राज्य नाट्य स्पर्धा आणि पारदर्शकता

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
18 Mar 2025 - 12:26 pm
गाभा: 

राज्य नाट्य स्पर्धेच्या परिक्षकांचा परिचय का करून दिला जात नाही? परिक्षक कोण असणार आहेत हे कळवले जात नाही.
परिक्षकांचा नाट्यविषयक अनुभव आणि त्यांचे योगदान या बद्दल स्पर्धक संघाना काहीच माहीत नसते.
स्पर्धेचे निकाल काय निकषांवर लावणार आहेत हे ही माहीत नसते.
तसेच नाटक संपल्यावर कलाकारांना परिक्षकानी काही मार्गदर्शन , संवाद करावे ही देखील अपेक्षा असते.
कलाकार सोडा पण दिग्दर्शक आणि लेखक यांच्याशीही परिक्षकांचा संवाद होत नाही.
परिक्षकांबद्दल इतके गौप्य कशासाठी राखले जाते.
निकाल दिला गेल्यावर स्पर्धक संघाना त्यानी केलेल्या सादरीकरणात चांगले काय अथवा सुधारणा काय हव्या याची परिक्षकानी माहीती द्यावी.
तरच स्पर्धा पारदर्शक होऊ शकेल.
साध्या एकांकीका स्पर्धेतही परिक्षक स्पर्धक संघांशी बोलतात.कमी अधीक काय झालेया बद्दल सांगतात
पण या वेळी मार्गदर्शन सोडा परिक्षक लेखक दिग्दरशकांशी बोललेही नाहीत.
या बाबत कोणाकडे विचारणा, मागणी करावी हे समजत नाहिय्ये.
हा सगळ्या स्पर्धकांचा मूलभूत हक्क आहे.

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

20 Mar 2025 - 12:46 pm | चौथा कोनाडा

रास्त अपेक्षा.

वेळे अभावी होत नसावे ?

अश्या किरकोळ (?) बाबींसाठी लक्ष द्यायला वेळ आणि बजेट नसावे बहुधा, सांस्कृतिक खात्या कडे, संबधीत मंत्र्यांकडे, अन कर्मचार्‍यांकडे !
संघटन करून जोरदार मागणी करुन पाठपुरावा केल्या शिवाय अश्या किरकोळ (?) गोष्टी मान्य होतील असं वाटत नाही !