - 11:19 pm | हुप्प्या

बातमीत उल्लेख केलेला इसम झकीर नाईक हा इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा मुख्य आहे. हा अत्यंत हुषार, इंग्रजीवर प्रभुत्व असणारा माणूस आहे. पण तितकाच तो धर्मपिसाट आहे. भारतात वहाबी पंथाचा जो एक अत्यंत कट्टर असहिष्णू मुस्लिम पंथ आहे त्याचा प्रचार करायला ह्याला सौदी अरेबियाकडून खूप पैसा मिळतो असे अन्य भारतीय मुसलमान म्हणतात. हा इसम कुराण तोंडपाठ जाणतो. भाषण करताना कुराणाची, इस्लामची भलावण करणे ह्याच्याकडून शिकावे. आधुनिक विज्ञानात जे जे काही आहे ते ते कुराणात खूप आधीच लिहिले आहे हा ह्या इसमाचा आवडता सिद्धांत. तो सिद्ध करायला कुराणातील वेचक वचनांचा हवा तसा अर्थ लावून जादूगार रिकाम्या हॅटमधून ससे, कबुतरे काढतो तसे हा कुराणातून असली रत्ने काढतो. अन्य अरबी जाणकारांनी ह्याचे दावे खोडायचा प्रयत्न केला आहे. पण हा माणूस आमनेसामने वाद घालायला तयार नसतो. पळवाटा काढतो.
बर्‍याच दिवस हा इसम भारतीय मुस्लिमांचा लाडका होता पण मध्यतरी कधीतरी ह्याने भारतीय मुस्लिम रूढींवर जोरदार टी़का केली. दर्गा, पीर, मझार वगैरेला जाणे, फुले वाहणे, नवस करणे, उत्सव करणे ह्या सुफी परंपरा गैरइस्लामी आहेत. कुणाच्याही अगदी महंमदाच्या कबरीपाशी जाऊन प्रार्थना करणे हे इस्लाम मानत नाही. केवळ अल्ला हाच देव आहे. बाकी कुणी नाही. हे ऐकून भारतीय मुस्लिम खवळले आणि ह्याचे स्थान ढळले.
युट्युबवर ह्याच्या अनेक क्लिपा पहायला मिळतील.
धर्मस्वातंत्र्याचा, धर्मांतरस्वातंत्र्याचा जयघोष करणार्‍यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की असली विषारी मुळी आपल्या देशात लावून आपण आपल्या देशाच्या नाशाची बीजे रोवत आहोत. असला कट्टर धर्म कुणाचेही हित करत नाही. एकदा का चंचूप्रवेश झाला की तो आपली नखे दाखवू लागेल. अफगाणिस्तानसारख्या देशाची काय वाट लागली हे आपल्या समोर आहेच.

टारझन's picture

31 May 2009 - 2:41 am | टारझन

आयला .. तो झाकिर नाईक मराठी आहे ? कमाल आहे राव .. एकदा पिस टिव्ही वर त्याचं तावातावानं बोल्णारं भाषण ऐकून तो पाकिस्तानी आहे की काय असं वाटलं होतं .. :)
हुशार आहे माणूस .. :) फक्त कुठे एकटा भेटला तर बरगड्या मोडतो त्याच्या :)

दीपक साळुंके's picture

30 May 2009 - 3:19 pm | दीपक साळुंके

विडीओज पाहिले ! धर्मांतर करुन घेणा-या लोकांच्या बोलण्याच्या पद्धतीवरुन मला वाटतं की हा सगळा ढोंगीपणा आहे. हे लोक मुळचे इस्लामिकच असावेत असा माझा अंदाज आहे. हा त्या झाकीर नाईक आणि त्याच्या संस्थेचा कांगावा असावा.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 May 2009 - 10:41 pm | llपुण्याचे पेशवेll

येस येस. मला पण असेच वाटले.. आणि त्याना चांगले पढवून आणले होते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विकास's picture

31 May 2009 - 2:09 am | विकास

अजून करमणूक हवी आहे का?

ह्या झकीर नाइकांच्या सभेतील बनावट शंकराचार्य आणि त्यांचे वक्तव्य येथे पहा. :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

31 May 2009 - 2:18 am | बिपिन कार्यकर्ते

या माणसाची ओळख सौदीत असतानाच झाली होती. त्याच्या तथाकथित आधुनिक चेहर्‍यामुळे बरेच मुस्लिम याच्याबद्दल अगदी भारावून बोलतात. मराठी मातृभाषा असलेला हा माणूस हिंदी, उर्दू, अरबी, इंग्रजी वगैरे भाषा अस्खलित बोलतो. तथाकथित आधुनिक चेहरा असल्याने जास्त धोकादायक.

याच्याबद्दल गूगलंल तर नक्कीच बरीच धक्कादायक माहिती मिळेल.

बिपिन कार्यकर्ते

चिरोटा's picture

30 May 2009 - 10:19 am | चिरोटा

अफगाणिस्तानसारख्या देशाची काय वाट लागली हे आपल्या समोर आहेच

ह्याची वाट लावायला सध्या आर्थिक वाट लागलेली अमेरिकाही कारणीभूत आहे.असो.

धर्मस्वातंत्र्याचा, धर्मांतरस्वातंत्र्याचा जयघोष करणार्‍यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की असली विषारी मुळी आपल्या देशात लावून आपण आपल्या देशाच्या नाशाची बीजे रोवत आहोत

कायद्याच्या चौकटीत एखादा धर्मप्रसार करत असेल तर त्याला कसे रोखणार?

पोलीस, गुप्तचर यंत्रणा ह्यांना काय कारण असावं बरं ह्या वर्षाभरापुर्वी घडलेल्या घटनेच्या शिळ्या कढीला ऊत आणण्याचं? मुद्दा विचार करण्यासारखा आहे की नाही?

नक्कीच आहे.लोक स्वतःचा धर्म बदलण्यास्(आमिषाला बळी न पडता) का प्रवुत्त होतात हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.'जबरदस्तीने धर्मांतर' हा मुद्दा पटत नाही.जिचे धर्मांतर झाले आहे ती व्यक्ती परत आधिच्या धर्मात येवु शकतेच ना?
भारतापुरते बोलायचे झाले तर देशावर अनेक आक्रमणे झाली पण लोक आपली भाषा,धर्म्,संस्क्रुती टिकवून आहेतच.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

हर्षद आनंदी's picture

30 May 2009 - 10:43 am | हर्षद आनंदी

या कार्यात ख्रिश्चन सुध्दा आघाडीवर आहेत. पुण्यात, खडकी, दापोडी, मिलेट्री एरीया इथे हा प्रकार चालु असतो. तसेच शुक्रवार पेठेतील, काही चर्च \ शाळांमध्ये, पुलगेट जवळच्या मिलिट्री शाळेत असे समारंभ दर आठवड्याला होत असतात.

एक उदा:
हडपसरला जाताना पुल उतरल्यावर रामवाडी लागते. तिथे डोंबारी समाजाचे धर्मांतर चालु होते. प्रत्येकी काही हजार रुपये देउन हे घडविण्यात आले होते. तिथे १५ ऑगस्टला झेंडावंदन करताना, भारत मातेचा फोटो लावला असता, "ये शैतान की माँ है" असे त्यांना, शिकविण्यात आल्याचे त्यांच्याकडुन कळले. सध्या धर्मांतर थांबविण्यात यश आले आहे.

इथे एक नमुद करावेसे वाटते,
शिवरायांनी, ह्या हिंदु समाजाच्या तळागाळाच्या लोकांना बरोबर घेउन स्वराज्य निर्माण केले. एकाच वेळेस ४ पातशाह्यांना नामोहरम केले. हिंदु उच्चवर्णिय समाज फार क्वचित वेळा शस्त्र हातात घेतो. लढतात ते हे तळागाळाचे लोक!! डोंबारी, भिल्ल, लोहार, कुंभार, चांभार, हरीजन, आणि असे अनेक समाज आज ही त्यांच्यात आक्रमणाची ताकद टिकवुन आहे. हिंदु समाजाला नारळाची उपमा दिल्यास, हे लोक शेंदी पासुन, करवंटी पर्यंत आहेत, आतला भाग म्हणजे उच्च्वर्णिय! असेच चालु राहिले तर कवच भेदायाला वेळ लागणार नाही, खोबरे कसे खवणले जाते, ते प्रत्येकास माहीत आहेच ...

पण आजच्या काळात या लोकांच्या कलागुणांना, कौशल्याला स्थान नाही.... कसायला जमिन नाही, जमिन आहे तर पानी नाही, सगळे आहे तर मालाला किंमत नाही. खायला अन्न नाही, ४-५ वर्षाची मुले रस्त्यावर नागडी फिरत असतात. बाया-बापड्यांच्या अंगावर तरी कुठे धड कपडे असतात? हा समाजाचा भाग अधिकाधिक गरीब होत आहे, कारण शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. याला जबाबदार कोण? फक्त राजकारणी? सगळ्यात पहिल्यांदा पोटाची भुक, ती भागविण्यासाठी, धर्म, जात, ही मानसिक बंधने तटातट तुटतात, नव्हे तुटली तर त्याला चुक कसे म्हणावे? धर्मांतर म्हणजे आत्महत्या, हे भरल्या पोटी ऐकायला छान वाटते. ८ दिवस एक वेळ, ते सुध्दा शिळेपाके, वास येणारे तरिही अर्धपोटी खा, मग सांगा!! तरीही हे चुकच...

आजही भारतीय सैन्यातील पायदळ, जवान यांच्यात मनाने "भारतीय" असणार्‍या खेडोपाड्यातील लोकांचा समावेश जास्त आहे. "INDIAN" कुठे आहे? अमेरिकेला जाण्याची, लंडनला जाण्याची, दुबई, करातला जाण्याची ओढ आहे. राजकारण्यांना शिव्या घालताना पहिला नंबर, मतदान करताना उन लागतय म्हणे! पुण्या-मुंबई सारख्या शहरातुन किती हिंदु उच्चवर्णिय तरुण देशासाठी सैन्यात जातात? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

हे निस्तरण्याचा प्रयत्न सध्या काही तरुणांकडुन केला जात आहे. चिंचवडच्या आद्य क्रांतीकारक चाफेकरांच्या वाड्यात ह्या वस्तीतील ३०-३५ लहान मुले, तिथे राहुन प्राथमिक शिक्षण घेत आहेत.

अहो गेली २०० वर्षे पोप भारतात ख्रिस्ती समाज वाढवायाचा प्रयत्न करता आहेत पण अजुन त्याना त्यात काहीच यश आले नाही. मागील वर्षी पोपने तसे बोलुन ही दाखवले आहे. आता त्यानी २०२० ची मुदत दिली आहे. दरम्यानच्या काळात त्याना संपुर्ण भारत खिर्स्ती बनवायचा आहे. कोट्यावधी रुपये त्यासाठी ते भारतात ओतत आहेत्.बघुया त्यात त्याना यश येते का. का त्याआधीच ते वर जातात का.=))

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

हर्षद आनंदी's picture

30 May 2009 - 12:54 pm | हर्षद आनंदी

जखम झाली आहे ती भारत मातेला....

गेली २०० वर्षे पोप भारतात ख्रिस्ती समाज वाढवायाचा प्रयत्न करता आहेत :-- अजुन चालुच कसे शकते? आणि का? हिंदु क्ठे जात नाही हिंदु धर्माचा प्रचार करायला..... मग हेच **वे का इथे?

आपण जाऊ अमेरिकेला, युरोपला हिंदु धर्माचा प्रचार करायला, त्यांना मन:शांतीची गरज आहे, आणि ती हिंदु धर्मच देऊ शकतो, असे सांगुन प्रचार करुया!! बघा २ दिवसात आपली प्रेतं कुठल्यातरी मेडीकल स्टुडंटच्या टेबलावर असतील, फुकटचे प्रयोग करायला...

लेटेस्ट : ऑस्ट्रेलियात होत असलेले भारतीय (हिंदु) विद्यार्थांच्या हत्या...

त्यानी २०२० ची मुदत दिली आहे. दरम्यानच्या काळात त्याना संपुर्ण भारत खिर्स्ती बनवायचा आहे ....

महाराष्ट्र आहे तोपर्यंत शक्य नाही..... कोणी ना कोणी शिवाजी नक्की येईल, पण तो पर्यंत आपण लढुच...

गेल्या १०००-१२०० वर्षांची आक्रमण झेलुन, आक्रमणकर्त्यांना याच मातीत गाडुन हा हिंदु आज उभा आहे. आता अजुन बलशाली होत आहे. हे कार्य १० वर्षात करणे त्यांना शक्य नाही, पण ज्या पध्दतीने, १६४० पासुन १८१८ पर्यंत ईग्रजांनी हात पाय पसरले, नंतर हा देश पुर्णपणे नागावला.... हीरे, मोती, पाचु, सोने, नाणे, खनिजे, वन्य जीवन, सामान्य जीवन, कायदा, शिक्षण पध्दती, संस्कृती, गौरवशाली ईतिहास, ऐतिहासिक वास्तु इतकेच नव्हे तर सारासार विचार करण्याची ताकद सुध्दा त्यांनी नाहीशी केली, तसेच ते हे ही करु शकतात. ग्रामीण भारताला टार्गेट केल्यास त्यांना अशक्य असे काहीच नाही. आता ते तेच करीत आहेत. भारताच्या पुर्वेकडील ७ राज्ये, सेव्हन सिस्टर्स, बहुतांशी धर्मांतरीत झाली आहेत.

पाकिस्तान ते बांग्लादेश हा प्रदेश, भारतभुमीतुन जोडण्याचा प्रयत्न "मुघलिस्तान" जरा गुगळुन काढा.

अहो गेली ८०० वर्षे झाली मुस्लिम आक्रमणाला भारतीय हिंदु तोंड देत आहेत. त्याना पुर्ण भारत कधीच मुस्लिमबहुल राष्ट्र करता आले नाही.मग हा पोप कोण तिसमारखान लागुन गेला. अहो ह्याना २०० वर्षे कोट्यावधी रुपये ओतुन देखिल ५% लोक ख्रिर्स्ती करता आले नाही. मग इथुन पुढे काय झक मारणार. फक्त कोरिया(दक्षिण) मधे ह्याना ५० वर्षात जवळजवळ ८५ % लोकाना ख्रिर्स्ती करण्यात यश आले आहे.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

यन्ना _रास्कला's picture

30 May 2009 - 8:01 pm | यन्ना _रास्कला

देवान्मधे अल्ला आनी पर्बु येशु मोजल तर कायच बिघडत नाय. हिन्दु र्‍हाहुन व्हा कि यशुच पायिक. कोन तुमाला नाय म्हनतय. धर्म बदललाच पायजे आस कुठ लिवलय.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

देवदत्त's picture

30 May 2009 - 8:49 pm | देवदत्त

गणा मास्तरांचे मत काय? ते मात्र दुवा टाकून गेलेत, इतर लोक चर्चा करत आहेत :)
(पुन्हा एक वाक्य /किंवा दुवा चर्चांचा पूर यायचा आता...)

विकास यांचे मत पटले.

धर्मांतर झाले म्हणून की हे पुण्यात झाले म्हणून त्याची बातमी झाली आहे?

गणा मास्तर's picture

30 May 2009 - 10:50 pm | गणा मास्तर

गणा मास्तरांचे मत काय? ते मात्र दुवा टाकून गेलेत, इतर लोक चर्चा करत आहेत
फार घाईघाईत दुवा टाकला होता.नंतर चर्चेला वेळ मिळाला नाही.
व्हिडिओमध्ये असे दिसते की, लोकांनी स्वतःच्या मर्जीने धर्मांतर केले आहे. कायदेशिररित्या अशावेळी काही करता येणार नाही.
पण लोक असा निर्णय का घेतात याचा हिंदुंनी विचार करायला हवा. वर हर्षद आनंदीने व्यक्त केलेली मते आणि माझी मते जुळतात.

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

हुप्प्या's picture

30 May 2009 - 10:22 pm | हुप्प्या

परकीय राष्ट्रातला पैसा आपल्या देशात ओतून, खरीखोटी आमिषे दाखवून जी धर्मांतरे होतात ती एकतर ख्रिस्ती वा इस्लाम या धर्माकडून. ह्या धर्मांचा एक मोठा तोटा असा की ते कुठल्या तरी उपर्‍या जागेतून उचलून भारतात आणले जातात. त्यांना स्थानिक संस्कृतीशी देणेघेणे नसते. किंबहुना त्याविषयी तिरस्कार असतो. त्यामुळे स्थानिक सण, चालीरिती, भाषा, रुढी आणि इतिहास सगळे विसरावे याकडे यांचा कल असतो. मुसलमान झाले की सगळ्या प्रार्थना अरबीतच, अन्य भाषांना स्थान नाही. जणू अल्लाला बाकी भाषा येतच नसाव्यात. दोनचार ईदा एवढेच सण. ख्रिस्ती लोक भाषेच्या बाबतीत जरा मवाळ आहेत. पण बाकी ताठरच. कुंकू लावू नका, क्रॉस वा मेरी सोडून कुठल्या मूर्तिपुढे नतमस्तक होऊ नका वगैरे. जसे जगभर कुठेही मॅकडोनल्डमधे गेलो तर साधारण एकच प्रकारचे अन्न मिळते (अपवाद सोडा) त्यावर स्थानिक संस्कृतीची कुठलीही छाप नसते तसे ह्या धर्मांमुळे संस्कृतीचे मॅकडोनल्डायझेशन होते.
हिंदू धर्म कदाचित बाहेरून आला असेल. पण त्यात अनेक देव असल्यामुळे स्थानिक देवांना तो सहज सामावून घेऊ शकला. स्थानिक म्हसोबा, काळूबाई आणि सटवाई सुखाने पूजल्या जात राहिल्या. एक देव मानणार्‍यांपेक्षा अनेक देव मानणारे जास्त सहिष्णू असतात.
माझ्यामते ह्या बाटवाबाटवीचा हा एक मोठा दुष्परिणाम आहे.

शाहरुख's picture

31 May 2009 - 10:25 am | शाहरुख

जर एखादा माणूस पैसे घेऊन धर्म बदलत असेल तर ते कायद्याच्या बाहेर आहे का ? (पैसे देणारा आणि घेणारा दोघांच्या साठी)

जर नसेल तर, एखाद्याला पैसे घेऊन धर्म बदलु न देणे ही कुणाची "जबाबदारी" ?? त्याला जास्त पैसे देऊन "रिटेन" करणे अपेक्षित आहे का ?

-जानवेवाला शाहरुख