हा चित्रपट कोणता???

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in काथ्याकूट
16 May 2009 - 3:38 pm
गाभा: 

केबलवर एक मराठी चित्रपट लागलाय..
साधारण कथा अशी चललीयः
कालिंदी, तिचा नवरा- त्याला सगळेजण बेंब्या म्हणताहेत-, नि तिचा भाऊ- अंमली पदार्थाच्या आहारी गेलाय..हे एका घरात राहताहेत. या जोडप्याला मूल नाहीये.. त्यांच्या घरात विदूषकांची फौज आलीये अचानक... देवही आलाय.. मूळचं नास्तिक घर-- आता तिथे देवाचा फोटो पण लागलाय..

कालिंदी देवाचं चांगलं आदरातिथ्य करते.. वर त्याला तिच्याशी संग करून तिचा प्रियकर हो.. नि त्या दोघांचं बाळ म्हणून त्यालाच ये म्हणतेय... देव याला तयार होत नाही... मात्र तो स्वतःचा अंश दुसर्‍या कुणाकरवी पाठवून शास्त्रोक्त पध्द्तीने कृत्रिम गर्भधारणा करवतो... बाळंतपणात ती वारते... तिचा भाऊ बाळ त्याचं आहे म्हणून तिच्या नवर्‍याला सांगतो..

जाम विचित्र प्रकार चाललाय.. सगळे खूप वैचारीक संवाद बोलताहेत.. एकही चेहरा ओळखीचा नाही.. खाली भाषांतर येतंय.. नि आश्चर्य म्हणजे नेहेमीसारखं शब्दशः न येता खूप चांगलं इंग्रजी भाषांतर आहे..
हो.. आताच मुख्य विदूषक विना रंगरंगोटी सामोरा आला..त्याचं नांव माहीत नाही .. पण तो नेहेमी पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत असतो.. फोटो मिळाला तर डकवते त्याचा..

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

16 May 2009 - 3:39 pm | पर्नल नेने मराठे

:-?
चुचु

अनंता's picture

16 May 2009 - 3:44 pm | अनंता

+१ सहमत ;)

वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

लिखाळ's picture

16 May 2009 - 3:48 pm | लिखाळ
परिकथेतील राजकुमार's picture

16 May 2009 - 3:52 pm | परिकथेतील राजकुमार

बहुमताने लिखाळ काकांशी सहमत.

सौमित्र रानडेचा चित्रपट.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मस्त कलंदर's picture

16 May 2009 - 3:54 pm | मस्त कलंदर

सही.. तुम्ही पाहिला आहे ??
हो.. सापत्नेकर नावाचं पात्र आहे खरं!! नि देव त्याच्या मार्फतच आपला अंश कालिंदिला देतो.... कधी ऐकला-पाहिला नव्हता हा शिणूमा..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

परिकथेतील राजकुमार's picture

16 May 2009 - 3:57 pm | परिकथेतील राजकुमार

पुर्ण नाही पाहिला पण एका मित्राकडे सीडीवर होता, त्याच्या घरी गेलो असताना पहिली १०/१५ मिनिटे पाहण्याचा (दुर्भाग्य) योग आला.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मस्त कलंदर's picture

16 May 2009 - 4:05 pm | मस्त कलंदर

केवळ उत्सुकतेपोटी.. नि अर्धाच तासाच भाग शिल्ल्क होता म्हणून... नाहीतर बघण्याची हिंमत नव्हती... असाच अनुभव लिमिटेड माणूसकीला आला.. त्यांना शेवटपर्यंत काय म्हणायचंय तेच कळालं नाही..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मस्त कलंदर's picture

16 May 2009 - 3:56 pm | मस्त कलंदर

http://www.rudraa.com/main/Marathi_Sapatnekarache_Mool.htm

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

लिखाळ's picture

16 May 2009 - 4:15 pm | लिखाळ

मी माझ्या प्रतिसादात हाच दुवा दिला आहे.
राजश्री.कॉम वर चित्रपट आहे. तेथे पाहता येईल. मी तिथेच पाहण्याचा प्रयत्न केला. पण नंतर झोप लागली बहुधा ;)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!!!

परिकथेतील राजकुमार's picture

16 May 2009 - 4:22 pm | परिकथेतील राजकुमार

=D> =D> =D> =D>

लिमिटेड माणुसकी मला तरी आवडला. एक वेगळ्या प्रकारची अगदी हटके अशी स्टोरी आहे. रजत कपुरचे मराठी थोडे खटकते पण रवींद्र मंकणी बघण्यासारखाच.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य