माझ्या संग चांदणं ही...

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in मिपा कलादालन
6 Oct 2024 - 11:15 am

“माझ्या संग चांदणं ही”
हे माझं नवं गाणं रिलीज झालं आहे. एकदा नक्की बघा आणि गाणं कसं वाटलं सांगा.

https://youtu.be/wFyTCuCXdPs?si=u2k7pzivz-u5yW9i

सपनानं तुझ्या मन रातभर व्यापलं
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं
कंकण आवाज
पैजणाचं नाद
रातभर घुमे
सखे तुझी साद
असं कसं राती मला आगळच वाटलं.
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं.

नभातला चांद सखे तुझ्यावानी वाटला
तुझा श्वास गंध साऱ्या रानीवनी दाटला
दाटला सुगंध
वाऱ्यातून येई
गंधाळून मन
सखे माझं जाई
गंध तुझ्या पिरतिचं रातभर दाटलं.
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं.

सरुनिया रात मग उजाडता दिस
फुलापरी मन माझं उमलतं कसं
विखरून मनभर
सपनाचं ठसं
पिरतनं तुझ्या मन
भारलय जसं
असं कसं मन आता वागतय आगळं.
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं.

दीपक पवार.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Oct 2024 - 2:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन. गाणंही छान झालंय.

शुभेच्छा. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

Deepak Pawar's picture

6 Oct 2024 - 6:36 pm | Deepak Pawar

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर मनःपूर्वक धन्यवाद.

चांदणे संदीप's picture

13 Oct 2024 - 12:11 pm | चांदणे संदीप

गाणं पाहिलं. सुरेख झालंय.

सं - दी - प

Deepak Pawar's picture

15 Oct 2024 - 2:21 pm | Deepak Pawar

चांदणे संदीप सर मनःपूर्वक धन्यवाद.

खूप छान शब्दयोजना आणि गाणे पण छान झाले आहे. शुभेच्छा.

Deepak Pawar's picture

28 Oct 2024 - 3:53 pm | Deepak Pawar

OBAMA80 सर मनःपूर्वक आभार.

रम्या's picture

13 Dec 2024 - 1:06 pm | रम्या

वा छानच, शब्द आणि संगीत दोन्हीही सुंदर!

Deepak Pawar's picture

14 Dec 2024 - 11:26 am | Deepak Pawar

रम्या सर मनःपूर्वक धन्यवाद.