विवाह संस्था व तीचे पावित्र्य

हर्षद आनंदी's picture
हर्षद आनंदी in काथ्याकूट
26 May 2009 - 9:03 am
गाभा: 

कालच चॅनेल सर्फिंग करताना, कुठल्याश्या न्युज चॅनेल वर, "रीयल टीव्ही" नावाच्या चॅनेलवर दाखाविण्यात येणार्‍या एका रीऍलिटी शो मधील काही भाग दाखवुन "ये अश्लिलता नही तो और क्या" वगैरे बडबड ऐकण्यात आली.

सायंकाळी झी मराठी वरील "कळत नकळत" या मालिकेची जाहीरात पाहण्यात आली. "रोहीत मधुरा" या पात्रांच्या लग्नाचे रीतसर आमंत्रण मिळाले.

मनात विचार आला विवाह संस्थेचे पावित्र्य शिल्लक राहिले आहे काय? असल्यास वा नसल्यास त्याची कारणे कोणती?

चित्रपट अथवा मालिका, किंबहुना कोणत्याही दृक-श्राव्य माध्यमातुन, कोणत्याही धर्मातील विवाह- विधिवत विवाह दाखवले जातात, त्याचे फलश्रुती ह्या समाजाच्या एका मुलभुत आधारस्तंभाचे विडंबन जोरात होत आहे, असे वाटते.
कोणत्याही धर्मातील विधी काहीतरे महत्व ठेवुन असतात, तरी त्यांचे जाहीर रित्या प्रदर्शन होऊ नये असे वाटते. कथेतील विवाह दाखवुन आपन त्या विधींची चेष्टा करतोय असे आता जाणवायला लागले आहे. तरी या गोष्टींवर आपले मत जाणुन घ्यावेसे वाटते.

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

26 May 2009 - 9:05 am | विनायक प्रभू

कळाले नाही हॉ

हर्षद आनंदी's picture

26 May 2009 - 9:16 am | हर्षद आनंदी

आपण जे काही दुरदर्शन संचावर पाहतोय, त्याचा भावी पिढीवर काय परीणाम होऊ शकतो \ झालाय? लग्नसंबंधाचे महत्व संपत चालले आहे, त्याला कारणीभुत हे प्रकार आहेत असे वाटते.

टारझन's picture

31 May 2009 - 2:34 am | टारझन

मास्तरला पण कळलं नाही ? =)) =)) =))
चला आता मास्तरला सामान्य वाचकांची व्यथा कळेल .. :)

असो ..बाकी काथ्याकुटातला सब्जेक्ट कुछ कळ्या तो नैच्च .. पण पच्या भी नही बॉस !! जरा मोठं आणि विस्तृत लिवलं असतं तर कळलं असतं ..

(गतिमंद) टारझन अस्वस्थी

चिरोटा's picture

26 May 2009 - 9:10 am | चिरोटा

गेल्या काही वर्षात जात्,धर्म्,भाषा सगळच रस्त्यावर आलय. विवाह संस्था त्यापैकी एक.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

विवाह संस्थेचे पावित्र्य म्हणजे नक्की काय? (ते कळल्यास पुढची कारणमिमांसा करता येईल)

..विधी काहीतरे महत्....जाहीर रित्या प्रदर्शन होऊ नये असे तुम्हाला का वाटते? (मग लग्नाला का बोलावतात? गुपचुप का नाही करत?)

कथेतील विवाह दाखवुन आपन त्या विधींची चेष्टा ? (हे कसे काय?)

कळत नकळत हा एक मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे (बघुन जास्त विचार न करता सोडून देणे) की सर्वांना अपरिहार्य कायद्याने बंधनकारक वैचारिक / पाळणे आवश्यक असा उपचार आहे?

हर्षद आनंदी's picture

26 May 2009 - 9:36 am | हर्षद आनंदी

विवाह संस्थेचे पावित्र्य म्हणजे नक्की काय? (ते कळल्यास पुढची कारणमिमांसा करता येईल)

लग्ना नंतरचे रंगवलेले सीन, त्याच्याही पलीकडे जाउन गेले काही दिवस झी- मराठी वर जो तमाशा चालला आहे (अवघाची संसार, कळत नकळत व.) ते बघुन डोके फिरले. घराघरातुन लहान मुले ह्या सिरीयल बघत असतात. त्यांच्यांवर काय संस्कार होतीय हा विचार आला.

..विधी काहीतरे महत्....जाहीर रित्या प्रदर्शन होऊ नये असे तुम्हाला का वाटते? (मग लग्नाला का बोलावतात? गुपचुप का नाही करत?)
कथेतील विवाह दाखवुन आपन त्या विधींची चेष्टा ? (हे कसे काय?)

खरे आणि खोटे यात काहीतरी अंतर ठेवा ना राव! खोट्या गोष्टी दाखविण्यासाठी विधी, फेरे दाखविण्याची काय गरज? ते तर एखादी गोष्ट झाली असे प्रतेकात्मक रीत्या सांगता येत नाही का?

कळत नकळत हा एक मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे (बघुन जास्त विचार न करता सोडून देणे) की सर्वांना अपरिहार्य कायद्याने बंधनकारक वैचारिक / पाळणे आवश्यक असा उपचार आहे?

हे मान्य, तरी संस्कृतीचा र्‍हास उघड्या डोळ्यांनी बघवत नाही हो!

सहज's picture

26 May 2009 - 9:39 am | सहज

टिव्ही बंद करा :-) टिव्ही बंद --> खोटेनाटे बंद --> संस्कृतीचा र्‍हास थांबेल.

तुम्ही म्हणता ते कार्यक्रम बघत नसल्याने तुम्हाला नक्की काय खरे खोटे वाटते याबाबत खल करण्यास असमर्थ :-(

शुभेच्छा!

मेघना भुस्कुटे's picture

26 May 2009 - 9:42 am | मेघना भुस्कुटे

टिव्ही बंद करा --> संस्कृतीचा र्‍हास थांबेल.

=))
=))
=))

जालीम पण रामबाण उपाय!

सागर's picture

26 May 2009 - 12:37 pm | सागर

टिव्ही बंद करा टिव्ही बंद --> खोटेनाटे बंद --> संस्कृतीचा र्‍हास थांबेल.

=)) =)) =))

पूर्णपणे सहमत.... :)
अवांतरः पण टी.व्ही. बंद केला तर माझे आवडते डिस्कव्हरी आणि ऍनिमल प्लॅनेट कसे पाहणार :(
तसेही कथानायिकेंची तीन तीन - चार चार लग्ने पाहून डोक्यातील संस्कारांची वाट लागते. पण बायकोपुढे बोलेन कोण ? ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 May 2009 - 12:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तसेही कथानायिकेंची तीन तीन - चार चार लग्ने पाहून डोक्यातील संस्कारांची वाट लागते.

चार लग्नं आणि चारशे लग्नबाह्य संबंध विसरू नका मिश्टर! वर त्या कथानायिकेचं नावसुद्धा 'संस्कृती'च असेल!!

पण बायकोपुढे बोलेन कोण ? Wink

हे दोन वेगवेगळे विषय आहेत. तुमच्या बायकोपुढे बोलणार्‍या अनेक व्यक्ती मला माहीत आहेत ... तिच्या मैत्रिणी! ;-)

अदिती उवाचः या सिरीयल लोकाच्या घरी जाऊन बघायच्या तर बघायच्या, एकीकडे त्या सिरीयलवर ही & ही शेरे मारून विंट्रेश्ट घेऊन बघणार्‍यां शेजार्‍यांचा जीव नकोसा करायचा आणि वर त्यांच्यामुळे संस्कृतीचा र्‍हास होतो अशी ओरड करायची हा माझा आवडता धंदा आहे!

सागर's picture

26 May 2009 - 2:00 pm | सागर

=))

सहमत... आदितीताई,

चार लग्नं आणि चारशे लग्नबाह्य संबंध विसरू नका मिश्टर! वर त्या कथानायिकेचं नावसुद्धा 'संस्कृती'च असेल!!

पार्वती....तुलसी.... करुन सवरुन थकले आता.... आता अक्षरा पुराण चालू असते.... :) ...
बाकीच्या सिरियल्स कडे मी लक्ष पण देत नाही त्यामुळे नावे माहिती नाहीत ;)

बायकोने सिरियल लावली की बघणे नशीबी येते ... बर्‍याच वेळा मीच तिला स्टोरी सांगतो की पुढे असे घडेन आणि तसे घडेन...
आणि अगदी तसेच होते... अशा रटाळ सिरियल्सच्या कथा सांगायला ह्या सिरियल्स पहायची गरज अजिबात नसते.... :)

नाही म्हणायला माझ्या बायकोमुळे एक सिरियल मी आवर्जून बघतो... तारक मेहता का उलटा चष्मा... आणि कधी कधी एफ आय आर....
धमाल टाईमपास होतो... या सिरियल्स खर्‍या अर्थाने मनोरंजन करतात. केव्हाही बघा...किंवा बघू नका... कथानक लक्षात ठेवायची भानगड नाही.
मराठी मधे पण गंगाधर टिपरेंसारख्या चांगल्या सिरियल्स चा मोठा तुटवडा आहे.

अवांतर: आदितीताई आतापर्यंतच्या तुमच्या सगळ्या "अदिती उवाचः " चा एक लेख टाकून द्या... तेवढाच माझ्यासारख्या सिरियल्सला गांजलेल्या पीडीतांना आनंद होईन..

नीधप's picture

30 May 2009 - 8:49 pm | नीधप

खरे आणि खोटे यात काहीतरी अंतर ठेवा ना राव! खोट्या गोष्टी दाखविण्यासाठी विधी, फेरे दाखविण्याची काय गरज? ते तर एखादी गोष्ट झाली असे प्रतेकात्मक रीत्या सांगता येत नाही का?<<
अहो ती काय सुहाग रात आहे का प्रतिकात्मक दाखवायला? कायपण... आता उद्या म्हणाल देवाची पूजा पण प्रतिकात्मक दाखवा खरी खुरी केल्यासारखी दाखवली तर मुलांवर वाईट परिणाम होतील...

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

Nile's picture

31 May 2009 - 1:49 am | Nile

अहो ती काय सुहाग रात आहे का प्रतिकात्मक दाखवायला?

=)) असं केलं तर ही काय प्रतिकात्मक दाखवण्याची गोष्ट आहे का असा 'काथ्याकुट' निघेल. ;)

विसोबा खेचर's picture

26 May 2009 - 9:18 am | विसोबा खेचर

विवाह संस्था व तीचे पावित्र्य

माझ्या आयुष्यात असे काही अनुभव आले आहेत, की वरील बाबतीत मी जर काही लिहिले तर ते स्फोटक ठरेल! तेव्हा काही न बोललेलेच बरे!

चालू द्या..!

आपला,
(पवित्र अविवाहीत!) तात्या :)

सागर's picture

26 May 2009 - 12:39 pm | सागर

तात्या,

होऊन जाऊ दे एकदा काय ते
डोक्यात स्फोट करुन घेण्यापेक्षा इथे केलेला बरे ;)

सागर

निदान तुमच्या स्फोटामुळे ह्या विषयावर एकादी साधकबाधक चर्च तरी मिपावर घडुन येईल. आपल्या चुका तरी लोकांच्या नजरेत येतील्.वाट बघत आहे.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

विनायक प्रभू's picture

26 May 2009 - 11:10 am | विनायक प्रभू

असेच बोल्तो.
डोक्याला शॉट च्या प्रतिक्रिया नक्की

विजुभाऊ's picture

26 May 2009 - 12:40 pm | विजुभाऊ

अरे.माझा प्रतिसाद काय झाला? :(

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

अ-मोल's picture

26 May 2009 - 4:17 pm | अ-मोल

हम आपके है कौन ष्टाईल गळेकाढू मालिकांवर कायदयाने बंदी आणावी.

भाग्यश्री's picture

26 May 2009 - 10:18 pm | भाग्यश्री

सद्ध्याच्या परिस्थितीत तुम्ही झी (मराठी/हिंदी) तत्सम चॅनल्सच्या सिरिअल्स पाहात असाल, तर संस्कृतीचा र्‍हास नक्कीच होतोय! टीव्ही बंद करा.. हा उत्तम उपाय !

२ दिवस फक्त मी छोटी बहू, सात फेरे बघायचा प्रयत्न केला.. फीट येऊन पडणार होते मी! सामान्य जनता इतकी गांजलेली आणि पीडित असते (तेही ढीगभर सोन्याचे दागिने घालून) हे माहीत नव्हते मला.. ज्या गोष्टी सरळ तोंडावर बोलता येण्यासारख्या असतात त्या यांना बोलता येत नाहीत, का तर घराण्याची प्रतिष्ठा किंवा संस्कार , आणि मग काय बोलू, कसं बोलू करत , डोळ्यातून ग्लिसरीनचा पाऊस काढत ३ एपिसोड्स घालवतात!! फालतूगिरी सगळी! X(

www.bhagyashree.co.cc

रेवती's picture

31 May 2009 - 1:43 am | रेवती

२ दिवस फक्त मी छोटी बहू, सात फेरे बघायचा प्रयत्न केला..
का गं असा प्रयत्न करावासा वाटला?
माझी सहानुभुती आहे तुला. ;) (हलकेच घे.)
त्या प्रकारच्या सिरिअल्समध्ये एकाच व्यक्तीचा चेहरा वेगवेगळ्या कोनांमधून दाखवतात ..... तोही ढँटॅढँ अश्याप्रकारचं बॅक्ग्राऊंड म्युझीक लावून....... असं ऐकलय.

रेवती

भाग्यश्री's picture

1 Jun 2009 - 6:08 am | भाग्यश्री

:) :) सहानुभूती ऍक्सेप्ट केली! गरज होतीच! :)

www.bhagyashree.co.cc

नितिन थत्ते's picture

30 May 2009 - 7:13 pm | नितिन थत्ते

>>>खरे आणि खोटे यात काहीतरी अंतर ठेवा ना राव! खोट्या गोष्टी दाखविण्यासाठी विधी, फेरे दाखविण्याची काय गरज? ते तर एखादी गोष्ट झाली असे प्रतेकात्मक रीत्या सांगता येत नाही का?

हे फेरे वरैरे दाखवले म्हणजे सिरिअल जास्त दिवस दळता येते. मागे दामिनी नावाच्या जंबो सिरिअलचा एक एपिसोड चुकून पाहिला. त्या सुमारास गणपतीचे दिवस होते. त्या एपिसोडमध्ये सुरुवात ते ब्रेक १- गणपती घरी आणणे. ब्रेक १ ते ब्रेक २ - गणपतीची आरती आणि ब्रेक २ ते शेवट- अथर्वशीर्षाची आवर्तने असे दाखवले होते. एपिसोड संपला. कथेच्या दृष्टीने पूर्ण एपिसोड रिकामाच होता.

खराटा
(रंग माझा वेगळा)

यन्ना _रास्कला's picture

30 May 2009 - 7:49 pm | यन्ना _रास्कला

आदिवाशी समाजामधी कोनापासुन राजीखुशीन मुल्गी पोटुशी र्‍हायली त त्येला तिच्यासंगच लगीन कराव लागत. आनी आधि पोरगा झाला त त्यो त्याच मान्साच नाव बाप म्हनुन लावतो. पुर्वी म्हनुनच आमच्यात एका मान्साला ३-४ बायका पन आसत.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

स्वामि's picture

1 Jun 2009 - 8:17 am | स्वामि

काय नशीब घेउन आले असतात ह्या सीरीयल मधले ना(ला)यक.बायको एवढी सुंदर असते तरी पण..........तो हर्षवर्धन भोसले तर लग्नाआधी एकीला पोटुशी ठेवतो,दुसरी त्याच्यावर मरते तर लग्न तिसरीशी करतो.तुमच्या बघण्यात आहे का हो असा कोणी नरपुंगव?

इनोबा म्हणे's picture

1 Jun 2009 - 9:18 am | इनोबा म्हणे

खरे आणि खोटे यात काहीतरी अंतर ठेवा ना राव! खोट्या गोष्टी दाखविण्यासाठी विधी, फेरे दाखविण्याची काय गरज? ते तर एखादी गोष्ट झाली असे प्रतेकात्मक रीत्या सांगता येत नाही का?
सहमत आहे. खोटे लग्न दाखवताना विधी, फेरे वगैरे दाखवतात आणि 'सुहागरात' मात्र प्रतिकात्मक ... हा अन्याय आहे. ;)

त्यात विविध जोडपी एकत्र राहणार आहेत. त्यात त्याचा प्रणय,मिठ्यामारणे, भांडण करणे सगळे वास्तवात दाखवणार आहेत्.त्या मालिकेचे नाव काहीतरी सरकार केराजमैं असे काहीतरी आहे. कलर्स ह्या चॅनेल वरुन त्याचे प्रसारण होईल. परवा त्यातील गरमागरम सीन दाखवले आहेत इंडीया टीव्ही वर. टीव्ही वरील कार्यक्रमावर नियंत्रणासाठी सेन्सारबोर्डला अधिकार नाहीत का? . हे सीन बघितल्या नंतर तसे एकादे बोर्ड असावे ह्याची प्रकर्षाने जाणिव होते.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ