बोल्शेविक बांगलादेशात शिरजोर

नठ्यारा's picture
नठ्यारा in काथ्याकूट
10 Aug 2024 - 2:01 am
गाभा: 

लोकहो,

नुकत्याच बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन भारतात पळून यावं लागलं. त्यानंतर बांगलादेशातील हिंदूंची भीषण ससेहोलपट सुरू झाली. ती थांबावी या हेतूने हा लेख लिहिला आहे. मुद्द्यावर येण्याआधी हिच्यासारख्या अन्य घटनेचा थोडा मागोवा घेतो.

ही बोल्शेविक क्रांती आहे. साधारण असाच प्रकार झार निकोलस रोमानोव्हच्या बाबतीत झाला होता. त्याने मार्च १९१७ मध्ये राजेपदाचा राजीनामा दिला. त्याच वेळी आपला भाऊ मायकेलची राजेपदी नियुक्ती केली व ती नियुक्ती रशियन संसदेकडून मान्य करवून घ्यायची अटही टाकली. हे केल्यावर तत्कालीन राजधानी पीटर्सबर्गहून परागंदा व्हावं लागलं. ही घटना मार्च १९१७ मध्ये घडली. हिला फेब्रुवारीची क्रांती असंही म्हणतात. पारंपरिक रशियन कालमापन ग्रेगरियन कालमापनापेक्षा थोडं वेगळं आहे. मायकेल केवळ नामधारी प्रमुख होता. केरेन्स्की नामे क्रांतिकारकाकडे पंतप्रधानपद होतं. तो खरा सत्ताधारी होता. मात्र आठ नऊ महिन्यांत त्याला हाकलून लेनिनच्या नेतृत्वाखाली बोल्शेविक सत्तेत आले. सत्तेत आल्याबरोबर लगेच केरेन्स्कीस मेन्शेविक म्हणजे अल्प पाठिंब्याचा म्हणून घोषित केलं. प्रत्यक्षांत केरेन्स्की व लेनिन यांच्यात तोडपाणी झालं असायची शक्यता आहे. तसंही पाहता केरेन्स्की लेनिनच्या मुख्याध्यापकाचा मुलगा आहे. बोल्शेविक सत्तेत आले ते नोव्हेंबर १९१७ मध्ये. म्हणून हीस ऑक्टोबरची क्रांती म्हणतात.

पुढे असं झालं की झारला ब्रिटनने आश्रय दिला नाही. त्यामुळे सुरक्षेच्या कारणासाठी त्याला आपल्या शत्रूच्या म्हणजे बोल्शेविकांच्या नजरकैदेत राहावं लागलं. त्याच्यासाठी सुरक्षेचे इतर पर्याय का उपलब्ध नव्हते याची माहिती नाही. कदाचित झारही या क्रांतीत सामील असू शकतो. त्याला जुलै १९१८ मध्ये बोल्शेविकांनी सहकुटुंब सहपरिवार ठार मारला असं अधिकृतरीत्या म्हणतात. मात्र मृतांचे मुडदे कोणीही पाहिलेले नाहीत. झार दिसंत नाही म्हंटल्यावर रशियात नागरी युद्ध उफाळलं (साल १९१८ ते १९२१). ते नियंत्रणात आणण्यासाठी १९२२ साली लेनिनने दुष्काळ पाडला.

बांगलादेशातही असाच रंगीत क्रांतीचा ( colour revolution ) आकृतिबंध दिसून येतो. अगोदर निदर्शने वा उठाव आणि ती अचानक हाताबाहेर जाऊन सत्ताधाऱ्याचं पलायन, असा तो प्रकार आहे. अचानक हा शब्द महत्त्वाचा. तर आता शेख हसीनाचा झार होईल काय ? माझ्या मते तिला भारतातून इतरत्र हलवणं धोक्याचं ठरू शकतं. खरंतर भारताने तिला अटक वा नजरकैद करावं. अकस्मात परिस्थिती हाताबाहेर जाईल याची भणक भारतीय गुप्तचरांस आजिबात लागू नये म्हणजे काय ? मोदी, दोवाल, जयशंकर, राजनाथ, अमित शहा यांपैकी एक वा अनेकांचे स्पष्टीकरण अपेक्षित आहे. हां, तर काय सांगंत होतो की महमंद युनुस हा या बोल्शेविक क्रांतीचा केरेन्स्की आहे. लगेच वा यथावकाश त्यासही हाकलला जाईल. म्हणून त्याने भारताविरुद्ध त्रागा केला आहे.

महमंद युनुस म्हणतो की भारताने हा बांगलादेशाचा अंतर्गत प्रश्न आहे असं सांगणं चुकीचं आहे. त्याला भारताने कारवाई करायला हवी होती. ही केवळ तोंडदेखली बोंब असेल तर आपण समजू की तो इस्लामिक दहशतवादास मिळालेला आहे. पण ती जर खरी असेल तर त्यामागील अर्थ त्याची केरेन्स्कीप्रमाणे उचलबांगडी होऊ शकते हा आहे. महमंद युनुस हा ग्रामीण बँकेचा शिल्पकार आहे. केरेन्स्की हा देखील करन्सी म्हणजे चलनाशी संबंधित होता. या दोघांच्या पार्श्वभूमीतील साम्य चटकन ध्यानी यावं. केरेन्स्की मेला नाही कारण त्याचा वशिला होता. महमंद युनुसचा वशिला आहे का ? असला किंवा नसला तरी तो जिवंत राहील काय ? या बाबतीत काळ सांगेल ते खरं.

सोव्हियेत क्रांती पताधिप यहुदी व मसण्ये ( financier jews and freemasons ) यांनी घडवून आणली. हेच घटक आज बांगलादेशात इस्लामिक क्रांतिकारक म्हणून तथाकथित क्रांतीस पुढावा देत वावरंत आहेत. जॉर्ज सोरॉस सारखे पताधिप ज्यू कधीही थेट उघडपणे क्रांती करीत नसतात. ते फ्रीमेसन वा तत्सम संघटनेस हाताशी धरून आपलं काम साध्य करतात. बांगलादेशात ती जमाते इस्लामी आहे, तर भारतात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया असते. अशा रीतीने अनेक ठिकाणी अनेक काड्या सारल्यामुळे युरोपात ज्यूंच्या विरोधात जनमत खवळत आलेलं आहे. ज्याला ब्रिटीश साम्राज्य म्हणतात ते वास्तविक यहुदी पताधिपांचं साम्राज्य होतं व ते मसण्यांनी चालवलं. British Empire was a financier jew's empire run by freemasons. हे सत्य जगजाहीर आहे. आजघडीची बांगलादेशी क्रांती ही ब्रिटीश साम्राज्य पुनर्स्थापित करण्यासाठी केलेली खेळी आहे.

तर हिचा सामना कसा करायचा ? दोन मुद्दे जाणवले.

०१. भारताची सुरक्षा : माझ्या मते भारताने बांगलादेशाचा एक वा अधिक भाग तोडून हिंदूंसाठी म्हणून वसवावे. एक भाग भारताच्या कुक्कुटग्रीवेस ( चिकन नेक हीस ) विस्तारणारा असावा. जेणेकरून ईशान्य भारत उर्वरित भारताशी विस्तृत भूभागाने जोडला जाईल. दुसरा भाग चितगाव टेकड्या असाव्यात. ही पर्वतराजी १९४७ साली फाळणीच्या वेळेस पूर्व पाकिस्तानात ढकलायचं काहीच कारण नव्हतं. हिच्यात चकमा बौद्ध बहुसंख्य होते. तिसरा भाग खुद्द चितगाव व कॉक्सबाजार हा असू शकतो. यामुळे ईशान्य भारतास ( विशेषत: त्रिपुरा व मिझोरम राज्यांस ) भारतातून सुगम सागरी शिरकाव ( convenient sea access ) मिळू शकेल.

०२. बांगलादेशी हिंदूंची दु:स्थिती सुधारणे : याकरिता एक उपाय आहे. माहीम ( मुंबई ), मीरारोड ( मुंबईनजीक ), मुंबरा, भिवंडी, मालेगाव, सिल्लोड इत्यादि ठिकाणांच्या आपल्या भाईचारावाल्या आप्तेष्टांना विनंती करणे. त्यांच्या हातापाया पडून त्यांना मनापासून विनवणे. जमल्यास त्यांची गळाभेट घेणे. त्यांच्या कमरेवर हात ठेवून नृत्य करणे. त्यांना यथोचित प्रकारची वस्त्रे पुरवणे. त्यांना रुचकर मांसाच्या मेजवान्या देणे. त्यांच्या काळजास हात घालून त्यांचं हृदयपरिवर्तन करणे. इत्यादि.

०३. यादी अपूर्ण. कृपया वाचकांनी भर घालावी.

बाकी काय लिहिणे. लेख नेहमीप्रमाणे विस्कळीत आहे. खरंतर नीट बसून लिहायला हवा. पण काय करणार तहान लागल्यावर विहीर खणायची जित्याची खोड आहे. आणि मला मरायचं नाहीये.

आपला नम्र,
-नाठाळ नठ्या

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

11 Aug 2024 - 7:45 am | चौकस२१२

माझ्या मते भारताने बांगलादेशाचा एक वा अधिक भाग तोडून हिंदूंसाठी म्हणून वसवावे.

शु हळू बोला खुर्शीद मणिशंकर यांनी ऐकले तर फाडून खातील तुम्हाला !!!!!

अरे बाबो.... असले काही हिंदूंचं रक्षणासाठी भारताने आणि ते सुद्धा भाजप सरकारने कितीही इच्छा असली तरी करने म्हणजे इंग्रजीत एक म्हण आहे "फॅट चान्स "
देशातलै देशात समान नागरी कायदा करण्याचाच मानस सुद्ध ९९ /२४० मते देऊन जनतेने हणून पाडला तर असे हिंदूंसाठी काही करणे तौबा तौबा ...

चौकस२१२'s picture

11 Aug 2024 - 7:53 am | चौकस२१२

शेतकरी आंदोलनात किनई खलिस्तान्यांचा काहीच हात नवहता तसेच बांगलादेशातील या "पाक" (शुद्ध )क्रांतीत जिहादी लोकांचा काहीच हात नाही
तेवहा सर्व हसीना प्रेमी संघोट्यांनी गप्पा बसावे असा फतवा काधन्यात येत आहे
आपला
१००-१ लीडर ऑफ ओपो

कर्नलतपस्वी's picture

11 Aug 2024 - 9:01 am | कर्नलतपस्वी

भोंदू बांधवानी यातून काहीतरी शिकावे....

बांगलादेशातील हिंदूंची भीषण ससेहोलपट सुरू झाली. ती थांबावी या हेतूने

मुद्दा बरोबरच आहे कारण भारताकडे वंग हिन्दू बांधवांचे तारणहार म्हणून बघणे सहाजिकच आहे. पण मला असा प्रश्न पडतो की अशा वेळेसच नेमके सर्वांना भारत हिन्दू देश म्हणून का आठवतो?. इतर देशातील पिडीत लोकांना भारताने का शरण व सुरक्षा द्यावी?
का आपले संविधान तर सेक्युलर म्हणवते म्हणून?

शेख हसिना यांना भारतात का यावे वाटले?मध्यपूर्व एत्तधर्मिय बहुल देशात जास्त सुरक्षित वाटावयास हवे?
भारतामधील काही लोकांनाच इथे रहात असताना असुरक्षित वाटते,असे का?

अकस्मात परिस्थिती हाताबाहेर जाईल याची भणक भारतीय गुप्तचरांस आजिबात लागू नये म्हणजे काय ?

असे मुळीच नाही. पंचेचाळीस मिनीटात शेजारील देशाचे पंतप्रधान दुसर्‍याच देशात पलायन करतो ,शरण घेतो व एव्हढी मोठी घडामोड गुप्तचरांना नसेल असे शक्यच नाही. अल्पावधीत पंतप्रधान सारख्या अती महत्वपूर्ण पदावर विराजमान व्यक्तीला सुरक्षा प्रदान करणे पुर्व सुचना शिवाय शक्यच नाही.

हा बांगलादेशाचा अंतर्गत प्रश्न आहे का?

मुळीच नाही. शेजारी असल्याने याचे पडसाद
नक्कीच उमटणार. सीमावर्ती भागातून पिडीतांचे लोंढे व बरोबरच दहशतवादी घुसणार त्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही.

मला वाटते सहिष्णुता हा देशाला फार पुरातन काळापासून लागलेला भयंकर रोग आहे.

मला वाटते सहिष्णुता हा देशाला फार पुरातन काळापासून लागलेला भयंकर रोग आहे.

यात मी फक्त एक शब्द बदलींन सहिष्णुता ऐवजी "अति सहिष्णुता" "अयोग्य ठिकाणी दाखवलेली सहिष्णुता "

शाम भागवत's picture

11 Aug 2024 - 12:21 pm | शाम भागवत

का आपले संविधान तर सेक्युलर म्हणवते म्हणून?
आणिबाणीत सगळे विरोधक तुरूंगात असताना व विधानसभेची मुदत संपलेली असताना घटना दुरूस्ती करून संविधानात सेक्युलर शब्द घुसवण्यात आला असे कुठेसे वाचल्याचे आठवते. इतकेच नव्हे तर याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे असेही वाचनात आले आहे.

शाम भागवत's picture

11 Aug 2024 - 12:36 pm | शाम भागवत

मला वाटते हिंदू जागा होतो आहे. असे प्रकार झाले की भारतातील हिंदू संघटन वाढीस लागते. पण त्यासाठी काही हिंदूना मरावे लागते. अत्याचार सहन करावे लागतात. तोपर्यंत हिंदू विचार करायलाही तयार होत नाहीत.
बांगला देशांत २७ टक्के हिंदू होते. ते आता ७ टक्के म्हणजे १ कोटी आहेत म्हणतात. हे घडत असताना हिंदूंनी कोणता आवाज उठवला? समान नागरी कायदा झाला का? सीएए कायदा झाला का? पाकिस्तानात तर फक्त १ टक्का हिंदू उरलेले आहेत म्हणतात.

मतदान करताना मुस्लीम व्होट बँकेला हिंदू व्होट बँक हेच उत्तर आहे. हे हळूहळू घडताना दिसतंय. ३५ टक्के हिंदू एकत्र आले आहेत. बांगला देशातील घटना घडल्यावर काही हिंदू झोपेतून जागे होतील व हे ३५% टक्के वाढतील एवढ्या आशेवर जगणे फक्त आपल्याला सध्या शक्य आहे.
असो.

चौकस२१२'s picture

11 Aug 2024 - 2:03 pm | चौकस२१२

मतदान करताना मुस्लीम व्होट बँकेला हिंदू व्होट बँक हेच उत्तर आहे.

खरे तर तर चांगल्या लोकशाहीत कुठलीच धार्मिक वोट बँक नसावी
पण केवळ डावखुर्यांच्या "नतद्रष्ट " वागणुकी मुळे धार्मिक नसलेल्या हिंदूला सुद्धा आता हिंदू व्होट बँक व्हावी असे वाटते !

शाम भागवत's picture

11 Aug 2024 - 5:02 pm | शाम भागवत

हिंदू हा एक धर्म असं जोपर्यंत विचारवंत मानत राहतील तोपर्यंत तरी हा गोधळ चालूच राहणार आहे.
हिंदू ही एक विचारसरणी आहे. किंवा विचार करण्याची एक पध्दत आहे. ती अनेक जीवनपध्दतींचा एक समुच्चय आहे.
भगवंत जरी एक असला तरी तो प्राप्त करण्याचे अनेक मार्ग असू शकतात असे मानणारी ती एक पध्दत किंवा जीवनशैली आहे.

त्यामुळे राम मानणारा हिंदू असू शकतो तसेच राम न मानणारा पण हिंदू असू शकतो. मूर्तीपूजेवर विश्वास ठेवणारा हिंदू असू शकतो तसेच न मानणारा किंवा त्यावर संशय व्यक्त करणाराही हिंदू असू शकतो. ही उपासनेतील विविधताच कोणी लक्षात घेत नाहीये.

ख्रिश्चन व मुसलमानांना एवढेच कळते की आपला जो धर्मग्रंथ आहे तो न पाळणारा हा परधर्मीय असतो. त्यानुसार ते हिदूंना परधर्मीय मानतात. विविध देव, विविध उपासना, विविध ग्रंथ असू शकतात व त्यातही एकता असू शकते ही त्यांना कळणारी गोष्ट नाही आहे.
दुर्देवाने ते विजेते असल्याने आपणही हिंदू हा शब्द संकूचित अर्थाने मानायला लागलेले आहोत.

हिंदू तत्वज्ञानानुसार व्यक्ति तितक्या प्रकृती असतात व परमेश्वराकडे जाण्याचे तेवढे मार्ग असू शकतात. त्यामुळे बायबल व कुराण यांच्या सहाय्याने सुध्दा परमेश्वर प्राप्ती करून घेता येते यावर हिंदू आरामात विश्वास ठेऊ शकतो. पण इतरांचे तसे नाही आहे.

इतर धर्मियांप्रमाणे हिंदू हा एक धर्म समजून, हिंदू हा शब्द संकूचित करू नका एवढेच म्हणून थांबतो.

भागो's picture

11 Aug 2024 - 5:11 pm | भागो

शाम भागवत
आपल्या विचारांशी पूर्ण सहमत.

संकुचित अर्थाने कि काय माहित नाही पण कधी कधी वाटते कि या "विवधतेतून एकता " पेक्षा कॅथॉलिक ख्रिस्त्यांसारखे एकसंध एकाधिकार शाही सारखे साचेबंद जगभर साधारण सारखे असलेले ( स्ट्रक्चरचर्ड ) असे काही तरी असावे ... तसे असते तर कदाचित हिंदू फोडला गेलं नस्ता

मी तरी हिंदू हा एक समाज म्हणून पाहतो धार्मिक दृष्टीने नाही ( जसे डाव्यात उजवे आणि उजव्या पक्षात डा वे पण असतात , तसे हिंदू हि ओळख पण अजिबात धार्मिक नाही असे काही लोक असतात त्यातील मी असे मला वाटते (म्हणजे सद्या तरी भाजप ला पाठिंबा देत असून सुद्धा अंधश्रद निर्मूलनावर ला पूर्ण पाठिंबा असे मानणे हे याचे उदाहरण )

त्यामुळे हिंदू राशटर हे धार्मिकते साठी नाही ( म्हणजे जसे इराण ) तर केवळ बहुसंख्यांकांचाच योग्य तो सन्मान राहावा आणि एक सर्वधर्मसमभावी पण हिंदूंची ओळख असलेला देश म्हणून राहावा असे वाटते

मग त्यात योग , आयुर्वेद , देवनागरी लिपी सारखया हिंदू संस्कृतीशी नाळ असलेली गोष्टी जर सरकार ने जगभर "मार्केट" केल्या तर त्यात जे दावे केवळ हिंदू विरोधी भावनेतून विरोध करता ता त्यानं माझा कडवा विरोध असतो
असो शेवटी सावरकरांच्या हिंदू असण्याचं व्याख्येवर आपलं तरी जास्त भर आहे मग शैव वैष्णव हा देवी कि तो देवी असले "सवते सुभे "
नकोत

व्यक्ति तितक्या प्रकृती असतात व परमेश्वराकडे जाण्याचे तेवढे मार्ग असू शकतात.
हो असतात पण कुठंतरी एक पण पाहिजे नाहीतर शंभर शकले झाली कि शत्रू ला सोपे
येथे सावरकरांची विचारसरणी जास्त भावते मी तर हिंदूंचं आपापसातील फुटी बद्दल बोलतोय ते एकूण भारतवर्षातील पुण्यभूमी आणि कर्मभूमी मानणाऱ्या सर्वांना हिंदू म्हणत असत ( सावरकर हे अजिबात दाहरमिक अंदाज नवहते हे बऱ्याच जणांना माहित असले त्यांचे पतितपावन मंदिर पर्यटन वैगरे शोधा )

शाम भागवत's picture

12 Aug 2024 - 1:51 pm | शाम भागवत

हिंदू विचारसरणी ही हजारो वर्षे चालत आलेली आहे. निसर्गातील विविधतेवर आधारलेली आहे. सगळं एकाच साच्यात बसवायचा त्याच अट्टाहास नाही आहे.
जरी सध्या ही संस्कृती किंवा विचार परंपरा धोक्यात असल्यासारखे वाटत असले तरी ही परिस्थिती गेल्या ३-४ शतकातली आहे. हजारो वर्षाच्या वाटचालीत ही ३-४ शतके म्हणजे खप मोठा कालावधी आहे असे मला वाटत नाही.
मुख्य म्हणजे जसजसे दिवस उलटत जात आहेत त्याप्रमाणात ती बलवत्तर होत जाताना दिसत आहे. सर्व विचारांना बदलांना सामावून घेणारी ही संस्कृती टिकणे हे निसर्गनियमांना धरून आहे असे मला वाटते.

वामन देशमुख's picture

12 Aug 2024 - 6:10 pm | वामन देशमुख

हिंदू विचारसरणी ही हजारो वर्षे चालत आलेली आहे. निसर्गातील विविधतेवर आधारलेली आहे. सगळं एकाच साच्यात बसवायचा त्याच अट्टाहास नाही आहे.
जरी सध्या ही संस्कृती किंवा विचार परंपरा धोक्यात असल्यासारखे वाटत असले तरी ही परिस्थिती गेल्या ३-४ शतकातली आहे. हजारो वर्षाच्या वाटचालीत ही ३-४ शतके म्हणजे खप मोठा कालावधी आहे असे मला वाटत नाही.
मुख्य म्हणजे जसजसे दिवस उलटत जात आहेत त्याप्रमाणात ती बलवत्तर होत जाताना दिसत आहे. सर्व विचारांना बदलांना सामावून घेणारी ही संस्कृती टिकणे हे निसर्गनियमांना धरून आहे असे मला वाटते.

टिपिकल शहामृगी दृष्टिकोन!

हिंदू विचारसरणी ही हजारो वर्षे चालत आलेली आहे.

पर्शियन संस्कृतीही हजारो वर्षे चालत आलेली होती! इस्लामने पाहता पाहता संपवली! रोमन, ग्रीक या संस्कृती आता कुठे आहेत का? हिंदू विचारसरणी ही केवळ हजारो वर्षे चालत आलेली आहे म्हणून तिला संरक्षणाची गरज नाही हे म्हणणे आत्मघातकी आहे.

मुख्य म्हणजे जसजसे दिवस उलटत जात आहेत त्याप्रमाणात ती बलवत्तर होत जाताना दिसत आहे

कधी? कुठे? प्रत्यक्षात मागच्या शतकानुशतके हिंदू (किंवा त्यांना जे काही म्हणायचे आहे त्या) लोकांना हिंदू म्हणून शिल्लक राहता येईल असा भूभाग सातत्याने कमी कमी होताना दिसत आहे. कोणत्याही ठिकाणी त्यात वाढ होताना दिसत नाही.

सर्व विचारांना बदलांना सामावून घेणारी ही संस्कृती टिकणे हे निसर्गनियमांना धरून आहे असे मला वाटते.

असे मलाही वाटते. पण ते निसर्गनियम प्रत्यक्षात राबविण्याची जबाबदारी हिंदूंच्या नेतृत्वाची आहे. पण हिंदू म्हणजे तर नेतृत्वहीन द्विपाद कळप!

शाम भागवत's picture

13 Aug 2024 - 8:34 pm | शाम भागवत

सगळं दोन चार वर्षात व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुमचे सगळे मुद्दे मान्य.
:)

चौकस२१२'s picture

6 Sep 2024 - 8:27 am | चौकस२१२

सर्व विचारांना बदलांना सामावून घेणारी ही संस्कृती टिकणे हे निसर्गनियमांना धरून आहे असे मला वाटते.
या भ्रमात आपण राहतो .. आणि कँसर जसा पोखरते तसे हे २ अब्राहमीक धर्म आपल्याला पोखरत आहेत
विविधता असेना का पण एकूण हिंदू तरी स्पष्ट पणे म्हणूयात मग त्यात हिंदू कि संना तान / शिवा कि वैष्णव असले फाटे नकोत
उदाहरण घ्या
१) इस्कॉन ची लोक बघून आपण हुरळतो बघा कसे गोरे हिंदू झाले.. त्यानना विचारले कि बाबा तू सर्वसाधारण हिंदू आहेस का तर उत्तर काय मिळते ते पहा.. जगभरचं मिपाकरांनी जवळचं इस्कॉन मंदिरात जाऊन विचारा ( तो एक sekt आहे )
२० वरील प्रश्न स्वामी नारायण वाल्यांना विचार आपण हुरळतो कि अबू ढबीत हिंदू मंदिर झाले .. नाही ते स्वामी नारायण या डोळ्याला झापड लावलेली पंतह्चे मंदिर ( प्रचंड पैसे)
एक हिंदू म्हणून इस्कॉन आणि स्वामी नारायण याबद्दल आत्मीयता वाटायला पाहिजे पण त्यातील गोम दिस ल्यावर जास्त वाईटच वाटते .. हे सव ते सुभे आहेत
जसे छत्रपती दुर्बल झाल्यावर सांगली पासून ग्वाल्हेर पर्यंत
सगळे स्वयंभू "राजे झाले" छत्रपतींचे मूळ स्वराज गेले खड्यात !

मुक्त विहारि's picture

13 Aug 2024 - 9:30 pm | मुक्त विहारि

वाचत आहे...

diggi12's picture

6 Sep 2024 - 6:38 am | diggi12

फ्री मेसन

हिंदूंनी अजान आणि नमाज दरम्यान लाऊडस्पीकर आणि इतर धार्मिक विधी थांबवावेत.
इति सेक्युलर बांगलादेश सरकार. मेजॉरीटीचा आवाज ऐकणारे सरकार !
बातमी दूवा : १
बातमी दूवा : २
बातमी दूवा : ३
अवांतर : बांगलादेशाचे नवीन पाकीस्तान किती काळात होईल ?