१२/०२/२०२५...चित्रगुप्त यांच्या बरोबर पुणे कट्टा....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
24 Dec 2024 - 10:59 am
गाभा: 

नमस्कार मंडळी ,

श्री. चित्रगुप्त, जानेवारी महिन्यात, पुण्याला येत आहेत. कट्टा आयोजीत करण्या संदर्भात त्यांच्याशी बोलणे झाले,

त्यानुसार काही प्राथमिक गोष्टी ठरल्या.

१. शहर ... पुणे

२. तारीख ... १२/०२/२०२५

आता नेहमीप्रमाणे इतर गोष्टी.

कट्टा पुणे इथे असल्याने, ह्या धाग्याचे इतर अजून दोन उपधागे निघायची शक्यता नाकारता येत नाही.

मी फक्त धागा काढण्यापुरता आणि ह्या धाग्यावर काड्या सारण्यापुरता. कितीही इच्छा असली तरी, सध्या अपंग असल्याने, डोंबिवली हे जागतिक केंद्र सोडून इतर कुठेही जाणे मला शक्य होणार नाही. अर्थात् कट्ट्याला प्रत्यक्ष येता येत नसल्याने, फोटो आणि वृत्तान्त, यांच्या अपेक्षेत आहे.

बाकी, पुण्यातील नक्की ठिकाण कुठले? आणि कट्टा सकाळी करायचा? की दुपारी करायचा? की रात्री करायचा? सामिष ठेवायचा? की मिश्राहारी? अपेयपाना सकट ठेवायचा का?

हे उपप्रश्र्न मला तरी पडले. (आणि कदाचित चित्रगुप्त ह्यांना पण पडले असावेत.)

धागाकर्ता,
मुवि...

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

24 Dec 2024 - 12:49 pm | श्रीगुरुजी

मी नक्कीच यायचा प्रयत्न करेन.

देशपांडे विनायक's picture

24 Dec 2024 - 12:56 pm | देशपांडे विनायक

पुढील माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी सौभाग्यवती ची अनुमती घेतलेली आहे.गेल्या ५० वर्षाच्या अनुभवाने अनुमती मिळवण्यासाठी फार त्रास घ्यावा लागला नाही.
माझ्या घरी आमच्या सोसायटीचे १५ एक सभासद जमून पार्टी करतात .
माझे घर भूगाव येथे आहे .
माझ्याकडे ओली पार्टी सामिष भोजनासह
करण्यास माझी तयारी आहे .बाकी प्रकारास ही अनुमती आहे .

चौथा कोनाडा's picture

25 Dec 2024 - 11:57 am | चौथा कोनाडा

+१०१

अमरेंद्र बाहुबली असते तर नक्की आले असते, पण त्यना इथून काढून टाकले

मुक्त विहारि's picture

24 Dec 2024 - 2:52 pm | मुक्त विहारि

तुम्ही देखील कट्ट्याला जाऊ शकता.

मतभेद असणे आवश्यक आहे, पण मनभेद नकोत... , हे आमच्या डोंबिवली कट्ट्याचे ब्रीदवाक्य आहे.

अध्यात्मिक मंडळी, पुरातत्व चिंतन मंडळी, भटकंती वाले, कलाकार ( गायन संगीत चित्रकला वगैरे) यांचेही वेगळे कट्टे असावेत. राजकारण भूसा पाडणे यासाठीही एक.

मुक्त विहारि's picture

24 Dec 2024 - 4:11 pm | मुक्त विहारि

हे सगळे विषय चर्चेला येतात..

१६ फेब्रुवारी सोडून कोणत्याही दिवशी १२ ते १९ च्या दरम्यान चालेल. कदाचित एक चित्रप्रदर्शनही होईल. तसे झाले तर प्रदर्शनाच्या ठिकाणीच कट्टा करू शकतो. मुविंचे अनेक आभार.
पाषाण सरोव, पाताळेश्वर किंवा दुसरे एकादे निसर्गरम्य ठिकाण असल्यास उत्तम.

चौथा कोनाडा's picture

24 Dec 2024 - 10:13 pm | चौथा कोनाडा

पुण्यातील " पु.ल.देशपांडे उद्यान" हे ठिकाण सुचवतो.

पुण्यातील निसर्ग रम्य ठिकाण सुप्रसिद्ध पु.ल.देशपांडे उद्यान ( ‘ओकायामा फ्रेंडशिप गार्डन’ ) सिंहगड रोडव आता मध्यवर्ती झालेय .. जायला यायला सोपे .. आत भरपुर कट्टे बसण्याच्या जागा आहेत. जवळपास खादाडीसाठी भरपुर पर्याय आहेत. नीट गोळीबंद नियोजन केले तर कमी कालावधीच्या उत्तम कट्ट्यासाठी बेष्ट ! फुटु काहाढन्या साठी एक नंबर ! पार्कींग ची झाकास सोय !

याच परिसरात नविन मुघल गार्ड्न सुद्धा
हादिक म्हायती साटी ह्ये दोन व्हिडो बगा:

https://www.youtube.com/watch?v=tssl3lrSwK4

https://www.youtube.com/watch?v=qM6xbtappN4

मुक्त विहारि's picture

24 Dec 2024 - 10:36 pm | मुक्त विहारि

धाग्या मधले शीर्षक आणि तारीख बदलायची आहे .

तारीख १२/०२०२५ , अशी करायची आहे.

मुक्त विहारि's picture

24 Dec 2024 - 10:37 pm | मुक्त विहारि

१२/०२/२०२५

मला यायला आवडेल आणि सध्या तरी १२ फेब्रुवारीला जमेल असे वाटते. चित्रगुप्त यांना भेटायची उत्सुकता आहे.

कट्टा कुणाच्या घरी न करता सार्वजनिक ठिकाणी करावा ही विनंती - म्हण्जे सोयीनुसार येता येईल.
पु.ल.देशपांडे उद्यान चालेल/धावेल. :)