मराठी भाषेला रोजगार उन्मुख करण्याची गरज.

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
21 Apr 2025 - 11:35 am
गाभा: 

जी भाषा रोजगार, धन दौलत आणि समाजिक प्रतिष्ठा मिळवून देते ती भाषा लोक शिकतात. जेंव्हा दिल्लीत 11वी बोर्ड होते. तेंव्हा 8वी बोर्डची परीक्षा दिल्या नंतर विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील अधिकान्श विद्यार्थी हिन्दी विषय घ्यायचे नाही. विज्ञान घेणारे फक्त आंग्ल भाषा शिकायचे. वाणिज्य वाले अधिकान्श विद्यार्थी जास्त मार्क्स मिळतात म्हणून संस्कृत भाषा घायचे. उरलेले आमच्या सारखे हिन्दी हा विषय घ्यायचे. 11वी नंतर तर वाणिज्य वाले अधिकान्श विद्यार्थी ही हिन्दी शिकत नसे. कारण आंग्ल भाषा येत नसेल तर विद्यार्थी डॉक्टर, इंजीनियर, आर्किटेक्ट एवढेच काय कृषि वैज्ञानिक किंवा ग्रामीण भागत काम करणारा प्राण्यांचा डॉक्टर ही बनू शकत नव्हते. आजकाल तर महाराष्ट्रात आमच्या मुलाला मराठी येत नाही हा गर्वाचा विषय आहे. काही महिन्यापूर्वी आयटी शिक्षित 2 बीएचके मध्ये राहणार्‍या एका नातलगा कडे गेलो. पाच वर्षाच्या मुली सोबत तिचे आई वडील फक्त आंग्ल भाषेत बोलत होते. तिला मराठी थोडे बहुत कळत असेल. माझ्या सारखे अशिक्षित पाहुणे घरी आल्याने त्यांना मराठी बोलणे भाग होते. घरात मराठी का नाही बोलत या वर उत्तर मिळाले. सुरवातीपासून मुलीला उत्तम आंग्ल भाषा आली पाहिजे म्हणून आम्ही घरात मराठी बोलत नाही. मराठी भाषा रोजगार देत नाही म्हणून उच्च शिक्षित (???) घरी मुलांशी मराठी बोलत नाही. शाळेत मराठी शिकत नाही. घरा बाहेर ही "मजबूरी में हिन्दी बोलणी पड़ती है" नाहीतर आम्ही ब्रिटीशांपेक्षा भारी काळे अंगरेज आहोत. आमची खरी मातृभाषा ही आंग्ल भाषाच आहे. आमचा खरा मातृदेश पाताळत आहे. ही परिस्थिति महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशाची आहे.

कोणती भाषा शाळेत शिकायची ही निवडण्याचा हक्क विद्यार्थ्याला पाहिजे. यात सरकारने कधीच दखल दिली नाही पाहिजे. बाकी हिंदीचा विरोध करणारे अधिकान्श नेता आपल्या मुलांना सीबीएससी आणि प्रसिद्ध मिशनरी शाळांत टाकतात. तिथे ते आंग्ल भाषेसोबत त्यांची मुले हिंदीच शिकतात. पण सामान्य मुलांनी हिन्दी शिकली तर त्यांना ही स्वरोजगारसाठी हिन्दी शिकण्याचा लाभ होईल. बाकी मराठी अस्मिता जपण्यासाठी भाषेवर प्रेम असणे गरजेचे. भाषेवर प्रेम असेल तर 100 वर्षांनंतर ही पर प्रांतात घरात मराठी जीवंत राहते. माझे उदाहरण समोर आहे.

ज्या लोकांना मराठी भाषेची कळवळ आहे. मराठी अस्मिता प्रिय आहे. त्यांनी सरकारवर दबाव टाकला पाहिजे की डॉक्टर , नर्सिंग, फार्मा, फिजिओथेरेपी सहित मेडिकल विधांचे सर्व कॉलेजात मराठी माध्यमात शिक्षण घेण्यासाठी 50 टक्के जागा सुरक्षित केल्या पाहिजे. इंजिनीअरिंग आणि इतर टेक्निकल शिक्षणात 50 टक्के प्राधान्य मराठी भाषेत शिक्षणाला दिले पाहिजे. मग बिहारी मुले ही मराठी भाषा शिकतील.

बाकी भविष्याचे म्हणाल तर पुढील पन्नास वर्षांनंतर अरेबिक लिपीतील उर्दू ही सरकारी भाषा होणार. त्यावेळी इच्छा असूनही मराठी हिन्दी शिकणे संभव होणार नाही.

प्रतिक्रिया

माहितगार's picture

21 Apr 2025 - 12:17 pm | माहितगार

लेखातील प्रमुख विचारांशी बर्‍या पैकी सहमत

अथांग आकाश's picture

21 Apr 2025 - 6:02 pm | अथांग आकाश

+१
येथे एक अक्कलशुन्य माणुस त्याला नसलेली अक्कल पाजळत आहे! त्याच्या साथीला एक गुरुजी आपली अक्कल पाजळत आहे!! कुठुन येतात असे लोक देव जाणे?
.

मराठी भाषा रोजगार देत नाही म्हणून उच्च शिक्षित (???) घरी मुलांशी मराठी बोलत नाही.
मराठी भाषा रोजगार देत नाही तशी ईंग्रजी ही देत नाही. रोजगार देतात ते तुमचे स्किल सेट. हे जेव्हा लोकांना समजेल तो सुदिन.

अथांग आकाश's picture

21 Apr 2025 - 6:09 pm | अथांग आकाश

मराठी भाषा रोजगार देत नाही तशी ईंग्रजी ही देत नाही. रोजगार देतात ते तुमचे स्किल सेट. हे जेव्हा लोकांना समजेल तो सुदिन.

सहमत!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Apr 2025 - 1:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"रोजगार देतात ते तुमचे स्किल सेट"
खरे आहे पण हे गेल्या २०-२५ वर्शात नोकर्या(आय् टी वगैरे) संबंधित.इंग्रजी बोलण्यावर पकड आहे अशा व्यक्तीचा कचेरीत प्रभाव पडतोच. मार्केटिंग् कंत्राटे घेणे, उत्पादन विक्री..इंग्रजी ज्याचे चांगले असते ती व्यक्ती करीयरमध्ये पुढे जाते असा सार्वत्रिक अनुभव आहे. असो.
ते फाड फाड इंग्रजी बोलायला शिकवणारे कोकाटे क्लासेस आहेत का अजुन?

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2025 - 1:46 pm | श्रीगुरुजी

माईडे,

तुझे हे, तर्खडकर वाचून, साहेबाची भाषा शिकले ना?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Apr 2025 - 2:02 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

नीट इंग्रजी लिहिता/बोलता येणे, आणि अंकगणित.. आजच्या जगात अजूनही तुम्हाला उपयोगी पडतात(निदान भारतात तरी). कंपन्यात प्रमोशन्/बढती झालेल्या लोकांशी बोलुन पहा. बहुतांशी लोकांचे इंग्रजी आणि अंकगणित चांगले असलेले दिसुन येईल. काही अपवाद असू शकतात. आय एस एस्/आय एफ एस अधिकार्यांचे इंग्रजी कसे असते? 'त त प प' करणारे, अडखळत इंग्रजी बोलणारे सी ई ओ,सी टी ओ,सी आय ओ पाहिले आहेत का? अपवाद असतील पण बहुदा नाहीच.

सोत्रि's picture

21 Apr 2025 - 7:37 pm | सोत्रि

त्यांनी सरकारवर दबाव टाकला पाहिजे की डॉक्टर , नर्सिंग, फार्मा, फिजिओथेरेपी सहित मेडिकल विधांचे सर्व कॉलेजात मराठी माध्यमात शिक्षण घेण्यासाठी 50 टक्के जागा सुरक्षित केल्या पाहिजे. इंजिनीअरिंग आणि इतर टेक्निकल शिक्षणात 50 टक्के प्राधान्य मराठी भाषेत शिक्षणाला दिले पाहिजे.

पटाईतकाका,
डॉक्टर , नर्सिंग, फार्मा, फिजिओथेरेपी सहित मेडिकल विधांचे, इंजिनीअरिंग आणि इतर टेक्निकल शिक्षण मराठी माध्यमात कुठल्या विद्यापीठात मिळते ते सांगा, लगेच तिकडे जागा सुरक्षित (की आरक्षित) करूयात.

बाकी भविष्याचे म्हणाल तर पुढील पन्नास वर्षांनंतर अरेबिक लिपीतील उर्दू ही सरकारी भाषा होणार.

तुमच्याकडे जादूचा काचेचा गोळा आहे का भविष्य बघायचा?

लेखाच्या शिर्षकाचा आणि गाभ्याचा काहीही संबंध लागत नाहीयेय.

- (मराठी) सोकाजी