तर वाचकहो, सदर लेखाचा लेखक (अस्मादिक ) ह्यांना जास्त सिरिअसली घेऊ नका ..
तुम्हाला वाटलं त्यांच्या (अस्मादिकांच्या) डोक्यावर काही परिणाम झालेला आहे तर तुम्ही या जगात एकटे नाही,
आणि अस्मादिकांच्या पण स्वतः बद्दल त्याच भावना आहेत,
त्यामुळे आम्हीच स्वतःला कधीच सिरिअसली घेत नाही.
सदर लेख केवळ मनोरंजन म्हणूनच वाचावा, कसलेही गर्भित अर्थ घेऊ नये.
तर आज मला स्वप्न पडले .. स्वप्नात साक्षात शंकर महादेव प्रकटले ... (बॉलीवूड गायक नव्हे ) तर ( ओ. जी. "दम मारो दम" कुल गाय ... यु नो .. लदाख स्फिती वॅली वैगरे ज्यांच्यासाठी तळपाय लेवल .. सियाचीन, एव्हरेस्ट अँड अबोव वर ते नेहमी ट्रेक करत असतात ते ... विदाऊट फोर व्हील ड्राइव्ह.. )
ते म्हणाले "बोल भिडू".. "कैसा है तू ? काय चल रहेला हैं तेरे लाइफ में आज कल ?"
(हो तो, माझ्याशी जॅकी श्रॉफ स्टाईलनेच बोलतो .. ओ के !!!.. सो शट अप .. .. कीप काम अँड रीड ऑन .. )
"तो बॉस, बोले तो ... लाईफ़में एक ५० सरवाले एक नाग ने बहुत मचमच मॅचआयएलाय ..
(हो मी सुद्धा शंकराशी बंबैय्या स्टाईलनेच बोलतो .. ओ के !!!.. सो शट अप अगेन .. ..)
ओजी : देख भिडु, मेरा बच्चा हैं तु ..
क्या कर्नेका मालूम क्या .. ऐसा भिंडी प्याज लेनेका , ऐसा उस्को चौकांडी काटने का ... ऐसा तवे के उपर फैलानिका ...
मी : ह्यॅ ? ह्यॅ ???
ह्या दोन वेळच्या "ह्यॅ ? ह्यॅ ?" नंतर ओजी ने माझ्या साईडला असलेल्या, त्याच्या कानातून, दुसराही ब्लूटूथ इन-इअर फोन बाहेर काढला ..
माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं ...
मी : लाईफ़में एक ५० सरवाले एक नाग ने बहुत मचमच मॅचआयएलाय .. आणि असं बर्फामध्ये काडीने त्याला चित्र काढून दाखवले , कि कसं कसं वेडंवाकडं तो सरपटतोय ..
ओजी : देख भिडू इधर मैं तेरेकु कुछ नही बतायेंगा ... अपने आप पे होसला रख और तू हि आगे चार्ट बना के अपनेआपको दिखा ... कि तेरेकु खुदकोच कैसा लागता है ये आगे चलेगा ... अपने पैरोपे खुद खडा रेहनेका भिडू ...
मी मग, मला काय वाटतंय ते, बर्फात काडीने काढलं चित्र .. कि हा नाग नक्की कसा चालेल ...
खाली बर्फात चित्र गिरवत असताना वरून आवाज आला ..
ओ जी : जातेजाते मेरी बात सुननेका भिडू ... तेरा इधर खेलके हुआ ना तो , यहांसे ऐसा सिध्दा मौसी के गाव में जाणे का, उधर जाके आंगनमे , एक झाड़ लगानेका .. समजा क्या भिडू ... उपकार नै कर रहेला तु झाड लगाके...
मी मान वर करून डोळे उघडून पाहिलं तर , सकाळच्या उजेडात बेडरूमचा सिलिंग फॅन दिसत होता....
प्रतिक्रिया
17 Mar 2025 - 11:27 am | आंद्रे वडापाव
युयुत्स्तु
पुढील ५ वर्षे मार्केट , (२०५०० ते २५५००) या रेंज मध्येच आट्या पाट्या खो खो खेळेल ...
(आय अँम कंकरिंग विथ शंकर शर्मा )
According to Sharma, the benchmark Nifty 50 index is set to offer zero returns from the September 2024 highs over the next four to five years.