मनसेमुळे सेना - भाजपा युती मुंबईत साफ झोपली

घाशीराम कोतवाल १.२'s picture
घाशीराम कोतवाल १.२ in काथ्याकूट
16 May 2009 - 4:24 pm
गाभा: 

राज ठाकरेंच्या करिश्म्यामुळे मुंबईत शिवसेना भाजपा युतीचा सुपडा साफ झाला मनसे सारख्या नवख्या पक्षांच्या नवख्या उमेदवारांमुळे शिवसेना भाजपाचे राम नाईक गजानन किर्तीकर किरिट सोम्मया सारखे दिग्गज उमेदवार पडले आहेत

मनसेची लाट युतीची वाट लावणार ’ , असं समीकरण राजकीय विश्लेषकांनी आणि अभ्यासू मतदारांनी ३० एप्रिलला मतदानाच्या दिवशीच मांडलं होतं. अगदी तसंच चित्र आज पाहायला मिळालं. महाराष्ट्रातल्या १२ जागांवर, जिथे मनसेचे उमेदवार उभे होते, तिथे शिवसेना-भाजप युतीचे अक्षरशः बारा ’ वाजले आहेत. ठाणे आणि मुंबई या शिवसेनेच्या दोन गडांना तर त्यांनी खिंडार पाडलंय. अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवाराला तिस-या नंबरवर फेकण्याची करामतही त्यांनी केलेय.

दक्षिण मुंबईत काँग्रेसचे मिलिंद देवरा विजयी झाले असून विजयाची सिक्सर मारायला निघालेले शिवसेनेचे मोहन रावले तिस-या नंबरवर फेकले गेलेत. दुसरा क्रमांक पटकावणा-या मनसेच्या बाळा नांदगावकरांनी त्यांचा घात केला.

दक्षिण मध्य मुंबईतही मनसेच्या श्वेता परूळकर, शिवसेनेचे सुरेश गंभीर यांच्या मार्गातला अडथळा ठरल्यात. त्यामुळे एकनाथ गायकवाड यांची लाइन अगदीच क्लिअर झाली आहे. तसंही त्यांचं पारडं जड होतं, त्यातच मनसेनं सेनेची अवस्था अधिकच गंभीर ’ केली.

काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी उत्तर मध्य या नव्या मतदारसंघातही बाजी मारली आहे. राम जेठमलानी आणि राज ठाकरे यांच्या वादावादीत महेश जेठमलानी यांना धक्का बसलाय. मनसेच्या शिल्पा सरपोतदार यांना एक लाखापेक्षा जास्त मतं मिळाल्यानं जेठमलानी यांचा पत्ता सहज कट ’ झालाय.

वायव्य मुंबईत गजानन कीर्तिकर यांची सीट पक्की मानली जात होती. पण तिथे मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी त्यांना ‘ ठाकरी हिसका ’ दाखवला. गुरुदास कामत यांचं भाग्य मात्र त्यामुळे चांगलंच फळफळलं. त्यांच्यासाठीही हा मतदारसंघ नवा होता आणि तिथे त्यांचा फारसा प्रभावही नव्हता.

उत्तर मुंबईत भाजपचे राम नाईक यांना पुन्हा एकदा दणका बसलाय. शिरीष पारकर यांनी त्यांची पार वाट लावली आहे. त्यामुळे संजय निरुपम अनपेक्षित विजयाच्या दिशेनं कूच करत आहेत.

ईशान्य मुंबईतही शिशिर शिंदे यांच्यामुळे भाजपच्या किरीट सोमय्या यांना पराभवाचा धक्का बसलाय.

उत्तर मध्य मुंबई
प्रिया दत्त (काँग्रेस) - ३ लाख १९ हजार ३५२
महेश जेठमलानी (भाजप) - १ लाख ४४ हजार ७९७
शिल्पा सरपोतदार (मनसे) - १ लाख ३२ हजार ५५५
मताधिक्यः १ लाख ७४ हजार ५५५

ईशान्य मुंबई
संजय पाटील (राष्ट्रवादी) - २ लाख १३ हजार ५०५
डॉ. किरीट सोमय्या (भाजप) - २ लाख १० हजार ५७२
शिशिर शिंदे (मनसे) - १ लाख ९५ हजार १४८
मताधिक्यः २ हजार ९३३

वायव्य मुंबई
गुरुदास कामत (काँग्रेस) - २ लाख ५३ हजार ८९९
गजानन कीर्तिकर (शिवसेना) - २ लाख १५ हजार ४८४
शालिनी ठाकरे (मनसे) - १ लाख २३ हजार ८८५
अबू आझमी (सपा) - ८४ हजार ४११
मताधिक्यः ३८ हजार ४१५

ठाणे
संजीव नाईक (राष्ट्रवादी) - ३ लाख ०१ हजार ०००
विजय चौगुले (शिवसेना) - २ लाख ५१ हजार ९८०
राजन राजे (मनसे) - १ लाख ३४ हजार ८४०
मताधिक्यः ४९ हजार ०२०

भिवंडी
सुरेश टावरे (काँग्रेस) - १ लाख ८२ हजार ७८१
जगन्नाथ पाटील (भाजप) - १ लाख ४१ हजार ६१६
देवराज म्हात्रे (मनसे) - १ लाख ०७ हजार ०८५
आर. आर. पाटील (सपा)- ३२ हजार ७६५
मताधिक्यः ४१ हजार १६५

(सर्व आकडेवारी मटा मधुन सांभार)

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

16 May 2009 - 4:29 pm | अविनाशकुलकर्णी

हो न.. कृपा शंकर म्हणाले.."उत्तर भारतियानि उत्तर दिले आहे"
आता मुंबई त्यांच्या हातात...बसा बोंबलत

अनंता's picture

16 May 2009 - 4:35 pm | अनंता

आम्ही मटा दररोज वाचतो ;)
लेखही बहुतांश मटातून साभार लिहायला विसरलात काय?

वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

क्लिंटन's picture

16 May 2009 - 4:43 pm | क्लिंटन

आकडेवारी दिल्याबद्दल कोतवालांना धन्यवाद.राज ठाकरेंच्या मनसेला मिळालेली बहुतांश मते मनसे नसती तर शिवसेना-भाजप युतीला गेली असती हे मानायला जागा आहे. २६/११ नंतर आणि एकूणच काँग्रेस सरकारविरोधी मते शिवसेना-भाजप युती आणि मनसे यांच्यात विभागली गेली आणि त्यामुळे काँग्रेस उमेदवारांचा मार्ग सोपा झाला.मनसेने मते खाल्ली नसती तर काँग्रेसला ही निवडणुक इतकी सोपी गेली नसती हे नक्की.

शिवसेनेची सुरवात मुंबई-ठाण्यातून झाली आणि बरीच वर्षे शिवसेनेचे वर्चस्व मुंबई-ठाणे सोडून राज्याच्या इतर भागात नव्हते.पण आता जे काही वर्चस्व शिवसेनेचे आहे ते राज्याच्या इतर भागातच राहिले आहे हा दैवदुर्विलास.

१९९३-९४ पर्यंत बाळासाहेबांचा राजकिय वारसदार राज ठाकरे असणार आणि उद्धव ठाकरे राजकारणापेक्षा फोटोग्राफीत रमणार असे चित्र होते.पण नंतरच्या काळात उध्दव पुढे आले किंवा आणले गेले.त्याचे परिणाम यापुढे शिवसेनेला भोगावे लागणार आहेत.एकूणच काय चुलत भावंडांमध्ये भांडणे व्हायची भारताची ’उज्वल’ परंपरा इथेही चालूच आहे.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

सागर's picture

18 May 2009 - 4:10 pm | सागर

क्लिंटनसाहेब,

एक गोष्ट तुमच्या मतात थोडी भर घालावीशी वाटते आहे
शिवसेनेची सुरवात मुंबई-ठाण्यातून झाली आणि बरीच वर्षे शिवसेनेचे वर्चस्व मुंबई-ठाणे सोडून राज्याच्या इतर भागात नव्हते.पण आता जे काही वर्चस्व शिवसेनेचे आहे ते राज्याच्या इतर भागातच राहिले आहे हा दैवदुर्विलास.

राज ने फक्त १२ ठिकाणी उमेदवार उभे केले होते, त्यामुळे ही वाट लागली. राज ने सगळीकडे मनसे चे उमेदवार उभे केले असते तर कदाचित राज्यात सगळीकडे हेच चित्र दिसले असते. :)

शिवसेनेने यातून बोध घेऊन केलेल्या चुकीचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला तरच पुन्हा गेलेली प्रतिष्ठा त्यांना मिळवता येईन.
पण मनसे चे वादळ आता थांबेलसे वाटत नाही.
फक्त बाळासाहेबांच्या हातात राज ला समजावण्याची व सांभाळण्याची ताकद आहे. पण प्रकृती स्वास्थ्यापायी बाळासाहेब यात कितपत लक्ष घालतील यात शंका आहे
असो. पुढच्या निवडणुकीची मुहूर्तमेढ राज ने या निवडणुकीत चांगलीच घट्टपणे रोवली आहे.

मनसेच्या पुढील उत्तुंग वाटचालीस शुभेच्छा
सागर

इनोबा म्हणे's picture

18 May 2009 - 4:24 pm | इनोबा म्हणे

>>शिवसेनेने यातून बोध घेऊन केलेल्या चुकीचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला तरच पुन्हा गेलेली प्रतिष्ठा त्यांना मिळवता येईन.
कसलं काय. आजचा सामनाचा अग्रलेख वाचा. संजय राऊतांनी मनसेला आणि त्यांना मतदान करणार्‍या मराठी जनतेलच सगळा दोष दिलाय. यांच्या चूका हे मान्य करायलाच तयार नाहीत तर त्या दुरुस्त तरी कसे करणार?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 May 2009 - 4:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हाहा ... फारच मजेशीर आहे तो अग्रलेख. पुन्हा एकदा फार्फार करमणूक झाली ते वाचून!!

भडकमकर मास्तर's picture

18 May 2009 - 6:02 pm | भडकमकर मास्तर

तो अग्रलेख वाचला.. माझीही फार करमणूक झाली...
अजून शिकण्याची वेळ गेलेली नाही, पण हेच समजून घ्यायच्या मूडमध्ये नाहीत...
... मला वाळूत डोके खुपसलेले शहामृग दिसायला लागले आहे...

अवांतर : पुढच्या विधानसभा निवडणुकीत माझा कल मनसे कडे चालला की काय असे वाटायला लागले आहे...

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

प्रदीप's picture

18 May 2009 - 7:37 pm | प्रदीप

हेच समजून घ्यायच्या मूडमध्ये नाहीत...
... मला वाळूत डोके खुपसलेले शहामृग दिसायला लागले आहे...

स्वतःच्या शक्तिविषयी भ्रम झालेल्यांची संख्या दुनियेत कमी नाही, त्याचेच हे अजून एक उदाहरण. पण आता देव करो, ते अशाच भ्रमात राहोत, मग विधानसभेच्या निवडणुकीत ते संपलेच समजा.

मी पण हा लेख आत्ताच वाचला...
माझीही भरपूर करमणूक झाली....

महाराष्ट्रात घोडदौड सुरुच राहिली. मुंबई - ठाण्याने यातना दिल्या असे म्हटले आहे

"राज" चे उपकार माना हो..... त्याने फक्त मुंबई - ठाणे व नाशिक अशा ठिकाणी १२ उमेदवार उभे केले होते
नाहीतर सगळीकडेच हेच चित्र दिसले असते आणि मग महाराष्ट्रात घोडदौड सुरुच राहिली असे म्हणायला वाव राहिला नसता...
पण हे समजून कोण घेणार? का डोळ्यावर पांघरुण ओढून घेतले आहे सेनेने?

मला मात्र मनापासून वाटते की मराठी माणसांच्या हितासाठी दोघांनी एकत्र येणे गरजेचे आहे. अन्यथा शिवसेनेला पुढील निवडणुकीस घोडदौड करण्यास जागाच उरणार नाही

जय महाराष्ट्र
(खिन्न) सागर

भडकमकर मास्तर's picture

19 May 2009 - 5:36 pm | भडकमकर मास्तर

>>>मला मात्र मनापासून वाटते की मराठी माणसांच्या हितासाठी दोघांनी एकत्र येणे गरजेचे आहे. >>>>
हेच वाक्य मनोहर जोशींनी उच्चारले तेव्हा त्यांना मातोश्रीवर बोलावून झापण्यात आले आणि अशी उद्धवजींची इच्छा नाही असे नंतर त्यांच्याकडून वदवून घेण्यात आले; असे आजच्या सकाळला आले आहे...

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

हो मास्तर,
मी सकाळ वर पण बातमी वाचली

या निवडणुकीतून राज ने काय सिद्ध करुन दाखवले यापेक्षा चूक मान्य न करुन खापर ठाणे-मुंबईच्या मराठी जनतेवरच फोडले गेले आहे.

शिवसेनेचा राज कडे पाहण्याचा दृष्टीकोन हाच राहिला तर शिवसेना पुढच्या निवडणुकीत अखिल महाराष्ट्राला दोष द्यायला कमी करणार नाही
कारण ह्याच अरेरावीपणामुळे पुढच्या निवडणुकीत राज शिवसेनेची उरली सुरली मते पण घेऊन जाईन यात शंका नाही.

- सागर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 May 2009 - 7:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कारण ह्याच अरेरावीपणामुळे पुढच्या निवडणुकीत राज शिवसेनेची उरली सुरली मते पण घेऊन जाईन यात शंका नाही.

फक्त मतांवरच निभावलं तर थोडक्यात निभावलं असं म्हणेन!

आत्तापर्यंत चुकांचं खापर राजकारण्यांवर फोडलेलं पाहिलं होतं. इथे तर मिठी (गंगा म्हटलं तर पुन्हा भय्यांची नदी होईल) उलटी वहायला लागली! ;-)

विसोबा खेचर's picture

16 May 2009 - 4:53 pm | विसोबा खेचर

मनसेमुळे सेना - भाजपा युती मुंबईत साफ झोपली

हो, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आज मुंबईत मराठी माणूसच साफ झोपला आहे. एकाही मराठी नेत्याला विजय मिळालेला नाही..!

येत्या विधानसभेतही मुंबैत शिवसेना-मनसेत मराठी मतांची विभागणी होऊन त्यांच्यापैकी एकालाही स्पष्ट विजय न मिळता त्याचा काँग्रेसच्या तिसर्‍याच कुणा अमराठी नेत्याला फायदा होण्याची भिती आहे..!

मराठी माणूस दरवेळेस जर असा शिवसेना-मनसेत विभागला गेला तर प्रॉब्लेम वाटतो बॉस!

आपला,
(मारवाडी) तात्या.

प्रदीप's picture

16 May 2009 - 6:47 pm | प्रदीप

मराठी माणूस दरवेळेस जर असा शिवसेना-मनसेत विभागला गेला तर प्रॉब्लेम वाटतो बॉस!

म्हणायचे आहे.

एकंदरीत काय, आम्ही आमचा खास मराठी बाणा पुढे चालवला आहे. इतिहासापासून आम्ही काहीही शिकलेलो नाही.

कुठल्यातरी एका जुन्या चित्रपटात मेहमूद सुंदर स्त्रियांबद्दल म्हणाला होता ते असे काहीतरी होते" मियाँ, ये लडकीयाँ एक के कंधेपे मान रख के, दुसरे को आँख मारती है, और उस्सी टाईम तिसरे के बारे मे सोचतीं है" शिवसेनेच्या अलिकडच्या उड्या पाहून ह्याची मला आठवण येत होती. आता सेनेची परिस्थिती 'ना घर का, ना घाट का' अशी झाली आहे.

विकि's picture

17 May 2009 - 12:43 am | विकि

हो, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आज मुंबईत मराठी माणूसच साफ झोपला आहे. एकाही मराठी नेत्याला विजय मिळालेला नाही..!
एकनाथ गायकवाड आणि संजय पाटील काय अमराठी आहेत काय.

अनामिका's picture

16 May 2009 - 5:02 pm | अनामिका

क्लिंटन यांच्या मताशी सहमत
कोतवाल साहेब तुंम्ही स्वतःच्या शब्दात लिखाण करायची तसदी घ्याल का?
सेना भाजपाचा सुपडा साफ झाला याचा आसुरी आनंद बाळगणार्‍यांचा निवडुन आलेले उत्तरभारतीय कधी सुपडा साफ करतिल हे त्यांचे त्यांनाच कळायचे नाही.
मनसेने नाहक उमेदवार उभे करुन सेनाभाजपाची मते खाल्ली व त्याचा फायदा आघाडीला व अप्रत्यक्षपणे उत्तरभारतीय उमेदवारांनाच मिळवुन दिला........मुंबई महाराष्ट्राच्या हातुन जाण्याची ही नांदी नसावी म्हणजे मिळवले?
राजने लोकसभा निवडणु़कांच्या निमित्ताने मराठी माणसाचा ,मुंबईकरांचाव पर्यायाने महाराष्ट्राचा केसाने गळा कापला असेच खेदाने म्हणावे लागतय.
आणि याच निमित्ताने आपल्याच माणसांचे पाय ओढण्याची मराठी माणसाची खेकडा प्रवृत्तीदेखिल स्वहस्ते दाखवुन दिली........
महाराष्ट्राचा दैवदुर्विलास म्हणायचा तो हाच का? असा प्रश्न पड्लाय?
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

llपुण्याचे पेशवेll's picture

16 May 2009 - 5:21 pm | llपुण्याचे पेशवेll

>>सेना भाजपाचा सुपडा साफ झाला याचा आसुरी आनंद बाळगणार्‍यांचा निवडुन आलेले उत्तरभारतीय कधी सुपडा साफ करतिल हे त्यांचे त्यांनाच कळायचे नाही.
सेना भाजपचा साफ पराभव(सुफडा साफ या हिंदी शब्दापेक्षा मराठी शब्द बरे) झाल्यामुळे आनंद झालेल्या लोकांमधे मी ही मोडतो. गेली अनेक वर्षे राम मंदिराच्या नावावर मते मागून भाजपने घाणकारण केले. तसेच शिवसेनेने मुंबईत मराठी माणसाबद्दल केले. इतकी वर्षे शिवसेनेच्या हातात सत्ता असून शिवसेना मराठी माणसासाठी काहीच करत नाहि? एक कायदा करु शकत नाहीत मराठी माणसाच्या हिताचा? भाजपवाले कर्नाटकाच्या बाबतीत कानडी अस्मिता म्हणून पाहू शकतात तेच महाराष्ट्राच्या बाबतीत पाहू शकत नाहीत? किती ही लाचारी? त्यापेक्षा राजने कमीतकमी २-३ कॉलेजे , १०-१२ हॉटेल्स तरी फोडली (प्रश्न येथे फोडाफोडीच्या समर्थनाचा नाही तर त्यामागच्या हेतूचा आहे. मनसेने भारती विद्यापीठ फोडले तेव्हा असाच असुरी आनंद मला झाला होता). त्यामुळे युती गेली तरी काही वाईट वाटणार नाही. चांगले असल्याचे भासवून शेवटी काँग्रेसवाल्यांसारखे वागणार्‍यांपेक्षा सरळ काँग्रेसवालेच आले तर काय वाइट?

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

नितिन थत्ते's picture

16 May 2009 - 5:53 pm | नितिन थत्ते

सहमत.

मराठी माणसाने एकजूट दाखवायला हवी होती असे वर बर्‍याच लोकांचे म्हणणे दिसते. ती एकजूट मराठी लोकांना उलट दिशेने दाखवता आली असती. म्हणजे सर्व मराठी लोकांनी शिवसेनेऐवजी मनसे ला मते द्यायला हवी होती. त्याने दोन गोष्टी साध्य झाल्या असत्या.
१. नुसते मराठी मराठी असे गाणे ४० वर्षे गाऊन काहीच न करणार्‍या शिवसेनेला हिसका बसला असता. त्यातून राजला पुढील वाटचालीसाठी धडाही मिळाला असता.
२. मराठी खासदार निवडून आले असते. मराठी लोकांचा-मराठी म्हणून आवाज- दिल्लीत पोचला असता.

खराटा
(रंग माझा वेगळा)

अनामिका's picture

16 May 2009 - 6:00 pm | अनामिका

पेशवे!!!!!!!!
स्वतःचे घर फोडायला परकियांची गरज नाही आपले स्वकियच या गोष्टीत तरबेज आहेत हे आपल्या अभिप्रायावरुन सिद्ध होतय असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही...............
सेनेने भले काही केल नसेल मराठी माणसासाठी पण म्हणुन मराठीची ओरड करत मराठी माणसाचा पर्यायाने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा अधिकार मनसेला कुणी दिला?
मी स्वतः देखिल राजचीच समर्थक आहे पण आज महाराष्ट्रातली राजकिय परिस्थिती बघता आपणच वैयक्तिक मतभेद , स्वार्थ साधण्यासाठी व स्वकियांवर सुड उगवण्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या अधःपतनास हातभार लावतोय.
इतक सगळ करुन मनसे महाराष्ट्रात आपले बस्तान बसवु शकली तर आनंदच आहे पण दुर्दैवाने तसे नाही झाले तर तेल गेले "तुप गेले हाती आले धुपाटणे" अशी अवस्था नाही झाली म्हणजे मिळवले........पाच वर्षाचा काळ खुप मोठा आहे.........इकडच जग तिकडे व्हायला वेळ लागणार नाही.उद्या जर मुंबई महाराष्ट्रापासुन वेगळी करण्याचा निर्णय झालाच तर त्याच पातक मनसेच्याच माथी असेल इतक ध्यानात असु द्या.
काँग्रेसला मुंबई काबिज करायला हातभार लावून एकाअर्थी मनसेने माकडाच्या हाती कोलीत दिलय हे स्मरणात राहु द्या म्हणजे झाल.............
सेनेने मराठी माणसासाठी काय केलेय हे मी व्यक्तीशः अनुभवलय बघितय .........पण त्याची चर्चा मला इथे करायची नाही.
जय हिंद !
जय महाराष्ट्र!

जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

सेनेने आजपर्यत मुंबईत मराठी माणसासाठी काय केलेच नाही. फक्त मुंबई केंद्रशासित करण्याचा कॉग्रेसचा डाव आहे ह्याच मुद्द्यावर सत्ता ताब्यात घेत गेली आहे. गेल्या पंचवार्षिक मध्ये कॉग्रेसने मुंबईत ज्यादा जागा जिंकल्या होत्या काय केले त्यांनी?मुंबई तोडली का?
मग कशाला त्याबद्दल बोलायचे? मुंबई बद्दल काही निर्णय घेताना त्याना स्थानिक नेत्याची मते देखिल लक्षात घ्यावी लागणार आहेत. त्यामुळे हे होईल ते होईल असे भाकित करण्यात काहीच अर्थ नाही.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 May 2009 - 8:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अनामिकांशी असहमत.

शिवसेनेला एवढा मराठीपणाचा (माणूस, भाषा, भूमी इ) कैवार आहे तर त्यांनी त्याकारणास्तव मनसेला पाठींबा द्यायचा होता. ज्या जागा वाटपात शिवसेनेला आल्या होत्या, त्या मनसेसाठी सोडून द्यायच्या! तडजोड फक्त एकानेच का करायची? बरं आत्ताचे निकाल पहाता दोन-चार जागा सोडल्या असत्या तर (उदा: ठाणे, दक्षिण मुंबई) तर जास्त मराठी माणूस निवडून नसता का आला? रामभाऊ म्हाळगी आणि प्रकाश परांजपेंच्या मतदारसंघाच्या तुकड्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍या माणसाला उमेदवारी दिली, काय परिणाम झाला??
असो. मला या मराठीच्या 'कैवार' घेण्याची विचारसरणी अमान्य आहे त्यामुळे मी या विषयावर न बोललेलंच बरं! पण विचारांत विसंगती असावी अशी शंका आली म्हणून प्रतिसादप्रपंच!

विकि's picture

17 May 2009 - 8:25 pm | विकि

तुम्ही तर मुंबईत न राहता कुवेत मध्ये असता ना. म्हणजे तुम्ही तर तिथे परप्रांतियच ना.

अनामिका's picture

17 May 2009 - 11:06 pm | अनामिका

कॉ विकी!!!!!!!!!१
मी भले तुमच्या लेखी देशाबाहेर राहते आहे म्हणुन परप्रांतीय ठरत असेन्.............पण इथे आंम्ही कुणाच्या उपजिविकेच साधन बळकवायच्या उद्देशाने आलो नाही ................आणि महाराष्ट्रातील उपर्‍यांप्रमाणे इथे स्वतःचा टक्का वाढवण्यासाठी विमाने भरभरुन आपल्या आप्तांना बस्तान बसवायला पाचारण करित नाही आहोत..............इथे रहाताना इथल्या सगळ्या नियमांचे पालन करुनच रहातो आहोत ........."कानामागुन आली आणि तिखट झाली" त्याप्रमाणे इथे आंम्ही अनैतिक मार्गाने स्थानिकांच्या हक्कांवर गदा आणुन रहात नाही................
आणि परप्रांतियांच्या बाबतीत काही नियम राजनेच घालुन दिलेत त्याचे इथे रहाताना प्रामाणिकपणे पालन करतो............काय आहे ?इथे काँग्रेसचे अथवा तुमच्या लालबावट्याचे सरकार नाही आंम्हाला मतांच्या राजकारणासाठी पाठीशी घालायला आणि आमच लांगुलचालन करायला काय समजले?..........आणि देशाबाहेर रहातो म्हणून देशात घडत असलेल्या घटनांवर आपली मते मांडु नयेत असे तुम्हांस वाटत असेल तर तर तुमचा हा महान विचार तुंम्ही तुमच्याकडेच ठेवलेला जास्त चांगले.

आणि आंम्ही परदेशात राहुन देखिल अस्सल देशी आहोत आणि आमची विचारसरणी देखिल कुठल्या देशाकडुन आयात केलेलि नाही तुमच्या सारखी ............... तुमच्या सारखे प्रत्येकवेळेस चिन रशिया कडे तोंड करुन बांग देत नाही आंम्ही.

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

विकि's picture

17 May 2009 - 11:28 pm | विकि

अनामिका ताई मी तुमच्याबाबत सत्य आहे तेच म्हणालो आहे तुम्हाला राग आल्यास मी काही करू शकत नाही.
आणि एक फरक तुम्ही परदेशात राहतात इथे मुंबईत जे येतात ते भारतीयच असतात ना.

चिरोटा's picture

18 May 2009 - 11:22 am | चिरोटा

इथे रहाताना इथल्या सगळ्या नियमांचे पालन करुनच रहातो आहोत

ह्याचा अर्थ तिकडच्या प्रशासनातले अधिकारीपण स्वच्छ असतील. नियमांचे पालन होत आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाची असते.'बाहेरचे लोक येवून घाण करतात" पण घाण होऊ नये म्हणून इकडे प्रशासन(जिकडे ९५% मराठीच आहेत) काळजी घेते का?
मोठ्या (अमराठी)बिल्डरांना वनखात्याच्या ताब्यातली जमीनपण पटकन मिळते. कफ परेड्,वरळी,परळ ह्या जुन्या वस्तींमधेपण मोठे टॉवर उभे रहातात. हे सगळ्याना परमिशन देणारे राजकारणी आणि अधिकारी मराठीच असतात.
दाऊद/शकील भारताबाहेर पण त्यांची गँग मुंबईमधे गेले २० वर्षे कार्यरत .आजही त्यांचा फोन आला की मोठ्या व्यापार्‍याना घाम फुटतो!. ९५% अधिकारी मराठी असणार्‍या मुंबई पोलिस दलाचे आणि पर्यायाने मराठी राजकारणी लोकांचे अपयश नाही काय?
मनसेने आंदोलनाची सुरवात ह्या लोकांपासुन करायला नको का?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

उध्दव ठाकरे ह्यांच्या भुमिकेचा तु अभ्यास करावास असे वाटते.आज शिवसेनेला जी काही मरगळ आली आहे त्याला स्वःता उध्दव ठाकरे जबाबदार आहेत. भलेही आज मुंबई,ठाणे,पुणे व नाशिकात राज ठाकरे ह्याच्या मनसे मुळे शिवसेनेच्या जागा गेल्या असल्या तरी तिथे शिवसेनेला एक भक्कम पर्याय म्हणुन मनसे समोर आला आहे. उद्या सेनेची मते देखिल मनसे कडे वळायला वेळ लागणार नाही.
आज मनसे कडे तरुण वर्ग जो आकर्षित झाला आहे तो १४-२० वया दरम्यानच्या तरुण तरुणीचा आहे . पुढे त्याना मतदानाचा हक्क प्राप्त झाला कि काय घडेल ह्याची तुला कल्पना असेलच. मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या सेनेने हिंदुत्वाची कास धरली त्यावेळीच मराठी माणुस परत एकदा पोरका झाला होता. आज त्याला मनसे ने हात दिला आहे.१२ जागी फक्त उमेदवार उभे केल्यानण्तर जर ही परिस्थिती तुमची होत असेल तर बाकी ठिकाणी उमेदवार उभे केले असते तर तुमची पळताभुई थोडी झाली असती.विधानसभेला काय होणार ह्याचा अंदाज सेना नेत्रुत्वाला आला असावा अशी मी आशा करतो.
राज ठाकरे झिंदाबाद.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

अनामिका's picture

16 May 2009 - 6:19 pm | अनामिका

श्री वेताळ !
आपण असे समजत असाल तर मग पुढे बोलणेच नको....................मला दुखः सेनेचे उमेदवार निवडुन आले नाहीत याहीपेक्षा मनसेमुळे काँग्रेसला मुंबईवर अधिराज्य गाजवायची संधी मिळाली याचच जास्त आहे...........उद्या कुणी बघितलाय ?उद्या सेनेची मते देखिल मनसेकडे वळतील या भविष्यकाळातील कल्पनाविलासात मग्न राहुन मी स्वतःचा वर्तमानकाळ जर हातचा घालवुन बसत असेन तर त्याला काय अर्थ उरतो?
ज्या झाडाच्या फांदीवर बसलोय नकळतपणे त्याच फांदीवर घाव घालुन साध्य काय होणार ?शेवटी फांदी तुटल्यावर आपणच फांदीसकट तोंडघशी पडणार आणि तरीही जर फांदी तुट्ल्याचा आसुरी आनंद मिळवण्यात आपण धन्यता मानतत असु तर आपले देव सुद्धा भले करु शकणार नाही.
दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ झाला याचच जास्त वाईट वाटतय.................जे काँग्रेसला अपेक्षित होत तेच घडल...............त्यापेक्षा सेनेचा सुपडा साफ करायच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या मनसेने काँग्रेसचा सुपडा देखिल साफ केला असता व स्वतः निवडुन आले असते तर लोकांनी त्यांना दुवाच दिला असता.
तुंम्हाला माझ्या लिखाणात सेनेबद्दल प्रेम् दिसत असेल तर त्याला माझा आक्षेप नाही कारण शरीराचे भाग कुणि वेगळे करु शकत नाही............सेना काय किंवा मनसे काय माझ्या साठी दोन्ही सारखेच ..............पण सेनेचा पराभव यापेक्षा उद्धववर कुरघोडी करण्याच्या नादात राजने स्वतःचेच नुकसान करुन नाही घेतले म्हणजे मिळवले.
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

यन्ना _रास्कला's picture

16 May 2009 - 10:17 pm | यन्ना _रास्कला

संप्रुण सहमत. प्वाईंट आहे.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

नितिन थत्ते's picture

16 May 2009 - 6:07 pm | नितिन थत्ते

इतकी वर्षे शिवसेनाच मुंबईत निवडून येतेय. तरी मराठी माणसाचा सुपडा साफच होतोय. त्यामुळे मनसे ने शिवसेनेला वॉकओव्हर दिला असता तरी मराठी माणसाचा सुपडा साफच होणार होता. म्हणून मराठी लोकांनी (म्हणजे मराठी लोकांचा हक्क वगैरे विचार करणार्‍यांनी एकजुटीने मनसे ला ट्राय करायला हवे होते. म्हणजे काँग्रेसचे खासदार निवडून आले नसते.

खराटा
(रंग माझा वेगळा)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

16 May 2009 - 6:25 pm | घाशीराम कोतवाल १.२

अहो गेल्या वेळेसच ह्यांचा सुपडा साफ झाला असता पण मोहन रावले निवडुन आले आणि ह्यांची लाज वाचली ती तर खर म्हनजे अरुन गवळीमुळे वाचली जर त्यांनी ९०००० नव्वद हजार मते घेतली नसती तर अहो कशाला राजच्या नावाने खडे फोडताय एक म्हनजे स्वताला राज समर्थक म्हनवता आणी त्याने उमेदवार उभे करायला नको असे हि म्हणतात तुम्हाला नक्कि काय म्हणायचे आहे
अहो अजुन १ वर्षात विधानसभेच्या निवडणुका होतील मग बघा राज कसा किंगमेकर बनतो ते आणी ४० वर्ष बाळासाहेबांनी मराठीचा मुद्दा उचलुन धरला पण मराठी पाट्याचा कायदा असुन ह्यांना राबवता आला नाहि राजच्या निवेदनाने कसे ५५% पाट्या मराठीत लागल्या अहो जर सेनेला मराठीचा एव्हडा कळवळा होता तर त्यांनी का नाहि राजच्या उमेदवारांना पाठिंबा दिला
बोलण खुप सोप्प आहे पण जर त्याचे १२ उमेदवार प्रत्येकि १ लाख ह्याप्रामाणे १२ लाख मते घेउ शकतात तर विधानसभेत
२५ ते ३५ आमदार सहज बसु शकतात ना ..

**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

अनामिका's picture

16 May 2009 - 6:53 pm | अनामिका

कोतवालसाहेब!
किंगमेकर संबोधुन तुंम्ही राजला त्या नतद्रष्ट लालुच्या पंक्तीत बसवण्याचा प्रमाद करु नका हि कऴकळीची विनंती
विधानसभा निवडणुकांच्या वेळेस राज आपली निर्णायक भुमिका बजावेलच त्याबद्दल शंकाच नाही .आणि तुंम्ही माझी कळकळ समजु शकत नसाल तर निदान समजुन घेण्याचा प्रयत्न करा. तुंम्ही फक्त मराठी पाट्यांच झालेल यशस्वी राजकारण बघुन अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊ नका.त्याही पेक्षा फार मोठे प्रश्न आहेत महाराष्ट्रापुढे व मराठी माणसापुढे त्याची तड लावण देखिल तितकच गरजेच आहे
अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

नितिन थत्ते's picture

16 May 2009 - 7:00 pm | नितिन थत्ते

त्याही पेक्षा मोठे प्रश्न आहेत हे खरे. पण त्याबाबतीत शिवसेनेने काही दिवे लावल्याचे स्मरत नाही.
युतीच्या राज्यात सुरुवातीला शिवउद्योग सेना नावाचा प्रकार राजनेच सुरू केला होता (एम्प्लॉयमेण्ट एक्सचेंज सारखा). त्यात काही बरे काम झाल्याचे स्मरते.
बाकी दसर्‍याच्या भाषणात 'मला मर्द हवेत', 'बांगड्या भरल्या नाहीत' वगैरे ठरावीक वाक्ये फेकून टाळ्या मिळवण्याखेरीज काही भरीव काम नाही (रुग्णवाहिका सोडून).

खराटा
(रंग माझा वेगळा)

प्रशु's picture

16 May 2009 - 6:31 pm | प्रशु

मराठी माणसाने मराठी माणसाचा मराठी माणसाठी केलेला पराभव..

आता तरी जागे व्हा..........

नितिन थत्ते's picture

16 May 2009 - 6:42 pm | नितिन थत्ते

>>>मराठी माणसाने मराठी माणसाचा मराठी माणसाठी केलेला पराभव

यात मराठी माणसाच्या हिताचा पराभव केला असेल तर तो राजला किंवा शिवसेनेला सगळी मते न देणार्‍या मतदारांनीच.
मराठी माणसाच्या हितासाठी मनसेने उमेदवारच उभे करायला नको होते किंवा लोकांनी मनसे ला मते द्यायला नको होती असे म्हणणे अयोग्य आहे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

कलंत्री's picture

16 May 2009 - 6:42 pm | कलंत्री

कोणत्याही नवोदित पक्षासाठी हरणे, हरविणे आणि जिंकणे अशी त्रिसुत्री असते. राज - मनसे हे हरविणे अशा पायरीवर गेले असे समजावे.

पूढील वेळेस शिवसेना आणि भाजपा यांनी मनसेची दखल घेतली पाहिजे असे सूचवावेसे वाटते.

अवांतर : मनसेला आर्थिक निधी कॉग्रेसने दिला आहे असे वावड्या ऐकत आहे.

नितिन थत्ते's picture

16 May 2009 - 6:49 pm | नितिन थत्ते

>>>अवांतर : मनसेला आर्थिक निधी कॉग्रेसने दिला आहे असे वावड्या ऐकत आहे.

कलंत्री साहेब,

वाईट पाहू नये.
वाईट ऐकू नये.
वाईट बोलू नये.

खराटा
(रंग माझा वेगळा)

अवलिया's picture

16 May 2009 - 6:54 pm | अवलिया

--अवलिया

कलंत्री's picture

16 May 2009 - 7:03 pm | कलंत्री

ही मर्कटे गांधीच्या मेजावर असत आणि कोणी वाईट बोलत असेल तर गांधी या मर्कटांवर निर्देश करीत. सध्या इतकी माकडे झाली आहेत की माणसे शोधावी लागतील ( हलके घ्या).

वेताळ's picture

16 May 2009 - 7:07 pm | वेताळ

गांधीजीना माणसांपेक्षा माकडांवर ज्यादा विश्वास होता ,त्यामुळे माणसे पण माकडांप्रमाणे वागायला लागली आहेत.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

इनोबा म्हणे's picture

16 May 2009 - 7:59 pm | इनोबा म्हणे

सध्या इतकी माकडे झाली आहेत की माणसे शोधावी लागतील
हो ना! आणि माकडांचाही गांधीजींवर फार जिव आहे.

वेताळ's picture

16 May 2009 - 7:02 pm | वेताळ

आमच्या इथे एक आमदार सलग ३० वर्षे निवडुण येत होते. मागील दोन निवडनुकात ते पडले परंतु अजुनही लोक त्याना आमदारसाहेब असेच बोलवतात. तसेच सेनेचे झाले आहे.मराठी माणसाच्या हक्कासाठी सेनेची स्थापना झाली होती तेच हे सेना वाले विसरले. हिंदुत्व व मुसलमान विरोध सुरु झाला. परंतु काही भाबड्या मराठी माणसाना अजुनही वाटते कि सेना फक्त मराठी हिताचे रक्षण करण्यासाठीच आहे. ह्याच सेनेने राज्यसभेसाठी चंद्रिका केनिया,राम जेठमलानी,अशा कितीतरी अमराठी लोकाना राज्यसभेमधुन संसदेत पाठवले आहे. त्यानी मराठी लोकांचे काय हित केले हे सेनेलाच माहित आहे. त्यामुळे सेना म्हणजे मराठी माणसाचे हित रक्षण हा राग आळवायचे बंद करा.आजकाल सेना ९०% राजकारण व १० % तिकिटाचा काळाबाजार करते.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

इनोबा म्हणे's picture

16 May 2009 - 7:07 pm | इनोबा म्हणे

मनसेने नाहक उमेदवार उभे करुन सेनाभाजपाची मते खाल्ली व त्याचा फायदा आघाडीला व अप्रत्यक्षपणे उत्तरभारतीय उमेदवारांनाच मिळवुन दिला........कधी काळी उत्तर भारतीयांची मते मिळविण्यासाठी संजय निरुपम,जेठमलानी सारख्या अमराठींना उमेदवारी देणार्‍या,उत्तर भारतीयांसाठी हिंदितून "दोपहर का सामना" चालवणार्‍या, उत्तर भारतीय मेळावे भरवणार्‍या, मराठी माणसाचा घात करणार्‍या शिवसेनेच्या उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी मनसेने माघार घ्यायला हवी होती का? हे बरं आहे तुमचं. आणि समजा मनसेने माघार घेतलीच असती तरी शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केले असते? वयाच्या २२ व्या वर्षापासून जे राज ठाकरे शिवसेनेसाठी राबले त्यांना एका फटक्यात बाजूला सारले गेले. गांधी-नेहरुंच्या घराणेशाहीला शिव्या देणार्‍यांनी शेवटी घराणेशाहीचाच रस्ता निवडला.

राजने लोकसभा निवडणु़कांच्या निमित्ताने मराठी माणसाचा ,मुंबईकरांचा व पर्यायाने महाराष्ट्राचा केसाने गळा कापला असेच खेदाने म्हणावे लागतय.
केसाने गळा कुणी कापला हे मराठी माणसाला चांगलेच माहित आहे. त्यामुळेच मराठी माणसाने यावेळी शिवसेनेला हिसका दाखवला. अनामिका ताई मते ही हिसकावून मिळत नसतात. आज जर मराठी माणसाने मनसेला इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे तर त्यामागे तशी कारणे ही आहेत. मनसेला शिव्याशाप देण्यापेक्षा शिवसेनेच्या चुका शोधा.

आणि याच निमित्ताने आपल्याच माणसांचे पाय ओढण्याची मराठी माणसाची खेकडा प्रवृत्तीदेखिल स्वहस्ते दाखवुन दिली........
महाराष्ट्राचा दैवदुर्विलास म्हणायचा तो हाच का? असा प्रश्न पड्लाय?

हो, हाच महाराष्ट्राचा दैवदुर्विलास आहे. योग्य नेतृत्व काय असते हे राज ठाकरेंनी दाखवून दिले असताना ही शिवसेना आज ही त्यांनाच दोष देत बसले आहेत. खेकडा वृत्ती कशाला म्हणतात हे शिवसेनेनेच आज दाखवून दिले आहे.
राज आज जर शिवसेनेचे नेते असते तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्यांनी धूळ चारली असती. पक्षाच्या आणि मराठी माणसाच्या भल्याकडे दुर्लक्ष करुन बाळासाहेबांनी पुत्रप्रेमाला प्राधान्य दिले. आणि तीच चूक शिवसेनेला भोवते आहे.

अनामिका's picture

16 May 2009 - 7:36 pm | अनामिका

इनोबा
तुमचे सगळे मुद्दे मान्य ............तुंम्हाला मी राज विरोधक आहे असे वाटत असेल तर प्रश्नच मिटला...माझा आक्षेप फक्त मनसे सेनेच्या भांडणात काँग्रेसचा लाभ झाला यालाच आहे..कुणितरी समजुतीने घ्यायला हवे कि नको?कि प्रत्येक जण स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या नादात आढ्यतेनेच वागणार्?कुठून तरी सुरुवात व्हायलाच हवी.
" title="दुवा">http://www.misalpav.com/node/4200
.......हे लिखाण वाचुन देखिल तुंम्ही मला राज विरोधकांच्या पंक्तित नेउन बसवत असाल तर याउपर न लिहिलेलेच बरे
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

इनोबा म्हणे's picture

16 May 2009 - 7:51 pm | इनोबा म्हणे

तुंम्हाला मी राज विरोधक आहे असे वाटत असेल तर प्रश्नच मिटला
अर्थातच्...आणि तसे वाटण्याला आपला प्रतिसादच कारणीभूत आहे. मनसे आणि शिवसेनेच्या वादात मराठी माणसाचे नुकसान झाले हे मान्य. पण मग आपल्या प्रतिसादात सगळे शिव्याशाप फक्त राज यांनाच का? याला उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत असे तुम्हाला का वाटले नाही?
राज यांच्यासारखा प्रभावी नेता असताना ही त्यांना घरी बसवून उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची सुत्रे स्वतः च्या हाती घेतली. हा मराठी माणसाचा घात नाही का? त्यावेळी उद्धव यांनी मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा गळा कापला नहई का? ज्या बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या भल्यासाठी हि संघटना चालू केली त्यांनी तरी त्यावेळी हस्तक्षेप करायला हवा होता ना.
आज एवढ्या मोठ्या संख्येने मराठी माणूस राज यांच्या पाठीशी भक्कम उभा असताना ही आपण अप्रत्य्क्षरित्या राज यांनीच माघार घ्यावी असे सुचवताय. त्यापेक्षा शिवसेनेने माघार घेतल्यास बरे आहे ना!

पिवळा डांबिस's picture

17 May 2009 - 3:31 am | पिवळा डांबिस

इनोबा,
तुझ्या या आणि यापूर्वीच्या प्रतिक्रियेशी १००% सहमत....
मराठी हिताची जपणूक करण्याचा मुद्दा आपलाच असल्याचे समजणार्‍या शिवसेनेला आता तरी जाग यावी....
शिवशाहीचा वारस अष्टप्रधान मंडळाकडून नव्हे तर (निवडणुकीच्या) रणांगणावर ठरवला जातो हा इतिहास त्यांना उमजावा...
आता विधानसभा निवडणूक जवळ आलीच आहे...
मनसे, एक धक्का और दो!!!

अनामिका's picture

17 May 2009 - 11:20 pm | अनामिका

मी राजने माघार घ्यावी असे मुळीच सुचवत नाही आहे.....................................'तुम अपुन को इतना मारा, लेकीन अपुन ने तुमको सिर्फ दोही मारा, पर क्या सॉलिड मारा' .हा डायलॉग काय दर्शवतोय्...............राजवर व मनसेवर अन्याय केला कुणी ?आघाडीच्या सरकारमुळे त्याला तुरुंगात जावे लागले ..............गुंडाची सेना ठरवुन मोकळे झालेल्या अघाडिच्याच ताब्यात मुंबई द्यायला कारण राज झाला याचच दु:ख जास्त आहे...............
उद्धवने राजला समजुन घेण्याइतपत परिपक्वता त्याच्या कडे असती तर आज सेना, मनसेवर ही वेळच आली नसती!
पण जर खरच महाराष्ट्राच व मराठी माणसाच भल व्हाव अशी प्रामाणिक इच्छा दोन्ही पक्षांची असेल तर कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा कि नको?..........
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

अनामिकाताई आणि इनोबा भाऊ

दोघांच्या चर्चेमुळे मला थोडेसे लिहावेसे वाटले म्हणून लिहित आहे.

मराठी माणसाचा घात मराठी माणसामुळेच होतो हा इतिहास आहे. पानिपत झाले हा वाक् प्रचार त्यामुळेच पडला आहे.
पण तो इतिहास आता बदलायची वेळ आलेली आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.

राज च्या बाबतीत जे झाले त्यामुळे राज ने शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःचा नवीन पक्ष स्थापन केला.
स्वतःच्या कर्तृत्त्वाला वाव मिळत नसल्यामुळे शिवसेना सोडून झालेला मनसे चा जन्म मी बंडखोरी मानत नाही.

आणि राजच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत लाखो मराठी मने लाखों मतांच्या रुपाने त्याच्यामागे उभी राहिली .
यातच राजचे यश, कर्तृत्त्व दिसून येते यात शंका नाही. पहिल्याच निवडणुकीत मनसे चे ३ उमेदवार चुरशीच्या लढाईत हरले. बाळा नांदगावकर तर अगदी काही हजारांनी हरले.

मराठी माणूस वर्षांनुवर्षे परप्रांतियांकडून भरडला गेला आहे आणि अजूनही जातो आहे. यासाठी पहिली महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे योग्य नेता निवडण्याची. आणि मला राज मधे ते सर्व गुण दिसतात. संधी प्रत्येकाला मिळायला हवी हे माझे मत आहे. इतकी वर्षे शिवसेनेने मराठी माणसाची अस्मिता मराठी माणसाला मिळवून दिली आहे असे मला वाटत नाही. हेच नेमके राज करु पाहतो आहे. त्याचा मार्ग बर्‍याच जणांना गुंडगिरीचा वाटतो. पण आज परिस्थिती अशी आहे की परप्रांतियांना (खास करुन यू.पी. - बिहारच्या लोकांना) याच भाषेतले उत्तर कळते.
महाराष्ट्रातून अशा प्रकारचा प्रचंड प्रतिकार या परप्रांतियांना अपेक्षित नव्हता. त्यामुळेच एवढा गदारोळ चालू आहे.

दुसरे मला असे सांगायचे होते की, आत्ता असे चित्र दिसते आहे की राज मुळे शिवसेनेचे पानिपत झाले. पण आपण सर्वांनीच लांबचा विचार करायला हवा. पहिल्याच निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा पाठींबा मिळाल्यावर, राजही अधिक जोमाने त्याची संघटना मजबूत करेन. आणि पुढच्या निवडणुकीत मनसेला दुर्लक्षित करणार्‍या पक्षांनाच मराठी मतदार दुर्लक्षित करतील. अर्थात त्याला थोडा वेळ लागेल. पण राजच्या लढाईला, प्रयत्नांना पूर्ण यश पहिल्याच प्रयत्नात मिळण्याची अपेक्षा आपण करणे पण चुकीचे आहे. पहिले पाऊल टाकण्याअगोदर लहान मूल पण १०० वेळा पडते. पुढील ५ वर्षांत राज नक्कीच अशी तयारी करेन की मराठी माणसाने मराठी माणसाचा गळा कापला हा त्याच्यावरचा कलंक पुसला जाईन.

राजला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...

आपणही मराठी मित्र आपापसात भांडू नये ही विनंती :)
शेवटी आपण सगळे मराठी, हेच खरे
जय महाराष्ट्र !!! जय मनसे !!! :)
धन्यवाद,
सागर

प्रशु's picture

16 May 2009 - 7:18 pm | प्रशु

कोणी तरी या नंतर आपण सगळयानी काय करावे या बद्द्ल बोलेल का?

इनोबा म्हणे's picture

16 May 2009 - 7:24 pm | इनोबा म्हणे

यापुढे आपण फक्त मनसेलाच मत द्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

16 May 2009 - 7:43 pm | llपुण्याचे पेशवेll

असेच म्हणतो.....
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

ब्रिटिश टिंग्या's picture

16 May 2009 - 8:49 pm | ब्रिटिश टिंग्या

मी स्वत: लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षाला मत देण्यापेक्षा एखाद्या राष्ट्रीय पक्षाला मत देणे पसंत करेन!

अपवाद : मतदान करीत असलेल्या मतदारसंघात राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार उभा नसल्यास.....

कारण :

१. प्रादेशिक पक्षांची विचारसरणी ही केवळ त्या त्या प्रदेशाच्या मुलभुत प्रश्नांशी निगडीत असते. शक्यतो राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांबद्दल त्यांना सोयरसुतक नसते.
२. अधिकाधिक प्रादेशिक पक्षांच्या उदयामुळे केंद्रात त्रिशंकु स्थितीचा सामना करावा लागतो.
३. वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांमुळे बनलेले सरकार कितपत सुज्ञ निर्णय घेउ शकेल याची शाश्वती अजिबात नसल्याने.

विधानसभा निवडणुकीत मात्र शक्यतो प्रादेशिक पक्षाला (ज्याची केंद्रात सत्ता असण्यार्‍या पक्षासमवेत युती आहे) त्यालाच मत देणे पसंत करेन.

राष्ट्रीय ऐक्याची ऐशीच्यातैशी करणार्‍या प्रादेशिक पक्षाला मत कधीही देउ इच्छित नाही!

- टिंग्या

llपुण्याचे पेशवेll's picture

17 May 2009 - 3:59 am | llपुण्याचे पेशवेll

>>मी स्वत: लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षाला मत देण्यापेक्षा एखाद्या राष्ट्रीय पक्षाला मत देणे पसंत करेन!
मी स्वतः भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही ढोंगी पक्षांसाठी पर्याय शोधत होतो. आणि माझ्या मते मनसेच्या रुपाने मला तो मिळाला.

>>१. प्रादेशिक पक्षांची विचारसरणी ही केवळ त्या त्या प्रदेशाच्या मुलभुत प्रश्नांशी निगडीत असते. शक्यतो राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांबद्दल त्यांना सोयरसुतक नसते.
हे राष्ट्रीय प्रश्न राष्ट्रीय प्रश्न असतात तरी काय? शेवटी कोणत्याना कोणत्या ठीकाणी ते स्थानिक होतच असतात. उदा. बिहारी जनतेच्या स्थलांतराचा प्रश्न हा महाराष्ट्र, आसाम्, पंजाब अनेक ठीकाणी स्थानिक प्रश्न आहेच की. शेवटी मी देखील राष्ट्राचा एक भाग आहे म्हणून माझा विचार असा आहे की जर माझ्या आजूबाजूचे सर्व उत्तम असेल तर मी राष्ट्राचा विचार करू शकतो. अन्यथा ना धड राष्ट्रीय समस्यांवर तोडगा आहे ना स्थानिक.... आणि राष्ट्रीय पक्ष देखील देशभरातल्या मतांचा विचार करून देशभरात सर्बत्र असलेल्या या स्थानिक प्रश्नांवर तोडगा काढत नाहीत. हा स्थानिकांवर अन्याय नाही का? याचाच राग मलातरी सर्वात जास्त आला. जेव्हा भाजप कर्नाटकात कानडी अस्मिता म्हणून बेळगाव प्रश्नावर मूग गिळून बसते, सर्व बिहारी नेते राजविरुद्ध एक होतात तेव्हा एकही मराठी भाजपा वा काँग्रेस नेता राजच्या भूमिकेचे समर्थन करू धजत नाही ? गेले तेल लावत असे राष्ट्र जिथे एखाद्या प्रगतीशील राज्याच्या अस्मितेला असे हिणवले जाते. माझे सरळसरळ म्हणणे असे आहे कि जर राजच्या भूमिकेचे समर्थन जर सोनियांनी केले असते व त्यावर उपाय योजायचे कबूल केले असते तर मी मत काँग्रेसलाही दिले असते.

>>२. अधिकाधिक प्रादेशिक पक्षांच्या उदयामुळे केंद्रात त्रिशंकु स्थितीचा सामना करावा लागतो.
राष्ट्रीय पक्ष एकात्मतेच्या नावाखालीच ढोंगीपणा करू लागतात त्यामुळे स्थानिक पक्ष जन्मास येतात व तगतात. त्यामुळे त्रिशंकू स्थितीस हे राष्ट्रीय पक्षच काही अंशी जबाबदार ठरतात.

>>३. वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांमुळे बनलेले सरकार कितपत सुज्ञ निर्णय घेउ शकेल याची शाश्वती अजिबात नसल्याने.
तसेही २/३ बहुमतातील सरकारने देखील शहाबानो प्रकरणासारख्या घोडचूका केल्याच आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षाचे मिळून झालेले सरकार काही अंशी बरे असे वाटते. कमीत कमी एकाच विचारसरणीच्या पक्षाची किंवा नेत्याची मनमानी तरी चालत नाही.

>>राष्ट्रीय ऐक्याची ऐशीच्यातैशी करणार्‍या प्रादेशिक पक्षाला मत कधीही देउ इच्छित नाही!
राष्ट्रीय ऐक्याची ऐशी तैशी करणार्‍या राष्ट्रीय पक्षाला मत मीही कधीही देऊ इच्छीत नाही.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

इनोबा म्हणे's picture

17 May 2009 - 9:53 am | इनोबा म्हणे

पेशव्यांशी पुर्णपणे सहमत.

टारझन's picture

17 May 2009 - 9:58 am | टारझन

मस्त रे पेशव्या ... विण्या लेका तुझ्याशी बी १०१% सहमत आहे !!

टिंग्या... काय लेका तु पण ? कोणत्या अँगल ने विचार करतोस रे ? असो .. विचारस्वातंत्र्य आहे :)
बाकी विधानसभेत राज ठाकरे आलाच पाहिजे राव !! च्यायला दिल्लीत नाय गेला चालत .. पण मुंबैत राज ठाकरे आनाच्च मंगता .. केवळ काही दिवस मुंबैत राहूनच मला परिस्थितीची जाणिव झालीये .. राज बोलतो त्यात तथ्य वाटते बॉ !!

- टाराज ठाकसे
(मिसळपाव नवनिर्माण सेणा)

स्वामि's picture

16 May 2009 - 10:49 pm | स्वामि

इनोबा आपले म्हणणे पटले.अनामिकाताईंचे दु:ख दुहे री आहे,एकीकडे मराठी माणूस हरला तर दुसरीकडे शिवसेना.पण यात आत्मपरीक्षणाची वेळ उध्धवजींवर आलेली आहे.आज ते जर कार्याध्यक्ष नसते तर नारायण राणे आणि राजसाहेबांनी मिळून शिवसेना कुठल्या कुठे नेली असती.

विसोबा खेचर's picture

17 May 2009 - 12:19 am | विसोबा खेचर

पण यात आत्मपरीक्षणाची वेळ उध्धवजींवर आलेली आहे.आज ते जर कार्याध्यक्ष नसते तर नारायण राणे आणि राजसाहेबांनी मिळून शिवसेना कुठल्या कुठे नेली असती.

सहमत आहे..

तात्या.

पाषाणभेद's picture

16 May 2009 - 11:55 pm | पाषाणभेद

कुणीही यावे आणि मुबंईवर टिचकी मारून जावे अशी मुंबईची स्थिती केवळ काँग्रेस ने केली हे आपण मुंबईच्या तसेच द्विभाषीक राज्यातुन संयूक्त महाराष्ट्राच्या जन्मापासुन पाहात आलो आहोत. तोच कित्ता आता यापुढे मराठी मुगगीळे आमदार, खासदार, मंत्री- संत्री चालवत आहेत. त्यास आताशी काही प्रमाणात शिवसेनेचा पण हातभार लागत आहे/ होता.
पण मुंबई - आणि मराठी साठी आता राज ठाकरे हा समर्थ पर्याय उपलब्ध झालेला असतांना ज्या लोकांनी त्यांना मतदान केले नाही त्या सारखे करंटे आपणच.

६० वर्षे झालीत तरी अजुन आपण गटारे, रस्ते, पाणी यातच अडकलेलो आहोत. शरद पवार , मनोहर जोशीं, सुशीलकूमार सारखे गुळगुळीत बोलणारे आपल्याला चालतात पण हातात दांडु घेणारा चालत नाही. राज आंदोलन करत होते तेव्हा कोण कसे वागले आपण पाहीले नाही काय?

यांना फक्त सत्तेची उब पाहीजे. ही उब गेली की ते काकडुन मरतील.

अजुनही वेळ गेलेली नाही. नाहीतर येणार्‍या मराठी पिढ्या आपल्याला क्षमा करणार नाही.

अजुनही एक लक्षात घ्या, मुंबई जर महाराष्ट्रापासुन वेगळी करायची भाषा कोणी सुरू केली तर त्या विरूद्ध उतरणारे पहीले मुले केवळ मराठी असतील आणि ते केवळ आणि केवळ मनसे आणि आधीच्या शिवसेनेच्या विचारांचीच असतील.

कोल्हापुर, हतकणंगले मधली विजयाची स्थिती पण हिच मनसेची बंडखोर मानसीकता दाखवत आहे, जरी विजयी उमेदवार मनसेचे नसतील तरी.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर सह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

प्रदीप's picture

17 May 2009 - 8:54 am | प्रदीप

आहे हे. ह्या सगळ्या मतांशी सहमत.

मनसेमुळे सेना - भाजपा युती मुंबईत साफ झोपली

शिवसेनेच्या मुंबईतील आणि राष्ट्रवादीच्या शिरुर, मावळ, कोल्हापूर, हातकणंगले येथील पराभवांना त्या-त्या पक्शांचे प्रमुख आणि त्यांचे तथाकथित कारभारी जबाबदार आहेत, मनसे किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना नव्हेत...

--सुहास

हे चारही मतदार संघ बहुतांशी त्या त्या जिंकलेल्या उमेदवारांच्या प्रतिमेमुळे आणि आधीच स्थापित असलेल्या संपर्क यंत्रणे मुळे आले आहेत.
विलास लांडे हा उमेदवार शिरूर मधून अढळराव पाटलांसारख्या मातब्बर उमेदवारापुढे नक्कीच कमजोर होता. आणि अढळरावांच्या प्रचाराला आणि या उमेदवाराविरुद्ध घेतलेल्या थेट आक्रमक भूमिकेला विलास लांडे आणि राष्ट्रवादी उत्तर देऊ शकले नाहीत.
पवारांच्या सभा होऊनही हे हरले. शिरूर व मावळ दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीच्या अनेक मोठ्या सभा झाल्या पण त्या मोठ्या मुद्द्यांवर व भाजप - सेनेवर टि़का करणार्‍याच होत्या. स्थानिक मुद्दे किंवा खासदार / प्रतिस्पर्धी उमेदवाराविरुद्ध त्यांना जनमत उभे करता आले नाही. तेच गजानन बाबर यांचे. गेली अनेक वर्षे त्यांचे मुळशी मावळ भागात नाव आहे. तिथे थोडी लढत झाली खरी. थोडक्यात त्यांनी बाजी मारली... अढळरावांचे मताधिक्य मोठे आहे त्यामुले पक्ष प्रमुख किंवा कारभारींवर या अपयशाचा भार तितका जात नाही.

कोल्हापूर मध्ये प्रमुखांची चूक ही सदाशिव रावांसारख्या जुन्या आणि मुरलेल्या माणसाला बाजूला सारण्याची. त्यात सदाशिव रावांवर अगदी तोल सोडून केलेली टिका त्यांना स्वतःला भोवली असावी. त्यांच्या जवळच्या काही माणसांकडून असं कळालं की सदाशिव रावांना यशाबद्दल पूर्ण खात्री होती. म्हणजे त्यांनी उभी केलेली राष्ट्रवादीची संघटना अर्थात त्यांच्या बाजूने लढली पक्षाच्या नव्हे.
हातकणंगले - राजू शेट्टी यांचा वैयक्तिक इतिहास आणि शेतकर्‍यांची सहानूभूती, तसंच साखर कारखानदारांनी - जसं कोरे, माने इ. त्यांच्या विरुद्ध केलेला प्रचार हा शेतकर्‍यांनी त्यांच्या बाजूने घेतला. सामान्य शेतकरी कारखानदारांच्या थापांना भुलला नाही. इतकी वर्षे माने यांना मत देणारा शेतकरी पर्यायाच्या शोधात होता. त्यांच्या विरोधात लढणारा एक उमेदवार त्यांना मिळाला.
यात राष्ट्रवादीचं कर्तृत्व नाही...

विकि's picture

17 May 2009 - 12:50 am | विकि

शिवसेनेने मनसे ला अधिक गांभिर्याने न घेतल्याने त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेचा जरा जास्तच अनुल्लेख केला.

विकि's picture

17 May 2009 - 12:59 am | विकि

कितीजण पक्के मुंबईकर आहेत जे कधीही मुंबई सोडून अन्य देशात ,राज्यात गेलेले नाहीत. कारण ज्यांना मुंबई सोडाविशी वाटली त्यांना मराठी मुंबईबद्दल लिहायचा अधिकारच नाही.

प्रदीप's picture

17 May 2009 - 8:58 am | प्रदीप

विकीसाहेब,

आता कम्युनिस्टांची ढाल तुटली, फुटली म्हणून हे नवे खूळ काढलेत काय?

विकि's picture

17 May 2009 - 8:06 pm | विकि

मी जे बोललो ते सत्यच आहे.तुम्ही अधिक विचार केल्यास तुम्हालाही पटेल. कारण तिथे परदेशात राहणारे जेव्हा इथे मराठीची बाजू मांडतात तेव्हा ते तिथे परप्रांतियच असतात ना.

क्लिंटन's picture

18 May 2009 - 3:45 pm | क्लिंटन

कितीजण पक्के मुंबईकर आहेत जे कधीही मुंबई सोडून अन्य देशात ,राज्यात गेलेले नाहीत. कारण ज्यांना मुंबई सोडाविशी वाटली त्यांना मराठी मुंबईबद्दल लिहायचा अधिकारच नाही.

मग त्याच न्यायाने काश्मीरबाबत बोलायचा अधिकार केवळ काश्मीरात रहात असलेल्यांनाच का?मी काश्मीरमध्ये अजूनपर्यंत एकदाही गेलेलो नाही पण ते भारताचेच आहे आणि असावे हे मला कळकळीने वाटते. आणि त्यात चूक काय आहे ते कृपया स्पष्ट करावे.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

विकास's picture

17 May 2009 - 7:46 pm | विकास

बाकी बरेच वर चर्चिले गेले आहे. त्यातील फुटीविरुद्धच्या मतांशी सहमत...

एक बातमी आत्ताच पाहीली. त्यातील सुरवातीचा भागः

'तुम अपुन को इतना मारा, लेकीन अपुन ने तुमको सिर्फ दोही मारा, पर क्या सॉलिड मारा' हा 'अमर अकबर अॅन्थनी' या चित्रपटातील डायलाग बोलून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला दिलेल्या दणक्याचे मार्मिक शब्दांत वर्णन केले. शिवाय, मराठी मतांमध्ये फूट पडली नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी भरभरून मते दिली, असा दावा राज यांनी केला. (संदर्भ: म.टा.)

हे असले उद्गार राजच्या (किंवा कुणाच्याही) राजकारण्याच्या तोंडून ऐकणे पोरकटपणाचे वाटते. त्यात अजून एक गंमतः ज्या अमिताभला आणि हिंदीला शिव्या दिल्या त्याचाच उपयोग स्वतःच्या भावना व्यक्त करायला करणे हे बाकी कसेही असोत "पॉलीटीकली करेक्ट" वाटत नाही. नशिबाने आपली जनता दहशतवादी हल्ले लक्षात ठेवत नाही तर असली फुटकळ वाक्य/कोट्यांचा वापर आणि चुका थोड्याच लक्षात ठेवणार आहेत! :-)

जृंभणश्वान's picture

18 May 2009 - 1:09 am | जृंभणश्वान

वैचारीक चर्चा झेपत नाहीत. पण

हे असले उद्गार राजच्या (किंवा कुणाच्याही) राजकारण्याच्या तोंडून ऐकणे पोरकटपणाचे वाटते. त्यात अजून एक गंमतः ज्या अमिताभला आणि हिंदीला शिव्या दिल्या त्याचाच उपयोग स्वतःच्या भावना व्यक्त करायला करणे हे बाकी कसेही असोत "पॉलीटीकली करेक्ट" वाटत नाही"

हाच मूळ मुद्दा आहे.
(५ मिनिटांसाठी मनसेचा कार्यकर्ता समजा मला :) )
हिंदीद्वेषी नाही आहोत आम्ही. आम्ही मराठी बोलता बोलता जेवढ्या सहजतेने हिंदी भाषा वापरतो, तेवढ्याच सहजतेने कधीतरी मराठी येउदे परप्रांतीयांच्या तोंडून. [जसे अनवधानाने, हम युपी के है... निघुन जाते तसे.]

राजने मुद्दामून केले का चुकुन झाले माहित नाही पण मराठीचा उदो उदो करणारा सहज हिंदी बोलून जातो यावरुन मनसे फुटीरतावादी वगैरे नाहीये हे ४ लोकांच्या लक्षात आले तरी चिक्कार.

नितिन थत्ते's picture

17 May 2009 - 11:06 pm | नितिन थत्ते

राज ठाकरे तर म्हणतात शिवसेनेने त्यांची मते खाल्ली. :)

खराटा
(रंग माझा वेगळा)

असं दिसतं आहे.
कदाचित हाच त्यांचा मास्टर प्लॅनही असू शकेल.

एकाने (शिवसेना) हिंदूत्त्वाचा मुद्दा फॉलो करायचा आणि एकाब ब्रँच (मनसे) ने मराठीचा मुद्दा हाताळायचा.
निवडणूका झाल्या कि एकत्र (दिलजमाई? काका-पुतण्या? कला का भुला शाम को घर.. टाईप) यायचं

:?

असं झालं तर चांगलच आहे.

चिरोटा's picture

18 May 2009 - 9:36 am | चिरोटा

मनसे आणि शिवसेना एकत्र आले तर तो राज ठाकरे ह्यांचा वैचारिक पराभव असेल्.शरद पवारांची आज जशी अवस्था आहे तशी होईल्.बरोबर दहा वर्षांपुर्वी पवारानी परदेशी मुद्दा उचलुन राष्ट्रवादी स्थापन केली होतीं. नंतर 'ग्रेट मराठा' अपरिपक्व'परदेशी' सोनियांपुढे कितीवेळा नतमस्तक झाला ते आपण पाहिलेच. रा़ज ठाकरे असे होवू देणार नाहीत असे वाटते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

विशाल कुलकर्णी's picture

18 May 2009 - 11:01 am | विशाल कुलकर्णी

<<सेनेने भले काही केल नसेल मराठी माणसासाठी पण म्हणुन मराठीची ओरड करत मराठी माणसाचा पर्यायाने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा अधिकार मनसेला कुणी दिला?>>>

गंमत आहे नाही. प्रश्न असा आहे की खंजीर कुणी कुणाच्या पाठीत खुपसला. इथे राजना किंवा मनसेला दोष देण्यापेक्षा जरा आत्मपरिक्षण करणे योग्य नाही का ठरणार? शिवसेनेची किंवा भाजपाची मते मनसेने खाल्ली आणि युती झोपली व त्यामुळे मराठीयांचे नुकसान झाले असे म्हणताना मग या मराठी माणसांनी सरसकट राजजींच्या मनसेलाच मते का नाही दिली. मुळात खुप कमी प्रमाणात मतदान झाले, ज्यांनी केले ते अस्थानी केले.
तेव्हा खंजीर खुपसण्याचा आरोप जर मनसेवर किंवा राजवर होत असेल तर असे मतदान करणारी मराठी जनतादेखील तेवढीच दोषी आहे. उगीचच फक्त राजकारण्यांवरच आगपाखड करण्यात काय अर्थ आहे?

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

विजुभाऊ's picture

18 May 2009 - 2:46 pm | विजुभाऊ

या विषयावरची पुढे कुठेच न नेणारी चर्चा आता थांबवण्यात यावी ही विनन्ती.

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

"मनसे'चा पराभवात विजय जरी झाला असला तरी..
कोणाच्या पराभवात विजय मानणे हे सुरवातीची व्यूहरचना म्हणून ठीक असले तरी ते "नवनिर्माण' करू शकत नाही. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने एक राजकीय पर्याय निर्माण करून तो स्थिर करायचा असेल तर पक्षबांधणीसाठी राज ठाकरे यांना प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी पक्षात दुसरी फळी भक्कमरीत्या उभी करावी लागेल. राज ठाकरे यांच्या प्रचाराचा सारा रोख प्रस्थापित पक्षांच्या विरोधात होता; परंतु त्यांच्या राजकारणामुळे सत्ताधारी आघाडीलाच फायदा झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे केवळ पाडापाडी करणारा पक्ष अशी प्रतिमा निर्माण होऊ न देता एक सक्षम पर्याय म्हणून मनसे कसा उभा राहणार, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. पुणे-मुंबई-नाशिकच्या बाहेरही महाराष्ट्र आहे. तेथे रुजल्याशिवाय असा पर्याय निर्माण करता येत नाही. हे लक्षात घेतले नाही तर पराभवातील विजयाप्रमाणे भविष्यात विजयातील पराभवाची चवही मनसेला कदाचित चाखावी लागेल.

इनोबा म्हणे's picture

18 May 2009 - 7:46 pm | इनोबा म्हणे

'मटा'वर वाचून झाले आहे. कशाला कॉपी-पेस्ट करुन जागा वाया घालवताय.

सुनील's picture

18 May 2009 - 9:55 pm | सुनील

काही व्याख्या व गृहितके आणि किंचित आकडेमोड......

व्याख्या
१) मराठी - ज्याची मातृभाषा मराठी आहे तो.
२) मुंबईकर - ज्याचा जन्म आणि बहुतांश काळ मुंबईत गेला आहे तो

गृहितके
१) मनसेच्या उमेदवारला मिळालेली सगळी मते, जर मनसे रिंगणात नसती तर, सेना-भाजप उमेदवारला मिळाली असती.
२) अबु आझमीला मिळालेली सगळी मते, जर तो उभा नसता तर, काँग्रेस उमेदवारला (गुरुदास कामत) यांना मिळाली असती.

वरील दोन्ही गृहितके खरी मानली तर काय परिस्थिती असती?

निवडून आलेले उमेदवार हे असते - ६ पैकी ३ मराठी.
राम नाईक (मराठी)
गुरुदास कामत
किरिट सोमैय्या
प्रिया दत्त
एकनाथ गायकवाड (मराठी)
मोहन रावळे (मराठी)

आणि सध्याचे परिस्थिती अशी आहे - ६ पैकी २ मराठी.
संजय निरुपम
गुरुदास कामत
संजय पाटील (मराठी)
प्रिया दत्त
एकनाथ गायकवाड (मराठी)
मिलिंद देवरा

म्हणजे फक्त एक मराठी उमेदवार कमी!

जाता जाता - मुंबईबाहेरचा मराठी आणि पक्का मुंबईकर अमराठी यांतून काय निवडावे बरे? उमेदवाराचे चारित्र्य / काम तसेच त्याच्या पक्षाची ध्येयधोरणे समान असतील तर, स्थानिक उमेदवार हाच योग्य पर्याय ठरू नये काय?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

काजुकतली's picture

19 May 2009 - 3:55 pm | काजुकतली

आज मनसे कडे तरुण वर्ग जो आकर्षित झाला आहे तो १४-२० वया दरम्यानच्या तरुण तरुणीचा आहे .

हे अगदी १००% खरे आहे. माझी १४ वर्षांची मुलगी राजसमर्थक आहे. तिच्या शाळेत, ज्यांचे आईवडील मनसे सोडुन इतर पक्षांचे नेते आहेत, त्या मुली सोडून बाकी सगळ्या राजसमर्थक आहेत. आणि माझ्या मुलीच्या मते, त्या मुलीही फार काळ आईवडीलांच्या पक्षांचे समर्थन करणार नाहीत. बाकीच्या मुली लवकरच त्यांना राजसमर्थक बनवतिल. :)

साधना

गोगट्यांचा समीर's picture

19 May 2009 - 7:38 pm | गोगट्यांचा समीर

काही असो .. मनसे ने शिवसेनेच्या जागा घेतल्यान हे काही चांगलं नाही...
कारण , मधे एकदा मिलिंद देवरा म्हणाले होते की मुंबई जर का राज्य झाल तर चांगल होईल.. तेव्हा ही भूमिका घेणारा पक्ष मुंबईतुन निवडून आला हे काही चांगल नाही.

आता झालं ते झालं ..
पूढ्च्या वेळी माझ्या मते ...एका पक्षाला मतदान होईल... या वेळचे निकाल नक्कीच मतदाराला आवडले नाही आहेत...
आणि निवडणूकीत हे बरेचदा आपोआप बदलतं .कारण आपण मतदान करतो तेव्हा तो माणूस निवडून यावा यासाठी करतो ..
दूसरा पडावा म्हणून नाही , किमान दोन वेळा असं होणार नाही..

चामट्या's picture

22 May 2009 - 1:43 pm | चामट्या

साला जर एव्हडीच उध्दवमधे धमक असती तर २००४ च्या निवडनुकित त्यांचा एकच खासदार निवडुन नसता आला
आता तर तो पण पडला मुंबई महराष्ट्रापासुन तोडायचा डाव आहे असे ओरडुन ओरडुन्च सेनेने किती तरी वेळा
मुंबई महानगर्पालीकेत सत्ता घेतली आहे त्याच काय अजुन तरी मंबई महाराष्ट्रातच आहे ना आणी पालिकेत ह्यांनी कोनाच भल केल आहे स्वताच आणी स्वताच्या कंत्राटदारांच त्याच काय ?