गाभा:
आज २८ मे,
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा जन्मदिवस. २८ मे १८८३ साली जन्मलेल्या स्वातंत्रवीराचे स्मरण हे नेहेमीच प्रेरणादायी आणि चैतन्य निर्माण करणारे असते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा होम करुन ब्रिटीशांविरुद्ध रण छेडणार्या या महान क्रांतिकारक देशभक्ताला मनापासुन लक्षावधी प्रणाम. मिपाच्या संचालकांना याचा विसर कसा काय पडला?
प्रतिक्रिया
28 May 2009 - 1:04 pm | अमोल केळकर
'सावरकरांचे विचार नेहमीच प्रेरणा देणारे ठरतील.'
----------------------------------------------------------------
अवांतरः मिपाच्या संचालकांना विसर पडला असेल असे वाटत नाही. तांत्रीक कामांमुळे मुखपृष्ठावर उल्लेख राहिला असण्याची शक्यता जास्त आहे. लवकरच स्वा. सावरकरांचा फोटो आणि विचार दिसतील असे वाटते.
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
28 May 2009 - 1:46 pm | विशाल कुलकर्णी
तसेच असावे. कारण माझ्या माहितीप्रमाणे तात्या कट्टर सावरकरभक्त आहेत.
सस्नेह
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"
(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री
28 May 2009 - 1:45 pm | कपिल काळे
सावरकरांना आणि त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन!!
आज सकाळीच विचार मनात आला होता की, मिपा मुखपृष्ठावर त्यांचे छायावित्र पहायला मिळेल का, परंतु देखभालीसाठी मिपाची डोळेमिचकावणी सुरु असल्याने ते शक्या झालेले दिसत नाही.
28 May 2009 - 1:54 pm | जागु
आम्हीही (मी व आहो) सावरकर भक्त आहोत. आमचेही विनम्र अभिवादन.
29 May 2009 - 12:40 am | प्राजु
मीही सावरकर भक्त आहे..
माझेही अभिवादन!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 May 2009 - 3:27 am | विकास
सर्वप्रथम स्वा. सावरकरांना विनम्र आदरांजली. मी पण सावरकरांना मानणारा आहे हे माझ्या इतर अनेक साद-प्रतिसादातून (येथील आणि उपक्रमावरून) समजेल. हे सांगण्याचा उद्देश खालील उर्वरीत प्रतिसाद :-) : कृपया हे कोणी व्यक्तिगत घेऊ नये. तसा मनापासून उद्देश नाही. हा मुद्दा वेगवेगळ्या वेळेस वारंवार येतो म्हणून जे वाटले ते लिहीत आहे इतकेच.
मिपावर प्रत्येक वेळेस प्रत्येक थोर नेत्याचे, विभुतीचे छायाचित्र हे त्यांच्या (म्हणजे त्या थोर नेत्याच्या) जयंती अथवा पुण्यतिथीस असलेच पाहीजे अथवा तसे नसले तर त्याचा संबंध मग मिपाकरांचे विचार, जात, धर्म, (उद्या एकाही थोर बाईचे चित्र लावले नाही म्हणून) लिंग आदींशी लावायचे काही कारण नाही असे वाटते. वास्तवीक मिपावर नुसते चित्र लावले का ते विचारण्याऐवजी, आपल्याला आवडणार्या अशा थोर व्यक्तिबद्दल आपल्याला माहीत असलेल्या घटनांवर, विचारांवर इत्यादी, आधारीत येथे लेख आणि चर्चा टाकावी आणि त्या व्यक्तीचे विचार वाचकांपुढे आणावेत असे वाटते - मग ती व्यक्ती सावरकर असोत अथवा आंबेडकर अथवा अजून कोणी :)
29 May 2009 - 7:15 am | विसोबा खेचर
विकासभौजींशी सहमत आहे..
तात्यारावांबद्दल नितांत आदर आहेच आणि राहील. त्यांच्या जयंतीनिमित्त मिपावर फोटू टाकला गेला नाही याचा अर्थ मिपा मालकांना त्यांच्याबद्दल आदर नाही असा कुणी करून घेऊ नये. सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या लाईफमंदी सर्वच गोष्टी आठवण ठेऊन करणं शक्य होतच असं नाही. शिवाय गेल्या ३-४ दिवसांपासून मिपाचे कामही सुरू आहे त्यामुळे मिपा बराच वेळ बंद होते..
आपला,
(सावरकरभक्त) तात्या.
बाय द वे, विशाल कुलकर्णी साहेबांनी आता आठवण करून दिली आहेच, त्यामुळे मिपा मुखपृष्ठावर सावरकरांचे स्मरण निश्चितच केले जाईल. खरं सांगायचं तर ही घटना माझ्या लक्षातच नव्हती..
आपला,
(प्रांजळ) तात्या.
29 May 2009 - 8:10 am | समिधा
माझ्या सर्व कुटुंबाला सावरकरांबद्द्ल खुप आदर आहे. माझेही अभिवादन!
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
29 May 2009 - 2:10 pm | लिखाळ
सावरकरांना अभिवादन !
विकासरावांशी सहमत आहे.
'१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ सावकरांच्या १२६व्या जयंती निमित्त सवलतीच्या दरात उपलब्ध केला आहे. काल लोकसत्तेत बातमी वाचली तीचा दुवा देतो. इच्छुकांना लाभ घेता येईल.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
29 May 2009 - 5:19 pm | विनायक पाचलग
शतशः अभिवादन
काही व्यक्तींबद्दल बोलता येत नसते,शब्द तोकडे पडतात असेच सावरकर
त्यामुळे पुन्हा एकदा अभिवादन
(कालच धागा काढायला आलेलो होतो मात्र मिपा बंद दिसले ,पण विशालजीनी ते काम केल्याबद्दल त्यांचे आभार)
स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......
विनायक पाचलग
29 May 2009 - 5:47 pm | धमाल मुलगा
त्या क्रांतीसुर्य, दुरदृष्टी असलेल्या प्रचंड पांडित्यवान अश्या देवतुल्य व्यक्तिमत्त्वाला आमचाही साष्टांग प्रणिपात!
लोकसत्तेतली ती बातमी वाचली, परंतु एक प्रश्न पडला की हे पुस्तक ह्या वर्षी सवलीतीच्या दरात देणार आहेत असं म्हणताहेत, पण मी तर गेल्यावर्षीच ग्राहक पेठेतून घेतलं. अर्थात तेव्हाही फारच नगण्य किंमत होती त्याची.
साक्षात तात्यारावांनी स्वतः लिहिलेल्या हस्तलिखीताला पुस्तकरुपानं प्रकाशीत केलेल्या ह्या पुस्तकासाठी सवलत नसती तरीही नक्कीच लोकांच्या त्यावर उड्या पडल्या असत्या. :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
29 May 2009 - 6:11 pm | नितिन थत्ते
सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील आणि हिंदू धर्मीयांना रूढींच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी केलेले समाजसुधारणात्मक कार्य अतिशय स्पृहणीय.
मनःपूर्वक अभिवादन.
खराटा
(रंग माझा वेगळा)