गाभा:
नमस्कार !
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे पार पडत आहे ! मिसळपाव हे आपले इतके प्रसिध्द आणि मराठी भाषेतील साहित्याला वाहिलेले अग्रणी संकेतस्थळ ! असे असुनही इथे साहित्य संमेलनावर , अध्यक्षीय भाषणावर चर्चा करायला , वाद विवाद करायला , काथ्याकुट करायला लेखन नाही हे पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली !
तस्मात हा लेखनाचा धागा सुरु करत आहोत !
फुल्ल मजा चालली आहे तिथे ! या गप्पा मारायला . डोन्ट स्किप धिस एन्टरटेन्मेंट !
या ! वेलकम !
प्रतिक्रिया
23 Feb 2025 - 2:21 pm | प्रसाद गोडबोले
सीरीयसली ? आर यु किडिंग मी !! =))))
28 Feb 2025 - 3:51 pm | भागो
ह्या चित्रात माउली आणि तुकाराम बोवा ह्यांची चित्रे नाहीत. politically correct chitra.
28 Feb 2025 - 4:16 pm | श्रीगुरुजी
प्रतिभा पाटील चित्रात दिसताहेत. त्यांचा साहित्याशी काही संबंध होता का?
1 Mar 2025 - 9:43 am | आंद्रे वडापाव
गोडबोले साहेबांनी,
शाहू फुले आंबेडकर, असे सर्च करून, जे चित्र पाहिले मिळाले,
ते इथे डकवले...
प्रतिभा पाटील, वैगरे कडे लक्ष द्यायला त्यांना पुरेसा वेळ मिळाला नसेल...
राम...
1 Mar 2025 - 9:48 am | श्रीगुरुजी
डाव्या कोपऱ्यात खाली असलेली सुटातली व्यक्ती कोण?
1 Mar 2025 - 11:01 am | प्रसाद गोडबोले
वरील प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद आंद्रे वडापाव !
वरील प्रतिसाद हा तुमच्या पुर्वग्रहदुषित पराकोटीच्या व्यक्तिद्वेषाचा ढळढळीत पुरावा आहे !
सदरहु चित्र हे अन्यत्र कोठुनही घेतलेले नसुन खुद्द ९८वाच्या साहित्य संमेलनाच्या अधिकृत वेबसाईट वरुन घेण्यात आले आहे .
ही घ्या लिंक - https://abmssdelhi.org/
जराशी शोधाशोध केले असते तर त्य्मचे तुम्हालाच सापडले असते हे संकेतस्थळ , पण असो , त्यात तुमचा दोष नाही , कारण गट -१ आणि गट - २ ही विभागणी कृत्रिम नसुन नैसर्गिक आहे , तुम्ही त्याला काहीही करु शकत नाही . गोडबोलेंनी काहीही लिहिलं की त्याला विरोध आणि केवळ विरोधच करणे ही तुमची नैसर्गिक वृत्ती आहे , उर्मी आहे !
आणि म्हणुनच मी तुम्हाला , गट-२ ला धन्यवाद म्हणतो कारण अशा वृतीमध्ये , अशा वृत्तीच्या लोकांमध्येही , त्यांच्या प्रतिसादांमध्ये राम पाहणे हीच खरी परिक्षा आहे , साधना आहे !
असो. आताही चुक मान्य न करता ह्या प्रतिसादालाही विरोध करणारा काहीतरी उपप्रतिसाद द्या =))))
राम
1 Mar 2025 - 11:23 am | आंद्रे वडापाव
अरे वा, सिंगल आऊटपूट न्यूरलनेटवर्क मध्ये सुधारणा करून , ड्युअल-आऊटपूट क्लासिफिकेशन न्यूरलनेटवर्क आलं म्हणायचं ...
(राम + गट १ क्लासिफाइड)
(राम + गट २ क्लासिफाइड)
_/\_
1 Mar 2025 - 11:52 am | प्रसाद गोडबोले
राम !
=))))
हेच अपेक्षित होतं तुमच्याकडून !
जन देव तरी पाया चि पडावे | त्याचिया स्वभावे चाड नाही ||१||
अग्नीचे सौजन्य शीतनिवारण | पालवी बांधोनि नेता नये ||२||
तुका म्हणे विंचु सर्प नारायण | वंदावे दुरोन शिवो नये ||३||
https://www.youtube.com/shorts/_XNegCENn2o
राम !
23 Feb 2025 - 2:35 pm | आग्या१९९०
पवार साहेबांनी आव मोठा आणला होता, परंतु आयत्यावेळी कच खाल्ली. सोबत दोघांना व्यासपीठावर आणून त्यांचा पद्धतशीरपणे अपमान झाला हे बघून खुष झाले असतील.
23 Feb 2025 - 3:22 pm | Bhakti
मी अकरा मिनिटांचे भाषण ऐकले.
https://www.facebook.com/share/v/18NrTATHgL/?mibextid=D5vuiz
अहाहा! खरोखर खूपच अप्रतिम भाषण झाले.
गोषवारा असा होता.
भाषा जैविक आहे.बोलीभाषेने , संतांच्या काव्याने ती जिवंत राहिली.आमचे संत हे खरे पुरोगामी होते.
महाराष्ट्राला त्यांनी बळ दिले.असा संतांनी घडवलेला महाराष्ट्रात शिवाजी महाराजांना अनेक मावळे याच भाषेच्या श्रीमंतीमुळे मिळाले.आईने बाळाला ऐकवली पहिली ओवी म्हणजे या भाषेचा उगम आहे.-डॉ.तारा भवाळकर
दुसरे पूर्ण १ तासांचे भाषण ऐकायचे राहिले आहे,ऐकेन लवकर.
23 Feb 2025 - 5:17 pm | आंद्रे वडापाव
मिपा वरील स्त्री वाचक याना,
बीबीसी युट्यूब चॅनेल वर, साहित्य संमेलन अध्यक्ष, तारा भवाळकर, यांच्या मुलाखतीचा ९ ~१० मिनिटाचा तुकडा पहा ही विनन्ति...
"बापाला बापपण सिद्ध करावं लागतं"....
27 Feb 2025 - 2:51 pm | Bhakti
https://youtu.be/HWAuiSPJZJE?si=xK0XHTgmQog4o1ad
तूच बाप आहेस खात्री आहे का? _/\_की नुसता अधिकार गाजवायचा?
यात त्यांनी पुरुष नाटकाचा उल्लेखही केला आहे.बहूदा सध्या जे पोंक्षेंचे जे नाटक 'पुरुष' नाटक सुरू आहे,ते हेच आहे का? हे नक्की माहीत नाही पण बकेट लिस्टमध्ये हे नाटक पाहायचे नक्की आहे.
होय,निर्मिती करण्यांत इतर वर्गांमध्ये स्त्री देखील समाजव्यवस्थेत नकळत कशी बळी पडते -स्वीकारून कौतुकबळी वा इतर मार्गी हे कित्येकांना कळतही नाही.सध्या तर पाश्चात्य फिलॉसॉफी ऐकतेय, भारतीयही ऐकतेय,मनात अगदी समुद्रमंथन सुरू आहे,पाहते विष बाहेर पडते वा अमृत!
24 Feb 2025 - 9:07 am | श्रीगुरुजी
दिल्लीतील सर्वपक्षीय राजकीय संमेलन संपले का?
24 Feb 2025 - 9:53 pm | Bhakti
सर्वपक्षीय राजकीय संमेलन ...
असं असतं...असेल तर दर महिन्याला भरायला पाहिजे.
24 Feb 2025 - 9:44 pm | धर्मराजमुटके
ते अजैविक जन्माबद्द्ल ऐकलं का कोणी ? बाईंनी शालजोडीतले हाणले म्हणून बर्याच पेप्रांत छापून आलं होतं म्हणे. बाकी कुणी नाहितर मिपावरील काही सभासदांनी नक्किच ऐकलं असावं.
25 Feb 2025 - 11:39 am | आंद्रे वडापाव
"नॉनबायोलॉजिकल इंटरनॅशनल डंकापती" , सुनके फ्लावर समझे क्या ???
1 Mar 2025 - 12:51 pm | चौथा कोनाडा
हा .... हा .... हा .... !
ह्योच आमचा सामी !
25 Feb 2025 - 5:02 am | nutanm
आमही मनोरनजन व महतवाचे विचार वाचायला लेख वाचला पण दोनही शूनय भोपळा! या लेखात. व परतीसादात पण नाही . ( कीबोर्ड बरोबर नाही क्षमसव.)
25 Feb 2025 - 9:51 am | प्रसाद गोडबोले
नीट पहा
सदर लेखन हे लेख ह्या सदरात केलेले नसून काथ्याकूट ह्या सदरात केलेलं आहे. त्यामुळे इथे काहीही महत्त्वाचे (?) विचार दिलेले नाहीत.
आणि प्रतिसाद नाहीत त्याला कारण कदाचित हा काथ्या इतका शुष्क आणि निरस आहे की कोणाला तो कुटायची इच्छा झाली नसावी =))))
तुम्हाला काथ्या कुटायचा असल्यास स्वागतच आहे. पूर्वी जात्यावर ओव्या म्हणायच्या तसे आपण उखळावर च्या ओव्या नावाची नवी लोकपरंपरा सुरू करू , या . =))))
अवांतर: मला लाल भोपळ्याची भाजी फार आवडते. आणि घारगेही आवडत ! त्यामुळे धन्यवाद !
25 Feb 2025 - 11:36 am | आग्या१९९०
मराठी साहित्य संमेलनात हजेरी लावताना निदान राजकारण्यांनी फक्त पुरणपोळीच मिळावी झणझणीत ठेचा नको असे म्हणणे योग्य नाही. नसेल सहन होत तर तिकडे जाऊच नये.
साहित्यिकांनी मर्यादा पाळाव्यात असे सांगणारे हे कोण टिकोजीराव? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, मर्यादेचे बंधन तुम्हाला लागू होते, साहित्यिकांना नाही.
25 Feb 2025 - 5:31 pm | विवेकपटाईत
भविष्यात सरकारने यासाठी अनुदान देऊन पैसा व्यर्थ करू नये.
1 Mar 2025 - 12:55 pm | चौथा कोनाडा
छान आटोपशीर प्रामाणिक वृतांत !
आपली दुसर्या प्रचितली पटाईत छबी आवडली !
आता इतक्या दिवसांनंतर उमगले असेल तर आपण "हसावे" कॅटेगिरीत गेलात की "रडावे" कॅटेगिरीत गेलात यावर सविस्तर वाचायला आवडेल !
2 Mar 2025 - 9:31 pm | रामचंद्र
भन्नाट प्रतिसाद!
25 Feb 2025 - 5:47 pm | आग्या१९९०
भविष्यात सरकारने यासाठी अनुदान देऊन पैसा व्यर्थ करू नये.
अगदी बरोबर! पण काहींना सरकारी खर्चाने अजेंडा राबवायचा असतो, छबी मिरवायची असते, मग भले तेथे जाऊन अपमान झाला तरी हरकत नसते.
1 Mar 2025 - 1:12 pm | रामचंद्र
<डाव्या कोपऱ्यात खाली असलेली सुटातली व्यक्ती कोण?>
ते माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख असावेत.
1 Mar 2025 - 1:51 pm | श्रीगुरुजी
संमेलनाच्या बोधचित्रात शरद पवार, बाळ ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे चित्र नसल्याने तीव्र निषेध.
2 Mar 2025 - 6:52 pm | अमरेंद्र बाहुबली
सावरकरांसारख्या साहित्यिकाचे का वगळले असावे?