क्रिकेटचं चांगभल

मोहन's picture
मोहन in काथ्याकूट
25 Feb 2008 - 5:47 pm
गाभा: 

गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपेक्षा त्यातल्या  "कोटींची" चर्चा वाचून / पाहून बरेच विचार मनात येताहेत. आयपीएल नामक क्रिकेट-व्यापार आता सूरू झाला आहे. खर पाहिलं तर व्यापार हा समाजाच्या भरभराटीचा निर्द्शक समजला जातो.  नफा कमावण्याचा मुख्यहेतू असुनही, रोजगार निर्मिती, क्षेत्रिय विकास, सामाजीक व पर्यावरणाचा विकास  इत्यादि हेतू  साध्य करायचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवायचे अभिप्रेत असते. 
आयपीएल क्रिकेट-व्यापार काय साध्य करेल ?
क्रिकेटची प्रगती ? -   क्रिकेट तज्ञच या बद्दल साशंक आहेत. आपण काय लिहीणार?
नफा -   गुळा भोवती मुंगळे जमावे तसे विवीध कंपन्या, चित्रपट तारे-तारकांच्या पडलेल्या उड्या पाहून अंदाज येतोच.  खेळाडूंचे  मात्र नक्कीच भले (!) होईलसे दिसते.
रोजगार-  नगण्य फरक पडेल.
समाज -  २०-२० च्या या "कोंबड्यांच्या झुंजी" यशस्वी होण्याकरता समाजाचा मोठा सहभाग अत्यावश्यक आहे ! गर्दी खेचण्यासाठी हर तर्‍हेचे प्रयत्न केले जातील. याची झलक आपण सगळ्यांनी या आधीच्या सामन्यांमधे अनुभवली आहे.  एवढ्यामोठ्या खर्चा वरचा दामदुप्पट परतावा किमान अपेक्षित राहील ! तो कसा काढणार  व कोण देणार ?!  माझ्या मते जाहिरात हे एकमेव  आवक स्त्रोत असल्याने सर्व भडिमार त्यावरच राहाणार. त्यातही दूरदर्शन फारच महत्त्वाचा ठरेल.  टीआरपी " कमावण्याचे " अभूतपूर्व  प्रयत्न पाहायला मिळतील. जाहिरातींचे दर अस्मानाला भिड्ल्यास आश्चर्य वाटायला नको. .........
मित्रहो जाहीरातींचा हा खर्च आपण सर्व उत्पादनांच्या वाढीव किमती देवून उचलणार आहोत !!!  चहा, कॉफी,तेल,मिठ, आटा, साबण, ई. रोज लागणार्‍या वस्तू, इंश्युरन्स, ब्यांका, फोन,  आदि. नियमित लागणार्‍या सेवा, चित्रवाणी संच, धुलाई यंत्र, ई. ग्राहकोपयोगी वस्तू ...... यादी तुम्ही वाढवू शकता. 
 तर मित्रहो तयार रहा, कंबर कसा, पोटाला चिमटा काढण्यास तयार रहा  कारण  आपल्या सगळ्यांना मुकेशभाई, शाहरुखभाई, प्रितीताईं  ईत्यादींना ( आणि हो शरदभाऊ राहिलेच)  क्रिकेट्च भलं करायला मदत करायची आहे.  
बघा पटतं का ? :-)
( कसोटी क्रिकेटप्रेमी व सध्या अंपायर असलेला) मोहन

प्रतिक्रिया

जुना अभिजित's picture

25 Feb 2008 - 6:50 pm | जुना अभिजित

हे म्हणजे अगदी मल्लिका शेरावत सारखं झालं. लोकांना बघायला आवडतं म्हणून मी दाखवते. किती दाखवायचं काय दाखवायचं ह्याला काही ताळतंत्र?.
१. रोजगार-  नगण्य फरक पडेल.  या बद्दल कोणाच्या रोजगारात फरक पडण्याची अपेक्षा आहे? किंवा आधी किती रोजगारनिर्मिती होत होती?  क्रिकेटचे मैदान, स्टेडीयम वगैरेची देखभाल करणार्‍यांना रोजगार मिळेल.  चार्टर्ड अकौंटंटना रोजगार मिळेल.
२. मित्रहो जाहीरातींचा हा खर्च आपण सर्व उत्पादनांच्या वाढीव किमती देवून उचलणार आहोत : बरोबर आहे. ही जाणीव आली तर लोक आरोग्याला आणि खिशाला अनावश्यक खर्च टाळण्याच्या मागे लागतील.
३. क्रिकेटची प्रगती ?  हे काय असते? क्रिकेटची प्रगती होणे न होणे हे त्या खेळाशी संबंधित संस्था म्हणजे बीसीसीआय बघून घेईल. देश जेव्हा एखादा खेळ पुरस्कृत करतो तेव्हा त्याची चिंता आपण करू उदा कबड्डी, हॉकी. मुळात क्रिकेटर लोक बीसीसीआय साठी खेळतात. उदा: कपिल देव हा वर्ल्ड कप जिंकणार्‍या संघाचा कर्णधार होता. पण आय्सीएलमध्ये गेल्यावर बीसीसीआयने त्याची पेन्शन बंद केली.  
४. तयार रहा, कंबर कसा, पोटाला चिमटा काढण्यास तयार रहा: इच्छा नसताना ज्या जनतेला या सर्वाची झळ बसणार आहे त्या बद्दल वाईट वाटते. क्रिकेट आवडणार्‍यांनी पुन्हा एकदा विचार करावा की हेच ते क्रिकेट आहे का जे आपल्याला बघायला आवडते.
तात्पर्यः सर्वांना कळकळीची विनंती आतातरी शहाणे व्हा. देशबिश मध्ये आणू नका. अनावश्यक खर्चाला आळा घाला. कोक, पेप्सीला कळू द्या की क्रिकेट त्यांचे सेल्स वाढवू शकत नाही.
 
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Feb 2008 - 8:41 pm | llपुण्याचे पेशवेll

या विषयावर मागल्यावेळेला म्हणजे जेव्हा इंग्लंडमधे विश्वचषक चालू होता तेंव्हा एक लेख 'सकाळ' मधे छापून आला होता. त्यात क्रिकेटच्या प्रेमाला 'स्वप्निल नशा' असे म्हटले होते. तेव्हा कारगिलचा संघर्ष गाजत होता. तेव्हा त्याच्या अनुषंगाने 'स्वप्निल नशा' हा शब्द वापरण्यात आला होता. त्यात जेवढा मानमरातब क्रिकेट खेळाडूना देतात त्याच्या १/१० तरी आपल्या जवानांच्या वाट्याला येतो का? असा सवाल विचारण्यात आला होता.
ता.क. नक्की कोणत्या विश्वचषकाच्या वेळेला कारगिल संघर्ष झाला हे मला नक्की आठवत नाही पण हा लेख मात्र आठवतो आहे.
पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

25 Feb 2008 - 9:18 pm | विसोबा खेचर

तर मित्रहो तयार रहा, कंबर कसा, पोटाला चिमटा काढण्यास तयार रहा  कारण  आपल्या सगळ्यांना मुकेशभाई, शाहरुखभाई, प्रितीताईं  ईत्यादींना ( आणि हो शरदभाऊ राहिलेच)  क्रिकेट्च भलं करायला मदत करायची आहे.  
पूर्ण सहमत..!
सध्या खेळाडूखरेदी, त्यांचा लिलाव, वगैरे जे प्रकार सुरू आहेत ते पाहून हसावे की रडावे हेच कळत नाही. माझ्या मते या प्रकारांना कायद्यानेच पूर्ण बंदी घालावयास हवी. कारण मध्यम ते दूरच्या भविष्यात सामान्य माणसाच्याच खिशाला या सर्वाची अप्रत्यक्ष झळ बसणार आहे हे निश्चित!
मोहनरावांनी अतिशय चांगला विषय चर्चेस घेतला आहे!
तात्या.

व्यथित व्हायला झाले आहे. उत्तम पैदाशीचे घोडे जसे विकले जातात तसे हे खेळाडू विकले गेले आहेत. सगळ्याच गोष्टींचे व्यावसायीकरण करून शेवटी सर्वसामान्य माणसाच्या जीवनातला साधा खेळाचा आनंदही हिरावला जाणार आहे आणि त्याची जागा महागाईचे चटके घेणार आहेत. असा विषय चर्चेला आणल्याबद्दल मोहनरावांचे आभार.
चतुरंग

अभिजीत,धनंजय,तात्या,चतुरंग प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हे माझे मराठीतले पहिलेच लिखाण होते.
 
मोहन

विजुभाऊ's picture

26 Feb 2008 - 1:14 pm | विजुभाऊ

जुन्या काळी गुलाम विकले जायचे......
केरि पेकर ने खेळाडुम्ची सर्कस काढली होती...
बाकी आपले क्रुषी मंत्रि ह धन्द छान करतात.....
मला वाटते की त्याना त्या पैशातुन शेतकर्यांचे काही तरी भले करायचे असेल

केशवराव's picture

26 Feb 2008 - 2:25 pm | केशवराव

मला वाटते कि त्याना त्या पैशतून शेतकर्‍यांचे काही तरी भले करायचे असेल.
  विजूभाऊ,  एकदम त्यांच्या मनातले  ओळखलेस. कमाल आहे तुझी.
                                                  --------  केशवराव.