आजच्या म.टा. मधे अंमळ (खालील) गंमतशीर बातमी वाचनात आली:
बायकोचे ऐकाल, तर सुखी राहाल!वैवाहिक आयुष्य सुखाचे व्हावे, असे वाटत असेल तर बायकोच्या मुठीत राहा... बायको सांगेल ती पूर्व दिशा माना... तिच्याविरोधात बोलाल तर चांगलेच अडचणीत याल... 'सुखी संसारा'चा हा कानमंत्र कोणा मॅरेज कौन्सिलरने नव्हे, तर चक्क सुप्रीम कोर्टाने दिलाय!
लग्नानंतर निर्माण झालेला बेबनाव १७ वषेर् उलटूनही कायम असल्याने काडीमोडाची कैफियत घेऊन आलेल्या जोडप्याला सुप्रीम कोर्टाच्या सुटीकालीन खंडपीठाने कायदेशीर 'आदेश' देऊन 'निकाल' न देता एखाद्या कौन्सिलरप्रमाणे सल्ला दिला. कायद्याची रुक्ष भाषा न वापरता हलकीफुलकी विधाने करत खंडपीठातील न्या. मार्कंडेय कटजू आणि दीपक वर्मा यांनी सुनावणी घेतली.
सुखी संसारात भांडणे व्हायला नको असतील, तर बायकोविरोधात जाऊन पायावर धोंडा पाडून घ्यायचा नाही, असा गमतीशीर सल्ला देत खंडपीठाने या जोडप्यातील तणाव निवळावा, यासाठी प्रयत्न केला. तसे तर आम्ही सगळेच पीडित आहोत, असे मिश्किलपणे म्हणत न्यायमूतीर्ंनी पुरुषजातीची कैफियतच मांडली! बायकोचे बरोबर आहे की चूक, याचा विचार न करता बायकोच्या होला हो करा, तरच सुखी राहाल, असा कानमंत्र देत त्यांनी सुनावणीची पुढची तारीख सांगितली.
आता आशा करूया की स्त्रीयांच्या बाजूचा हा सुप्रिम कोर्टाचा निकाल ऐकून परत एखादी घटनादुरूस्ती नव्याने आलेले सरकार करणार नाही ;)
प्रतिक्रिया
20 May 2009 - 3:39 am | धनंजय
मजाच आहे.
पण हा निकाल नव्हता. पुढची तारीख देण्यासाठी बायकोने अर्ज केला, तो सुप्रीम कोर्टाच्या या खंडपीठाने मान्य केला.
निकालच दिलेला नाही त्यामुळे अजून घटनादुरुस्ती करायची वेळ आलेली नाही. ( या परिस्थितीत बायकांच्या विरुद्ध नेमकी काय घटनादुरुस्ती केली जाईल असा मजेशीर अंदाज आहे? ;-) - )
20 May 2009 - 3:51 am | विकास
>>>निकालच दिलेला नाही त्यामुळे अजून घटनादुरुस्ती करायची वेळ आलेली नाही.
अहो निकाल नव्हता "सल्ला" दिला हे वर आले आहेच. पण अशा गोष्टी परत घडू नयेत म्हणून निकालाआधी घटनादुरूस्ती केली की त्यावर आधारीत निर्णय देणे कोर्टाला बांधील राहील ना?
शहाबानोच्या वेळेस निकालानंतर घटनादुरूस्तीची चूक केली ती येथे सुधारता येऊ शकते.
20 May 2009 - 5:19 am | पिवळा डांबिस
कोर्टाचं म्हणणं अगदी बरोबर आहे...
:)
(तुला काय हवंय? सत्ता! मला काय हवंय? शांती!! मग तू स्मार्ट, होय तू स्मार्ट; आणि मी बावळट, येस आय ऍम बावळट!!!! - व. पु)
20 May 2009 - 5:58 am | विकास
>>>तुला काय हवंय? सत्ता! मला काय हवंय? शांती!! मग तू स्मार्ट, होय तू स्मार्ट; आणि मी बावळट, येस आय ऍम बावळट!!!! - व. पु
एकदम मस्त! वपुंचे अजून एक (या अर्थी) वाक्य आठवले. "कायम बायकोचे ऐकून निर्णय घ्यावा. बरोबर ठरल्यास पाठींबा दिल्याने आपण यशस्वी आहोत असे म्हणता येते आणि चूक ठरल्यास तिचा निर्णय!" ;)
20 May 2009 - 6:17 am | यन्ना _रास्कला
व्हता व्हइल तितक डिवोर्स टालत. कारन आयबापाच्या डिवोर्शीचे परिनाम सर्व्या मुलावर होतात. मुलाची नीट वाड होउ शकत नाय. ते आपसात भान्डतात. म्हनुन कोरट जमल तितक नवरा बायकुला समजावत. आगे खुदा कि मर्झी.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
पोस्तात पोलीस काय करतोय...... नक्कि मास्तर, दुसर कोन?
20 May 2009 - 7:06 am | विनायक प्रभू
मुलांच्या अगोदर तुमच्यावर परिणाम काय होइल ते विचार करा. (मेल गिब्सन)
एकदम खंक
त्यापेक्षा बायको म्हणते त्याला हो म्हणायचे आणि गप्प बसायचे.(पि.डां म्हणतात त्या प्रमाणे)
20 May 2009 - 7:24 am | विकास
>>>मुलांच्या अगोदर तुमच्यावर परिणाम काय होइल ते विचार करा.
ह्या संदर्भात थोडे वेगळे वाटते. बर्याचदा मुलाआधी स्वतःवरच (एकमेकांमुळे) काय परीणाम होतो आहे ह्याचा (नेहमी नसेल पण बर्याचदा चुकीचा) विचार करत अपत्ये मुलांकडे दुर्लक्ष करतात असे कुठेतरी वाटते.
20 May 2009 - 8:49 am | विसोबा खेचर
सुप्रिम कोर्ट आणि विवाहीत पुरूष
आपला काय संबंध नाय बा! :)
आपला,
(अविवाहीत) तात्या वाजपेयी.
20 May 2009 - 6:24 pm | संदीप चित्रे
बायकोला घेऊ द्यावेत.
निर्णय चुकला तर आपल्याला बोल पडत नाही.
निर्णय बरोबर आला तर क्रेडिट तिला मिळतं पण काम आपलं झालेलं असतं :)
-- कै. वपु