गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला.
जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या.
जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले.
https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump...
https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump...
चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-p...
प्रतिक्रिया
1 Mar 2025 - 11:10 pm | अमरेंद्र बाहुबली
ह्यावर भारताची प्रतिक्रिया काय?
1 Mar 2025 - 11:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
परराष्ट्रमंत्री जयशंकर किंवा पंतप्रधानांकडुन अजुन तरी प्रतिक्रिया आलेली नाही.(निदान मी वाचलेली तरी नाही. असेल तर येथे लिंक द्यावी.) दरम्यान फ्रान्सच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया दखल घेण्याजोगी-
French President Emmanuel Macron posted: "There is an aggressor: Russia. There is a victim: Ukraine. We were right to help Ukraine and sanction Russia three years ago - and to keep doing so.
1 Mar 2025 - 11:13 pm | श्रीगुरुजी
माईडे,
यावर तुझ्या 'ह्यां'ची प्रतिक्रिया काय?
2 Mar 2025 - 8:17 am | माईसाहेब कुरसूंदीकर
ह्यांची प्रतिक्रिया आपल्या परराष्ट्र खात्याची असते तशीच आहे गुरुजी.
"आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेउन आहोत"
2 Mar 2025 - 8:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुड वन. पूर्वी 'इशारे' असायचे आता. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.
-दिलीप बिरुटे
2 Mar 2025 - 9:05 am | श्रीगुरुजी
माईडे,
जगातील मोजके देश सोडले तर कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. ज्यांचे हितसंबंध युक्रेनमध्ये आहेत फक्त त्यांनीच प्रतिक्रिया दिली. त्यातील अनेकांनी स्पष्ट भूमिका न घेता नरो वा कुंजरो वा अशीच तटस्थ प्रतिक्रिया दिली.
रशिया भारताचा मित्र आहे, अमेरिका भारताचा मित्र आहे व युक्रेन आणि भारताचे संबंध खूप जवळिकीचे नाहीत. अश्या परिस्थितीत भारताने तटस्थ राहणे किंवा मौन पाळणे हेच योग्य व बहुसंख्य देशांची हीच भूमिका आहे.
जाता जाता . . . ट्रंप अध्यक्षपदाच्या आपल्या पहिल्या कारकीर्दीत एक आक्रमक नेता म्हणून प्रसिद्ध झाले होते. परंतु अध्यक्षपदाच्या आपल्या दुसऱ्या कारकीर्दीत ते आक्रमकतेबरोबर उन्माद व वेडसरपणाचे प्रदर्शन करीत आहेत. एका देशाच्या सर्वोच्च नेत्याचा जाहीर अपमान करणे हे त्याचेच लक्षण आहे. दुर्दैवाने त्यांचा उपाध्यक्ष जेडी व्हान्स हा तसूभरही मागे नाही.
ट्रंपचा उन्माद दीर्घकालीन टिकणार नाही. दोन्ही पक्षांचे बहुसंख्य खासदार एकत्र येऊन ट्रंपचे उन्मादी निर्णय हाणून पाडतील व कदाचित ट्रंपविरूद्ध महाभियोग वगैरे आणून निक्सनप्रमाणे पायउतार होण्यास भाग पाडतील असे वाटते.
3 Mar 2025 - 3:19 pm | शशिकांत ओक
व्हाईट हाऊसमधली ती कुप्रसिद्ध भेट म्हणजे अगदी तमाशाच होता. डब्ल्यूडब्ल्यूईचे व्हिन्स मॅकमोहन यांना बसवून थेट प्रेक्षकांसमोर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे डोके मुंडवले होते तेव्हाची आठवण झाली! एक अपमानास्पद झेलेन्स्कीची भेट स्क्रिप्टेड वाटली आणि मला खात्री आहे की यामुळे अनेक जागतिक नेत्यांच्या तोंडात वाईट चव आली. त्यानंतर अमेरिकेला भेट देऊन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे काही मदत मागण्याची कोणाची छाती असेल? जागतिक स्तरावर आपली लाज काढण्याचा कार्यक्रम का आणि कशासाठी कोणी ओढवून घेईल?
3 Mar 2025 - 3:38 pm | अमरेंद्र बाहुबली
मुळात झेलेनस्कीने मूर्खपणा केलाय हे तात्यांचे देखील मत आहे नि तात्यांनी लवकर युद्ध संपवा असे संकेत दिलेत, आता युद्ध रशियाच्याच अटींवर संपेल हे सगळ्यांच्याच लक्षात आलंय कारण जो काही हाग्यादम रशियाला द्यायचा तो आधीच नाटो देशांनी दिलाय, त्याचा रशियावर मोठा परिणाम झालेला नाहीये, भरपूर पैसे नी युद्ध सामुग्री युद्धात ओतून झालीय तरीही रशिया मागे हटला नाहीये. तिसरं महायुद्ध परवडणार नाहीये कारण रशिया मिटेल तर अख्खा युरोप नि अमेरिका अणुबॉम्ब टाकून मिटवून मगच मिटेल, त्यामुळे आता आहे तेव्हडा भूभाग ताब्यात ठेऊन उरलेला युक्रेन घेऊन गप बसने इतकेच काय ते झेलेनस्कीच्या हातात, तात्यांनी पुढाकार घेऊन पुतीनना समजावले तर कदाचीत पुतीन व्यापलेला भागही सोडून मागे जाऊ शकतात कारण पुतीन तात्यांच्या शब्दाबाहेर नाही, तात्यांचे वजन आहे आजही पुतीन ह्यांच्याकडे. तेव्हा तात्या जे काही सांगताहेत ते झेलेनस्कीने ऐकावे, उगाच भर पत्रकार परिषदेत तात्यांचा अपमान करू नये , तात्यांनी जग पाहिलेय उगाच तात्यांचे केस पांढरे झालेले नाहीत , अनुभवाचे बोल आहेत.
- तात्यांचा पंखा अमरेंद्र बाहुबली!
3 Mar 2025 - 3:41 pm | चंद्रसूर्यकुमार
म्हणूनच आपल्या राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी 'माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझे चिन्ह चोरले' ही तक्रार घेऊन वॉशिंग्टनला जावे आणि ट्रम्पतात्यांना त्याविषयी काहीतरी करायची गळ घालावी असे फार वाटते :)
3 Mar 2025 - 8:59 pm | अमरेंद्र बाहुबली
एकाला माझी पदवी खरी आहे असे "माय फ्रेंड डॉलांड" कडून बोलवून घ्यायची संधी आहे. :)
1 Mar 2025 - 11:23 pm | आग्या१९९०
मी झेलेंस्कीला ५६ इंची छाती भेट दिल्याने त्याने " लाल आंख" दाखवले ट्रम्पला असे म्हणेल.
2 Mar 2025 - 12:33 am | अमरेंद्र बाहुबली
खिक्क!
2 Mar 2025 - 8:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हरे कृष्ण. =))
-दिलीप बिरुटे
2 Mar 2025 - 8:53 am | श्रीगुरुजी
नेहमीच्याच यशस्वी कलाकारांना हा एक नवीन दिव्याचा खांब किंवा पोस्टाची पेटी सापडली.
2 Mar 2025 - 12:48 pm | श्रीगुरुजी
महाराष्ट्रात या एकमेव राज्यात थोडे अस्तित्व असलेला पक्ष पूर्ण संपून कबरीत जाऊन कयामतच्या दिवसाची वाट पाहतोय आणि निघाले केरळमध्ये जेथे काळं कुत्रं सुद्धा विचारत नाही.
2 Mar 2025 - 5:30 pm | अमरेंद्र बाहुबली
काळजी नसावी ! जो पर्यंत पृथ्वीवर शेवटचा मराठी माणूस आहे तो पर्यंत शिवसेना पक्ष राहील, शिवसेना संपण्याच्या वल्गना करण्यात मागच्या 3 पिढ्या खपल्या पुढच्या 30हि खपल्या तरीही शिवसेना राहीलच! केरळ मध्ये सत्ता, पैसे, ईडी , निवडणूक आयोग, तोड्यापाण्या कारण्याची सर्व साधने एवढे सगळे असूनही भाजपचे हाल काय आहेत ते पहा.
केरळात भाजप नाhiकारण केरळ हे भारतातील सर्वात सुशिक्षित राज्य आहे, भाजपचा प्रभाव फक्त शेणपट्ट्यात
2 Mar 2025 - 5:56 pm | श्रीगुरुजी
वृक्षावर माजलेलं बांडगूळ उखडून फेकल्यानंतर जगणार कसं? आता चिवशेणा थेट कयामतच्या दिवशी कबरीतून उठेल आणि मग आपल्या पापपुण्याचा हिशेब अल्लाला द्यावा लागेल.
2 Mar 2025 - 6:13 pm | अमरेंद्र बाहुबली
बांडगुळ वृक्षापेक्षा मोठं झालं तरी बांडगुळ ते बांडगुळंच. ज्या वृक्षाच्या बांडगुळ वाढले तो वृक्षच कापायला निघालंय पण बांडगुळ हे विसरले कि वृक्ष बांडगुळाला वाढवू शकतो तसा मिटवूही शकतो. एक दिवस भ्रष्टाचारी जनता पार्टीला मिटायचे आहे. मिटल्यावर मग कयामतच्या दिवशीही उठणे शक्य नाही, कोणताही विश्वगुरू वाचवू शकणार नाही. तसेही खोटे जास्त काळ चालत नाही.
2 Mar 2025 - 7:04 pm | श्रीगुरुजी
तरी बांडगुळ ते बांडगुळंच.
अगदी बरोबर. मुस्लिम लीग, समाजवादी पक्ष, कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अश्या अनेक वृक्षांवर माजूनही शेवटी बांडगूळ ते बांडगूळच.
तसेही खोटे जास्त काळ चालत नाही.
आमेन. म्हणून तर जनतेने चिवशेणेला मूठमाती दिली.
2 Mar 2025 - 7:24 pm | अमरेंद्र बाहुबली
जळत रहा असेच. शिवसेना नेहमीच मराठी माणूस, हिंदुत्व नि मुंबई ला वाचवत राहील !
2 Mar 2025 - 7:41 pm | श्रीगुरुजी
चिवशेणा बिहारींनी स्थापन केलेला महाराष्ट्रद्रोही व मुस्लिमधार्जिणा पक्ष आहे. हिंदू, मराठी माणसे व मुंबईला अश्या उपऱ्यांची अजिबात आवश्यकता नव्हती, नाही व नसेल.
2 Mar 2025 - 8:04 pm | अमरेंद्र बाहुबली
खो खो! विनोदबुध्धीला दाद तुमच्या!
3 Mar 2025 - 8:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विषयच संपला. जय महाराष्ट्र.
-दिलीप बिरुटे
3 Mar 2025 - 9:19 am | श्रीगुरुजी
खरं आहे. शिवसेना हा विषय केव्हाच संपलाय. शिवसेनेचे जे थोडेफार समर्थक होते त्या सर्वांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय.
3 Mar 2025 - 11:25 am | अमरेंद्र बाहुबली
जय महाराष्ट्र !
3 Mar 2025 - 9:47 am | माईसाहेब कुरसूंदीकर
"आज केरळ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या त्रिचुर येथील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले."
१९९५/९६ साली मनोहर जोशी ह्यांनी लंडनमध्ये शिवसेना साखेचे उद्घाटन केले होते त्याची आठवण झाली.
केरळमध्ये भुवन चंद्रन नावाचे एक शाखा चालवतात असे दिसते आहे. फोटोंवरुन उद्धव केरळमध्ये अनेकवेळा जातात असेही दिसते आहे.
uddhav
3 Mar 2025 - 10:48 am | चंद्रसूर्यकुमार
अहो माई, तसे राहुल गांधी अनेकदा थायलंडला जातात. पण म्हणून ते थायलंडमध्ये काँग्रेसची शाखा काढायला जात नाहीत.
3 Mar 2025 - 11:05 am | श्रीगुरुजी
उठांनी चंद्रावर सुद्धा शिवसेना शाखा काढली आहे.
4 Mar 2025 - 1:32 am | रामचंद्र
तसा गेल्या सातआठ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही केरळात अस्तित्वात आहे. भाजपचाही प्रथमच एक खासदार तिथून निवडून आला आहे. आणि भाजपची जरी ही सुरुवात असली तरी संघ तिथे इतक्या वर्षांपासून विरोधी सरकार असूनही पाय रोवून आहे.
3 Mar 2025 - 1:07 am | सुक्या
जगदंब !! जगदंब !!
3 Mar 2025 - 10:53 am | कपिलमुनी
महाराष्ट्राच्या बुडाला आग लागली आहे .. यू पी बिहार सारखे गुन्हे घडत आसताना दुसर्यांच्या नाकातला शेंबूड बघण्याची नेते आणि भक्त यांची धडपड मजेशीर आहे
3 Mar 2025 - 11:25 am | अमरेंद्र बाहुबली
+१
3 Mar 2025 - 11:42 am | आग्या१९९०
भाजप महिला नेत्या आणि महिला कार्यकर्ते कोणत्या विश्वासाने पक्षाला समर्थन देत आहेत हेच कळत नाही. बलात्कारी कैद्यांची सुटका, त्याच्या आरत्या ओवाळून स्वागत, मणिपूरसारख्या घटनांकडे केंद्राचे जाणूनबुजून कानाडोळा करणे इ. आता महाराष्ट्रात केंद्र सरकारमधील एका महिला नेत्याच्या मुलीला छेडछाड केली जाते तरी त्याची दखल घेतली जात नाही. हा पक्ष महिलांना गृहीत धरतो आहे, नव्हे त्याच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी गृहीत धरत आहे. आता स्वाभिमान की एकनिष्ठता ह्यापैकी एकाची त्यांना निवड करण्याची वेळ आली आहे.
3 Mar 2025 - 11:52 am | अमरेंद्र बाहुबली
+१
पूर्वी अश्या घटना up त घडल्याच्या बातम्या यायच्या आता महाराष्ट्रातून अश्या बातम्या येताहेत, महाराष्ट्राचा युपी करून गुजरातला महाराष्ट्राच्या पुढे न्यायचे भाजपचे स्वप्न दिसतेय .
3 Mar 2025 - 12:38 pm | सुक्या
गादी रुळावर आणतो जरा.
व्हाईट हाउस मधे झालेल्या ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की चर्चेच्या फियास्को नंतर आता युरोपियन देश आपली आपली सैन्य पथके युक्रेन ला लढायला पाठवणार आहेत. आतापावेतो हे युध्द रशिया व युक्रेन या दोन देशांमधेच आहे. उत्तर कोरीयाचे सैनिक जरी लढाई करत असले तरी अजुन त्यावर कुणी आक्षेप घेतला नाही. आता मात्र ईतर देशांचे सैन्य जर रशिया वर चाल करुन गेले व रशिया ने उत्तरादाखल हल्ला केला तर नेटो देश त्यांचा अर्टीकल ५ लागु करु शकतात. ह्यात एका देशावर झालेला हल्ला हा सगळ्यांवर झालेला हल्ला मानला जातो व ईतर देश युध्दात उतरु शकतात. कदाचीत नेटो नियमावलीला बांधला असल्याने अमेरिका पण त्यात उतरु शकतो. ही तिसर्या जागतीक महायुध्दाची नांदी ठरेल.
कदाचीत त्यामुळे पण अमेरिका मागे राहु ईच्छीते. नुकताच अफगानिस्तानातुन माघार घेउन नाक ठेचुन घेतले आहे. त्यामुळे आख्खे युरोप जरी युक्रेन च्या मागे असले तरी त्याचा युक्रेनला फायदा होनारच नाही. नेटो देशांमधे अमेरिका जवळ्पास ७०% भार उचलतो. त्यामुळे जर नेटो मधुन अमेरिका बाहेर आले तर ती संघटना बरखास्त होइल हे मात्र नक्की.
बघु काय होते ते पुढे....
3 Mar 2025 - 1:01 pm | अमरेंद्र बाहुबली
ह्यात काही झाले तरीही वाट मात्र युक्रेनचीच लागणार , युरोपीय देशांना रशिया काय आहे हे चांगलेच माहित आहे, अमेरिकेच्या खांद्यावर बसून बेडकुळ्या दाखवत होते, अम्रेकीशिवाय मैदानांत उतरले तर रशिया अख्खा युरोप भाजून काढेल , मूर्ख झेलेनस्कीने रशियाशी पंगा घ्यायला नको होता .
पुतीनशी वाकडं त्याचे नदीवर लाकडं
पुतीनशी नीट त्याला सोन्याची वीट
3 Mar 2025 - 6:55 pm | रामचंद्र
भाजपसमर्थकही नेमकं हेच म्हणत आहेत.
3 Mar 2025 - 7:58 pm | अमरेंद्र बाहुबली
ते? ते फेकाफेकी करतात! वार रोकदी पॉ पॉ ! :)
3 Mar 2025 - 2:43 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"मूर्ख झेलेनस्कीने रशियाशी पंगा घ्यायला नको होता ."
तुमच्या देशावर कोणी आक्रमण केले तर तुम्ही पंगा नाही घायचा? रशिया बलाढ्य आहे, पुतिन क्रूर आहे हे मान्य पण युक्रेनकडे काय आहे?
The natural gas transmission system of Ukraine is a complex of pipelines for import and transit of gas in Ukraine. It is one of the largest gas transmission systems in the world
https://en.wikipedia.org/wiki/Natural_gas_transmission_system_of_Ukraine
Ukraine is an important transit country for oil and natural gas from Russia to Europe
3 Mar 2025 - 3:06 pm | अमरेंद्र बाहुबली
तुमच्या देशावर कोणी आक्रमण केले तर तुम्ही पंगा नाही घायचा?
रशियाची माफक मागणी इतकीच होती कि युक्रेनने नाटो मध्ये जाऊ नये, कांरण नाटोच्या सीमा थेट रशियाला भिडल्या असत्या! आणी ती मागणी न्याय्य देखील होती, कुठलाही देश आपली सुरक्षा प्रथम पाहणार, रशियाने तेच केले! cubaला सोविएतने अणुबॉम्ब ठेवल्यावर अमेरिकेने किती थयथय केली होती?
आपल्यावर रशियाने हल्ला केला तर युरोपीय देश नि अमेरिका लगेच धावून येतील अशी मूर्ख झेलेनस्कीची अटकळ होती पण कुणी कुत्रही त्याला विचारायला आलं नाही, युद्धसामुग्री तेवढी दिली पण मारायला युक्रेनचे लोक नि सैन्यच होते, आता तात्यानी देखील हात वर केलेत, बस म्हणा बोंबलत मूर्ख झेल्या लेका!
3 Mar 2025 - 8:33 pm | आग्या१९९०
"मूर्ख झेलेनस्कीने रशियाशी पंगा घ्यायला नको होता ."
मूर्ख कोण हे सांगता येणार नाही, परंतु तीन वर्ष युक्रेनने पुतीनला युद्धात प्रतिकार केला तो एकट्या अमेरिकेच्या जीवावर नाही हे ट्रम्पला फ्रान्स आणि ब्रिटनने सुनावल्यानंतर ट्रम्प गडबडला आहे. संपूर्ण युरोप अमेरिकेच्या विरोधात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खुद्द अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक ट्रम्पच्या वेडेपणाला विरोध करू लागले आहे . ट्रम्प विरोधात महाभियोगाची शक्यता वाढली आहे.
3 Mar 2025 - 8:47 pm | अमरेंद्र बाहुबली
तात्यांवर महाभियोग चालला तरीही युक्रेनी जनतेवर जे रशियन अत्याचार चालू आहेत ते थांबणार आहेत का? उद्या तात्या गेले नि दुसरा आलं तो जास्तीत जास्त काय करेल? युक्रेनला भरपूर शस्त्र लढण्यासाठी देईल नि अजून सैनिक नि नागरिक मरतील ! हा काय उपाय झाला का? युक्रेन ची लोक पळतील नि मरतील फक्त !
झेलेनस्कीच्या पुढच्या 50 पिढ्या खपल्या तरीही युक्रेन रशियाविरुद्ध युद्ध जिंकणे अशक्य आहे, अहो जिथे हिटलरचे शिस्तबद्ध नाझी 87 लाख रशियन मारूनही रशिया जिंकू शकले नाहीत तिथे हे दरिद्री युक्रेनी जिंकणार आहेत का? तात्या सांगत आहेत कि युद्ध थांबवा, युद्ध थांबणे हे युक्रेनच्याच भल्याच आहे, नि तात्या युक्रेनच्या भल्याचाच विचार करत आहेत. अमेरिका नी युरोपच्या इतर देशांच्या बापाचं काय जातंय युद्ध सुरु ठेवा म्हणून सांगायला? मरत तर युक्रेनी आहेत ना? आला का कुणी मायका लाल ब्रिटिश, फ्रेंच जर्मन किंवा पॉलिश युक्रेनीच्या खांद्याला खांदा लावून लढायला?
तात्या सांगताहेत त्यातच युक्रेनच नि जगाचं भलं आहे.
3 Mar 2025 - 9:11 pm | आग्या१९९०
पुतीन धूर्त अजगर आहे, युक्रेन सहज गिळता येईल असे वाटल्याने हल्ला केला होता. त्याचाही डोळा तेथील दुर्मिळ खनिजांवर होता. युद्ध करून ती खनिजे मिळवणे आर्थिकदृष्ट्या खर्चिक झाल्याने युद्ध थांबवून ट्रम्प आणि पुतीन खनिजे वाटून खाण्याची स्वप्ने पहात आहेत. मेलेले कोंबडं आगीला भित नाही , त्यामुळे झेलेंस्की नमते घेत नाही. नमते घेतले तर दोन मोठे हुकूमशहा जगाला वेठीस धरणार हे ठाऊक असल्याने युरोप ट्रम्प विरोधात गेला आहे. ट्रम्पला नमते घ्यावेच लागणार आहे.
3 Mar 2025 - 9:20 pm | अमरेंद्र बाहुबली
युक्रेन सहज गिळता येईल असे वाटल्याने हल्ला केला होता.
हा भ्रम जाणून बुजून पसरवण्यात आला आहे, मुळात युक्रेन जिंकणे हा पुतिनच्या डाव्या हाताचा मळ! पण जा युक्रेन जिंकले तर युक्रेनची संपूर्ण जबाबदारी रशियावर येईल नि संपूर्ण जग रशिया विरोधात जाईल हे वेगळे! युद्ध चालू असताना अत्याचार केले तर कुणीही बोंबा मारत नाःई पण प्रदेश जिंकून मग अत्याचार केले तर अख्ख जग बोंबलेल. मुळात युद्ध चालू ठेवण्यातच रशियाचे भले आहे , युद्ध चालूच राहिले तर युक्रेन कधीही शांत राहणार नाही सतत युद्धग्रस्त राहील, नि शेजारच्या इतर देशांना योग्य तो संदेश जाईल, पुतीन एकाच वेळी युक्रेनच्या लोकसंख्येइतके सैन्य मैदानात उतरवू शकतो पण असं करणे रशियाच्या नुकसानीचेच आहे.
3 Mar 2025 - 9:24 pm | अमरेंद्र बाहुबली
राहीला प्रश्न झेलेनस्कीचा तर तो एक मोठा मूर्ख आहे, पाण्यात राहून माशाशी वैर घेऊ नये! हे त्या मूर्खाला कळू नये? आपण कोण? आपले भौगोलिक स्थान काय? आपले शेजारी कोण? काय केले म्हणजे काय होऊ शकते? ह्याची जाणीव नसल्यानेच त्या मूर्खाने युक्रेनला युद्धात ढकलले नी त्याच्यामुळी लाखो युक्रेनी सैनिक नी नागरिक परगंदा झाले किंवा गचकले!
3 Mar 2025 - 9:26 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
आपण रशियाला हरवु शकत नाही हे झिलिन्स्कीना सुरुवातीपासुनच ठाउक आहे पण पुतिनचे सगळे ऐकले तर मैत्रीचे ढोंग करुन पुतिन झिलिस्कीला विष घालुन मारायलाही कमी करणार नाही. पुतिनने ते प्रयोग ह्याआधीही केले आहेत. सध्यातरी ट्रम्पचा मूर्खपणा आणी पुतिनचा नालायक्पणा झिलिन्स्कीच्या चर्चेने जगासमोर पुढे आला एवढेच आता म्हणता येते.
3 Mar 2025 - 9:36 pm | आग्या१९९०
सध्यातरी ट्रम्पचा मूर्खपणा आणी पुतिनचा नालायक्पणा झिलिन्स्कीच्या चर्चेने जगासमोर पुढे आला एवढेच आता म्हणता येते.
अपरिपक्वतेमुळे दोघेही फसले आहेत.
3 Mar 2025 - 8:33 pm | चित्रगुप्त
अबांचे प्रतिसाद रोचक वाटत आहेत, आणि अवैध मार्गाने अमेरित घुसणार्या भारतियांना ट्रंप तात्या आता पनामात रवाना करत आहेत, हे लईच आवडले.
3 Mar 2025 - 9:50 pm | श्रीगुरुजी
ट्रंप आत्मघातकी मार्गावर आहे. एका सार्वभौम राष्ट्रप्रमुखाला बोलवून जाहीर पाणउतारा करणे हे अत्यंत मूर्खपणाचै वागणे आहे. त्यामुळे युरोपियन देश व सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडलेले इतर देश यांची एकजूट होऊ शकते. अमेरिकी जनतेला व बहुसंख्य खासदारांना हे फारसे आवडेल असे वाटत नाही. ट्रंप बहुसंख्य अतार्किक निर्णय तेथील न्यायालय व खासदार हाणून पाडल्यास नवल वाटणार नाही. आधी लिहिल्याप्रमाणे कदाचित महाभियोग आणून ट्र्पला हटविले जाऊ शकते. पण तसे झाल्यास व्हान्स अध्यक्ष होईल व तो ट्रंपपेक्षाही उथळ वाटतोय.
झेलेन्स्कीसाठी सहानुभूती व आदर वाटतोय. एका प्रचंड बलाढ्य महासत्तेला ३ वर्षे लढत दिली. डेव्हिड व गोलियाथची लढाई आहे ही.
3 Mar 2025 - 10:11 pm | अमरेंद्र बाहुबली
झेलेन्स्कीसाठी सहानुभूती व आदर वाटतोय. एका प्रचंड बलाढ्य महासत्तेला ३ वर्षे लढत दिली. डेव्हिड व गोलियाथची लढाई आहे ही.
काहीही! मुळात नाटो मध्ये जाऊन युक्रेनी जनतेचा असा कोणता फायदा होणार होता? एकवेळ युरोपियन युनियन मध्ये घुसायचा प्रयत्न केला असता तर झेलेनस्कीचा लढा दाखल घेण्याजोगा होता, मात्र नाटोसाठी युद्ध करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा!baaki तात्यांनी असं भर पत्रकार परिषदेत भांडण करायला नको होते मान्य
4 Mar 2025 - 12:56 am | कॉमी
अबा तुम्ही फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या.
युक्रेनला नाटो मध्ये जावे असे का वाटते? नाटो चे कार्ड दिसायला छान आहे हे कारण आहे की आणि काही?
4 Mar 2025 - 12:57 am | अमरेंद्र बाहुबली
युक्रेनला नाही. झेलेनस्कीला वाटते, ते का वाटते त्याचे त्यालाच माहीत!
4 Mar 2025 - 1:52 am | कॉमी
असे म्हणून कसे भागेल? तुम्ही गुणोत्तराचा अर्धा भाग बघून उत्तर सुटले म्हणताहात.
4 Mar 2025 - 8:18 am | अमरेंद्र बाहुबली
तुम्ही सांगा मग उरलेला अर्धा भाग!
4 Mar 2025 - 10:27 pm | रामचंद्र
अबा,
किमान अंगकाठी आणि तोंडावळा या बाबतीत तुमच्यात आणि त्या झेलेन्स्कीत भलतंच साम्य आहे हे तुमच्या लक्षात आलंय का?
4 Mar 2025 - 12:50 pm | श्रीगुरुजी
पहिली विकेट गेली. हा फलंदाज बाद होऊ नये यासाठी दोन्ही बाजूचे खेळाडू, पंच, रेफ्री, दोन्ही बाजूचे कर्णधार वगैरेंनी आटोकाट प्रयत्न करूनही शेवटी विकेट गेलीच.
4 Mar 2025 - 1:09 pm | रामचंद्र
जरब बसेल अशी कारवाई 'आश्रयदात्यां'वर होण्याची शक्यता शून्य आहे. लोकक्षोभाचा स्फोट होण्याची वेळ येईपर्यंत प्रकरण लांबवायचं आणि मग थातुरमातुर कारवाई केल्यासारखं करून प्रकरण दडपून टाकायचं यात विद्यमान राज्यकर्ते तरबेज आहेत. मात्र या निमित्ताने या विषवल्लीची सर्वच पाळेमुळे खणून काढली गेली तर उत्तमच.
4 Mar 2025 - 12:58 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
युक्रेनची 'नेटो' सभासद होण्याची ईच्छा १९९४ पासुनची आहे. सगळी माहिती https://en.wikipedia.org/wiki/Revolution_of_Dignity आहे.
२०१४ पासुन, रशियाने युद्ध चालु केल्यापासुन युक्रेन धुमसतो आहे.तत्कालिन अध्यक्ष यनुकोव्हिक हे युक्रेनने रशियाच्या गटात सामिल व्हावे पण युरोपियन युनियनबरोबर मुक्त व्यापार न करण्याच्या मताचे होते. त्याविरोधात जोरदार आंदोलने झाली आणि त्यांना पायउतार व्हावे लागले. युक्रेनच्या नागरिकांमध्ये रशियाबद्दल कमालीची चीड होती आणी आहे. राजकीय हस्त़क्षेप, दमनतंत्र आणि दुसर्या देशातील पुढार्याना पैसे खायला घालुन व्यवस्था खिळ्खिळी करणे हे रशियाचे उद्योग आहेत.
"झिलिन्स्की मूर्ख लेकाचा, काहीच कळत नाही त्याला' असे म्हणणे म्हणजे आपला राजकीय बुद्द्ध्यांक ट्रम्पएवढाच आहे असे मान्य करण्यासारखे आहे.
4 Mar 2025 - 2:32 pm | अमरेंद्र बाहुबली
माईडे, युद्ध सुरू करण्याआधी मुत्सेड्डेगिरी वगैरे काही पायऱ्या असतात, कुठलाही देश शेवटच्या पायरीतच युद्ध सुरू करतो, युक्रेन रशियाच्या गोटात जावो अथवा अमेरिकेच्या अथवा तटस्थ राहो, सर्वात महत्त्वाचे आहे युक्रेनच्या लोकांची सुरक्षितता. रशिया हा काही पुचाट देश नाही, आपल्या शेजाऱ्याशी भांडण करताना आपल्या मागे कुणीतरी ताकदवान देश उभा आहे का हे तरी त्या मूर्ख झेलेनस्कीला कळायला नको? दिला देश ढकलून रशियापुढे! आता रशिया साधं चोपणार आहे का? आजूबाजूचे बेलारूस वगैरे देश मूर्ख आहेत का? रशियन पंखाखाली गेलेले? आणी इतके करून मिळवले काय झेलेनस्कीने तर 20 टक्के भूभाग गेला नी लाखो लोक स्थलांतरित झाले हजारो मेले, ह्यामुळे झेलेनस्की "मूर्ख लेकाचाच " आहे.
तात्या जे सांगताहेत तेच युक्रेनच्या हिताचे आहे, युद्ध थांबवणे, तात्या सगळ्यांसमोर राग राग करतात पण आतून मनाने फार चांगले आहेत, सिनेट सदस्यांनी हे समजून घ्यावे व तात्यांविरुद्ध उगाच काहीतरी महाभियोग वगैरे आणू नये.
आणी आपण तात्यांच्या बुध्यांक हि काढू नये, तात्यांनी उगाच का दोनवेळा निवडणूक जिंकली? कमळाबाई हॅरिसला जुमानले नाही की हिलरी मावशीला शरन गेले नाही, ते हि प्रामाणिकपणे लढून आपल्यासारखे नाही ईडी सीबीआय विरोधकांवर सोडले, की पक्षात या घोटाळे माफ करतो धोरण राबवले, ना चार दोन गद्दार हाताशी धरून पक्ष फोडले ना निवडणूक आयोगाचा गैरवप करून ईव्हीएम हाताळून राज्य जिंकले, तात्यांनी जे काही केले त प्रामाणिकपणे नी समोर! त्यामुळे तात्यांचा बुध्यांक वगैरे काढू नका. तात्या इस लब!
4 Mar 2025 - 9:41 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अजूनपर्यण्त ७०,००० रशियन सैनिक युक्रेनने ढगात पाठवले आहेत. युक्रेनचेही त्याहुन अधिक म्रुत्युमुखी पडले आहेत हे नक्की. पण हे असेच चालु ठेवले तर रशियाचेही नुकसान आहेच.
4 Mar 2025 - 9:47 pm | अमरेंद्र बाहुबली
माईडे किती भोळी गं तू? ज्या देशाने दुसऱ्या महायुद्धात २.५ कोटी जनता नी ८७ लाख सैनिक गमावले त्या देशाला ७० हजार सैनिकांनी फरक पडणार आहे का? हे काय नुकसान म्हणायचे का? नाटो बाजूला येत असेल तर रशियाने शक्य ती ताकद लावून हा प्रयत्न हाणून पडायला हवा हे एक देश म्हणून रशियाचे कर्तव्य आहे.
4 Mar 2025 - 1:47 pm | श्रीगुरुजी
महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राला लाभलेला सर्वोत्तम गृहमंत्री म्हणजे देफ. त्यांचं नुसतं नाव काढलं तरी गुन्हेगार थरथर कापतात. त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्र गुन्हेगारमुक्त झाला आहे. एक हजार गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एकाही गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई होऊन देणार नाही व एकाही निरपराध्याला न्याय मिळून देणार नाही अशी त्यांनी राज्यघटनेवर हात ठेवून शपथ घेतली आहे व त्या शपथेचे ते काटेकोर पालन करतात.
4 Mar 2025 - 2:09 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
युपी बिहारला लाजवेल अश्या प्रमाणावर महाराष्ट्रात गुन्हेगारी सुरु झालीय , परंतुएक गुन्हेगाराचा आका असतो जो सेटिंग लावून गुन्हेगाराला वाचवतो, त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नाहीये, खिन्न मर्डर तर नित्याचेच झालेत, गुन्हेगार तर "coming to yerwada" असं स्टेटस ठेऊन मुडदे पाडत आहेत, एकंदरीत महाराष्ट्र चुकीच्या हातात गेलाय एवढं मात्र निश्चित!
4 Mar 2025 - 3:48 pm | स्वधर्म
एका तरी कट्टर भाजप समर्थकाला आता त्यांचे राज्यातील मुख्यमंत्री व भाजपचे वजनदार नेते हे जनतेच्या अहिताचे निर्णय घेत आहेत, हे लक्षात आले शेवटी! लवकरच महानेतेही असेच करतात (आठवा: ब्रीजभूषण सिंह), हे समजू लागेल ही आशा.
4 Mar 2025 - 3:59 pm | रामचंद्र
आता संबंधित महान व्यक्तीचं पक्षात घेऊन पुनर्वसन का नुसतंच पुनर्वसन होणार, एवढीच उत्सुकता आहे. अन्यायग्रस्त मृत व्यक्तीला खराखुरा न्याय मिळणार नाही याची खात्रीच आहे.
4 Mar 2025 - 2:43 pm | आग्या१९९०
देशालाही उत्तम गृहमंत्री लाभलाय. मणिपूर प्रकरण हे उत्तम उदाहरण आहे.
4 Mar 2025 - 2:46 pm | आग्या१९९०
ज्या ज्या राज्यात डबल इंजिन सरकार आहे तिथे तर रामराज्यच अवतरले आहे.
4 Mar 2025 - 4:30 pm | दीपक११७७
झेलेनस्की ने जर युद्धच्या आधीच अमेरिके सोबत खनिज उत्खनन करण्यासाठीचा करार केला असता तर त्याला देशा करिता हवे असलेले संरक्षण दहा-पंधरा वर्ष आपसुकच मिळाले असते सोबतच रॉयल्टी देखील आणि जीव आणि संपत्तीचा नाश टाळता आला असता.
4 Mar 2025 - 5:16 pm | आग्या१९९०
युद्धामुळे युक्रेनची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे, त्यामुळेच रशिया आणि अमेरिका घायकुतीला आले आहेत. युद्ध रशियाने सुरू केले आहे त्यानेच थांबवले पाहिजे. ट्रम्पने पुतीनवर दबाव आणायला हवा,परंतु भिकारडा खनिजांसाठी झेलेंस्कीला दमदाटी करतोय.
4 Mar 2025 - 5:53 pm | दीपक११७७
क्रिमिया घेतल्या नंतर २०१४ पासून युक्रेनच्या थिंक टँक ने यावर विचार करायला हवा होता ।
4 Mar 2025 - 6:34 pm | चंद्रसूर्यकुमार
अमेरिकेने १९९४ मध्ये करार करून युक्रेनला परकीय आक्रमणापासून संरक्षणाची हमी दिली होती. त्याचे काय झाले? तो करार असताना आणखी नव्याने करार करून संरक्षणाची हमी का मिळवायला हवी होती? २०१४ मध्ये रशियन वंशाच्या यानुकोविच या अध्यक्षाला युक्रेनच्या लोकांनी ऑरेंज रिव्होल्युशन करून पळवून लावले तेव्हा रशियाने युक्रेनचा क्रायमिया हा भाग गिळंकृत केला होता. तसा क्रायमिया एकेकाळी रशियाचाच भाग होता आणि १९५४ मध्ये निकिता ख्रुश्चोव्ह अध्यक्ष असताना तो युक्रेनला दिला गेला होता. काहीही असले तरी २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने क्रायमिया हा युक्रेनचाच भाग होता. मग तो भाग रशियाने गिळंकृत केला हा खरं तर युक्रेनच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला होता. मग १९९४ च्या कराराप्रमाणे अमेरिकेने युक्रेनचे संरक्षण करायला हवे होते ना? पण शांततेचे नोबेल जिंकलेले ओबामा बघत बसले आणि अमेरिकेने त्या बाबतीत काहीही केले नाही. अमेरिकेची दादागिरी इराक, अफगाणिस्तान, लिबिया, ग्रेनाडा वगैरे अमेरिकेच्या अरेला कारे करू न शकणार्या देशांविरोधातच असते. समोर पुतीन हा माथेफिरू बसलेला असल्याने क्रायमिया प्रकरणी हस्तक्षेप केला असता तर पुतीनने थेट तिसरे महायुध्दच चालू केले असते म्हणून अमेरिका गप्प बसली. तेव्हाच युक्रेनच्या नेत्यांना अमेरिकेवर विसंबून राहण्यात अर्थ नाही हे समजायला हवे होते. तरीही युक्रेनला नाटोमध्ये सामील व्हायचे होते आणि त्यासाठी झेलेन्स्की प्रयत्न करत होते. आपण रशियाला अंगावर घेऊ शकणार नाही हे समोर दिसत असताना आणि ज्या अमेरिकेवर अवलंबून राहून सगळे चालू होते त्या अमेरिकेने तर आपल्याला वार्यावर सोडले हे समोर दिसत असताना परत नाटोमध्ये सामील होणे आणि त्याच अमेरिकेच्या जवळ जाणे ही झेलेन्स्कींची चूक नव्हती का?
१९९९ मध्ये पोलंड, झेक रिपब्लिक आणि हंगेरी नाटोमध्ये सामील झाले, २००४ मध्ये इस्टोनिया, बल्गेरीया, लाटव्हिया, लिथुआनिया, रोमानिया वगैरे देश नाटोमध्ये सामील झाले, २००९ मध्ये अल्बेनिया आणि क्रोएशिया सामील झाले त्या प्रत्येक वेळेस रशिया कुरकुरला होता कारण नाटोने पूर्वेकडे हातपाय पसरले होते ते रशियाला मान्य नव्हते. पण त्या वेळेस त्याविषयी काही कडक कारवाई करण्याच्या स्थितीत रशिया नव्हता. तसेच इस्टोनिया आणि लाटव्हियाचा अपवाद वगळता त्यापैकी इतर देशांची रशियाबरोबर सीमा नव्हती. युक्रेनची ती स्थिती नव्हती. आणि बाल्टीक देश नाटोमध्ये सामील झाले होते २००४ मध्ये जेव्हा रशिया नुसता कुरकुर करू शकत होता पण सैनिकी कारवाई करायला तितक्या प्रमाणात समर्थ नव्हता. पण झेलेन्स्की महाशय ते २०२१-२२ मध्ये करू पाहत होते- जेव्हा रशिया अधिक समर्थ होता. आणि त्यात युक्रेनची रशियाबरोबर सीमा होती. अशा परिस्थितीत आपण रशियाला अंगावर घेऊ शकणार नाही हे माहित असतानाही परत नाटोमध्ये जाणे ही चूक नव्हती का? एखाद्या सिंहाला दगड मारल्याप्रमाणे ते झाले. आणि तो सिंह अंगावर आल्यास ज्या अमेरिकेवर विसंबून राहिले होते त्या अमेरिकेनेच त्यांना दिलेल्या संरक्षणाच्या हमीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. असे असताना आपल्याला कितपत झेपत आहे ते न बघताच झेलेन्स्की महाशय सगळ्या गोष्टी करत होते? त्यात आणखी गुंतागुंत म्हणजे युक्रेनच्या पूर्व भागात रशियन वंशाच्या लोकांची बहुसंख्या होती. पूर्वेकडच्या बंडखोरांना रशिया मदत करत होता आणि त्या डोकेदुखीला युक्रेनला यशस्वीपणे तोंड देता येत होते का? तात्पर्य हे की कोणतीच गोष्ट अनुकूल होत नसताना आपण जे काही करत आहोत त्याचे परिणाम काय होतील त्याचा विचार न करता झेलेन्स्की नाटोमध्ये जाऊ बघत होते.
२०२२ मध्ये रशियाने हल्लाच केल्यानंतर परत एकदा बायडन आजोबा ओबामांप्रमाणे पुतीनला घाबरले आणि नुसती शस्त्रे आणि इतर मदत युक्रेनला करत राहिले पण स्वतः युध्दात पडले नाहीत. १९९४ ची ती संरक्षणाची हमी परत एकदा कचर्याच्या टोपलीत गेली. आता तरी अधिक नुकसान टाळायला आता तरी झेलेन्स्की निमूटपणे आम्हाला नाटोत जायचे नाही असे म्हणून युध्द थांबवायचा प्रयत्न करतील की नाही? तर ते नाही. ३ वर्षे युध्द सुरूच आहे. ते कोणाच्या जोरावर? तर अमेरिकेने आणि युरोपने दिलेल्या मदतीवर. आम्ही दिलेल्या मदतीचे नक्की काय झाले हा प्रश्न बायडन आजोबांनी विचारला नसेल पण ट्रम्पतात्यांनी विचारला. झेलेन्स्की महाशयांना फ्लॉरीडात आलिशान बंगला घ्यायचा होता ना? पण ते मिडियात आल्याने बहुदा तो बेत त्यांनी टाळला. आपला देश युध्दात आणि संकटात सापडलेला असताना देशाचा अध्यक्ष परदेशात आलिशान बंगले घेतो? ते पैसे कुठून आले? की अमेरिकेने दिलेल्या मदतीतूनच त्यांना तो बंगला घ्यायचा होता? म्हणजेच अमेरिकेकडून मदत घ्यायची आणि त्यातील निदान काही भाग स्वतः मजा करायला वापरायचा बेत होता का? आणि त्या मदतीचा ओघ पुढेही सुरूच राहावा म्हणून युध्दही सुरू ठेवायचे आहे? तात्यांनी ज्या पध्दतीने झेलेन्स्कींना वागणूक दिली किंवा आपल्याच देशाच्या माजी अध्यक्षांना 'दॅट स्टुपिड प्रेसिडेंट' असे जाहीरपणे म्हटले हे चुकीचेच आहे- त्याचे समर्थन करता येणार नाही. पण अमेरिकेचे पैसे घेऊन युध्द सुरूच ठेवण्यात झेलेन्स्कींचे हितसंबंध गुंतले आहेत का असे तात्यांना वाटले असेल तर त्यात त्यांचे काही चुकले असे वाटत नाही.
सोव्हिएट युनियनच्या काळात रशियाने पूर्व युरोपात दमनशाही चालवली होती त्यामुळे ते देश रशियाच्या बाजूचे असणे अशक्य. काहीही असले तरी नाटो आपल्या शेजारी येणे पुतीनकाकांनाही मान्य नव्हते. असे असेल? १९६२ मध्ये क्युबात रशियन अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे आल्यावर जॉन केनेडींनी रशियाला अणुयुध्द सुरू करू ही धमकी दिली होती. ते का? कारण आपल्या शेजारी रशियाची क्षेपणास्त्रे येणे अमेरिकेला मान्य नव्हते. तसे असेल तर आपल्या शेजारी नाटो येणे हे रशियाला मान्य नसेल तर त्यात रशियाचे काय चुकले?
झेलेन्स्की महाशय मात्र फुकाच्या अमेरिकेच्या हमीवर अवलंबून राहिले आणि त्यात युक्रेनच्या सामान्य लोकांना मात्र हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. आणि त्यापुढे जाऊन युध्दाच्या नावावर इतर देशांकडून मदत उकळून स्वतः बंगले घेत झेलेन्स्कींना फिरत राहायचे आहे का? असल्यांना अजिबात मदत द्यायची नाही असे तात्यांना वाटले तर त्यात त्यांचे काही चुकले असे वाटत नाही. बाकी झेलेन्स्की बाणेदार वगैरे अनेकांना वाटतो, अलीकडे वाटायला लागला आहे. मला तरी तो सर्वात वाईट बाजूला पाताळयंत्री आणि सगळ्यात चांगल्या बाजूला भाबडा वाटतो. पाताळयंत्री या कारणाने की इतर देशांकडून युध्दाच्या नावावर मदत घ्यायची आणि त्या कारणाने युध्द चालूच ठेवायचे असे त्याला वाटत असेल तर. भाबडा या कारणाने की २०१४ मध्ये अमेरिकेने काहीही कारवाई रशियाविरोधात केली नाही तरी अमेरिका आपल्या मदतीला येईल आणि सैन्य पाठवेल ही अपेक्षा ठेऊन असेल तर. आता तात्या युक्रेनला मदत देणार नाहीत आणि ते घोंगडे युरोपियन देशांच्या गळ्यात घालतील. तसेही नाटोच्या नावावर अमेरिका इतकी दशके युरोपसाठी खर्च करत आलीच आहे. आता झेलेन्स्कींचा पुळका असेल तर करू दे युरोपिअन देशांना मदत. होऊ दे खर्च. तसेही युरोपिअन देशांमध्ये भळभळती हृदये असलेले पुष्कळ नेते आहेत. तात्या राहतील नामानिराळे. या सगळ्या भानगडीत युक्रेनच्या सामान्य लोकांना मात्र त्रास होत आहे त्याचे वाईट वाटते.
राहता राहिला प्रश्न भारताचा. बायडन अध्यक्ष असताना अमेरिकेची अपेक्षा होती की भारताने त्या प्रकरणी पाश्चिमात्य देशांची बाजू घ्यावी आणि रशियाची साथ सोडावी. अरे वा रे वा. इतकी वर्षे अमेरिकेची पाकिस्तानशी चुंबाचुंबी चालूच होती ना? तेव्हा आपण काय कमी वेळा अमेरिकेकडे तक्रार केली होती का? गेल्या काही वर्षात अमेरिकेचे भारताशी संबंध सुधारले तरी पाकिस्तानला सोडायला अमेरिका तयार नाही. तसे असेल तर आम्ही पण आमचा जुना मित्र रशियाला का सोडावे? शीतयुध्द काळात रशियाने आपल्यासाठी सुरक्षा परीषदेत सहा वेळा व्हेटो वापरला होता. अशा मित्राला आम्ही का सोडावे? आणि ते पण कोणासाठी? युक्रेनसाठी? युक्रेनने आमच्याबरोबर कसा व्यवहार ठेवला होता? १९९८ च्या अणुचाचण्यांच्या वेळेस आपला निषेध करणार्यांमध्ये युक्रेनही होता. ३७० कलम प्रकरणी पण युक्रेनने पाकिस्तानचीच भाषा बोलली होती ना? मग अशा देशासाठी आम्ही आमच्या मोठ्या मित्रदेशाला का सोडायचे? अर्थातच युध्दाचे आणि रशियाने केलेल्या हल्ल्याचे उघड समर्थन करणे आपल्याला शक्यच नाही. मग वरवर बोलताना आम्ही शांततेच्या बाजूचे आहोत अशी गुळमुळीत भाषा वापरून आतमधून आपल्याला पाहिजे ते करणेच योग्य होते. आणि ते आपण केले आहे.
4 Mar 2025 - 8:37 pm | अमरेंद्र बाहुबली
वाह चंद्र…सर! इतक्या वेळ जे मी सांगत होतो ते शास्त्रशुद्ध नी अभ्यासपूर्ण रीतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद! झेलेनस्की मूर्ख आहे हे मी आधीपासूनच सांगत आलोय, अगदी २०२२ ला फेब्रुवारीत रशियन सैन्य युक्रेनच्या सीमेवर जमले तेव्हाही, पुतिन काकानी तेव्हाही युक्रेनला एक संधी दिली होती, चांगले आठवडाभर रशियन सैन्य युक्रेनच्या बॉर्डरवर उभे होते पण मुर्ख झेलेनस्कीने माती खाल्ली नि आम्हाला नाटोमध्ये सामील व्हायचे नाही असे सांगितले नाही, शेवटी रशियन सैन्य युक्रेनमध्ये पुतीन काकानी घुसवलेच! आता ह्या मूर्ख झेलेनास्कीकडे ना अणुबॉम्ब ना आधुनिक लढवय्ये सैन्य, अमेरिका नि युरोपच्या भिकेने कितीक काळ लढणार होता? आणी कोणाविरुद्ध? ज्या देशाला अमेरिकासारखा तेल लावलेला पैलवान भितो त्या देशविरुद्ध? हे इतक्या मोठ्यापदावर बसलेल्या झेलेनस्कीला कळायला नको होते का? बर युद्ध सुरू झाले कुनी कुत्र आपल्यासाठी धावून आले नाही हे दिसत असूनदेखील युद्ध थांबवण्यासाठी काहीही न करता अजून ३ वर्षे युद्ध चालू ठेवायचे? अहो पुतीनकाका दयाळू आहेत म्हणून २० टक्केच युक्रेन भाजून काढलाय, काकानी ठरवले तर अख्खा युक्रेन गव्हाच्या नी सूर्यफूलांच्या शेतासह दोन दिवसात भाजून काढेल! पण पुतिनकाकांच्या दृष्टीने लांबलेल युद्ध त्यांच्या वयक्तिक नी देशहित ह्या दोघांसाठी चांगले आहे. मूर्ख झेलेनस्की आणखी किती वाटोळे करतो युक्रेनचे ते पाहायला हवे. ह्याला युक्रेनच्याच लोकांनी उडवून द्यायला हवे नी चांगला देशहितासाठी निर्णय घेणार पंतप्रधान आणायला हवा!
रच्याकने तात्या संतापी, बिनडोक दिसत असले तरी आहेत अत्यंत हुशार! गेल्या ३ वर्षात युक्रेनच्या लोकांच्या भल्यासाठी पहिल्यांदा कुणी काही करत असेल तर ते म्हणजे तात्या! इतर देशांच्या काय बापाचे जातेय युक्रेनी लोक मरो की जगो? साधे आपले पॅरिस खराब होऊ नये म्हणून सरळ नाझींपुढे लोटांगण घालणारे फ्रेंच असो की अमेरिकेच्या जीवावर युद्ध जिंकून फुशारक्या मारणारे ब्रिटन असो कुणालाही काही पडलेली नाही युक्रेनच्या जनतेची! तात्या बघा विश्वाची घडी कशी नीट लावतात ते! युरोपीय देशात जास्तच खुमखुमी असेल तर पुरवावा पैसा युक्रेनला अधिक खुमखुमी असेल तर स्वतचे सैन्य उतरवावे! अख्खा युरोप पुतिन काकांच्या घोड्याच्या टाचेखाली नाही आला तरतर अमरेंद्र बाहुबली नाव लावणार नाही!
4 Mar 2025 - 9:09 pm | चित्रगुप्त
चसुकु आणि अबा दोघांचे प्रतिसाद आवडले.
4 Mar 2025 - 9:28 pm | आग्या१९९०
ऑस्कर सोहळ्यात रॉबर्ट डी निरो ने ट्रम्पला F म्हटल्यावर सभागृहाने जोरदार समर्थन दिले. ट्रम्पाची गच्छंती अटळ आहे.
4 Mar 2025 - 10:00 pm | श्रीगुरुजी
ट्रंप, जिनपिंग व पुटिन हे माथेफिरू सत्तेत नको असे माझे मत झाले आहे. युक्रेनचा नाश होत आहेच पण रशियाला सुद्धा मोठी किंमत द्यावी लागली आहे.
झेलेन्स्कीला कसा हासडला असे ट्रंप-व्हान्स जोडीला वाटत असेल, पण उद्या रशियाने युक्रेन बळकावला तर तेथील सर्व खनिजसंपत्ती पुटिनच्या नियंत्रणात येईल व ट्रंपला हात चोळत बसावे लागेल. रशियाच्या यशामुळे जिनपिंग सुद्धा तैवान हस्तगत करेल.
ब़ागलाची शेख हसीना खूप काही चांगली नव्हती. पण ती गेली तर तिच्या जागी येणारे जास्त भयंकर असतील हे भारताला जाणवत होते व म्हणून तर भारत सातत्याने तिला पाठिंबा देत होता. पण दुर्दैवाने तिला घालविले गेले व आता तेथे कट्टर भारतविरोधी सरकार आल्याने आपली डोकेदुखी वाढली आहे.
ट्रंपला झेलेन्स्की आवडत नसला तरी तो नसल्यास अमेरिकेचेच प्रचंड नुकसान होणार आहे.
4 Mar 2025 - 10:28 pm | अमरेंद्र बाहुबली
ट्रंप, जिनपिंग व पुटिन हे माथेफिरू….
ह्यात आणखी एका माथेफिरूचे नाव समाविष्ट करायला हवे! :)
4 Mar 2025 - 10:21 pm | आग्या१९९०
झेलेन्स्कीची तिरकी चाल ट्रम्पला अनपेक्षित होती. गेला दरोड्यातील हिस्सा मागायला परंतु देशातील जनमत विरुद्ध गेल्याने अडचणीत आला. थकलेल्या पुतीनला आता बराच घाम गाळावा लागणार.
4 Mar 2025 - 10:58 pm | आग्या१९९०
ट्रम्प तात्याला तंटे मिटवायचे कंत्राटे मिळू लागली.
https://youtu.be/ID9nZHPaQVk?feature=shared
5 Mar 2025 - 9:25 am | श्रीगुरुजी
अमेरिकेच्या मदतीविना युरोपच्या पाठिंब्यावर युक्रेनने युद्धात टिकाव धरला तर नाचक्की अमेरिकेची होईल व युक्रेनमधील खनिजे अमेरिकेला मिळणार नाहीत.
जर रशिया युद्धात जिंकला तर युक्रेनवर रशियाचे नियंत्रण येईल व खनिजे रशियाला मिळतील आणि जागतिक राजकारणात रशिया वरचढ होईल.
युक्रेनला मदत न करणे हे अमेरिकेसाठी हानीकारक आहे.
झेलेन्स्कीचा सार्वजनिक पाणउतारा करण्याच्या आनंदात मग्न असलेले ट्रंप व व्हान्स ही हानी समजण्याएवढे प्रगल्भ वाटत नाहीत.
5 Mar 2025 - 9:44 am | रात्रीचे चांदणे
ट्रम्प तात्याना युद्ध बंद करून युक्रेन ची मिनरल्स मिळवायची असतील. पण झेलेन्स्की त्याला तयार नसणार. कारण युद्ध बंदी म्हणजे आत्ता पर्यंत हरलेला सगळा भूभाग रशियाचा. पण युक्रेन दुसऱ्यांच्या जीवावर आणखी किती दिवस युद्ध लढत राहणार? अमेरिकेची मदत फक्त हत्यारे आणि पैशांच्या स्वरूपात नसणार. महत्वाचे माहिती, रशियन सैनिकांची लोकेशन्स आणखीन काही गुप्त गोष्टीही अमेरिका युक्रेन्स ला पुरवत असणार. समजा युरोप ने मदत करूनही युक्रेन आपला भाग हरत असेल तर युद्धबंदीच करणे योग्य आहे.
5 Mar 2025 - 9:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची छायाचित्र काल समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. आरोपपत्रात संतोष देशमुखांच्या हत्येचा कट कसा रचण्यात आला कसे कसे कृत्य केलं त्याची तपशीलवार माहिती येत आहे. विकृत मानसिकता असलेल्यांनी केलेली निर्घून हत्या केली असं त्याचं वर्णन करता येईल. हत्या करतांना, मारहाण करतांना व्हीडीयो करणे, छायाचित्रे काढणे, गृपवर व्हायरल करणे ही इतरांवर दहशत बसावी यासाठीचं हे कृत्य आहे. सरपंच अर्धमेले असतांना आरोपींनी सरपंचाच्या तोंडावर लघवी करणे आणि पाठ काळीनिळी होईपर्यंत म्हणजे मरेपर्यंत मारणे ही गुंडगीरी आणि दहशत मोडून काढणे राजकीय लोकांना स्वतःच्या हितासाठी शक्य नाही असे कायम दिसते. राजकीय फायद्यांसाठी, पैशांसाठी असे गुंड नेत्यांसोबत असतात त्यांना पोसावे लागते तेव्हा निवडणूकीत नित्यनियमाने निवडून येता येते.
महाराष्ट्रात वरील घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटलेली नाही. कोणत्यातरी एका धर्माच्या माणसाने कोणत्यातरी दुस-या धर्माच्या माणसाची हत्त्या केली असती तर, कदाचित कट्टरवाद्यांनी देश डोक्यावर घेतला असता. सकाळ संध्याकाळ माध्यमांनी विषय मेंदुत ओतायचे काम केले असते, पण या विषयात तसा कोणताही स्कोप नसल्यामुळे अशा गोष्टी होतच असतात अशा पद्धतीने हे जनतेसमोर येत आहे. पोलीस तपास, सरकार म्हणून होणारी कार्यवाही, हा खेळ आपण अनेक महिन्यांपासून पाहात आहोत. आरोपींना पाठीराख्यांना वाचवायचे सर्वतोपरीने प्रयत्न सुरु आहेत.
सामान्य माणसांनी व्यवस्थेतील अन्यायाच्या विरोधात उभं राहू नये अशी एक दहशत देशभर उभी राहात आहे. आधुनिक, पुरोगामी महाराष्ट्रात, सरकार कोणत्याही पक्षाचं असू दे, आता दडपशाहीचं गुंडगिरीचं राज्य फोफावत चाललं आहे, येत्या काळाता सामान्य माणसाचं जगणं अधिक खडतरच होत राहील असे वाटायला लागले आहे. मस्साजोगची घटना अस्वस्थ करणारी आहे.
-दिलीप बिरुटे
5 Mar 2025 - 10:54 am | अमरेंद्र बाहुबली
सहमत आहे. असे फोटो व्हायरल झालेत असं कळाले! ट्विटरवर सापडले, आतड्या पिळवटून टाकतील असे ते फोटो होते, अत्यंत क्रूर प्रकारे नि विकृत पद्धतीने संतोष देशमुख ह्यांचा खून करण्यात आलाय! अतिशय वाईट वाटले पाहून, महाराष्ट्र आहे की बिहार असा प्रश्न पडावा! विशेष म्हणजे संतोष देशमुख हे भाजपचे बुथप्रमुख होते, जर सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता अश्या क्रूर पद्धतीने मरत असेल नि गुन्हेगारांना वाचवण्याचे प्रयत्न होत असतील तर सामान्य माणसाची काय हालत असेल हे कळते , दुसरीकडे केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढली जाते नि बॉडीगार्ड असलेल्या पोलिसाला "जाऊन तक्रार कर" अशी गुर्मी दाखवली जाते, 2 दिवस कुणालाही अटक वगैरं होत नाही कारण कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाचे असतात, महाराष्ट्रात दहशतीचे वातावरण आहे. रस्त्यावर फिरताना वगैरे अरे ला कारे करायला आजिबात जाऊ नका कारण गुन्हेगार प्रचंड मोकाट नी सुसाट सुटले आहेत, जिथे सरपंच मेल्यावर काही होत नाही तिथे तुम्ही आम्ही तर..... असो!
महाराष्ट्र वाईट हातात गेल्याची ही फक्त सुरुवात आहे, पुढे अजून काय काय पाहावं लागणार देव जाणे!
5 Mar 2025 - 11:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
कायद्याने काहीही होत नाही, अशी नकारात्मक भावना आहे. गुन्हेगारी कृत्य केलं म्हणजे काही फासावर जात नाही, इतका आत्मविश्वास गुंडांमधे भरला आहे, अटक वगैरे झाली तर, आपला भाई आपल्याला सोडवून आणेल कोर्ट कचे-यात पुराव्याअभावी सुटका होते हे पक्क माहिती झालं आहे, त्यामुळे गुंडगिरी फोफावली आहे. रस्त्यावर गाडीला कट लागला, थोडंफार लागलं तर, दूर्लक्ष करा. गाडीचं नुकसान झालं तर भरुन निघेल. जीवाचं नुकसान झालं तर भरुन निघणार नाही. रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या चर्चा, वाट्सॅप सारखी चर्चास्थळे. लोकांशी मैत्री असते तोवर गोडगोड असतं. हळुहळु मतमतांतरे व्हायला लागतात. आपला मुळ स्वभाव कधीतरी बाहेर पडतो आणि तुतु मैमै सुरु होते. अशा माध्यमांमधूनही लोक डूख धरुन बसतात. राग धरुन बसतात. वैचारिक हिशेब गुद्दागुद्दीने पूर्ण करायची खुमखुमी येते. तेव्हा रस्त्यावर असो की, माध्यमांवर असो, अजिबात जिथे आपलं जमणार नाही, असे वाटले की गप्प बसलेलं बरं, किंवा काढता पाय घेतला तरी काही कमीपणा नसतो. भली भली माणसं, भली वाटणारी माणसं भयंकर वागून जातात. तेव्हा, सध्याचा काळ संयमाचाच आहे.
-दिलीप बिरुटे
5 Mar 2025 - 4:40 pm | स्वधर्म
असं सतत गप्प बसंलं, तर अन्याय करणार्याला वाटेल की माझी गुंडगिरी अशीच चालू राहील आणि हेच बरोबर वागणं आहे. शक्य असेल तिथे विरोध निदान आपण बोलून तरी दर्शवला पाहिजे की अजिबातच नको.
असो, पण महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था आता रसातळाला गेली आहे, आणि त्याची जबाबदारी गृहमंत्र्यावर आहे, हे नक्की.
5 Mar 2025 - 7:54 pm | रात्रीचे चांदणे
घटना घडल्यानंतर नऊ महिन्यांनी राजीनामा घेतलाय. फडणवीस आणि अजित पवार नेहमीच मुंडेना वाचवत आलेत. करुणा मुंढे प्रकरणातही त्यांना वाचवलं गेलंय.
5 Mar 2025 - 9:02 pm | श्रीगुरुजी
फडणवीस आणि अजित पवार नेहमीच मुंडेना वाचवत आलेत.
फक्त मुंडेला?
6 Mar 2025 - 2:47 pm | कपिलमुनी
तोवर एव्ढ्या पॉवर फुल्ल मंडळींनी किति पुरावे मिटवले असतील ..
6 Mar 2025 - 2:51 pm | अमरेंद्र बाहुबली
अगदी नाईलाज झाला तेव्हाच राजीनामा घेतलाय!
6 Mar 2025 - 5:13 pm | दीपक११७७
साटं-लोटं राजकारणाचा फटका हा कायम जनतेलाच बसतो. महाराष्ट्रात साटं-लोटं राजकारणाची विषारी मूळ खूप खोलवार रूज़लेली आहेत असो . .
6 Mar 2025 - 8:47 pm | रात्रीचे चांदणे
हत्ये नंतर जी SIT स्थापन झाली होती त्यात वाल्मिकी कराडचेच दोन निकटवर्तीय होते. नंतर ओरड झाल्यानंतर बदलण्यात आले. बर, एव्हढ होऊनही कराडला पोलिसांनी स्वतः अटक केली नाहीतर तो स्वतः सरेंडर झाला. अजूनही एक आरोपी फरारच आहे. संतोष देशमुख मराठा होते आणि बीड मध्ये वंजारी विरुद्ध मराठा अशी विभागणी आहे म्हणून मराठा समाजाने प्रकरण ताणून धरलं. पीडित दुसऱ्या जातीचा असला असता तर एवढेही कष्ट पोलिसांनी घेतले नसते. भाजपच्या धसानी मुंडेना विरोध म्हणून विरोध केला, पोलिसांवर आरोप केले पण गृहमंत्री फडणवीस विरोधात मात्र एक शब्द नाही.
6 Mar 2025 - 10:15 pm | रामचंद्र
आधीची माहिती धक्कादायक आहे आणि
शेवटचे निरीक्षण रोचक आहे.
6 Mar 2025 - 11:20 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
आता तरी बोला रे. काही तरी बोला रे.. निषेधाचे एखादे पत्रक तरी?
पंतप्रधान , परराष्ट्रमंत्री ,उद्योग आणी पुरवठा मंत्री(हे पियुष गोयल सध्या अमेरिकेत आहेत ना?), काहीतरी बोला.
अमेरिकन संसदेत ट्रम्प भारतासकट ईतर देशांची नावे घेत आहेत. त्यातील चीनने तर सरळ "कोणते युद्ध पाहिजे ते सांगा, आम्ही तयार आहोत" असे सांगितले.
कॅनडा देश आकाराने मोटा पण ईतर अनेक बाबतीत अमेरिकेपुढे खूप छोटा पण ट्रुडोनी सांगितले की "अमेरिकेतील काही भागात विद्युत पुरवठा खंडीत करू. अमेरिकेला कॅनडाची अर्थव्यवस्था नष्ट कराय्ची आहे"
डेन्मार्कचे ग्रीनलँड आम्हाला पाहिजे आहे असे ट्रम्प म्हणाले- आणी डेन्मार्कमधील एका खासदाराने संसदेत सरळ ' f _ __ऑफ ट्रम्प" म्हणुन ट्रम्पची लायकी काढली.
https://www.bbc.com/news/articles/c4gmd3g2nzqo
https://www.bbc.com/news/articles/c89ye749nxvo
https://www.youtube.com/watch?v=ImtRaTjAF9Y
आपले, म्हणजे भारताचे घोडे कुठे अडतय? की "अमेरिका मोठा देश आहे. मान खाली घालुन पडेल ते पदरात घ्या" ही जुनी भूमिका? हे निषेध नोंदवणारे देशही आपल्यासारखेच अमेरिकेवर काही प्रमाणात अवलंबून आहेत ना? मग आपल्याला काय भीती वाटतेय? उद्या ट्रम्प "मला कश्मिर पाहिजे' म्हणाला तरीही आपण गप्पच बसणार?
6 Mar 2025 - 11:45 pm | श्रीगुरुजी
माईडे,
चीन, डेन्मार्क वगैरेंची बडबड ऐकून "हिंमत असेल तर . . .", "मर्दाची अवलाद असाल तर . . .", "अंगात दम असेल तर . . .", "एका बापाची अवलाद असाल तर . . .", "मेलेल्या आईचे दूध प्यायले नसेल तर . . ." अशी बडबड करत फिरणाऱ्या काही विदूषकांचे स्मरण झाले.
7 Mar 2025 - 4:49 am | रात्रीचे चांदणे
म्हणजे आपण दुसऱ्या देशांच्या उत्पादनावर जर लावायचा आणि दुसऱ्या देशांनी भारत जास्त कर लावतो म्हणले की निषेध करायचा?
6 Mar 2025 - 11:40 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
गेले २ वर्षे रत्न-हिर्यांच्या व्यवसायात मंदी आहे. गेल्या वर्षी गुजरातमध्ये ह्या व्यवसायातील ५० जणांनी आत्महत्या केल्या.भारतातुन आलेल्या दागिन्यांवर अमेरिका ७/८ % आयत शुल्क आकारते तर अमेरिकेतुन आलेल्या दागिन्यांवर भारत २०% आयात शुल्क लावतो. ट्रम्प जे करतात ते योग्यच आहे असे धरले तर अमेरिका भारतातील दागिन्यांवर २०% आयात शुल्क लावणार. मग ह्याचे भारतावर होणारे परिणाम?
https://www.youtube.com/watch?v=agdGlxB8ifQ
6 Mar 2025 - 11:48 pm | श्रीगुरुजी
मग ह्याचे भारतावर होणारे परिणाम
परिणामी अमेरिकनांना रत्ने-हिरे महाग मिळतील. मिळू देत की. आपलं काय जातंय. गुजराती हुशार आहेत. ते वेगळ्या मार्गाने अमेरिकेत हिरे-रत्ने पोहोचवतीलच.
7 Mar 2025 - 11:59 am | माईसाहेब कुरसूंदीकर
" गुजराती हुशार आहेत. ते वेगळ्या मार्गाने अमेरिकेत हिरे-रत्ने पोहोचवतीलच."
आणि अमेरिकन हुशार नाहीत? रत्ने/हिर्याची निर्यात चांगली असती तर एका वर्षात ६५ आत्महत्या झाल्या नसत्या.
युक्रेन-रशिया युद्धाचा सुरतमधील कारागीरांवर कसा परिणाम झाला आहे ते खालील व्हिडियोत बघा. कारागिरांच्या संघटनेने गुजरात सरकारकडे अनेकदा मदत मागितली पण काही उपयोग झाला नाही.
https://www.youtube.com/watch?v=KkttlEK_wg8
गेल्यावर्षी surat diamond bourse चे उद्घाटन झाले. आकाराने पेंटॅगॉनहुनही मोठे केंद्र आहे. पण ४२०० पैकी आजतोवर फक्त ३००/४०० ऑफिसेस चालु झाली आहेत.
औरंगझेबाच्या थडग्यापेक्षा हा प्रश्न मह्त्वाचा आहे.
7 Mar 2025 - 1:03 pm | श्रीगुरुजी
बरं मग माईडे तुझे सर्वज्ञ हे काय उपाय सांगताहेत? का ते नुसते आरामखुर्चीत डुलत डुलत फक्त समस्या सांगत राहणार?
7 Mar 2025 - 1:25 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
पियुष गोयल अमेरिकेच्या दौर्यावर गेले आहेत चर्चा करायला. पंतप्रधान 'वनतारा' मध्ये आहेत. हे दोघे काहीच बोलायला तयार नाहीत. त्यानंतरच मत/उपाय सांगता येइल. नाहीतर ईकडे मि.पा.वर उपाय सुचवणार आणी तिकडे जयशंकर्/गोयल जिन-व्हिस्की घेत 'कूटनीती' यशस्वी झाली म्हणून चीयर्स करणार.

7 Mar 2025 - 1:28 pm | श्रीगुरुजी
'ह्यां'ना सांग ते बोलण्याची वाट नका पाहू. उपाय सांगून टाका.
7 Mar 2025 - 2:47 pm | आग्या१९९०
परिणामी अमेरिकनांना रत्ने-हिरे महाग मिळतील.
तसे होणार नाही. अमेरिकेला दुसरे देशही रत्ने - हिरे निर्यात करतात. त्यांच्यावर. अमेरिकेने भारताइतकी ड्युटी लावली नसल्यास स्वस्त मिळतील. अमेरिकेकडे पर्याय भरपूर आहेत.
7 Mar 2025 - 3:12 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
ह्या आयात शुल्काचा भारतावर विशेष परिणाम होणार नाही असे खात्रीलायक सांगणारे 'अर्थतज्ञ' विविध चॅनेल्स्वर गेले २/३ दिवस अवतरले आहेत. हसायचे की रडायचे ते कळत नाही.एका तज्ञाला 'मोदी-ट्रम्प भेटीतुन भारताला काय मिळाले? ह्या प्रश्नावर ' अध्यक्ष झाल्यावर सर्वात आधी मोदी-ट्रम्प भेट झाली हेच मोठे यश आहे" असे तो म्हणाला. बाकी वॉट्स-अॅप विद्यापीठावर जस्टिन ट्रुडो/जिंपिंग ह्यांची यथेच्छ टवाळी करणारे, ट्रम्प ह्यांच्यावर काहीच बोलताना दिसत नाहीत.
7 Mar 2025 - 3:39 pm | श्रीगुरुजी
ट्रंपवर कोणीच बोलत नाही म्हणून इतकी कासावीस होऊ नकोस माईडे.
7 Mar 2025 - 4:29 pm | अमरेंद्र बाहुबली
माईनी एकहाती धुलाई लावलीय! माईडी रॉक्स इतर सगळे शॉक्स! :)
7 Mar 2025 - 5:19 pm | सिद्धार्थ ४
माईंचा डाय हार्ट पंखा
7 Mar 2025 - 9:21 pm | आग्या१९९०
ट्रम्पचे टॅरिफ युद्ध थंडावले. कॅनडा, मेक्सिको, चीन समोर नमला ट्रम्प. ३०० बिलियन डॉलर जी ७ आणि युरोपीय देशांनी गोठविलेले असल्याने युक्रेनला मदत करण्यासाठी फंड असल्याने ट्रम्प आणि पुतीन दोघांनाही माघार घ्यावी लागणार. चीनने एकट्याच्या बळावर ट्रम्पला आव्हान दिले , आपले विश्वगुरु काचेतून वाघ सिंहांना आपले दर्शन देण्यात मग्न होते. काय कामाचा असला अजैविक बाहुला.
7 Mar 2025 - 9:25 pm | अमरेंद्र बाहुबली
खी खी! :)
7 Mar 2025 - 10:09 pm | स्वधर्म
समर्थक जयजयकार करणारच. नमो यांचे काहीच आश्चर्य वाटत नाही. ते नेहमीच मोठमोठ्या घोषणा करतात आणि कधीही रिझल्ट देत नाहीत. चूक तर त्याहूनही मान्य करत नाहीत. बोलण्याच्या बरोबर विरूध्द क्रुती करतात, तरीही भक्त भलामण करतच राहतात याचे खूप आश्चर्य वाटते.
7 Mar 2025 - 9:55 pm | आग्या१९९०
माहितीच्या अधिकारात वैयक्तिक माहिती मिळणार नाही परंतु नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट २४७ नुसार शंका आल्यास आपली वैयक्तिक माहिती ( सोशल मिडिया, इमेल ई . ) इन्कम टॅक्स विभाग मिळवू शकेल तेही आपल्या परवानगीशिवाय. तुमचे पासवर्ड गेले गोबरात. ह्याला म्हणतात डिजिटल इंडिया.
8 Mar 2025 - 5:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अजून ट्रम्पकडुन काय काय अवहेलना झेलायला लागणार आहे देव जाणे.
Because somebody has finally exposed India”: Trump claims New Delhi has agreed to cut tariffs
दोन देश जेव्हा आयात शुल्क ठरवतात तेव्हा एकमेकांसमोर बसुनच ठरवत असणार ना? मग आता "भारत खूपच आयात शुल्क लावत होता. आता (मी) त्याला उघडे पाडले आहे'. ह्या डोनाल्डाच्या विधानाचा अर्थ काय? भारतातर्फे कोणीच का विचारत नाही? पियुष गोयल ४-६ मार्च अमेरिकेतच होते. त्यांच्या त्या ट्वीटर(एक्स)वर त्यांनी 'नारी शक्तीला' तर प्रणाम केला आहे पण आपण ट्रम्प जे बोलत आहेत त्यावर किंवा आयात शुल्कावर काहीच भाष्य नाही.
गप्प राहण्याच्या बदल्यात कोणाला सोडवण्याचा प्रयत्न होतोय का?
https://www.thestatesman.com/india/because-somebody-has-finally-exposed-...
https://www.youtube.com/watch?v=AVt76PAJsek
8 Mar 2025 - 6:03 pm | आग्या१९९०
नेहरूंच्या काळात अमेरिकेतील आयातीवर भारत १५ - ४०% आयात कर लावत असे आणि अमेरिका भारतीय आयातीवर ३-३५% आयात कर लावत असे. आता नेहरूंना मध्ये कसे आणायचे ह्यावर विचार करत असतील.
8 Mar 2025 - 6:22 pm | श्रीगुरुजी
मग नेहरूंच्या काळात परत जा.
8 Mar 2025 - 6:26 pm | श्रीगुरुजी
माईडे,
नुसतं आरामखुर्चीत डुलत सामना वाचून काहीतरी फेकण्यापेक्षा तुझ्या 'ह्यां'ना आरामखुर्चीतून उठून जरा वाचन व अभ्यास वाढविण्यास सांग.
8 Mar 2025 - 6:36 pm | अमरेंद्र बाहुबली
तुमचं वाचन असेल तर तुम्ही उत्तर द्या! पुन्हा पुन्हा माईच्या “ह्याना” मधे आणून उत्तर मिळेल का?
8 Mar 2025 - 6:42 pm | अमरेंद्र बाहुबली
गप्प राहण्याच्या बदल्यात कोणाला सोडवण्याचा प्रयत्न होतोय का?
अदाणीला माईडे अदाणीला!
गुजरातला प्रकल्प पळवणे, गुजराती व्यापाऱ्याना मदत करणे, नी गुजरातला वैभव आणणे हा भारत सरकारचा प्रमुख ३ सुत्री कार्यक्रम आहे.
8 Mar 2025 - 6:39 pm | विजुभाऊ
या महिन्यात राऊत आणि अंधारे मंडळी शांत बसलेली दिसतेय.
मिडीयात त्यांच्याबद्दल बातम्या नसणे हेच एक आश्चर्य आहे
8 Mar 2025 - 6:40 pm | अमरेंद्र बाहुबली
राऊत रोज हल्ला करताहेत! गनीम बचाव करतोय, आहात कुठे?
8 Mar 2025 - 6:57 pm | श्रीगुरुजी
अगदी अलिकडेपर्यंत मटा, लोकसत्ता, लोकमत वगैरे वृत्तपत्रे आणि एबीपी माझा सारख्या काही वाहिन्या आजच्या सामनात काय लिहिलंय असं शीर्षक देऊन सामनातली घाण आपल्या वाचकांवर फेकायचे. ज्यांना सामना वाचायचाय ते स्वतः वाचतील, तुमच्या वृत्तपत्रातून का वाचतील? मुळात सामना कोणीच वाचत नाही. २-४ ,हजार प्रती खपतात त्या झोपडपट्टीत कारण सकाळच्या वेळी मुलांना बसवायला आणि पुसायला उपयोग होतो. हे इतर वृत्तपत्रवाले सामना सक्तीने आपल्या वाचकांवर लादायला लागले तेव्हा वाचकांनी ही वृत्तपत्रे वाचणे बंद केले आणि तेव्हा कुबेर वगैरेंचे डोळे उघडले आणि सामनिला म्हणजे राऊत, ठाकरे वगैरेंना प्रसिद्धी देणे बंद झाले. म्हणून आजकाल राऊत, अंधारे वगैरेंचं बरळणं प्रसिद्ध होत नाही.
8 Mar 2025 - 7:07 pm | आग्या१९९०
काय राऊत, आंधळे घेऊन बसलाय? अमेरिकेत बेकायदा प्रवेश केलेल्या नेपाळी नागरिकांना अमेरिकेने चार्टर विमानाने परत त्यांच्या देशात पाठवले ,तेही हातापायात बेड्या, साखळ्या न घालता , तरीही आपले विश्वगुरु गप्प बसून आहेत.
8 Mar 2025 - 7:19 pm | श्रीगुरुजी
हे वाचलं नसेलच
Nine Nepali nationals who were living and working illegally in the US were brought to Kathmandu on a chartered flight—handcuffed throughout the journey, said officials.
"En route to Kathmandu, their arms and legs were shackled throughout,” a Nepali official who quizzed them after they were handed over to the immigration official told the Post.
म्हणून मी मोदीद्वेष्ट्यांना वारंवार सांगतो की कोणतेही आरोप करण्यापूर्वी वाचन करा, अभ्यास करा. पण पालथ्या घड्यावर पाणी. फक्त सामना वाचायचा आणि बरळायला लागायचं हेच यांचं काम.
8 Mar 2025 - 8:20 pm | आग्या१९९०
हा पेपर वाचला ,ह्यात बेड्यांचा उल्लेख नाही. चार्टर्ड विमानाचा आहे. आपल्या भारतीयांच्या नशिबी संरक्षण दलाचे विमान होते.
https://www.aninews.in/videos/world/us-deports-batch-of-8-nepali-nationa...
8 Mar 2025 - 9:05 pm | श्रीगुरुजी
या वृत्तपत्रापेक्षा नेपाळसंबंधित बातम्यांसाठी काठमांडूचे वृत्तपत्र जास्त विश्वासार्ह नाही का?
हातापायात बेड्या घालून मर्सिडीजमधून नेले काय किंवा इनोव्हातून नेले काय किंवा रोल्स रॉयसमधून नेले काय . . . नेपाळी कमी संख्येने असल्याने व भाड्याची विमाने लहान असल्याने ८ नेपाळ्यांसाठी भल्यामोठ्या ३०० प्रवासी क्षमतेच्या विमानाची गरजच नव्हती.
8 Mar 2025 - 9:04 pm | अमरेंद्र बाहुबली
२-४ ,हजार प्रती खपतात
खो खो! ठाकरेद्वेष्ट्या महाराष्ट्रद्रोहीना चक्क खोटे बोलावे लागत आहे. :)
8 Mar 2025 - 9:12 pm | श्रीगुरुजी
२-४ हजार हा मी खोटा आकडा सांगितला. प्रत्यक्ष खप २-४ शे आहे.
8 Mar 2025 - 9:36 pm | अमरेंद्र बाहुबली
असत्यवादी हरीचंद्र विषगुरू तुमचा नेता! चालुद्या फेकाफेकी! :)
8 Mar 2025 - 7:03 pm | श्रीगुरुजी
भारताने आयातशुल्क कमी करण्यास मान्यता दिली आहे हा ट्रंपचा दावा वाचून ट्रंपचा आपल्या पहिल्या कार्यकाळातील हा दावा स्मरला.
8 Mar 2025 - 7:05 pm | श्रीगुरुजी
भारताचे उत्तर
8 Mar 2025 - 7:05 pm | रात्रीचे चांदणे
सध्या भारत अमेरिकेकडून जेवढा आयात करतोय जवळ जवळ त्याच्या दुप्पट निर्यात करतोय. अधिक भारतीय अमेरिकेत शिकायला आणि नोकरी साठी आहेत त्याचा फायदा वेगळाच. आणि आपण आपल्या उद्योग धंद्यांना संरक्षण देण्यासाठी आयातीवर अवाजवी कर लावतोय हे ही काय नवीन नाही. भारतीय नसते तर गूगल , मॅक्रसॉफ्ट सारख्या कंपन्या बंद पडतील ह्या असल्या भ्रमात न राहता योग्य पद्धतीने हे प्रकरण हाताळले पाहिजे. सध्यातरी आपल्याला अमेरिकेची भारताला जेवढी गरज आहे त्यापेक्षा आपल्याला अमेरिकेची जास्त गरज आहे. त्यामुळे कुठे ट्रम्प ने भारताचे नाव घेतले आणि आपण शांत का, ह्या असल्या होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करणेच योग्य.
8 Mar 2025 - 7:10 pm | श्रीगुरुजी
मुळात ट्रंप म्हणतोय ते भारताने मान्य केले आहे का हे अजून माहिती नाही. समजा भारत आयातशुल्क कमी करणार असेल तर त्यात वावगे काहीच नाही. इतकी वर्षे भारत जास्त आयातशुल्क वसूल करीत होता, पण आता अमेरिकेच्या ते लक्षात आल्याने कमी केलं यात चुकीचे काहीच नाही. एखादे दुकान छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने वस्तू विकत असेल व ग्राहकांच्या लक्षात आल्यानंतर छापील किंमतीत विकायला लागले तर त्यात मानहानी समजण्यासारखे काहीच नाही.
8 Mar 2025 - 8:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
" इतकी वर्षे भारत जास्त आयातशुल्क वसूल करीत होता, पण आता अमेरिकेच्या ते लक्षात आल्याने कमी केलं यात चुकीचे काहीच नाही"
अमेरिकेच्या कधीच लक्षात नाही आले? आणी ते ट्रम्प ह्यांनी आणुन दिले? मग पुर्वीचे ते गॅट आणी आताचे डब्ल्यु-टी.ओ. का काय ते, कशासाठी असते? असो.
ह्याआधी आयात शुल्काचे प्रश्न चर्चा करूनच सोडवले जायचे. उ.दा.
२०२३ मध्ये अमेरिकेने आयात होणार्या स्टील आणि अल्युमिनियमवर सुऱक्षेच्या कारणास्तव निर्बंध घातले होते. भारताने मग अमेरिकेतुन येणार्या सफरचंद/बदामवरील आयात शुल्क वाढवले होते. नंतर दोन देशांत चर्चा झाली आणि आयात शुल्क कमी केले गेले.
https://nationalnutgrower.com/news/india-to-lift-tariffs-on-u-s-almonds-...
२०१९ मध्ये ट्रम्पने भारताला जी एस. पी अंतर्गत मिळणार्या सवलती काढुन घेतल्या. मग भारताने बदाम्/आक्रोड ह्यांवरील आयात शुल्क वाढ्वले.
https://www.businesstoday.in/latest/economy-politics/story/from-almonds-...
मुद्दा हा की ह्यावेळी भारत गप्प आहे.
8 Mar 2025 - 9:10 pm | श्रीगुरुजी
भारतिने १९९८ मध्ये अणुचाचणी केल्याने अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले होते. ती भारताची मानहानी होती का?
त्यावेळी भारताने निर्बंधांकडे दुर्लक्ष करून निर्बंध निष्प्रभ ठरविले होते.
आता सुद्धा तसे होऊ शकेल. पण त्यासाठी भारताने आयातशुल्क कमी केले याची अधिकृत घोषणा तर होऊ दे.
मुलाचा नुसता साखरपुडा झाला तर लगेच नातवाच्या मुंजीकरता कार्यालय शोधणे सुरू.
8 Mar 2025 - 7:43 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"नुसतं आरामखुर्चीत डुलत सामना वाचून काहीतरी फेकण्यापेक्षा तुझ्या 'ह्यां'ना आरामखुर्चीतून उठून जरा वाचन व अभ्यास वाढविण्यास सांग."
अमेरिकेच्या उपाध्यक्षांनी झेलिन्स्कीबरोबर वाद घालत असताना ,झेलिनस्कीनी "आपण युक्रेनला कधी आला आहात का? नसाल तर या " असा प्रश्न विचारला. ह्याला म्हणतात स्वाभिमान.
'आता माझी सटकली"फेम डोनाल्ड ट्रम्प रोज काहीतरी उकरतात, ईतर देशांबद्दल अपमानास्पद बोलतात. कॅनडा,चीन्,मेक्सिको,फ्रान्स्,चीन त्यावर प्रत्युत्तर देतात पण भारत गप्प राहतो. ह्याचा अर्थ काय काढायचा?
जर्मनीच्या चॅन्सलरांचे गेल्या महिन्यातले विधान बघा-
German chancellor Olaf Scholz slammed as “selfish and self-serving” Donald Trump’s demands for Ukrainian rare earths in exchange for U.S. military aid, in an interview published on Saturday (February 8, 2025). जर्मन परंपरेला साजेल असेच थेट विधान आहे. ट्रम्प खट्टू होतील आणि बी एम डब्ल्यु/ऑडी गाड्यांवर आयात शुल्क वाढवतील.. असली भीती नाही.
आता हे सगळे घडत असताना आपले पंतप्रधान कुठे होते? "डोन्लाड ट्रम्प माझे मित्र आहेत "असे पंतप्रधान म्हणतात आणि मित्र म्हणतो-"मी भारताला उघडे पाडले आहे" काय प्रकार आहे हा? पत्रकारांची नेहमी बोलती बंद करणारे एस. जयशंकर लंडनमध्ये म्हणतात- ट्रम्प ह्यांच्या निर्णयांचा दोघांनाही फायदा होणार आहे"
गेल्या काही महिन्यात टेस्ला गाड्यांची विक्री कमी झाली आहे. मुंबईत टेस्लाची शो-रूम उघडत आहे.
वॉशिंग्टन सफरचंदे/अमेरिकन आक्रोड्/बदाम ह्यावरील आयात शुल्क कमी करण्याच्या विचारात भारत सरकार आहे. ही माहिती भारत सरकार नाही तर ट्रम्प आणि त्यांच्या सरकारमधुन मिळत आहे.!!
अमेरिकेच्या वाणिज्य सचिवांची भाषा बघा-
“The Indian market for agriculture has to open up…Now how you do that, the scale in which you do that (has to be seen). Maybe we should have quotas. Have limits. Be smarter when you have your most important trading partner on the other side of the table. You can’t say it is off the table,” Lutnick said.
https://www.thehindubusinessline.com/economy/us-throws-challenge-of-macr...
आणी आपले पियुष गोयल? वॉशिण्ग्टनला गेले आणि परत आले! मनमोहन सिंग ह्यांना मौनमोहन म्हणणारे मीडियावाले कुठे गेले?
आता काय? परत संभल, वक्फ बोर्ड, औरंगझेब?
8 Mar 2025 - 8:17 pm | श्रीगुरुजी
ट्रंप किंवा वाणिज्य सचिवांनी भारतसंदर्भात जो दावा केलाय तो भारताने मान्य केलाय का?
चीन परस्पर भारतातील गावांची, राज्याची नावे बदलल्याचे जाहीर करतो. या मूर्खपणाला भारताने प्रत्युत्तर दिले नाही म्हणजे भारत दुबळा ठरतो का?
तसेच ट्रंपने केलेल्या दाव्यावर आहे.
8 Mar 2025 - 11:07 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"ट्रंप किंवा वाणिज्य सचिवांनी भारतसंदर्भात जो दावा केलाय तो भारताने मान्य केलाय का?"
भारताने तो अमान्य तरी केला का? "Somebody Is Finally Exposing India" ह्या ट्रम्प ह्यांच्या विधानाचे खंडन केले पाहिजे असे मोदी/गोयल/जयशंकर, कोणालाच वाटत नाही? हेच विधान बिगर-भाजपाचा पंतप्रधान असताना झाले असते तर मीडियाने/भाजपाने किती धिंगाणा घातला असता? "India for Sale" वगैरे सारखी दोन-चार पुस्तके आली असती.अर्नब गोस्वामीने जो धुमाकुळ घातला असता तो विचारुच नका.
8 Mar 2025 - 11:30 pm | श्रीगुरुजी
आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे कोणी काही म्हटले की पुढच्या सेकंदाला लगेच प्रतिक्रिया द्यायची, इतके उथळ नसते. फक्त १ दिवसासाठी पंतप्रधान करा, २४ तासांच्या आत काश्मीर प्रश्न सोडवून दाखवतो, असला मूर्खपणा फक्त मुर्खांसाठी असतो.
8 Mar 2025 - 11:46 pm | आग्या१९९०
हो, घेतलाय अनुभव ८नोव्हेंबर २०१६ ला रात्री ८ वाजता. असे काही झटपट नष्ट होत नसते.
9 Mar 2025 - 6:25 am | श्रीगुरुजी
जखम भरली नाही अजून?
9 Mar 2025 - 7:48 am | आग्या१९९०
विश्वगुरूची ना? **वरचा घाव मिरवता येईना आणि दाखवता येईना. अश्वत्थामा झालाय विश्वगुरूचा.
8 Mar 2025 - 8:26 pm | आग्या१९९०
पत्रकारांची नेहमी बोलती बंद करणारे एस. जयशंकर
हल्ली तर कायम तणावात दिसतात, चेहरा फ्रेश अजिबात दिसत नाही. भारत सोडून सगळ्या देशांनी ट्रम्प वर तोंडसुख घेतले आहे.
8 Mar 2025 - 8:34 pm | आग्या१९९०
The Indian market for agriculture has to open up
हे आमच्या सरकारला सांगायची गरज नाही, वेळोवेळी कृषिमालावरील निर्यातशुल्क कमी करून शेतकऱ्याला देशोधडीला लावायचे काम सरकार करत असते.
8 Mar 2025 - 7:56 pm | रात्रीचे चांदणे
आपण युक्रेनला कधी आला आहात का? नसाल तर या
हा बाणेदारपणा असेल तर , व्हाइट हाऊसने हाकलून दिल्यानंतरही त्याच अमेरिकेबरोबर मिनरल्स डील करायला तयार होणे ह्याला लाचारी समजायचं का?
8 Mar 2025 - 8:04 pm | रात्रीचे चांदणे
तसं ही अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिको वरून येणाऱ्या मालांवर कर लावलेला आहे तर भारताविरुद्ध कराची घोषणा केली आहे.
10 Mar 2025 - 11:30 am | विवेकपटाईत
या धाग्यात अमेरिकन तात्या शिवाय दुसरे काही नसते.
दिनांक 9 मार्चला आशियातील सर्वात मोठा ज्यूस काढण्याचे संयंत्र नागपुरात सुरू झाले. संयंत्रची क्षमता 800 टन एका दिवसाची आहे. संत्र्या शिवाय इतर फळांचे ज्यूस ही इथे काढले जाईल. पुढील पाच वर्षांत नागपुरात किमान दहा हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल आणि हजारो शेतकर्यांना त्याचा फायदा होईल. संत्र्याचे भाव 40 टक्के वाढले. 1500 रु वरून 2200 रु प्रति क्विंटल झाले.
10 Mar 2025 - 3:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
ट्र्म्पाचे सहकारी वाणिज्य सचिव- हॉवर्ड ल्युट्निक- "भारताने रशियाकडून शस्त्रे घेणे बंद करावे. अमेरिकेकडुन शस्त्रे घ्यावीत.
ब्रीक्स देशांनी डॉलरशी स्पर्धा करणारा चलन काढण्याचा जो प्रयत्न आहे तोही बंद झाला पाहिजे. असेही ल्युटनिक म्हणाले.
दोन दिवसापुर्वीची मुलाखत आहे.
https://www.youtube.com/watch?v=HWaNqn5amJw
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सध्या काय करत आहेत सहज शोधुन पाहिले- चॅम्पियन चषक विजेत्या भारताचे त्यांनी अभिनंदन केले. ओमर अब्दुल्ला ५४ वर्षाचे झाले म्हणुन राजनाथ ह्यांनी त्यांचे शुभचिंतन केले. बेंगळुरुत एच ए एलच्या योगदानाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.
https://newskarnataka.com/karnataka/bengaluru/rajnath-singh-celebrates-h...
10 Mar 2025 - 4:37 pm | श्रीगुरुजी
शिमग्याला अजून अवकाश आहे माईडे.
10 Mar 2025 - 5:21 pm | आग्या१९९०
तरीही उतावीळ ' सोंग ' अमेरिकेत जाऊन बसली आहेत तोंड रंगवून घ्यायला.
10 Mar 2025 - 5:23 pm | श्रीगुरुजी
दाह खूपच वाढलेला दिसतो. काळजी घ्या.
10 Mar 2025 - 7:25 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
ट्रम्पने शिमगा सुरु केलाय. जर्मनी,फ्रान्स,ब्रिटन्,चीन्,कॅनडाचे देशप्रमुख अजिबात न घाबरता रंग लावत आहेत. भारताला ट्रम्पने रंग लावला पण भारत 'वेळ आल्यावर रंग लावु' म्हणतोय.
कॅनडा-अमेरिकेचे गेले १५० वर्षे चांगले संबंध आहेत. दोन देशांत तब्बल ८००० कि.मी. सीमा आहे पण नवे पंतप्रधान माईक कार्नी ह्यांनी ट्रम्पना प्रत्युत्तर द्यायला अजिबात वेळ लावला नाही. सुरुवातीला त्यांनी ट्रम्प ह्यांना हॅरी पॉटरमधील 'वॉल्डेमॉर'ची उपमा दिली."मी ट्रम्प ह्याना अजिबात यशस्वी होउ देणार नाही" असे माईक म्हणाले.
न घाबरता,कूटनीतीच्या नावाखाली वेळकाढुपणा न करता कॅनडाने जे ठणकावुन सांगितले त्याला म्हणतात खरा राष्ट्रवाद.
राष्ट्रवादाचे दुसरे उदाहरण घ्या-
Ontario Premier Doug Ford has taken a strong stance against U.S. President Donald Trump’s sweeping tariffs on Canada, vowing to retaliate by cutting energy exports, banning U.S. alcohol and cancelling a $100 million Starlink deal. They Need To Feel Pain
https://www.news18.com/world/canada-cancels-100m-starlink-deal-threatens...
आणि आपण? जयशंकर लंडनमधील आपल्या चाह्त्यांचे फोटो टाकुन त्यांचे आभार मानत आहेत. बाकीचे मंत्री भारताच्या क्रिकेट संघाचे कौतुक करत आहेत. ते विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते/सचिव म्हण्तात- ""There is lot of interest in statements coming from United States. I will not go into details""
किती ते घाबरायचे? असो.
10 Mar 2025 - 7:53 pm | रात्रीचे चांदणे
अमेरिकेचे ५१ वे राज्य म्हटल्यानंतर खर तर कॅनडाने सगळे संबंध तोडून टाकायला पाहिजे होते. पण ते बसले कुटणीतीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत.
10 Mar 2025 - 8:58 pm | आग्या१९९०
भारताने टेस्ला आणि हर्ले वर १००% आयातशुल्क लावल्यास अमेरिका भारताच्या कोणत्या उत्पादनावर तेव्हढेच आयातशुल्क लावेल?