महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक टक्केवारीच्या साहाय्याने मी काही मते बनवायचा विचार करतोय. मात्र "हा म्हणाला", "तो म्हणाला" वगैरे सारखी राजकारणी लोकांची मते मी आधार म्हणून घेणार नाहीये. तर्क करताना कोणतेतरी सांख्यकीय गणित त्यामागे असावे असा उद्देश आहे. राजकीय धाग्यांवर बरीच हुशार लोक भरपूर लिखाण करतात. पण त्यासाठी टिव्ही, वर्तमानपत्रे यातील बातम्या यांचा आधार घेतात. मला वाटते हा आधार घ्यावाच पण तो कोणत्यातरी सांख्यकीय विश्लेषणाच्या साहाय्याने तपासून घ्यायला हवा. आपोआपच बिटवीन द लाईन्स वाचायची कला साध्य होऊ शकेल. तसेच ही माध्यमे आपल्याला शेंडी लावायची शक्यता कमी होऊ शकेल.
विधानसभा निवडणूकी बरोबरच टक्केवारीच्या आधारे आपली लोकशाही कुढे चालली आहे त्याबाबत माझे मत मांडायचाही विचार आहे. पण ते कधी जमेल माहीत नाही. किंवा प्रतिसादामध्येच मी त्याबाबत लिहीन.
मी एका धाग्यावर माझी मते मांडली होती. तीच परत देत आहे. त्यानंतर काही मतदारसंघांची उदाहरणे देत आहे. यासाठी अल्फाबेटीकली पहिल्या १० मतदारसंघांचा नमुना म्हणून मी अभ्यास केला व त्यातून वेगळे काहीतरी घडत असल्याचे जाणवणारे चार मतदार संघ निवडून त्याचे तक्ते जोडत आहे. याच पध्दतीने इतर जणं पण यात भर घालू शकतील. पण मतदान टक्केवारी व त्यातून निघणारा अन्वयार्थ असे त्याचे स्वरूप असेल तर बर होईल. सगळ्यांनाच एका वेगळया पध्दतीने विचार करायला किंवा शिकायला मिळू शकेल. इतकेच नव्हे तर बातम्यांवर विसंबून न राहता आपणही थोडेफार विश्लेषण करू शकू.
राजकारणावरील धागा म्हणजे निव्वळ लाथाळ्या, हे मत बदलले तर अशा प्रकारच्या धाग्यावर अनेक हुशार लोकं भाग घ्यायला लागावीत हा या धाग्या मागचा मुख्य उद्देश आहे.
---------------------------------------------
मी 13 Nov 2019 - 11:55 am ला मांडलेली मते पुढे देत आहे.
१. मला तरी असेच वाटतेय की, राकाँ व काँग्रेसच्या साहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवायचे शिवसेनेने अगोदरच ठरवलेले असावे. अन्यथा निवडणूक निकाल लागण्याची प्रक्रिया चालू असतानाच, सर्व पर्याय खुले असण्याची घोषणा झाली नसती. ती घोषणा, एका प्रदीर्घ घटनेतील एक टप्पा असावी असेच माझे मत बनले. शिवसेनेच्या हातात कोणतीच हुकमाची पाने नव्हती हे आता कळल्यावर, शिवसेनेचा आक्रमकपणा पाहून माझे हे मत जास्त पक्का झालंय. मनसे शिवसेनेचा कट्टर शत्रू. त्यालापण शिवसेनेची मते जाताहेत हे जाणवल्यावर माझा हा संशय जास्तच बळावला. हे तपासायला पुण्याचे उदाहरण पुरेसे आहे.
अजून लढवलेल्या जागांवरची टक्केवारी जाहीर झाली नाहीये. ती मिळाली असती तर जास्त पुराव्यानिशी माझे मत मांडता आले असते. असो.
२. त्यामुळे जिथे भाजपाचा उमेदवार उभा होता तिथे शिवसेनेची बरीच मते राकाँ व काँग्रेसला गेली आहेत. कारण या दोघांचा निवडणूक निकालानंतर पाठिंबा मिळवायचा असेल तर त्यांचे आमदार निवडून आले पाहिजेत ही तर शिवसेनेचीच गरज बनते व भाजपाचे १४४ आमदार होऊ नयेत ही जबाबदारी ठरते. ह्या दोन्ही गोष्टी पवारसाहेबांच्या फायद्याच्या असल्याने त्यांनीही तोंडभरून आश्वासने दिली असणे शक्य आहे.
३. १९६७ पर्यंत काँग्रेसला विरोधकांची भिती वाटत नव्हती. पण लोहियांची विरोधी पक्षांची युती बनवून काँग्रेस विरोधात एकास एक उमेदवार देण्याची नीती यशस्वी होते म्हणाल्यावर, विरोधकांची एकजूट होऊ नये यासाठी डावपेच आखणे हे काँग्रेसचे मुख्य धोरण बनले.
त्यानुसारच पवारसाहेब राजकारण करतात व त्यात ते सद्या तरी सर्वात पाराविना आहेत असे वाटते. यावरून महाराष्ट्रात युती भारी पडतेय म्हणाल्यावर त्यात फूट पाडणे हेच आघाडीचे दिर्घकालीनधोरण असणार यात काही संशय नाही.
थोडक्यात महाराष्ट्रातील निवडणुकांत काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित लढणे व शिवसेना व भाजपाने वेगवेगळे लढणे हा एक मार्ग आहे जो आघाडीला सत्तेपर्यंत नेऊ शकतो.
जर युती तुटली असेल तर ती फक्त ताणली जात राहील एवढेच फक्त पाहावयाचे आहे व परत जोडली जाऊ नये यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. त्यासाठी शिवसेनेचे सरकार यावयाची जरूरी नाही.
४. परत निवडणुका झाल्या तर त्या शिवसेना व भाजपाने एकत्रित लढवू नयेत एवढीच आघाडीची इच्छा किंवा ध्येय असावे असे वाटतेय. यासाठी प्रथम राज्य यांना बाजूला केले. या राज्यच त्रासातून शिवसेना खूप मागे खेचली गेली. बाळासाहेबांची पुण्याईही कामी येऊ शकली नाही. त्याचा फायदा त्यांना २०१४ पर्यंत झाला. फोडा व झोडा पध्दतीत नेहमी रागीट माणसाला हाताशी धरले जाते. कारण रागाच्या भरात त्याच्यावर कब्जा मिळवणे सोपे असते. त्यामुळे यावेळी राऊतांद्वारे शिवसेनेला जाळ्यात पकडण्यात आलेय. राऊतांवरचा ऊध्वजींचा विश्वास हे हत्यार वापरले गेलंय.
५. पण मोदी उदयानंतर सगळंच गणित फिसकटायला लागलेय. शिवसेनेच्या बळावर मोठे होण्याची अगतिकता भाजपाची राहिलेली नाही. भाजपचे वाढते बळ त्याचा पुरावा आहे. त्यामुळे परत निवडणुका झाल्या व शिवसेना वेगळी लढली तर त्यांची आघाडीला गेलेली मते परत फिरतील.
भाजपकडे या वेळेस इच्छुक जास्त झाले होते व जागा २०१४ पेक्षा कमी झाल्या होत्या. पण परत निवडणुका झाल्यास, लढायच्या जागा १५६ वरून २८८ झाल्यामुळे बंडखोरांचा प्रश्न सुटेल. भाजपातील लाॅयल कार्यकर्ते त्यामुळे खूश झाल्याने पुढच्या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढेल, जी शहांची नेहमीचीच रणनीती आहे.
६. जर शिवसेनेने पुढील निवडणुकीत आघाडीशी हात मिळवणी केली तर भाजपाला ते हवेच असेल. धृवीकरण भाजपाला नेहमीच फायद्याचे ठरत आले आहे.
काँग्रेस विरोधातील आपला अवकाश शिवसेना आपणहून सोडून देत असेल तर भाजपा नक्कीच खूश होईल. भाजपा यापध्दतीनेच मोठी होत आली आहे. मात्र यासाठी संधीची वाट बघत बसायला लागते व त्यासाठी खूप पेशन्स लागतो. तो मोदी शहांकडे नक्कीच आहे असे वाटते.
७. थोडक्यात, भाजपा, काँग्रेस व राकाँ यांचे पुढील धोरण निव्वळ वेळकाढूपणाचे असेल असे वाटते. यासाठी एखादी कोर्टकेस वगैरे सारखा उपाय योजणे हा मार्ग मस्त. जो काँग्रेस नेहमीच अवलंबते. फक्त कोणाकडे तरी बोट दाखवता आले की झाले.
राऊतांनी बोलणी पवारांशी केली. ते आता पवारांकडे बोट दाखवत असतील. पवार बोट दाखवताहेत काँग्रेसकडे. काँग्रेस बोट दाखवतीय केरळ काँग्रेसकडे.
८. पण
जास्तीचं काहीही न देता शिवसेना जवळ येत असेल तर भाजपा ही संधी साधेल असं वाटते.
दीड दोन महिने फडवणीस संपले संपले असं वाटत असताना परत उभे राहतात, असं बऱ्याच वेळेस झालंय. या वेळेसही हे होऊ शकते.
या वेळेसही फडणवीस यांनी समारोपाच्या वेळी युतीच सरकार बनवेल असं म्हणूनच ते थांबले आहेत.
९. असंच होणं योग्य असेल. कारण राजकारणात डाव ओळखून प्रतिडाव टाकावा लागतो. बाकी सगळे गौण याचे भान राखावे लागते. जर युती तुटावी हा डाव असेल तर युती टिकवणे हाच प्रतिडाव असतो. शिवसेना कशी वागली याबाबत सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांना येणारा राग नेत्यांना पोटात ठेवावा लागतो.
भाजप पुढेमागे युती तोडेलही. पण ती सोयीची वेळ ते ठरवतील. पवार साहेबांनी त्यांच्या सोयीने निवडलेली वेळ भाजपाने साधणे शहाणपणाचे ठरणार नाही.
अर्थात हे सर्व राजकारणी माझ्यापेक्षा नक्कीच हुशार असणार म्हणा. :)
---------------------------------------------------
२०१९ विधानसभेच्या टक्केवारीच्या गमतीजमती
१. अक्कलकुवा (1)
आघाडी
पक्ष
२०१४
२०१९
राष्ट्रवादी
२७.७८
काँग्रेस
३६.७९
४१.२६
एकूण
६४.५७
४१.२६
युती
पक्ष
२०१४
२०१९
शिवसेना
५.९१
४०.२१
भाजप
१८.६८
एकूण
२४.५९
इतर दखलपात्र पक्ष
पक्ष
२०१४
२०१९
अपक्ष
४.५१
१२.६९
आप
२.०२
एकूण
४.५१
१४.७१
२०१४ ला नागेश पडवी यांनी भाजपातर्फे उभे राहून १८.६८% मते मिळवली होती. तर आमश्या पडवी यांना ५.९१% मते मिळाली होती. खरं तर या जागेवर भाजपाने जास्त मते मिळवली असूनही ही जागा शिवसेनेला सोडायला लागली. मागच्या वेळेचा भाजपा उमेदवाराला ऐनवेळी माघार घ्यायला लावल्यावर त्याने चिडून जाऊन बंडखोरी केली. तरीही या वेळेस शिवसेनेला ४०.२१ टक्के मते मिळाली. मतांची ही वाढ आश्चर्यकारकच आहे.
खरे तर २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेस२७.७८ टक्के व काँग्रेसला ३६.७९ टक्के मते मिळाली होती. म्हणजे आघाडीला एकूण ६४.५७ टक्के मते मिळाली होती. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली होती व काँग्रेस जिंकणार हे नक्की होते. त्यात परत युतीमध्ये बंडखोरी झालेली. म्हणजे अगदीच एकतर्फी अशी ही लढत होती. पण या वेळेस काँग्रेसला ६४.५७ टक्क्यांच्या ऐवजी फक्त ४१.२६ टक्केच मते मिळाली. म्हणजे युतीकरूनही मागच्या वेळेपेक्षा फक्त ४.४७ टक्के एवढीच वाढ?
मग राष्ट्रवादीची २७.७८ टक्कें पैकी ४.४७ काँग्रेसला मिळाली असतील तर राष्ट्रवादीची उरलेली २३.३१ कुढे गेली ?????
२०१४ साली शिवसेना व भाजप यांना एकत्रित २४.५९ टक्के मते मिळाली होती. त्यात परत भाजपाचा बंडखोर उभा होता. म्हणजे मते मागल्यावेळेपेक्षा कमी व्ह्यायला पाहिजे होती. पण शिवसेनेला मिळाली चक्क ४०.२१ टक्के. काँग्रेसपेक्षा फक्त १.०५ टक्के कमी. अगदी नशीब बलवत्तर म्हणून ही जागा कॉग्रेसला मिळालेली आहे.
निवडणूक निकालानंतरच शिवसेना राष्ट्रवादीजवळ आली असं का समजायचे?
-----------------------------------------------------------------------
२. अहमदनगर शहर (225)
आघाडी
पक्ष
२०१४
२०१९
राष्ट्रवादी
२९.७९
४७.३३
काँग्रेस
१६.३३
एकूण
४६.१२
४७.३३
युती
पक्ष
२०१४
२०१९
शिवसेना
२७.७९
४१.१९
भाजप
२४.०८
एकूण
५१.८७
४१.१९
इतर पक्ष
पक्ष
२०१४
२०१९
aimim
४.०४
वंचित
१.६९
बसप
०.३५
१.७२
एकूण
०.३५
७.४६
इथे राष्ट्रवादीचा उमेदवार उभा होता. २०१४ ला आघाडीला एकत्रित ४६.१२ टक्के मते होती या वेळेस ती ४७.३३ टक्के झाली. म्हणजे आघाडीचा धर्म काँग्रेसने पाळला असे म्हणावे लागेल.
मात्र २०१४ ला युतीला एकत्रित मते ५१.८७ टक्के असताना शिवसेनेला ४१.१९ टक्के मतेच मिळाली आहेत. शिवसेनेला अपेक्षेपेक्षा१०.६८ टक्के मते कमी मिळालेली आहेत. याचा अर्थ भाजपाची २४.०८ टक्के पैकी १०.६८ टक्के मते फुटली आहेत. पण त्याचा दुसरा अर्थ असा की, भाजपाच्या अंदाजे १४ टक्के लोकांनी युती धर्म पाळलेला असावा.
२०१४ साली चारही प्रमुख पक्ष एकत्र लढल्यामुळे या चौघांनीच ९७.९९ टक्के मते मिळवली होती. बाकीचे सगळे मिळून २ टक्के होते. त्यात बसपा ५व्या क्रमांकावर होती व तिला ०.३५ टक्के मते होती. मात्र २०१९ साली या सर्व पक्षांना पालवी फुटलेली दिसून येते. याला कारण भाजपाची फुटलेली मते आहेत हे निश्चित होते.
याचाच दुसरा अर्थ असा की, भाजपाची मते राष्ट्रवादीकडे गेलेली नाहीत.
------------------------------------------------
३. अकोला पश्चिम (३०)
इथे प्रथमदर्शनी असं वाटतं की काँग्रेसने वंचितशी आघाडी केली असती तर काँग्रेस जिंकली असती. त्यामुळे वंचितचा फायदा भाजपाला झाला अशीच सर्वसाधारण समजूत असते. पण २०१४ ची टक्केवारी पाहिली तर चित्र वेगळेच दिसते.
युती
पक्ष
२०१४
२०१९
वध/घट
भाजपा
४६.७७
४३.२३
शिवसेना
७.३९
एकूण
५४.१६
४३.२३
-१०.९३
आघाडी
पक्ष
२०१४
२०१९
वध/घट
काँग्रेस
६.४०
४१.७०
राष्ट्रवादी
१८.८५
एकूण
५४.१६
४३.२३
+१६.४१
बीबीएम व वंचित
पक्ष
२०१४
२०१९
वध/घट
बीबीएम
१६.७२
वंचीत
१२.२१
एकूण
१६.७२
१२.२१
-४.४९
शिवसेनेची मते भाजपाला मिळालेली नाहीत तर ती चक्क काँग्रेसला गेलेली दिसत आहेत. (काँग्रेसचा पण पाठिंबा मिळेल असे तोंडी आश्वासन राष्ट्रवादीकडून शिवसेनेला मिळाले होते की काय?) तसेच भाजपाची मतेही ३ टक्के कमी झालेली दिसत आहेत. ही का कमी झाली याचा विचार भाजपाला करावाच लागेल.
तर वंचितच्या समावेशामुळे पूर्वीच्या बीबीएमची काही मते (मुख्यत्वेकरून मुस्लिम मते असावीत) काँग्रेसकडे वळलेली दिसत आहेत. याचा अर्थ वंचितमुळे काँग्रेसच फायदाच झालेला दिसून येतो. अन्यथा काँग्रेसची मते ४.४९ टक्क्याने कमी झाली असती.
त्यामुळे वंचीत व ओवेसी एकत्र आले तर भाजपाचा फायदा होतो तर वंचीतने ओवेसींची साथ सोडली तर काँग्रेस व राष्ट्रवादीचा फायदा होतो. असाही अर्थ काढता येऊ शकतो. २०१९ ला तरी वंचितमुळे लोकसभेला भाजपाचा व विधानसभेला काँग्रेसचा फायदा झालेला दिसून येतो. काँग्रेसच्या वाढलेल्या १६.४१ टक्के मतांचा असा हिशोब लावता येतो.
-------------------------------------
टक्केवारीच्या आधारावरील हायपोथेसीसची उभारणी
येथे आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. याच टक्केवारीच्या आधारे बातम्यांचा अर्थ लावता येऊ शकतो. उदाहरणासाठी एका बातमीचा अर्थ लावायचा प्रयत्न करू.
लोकसभा निवडणुकांचा निकाल आल्यावर वंचितची आघाडीशी बोलणी चालू असल्याची बातमी आली होती. तसेच वंचितनी ओवेसींचा संबंध सोडल्याचे पण जाहीर केले होते. वंचितने ओवेसींशी संबंध तोडले तरच जागावाटपाबद्दल बोलणी करता येतील अशी एखादी अट आघाडीने वंचितला घातली होती की काय अशी दाट शंका येतीय. त्यानुसार वंचितने ओवेसींशी संबंध तोडल्यावर आघाडीचे काम झाले होते. आता वंचितशी आघाडी करायची जरूरी नव्हती यास्तव त्यानंतर वंचितला फक्त आशेवर ठेवण्यात आले, जेणेकरून वंचितने परत ओवेसींशी संगनमत करू नये.
ही फक्त शंका आहे. पण तशीच एखादी गोष्ट परत घडली की दाट शंका येणारच ना?
एनडीएशी संबंध तोडले तरच पुढची बोलणी करता येतील अशी अट शिवसेनेला घातली गेली होती. शिवसेनेने पण ती अट पाळण्यासाठी सावंतांना परत बोलावून घेतले. त्यानंतर चर्चेचा घोळ चालू ठेवून शिवसेनेला आशेवर ठेवले. आता भाजपानेच युती तुटली असल्याच जाहीर केल्यावर मात्र सगळंच बदललं आहे. शरद पवारांनी तर स्पष्टच सांगून टाकलंय की, शिवसेनेला सरकार बनवायला पाठिंबा देण्याबाबत त्यांची व सोनियांची अजून चर्चाच झालेली नाही.
एक अंदाज असाही आहे की, राष्ट्रवादीला सरकार व्हावं असं वाटतंय. तसे झाले तर राष्ट्रवादी पुढील निवडणुकीपर्यंत आपली ताकद आणखी वाढवू शकेल.
तर काँग्रेसला राष्ट्रवादीचा संशय येतोय. निवडणुकी अगोदरच शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये काहीतरी संगनमत झालेले आहे. संगनमत असायला हरकत नाही पण ते संगनमत काँग्रेसच्या मुळावर येत असेल तर काँग्रेसला कसे चालेल. तसे पुरावे मतदान टक्केवारीतून काँग्रेसला मिळाले असावेत. सरकार स्थापन झाले तर आणखी काय काय होईल काय माहीत? मला वाटते यामुळेच युती तुटेपर्यंत सोनियाजी शरदरावांच्या नाटकात काम करत राहिल्या. नंतर मात्र त्यांनी त्यांच्याबाजूने नाटकावर पडदा टाकला.
टक्केवारीच्या आधारावरील हायपोथेसीस समाप्त. :)
प्रतिक्रिया
11 Dec 2024 - 10:53 am | अमरेंद्र बाहुबली
सगळं प्रामाणिक पणे व्हायला हवे. इव्हीएम बनवनाऱ्या कंपनीतच चार डायरेक्टर गुजराती भाजपे आहेत. ते इव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत का घुसले असावे? त्यांचा हेतू काय? इव्हीएम मध्ये फेरफार ते करत नसतील कशावरून? ह्या गोष्टींची प्रामाणिक चौकशी झाली तर ठिकाय! नाहीतर भाजप नी निवडणूक आयोग निवडणुका घ्यायचे फक्त नाटक करेल, निकाल आधीच ठरेलला असेल.
11 Dec 2024 - 10:58 am | सुबोध खरे
भुजबळ बुवा
तुम्हीच म्हणताय कि निकाल आधीच ठरलेला आहे म्हणजे मग २०२९ च नव्हे तर २०३४ अन २०३९ मध्ये परत भाजप येणारच
मग रोज सकाळी उठून लोकशाहीची हत्या, इ व्ही एम चा घोटाळा, निवडणूक आयोगाचा गैरवापर, भाजपचा भ्रष्टाचार असं रडगाणं गाऊन काहीही होणार नाही हे समजतंय का?
पाच वर्षेच काय पन्धरा वर्षे रडगाणंच गाणं तुमच्या नशिबात आलंय हे लक्षात घ्या.
11 Dec 2024 - 11:06 am | अमरेंद्र बाहुबली
म्हणजे लोकशाहीची हत्या जलीय हे तुम्हाला मान्य आहे तर?
11 Dec 2024 - 11:36 am | सुबोध खरे
रोज सकाळी उठून लोकशाहीची हत्या, इ व्ही एम चा घोटाळा, निवडणूक आयोगाचा गैरवापर, भाजपचा भ्रष्टाचार असं रडगाणं गाऊन काहीही होणार नाही हे समजतंय का?
हे रडगाणं तुम्ही गाताय.
मी नाही.
आमच्या दृष्टीने इ व्ही एम व्यवस्थित काम करत आहेत आणि मतदार सुज्ञ आहेत . त्यांनी कोमट पाणी पिऊन घरात बसणाऱ्याना घरीच बसवलंय.
बाकी पाट कुठे मांडायचाय आणि उदबत्ती कोणत्या वासाची हवी आहे तेवढं सांगा म्हणजे रडगाण्यासाठी फुरोगाम्यांना आमंत्रणही देता येईल.
11 Dec 2024 - 11:55 am | मुक्त विहारि
एक नंबर प्रतिसाद...
11 Dec 2024 - 1:19 pm | अमरेंद्र बाहुबली
आम्ही रडगाणे नाही तर सत्य सांगतोय, भाजप पक्ष जिंकला म्हणजे इव्हीएम चांगले?
11 Dec 2024 - 1:41 pm | मुक्त विहारि
लोकसभेच्या वेळी हे सत्य उमजले न्हवते का?...
ही निवडणूक तर सोडाच, पुढील निवडणुकीच्या वेळी देखील, मी EVM वर संशय घेणार नाही... मग भले भाजप हरो किंवा जिंको...
बाकी पुढच्या विषयाचा, वक्फ बोर्डाच्या बाबतीत, आधीच अभ्यास करून ठेवा. कारण, आज नाही तर उद्या, हा प्रश्र्न तुम्ही उकरून काढणार.
11 Dec 2024 - 1:51 pm | श्रीगुरुजी
भाजप जिंको वा हरो, मतयंत्र चांगलेच आहे.
11 Dec 2024 - 2:01 pm | अमरेंद्र बाहुबली
भाजप नी भाजपची बांडगुळ पक्ष सोडले तर सगळेच पक्ष इव्हीएम वर टीका करताहेत. भाजपला फायदा होतोय म्हणूज भाजपची लोक इव्हीएम ला चांगलं म्हणताहेत. फुक्कट का चार गुजराती भाजपेयी डायरेक्टर म्हणून इव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत घुसवलेय?
11 Dec 2024 - 2:48 pm | श्रीगुरुजी
हरणारे नेहमीच कांगावा करतात कारण नाचता येईना *गण वाकडं.
आपण स्वत:ला निव्वळ हास्यास्पद नाही तर टिंगलीचा विषय बनवून घेतलंय. कोणत्याही विषयाची कणभरही माहिती नसताना आपण तारे तोडत राहता आणि स्वत:चं हसू करून घेता.
आधी independent director म्हणजे काय, त्यांचे कार्यक्षेत्र, त्यांचे अधिकार समजून घ्या. उद्या या कंपनीच्या दारावरचा सुरक्षारक्षक भाजप समर्थक असेल तरी आपण तारे तोडण्यास प्रारंभ कराल आणि नेहमीप्रमाणे स्वत:ला टिंगलीचा विषय बनवून घ्याल.
तेव्हा सांभाळा स्वत:ला आणि आवरतं घ्या.
11 Dec 2024 - 2:52 pm | अमरेंद्र बाहुबली
मी काहीही तारे तोडत नाही. बातमी टाकलीय, आणी डायरेक्टरांचे कार्यक्षेत्र वगैरे वगैरे, जसे काही “भाजपेयी” लईच प्रामाणिक आहेत.
11 Dec 2024 - 3:26 pm | श्रीगुरुजी
सुधारणेच्या पलिकडे केस गेली आहे.
11 Dec 2024 - 3:43 pm | अमरेंद्र बाहुबली
श्रीगुरुजी, मी बातम्या नी निवडणुकीतील आकडे ह्यांचे संदर्भ दिलेत हे नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देतो. पुण्यात गिरीश बापट गेल्यावर भाजप हरेल ह्या भीतीने निवडणूक आयोगाने निवडणूक लावली नव्हती त्याचवेळी पंजाबत मात्र घेतली होती, हरियाणा आणी महाराष्ट्राची निवडणूक सोबत न घेण्यामागे जाय कारण होते हे लपून नाही. निवडणूक आयोग भाजपसाठी उघड उघड काम करत असताना डोळेझाक कशी करायची?
11 Dec 2024 - 4:05 pm | श्रीगुरुजी
येथे कंपनीत स्वतंत्र संचालक नेमले हा संदर्भ दिलाय व त्याचा संबंध मतयंत्राशी जोडलाय. हा निव्वळ मूर्खपणा आहे. स्वतंत्र संचालक म्हणजे काय, त्यांचे कार्यक्षेत्र काय, त्यांचे अधिकार काय, ते का नेमले जातात, कंपनी कायदा याविषयी आपल्याला शून्य माहिती आहे व तरीही वारंवार तोच मूर्खपणा सुरू आहे.
आणि कसली डोंबलाची आकडेवारी. मतयंत्रातील मते व मतपत्रिका यांचे आकडे व बेरीज बरोबर जुळली आहे. सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत हे तपासले गेले, सरी प्रक्रियेचे चित्रीकरण केले, मते जुळतात या अर्जावर सर्व उमेदवारांच्या संमतीदर्शक सह्या आहेत, तपासलेल्या मतयंत्रात कोणतीही गडबड नाही हे सर्वपक्षीय उमेदवारांनी लेखी मान्य केले आहे . . . तरीही मतयंत्रात गडबड करून भाजप जिंकले ही ब्रोकन टेप सातत्याने फिरवत राहणे हा पराकोटीचा मूर्खपणा आहे.
आपल्याला काडीचीही माहिती नाही व आपण अत्यंत मुर्खासारखे बरळत आहात हे अनेकांनी अनेकदा सिद्ध करून व सांगूनही आपल्यात शष्प बदल नाही.
अर्थात या प्रतिसादावरही एक अजून मूर्ख प्रतिसाद येणार याची खात्री आहे. शेवटी पालथ्या घड्यावर कितीही पाणी ओतले तरी शून्य उपयोग असतो.
तेव्हा चालू दे मूर्खपणा.
11 Dec 2024 - 8:17 pm | चंद्रसूर्यकुमार
तुम्हाला जे काही वाटेल ते कारण असेल. मात्र उत्तर प्रदेशात सप्टेंबर-ऑक्टोबर १९९६ मध्ये निवडणुक झाल्यावर पुढची निवडणुक फेब्रुवारी २००२ मध्ये (आधीच्या निवडणुकीला ५ वर्षे उलटून गेल्यावर) आणि त्यापुढची निवडणुक एप्रिल-मे २००७ मध्ये (आधीच्या निवडणुकीला ५ वर्षे उलटून गेल्यावर) का झाली होती हे शक्य असल्यास शोधून काढा आणि ते कारण महाराष्ट्रातही लागू होत होते का ते पण बघा की.
11 Dec 2024 - 4:03 pm | मुक्त विहारि
त्यांचे काय घेऊन बसता?
शिष्य कुठला गुरू निवडत आहे? त्याप्रमाणे शिष्यासचे मोजमाप होते.
आता एखाद्याचा गुरू जर, अंडे शाकाहारी असते आणि द्रोणाचार्यांनी संजीवनी विद्या आणली, असे सांगत असेल तर, शिष्य पण तेच ज्ञान अवलंबणार...
आपणच, आपला गुरु निवडायचा असतो. हे ज्या दिवशी समजेल, त्या दिवशी त्यांचा पुनर्जन्म....
जेंव्हा आमच्या गुरूंनी, संजय दत्तला माफी दिली. आम्ही गुरू सोडुन दिला.
11 Dec 2024 - 10:45 am | मुक्त विहारि
EVM ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
https://pudhari.news/maharashtra/assembly-polls/supreme-court-rejects-de...
देशातील निवडणुकांमध्ये पेपर बॅलेट मतदान प्रणाली पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारी जनहित याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने फेटाळली. डॉ. के. ए. पॉल यांनी ही याचिका दाखल केली होती. (Supreme Court on EVM)
याचिकाकर्त्याने म्हटले की चंद्राबाबू नायडू आणि वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांसारख्या नेत्यांनीही इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) छेडछाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर खंडपीठाने म्हटले की, जेव्हा चंद्राबाबू नायडू किंवा रेड्डी हरले तेव्हा ते म्हणतात की ईव्हीएममध्ये छेडछाड झाली आहे. जेव्हा ते जिंकले तेव्हा ते काहीही बोलत नाहीत. र्ईव्हीएममध्ये छेडछाड होत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट सांगितले.
11 Dec 2024 - 3:56 pm | मुक्त विहारि
ईव्हीएम कोण बनवते आणि ते कसे कार्य करते, ते सक्रिय करण्यासाठी OTP आवश्यक आहे का? 7 मोठ्या प्रश्नांची उत्तरे
https://marathi.aajtak.in/india/story/who-makes-evm-and-how-does-it-work...
11 Dec 2024 - 4:06 pm | मुक्त विहारि
अमेरिका आणि भारताच्या EVM मध्ये काय आहे फरक? कोणत्या देशातील अधिक सुरक्षित? वाचा सर्व माहिती
https://marathi.ndtv.com/world/difference-between-indian-and-american-el...
11 Dec 2024 - 4:18 pm | मुक्त विहारि
ही माहिती जास्त काळजी पूर्वक वाचा.... वाद आणि प्रतिवाद, कसे असावेत? ह्याचे उत्तम उदाहरण आहे....
EVM वरील शंका कुशंकांबाबत निवडणूक अधिकारी आणि संगणकतज्ज्ञांना काय वाटतं?
https://www.bbc.com/marathi/articles/c7ve571q4ypo
-------
सर्वोच्च न्यायालयानं अनेक पद्धतीनं ते तपासलं, त्याच्यावर अतिशय मोठे-मोठे असे निकाल आहेत. ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी जरूर ते निकाल वाचावेत की अंगांनी ईव्हीएम तपासलं गेलं आहे आणि उत्तीर्ण झालेलं आहे.
------
14 Dec 2024 - 12:10 pm | अमरेंद्र बाहुबली
भाजपला सर्वसामान्य लोकांशी काही घेणं देणं नाही त्यांना फक्त खुर्ची सत्ता हवी आहे.
महाराष्ट्रातल्या बातम्या पाहिल्या की वाटतं या नक्की बातम्या आहेत की नैराश्याच्या खाईत लोटणाऱ्या घटना आहेत?
एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा ट्रॅक चुकतोय.
मुख्य कारण वाढती गुन्हेगारी आणि विकला जाणारा कायदा, अंन कायद्याची न राहिलेली भीति
जर आरोपींना माहीत आहे आपण खून करून 5-6 वर्षात बाहेर येणार त्यामुळे लगेच सुपाऱ्या दिल्या जातात.
अशांत महाराष्ट्र प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. ह्या टर्म मध्ये तरी महाराष्ट्राची ची कायदा सुव्यवस्था राखा.
14 Dec 2024 - 1:45 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद...
14 Dec 2024 - 2:03 pm | अमरेंद्र बाहुबली
पो नंबर-१४१
14 Dec 2024 - 6:48 pm | मुक्त विहारि
तूम्ही स्वतः च स्वत:चे "मनोरंजक प्रतिसाद" मोजत आहात, हे उत्तम....
स्वत:च्या कामगिरीचे स्वतः परखड पणे निरीक्षण करणे, हे स्वउन्नतीसाठी आवश्यक असते. पण, ते जरा कृतीत पण दिसले पाहिजे... अद्याप तरी, तुमच्या कडून ते कृतीत येत नाही...
असो....
14 Dec 2024 - 7:01 pm | अमरेंद्र बाहुबली
१४२
14 Dec 2024 - 6:52 pm | मुक्त विहारि
https://marathi.indiatimes.com/india-news/fact-check-news-maharashtra-pa...