गाभा:
माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई -- वय वर्षे १९ फक्त !
एक इतिहास रचला गेलाय !!
हार्दिक अभिनंदन !!!
---------------------
या निमित्ताने मुलींच्या गिर्यारोहणाला अजून चालना मिळावी या शुभेच्छा.
आमचा एक मित्र म्हणतो प्रत्येकाने एकदा तरी गिर्यारोहण करून पहावे --
जगण्यातली एरवी मोठी वाटणारी संकटं म्हणजे साध्या कटकटी वाटायला लागतात !
कृष्णा पाटील यांचे त्रिवार अभिनंदन.
कुणी मिपाकर त्यांच्या परिचयाचे असतील तर जरूर शुभेच्छ कळवाव्यात.
प्रतिक्रिया
22 May 2009 - 3:12 am | अनिता
अभिनंदन
काही लि॑क आहे का बातमीची?
22 May 2009 - 3:26 am | वेदनयन
हार्दिक अभिनंदन!!!
बातमी इथे आहे - 'जय एव्हरेस्ट'...सर्वोच्च शिखरावर महाराष्ट्रकन्येचा 'आवाज'!
---
22 May 2009 - 6:58 am | सहज
माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाईबद्दल कृष्णा पाटील यांचे हार्दिक अभिनंदन!
22 May 2009 - 8:22 am | अवलिया
अभिनंदन !!
--अवलिया
22 May 2009 - 8:27 am | विकास
एकदम कौतुकास्पद कामगिरी आहे.
एक प्रश्न: मराठी मुलगे एव्हरेस्टवर गेले आहेत का? की प्रथमच मराठी झेंडा एव्हरेस्टवर फडकला?
22 May 2009 - 9:18 am | भडकमकर मास्तर
१९९७ मध्ये बहुतेक पुण्याचा सुरेंद्र चव्हाण ( नाव बहुतेक योग्य आहे !!) टेल्को .... एव्हरेस्ट सर करणारा मराठी वीर...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
22 May 2009 - 5:38 pm | लिखाळ
कृष्णा पाटिलचे हार्दिक अभिनंदन !
मराठी एवरेस्टवीर
यापूर्वी १९९८ मध्ये सुरेंद्र चव्हाण याने एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केली होती.
त्यानंतर २००५ मध्ये कॅप्टन आश्विनी सडेकर-पवार हिने लष्कराच्या मोहिमेतून एव्हरेस्ट सर केले होते. बातमी वाचा , सकाळमध्ये अजून एक बातमी
त्यांच्या पंक्तीत आता कृष्णा विराजमान झाली.
वरील माहिती सकाळच्या बातमीतून साभार.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
22 May 2009 - 8:30 am | यशोधरा
कृष्णाचे अभिनंदन!!
22 May 2009 - 8:43 am | क्रान्ति
कृष्णाचे हार्दिक अभिनंदन! महाराष्ट्राच्या आणि पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचणा-या महाराष्ट्रकन्येला त्रिवार मुजरा!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
22 May 2009 - 10:29 am | मराठमोळा
पुण्याचे आणी महाराष्ट्राचे नाव उंचावणार्या जिगरबाज कन्येचे हार्दिक अभिनंदन. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
22 May 2009 - 11:08 am | दिपक
अभिनंदन!
22 May 2009 - 11:46 am | दत्ता काळे
कृष्णा पाटीलचे हार्दिक अभिनंदन.
बारा वर्षापूर्वी आमच्या संस्थेने ( शिवशक्ती प्रतिष्ठान, एरंडवणे, पुणे - ४ ) लहान मुलांकरता जी गिर्यारोहणाची शिबीरे घेतली होती त्यामध्ये कृष्णा पाटीलने सहभाग घेतला होता. आमच्या संस्थेला तिचा अभिमान आहे.
22 May 2009 - 11:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कृष्णाचे अभिनंदन आणि कौतुक तिला सहाय्य करणार्यांचे आणि तिला पूर्ण पाठिंबा देणार्या तिच्या घरच्यांचेही.
22 May 2009 - 12:23 pm | विशाल कुलकर्णी
कृष्णा पाटीलचे हार्दिक अभिनंदन.
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
22 May 2009 - 3:24 pm | शाल्मली
कृष्णा पाटीलचे आणि तिच्या घरच्यांचेही हार्दिक अभिनंदन.
तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
--शाल्मली.
22 May 2009 - 3:28 pm | सुमीत भातखंडे
कृष्णाचे मनापासून अभिनंदन.
कौतुक तिला सहाय्य करणार्यांचे आणि तिला पूर्ण पाठिंबा देणार्या तिच्या घरच्यांचेही.
सहमत. तिच्या घरच्यांचेही अभिनंदन.