अदानी,उर्जा आणि अमेरिका

माईसाहेब कुरसूंदीकर's picture
माईसाहेब कुरसूंदीकर in काथ्याकूट
22 Nov 2024 - 11:37 am
गाभा: 

अमेरिकेत गौतम अदानी ह्यांच्याविरोधात वॉरंट निघाले आणि भारतात एकच खळबळ माजली. दोषारोपात(INDICTMENT) गौतम अदानी आणि त्यांच्या सहकार्यांनी भारतातील चार राज्यांत २००० कोटींची लाच दिली होती. अदानी एनर्जीची सौर उर्जा ह्या राज्यांनी विकत घ्यावी म्हणून ही लाच २०१९ ते २०२४ ह्या काळात दिली गेली. अर्थात हे आरोप आहेत पण त्याचे पुरावे देखील देण्यात आले आहेत असे समजते.https://www.justice.gov/usao-edny/media/1377806/dl?inline
लगेच राहुल गांधी ह्यांनी अदानीना अटक करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. ही चार राज्ये- छत्तीसगड, आंध्र प्रदेश,तामिळ नाडु आणि ओडिशा. ह्यात सर्वाधिक लाच,१२५० कोटी, आंध्रप्रदेशमध्ये २०१९-२०२४ मध्ये देण्यात आली होती असा आरोप आहे. रोख अर्थात जगन मोहन रेड्डि ह्यांच्यावर आहे. कारण मुख्य्मंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय अशी मोठी कंत्राटे मंजूर केली जात नाहीत.
आता ह्यावरुन राजकारण तापणार होतेच. भाजपातर्फे ह्या सगळ्या मागे 'जॉर्ज सोरोस'च आहेत असे ठामपणे सांगण्यात आले. खरे तर हे असे बोलायची गरजच नव्हती. कारण ह्या चारही राज्यांमध्ये तेव्हा भाजपा सत्तेवर नव्हता. पण 'पाश्चिमात्य देशांना भारताचे बरे झालेले बघवत नाही' ही थियरी अनेक मध्यम वर्गीयांना सहज पटते. 'चारही राज्यांतील तत्कालीन अधिकार्यांची चौकशी करा' असे सांगितले असते तरी हरकत नव्हते पण अदानीवर संकट म्हणजे भारतावर संकट असे भाजपावाले मानत असावेत. असो.
मुख्य प्रवाहातील चॅनेल्सनी सावध पवित्रा घेत बातमी दिली आहे. मराठी चॅनेल्सवर तर बोलायलाच नको. 'दादा निवडुन येणार की भाउ की अण्णा' ह्यातच ती रमली आहेत.
अदानी आणि ट्रम्प ह्यांचे चांगले संबंध आहेत असे बोलले जाते. ट्रम्प निवडुन आल्यावर अदानी ह्यांनी ट्रंप ह्याच्या 'धैर्य आणि चिकाटीचे' कौतुक केले होते. १३ नोव्हेंबरला अमेरिकेत मोठी गुण्तवणुक करण्याची घोषणाही केली होती.
In his congratulatory post, Mr Adani said, "If there is one person on Earth who stands as the embodiment of unbreakable tenacity, unshakeable grit, relentless determination and the courage to stay true to his beliefs, it is Donald Trump."
ट्रम्प सत्तेवर यायच्या आत अदानीला अडकवायचे असा प्लान बायडेन सरकारमधील लोकांचा होता आणि तो यशस्वी झाला असेही म्हंटले जाते. आता ट्रम्प ह्यांनी शपथ घेतल्यावर ते ह्या दोषारोपाला आणि संबंधीत अधिकार्यांना कसे बाजुला काढतील ते पहावे लागेल.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Nov 2024 - 12:22 pm | अमरेंद्र बाहुबली

अदानीवर संकट म्हणजे भारतावर संकट असे भाजपावाले मानत असावेत. असो. खिक्क. अदानीने आपले हस्तक सरकारात पेरले. सर्वोच्च पदावरील मोदीही अदानीना मदत करतात, मोदीनी चंगच बांधलाय की अदानीना भारतातील सर्वात श्रीमंत माणूस बनवेल त्या साठी जमेल तसे नियम मोडून अदानीना एयरपोर्ट ते धारावी झोपडपट्टी सर्वच दिलं जातंय. हिंडेनबुर्ग सारख्या कंपन्या सत्य बाहेर काढून अदानीची हवा काढतात नी मोदींच्या मेहनतीवर पाणी फिरवतात. मग मोदीना चरफडत बसण्याशिवाय पर्याय नसतो, कारण हिंडनबुर्ग भारतात नाही की त्याच्यावर इडी सोडू की हिंडनबर्ग राजकीय पक्ष नाही की निवडणूक आयोगाला वापरून त्याचा काटा काढू, ना हिंडेनबर्ग कंपनीतलं कुणी आहे की खोके पोहोचवून कंपनीची दोन शकले करू. :)
अंधभक्तात अडाणींचे एक वेगळे स्थान आहे. आपल्या मालकाचे मालक असल्याने अदानीवर संकट म्हणजे राष्ट्रावर संकट असे अंधभक्त मानत असावेत. शिवाय दोघेही गुजराती, मराठी भक्तांनी गुजरातचरणी निष्ठा व्हायल्याची शपथ खाल्ली असल्याने अदानी म्हणजे त्यांचा जीव की प्राण. थोडावेळ जाउद्या अंधभक्त येतीलच समर्थनाला.
रच्याकने थेट मालकाशी मैत्री करावी म्हणजे नोकर आपल्यालाही मुजरा करतात हे ओळखूनच पवारानी सरळ अडाणीशी मैत्री केली असावी का?

चौथा कोनाडा's picture

22 Nov 2024 - 1:24 pm | चौथा कोनाडा

गेल्या एक दोन दशकांपासुन अमेरिकेचे राजकारण (किंवा अनेक देशांचे राजकारण) भारतीय थोर लोकशाही परंपरेनुसार चालले आहे असे दिसते.

सत्तेवर आले की आपल्याला धार्जिणे असणारे उद्योगपती, लष्करशहा यांना पाठीशी घालून त्यांच्या विरोधातले पुरावे कमकुवत करून शुद्धिपत्र अर्थात "क्लीन चीट" देऊन आपण सत्ता गाजवत राहायची हेच धोरण. त्यामुळे अदानी काय किंवा इतर न प्रकाश प्रकाशात आलेली मंडळी काय, निरपराध सुटणार यात काही आश्चर्य वाटायचे कारण नाही आणि हे सुरू झाले की त्यांना पाठिंबा द्यायला निर्दोष ठरवायला माध्यमातले घटक पुढे येतीलच !

जय अदानी
जय अंबानी
जय मोदी
जय अमित शहा
जय राहुल गांधी
जय सोनिया गांधी
जय केजरीवाल आणि
....... जय जय .... सर्वांचा जयजयकार
आणि आंतरराष्ट्रीय भारतीय राजकारणाचा विजय असो !

अथांग आकाश's picture

22 Nov 2024 - 1:35 pm | अथांग आकाश

वॉशिंग मशीनचा जयजयकार ;-)
.

सामान्य माणसाच्या दृष्टीने -
१)मोठ्या कामांची आंतरराष्ट्रीय निविदा म्हणजे कोण हे काम किती रकमेत किती दिवसांत करणार याची लिखीत झलक. तर खूप कमी रकमेची दिल्याने कंत्राटे अडानी गटाच्या कंपन्यांना मिळत आहेत.
२) राजकारण झालेच तर ते कंत्राट मिळाल्यावर होणार.
३) कुणी सांगितले म्हणून तशा रकमा अदानी मांडत असेल का?
४) अशी मोठी कामे न मिळालेल्या कंपन्यांची पोटदुखी वाढत आहे का?
....
५) बांगला देशाला वीज पुरवणाऱ्या काही भारतीय कंपन्या आहेत . वीज देत आहेत पण बिले थकली आहेत. या पार्श्वभूमीवरसुद्धा अदानीने एक वीज पुरवण्याचे( कोळशावर वीज उत्पादन याच पद्धतीची आहेत सर्व) कंत्राट घेतले आहे हे समजले. एवढी जोखमीची उडी कोण घेणार.
६) चीनच्या कंपन्यांच्या उत्पादनामुळे अमेरिकी कंपन्यांवर दबाव येत आहे. त्यात भर म्हणजे आता भारतही शर्यतीत उतरला तर दिवाळं जवळच आहे.
७) ट्रंपने MAGA( make America great again) नारा दिला आहे - गरीब स्थानिकांना काम देणे. पण याचबरोबर "no wars" आहे. म्हणजे शस्त्रे बनवणाऱ्या कंपन्या तोट्यात. युद्ध बंद झाली तर काय कसं होणार? मग बाईडन जाताजाता मदतीला धावले झेलेन्स्कीच्या " मार तू मोठे अग्निबाण" युद्ध चिघळेल आणि मग मजाच. पण तसं ट्रंप होऊ देणार नाही.
८) एकूण अदानी आणि भारताला सतावणे हाच उद्देश दिसतो आहे.

९) नेहमीप्रमाणे राहुलबाबाने उडी घेतली आहेच.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Nov 2024 - 1:55 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"एकूण अदानी आणि भारताला सतावणे हाच उद्देश दिसतो आहे."
सध्याच्या माहितीनुसार अदानीने बिगर-भाजपा सरकारमधील लोकांना लाच दिली होती. २०१९-२०२४ ह्या काळात. जगभरात उर्जा आणि संरक्षण कंत्राटात 'हमाममे सब नंगे' स्थिती असते. अमेरिकाही सोयीनुसार नैतिकतेवर बोलत असते. आमच्य अंदाजाप्रमाणे अदानी आणि बायडेन सरकार ह्यांच्यात काहीतरी बनाव निर्माण झाला असावा. म्हणूनच जाता जाता बायडेन ह्यांच्या प्रशासनातील अधिकार्यानी बदला घेतला असावा. कारण आता व्हाईट हाउसने आता निवेदन दिले आहे-
Asserting that the relationship between India and the U.S. is built on a strong foundation, the White House has expressed confidence that it can navigate the ongoing crisis surrounding bribery charges against Indian billionaire Gautam Adani.
म्हणजे 'हे ही दिवस जातील'! असेच त्यांना म्हणायचे आहे.

शाम भागवत's picture

22 Nov 2024 - 2:04 pm | शाम भागवत

अदानी आणि बायडेन सरकार ह्यांच्यात काहीतरी बनाव निर्माण झाला असावा.

ते ठीक आहे हो.

पण राहूल गांधी का त्यांच्या तालावर नाचताहेत. जर यातली माहिती बाहेर आली तर अगोदरची सरकारे गोत्यात येतील ना? ती भाजपाची असती तर राहूल गांधी बरोबर राजकारण खेळताहेत असं वाटलं असतं. पण जर भाजप विरोधी किंवा कधीकाळी कॉंग्रेसची सहयोगी सरकारे त्यामुळे गोत्यात येणार असतील तर ते राहूल गांधींच्या भारतातल्या राजकारणाला पूरक कसे हे काही कळत नाही.

बायडेन सरकारला ती राज्य सरकारे कोणती याचे काही घेणे देणे नसल्याने ते त्यांचे राजकारण बरोबर खेळताहेत. ते ट्रंम्प पाहून घेतील.

टीपीके's picture

22 Nov 2024 - 2:14 pm | टीपीके

तितकी समज त्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना असती तर मोदींच्या अनेक चुकांचा वापर करून आत्ता पर्यंत सत्तेत आले असते.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Nov 2024 - 2:11 pm | अमरेंद्र बाहुबली

थोडावेळ जाउद्या अंधभक्त येतीलच समर्थनाला. :)

तपशीलवार बातमी वाचली नाही अजून, पण कंपनी भारतीय, कंत्राटं भारतीय राज्य सरकारांची, मग यात अमेरिका कुठून आली? अटक वॉरंट काढायचा अधिकार त्यांना कुणी दिला? हे भारतीय सार्वभौमत्वाला चॅलेंज नाही का? की यातही परत आंतरराष्ट्रीय राजकारणच आहे? अडाणी हिंडेनबर्ग मधून सुटले म्हणून हा नवीन आरोप?

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Nov 2024 - 2:14 pm | अमरेंद्र बाहुबली

तिथे न्याय्य पद्धती आहे. :)

टीपीके's picture

22 Nov 2024 - 2:18 pm | टीपीके

समज नसेल तर फक्त अडाणी गोत्यात येतात म्हणून काहीही फालतू बोलू नका आणि स्वतःचे हसे करून घेऊ नका. फक्त मोदींना शिव्याच घालायच्या असतील तर वरील वाक्यात मी २ -३ फुलटॉस दिले आहेत त्यांचा वापर करून मारा सिक्स. (जर समजले तर )

शाम भागवत's picture

22 Nov 2024 - 2:20 pm | शाम भागवत

अटक वॉरंट काढायचा अधिकार त्यांना कुणी दिला?

ते कोणताही देश करू शकतो हो. आपणही पन्नूविरोधात काढलं असेलच की. अनेक पाकिस्तानी अतिरेक्यांविरूध्द नक्कीच काढलं असेल. त्याला महत्व नाही.

कोर्टाच्या मागे लपून, अमेरिका त्या अटक वॉरंटमागे आपली ताकद उभी करू शकते. त्यामुळे त्या अटक वॉरंटला महत्व येतं किंवा द्यायला लागतं असं मला वाटतं.

टीपीके's picture

22 Nov 2024 - 3:19 pm | टीपीके

काहीही

अहो फिर्यादी कोण आहे? त्याला फिर्याद करायचा हक्क आहे का? असेल तर कुठे? गुन्हा कुठे घडला हे पण प्रश्न आहेत ना?

जितके मला समजले त्या प्रमाणे, अडाणीने अमेरिकन बाजारातून पैसे उभे केले पण त्या वेळी पुरेशी माहिती दिली नाही किंवा चुकीची माहिती दिली त्यामुळे अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल झाली किंवा त्यांचे नुकसान झाले म्हणून ही केस आहे. खरं तर लाच देणाऱ्याबरोबर घेणाऱ्यांवर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, पण अमेरिका फक्त त्यांच्या गुंतवणूकदारांचा विचार करते आहे (आणि ते तितकेच करू शकतात कारण लाच घेणारा त्यांच्या जुराडिक्शन मध्ये येत नाही) म्हणून फक्त अडाणीचे नाव. लाच घेण्याऱ्यावर भारत सरकार गुन्हा दाखल करू शकते. अमेरिकेकडे जर पुरावे असतील तर अडाणीला नक्कीच शिक्षा व्हायला पाहिजे. आणि भारत सरकारने लाच घेणाऱ्यांवर तेच पुरावे वापरून भारतात गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि शिक्षा केली पाहिजे. पण लाच घेणारी, विरोधकांची सरकारे असल्याने विरोधक लाच घेणाऱ्याबद्दल बोलणार नाहीत. त्यांची डबल ढोलकी ते निर्लज्जपणे बडवत राहतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Nov 2024 - 2:30 pm | अमरेंद्र बाहुबली

विशेष म्हणजे अदानीने लाच दिली हे चूक केले असे कुठल्याही अंधभक्ताला वाटलेले नाहीये. :)

शाम भागवत's picture

22 Nov 2024 - 2:32 pm | शाम भागवत

:)

चौथा कोनाडा's picture

22 Nov 2024 - 3:30 pm | चौथा कोनाडा

:-)

विनोद तावडे क्याश वाटप प्रकरण .. यात समेट झाला की काय ?
नुसते आरोप आणि स्पष्टीकरण पत्रकार परिषद ... पुढं काय झालं ?

ट्रंपला पहिल्यांदा निवडून आणण्यात रशियाचा हात होता. कार्यक्रमाचे कोडींग करण्यात भारतीय कंपन्यांचा सहभाग(१३) होता म्हणे. त्यांना बाईडनने बाद करवले. मग आता पुन्हा मतदार ट्रंपला का निवडतात?

- अंधुक भक्त.

श्रीगुरुजी's picture

22 Nov 2024 - 2:38 pm | श्रीगुरुजी

एक जुनी आठवण. एनरॉनसाठी अमेरिकेच्या रिबेका मार्क यांनी भारतात येऊन कोणाला तरी ५० कोटी दिल्याचे जानूमस्तिष्क अनुयायांना स्मरत नसेलच.

भीमराव's picture

22 Nov 2024 - 2:51 pm | भीमराव

१. अदानी वर आरोप करायची परवानगी अमेरिका कोर्टाने बायडन सरकारच्या वकिलाला दिली आहे, अदानी अजुन दोषी आढळला नाही.

२. अमेरिका येथील न्यायव्यवस्था आपल्या पेक्षा भारी किंवा वरचढ आहे म्हणून अदानी वर खटला तिथं चालू नाही, अमेरीकन गुंतवणूकदांची गुंतवणूक अदानी मधे होती ती धोक्यात आली आहे म्हणून खटला सुरू आहे.

३. यात सगळ्यात हिंडेनबर्ग चा सहभाग लपलेला नाही. अदानी वर हिंडेनबर्ग चे आरोप झाले तेव्हा म्हणावा असा आर्थिक फायदा हिंडेनबर्ग ला झाला नाही, त्यावेळी त्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये अदानी ला नुकसान होईल असे भाकीत केले होते.

शाम भागवत's picture

22 Nov 2024 - 3:02 pm | शाम भागवत

कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय मांडला आहे. तीन ओळीत वस्तूस्थिती स्पष्ट होते आहे. धन्यवाद.
🙏

शाम भागवत's picture

22 Nov 2024 - 3:14 pm | शाम भागवत

एक शक्यता अशीही आहे की, बायडेन सरकारचा युनूस सरकारला पाठींबा आहे. अडानीने बांगला देशची वीज तोडली. मग अदानीच्या अमेरिकेतील धंद्याला त्रास होईल असं काहीतरी करायचं. डाव प्रतिडाव.
ट्रंप सरकार आल्यावर अमेरिकेत गुंतवणूक करण्याबाबत अदानी बोलले होते. पण या समन्समुळे अदानींंना अमेरिकेत पैसे उभे करणे अवघड जाऊ शकेल. या पध्दतीने मग
अदानींना बार्गेनिंगच्या टेबलावर आणायचा प्रयत्न असू शकतो. शेवटी कोणते तरी हितसंबंध असल्याशिवाय हे घडलेले नसणार. वेळ जात नाहीये तर जिंकणाऱ्या ट्रंपच्या मित्रांना करा ट्रोल असा काही प्रकार नक्कीच नसणार.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Nov 2024 - 3:39 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

शेवटी कोणते तरी हितसंबंध असल्याशिवाय हे घडलेले नसणार

१००%. अमेरिकन सरकार काय किंवा कंपन्या काय, नैतिकता,तत्वनिष्ठा.. सोयीनुसार वापरतात. अमेरिकेत पुर्वी किकबॅक हा शब्द लोकप्रिय होता. कोकाकोला,पेप्सी,औषधी कंपन्या ह्या सर्वानी दक्षिण अमेरिकेत धंद्यासाठी नितीमत्ता गुंडाळून ठेवली होती. शिवाय अमेरिकेत न्यायाधीशाची नियुक्तीही राजकारणी करतात असे वाचले आहे. सौर उर्जेच्या कंत्राटांमध्ये जिकडे अदानी जिंकले तेथे कोणत्या कंपन्या स्पर्धक होत्या ते पाहिले तर अंदाज येऊ शकेल. असो.
आता महाराष्त्रातील निकाल लागले की मग हा मुद्दा चर्चेला येइल.

सौर उर्जेच्या कंत्राटांमध्ये जिकडे अदानी जिंकले तेथे कोणत्या कंपन्या स्पर्धक होत्या ते पाहिले तर अंदाज येऊ शकेल.

स्पर्धक कंपन्यांची शक्यता मला तरी वाटत नाही. स्पर्धक कंपन्या एवढ्या काही मोठ्या नसतीत की त्या उगवत्या ट्रंपला पुढची ४ वर्षे पुरून उरून उरतील. त्याचा विरोध पत्करूनही आपला धंदा आरामात करू शकतील. कारण साधारणत: व्यावसायीक कंपन्या उगवत्या सूर्याला सुरवातीपासूनच विरोध करायला लागतील हे संभवत नाही.
बायडेन जेंव्हा आले तेंव्हा त्यांनी हे केले असते तर हा मुद्दा पटण्यासारखा होता.

त्यामुळे यामागे जास्ती मोठे कारण असले पाहिजे. मोठी शक्ती कार्यरत असली पाहिजे. जसे की डीप स्टेट किंवा सद्याचे अमेरिकन धोरणातील अडथळे दूर करणे वगैरे.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Nov 2024 - 4:01 pm | अमरेंद्र बाहुबली

हा अदानी कुठेना कुठे काहीना काही गैरउद्योग करतच असतो, आपल्या पैशाने सरकार बसलंय हे त्याला माहित आहे त्यामुळे कारवाईची भीतीही नाही. भाजप पक्ष अडाणीच्या पैशांनी मिंधा झाला आहे. त्यामुळे भारत सरकार ह्या अडाणीच्या गैरकृत्यांवर कारवाई करेल ही शक्यता शून्य. अमेरिका आरकार कारवाई करतंय ह्याचं मी एक भारतीय म्हणून स्वागत करतो. अमेरिकेने ह्याच्या नांग्या ठेचाव्यात.
हा महाराष्ट्रात सरकार बनवायच्या उद्योगासाठी लुडबुड करत असतो म्हणे.
कुठे ते खानदानी अंबानी कुटुंब नी कुठे हे….

शाम भागवत's picture

22 Nov 2024 - 4:07 pm | शाम भागवत

:)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Nov 2024 - 4:12 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

राजकारण आणि त्या 'सोरोस'च्या थियर्या बाजुला ठेवू. आपली 'सेबी' काय करत आहे? हिंडेनबर्ग प्रकरणातही सेबीने हात झटकले होते. अदानीने भारतात लाच दिली आहे असा आरोप आहे. Adani gave bribes to high ranking govt officials. हे विधान दुसर्या देशाने करणे गंभीर नाही का ?निदान तोंडदेखलेपणासाठी तरी सेबीने 'प्रकरण गंभीर आहे. चौकशी करू' असे तरी म्हणायला काय हरकत आहे? कारण ते आरोप तेथील न्यायालयाला पटले आहेत. मुख्य म्हणजे दुसरा देश तुमच्या देशावर/व्यवस्थेवर लाचखोरीचे आरोप करत आहे. किती दिवस अशी उडवाउडवी करणार? उद्या अदानीने भारतात चार खून केले आहेत, असा आरोप अमेरिकेने केला तरीही गप्पच बसणार का?

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Nov 2024 - 4:20 pm | अमरेंद्र बाहुबली

माई, भाजप सरकार अडाणीच्या पैश्यानी बसलंय. त्यामुळे भाजप पक्ष अडाणीचा मिंधा आहे. भाजप सरकारात निवडणूक आयोग, इडी, सीबीआय, गृहखाते ह्याना किती स्वायत्तता आहे हे आपल्याला माहित आहेच. अश्या काळात सेबीने कारवाई करावी अशी अपेक्षा काशिकाय? सेबी स्वायत्त आहे असे समजणे हे भाबडेपणाचे लक्षण आहे.
भारताला फुकट नाही पाश्चात्य देश बनाना रिपब्लिक म्हणतात.

आग्या१९९०'s picture

22 Nov 2024 - 5:56 pm | आग्या१९९०

ज्या राज्यात बिजेपीची सत्ता आहे त्यांना अदानी लाच कशाला देईल? मोटा भाय कशासाठी बसलाय? बिच्चारे!
भ्रष्टाचारी विरोधी पक्षांनी अदानीकडून पैसे घेतले असतील तर त्यांची चौकशी करण्यास राहुल गांधींनी विरोध कुठे केलाय? राज्य सरकारे दोषी असतील तर अदानीही दोषी ठरतो. संबित पात्राने सेल्फ गोल केलाय हे त्याच्या उशीरा लक्षात आले.

गुंतवणूकीसंबंधी वाद कोणत्या कोर्टात चालेल हे कंपनीच्या स्थापनेच्या किंवा तिचा उपक्रम कोणत्या नावाने कुठे सुरू झाला त्यात विशद असते. ते कुणाला माहीत झाले का? अदानी ग्रीनचे मुख्य नोंदणीकृत कार्यालय किंवा उपक्रमाची जागा जिथे आहे तिथे असे असू शकते.

अमेरिकेतल्या कोर्टात हा खटला चालू शकतो का?

आग्या१९९०'s picture

22 Nov 2024 - 7:09 pm | आग्या१९९०

जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर भारतात चालू शकतो. निदान विरोधी पक्षांच्या राज्यांविरुद्ध नक्कीच चालवता येईल.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Nov 2024 - 7:37 pm | अमरेंद्र बाहुबली

निदान विरोधी पक्षांच्या राज्यांविरुद्ध नक्कीच चालवता येईल. लाच देणे हा देखील गुन्हा असल्याने सरकारचे हात बांधले आहेत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Nov 2024 - 7:56 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

खरे आहे. आता 'बटेंगे तो कटेंगे' चे नारे वॉट्स-अ‍ॅपवर कधी फिरायला लागतील ते बघुया. उदय निरगुडकर्/अविनाश धर्माधिकारी सारखे विद्वान काय थियरी मांड्तात ते बघुया. भाउ तोरसेकर/आबा माळकर ह्यांचे व्हिडोयोज पाहणे बंद केले आहे.

शाम भागवत's picture

22 Nov 2024 - 11:32 pm | शाम भागवत

मी आत्ता जरा माहीती मिळवली त्यानुसार लाच कुणी दिली नाहीये व कुणी घेतलीही नाहीये. लाचेची ऑफर दिली हा दोषारोप केलाय. वॉरंट व समन्स या दोन्हीला अमेरिकेत वॉरंटच म्हणतात. त्यामुळे आणखीनच गोंधळ उडाला आहे.
समन्स बजावायला पाहिजे की नाही हे अमेरिकेत ज्युरी ठरवतात. मग त्यानुसार जज्ज निर्णय घेतो.
त्यामुळे ११ पैकी कमीतकमी ६ ज्युरींना अदानींना त्यांची बाजू मांडायच समन्स बजावायला हवं असं वाटलं. मग जज्ज साहेबांनी समन्स बजावलं. हे ज्युरी कायद्यातले तज्ञ वगैरे असत नाहीत.

तर मस्तच राजकारण चाललंय.
असो.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Nov 2024 - 8:26 am | माईसाहेब कुरसूंदीकर

https://www.justice.gov/usao-edny/media/1377806/dl?inline
इकडे स्पष्ट सांगितले आहे. अदानी आणि त्यांचे सहकारी कधी/कुठे भेटले. लाच कशी द्यायची,कोणत्या मार्गाने द्यायची.. ह्याचे पॉवर पॉइट सादरकरणही बनवण्यात आले. त्या आरोप्पत्रात तारीख-वार सगळे तपशील देण्यात आले आहेत. ह्यात राजकारण कुठे आले? आरोप हे आरोप असतात.
अदानी आणि त्यांचे सहकारी "असे काहीही घडलेले नाही" असे सांगतील का? नाही वाटत कारण एफ बी आय ने त्यांचे एस एम एस आणी ईतर संभाषणही टॅप करुन ठेवले असणार. ह्याची खात्री अदानी ह्यांना आहे. म्हणून ते आता गप्प राहतील आणि ट्रम्प ह्यांनी शपथ घेतली की मग न्यूयॉर्कमधील मग हरीश साळवेंसारखा वकिल नेमतील.

शाम भागवत's picture

26 Nov 2024 - 9:48 am | शाम भागवत

अदानीने भारतात लाच दिली आहे असा आरोप आहे.

हे तुमचे म्हणणे आहे.
मी म्हणालोय की लाच देण्याघेण्याचा प्रत्यक्ष व्यवहार झालेली नाही. तर फक्त लाच देण्याचे ठरलाय. मी ही वस्तुस्थिती फक्त पुढे आणलीय.
😁
पण एवढे सगळे पुरावे असताना भारतात केस दाखल करायची सोडून अमेरिकेत केली. त्यामुळे राजकारणाचा वास यायला लागला. तसं असेल तर अमेरिकेला काय साधायचं असेल ते शोधण्याचा प्रयत्न केला.
😁

आंद्रे वडापाव's picture

26 Nov 2024 - 8:34 am | आंद्रे वडापाव

https://i.ibb.co/Gk17XZR/Screenshot-20241125-152139-Chrome.png

मम आत्मनः श्रुती स्मृती पुरणोक्त
सत्ता फल प्राप्यऱर्थ प्रधान पद प्रित्यर्थ
अहं अंधत्वकर्णबधिरत्वंच धारणमं करिष्ये

शाम भागवत's picture

26 Nov 2024 - 9:58 am | शाम भागवत

:)

आंद्रे वडापाव's picture

26 Nov 2024 - 8:34 am | आंद्रे वडापाव

A

मम आत्मनः श्रुती स्मृती पुरणोक्त
सत्ता फल प्राप्यऱर्थ प्रधान पद प्रित्यर्थ
अहं अंधत्वकर्णबधिरत्वंच धारणमं करिष्ये

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Nov 2024 - 4:05 pm | अमरेंद्र बाहुबली

महाराष्ट्र अदानीने सॉरी भाजपने जिंकला असल्याने अदानीला चांगलाच दिलासा मिळालेला असेल.

कानडाऊ योगेशु's picture

26 Nov 2024 - 8:26 pm | कानडाऊ योगेशु

PENPENCILDRAW हे काय आहे?

शाम भागवत's picture

27 Nov 2024 - 4:02 am | शाम भागवत

पेन पेन्सिल ड्रा
पेन व पेन्सिलने काढलेले चित्र
मी तरी असा अर्थ लावलाय.
:)

अमेरिकी कोर्टात अदानीच काहीही होणार नाही.

अजून नुसता आरोप केलाय तो सिद्ध व्हायला भरपूर वेळ जाईल.

मुळात ट्रम्प साहेबांवर दोषारोप सिद्ध होऊन सुद्धा ते अध्यक्ष होणार आहेत आणि हे खटले ४ वर्षे बासनात राहणार आहेत .

तेंव्हा अडाणी यांचं अमेरिकेत काहीही होणार नाही हे शंभर टक्के सत्य आहे.

For the US to bring Adani to trial, extradition is key. The US has jurisdiction ONLY over crimes that occur on US soil or against US citizens. For extradition to take place, the alleged crime must be considered illegal in both the US and India.

Apart from that, the US must present sufficient evidence to Indian authorities.

The Indian authorities would then evaluate the request under domestic laws and the treaty’s terms, and Indian courts may be tasked with conducting hearings to decide if the evidence supports extradition.

बसा बैलाच्या खाली दूध काढायला

Extradition can be denied under certain conditions, such as if the charges are political, human rights concerns exist, or the evidence is insufficient.

कसाबला पकडून पूर्ण खटला चालवून तुम्ही फाशी दिली पण अजूनही पाकिस्तान पुरावा द्या म्हणून सांगतंय कि.

तो पनून तेथे बसून भारतविरोधी वक्तव्ये करतोय त्यासाठी रेड कॉर्नर नोटीस नाकारली गेली आहे. भारताची विनंती अमेरिका मान्य करत नाहीये तर भारत त्यांची विनंती का मान्य करेल

भारत अमेरिकेला अदानी बाबतीत भीक घालेल असं कुणाला वाटत असेल तर ती बालबुद्धी असेल

If the case proceeds, it would lead to a trial where prosecutors must prove guilt beyond a reasonable doubt.

https://www.indiatoday.in/india/story/gautam-adani-bribery-case-what-arr...

यातील काहीही होणार नाहीये.

तेंव्हा मी फक्त भुजबळांची बिनबुडाची विधाने वाचून हसण्यासाठी पॉपकॉर्न घेऊन बसलोय

शाम भागवत's picture

27 Nov 2024 - 4:00 am | शाम भागवत

आणि मी शेअर्स घेऊन बसलोय. भुजबळांमुळे आणखी खाली येण्याची वाट बघतोय,

शाम भागवत's picture

27 Nov 2024 - 3:06 pm | शाम भागवत

छे. आज वरच गेला.

शाम भागवत's picture

27 Nov 2024 - 3:13 pm | शाम भागवत

अप्पर सर्किट
:)