तीळगुळ वड्या

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
13 Jan 2025 - 11:21 am

क

निसर्गाची रंगसंगती जिभेची रसना पूर्ण करते.तिळ खोबरं वाटण्याच्या खमंग स्निगधतेत गाजराची,हरबऱ्याच्या दाण्याची मऊसर चवं रेंगाळत राहते....चांगले भोग म्हणुन बाकी काय भोगीची भाजी खायला मिळते.
बरोबरीने तीळ गुळाची वडी चाखतांना एखादा इलायची एक दाणा बक्षीस जिंकल्यासारखा वाटत राहतो

तीळगुळ वड्या

दोन वाटी भाजलेल्या तिळाचा जाडसर कुट,एक वाटी भाजलेल्या खोबऱ्याचा कूट,अर्धी वाटी शेंगा दाणे कुट, इलायची पूड, ४०० ग्रॅम गूळ,साजूक तूप.

चार मोठे चमचे साजूक तूप कढईत गरम करायचे.त्यात किसलेला गूळ घालावा.१० मिनिटे उकळी फुटेपर्यंत हलवत राहावा.नंतर त्यात तिळाचा,खोबऱ्याचा,शेंगा दाण्यांचा कूट ,इलायची पावडर टाकावी.काही अख्खे तिळ यात टाकावे.मंद आचेवर परतावे.साधारण १० मिनिटे.नंतर गरम गरमच हाताला/वाटीला गार पाणी लावून वड्या थापून घ्यायच्या.गरम असतांनाच वड्या कापायच्या.गार झाल्यावर काढायच्या.

तीळगुळ घ्या गोड गोड बोला!!

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jan 2025 - 12:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तीळगुळ वड्या आवडल्या. पुलेशु.

-दिलीप बिरुटे