गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला.
जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या.
जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले.
https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump...
https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump...
चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-p...
प्रतिक्रिया
10 Mar 2025 - 9:11 pm | अमरेंद्र बाहुबली
अग माई! अमेरिका सारख्या देशांना उत्तर द्यायला देशप्रेम असावे लागते, भाजपेयी देशप्रेमी नाहीत. त्यांच्या आडात देशप्रेम नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?
10 Mar 2025 - 9:22 pm | श्रीगुरुजी
उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी या उतारवयात माईची अवस्था झालीये. काळजी घे गं माईडे
10 Mar 2025 - 9:24 pm | रात्रीचे चांदणे
कुलभूषण जाधवांना पकडून देणाऱ्या ISI एजंटांचा अज्ञाताने गोळ्या घालून पाकिस्तानात खात्मा केला तरी संरक्षण मंत्री, पंतप्रधान यांचं एक स्टेटमेंट नाही. देशप्रेमी असले असते तर काहीतरी बोलले असते.
10 Mar 2025 - 9:28 pm | श्रीगुरुजी
अज्ञाताने!
सूज्ञ मुत्सद्दी न बोलता कृती करतात.
10 Mar 2025 - 10:27 pm | अमरेंद्र बाहुबली
जशी कॅनडात केली नी नंतर तोंडावर पडले तशी का?
#गावठीchankya!
11 Mar 2025 - 12:06 am | सुक्या
माझ्या माहीतीप्रमाणे ह्यात कॅनडा तोंडावर पडले नाही तर थोबाड फोडुन घेतले आहे. ३ वर्षे झाली तरी अजुन त्यांची गाडी क्रेडीबल अलीगेशन च्या पुढे सरकली नाहेये.
जरा माहीती घ्या. उगा आपले नेहेमीचे डायलॉग मारु नका.
11 Mar 2025 - 8:13 am | श्रीगुरुजी
खूपच जास्त अपेक्षा. या माणसाची समज ती किती, अभ्यास तो किती, माहिती ती किती.
निज्जर हत्येसंदर्भात भारताचा हात असल्याचा कोणताही पुरावा नाही असे ट्रुडोनेच ३ महिन्यांपूर्वी मान्य केले होते.
पण हे समजण्यासाठी वाचन करावे लागते आणि थोडी तरी समज असावी लागते. या माणसाच्या बाबतीत तर सगळाच आनंद.
अर्थात त्यात नवल नाही. चिवशेणासारख्या घाणीचा समर्थक असण्यासाठी मेंदू घोट्यात असणे सक्तीचे आहे.
11 Mar 2025 - 8:16 am | अमरेंद्र बाहुबली
नक्की का? अटक झालेल्यांसंदर्भात काय? खटले दाखल झाले त्याचे काय? बऱ्याच गोष्टी आहेत, पण एकदा का आपण खोट बोलणाऱ्या नेत्याचे समर्थक झालो की सगळी तथ्ये सहज दुर्लक्षित करता येतात नाही?
11 Mar 2025 - 9:02 am | श्रीगुरुजी
स्वत:चं अजून किती हसू करून घ्यायची इच्छा आहे?
11 Mar 2025 - 10:20 am | सुक्या
भाउबली सायेब,
जरा ऐकता का? मी जिथे राहतो तिथुन वान्कुवर २ तासावर आहे. २ महिन्यातुन एकदा तरी मी तिथे जेवण करायला जातो. इतकेच काय ज्या दिवशी निज्जर निजधामास गेला त्या दिवशी मी सरे ह्या गावातच होतो (खादाडी करायला). माझे अनेक मित्र कॅनेडीयन सिटीझन आहेत. तेव्हा मला ह्या प्रकरणाची तुमच्यापेक्षा जरा जास्तच माहीती आहे. उगा आपले व्हाट्सअॅप छापील प्रश्न विचारु नका.
11 Mar 2025 - 12:29 pm | श्रीगुरुजी
मूर्ख आहे तो. कधी अक्कल येणार देव जाणे.
11 Mar 2025 - 2:42 pm | सुक्या
खरे आहे तुमचे. मुर्खांना ते मुर्ख आहेत हे माहीतच नसते.
12 Mar 2025 - 7:16 pm | सुबोध खरे
कुठे त्या भुजबळां च्या नादाला लागतांय?
हातात कळफलक आहे म्हणून बडवायचा
11 Mar 2025 - 12:54 pm | अमरेंद्र बाहुबली
सर्वज्ञानी लोकांनी ट्रुडो नेमके काय बोलला ते सांगावे,
भारताविरुद्ध पुरावेच नाहीत की
पुरेसे पुरावे नाहीत?
गावठी चाणक्य नी त्याच्या आकाच्या अंधभक्तीत वस्तुस्थिती काय तेही पाहावे! खर तर असे मर्डर करायला जी सफाई लागते ती दाखवता आलेली नाही! निझरची हत्या झाल्या झाल्या लगेच आरोप भारतावर लागले, गावठी चाणक्य तेव्हाच उघडा पडला! नंतर राजनैतिक पातळीवर ट्रुडोला मॅनेज केले असावे वगैरे पण भारताची जी जायची ती गेलीच! आणी अटक झालेल्यांवर अजूनही चौकशी सुरुय! पुढे मागे (आले तर) सत्य बाहेर येईल, पण ह्यात भारतावर थेट शिंतोडे उडणे जगात नाचक्की होण्यास कारणीभूत आहे.
असो! देशभक्त बना अंधभक्त नको इतकेच म्हणेन!
11 Mar 2025 - 1:10 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
https://www.youtube.com/watch?v=pCVq0KfkDDU
त्यांचे पोलिस कमीशनर थेट सांगतात की भारतिय अधिकार्यांविरुद्ध पुरावे मिळाले, ते त्यांनी भारत सरकारला पाठवले. ते त्यांच्या वेबसाईटवर देखील हेच लिहितात. अशी ही बदनामी दुसर्या देशाने खपवुन घेतली असती का? "माफी मागा" असे जाहीररीत्या सांगायला हवे भारताने. आता कॅनडाचे गुप्तचर प्रमुख एका परिषदेसाठी दिल्लित येत आहेत. संबंध पुर्ववत होत असतील तर भारताने त्यांना कमीशनरांचे हे वक्तव्य/वेबसाईट वरील बदनामी थांबवा अशी ताकीद दिली पाहिजे.
11 Mar 2025 - 1:16 pm | अमरेंद्र बाहुबली
माई हे तुला मला माहीत! पण अंधभक्त त्यांचा गावठी चाणक्य आणी अडाणी आका ह्यांच्या समर्थनात सगळ्यानाच मूर्ख ठरवू लागतात त्याला काय करणार?
अंधभक्तीला काहीही सीमा नसते!
11 Mar 2025 - 2:40 pm | सुक्या
नंतर राजनैतिक पातळीवर ट्रुडोला मॅनेज केले असावे
आपली कल्पनाशक्ती आचाट आहे. माझी बोलती बंद केलीत तुम्ही ...
(हे परमेश्वरा काय काय वाचावे लागते आहे.)
11 Mar 2025 - 2:57 pm | श्रीगुरुजी
कपाळावर हात मारून घ्यावा लागतोय.
12 Mar 2025 - 7:17 pm | सुबोध खरे
कुठे त्या भुजबळां च्या नादाला लागतांय?
हातात कळफलक आहे म्हणून बडवायचा
13 Mar 2025 - 8:56 am | श्रीगुरुजी
निझरची हत्या झाल्या झाल्या लगेच आरोप भारतावर लागले, गावठी चाणक्य तेव्हाच उघडा पडला! नंतर राजनैतिक पातळीवर ट्रुडोला मॅनेज केले असावे वगैरे पण भारताची जी जायची ती गेलीच! आणी अटक झालेल्यांवर अजूनही चौकशी सुरुय! पुढे मागे (आले तर) सत्य बाहेर येईल, पण ह्यात भारतावर थेट शिंतोडे उडणे जगात नाचक्की होण्यास कारणीभूत आहे
आगगाडीचे अपहरण झाल्या झाल्या लगेच आरोप भारतावर लागले, गावठी चाणक्य तेव्हाच उघडा पडला! भारताची जी जायची ती गेलीच! ह्यात भारतावर थेट शिंतोडे उडणे जगात नाचक्की होण्यास कारणीभूत आहे.
15 Mar 2025 - 7:08 pm | विवेकपटाईत
एका मानसच्या द्वेषपाई लोक बुद्धी गहाण का ठेवतात. कॅनडाची जगात हंसी झाली आहे. बाकी आपले पंत प्रधान जे बोलतात ते करून दाखवितात. दहा वर्षांत भारतात भूतो न भविष्यती विकास झाला आहे. हे जगाला दिसत आहे.
15 Mar 2025 - 9:09 pm | अमरेंद्र बाहुबली
खिक्क! एखाद्याची sarcasm द्वारे इतकीही खिल्ली उडवू नये!
19 Mar 2025 - 10:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=)) हसुन हसुन पुरेवाट झाली.
चालू ठेवा करमणूक.
-दिलीप बिरुटे
10 Mar 2025 - 11:30 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"तरी संरक्षण मंत्री, पंतप्रधान यांचं एक स्टेटमेंट नाही"
मारले ही चांगले झाले पण "आम्ही पाकिस्तानच्या एका नागरिकाला मारले" असे विधान करणे मूर्खपणाचे झाले असते. आठवणी प्रमाणे कुलभुषणच्या विरोधात कथित पुरावे सापडले होते. तेथील न्यायालयाने ते तपासले होते. ही केस आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालु होती/आहे.
11 Mar 2025 - 12:05 am | श्रीगुरुजी
माईडीत सुधारणा दिसते. किती दिवस टिकेल कल्पना नाही.
11 Mar 2025 - 12:53 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"३ वर्षे झाली तरी अजुन त्यांची गाडी क्रेडीबल अलीगेशन च्या पुढे सरकली नाहेये."
कॅनडाच्या संसदीय कमीटी मधील नोट्स मधुन-
Indian Government Agents’ Involvement in Violent Criminal Activity in Canada
On October 14, the RCMP took the unprecedented step of publicly disclosing the threat posed by Government of India actions that have come to light through various law enforcement operations, including ongoing RCMP investigations.
https://www.publicsafety.gc.ca/cnt/trnsprnc/brfng-mtrls/prlmntry-bndrs/2...
इकडे पोलिस कमीशनर काय म्हणतात पहा-
https://www.youtube.com/watch?v=pCVq0KfkDDU
म्हणजे ते त्यांच्या साईटवर भारतावर आरोप करतात,पुरावे आहेत म्हणुन सांगतात, मुलाखतीतही तेच सांगतात.
This evidence was presented directly to Government of India officials, along with a request for their cooperation in stemming the violence and that our law enforcement agencies work together to address these issues.
कॅनडाचे अधिकारी थेट बोलत आहेत इकडे. हे खोटे असेल तर भारताने "माफी मागा" असे नको का सांगायला? कारण असे देशाचे नाव घेणे म्हणजे भारताची बदनामी आहे.
11 Mar 2025 - 1:19 pm | श्रीगुरुजी
माईडे,
देशाचा पंतप्रधान प्रगट सांगतोय की निज्जरच्या हत्येत भारताचा हात नाही आणि तू पोलीस कमिशनर घेऊन बसलीस.
म्हणजे पोलिस हवालदार सांगतोय अमुक एकाने चोरी केली आणि पोलीस आयुक्त न्यायालयात सांगतोय त्याने चोरी केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.
11 Mar 2025 - 1:47 pm | श्रीगुरुजी
माईडे,
निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत हे ट्रुडोने सांगितल्यानंतर कॅनडाचे पोलीस आयुक्त, अधिकारी इ. जे म्हणतात त्यास शष्प महत्त्व नाही.
अबाच्या संगतीने तुझी अवस्था ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला . . . अशी झाली आहे.
11 Mar 2025 - 3:23 pm | सुक्या
माईसाहेब,
विषय आहे तो निज्जर हत्या झाली ती भारतीय एजंट्ने केली व त्या हत्येत भारतीय अधिकारी सामील आहेत हा. तुम्ही दिलेला पब्लीक सेफ्टी दुवा हा त्यांच्या पार्लमेंटरी कमीटी च्या नोट्स आहेत. त्याला शष्प महत्व नाही. ट्रुडो तर पार्लमेंट मधे बोलला होता ही ह्यात भारताचा हात आहे. बाकी जर कॅनडा कडे किंवा फाईव आईज कडे जर सज्जड पुरावे असते तर आतापर्यंत ट्रुडो ने थयथयाट केला असता. उगा आपल्या पंतप्रधान पदाचा बळी दिला नसता.
ट्रुडो चा सारा डोलारा जगमित सिन्ग च्या आधारावर होता. निज्जर प्रकरणात काही हाती न लागल्यामुळे जगमित ने पण त्याला डच्चु दिला. फाईव आइज पण आता तेरी भी चुप मेरी भी चुप आहेत.
असो. अमेरीका/कॅनडा/ब्रिटन वगेरे वगेरे देश काहीही बोलले की ते खरे(च) आहे असे समजणारा वर्ग अजुनही आहे. व्हाईट सुप्रीमसी / गुलामगिरी चे जोखड ईतक्यात फेकणे अशक्य आहे. बरीच व्रुत्तपत्रे/लोक ही मानसिकता नेहेमी दाखवत असतात. कॅनडाचे अधिकारी जे बोलत आहेत ते खरे आहे व भारतीय अधिकारी जे बोलत आहेत ते खोटे आहे हे तुमचे ग्रुहीतक आहे. त्याला तुम्हीच तोडु शकता. ईतर फक्त प्रयत्न करु शकतात. त्यामुळे त्यावर मी काही बोलणार नाही. परराष्ट्र व्यवहारामध्ये मुसद्देगिरी नावाचा प्रकार असतो, तुमचे चुकले माफी मागा/ कट्टी फु किंवा तु तो मेरा यार है तेरेलिये सब हाजिर है वगेरे भाषण बाजी चालत नाही हे तुम्हाला माहीत आहे.
बाकी निज्जर हत्या व नंतर चे झालेले सोहळे याचा आता चावुन चावुन चोथा झाला आहे. त्यामुळे हा शेवटचा प्रतीसाद. तरीही गंमत म्हणुन खालीस्तानी किड्यांचे सिटीझन्स कोर्ट / खालीस्तानी रेफरंडम असल्ये माकड्चाळे बघायला जाईनच. त्यांच्या डोळ्यात बघुन छद्मीपणे हसण्यात कोण आनंद मिळतो.
11 Mar 2025 - 4:27 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
कॅनडाचे अधिकारी जे बोलत आहेत ते खरे आहे व भारतीय अधिकारी जे बोलत आहेत ते खोटे आहे हे तुमचे ग्रुहीतक आहे
असे कोणी म्हणत नाही. जे समोर दिसते त्यावरुन अनुमान काढावे लागते. ते आर सी एम पी चे कमीशनर चॅनेलवर येउन सरळ "भारत सरकार विरोधात पुरावे आहेत" असे म्हणतात. "भारत सरकारला पुरावे सादर केले आहेत" असेही म्हणतात. त्यांच्या वेबसाईटवरही तसे लिहिले जाते.
आता एवढे झाल्यावर भारत सरकारकडुन अपेक्षा काय असते? पुरावे नसतील तर भारतिय दूतावासाने त्या कमीशनरला सांगणे की "तू पुरावे दिले नाहीस. तू भारत सरकारची माफी माग नाहीतर बदनामीचा खटला दाखल करू" बरोबर ना? भारतिय दूतावासाकडुन तशी कृती झाली का ? "ट्रुडो बोलला आणि विषय संपला" ही पळवाट नाही का? कॅनडाने भारताची जी बदनामी केली त्याचे काय?
11 Mar 2025 - 5:37 pm | श्रीगुरुजी
आंतरराष्ट्रीय राजकारणात माफी, अपकीर्तिचा खटला वगैरे नसते, एवढी समज असावी अशी अपेक्षा आहे. ११ सप्टेंबरचा हल्ला बुशने स्वत:च आयोजित केला होता, इस्राएलने केला होता असले अनेक आरोप अनेक इस्लामी देशांनी केले होते. इटालीचा अध्यक्ष तर म्हटला होता की सीआयए व मोसादने संयुक्तपणे ११ सप्टेंबरचा हल्ला योजला होता.
ना अमेरिकेने ना इस्राएलने असल्या आरोपांकडे शष्प लक्ष दिले ना ते माफी मागा म्हणून मागे लागले. इंदिरा गांधी तर भारतातल्या सर्व घटनांमध्ये सीआयएचा हात असल्याचा आरोप करायच्या. पाकिस्तान देशातील सर्व घटनांमागे रॉ असल्याचा आरोप करतो.
ना असल्या आरोपांमुळे कोणत्या देशाची अपकीर्ति होते ना एखादा देश आमची माफी मागा अशी मागणी करतो ना आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागतो ना आरोप करणारे माफी मागतात.
इतकं वय झाले तरी माईडी अजून बाळबोधच राहिली.
13 Mar 2025 - 9:00 am | श्रीगुरुजी
कॅनडाचे अधिकारी थेट बोलत आहेत इकडे. हे खोटे असेल तर भारताने "माफी मागा" असे नको का सांगायला? कारण असे देशाचे नाव घेणे म्हणजे भारताची बदनामी आहे.
पाकिस्तानचा पंतप्रधान थेट भारतावर आरोप करीत आहे. हे खोटे असेल तर भारताने "माफी मागा" असे नको का सांगायला? कारण असे देशाचे नाव घेणे म्हणजे भारताची बदनामी आहे.
11 Mar 2025 - 5:03 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
झेलिंस्कींची 'आता माझी सटकली"!
युक्रेनचा मॉस्कोवर ड्रोन्सनी हल्ला.
https://www.theguardian.com/world/video/2025/mar/11/ukraine-drone-attack...
आता पुतिन काय करतात बघायचे.
11 Mar 2025 - 5:19 pm | अमरेंद्र बाहुबली
हे निमित्त करून पुतिन काका युक्रेनची चटणी करतील!
11 Mar 2025 - 5:28 pm | अमरेंद्र बाहुबली
असे १७६० हल्ले केले तरीही रशियाला फरक पडणार नाही!
11 Mar 2025 - 6:00 pm | श्रीगुरुजी
कामाच्या बहाण्याने थायलंड व ब्रह्मदेशात नेऊन अडकवून ठेवलेल्या २८३ भारतीय नागरिकांना भारताने मुक्त करून परत आणले.
12 Mar 2025 - 3:32 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"आमची दारू भारताने स्वस्त करावी. बॉर्बॉन व्हिस्कीवरील आयात शुल्क कमी करावे. "तात्यांचे फर्मान.
भारताने आयात शुल्क १५०% वरुन १००% केले होतेच. पण आता त्याचे जाहीर वाच्य व्हाईट हाउसने केले- (आयात शुल्क भारताने फेब्रुवारीतच कमी केले आहे)
https://www.youtube.com/watch?v=3WWFDXL-juY
https://www.reuters.com/business/retail-consumer/india-slashes-bourbon-w...(Reuters,in%20the%20South%20Asian%20market.
युरोपियन युनियनचे उत्तर- https://www.youtube.com/watch?v=bMHTNFV9Y6M
"अमेरिका जे आयात शुल्क लादु पाहातेय ते न पटणारे आहे."
पियुष गोयल ह्यांची पुन्हा अमेरिकावारी होतेय. https://www.ndtvprofit.com/economy-finance/reciprocal-tariffs-piyush-goy...
12 Mar 2025 - 5:10 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
शेवटी पंतप्रधानांच्या कार्यालयातुन कुणीतरी बोलते झाले-
Trump tariff threats present opportunity for India, too much protection detrimental to growth: Shamika Ravi(पंतप्रधान सल्लागार समीती)
वा, म्हणजे भारत जेव्हा आयात शुल्क जास्त लावत होता तेव्हाही संधी होत्या आणी आता आयात शुल्क कमी केल्यावरही संधी आहेत. !!
12 Mar 2025 - 5:38 pm | श्रीगुरुजी
माईडे आता आनंदी? सरकारतर्फे कोणीतरी बोलावे म्हणून तुझ्या 'ह्यां'नी देव पाण्यात ठेवले होते आणि तू अन्नपाणी सोडलं होतंस. आता देव पाण्यातून काढा, तू उपवास सोड आणि सत्यनारायण घालून उद्यापन कर.
13 Mar 2025 - 8:52 am | श्रीगुरुजी
माईडे, अबा,
बलुचिस्तानमधील आगगाडी अपहरण प्रकरणात भारताचा हात आहे या पाकिस्तानच्या आरोपामुळे भारताची जगभर नाचक्की झाली आहे. भारताची मान शरमेने खाली गेली आहे. आधी कॅनडात आणि आता पाकिस्तानात भारत दहशतवादी कृत्ये करीत आहे. भारताला लाज वाटायला हवी. परंतु मोदी-शाह-डोवाल एक शब्द बोलायला तयार नाहीत आणि त्यांचे भक्तही गप्प आहेत. भारताच्या नाचक्कीचे यांना काही पडले नाही.
तुम्ही गप्प का? निदान तुम्ही तरी काहीतरी बोला.
13 Mar 2025 - 9:35 am | चंद्रसूर्यकुमार
जर बलुचिस्तानमधील घटनेत भारताचा हात असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे असे स्वतःच्या बळावर काही नगरसेवक पण निवडून न आणू शकणार्या भाजपच्या एखाद्या गल्लीतल्या नेत्याने जाहीर वक्तव्य द्यायला पाहिजे. भविष्यात समजा बलुचिस्तानमध्ये यादवी युद्ध सुरू झाले आणि पाकिस्तानचा तुकडा पडला तर मग 'बघा आम्हीच केलं' असे म्हणत पुढच्या दोन-तीन पिढ्या श्रेय घेऊ :)
13 Mar 2025 - 10:53 am | श्रीगुरुजी
भक्तुल्यांना अभिमान वाटतोय, पण या घटनेमुळे भारताची मान शरमेने खाली गेलीये आणि जगभर भारताची अपकीर्ति झालीये याचे अधभक्तांना ना सोयर ना सुतक.
- इति माई, माईंंचे 'हे' आणि अबा
13 Mar 2025 - 9:43 am | रात्रीचे चांदणे
बर, हा आरोप पण कोणी सध्या माणसाने नाही तर पंत प्रधानाच्या सल्लागाराने केलाय.
13 Mar 2025 - 10:24 am | विवेकपटाईत
जर २०१४ मध्ये मोदी शेठ सत्तेत आले नसते तर भारताचे तुकडे तुकडे झाले असते. महागाई भयंकर वाढली असती. अनेक सरकारी बँकांचे दिवाळे निघाले असते. (दिवाळखोर कायदा बनला नसता). भारताचा कश्मीरचा बराचसा हिस्सा पाकिस्तानला दिल्या गेला असता. ज्या लोकांचे देशावर प्रेम नाही फक्त तेच मोदींचा विरोध करतात.
13 Mar 2025 - 11:48 am | माईसाहेब कुरसूंदीकर
"महागाई भयंकर वाढली असती"
मग सध्या काय आहे? डिझेल- ५५ रुपयांपासुन ८८ रुपयापर्यंत(२०१४ पासुन २०२४ पर्यंत), पेट्रोल(७३ पासुन ९७ रुपये/लिटर)
दूध(३६ रुपये लिटर पासुन ६० रुपये)
13 Mar 2025 - 7:40 pm | सुबोध खरे
The prices went up again -- from Rs 44 a litre in March 2011 to Rs 66 in May 2014, followed by a slide to Rs 57 in July 2017.
माई तुमच्या "ह्यां"चे निवृत्तीवेतन तेवढेच राहिले का?
का त्यात महागाई भत्ता आणि सातव्या वेतन आयोगामुळे भरघोस वाढ झाली?
किंवा तुमच्या मुलं नातवंडांचे पगारही तेवढेच राहिले का? का कमी झाले?
तुमचं वय झालं हे मात्र खरं
13 Mar 2025 - 11:39 am | माईसाहेब कुरसूंदीकर
" परंतु मोदी-शाह-डोवाल एक शब्द बोलायला तयार नाहीत आणि त्यांचे भक्तही गप्प आहेत. भारताच्या नाचक्कीचे यांना काही पडले नाही.तुम्ही गप्प का? निदान तुम्ही तरी काहीतरी बोला."
फरक लक्षात घ्या आदरणीय गुरुजी. निज्जर प्रकरणात कॅनडाने पुरावे दिले होते असे ते म्हणतात. त्यांचे पोलिस अमित शहांचे नाव घेतात. आपल्या राजदूताला भारतात पाठवतात. ते पुरावे पाच देशांना देतात. त्यातले दोन देश ब्रिटन आणि अमेरिका काय म्हणतात ते ही वाचा-
the United States and the United Kingdom threw their weight behind Canada, accusing India of not cooperating with the probe into the killing in the North American country and nudging it to do so now.
म्हणजे फक्त कॅनडाच नाही तर हे दोन महत्वाचे देश कॅनडाला समर्थन देतात(हे समर्थन पुरावे पाहिल्यावरच दिले असणार. हे दोन देश तेवढे शहाणे निश्चित आहेत).
म्हणुन भारताची बाजु येथे दुबळी होते. आणि भारताने ह्यावर उत्तर देणे अपेक्षित असते.
पाकिस्तान आगगाडी प्रकरणात पाकिस्तानने पुरावे दिले का? दुसरा कोणता देश त्याच्या बाजुने उभा राहिला का? असेल तर भारत अशा गुप्त कारवायांत कमी पडतो असाच अर्थ काढावा लागेल.
https://www.deccanherald.com/world/us-uk-stand-by-canada-ask-india-to-jo...
https://timesofindia.indiatimes.com/india/allegations-extremely-serious-...
13 Mar 2025 - 1:12 pm | श्रीगुरुजी
म्हणुन भारताची बाजु येथे दुबळी होते. आणि भारताने ह्यावर उत्तर देणे अपेक्षित असते.
यात भारताचा हात नाही हे ट्रुडोनेच मान्य केल्यानंतर
कसली दुबळी बाजू आणि कसलं डोंबलाचं उत्तर द्यायचं?
13 Mar 2025 - 12:15 pm | रात्रीचे चांदणे
मला तर वाटतंय की निज्जर ला भारतानेच मारले असेल. हे कॅनडालाही समजले असेल. पण पुरावे सापडत नसतील. त्यामुळेच त्यांच्या स्टेटमेंट्स मध्ये एक वाक्यता नाही. एकदा म्हणतात पुरावे आहेत दुसऱ्या वेळेस नाही. भारतात दहशतवाद्यांचे आरोप असणाऱ्याला कॅनडाने संरक्षण नाही द्यायला पाहिजे होत. आत्ता कॅनडा ने कितीही आदळआपट केली तरी भारताने दुर्लक्ष केलेलेच बरे.
13 Mar 2025 - 12:29 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"मला तर वाटतंय की निज्जर ला भारतानेच मारले असेल. हे कॅनडालाही समजले असेल. पण पुरावे सापडत नसतील"
बरोब्बर. मारले असेल तर उत्तमच आहे पण त्यातुन बाहेर पडण्यात आपण कमी पडलो असे दिसतय. ह्या आधी रॉचे संस्थापक आर एन काओ ह्यांच्या नेत्रुत्वाखाली अनेक कारवाया केल्या आहेत, नामानिराळे राहुन. ७०च्या दशकात
Kao as one of the 'five great intelligence chiefs of the 1970s
https://en.wikipedia.org/wiki/R._N._Kao
ह्यांनी मुलाखतीही फारशा दिल्या नाहीत. ना अजित डोवाल ह्यांच्यासारखे काही विधान केले-
You can do one Mumbai, and you may lose Balochistan” - Ajit Doval 9 yrs ago
https://www.reddit.com/r/IndianDefense/comments/1f6zoth/you_can_do_one_m...
डोवाल ह्यांच्याबद्दल आदर आहे पण त्यांचे हेच विधान आता बलुचिस्तान ट्रेन प्रकरणानंतर सगळीकडे पुन्हा प्रसिद्ध होतेय. असो.
13 Mar 2025 - 12:35 pm | रात्रीचे चांदणे
सहमत, अनावश्यक विधाने करायची काहीही गरज नाही. ह्याच कारणामुळे कॅनडा बाबतीत भारत शांत असेल.
13 Mar 2025 - 1:09 pm | श्रीगुरुजी
मारले असेल तर उत्तमच आहे पण त्यातुन बाहेर पडण्यात आपण कमी पडलो असे दिसतय
बाहेर यायचा प्रश्नच नाही कारण आत गेलोच नव्हतो.
तसं पाहिलं तर यात भारताचा हात नाही हे ट्रुडोनेच मान्य केलंय. अजून काय बाहेर यायचंय?
13 Mar 2025 - 2:54 pm | श्रीगुरुजी
तामिळनाडूने हिंदी सक्तीविरोधात दंड थोपटले.
हिंदी सक्तीविरोधात देशभर चळवळ सुरू व्हावी.
14 Mar 2025 - 12:08 pm | विजुभाऊ
या धाग्याचे शीर्षक " ताज्या घडामोडी मार्च २०२४" असे आहे.
मिपा वरचे लोक्स टाईम ट्रॅव्हल करत होते. असा समज होईल एक हजार वर्षांनंतर जर हा धागा कोणी वाचत असेल त्याचा.
त्या काळातला एखादा पुना ओक हा लेख पुरावा म्हणून सादर करेल
14 Mar 2025 - 1:03 pm | अमरेंद्र बाहुबली
हायला २०० प्रतिसादांनंतर हे लक्षात आले होय?
आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर गप्पा हाणणाऱ्या मिपकराना ही छोटी गोष्ट लक्षात येऊ नये?? मोठ घर पोकळ वासा, वारा जाई भसाभसा!
14 Mar 2025 - 4:38 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
'मिपा वरचे लोक्स टाईम ट्रॅव्हल करत होते. आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर गप्पा हाणणाऱ्या मिपकराना ही छोटी गोष्ट लक्षात येऊ नये"
बरे झाले हा विषय आला. आमचे थोर उद्योगपती मुकेश्भाई आणी सुनिल भारती मित्तल जून २०२४ मध्ये मस्कच्या स्टार-लिन्क बद्दल काय विचार करत होते ते शोधुन पाहिले-
"Billionaires Mittal and Ambani take on Musk in India’s internet space race"
अनेक वर्षे मस्क ह्यांच्या स्टार-लिंकला भारतात परवानगी मिळत नव्हती.
Musk’s SpaceX, the owner of Starlink, has been trying to enter the country for more than three years, but has not won regulatory approvals and was rebuked in 2021 by local authorities for signing up customers without having the proper licences.
अंबानी आणी मित्तल ह्यांच्या मते स्पेक्ट्रमचा लिलाव व्हायला हवा. ज्योतिरादित्य शिंदे ह्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये लिलाव करण्यात येणार नाही असे जाहीर केले(हे आय टी यु च्या नियमांनुसार आणि मस्क ह्यांना पाहिजे म्हणुन!)
https://www.business-standard.com/industry/news/in-a-win-for-musk-scindi...
ट्रम्प ह्यांची अध्यक्षपदी निवड झाल्यावर चक्र फिरलेली दिसतात. स्पेक्ट्रमचा लीलाव होणार नाही हे ल़क्षात आल्यावर ह्या दोन्ही उद्योगपतीनी मस्क ह्यांच्याशी जुळवुन घ्यायचे ठरवले आणि अवघ्या काही तासात दोघानी स्टार-लिंकबरोबर करार केला.
https://economictimes.indiatimes.com/industry/telecom/telecom-news/elon-...
14 Mar 2025 - 5:43 pm | श्रीगुरुजी
कोण होतास तू? काय झालास तू? अरे वेड्या कसा, वाया गेलास तू?
14 Mar 2025 - 5:52 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
राष्ट्रवादीसोबत युती नाही! नाही! नाही! आपदधर्म नाही शाश्वतधर्म नाही…..!
14 Mar 2025 - 6:26 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अशावेळी "राजकारणात कुणीही कायमचा शत्रु नसतो" हे वाक्य समर्थकांकडुन वॉट्स-अॅप विद्यापीठावर फेकले जाते. पण लोकांची दिशाभूल केलीत त्याचे काय ? राज्यावर ९.३ लाख कोटीचे कर्ज आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकावर ७२,००० रुपयांचे कर्ज येते.
14 Mar 2025 - 6:30 pm | श्रीगुरुजी
कर्जमुक्त हो माई.
14 Mar 2025 - 7:32 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
ट्रम्प आणी मस्कच्या दबावाखाली असलेल्या भारताकडुन गेल्या काही दिवसात काहीच प्रतिक्रिया येत नव्हत्या. पाकिस्तान 'जाफर एक्स्प्रेस' प्रकरण घडले. पाकिस्तानने नेहमी प्रमाणे भारतावर आरोप केला. सुदैवाने ह्यावेळी मात्र भारताची प्रतिक्रिया आली.
'Look Inwards Instead Of Shifting Blame': India Rejects Pakistan’s Claim On Train Hijacking
https://www.msn.com/en-in/news/india/look-inwards-instead-of-shifting-bl...
विश्वगुरू नाही निदान दक्षिण आशिया गुरु तरी आपण आहोत म्हणायला हरकत नाही.
14 Mar 2025 - 7:48 pm | रात्रीचे चांदणे
भारत अमेरिकी उत्पादनावर कर लावतोय हे सत्य आहे. थोडा नाहीतर अल्कोहोलवर १००-१५०%. अमेरिकेने हेच सांगितले आहे. याउलट पाकिस्तानने आत्ताच झालेल्या दहशतवादी हल्ल्या साठी भारताला जबाबदार ठरवले आहे. त्यात कमीत कमी १०० शांती सैनिक मेले असतील.
आयातीवर लावलेला कर आणि दहशतवाद ह्याची तुलना तरी शक्य आहे का? जसा आरोप तसेच उत्तर असणार ना? एकदा विरोध करायच ठरवलं की कारण काहीही असू द्या. फक्त विरोधच करायचा हे ठरलेलं आहे.
14 Mar 2025 - 8:04 pm | अमरेंद्र बाहुबली
मुल्ल्याची धाव मशिदीपर्यंत!
तसेच भक्तांची धाव पाकिस्तानपर्यंत असते, अमेरिका, कॅनेडा ते विचारात घेत नाहीत!
14 Mar 2025 - 8:12 pm | रात्रीचे चांदणे
गुलामांकडे उत्तर नसलं की समोरच्याला भक्त म्हणून वेळ मारून नेतात.
14 Mar 2025 - 8:43 pm | श्रीगुरुजी
अकलेचा दुष्काळ असल्याने दुसरे काय होणार?
15 Mar 2025 - 5:46 am | माईसाहेब कुरसूंदीकर
"भारत अमेरिकी उत्पादनावर कर लावतोय हे सत्य आहे. थोडा नाहीतर अल्कोहोलवर १००-१५०%"
भारत हे लपून करत होता का? दोन्ही देशांनी चर्चा केल्यावरच किती आयात शुल्क लावायचे हे ठरते ना? म्हणूनच जेव्हा ट्रम्प ह्यांनी चीन्/कॅनडा/ईतर देशांची नावे घेतली/जेव्हा "मी ह्या देशांना उघडे पाडले आहे" असे ट्रम्प बोलले तेव्हा त्या देशांनी ताबड्तोब प्रत्युत्तर दिले. असो.
ट्रम्प ह्यांच्यासारखाच ईलॉन मस्कही बडबड्या आणि फुशारक्या मारणारा दिसतो.
Musk said on X that Ukraine's "entire front line" would collapse if he turned the system off.
https://www.bbc.com/news/articles/cy87vg38dnpo
पोलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांनाही मस्क "लहान माणुस" म्हणाला आणि पुन्हा टीका झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ह्यांनी एक्स वर 'स्टार-लिंकचे स्वागत केले आणि ती पोस्ट मग डिलीट करुन टाकली. स्टार-लिंकला अजून अनेक परवाने मिळायचे आहेत(पण सगळे काही व्यवस्थित होईल हा 'विश्वास' रेल्वेमंत्र्यांना असावा!)
वाटाघाटी करण्यात मोदींशी कोणी स्पर्धा करू शकत नाही असे ट्रम्प म्हणाले. पण एफ-३५ विमाने प्रस्ताव,भारताने व्हिस्की पासुन सफरचंदापर्यंत कमी केलेले आयात शुल्क.. आणी आता स्टार-लिंक. दुसर्याचे तोंड भरुन कौतुक करुन स्वतःचा माल दुसर्याच्या गळ्यात मारायचा. अमेरिकेची जुनी पद्धत आहे.
15 Mar 2025 - 6:40 am | सुक्या
भारतीय विद्ध्यार्थी बहुदा राजकीय किंवा ईतर चळवळींपासुन दुर राहतात असा माझा कयास होता. परंतु भिकेचे डोहाळे कुणालाही लागतात. आजच ही बातमी वाचली. https://www.dhs.gov/news/2025/03/14/video-columbia-university-student-wh...
दुर कुठे चालु असलेल्या युद्धात आपला देश किंवा ज्या देशात आपण राहतो तो देश सहभागी नसताना, उगा एका अतीरेकी संघटनेसाठी आपले करीयर पणाला लावण्याची दुर्बुद्धी का झाली असावी.
15 Mar 2025 - 11:42 am | चंद्रसूर्यकुमार
रंजनी श्रीनिवासन ही भारतीय पोरटी तिचा व्हिसा रद्द झाल्यानंतर अमेरिकेतून स्वतःहून चालती झाली. त्यानंतर अमेरिका सरकारच्या प्रवक्त्याने म्हटले की अमेरिकेचा व्हिसा मिळणे आणि अमेरिकेत शिकायला येता येणे हा 'प्रिव्हिलीज' आहे. आमच्या देशात येऊन आमचा कायदा मोडणार्यांना आमच्या देशात स्थान नाही. यात अमान्य करण्यासारखे काहीच नाही. एक गोष्ट समजत नाही- जर कोलंबियासारख्या विख्यात विद्यापीठात शिकायला मिळत असेल तर स्वतःला भाग्यवान समजून अभ्यासात झोकून द्यायचे सोडून असल्या गोष्टी करायची अवदसा असल्यांना का आठवत असेल? आपल्या स्वतःच्या देशात अशा गोष्टी केल्या तरी हाकलले जाऊ शकत नाही त्यामुळे तेवढी तरी सुरक्षितता असते. दुसर्या देशात जाऊन बिनदिक्कतपणे असल्या गोष्टी करून काय मिळते? आता वाईट असे होणार आहे की ती घाण आता भारतात परत येणार आणि इकडे डापु गँगमध्ये सामील होऊन इकडे काड्या घालणार.
यावरून एक गोष्ट नक्कीच जाणवते. अमेरिका हा आपला देश नाही, त्यांच्या देशात कोणाला येऊ द्यावे आणि कोणाला नाही, कोणत्या अटींवर बाहेरच्यांना प्रवेश द्यावा, किती काळ बाहेरच्यांना राहू द्यावे, त्यांना काय काय करू द्यायला परवानगी द्यावी हे अमेरिकन लोक- अर्थात अमेरिका सरकार ठरविणार याचा आपल्या लोकांना पत्ताही नसतो. जसे काही अमेरिकेत जाऊन राहता येणे आणि नोकरी करणे हा आपला जन्मसिध्द अधिकारच आहे अशाप्रकारचा आपल्या लोकांचा दृष्टीकोन असतो. असल्या लोकांना चपराक बसत आहे हे पण काही थोडे नाही.
15 Mar 2025 - 12:10 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
सहमत. पुर्वी परदेशात जाउन स्थायिक होणे हेच प्रिविलेज असायचे. १९९० च्या सुमारास तुझा तो एच वन बी व्हिसा आला आणि तिकडे जायचे पेव फुटले. अभियांत्रिकीत ६०% च्या वर न जाणारे लोक , एच वन बी व्हिसावर अमेरिकेला सहज जाउ लागले. तिकडे जाउन ते 'बॉडी शॉपिंग'ही करू लागले. रिझ्युमेमध्ये वाट्टेल ते लिहायचे. (c,c++,COBOL, Java,Mysql..)एकुण अनुभव ४.५ वर्षे. !
अमेरिकेत मग अशा ह्या चीप लेबरला विरोध होउ लागला.मग ह्यावर आयडिया म्हणुन अमेरिकेतील वाटेल त्या विद्यापीठात एम एस साठी प्रवेश घ्यायचा आणी डिग्री करायची आणी मग तिकडे नोकरी बघुन ग्रीन कार्डला अर्ज करायचा आणि छोकरी बघायला भारतात यायचे. २०१० पर्यंत हे मस्तपैकी चालु होते.
ही रंजनी सी ई पी टीमधुन पास झाली आहे. आर्किटेक्चर(सॉफ्टवेयर नाही)मधील हे अहमदाबादमधील कॉलेज खूप नावाजलेले आहे. त्यामुळे भारतात तिला नोकरीसाठी काही अडचण येईल असे वाटत नाही.
15 Mar 2025 - 4:08 pm | रात्रीचे चांदणे
तरी नशीब अमेरिकेसारख्या देशात असले उद्योग केलेत. चुकून जरी अरब देशात हे असल काही केलं असतं तर परिणाम अतिशय वाईट झाले असते. आत्ता ती मुलगी युद्ध जिंकून आली अशा थाटात तिचे इंटरव्ह्यू वगैरे चॅनल्स वर चालू होतील. विरोधी पक्ष सरकारवर नाकर्तेपणाचा आरोप करतील.
15 Mar 2025 - 4:17 pm | अमरेंद्र बाहुबली
विरोधी पक्ष सरकारवर नाकर्तेपणाचा आरोप करतील.
+१नाकर्त्या लोकांवर नाकर्तेपणाचे आरोप करणे चुकीचेच!
15 Mar 2025 - 4:51 pm | कॉमी
अतिरेकी संघटनेला मदत म्हणजे नक्की काय केले त्या मुलीने?
15 Mar 2025 - 5:44 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
ट्रम्प सत्तेवर असल्याने त्यांच्या 'वंदे मातरम'ची व्याख्या तेथील बहुसंख्यांक टाळ्या वाजवतील अशी ते करतात.
15 Mar 2025 - 4:50 pm | श्रीगुरुजी
अमेरिकन पत्रकाराचे भारतातील विशिष्ट अधिकार काढून घेतले. अर्थात हे नागरिकत्व नव्हते तर भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना व भारतीय वंशाच्या नागरिकांशी विवाह केलेल्या परदेशी नागरिकांना भारतात अधिकृत अनुमतीविना प्रवेश, नोकरी, दीर्घकालीन वास्तव्य असे लाभ OCI (Overseas Citizens of India) या तरतुदीमार्फत दिले जातात व हेच अधिकार काढून घेतले आहेत.
वा! आवडले.
पण हे प्रथमच झालेले नाही.
यापूर्वी अनेकांचे OCI अंतर्गत मिळणारे अधिकार काढून घेतले आहेत.
15 Mar 2025 - 4:58 pm | श्रीगुरुजी
16 Mar 2025 - 1:13 am | सुक्या
असे व्हायलाच हवे. भारत म्हणजे बनाना रिपब्लिक आहे. त्या विरोधात काहीही केले तरी जे फायदे भारताकडुन घ्यायचे आहेत ते घेतच राहु. त्यात अम्हाला कुणीही अडवु शकत नाही. ही या अगोदरची मोडस ऑपरेंडी (मराठी प्रतिशब्द्?) होती. भारताचेच फायदे घेउन भारतात राहुन भारताविरुद्ध कागळी करणारे असंख्य लोक होते. आता या लोकांना त्याची किंमत चुकवावी लागते आहे. असल्या गोष्टींमुळेच मी विद्यमान सरकारचा चाहता आहे.
असे लोक भारताकडुन मिळणार्या सुविधांना हक्क समजायला लागले होते. मी जिथे राहतो त्या सिअॅटल भागात सुध्दा क्षमा सावंत नावाच्या महा पाताळ्यंत्री बाईचे असले अधिकार काढुन घेतले होते व तिचा भारतीय विसा पण नाकारला होता. भारताकडुन आलेल्या या अनपेक्षित प्रतीसादामुळे भंजाळुन जाउन तिने सिअॅटल च्या भारतीय दुतावासात जाउन गोंधळ घातला होता.
असले लोक वर तोंड करुन कोर्टात पण जात आहेत. त्यांना पण महीत आहे या केस चा काय निकाल लागणार आहे. तरीही केवळ प्रसिध्दी मिळवण्यासाठी असले थेर करतात. https://www.nationalheraldindia.com/international/us-journalist-raphael-...
वर कहर म्हणजे भारतातील कावीळ झालेले लोक असल्या लोकांना सपोर्ट पण करतात.
16 Mar 2025 - 1:24 am | अमरेंद्र बाहुबली
अमेरिकन पत्रकाराचे भारतातील विशिष्ट अधिकार काढून घेतले.
एका पत्रकाराची गळचेपी करून मोठा तीर मारला नाही?
16 Mar 2025 - 7:01 am | श्रीगुरुजी
आपल्या मूर्खपणाचे कितीदा जाहीर प्रदर्शन करणार?
16 Mar 2025 - 10:05 am | अमरेंद्र बाहुबली
A US journalist has taken the Indian government to court after his Indian overseas citizenship was unilaterally cancelled, after the publication of a story critical of a prominent Indian businessman.
हे बातमीतच लिहिले आहे.
मराठीत अर्थ,
एका अमेरिकन पत्रकाराने, एका प्रसिद्ध भारतीय उद्योजकावर टीका करणारी बातमी प्रकाशित केल्यानंतर, भारतीय सरकारने त्याचे भारतीय विदेशी नागरिकत्व (OCI) एकतर्फी रद्द केल्यामुळे न्यायालयात धाव घेतली आहे.
16 Mar 2025 - 7:57 am | आग्या१९९०
एका पत्रकाराची गळचेपी करून मोठा तीर मारला नाही?
पत्रकारांना घाबरून ज्या विगुने देशातील माध्यमांची गळचेपी केली तो परदेशी पत्रकारांचे लाड का करेल ? योग्य तेच केले.
16 Mar 2025 - 8:53 am | श्रीगुरुजी
गळचेपी केली म्हणजे नक्की काय केले? कोणत्या माध्यमांची गळचेपी केली? गळचेपीचे काय परिणाम झाले?
18 Mar 2025 - 4:51 am | सुक्या
ह्या प्रश्नांची उत्तरे कधीही मिळणार नाहीत. गोलपोस्ट बदलेल बघा ...
18 Mar 2025 - 8:26 am | अमरेंद्र बाहुबली
वर उत्तर दिलय आधीच! उघडा डोळे बघा नीट!
18 Mar 2025 - 8:45 am | श्रीगुरुजी
खरं आहे. प्रश्न विचारले की पलायन किंवा चिडीचूप.
15 Mar 2025 - 5:08 pm | वामन देशमुख
रंजनी श्रीनिवासन ही भारतीय पोरटी तिचा व्हिसा रद्द झाल्यानंतर अमेरिकेतून स्वतःहून चालती झाली...
ह्या प्रकरणातल्या आजवर झालेल्या घडामोडी आणि पुढे होऊ घातलेल्या घडामोडी या पूर्वनियोजित आहेत आणि भारत विरोधी शक्तींनी त्या हेतूपुरस्सरपणे घडवून आणलेल्या आहेत असे दिसते. (अमेरिकी सरकारने तिच्यावर केलेली कारवाई हा भाग वगळून)
१. वेगवेगळ्या संस्थांकडून फंडिंग मिळवून भारतात आणि इतर देशात संशोधक विद्यार्थी अशी प्रतिमा तयार करणे
२. अमेरिकेत जाऊन तिथे डॉक्टरल अभ्यास सुरू करणे
३. हमास या संघटनेवर बंदी घातलेली असतानाही, त्या समर्थनार्थ कृत्ये करणे
४. अमेरिकेत सरकारकडून कायदेशीर कारवाई
५. लगोलग स्वतःला सेल्फ डिपोर्ट करणे
६. त्याची व्यवस्थित प्रसिद्धी करणे
७. भारतात परत आल्यावर victim card खेळणे
८. त्याची पूर्वतयारी म्हणून मीडियामध्ये मोठ मोठे लेख प्रसिद्ध करविणे
९. स्वतःची आंदोलक विचारवंत वगैरे प्रतिमा बनविणे
१०. पुढची अरुंधती रॉय, मेधा पाटकर वगैरे बनणे
पहात रहा...
15 Mar 2025 - 5:59 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
हे असे दणादण निषकर्ष काढण्या आधी ह्या रंजनीचा ईतिहास तपासुन पहा.
Inlaks Scholarship
One of India's most prestigious scholarships, the Inlaks Shivdasani Scholarship, is awarded to exceptional students pursuing opportunities at leading international institutions.
Lakshmi Mittal Foundation Support
The Lakshmi Mittal Foundation was also backing Ranjani’s research focused on exploring critical issues at the intersection of caste, extractive economies, and postcolonial India.
(आता फोन लावायचा का मित्तलसाहेबांना ह्या प्रकरणावर? ?)
https://www.republicworld.com/india/ranjani-srinivasan-deported-scholar-...
https://inlaksshivdasanifoundationblog.org/home/2022/6/7/scholars-2022-m...
15 Mar 2025 - 7:16 pm | श्रीगुरुजी
इतक्या शिष्यवृत्ती मिळून केलं काय तर हमासचे समर्थन. वाया घालविल्या सर्व पदव्या व शिष्यवृत्ती.
15 Mar 2025 - 10:23 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
पण हे करायला,अमेरिकेसारखा देश सोडणे ह्यासाठी एक प्रकारची हिंमतही हवी. अन्यथा ग्रीन कार्ड/नागरिकत्व मिळावे म्हणून तिकडेच कोणालातरी 'पटवण्याचे' प्रकार करणारे भारतिय कमी नाहीत.
18 Mar 2025 - 5:03 am | सुक्या
हिंम्मत?
माई तिला आपण काय केले आहे व त्याचा काय परिणाम भोगावा लागु शकतो हे तिला खुप चांगले माहीती आहे.
म्हणुनच ती स्वत: अमेरिकेतुन चालती झाली. अटक वगेरे झाली असती तर वकीलाला पैसे कुठुन दिले असते? हे पॅलेस्ताईन वाले खुप चालु आहेत. फक्त काही लोकांना वकील दिलाय वर्गनी काढुन. ते पण विशिष्ट धर्माचे असाल तर. हे असले आंदोलन करणारे वारे फिरले की पाय लाउन पळतात. कुठे आलीय हिंमत बिंमत ..
बाकी तो महमूद खलिल माहीतच असेल तुम्हाला .. त्याला जे ग्रीन कार्ड मिळाले आहे ना ते असेच अमेरिकन नागरीक असलेल्या नूर अब्दाला हिला पटवुनच मिळाले आहे. नाहीतर आमच्यासारखे भारतीय १२/१३ वर्षे लायनीत उभे असतो त्यासाठी.
19 Mar 2025 - 11:05 am | सुक्या
हे घ्या !! फ्रोम होर्सेस माऊथ ...
https://www.cnbctv18.com/world/atmosphere-seemed-so-volatile-dangerous-i...
अन म्हणे हिंंमत. आता तर ती मी तर बॉ काईच केलं नाही ... म्हणुन खाका वर करते आहे ... मज्जा आहे ... एकुनच.
19 Mar 2025 - 9:43 am | सुबोध खरे
हायला
आय आय टी, आय आय एम, एम्स सारख्या शिक्षणसंस्थातून शिक्षण घेऊन अफूचा व्यापार केला तर चालतो का?
शैक्षणिक गुणवत्ता उत्तम असली म्हणून अतिरेक्यांना पाठिंबा समर्थनीय होतो?
माई
तुमचं वय झालंय हेच खरं
19 Mar 2025 - 9:59 am | श्रीगुरुजी
माई व नानासाहेब कालातीत आहेत.
15 Mar 2025 - 7:19 pm | श्रीगुरुजी
Gen next barkha dutt, arundhati roy, sagarika ghosh, mamata bannerjee etc. in the making.
15 Mar 2025 - 7:31 pm | विवेकपटाईत
1990 चे दशक. माझ्या ओळखीचा एक मुलगा इंगिनीरिंगचे शिक्षण, ते ही प्राइवेट कॉलेज मध्ये, न झेपण्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून नर्मदा बचाओ आंदोलन मध्ये गेला. त्यावेळी त्याचे आई वडील त्याला शिव्या द्यायचे. पण मुलगा डोक्याने हुशार होता. भारतात करियर कसे बनवायचे हे त्या आंदोलनात शिकला. नंतर हिमाचलच्या एका भागात विदेशी अनुदानाच्या मदतीने त्या भागातील आर्थिक सामाजिक भौगोलिक सर्व्हे इत्यादि केले. नंतर हार्वर्ड मधून पीएचडी केली. ज्या मुली सोबत त्याचे लग्न झाले त्या मुलीने ही हार्वर्ड मध्ये पीएचडी केली होती. दोघेही आता प्रोफेसर आहेत.
बाकी जगातील विख्यात युनिवरसिटींच्या गुणवत्ते वर माझा विश्वास उडाला. अमेरिका ब्रिटेन इत्यादि शिक्षण संस्थांचा ही उपयोग त्यांच्या स्वार्थासाठी करतात. अनेक अमेरिकी प्रायोजित संस्था दुसर्या देशातील लोकांना सामाजिक कामांसाठी नाही तर त्या देशात त्यांच्या अजेंडा राबविण्यासाठी पुरस्कार इत्यादि देतात.
15 Mar 2025 - 9:38 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अनेक अमेरिकी प्रायोजित संस्था दुसर्या देशातील लोकांना सामाजिक कामांसाठी नाही तर त्या देशात त्यांच्या अजेंडा राबविण्यासाठी पुरस्कार इत्यादि देतात.
अजेंडा चांगला असेल तर काहीच हरकत नाही. 'देशविरोधी' असेल तर आपल्या देशप्रमुखांनी अमेरिकेच्या अध्यक्षांच्या नजरेत तसे आणुन द्यायला हवे.ट्रम्प चांगले मित्र आहेत, गप्पा मारता मारता ह्यावर बोलायला हवे. सध्या स्टारलिंक बरोबर एयर् टेल्/जीओ करार करत आहेत. उपग्रह मस्कचे म्हणजे अमेरिकेचे. मस्क ह्यांचा उद्धटपणा जगजाहीर आहे.आंदोलन करणार्या लोकांपेक्षा सत्ताधार्यांचे लक्ष अमेरिकेच्या असल्या छुप्या अजेंडावर असायला हवे.
15 Mar 2025 - 9:24 pm | श्रीगुरुजी
Trump on rampage.
अमेरिकेने दक्षिण आफ्रिकेच्या राजदूतास देश सोडण्यास सांगितले.
15 Mar 2025 - 9:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
माज आणि मस्ती.
"Rubio linked his remarks to an article by the right-wing media outlet Breitbart, wherein Rasool is quoted as saying Trump mobilised a “supremacist instinct” and “white victimhood” as a “dog whistle” during the 2024 elections."
ह्यामुळे ट्रंपाचा तिळपापड झाला.
दुसरे कारण हे असावे की "वर्णभेदाच्या काळात आमची अवस्था सध्याच्या पॅलेस्टाईनसारखीच झाली होती" असेही विधान राजदूत रसूल ह्यांनी केले होते.
https://www.aljazeera.com/news/2025/3/15/south-africa-committed-to-us-ti...
16 Mar 2025 - 9:01 am | श्रीगुरुजी
भारताची मान पुन्हा एकदा शरमेने खाली जाणार का?
16 Mar 2025 - 9:04 am | श्रीगुरुजी
अजून सविस्तर वृत्त
16 Mar 2025 - 9:28 am | कर्नलतपस्वी
उलट सुलट चर्चा,मतमतांतरे,अभ्यासू प्रतीसादातून बरीच माहीती सुसंगतवार कळत आहे.
जगतीक घडामोडींवर पैनी नजर ठेवलेल्या अभ्यासू मिपाकरांचे मनापासुन आभार.
16 Mar 2025 - 2:43 pm | श्रीगुरुजी
हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार
16 Mar 2025 - 5:54 pm | अमरेंद्र बाहुबली
काहीही झाले तरी शिष्यच!
16 Mar 2025 - 11:16 pm | श्रीगुरुजी
मूढ अज्ञानी
16 Mar 2025 - 11:33 pm | अमरेंद्र बाहुबली
https://marathi.abplive.com/news/india/sharad-pawar-has-taught-me-in-pol...
16 Mar 2025 - 11:48 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
आजच लेक्स फ्रिडमनला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणतात- "मी राजकारणात २०००/२००१ साली आलो."पवारांनी काँग्रेस फोडुन २ वर्षे झाली होती.आणि पवार लोकसभेत विरोधी पक्षनेता होते ना? मोदी ऑक्टोबर २००१ मध्ये मुख्यमंत्री झाले. मग हे बोट पकडायचे लॉजिक काय कळेना.कदाचित केशुभाईना बाजुला करुन त्याच्वेळी अडवाणी/वाजपेयीना पटवण्यासाठी पवारांनी मोदींना मदत केली असावी.
17 Mar 2025 - 12:00 am | अमरेंद्र बाहुबली
सहमत! पण पवारांचीच राष्ट्रवादी फोडून पवारांचे चांगलेच पांग फेडल्या गेले.
17 Mar 2025 - 7:14 am | श्रीगुरुजी
मोदी पवारा़चा जाहीर उपहास करतात हे अनेकदा दिसले आहे. पवारांनी मला बोट धरून राजकारणात आणले ही तर मोठी टिंगल होती.
अगदी मागच्या महिन्यात मराठी साहित्य संमेलनात नेहमीप्रमाणे पवार व्यासपीठावर घुसले. नाट्य संमेलन असो, साहित्य संमेलन असो, क्रिकेट संबंधित कार्यक्रम असो, ऍथलेटिक्स संबंधित कार्यक्रम असो . . . आपला काहीही संबंध नसताना हे सर्वात आधी घुसून व्यासपीठावर जाऊन मोक्याचे आसन पकडतात.
तर त्या साहित्य संमेलन कार्यक्रमासाठी यांनीच जाऊन मोदींना आमंत्रित केले व मोदींनी त्यावेळी अत्यंत सुंदर भाषण केले. जेव्हा पवार चाचपडत व्यासपीठावर आसनस्थ होण्यास आले तेव्हा पवारांनी स्वतः त्यांच्या हाताला धरून आसनात बसविले व नंतर एका प्याल्यात पाणी ओतून प्यायला दिले. तुम्ही किती गलितगात्र झाला आहात व इतरांच्या मदतीशिवाय तुम्हाला उठता बसतो चालता येत नाही आणि तरीही खासदारकी सोडवत नाही हे मोदींनी दाखवून दिले.
पवारांना गुरू म्हणून हरबऱ्याच्या वृक्षावर चढवून योग्य वेळी त्यांचा पक्ष फोडून पवारांचा गट पूर्ण नामशेष करून फक्त अवशेष शिल्लक ठेवले.
मोदी चेहऱ्यावरील हसू लपवित उपहास करतात आणि मुर्खांना वाटते की पवार हेच मोदींचे गुरू. प्रत्यक्षात मोदींचा गुरू म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व कालच्या मुलाखतीत मोदींनी पवारांचे नावही घेतले नाही व संघावर स्तुतीसुमने उधळली.
17 Mar 2025 - 7:51 am | अमरेंद्र बाहुबली
अच्छा म्हणजे पवारांना जाहीरपणे गुरु म्हणणारे मोदी खोटे नी तुम्ही खरे? किती जड जाते ना? मान्य करायला की आपल्या आवडत्या नेत्याचा गुरु पवार साहेब आहे ते?
17 Mar 2025 - 8:37 am | श्रीगुरुजी
अजून किती उलगडून सांगायचं? मूढ अज्ञान्यांना मोदींनी केलेला उपहास अजूनही समजला नाही.
एखादा मॅट्रिकच्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळविलेला विद्यार्थी एका अनुत्तीर्ण विद्यार्थ्याची मी शिकवणी लावली होती व त्याच्या मार्गदर्शनामुळेच मी पहिला आलो असे सांगतो तेव्हा तो उपहास असतो. ५० वर्षे राजकारणात राहूनही तुम्हाला थथातथाच यश मिळविता आले, पण राजकारणात येऊन जेमतेम १३-१४ वर्षात मी सर्वोच्च पदावर पोहोचलो हा टोमणा मूढ अज्ञान्यांना समजतच नाही. त्यांना ते खरं कौतुक वाटतंय.
19 Mar 2025 - 9:46 am | सुबोध खरे
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
16 Mar 2025 - 11:04 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
लेक्स फ्रिड्मनच्या मुलखती ऐकणे म्हणजे पर्वणी असते. लेक्स हा मूळचा रशियन पण आता अमेरिकन संगणक तज्ञ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची त्याने नुकतीच घेतलेली मुलाखत ऐकण्यासारखी आहे.
https://www.youtube.com/watch?v=ZPUtA3W-7_I&t=4958s
17 Mar 2025 - 3:30 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
लाचखोरी प्रकरणात अदानीसाठी आलेले समन्स भारत सरकारने अहमदाबाद जिल्हा न्यायालयाला पाठवले. आता अदानीला वाचवण्यासाठी आपली यंत्रणा कशी चालढकल करते ते पाहणे मनोरंजक असेल.
गेल्या महिन्यात अदानीला वाचवायचा प्लान ठरलाच होता. त्यामुळे ट्रम्प ह्यांनी १९७७ चा एफ पी सी ए कायद्याला सहा महिन्यांची स्थगिती दिली होती. दरम्यान टेस्ला/स्टार लिन्क, अमेरिकन व्हिस्की/सफरचंदावरचे आयात शुल्क कमी होणे.. हे सगळे विनासायास घडले.
पण तिकडची सेबी,म्हणजे एस ई सी पण वस्ताद आहे.
Despite this, the SEC recently made a fresh court filing, suggesting that the executive order does not apply retroactively. This means the SEC’s investigation into the Adani Group is likely to continue unless the law itself is changed.
https://www.outlookbusiness.com/corporate/trouble-for-gautam-adani-modi-...
17 Mar 2025 - 3:39 pm | श्रीगुरुजी
अदानीच्या खापरपणतूला पुढील सुनावणीचे पत्र येईल. तेव्हा आम्ही नक्कीच नसणार, पण माई व माईंचे 'हे' नक्की असतील.
17 Mar 2025 - 4:08 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अदानी राजकीय नेत्यांना व्यवस्थित मॅने़ज करतो हे मान्य.पण Growth with goodness साठी ह्या प्रकरणातून बाहेर येणे महत्वाचे आहे.अन्यथा सर्वत्र अडथळे येणार आहेत अदानीला. म्हणूनच तर मान खाली घालुन आयात शुल्क कमी करणे, एफ-३५ चा प्रस्ताव, टेस्लाचा शिरकाव, स्टार-लिंकचे जिओ/एयरटेल बरोबर करार.. हे सगळे ट्रम्प आणि मस्कच्या हुकुमाबर पार पडल्यासारखे दिसले. अमेरिकेने आदेश द्यावेत आणी भारताने 'येस सर' करावे असेच दिसत होते. जयशंकरांचे अनेक आठवडे ठाण मांडुन असणे,ट्रम्प जे काही बडबडतात त्याला भारताने होकार देणे, गाजावाजा न करता पियुष गोयलांचे अमेरिकेला जाणे. सगळेच विचित्र होते.
17 Mar 2025 - 5:19 pm | श्रीगुरुजी
यातलं अजून काहीच झालेलं नाही, पण माई व माईंचे 'हे' हे अजूनही सुतकात आहे.
17 Mar 2025 - 5:39 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
आयात शुल्क भारताने कमी नाही केले?
Amid Trump Tariff Threats, India Cuts Import Duty On American Bikes, Cars In Boost To Harley And Tesla
https://www.ndtv.com/world-news/amid-trump-tariff-threats-india-cuts-imp...
व्हिस्कीवरील आयात शुल्क कमी नाही केले?
https://www.indiatimes.com/news/india/reciprocal-tariffs-india-cuts-duty...
ईतर देशांनी जो तडफदारपणा दाखवला तो भारताला का नाही दाखवता आला?
स्टार-लिंकचा एयरटेल आणि जिओचा करार? तो होणार नाही असे म्हणताय? उत्साहाच्या भरात वैष्ण्व ह्यांनी "स्टारलिंकचे स्वागत असो" असे ट्वीट केले आणि नंतर डिलिट केले. म्हणजे मस्कसाठी पायघड्या घालायच्या आहेत हे आधीच ठरले आहे.
17 Mar 2025 - 5:43 pm | अमरेंद्र बाहुबली
अदाणीसाठी देश विकायला काढतील भाजपेयी!
17 Mar 2025 - 7:23 pm | रात्रीचे चांदणे
ट्रम्पच्या मागच्या कारकिर्दीतही बऱ्याच गोष्टींचे आयात शुल्क माफ केले होते. मग ते कोणाला वाचवायला होते? भारत सरकार अदानी ला नक्कीच वाचवत आहे. पण प्रत्येक गोष्टीत अदानी संबंध असेलच अस नाही. बर, अमेरिकेच्या कोर्टात अदानी विरुद्ध जो आरोप आहे त्यात त्या वेळची काँग्रेस शासित राज्यही आहेत.
17 Mar 2025 - 8:14 pm | श्रीगुरुजी
आयात शुल्क मुळातच जास्त होते. पण आधीच्या अध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. तस्मात् अदानीचा संबंध नाही. तसेही अमेरिकन व्हिस्की, हर्ले डेव्हिडसन् वगैरे भारतात किती जण घेतात?
मस्क व जिओ-एअरटेल यांच्यात करार झाला तर तो दोन कंपन्यामधील करार असेल. त्यात सरकारचा किंवा अदानीचा संबंध नाही.
17 Mar 2025 - 9:27 pm | आग्या१९९०
स्पेक्ट्रम तर सरकार देणार ना? मस्क सांगेल त्या अटी मान्य करणार का सरकार? जिओ आणि एअरटेल स्पेक्ट्रम लिलाव मागतात ,सरकार लिलावाच्या विरुद्ध आहे. त्यांना २जी प्रमाणे स्पेक्ट्रम द्यायचा आहे.
17 Mar 2025 - 9:32 pm | श्रीगुरुजी
झाला आहे का करार? कोणत्या तरंगलहरी मागितल्या? मस्कने कोणत्या अटी घातल्या?
17 Mar 2025 - 10:11 pm | आग्या१९९०
दोन वर्षापासून ते कालपर्यंतच्या starlink च्या भारतसंबंधीत बातम्या वाचा. सगळी माहिती मिळेल.
17 Mar 2025 - 10:46 pm | श्रीगुरुजी
करारावर सह्या झाल्या अशी बातमी कोठे आहे?
17 Mar 2025 - 10:21 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
असली माहिती सरकारतर्फे यायला हवी होती. त्यावर चर्चा झाली पाहिजे होती. पण अशावेळी पंतप्रधान वनतारात, जयशंकर लंडनमध्ये,वाणिज्य मंत्री अमेरिकेत.त्यांच्या ट्वीटवर , काहीही माहिती नाही. प्रत्येक़जण आपण त्या गावचेच नाही असा अभिनय करतोय.
१३ वर्षपुर्वी २-जी स्पेक्टम बद्दल भाजपावाले काय म्हणत होते- "पंतप्रधानांनी जनतेसमोर येउन खरे काय ते सांगितले पाहिजे.पण ते ए राजा ह्यांना वाचवु पाहत आहेत"
the party said that Home Minister P Chidambaram’s continuation in the Union Cabinet “had become untenable” and argued that the UPA Government had made Delhi “a capital of crony capitalism”.
https://www.newindianexpress.com/nation/2012/Feb/03/2g-scam-bjp-seeks-ex...
17 Mar 2025 - 10:50 pm | श्रीगुरुजी
उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी तुझी अवस्था झालीये माईडे. अजून काही झालंच नाही, कशाचा कशाला पत्ता नाही आणि तुला सरकारी निवेदनाची घाई झालीये.
फक्त साखरपुड्याचा दिवस ठरलाय आणि तू निघालीस त्या जोडप्याच्या नातवाच्या मुंजीसाठी कार्यालय ठरवायला.
17 Mar 2025 - 10:25 pm | सुक्या
बाजारात तुरी अन् भट भटनीला मारी .. असला प्रकार आहे हा..
17 Mar 2025 - 10:52 pm | श्रीगुरुजी
अगदी. अर्धवट अर्धसत्य बातम्या देणारा एकजण, एक सर्वज्ञ मोहिनी अवतार आणि एक येडं अगदी कासावीस झालेत.
17 Mar 2025 - 10:56 pm | आग्या१९९०
कासावीस कोण झालंय हे लवकरच कळेल.
17 Mar 2025 - 11:19 pm | श्रीगुरुजी
जेव्हा कळेल तेव्हाच थयथयाट करा की. इथे अजून लग्नाचा पत्ता नाही आणि निघाले नातवंडाची मुंज ठरवायला.
18 Mar 2025 - 10:38 am | माईसाहेब कुरसूंदीकर
इकडे मुलगा मुलीचा हात धरून, नव्हे खेचुन पळुन गेलाय. मुलगा बडबड करतोय.मुलगी गप्पच आहे. मुलाने वाट्टेल तो हुंडा मागावा आणि मुलीने फक्त लाजुन हसायचे. मुलीला मुलगा पसंत आहे की नाही हे मुलीकडच्या मंडळीना कळणार कसे?
पद्धतशीरपणे, पंचाग्,मुहुर्त वगैरे बघुन झाले असते तर हरकत नव्हती.
18 Mar 2025 - 11:22 am | श्रीगुरुजी
कोणीही कोणाचाही हात धरून पळालेले नाही. कोणीही कोणाला लग्नाकरता विचारवेले नाही किंवा हो सुद्धा म्हटलेले नाही.
सगळ्या तुझ्या मनातल्याच गप्पा माईडे. अजूनही तू पंचांग, मुहूर्त, पसंतापसंती, याद्या, हुंडा, मानपान,. देणीघेणी या काळातच वावरतीयेस.
17 Mar 2025 - 10:16 pm | अमरेंद्र बाहुबली
आमचं तात्या आहेच भारी! उगा नाही अडाणी आडून भारत सरकाटला गुडघ्यावर आणलं, गावात कुणाचं कुणाशी लफड, नी जगात कोणत्या सरकारचं कोणत्या उद्योगपतीशी लफड ह्याची खडानखडा माहिती तात्या ठेवतात. आणी वेळ आली की खटक्यावर बोट जाग्यावर पलटी करून इंगा दाखवतात. :)
18 Mar 2025 - 6:55 pm | श्रीगुरुजी
रमजान काळात बाटगे अधिक कट्टर होतात असं म्हणतात. ते खरं दिसतंय. अपेक्षेप्रमाणे उबाठा गट या मुस्लिम पक्षाच्या प्रमुखाने औरंग्या व अफजुल्याची कबर हटवायला विरोध केलाय. ओवेसी, अबू आझमी, शप गट, सुळे, आव्हाड, कॉंग्रेस यांची हीच भूमिका आहे.
18 Mar 2025 - 7:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
'छावा' चा परिणाम? लहान/तरूण पोरांचे पॉप्कॉर्न खात मल्टिप्लेक्सात रडणे समजता येते पण सुमारे ९ लाख कोटीचे कर्ज असलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधार्यांकडुन ही अपेक्षा नाही.
Those glorifying Aurangzeb are 'traitors': Eknath Shinde
https://www.thehindu.com/news/national/maharashtra/those-glorifying-aura...
उपमुख्यमंत्री,नगरविकास्,सार्वजनिक काम .. ही खाती. इकडे दिवे लावायचे सोडुन ३२५ वर्षपुर्वी निधन पावलेल्या औरंगझेब, त्याची कबर.. ह्यावर चर्चा. बहुसंख्य लोकांची टाळकी गरम करायची, नोकर्या,व्यवसाय,वाहतुक प्रश्न ह्यावरुन लक्ष वळवायचे.
स्वतःच्या संपत्तीत मात्र पाच वर्षात तिप्पट वाढ.
https://www.loksatta.com/maharashtra/cm-eknath-shinde-property-in-nomina...
18 Mar 2025 - 7:33 pm | अमरेंद्र बाहुबली
पुरोगामी महाराष्ट्र अविकसित नि अधोगामी करायचा चंग बांधला आहे भाजपेयीनी!
18 Mar 2025 - 9:04 pm | श्रीगुरुजी
अजूनही अनाजी दत्तो, भीमा-कोरेगाव, कृष्णाजी भास्कर, नथुराम, समर्थ रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव, स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्यावरच चर्चा. बहुसंख्य लोकांची टाळकी गरम करायची. नोकऱ्या, व्यवसाय, वाहतुक प्रश्न ह्यावरुन लक्ष वळवायचे. स्वतःच्या संपत्तीत मात्र पाच वर्षात तिप्पट वाढ.
19 Mar 2025 - 7:52 am | श्रीगुरुजी
19 Mar 2025 - 8:52 am | अमरेंद्र बाहुबली
19 Mar 2025 - 9:33 am | श्रीगुरुजी
बनावट चित्र.
19 Mar 2025 - 9:37 am | आग्या१९९०
चित्रातील सगळेच ' बनावट ' आहेत. मूळ रूप दाखवले तर सेन्सॉर होईल.
19 Mar 2025 - 10:01 am | श्रीगुरुजी
निर्भय बना.
त्यासाठी भेटा अथवा लिहा - असीम सरोदे, विश्वंभर चौधरी.
19 Mar 2025 - 10:16 am | अमरेंद्र बाहुबली
https://timesofindia.indiatimes.com/india/pm-modi-visits-mughal-ruler-ba...
कधी कधी शोध घ्यावा, संघ किंवा भाजपच्या आयटीसेल वर विसंबून राहू नये!
19 Mar 2025 - 11:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सद्य पंतप्रधान यांच्या विरोधात जे जे असतं ते ते सर्व खोटं असतं. व्यवस्थेच्या विरोधात जे जे असेल ते ते खोटं आहे, हे सांगण्यासाठी देशभर गोबरभक्तांची फळी उभी आहे. गोबरयुगात हे सर्व व्हायचंच. कोणी कितीही वरीजनल बातम्या दिल्या तरी त्या खोट्याच आहेत असे, गोबरपंथी अनुयायी म्हणत असतात. अर्थात, लोक आता असे मेसेजेस, बातम्या सर्व तपासून घेतात त्यामुळे थोडा फार विश्वास टीकून आहे, देश टीकून आहे. दुव्याबद्दल धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
19 Mar 2025 - 1:25 pm | श्रीगुरुजी
तो जफर होता, तुमचा लाडका औरंग्या नाही.
19 Mar 2025 - 8:33 am | रात्रीचे चांदणे
औरंग्याच्या कबरीचा मुद्दा भाजपच्या नेत्यांनीच काढलेला आहे. खालच्या नेत्यांनी कबर हटवण्याची मागणी करायची आणि मुख्यमंत्र्यांनी हटवता येणार नाही म्हणायचं. वरच्या कार्टून मधले आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका एकच आहे. नागपूर मध्ये ३० पोलिस जखमी झालेत तर महिला पोलिसांचे कपडे काढण्याचा प्रकार झाला. सध्याला कमकुवत विरोधी पक्ष, लाडकी बहीण सारख्या फुकट्या योजना, ED, CBI,ह्या मुळे भाजपा आणि इतर सत्ताधारी लोकांचं फावत आहे.
19 Mar 2025 - 10:07 am | माईसाहेब कुरसूंदीकर
'मुस्लिम वाईट होते/आहेत' चा प्रचार 'छावा'नंतर जोरात चालु झाला. किंबहुना छावाची निर्मीती ह्यासाठीच झाली होती असे म्हंटले तर वावगे ठरू नये.
19 Mar 2025 - 10:14 am | श्रीगुरुजी
'मुस्लिम वाईट होते/आहेत' चा प्रचार 'छावा'नंतर जोरात चालु झाला. किंबहुना छावाची निर्मीती ह्यासाठीच झाली होती असे म्हंटले तर वावगे ठरू नये.
'ब्राह्मण वाईट होते/आहेत', 'ब्राह्मणांनीच औरंग्याशी हातमिळवणी करून मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांना मारले' असा प्रचार 'छावा'नंतर जोरात चालु झाला. किंबहुना छावाची निर्मीती ह्यासाठीच झाली होती असे म्हंटले तर वावगे ठरू नये.
19 Mar 2025 - 10:17 am | आग्या१९९०
एका ठराविक वर्गाचा हा ' गनिमी कावा ' आहे. बहुजन वर्गातील युवकांनी ह्यास बळी पडू नये.
19 Mar 2025 - 10:46 am | रात्रीचे चांदणे
मुस्लिम वाईट होते/आहेत हे दुसऱ्यांना सांगायची गरज नाही. तेच स्वतः ह्यासाठी काम करत असतात.
19 Mar 2025 - 11:19 am | माईसाहेब कुरसूंदीकर
सारखे ईतिहास उकरून कोण काढतात्?कोणताही ऐतिहासिक पुरावे नसताना 'टिपु सुलतानाने लाखो हिंदुंना मारले" हे कोण सांगते? दिवसातून फक्त १० ते १५ मिनिटे प्रार्थनेची वेळ असताना त्यावर बंदी आणण्याची मागणी कोण करतात?"पाकिस्तानला चालते व्हा" हे कोण म्हणते? ३०० वर्षपुर्वि मरण पावलेल्या बादशहाच्या कबरीची चर्चा करायची गरज काय?
ट्रम्प तात्या/मस्क तिकडे भारताचा प्रत्येक अवयव पिरगळून टाकत असताना हिंदु राष्ट्रवाले गप्प. का?
चीनने अरूणाचलमधील अनेक गावांवर हक्क सांगितल्यावरही त्यांच्याशी दोस्तीची भाषा का ?
मुस्लिमांना चेपणे सोपे आहे पण ट्रम्प/चीनबद्दल काही बोलाल तर हे दोन्ही देश उरावर बसतील ही भीती?