ठाणे अरबस्तान ला जोडण्याचा कुटील डाव ?

रानरेडा's picture
रानरेडा in काथ्याकूट
28 Sep 2025 - 9:57 pm
गाभा: 

स्वदेशी चा नारा देणाऱ्या सरकारकडून मराठमोळ्या ठाण्यातील एक नवं सांस्कृतिक केंद्र विवियाना मॉल हा विदेशी शक्तींना , खास करून अरबांना विकला हे ऐकले आणि मन सुन्न झाले, चित्त विचलित झाले, पायाखालची जमीन सरकली.

आज ठाणे विकले गेले
माझी खात्री आहे आज सर्व विवेकवादी , पुरोगामी ठाणेकर रडत असतील

आज मॉल विकला गेलाय उद्या सरकारी ऑफीसेस विकली जातील, मग महापालिका मग विधानसभा, लोकसभा, सेंट्रल व्हिस्टा आणि राष्ट्रपती भवनही विकले जाईल. काय काय बघायला लागणार आहे मोदींच्या राज्यात काय माहित.

ठाणे आता संपले आहे
ते अरब लोकांना विकले आहे
आता ठाण्यात स्त्रीयांना बुरखा घालून फिरावे लागणार .
जिकडे लक्झरी गाड्या होत्या तिकडे आता उंट फिरणार

लक्षात घ्या नेहरूंच्या काळात एकही मॉल विकला गेला नव्हता ...

कोणत्याही सुजाण, पुरोगामी, लोकशाहीप्रेमी पंतप्रधानाने या परिस्थिती मध्ये राजीनामा दिला असता ,अर्थात मोदींकडून ही अपेक्षा नाहीच !

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Sep 2025 - 10:19 pm | अमरेंद्र बाहुबली

काही जमले नाही, मुळात ठाण्यातला मॉल अरबाना विकला गेला तर पुरोगामी, विवेकवादी का दुखावतील? अधोगामी, मनुवादी हे दुखावले जायला हवेत ना? ठाण्यात बुरखा किंवा उंट फिरू लागले तरीही त्याचा त्रास सनातनी मनुवाद्यांना व्हायला हवा की पुरोगाम्याना? ह्यावेळी काही जमले नाही! सो रानरेडा उर्फ उडता डुक्कर उर्फ ताजेप्रेत पुढल्या वेळी चांगला प्रयत्न करा, ह्या तीन पेली कुठल्याही आयडीने केला तरीही चालेल. :)

खटपट्या's picture

28 Sep 2025 - 10:55 pm | खटपट्या

मोदींकडून अजून काय अपेक्षा ठेवणार?
देश विकायला काढला आहेच, ठाण्यापासून सुरवात.

मी पूर्वी गाऊन विकायचो, आता बुरखा विक्रीचे दुकान टाकीन म्हणतो,

नेहरूंच्या काळात एकही मॉल विकला गेला नव्हता हे खरेच आहे,
परत या परत या,
नेहरू तुम्ही परत या

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Oct 2025 - 12:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"आता ठाण्यात स्त्रीयांना बुरखा घालून फिरावे लागणार .
जिकडे लक्झरी गाड्या होत्या तिकडे आता उंट फिरणार"
अबुधाबीच्या ह्या कंपनीने गेल्या वर्षी गुजरातमधील प्रसिद्ध गिफ्ट सिटीमध्ये ऑफिस चालु केले आहे. गुंतवणूकही केली आहे. गिफ्ट सिटीमध्ये ऊंट आणि बुरखाधारी स्त्रिया फिरत आहेत का हे आधी बघावे लागेल. तुमच्या त्या उबर अ‍ॅपवरुन 'उबर गो,ऑटोप्रमाणे 'उंट' हा पर्याय येतो का? हे गांधीनगरमध्ये राहणार्याना विचारायला हवे.

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2062830

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Oct 2025 - 1:16 pm | अमरेंद्र बाहुबली

नको लक्ष देऊस माई, काहीतरी पांचट विनोद करायचा प्रयत्न होता त्यांचा, पण विनोद गंडल्याने ते विजनवासात गेले, मागेही श्रीगुरुजींचा दांडपट्टा फिरल्यावर गायबले होते ते आताच आले.

धर्मराजमुटके's picture

2 Oct 2025 - 6:01 pm | धर्मराजमुटके

ठाण्याची उपनगरे असलेल्या भिवंडी, कौसा, मुंब्रा, कळवा इत्यादी परीसरातील जनतेच्या आग्रहानुसार विकले असेल.