मेन विल बी मेन
वटपौर्णिमा, आतून आवाज आला,
पूजा करू का? ऐकताच पोटात गोळा आला
त्याचं काय आहे, म्हणत असाल तर बुकिंग करते
नाहीतर मी बापडी दुसरा गडी शोधते.
राहू दे, मीच करतो पूजा, मीच तुला मागतो
कशाला गुडघ्यांना त्रास, मनात मांडे भाजू लागतो,
हळद, कुंकू, बुक्का, पूजेची थाळी सजते,
तेरड्यासोबत चार आंब्यांची वर्णी लागते.
वड म्हणजे पुरुष? प्रश्न मला पडतो
काय होईल? आंब्याच्या जागी जर खंबा नेतो...
गुंडाळलेला वड म्हणत होता, "चूक झाली देवा"
"का रे बाबा?" "पारावरल्या पऱ्या बघून वाटत होता हेवा.
इना, मिना, रिंकू, टिंकू हाय, हॅल्लो करत होत्या
मेरावाला छोडके दुसरा मिळावा, म्हणून कल्ला करत होत्या."
परफ्यूमच्या काॅकटेलने आसमंत भारला होता,
भरजरी ललना बघून वडही धुंद झाला होता.
मग मीही लागलो लाइनीत, मारू लागलो फेरे
गजगामिनी नको, हेमा, शिल्पा, कुणी प्राजक्ता तरी दे रे.
-
भरजरी पदर लोळत होता, पदरावर पडला पाय,
-
"मान वेळावुनी धुंद पाहू नको, चालताना अशी वीज पाडू नको"
अरे देवा! माझा नंबर लागला की काय?"
ओळखीचा आवाज कानी पडला,
"गाढवासारखे लोळू नको, सोड माझी चादर, ओढू नको"
काय मेला त्रास! चार घटका निवांत....ब्ला, ब्ला, फूसsssssss,खळ फट्याक
Men will be men...
प्रतिक्रिया
31 Oct 2024 - 11:28 am | कंजूस
चांगली स्वप्नं पाडायला वडाचा आधार.
हा हा हा.
31 Oct 2024 - 2:03 pm | श्वेता२४
भारि जमलय
31 Oct 2024 - 2:22 pm | पाषाणभेद
हा हा, मस्त हसवणूक झाली. स्वप्नात परी नेहमी दिसते का?