काहीतरी चुरचुरीत खायची इच्छा होती.खुप दिवस अख्खे हिरवे मूग वापरून रेसिपी झाली नव्हती.
रात्री दीड वाटी हिरवे मूग ,एक वाटी हरभरा डाळ,अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धा चमचा मेथ्या एकत्र भिजवलेल्या.सकाळी जिरे, आलं तुकडा,दोन मिरच्या टाकून मिक्सरमधून भिजलेल्या डाळी जाडसर वाटून घेतल्या.
आता कांदा आणि कोथिंबीर चॉपरमधून बारीक केले.वाटलेल्या मिश्रणात चिरलेला कांदा, कोंथिबीर,धनेपूड,एक चमचा तिखट, स्वादानुसार मीठ घातलं.
छानपैकी मध्यम आकारात थापून खरपूस तळून घेतले.नुसत्या दह्याबरोबर खात आस्वाद घेतला.
नंतर परदेशी स्थायिक मैत्रिणीने सांगितले की मागची मूग-हरभराडाळ वडे म्हणजे फलाफलसारखीच रेसिपी आहे.तेव्हा थोडं फलाफल विषयी शोधलं तर त्यात हरभरा डाळीऐवजी काबूली चणा किंवा हरभरे वापरतात हे समजलं. लगेच तीसुद्धा परत करून पाहिले.रेसिपी मागच्या सारखीच.
नंतर एका मैत्रिणीने सांगितले श्राद्धासाठी असेच डाळी धुवून वाळवून त्याची भरड करून वडे करतात ते भरड वडे,करते ते नंतर.
-भक्ती
प्रतिक्रिया
21 Aug 2024 - 11:36 am | वामन देशमुख
व्वा ! फोटू पाहून तोंपासु!
तुमच्या रेसिपीज वरचेवर अधिकाधिक चांगल्या होत चालल्या आहेत.
;-)
अजून येत द्या - खुबा रोटी बाबा गणूस वगैरे .
---
हे वाचुन हे आठवले -
सानिकास्वप्निल यांचे फलाफल सँडविच
https://www.misalpav.com/node/17856
गणपा यांचे फलाफील - शवर्मा
https://www.misalpav.com/node/23035
21 Aug 2024 - 11:42 am | Bhakti
चालायचंच,
कभी जमीनपर कभी फलकपे
:)
5 Sep 2024 - 10:35 am | विजुभाऊ
ऑ .... वामनराव ते खुबा रोटी नाय ओ.. ते "खुबूस " असे आहे
"खुबा" याचा अर्थ वेगळा होतो. ( लहानपणी डॉक्टर खुब्यावर इंजेक्षन द्यायचे तो अवयव)
10 Sep 2024 - 11:23 pm | वामन देशमुख
मला खोबा रोटी असं म्हणायचं होतं.
(कॉन्टेक्स्ट् वेगळा आहे याची जाणीव आहे.)
बाकी खुबूस / खुबस / खबुस / पीटा ब्रेड ची आठवण करून दिल्याबद्धल आभार.
21 Aug 2024 - 1:10 pm | कंजूस
फेलाफेल किंवा काय उच्चार असेल तो म्हणजे चणाडाळवडे.
टर्मिनेटर यांची इजिप्त ट्रिप यावरच धावत होती.
मिश्र डाळ वडेही चांगले लागतात. चांगले केले आहेत.
21 Aug 2024 - 1:42 pm | Bhakti
खरचं ,बाराही भागांची खाद्यसंस्कृती पाहिली,सँडविच आणि फलाफेलच जास्त दिसले ;) हा पदार्थ इजिप्तचाच म्हणून ओळखला जातो.
27 Aug 2024 - 5:56 am | चौकस२१२
याला पूर्ण मेडिटेरियन चव पाहिजे असेल तर
जर उपलब्ध असेल तर यात कोथिंबिरी ऐवजी पार्सली घालावी ,
आणि त्याबरोबर " ताहिनी " तीळा पासून बनवलेले किंवा "ताझिकि : हि ग्रीक पद्धतीची काकडीची आंबट कोशिंबीर
30 Aug 2024 - 11:46 am | टर्मीनेटर
अगदी अगदी...
त्या सोळा दिवसांत फलाफेल सँडवीच हाच तर माझ्या रोजच्या आहारतला प्रमुख घटक बनला होता 😀
@ भक्ति
रेसीपी आवडली.
21 Aug 2024 - 1:19 pm | अमरेंद्र बाहुबली
अरे वा ताई. काल नगरलाच होतो. आधी माहित असतं तर आलो चाखायला. मस्त आहेत फोटो.
21 Aug 2024 - 1:32 pm | Bhakti
हो का,काल पनीर मसाला होता, अप्रतिम भाजी झाली होती.ही खूप आधीची रेसिपी आहे.आज कोबीची भाजी आहे :-)
21 Aug 2024 - 2:46 pm | कर्नलतपस्वी
फलाफल. बरोबर लसण्या दही देतात. खायला चांगले लागते.
अमरिकन थालीपीठ (पिझ्झा) अजीबात खात नाही तेव्हांहेच खात असे.
बाकी डाळवडा, परदेशात जाऊन नाव बदलले आहे.
दक्षिणी डाळीचे जास्त आवडतात. हल्ली कमी खातो नाहीतर कवळीच हातात यायची.
पाककृतीबद्दल काय बोलणार, खुद्द पाकपदम्श्री नी स्वतःच केली आहे म्हणल्यावर मस्तच असणार.
डोळ्यांना आवडली.
30 Aug 2024 - 2:57 pm | श्वेता२४
देसी व पौष्टीक फलाफल आवडले