मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रीगणेश लेखमाला २०२४ - आवाहन

साहित्य संपादक · · काथ्याकूट
७ सप्टेंबर २०२४ भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके १९४६. अर्थात गणेश चतुर्थी. आणि मिपाचा वर्धापनदिनदेखील! 2 दरवर्षी आपण गणेशोत्सवामध्ये अकरा दिवस श्रीगणेश लेखमालेचे आयोजन करतो. यंदाही आपण श्रीगणेश लेखमाला आयोजित केलेली आहे. आणि अर्थात, ती शक्य होणार आहे आपल्या सर्वांच्या सहभागाने. नियम वा अटी अशा काही विशेष नाहीत, गणेशोत्सव हा आनंद आणि चैतन्याचा सोहळा असल्याने लेख सुखद असावेत, त्यात हिंसा, क्रौर्य, वातावरण अन् मन कलुषित करणारे लेखन नसावे, एवढीच अपेक्षा. आपलं लेखन 'साहित्य संपादक' या आयडीला व्यनिमार्फत पाठवा, किंवा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail.com या पत्त्यावर ईमेल करा. लेखन पाठवण्याची अंतिम मर्यादा- २ सप्टेंबर २०२४! कविता, पाककृती, बाप्पासाठी नैवेद्य, कथा, भटकंती, फोटोग्राफी, चित्रकला .... जरूर पाठवा. यासाठी साहित्य संपादकांशी संपर्क साधा. टीप : श्रीगणेश लेखमालेत लेखांच्या संख्येवर आपोआप थोडी मर्यादा येते, त्यामुळे काही उत्तम लेखन या उत्सवात प्रकाशित नाही करता आले तरी आपण ते मिपा दिवाळी अंक - २०२४ साठी राखून ठेवणार आहोत. ते लेखन दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात येईल.

वाचन 2760 प्रतिक्रिया 0