पावसाळी भटकंती २०२४

कंजूस's picture
कंजूस in मिपा कलादालन
19 Aug 2024 - 4:39 pm

पावसाळी भटकंती २०२४

ऑगस्टच्या दोन आठवड्यात भिवपुरी आणि नेरळ माथेरान भटकलो. त्याची क्षणचित्रे आणि चित्रपट.

फोटो १.
.माथेरानमध्ये कुठेही भटकायचं .

फोटो २.
.. पावसाळ्यात सर्व गर्दी शार्लोट लेक कडेच जाते. दस्तुरीपासून पाच किमी.

फोटो ३.
.शिवसंग्रहालय- एको पॉईंटच्या वाटेवर.

फोटो ४.
..आता एक दिवसासाठी माथेरानला येणाऱ्यांसाठी नवीन सोय अमन लॉज स्टेशनच्या तिकीट खिडकी समोर.

फोटो ५.
..ई रिक्षा आता सध्या सहा आहेत आणि त्या दस्तुरी ते माथेरान स्टेशन पंधरा मिनीटांत नेतात. तिघांचे रु१०५.किंवा प्रत्येकी रु ३५ .रांगेत उभे राहायचे. शनिवार रविवार अर्धा तास जातो पण इतर दिवशी लवकर मिळते.

फोटो ६.
..भिवपुरी स्टेशनपासून फक्त दीड किमी अंतरावर एक मोठा तलाव आहे. पण तो एका टेकडीमुळे दिसत नाही. या तलावाला वळसा घालून बरीच पायपिट भटकंती केल्यावर माथेरानच्या गार्बट पॉइंटला पोहचता येते. ट्रेक अवघड नसून फक्त खूप चालीचा आहे. खूप पाऊस असताना वाटेतला डिकसळ धबधबा आणि नदी ओलांडता येत नाही. धबधबा मात्र पर्यटकांचे आकर्षण आहे. माथेरानला वर जाणाऱ्या सात वाटांपैकी ही एक मजेदार वाट आहे.

माथेरान बद्दल थोडेसे .....
इथे जाण्यायेण्याच्या सोयी आणि वाहनांबद्दल सतत बदल होत असतात. काही चांगले काही वाईट. सर्वात म्हणजे मिनी टॉय ट्रेन म्हणजे नेरळपासून माथेरानपर्यंत धावणारी छोटी गाडी. यांचे online आरक्षण एप्रील २०१२पासून रेल्वेने बंद केले. फक्त तिकिट खिडकीवर उभे राहून(दोन तास) तिकीट मिळते. पुढे गाडी तीन तास घेते. त्यामुळे यातली गंमत संपली. १५ ऑक्टोबर ते १० जून चार गाड्या धावतात. माथेरानच्या चढावर पहिले स्टेशन अमन लॉज. तिथून माथेरान अडीच किमी आहे. हे अंतर जाणाऱ्या चार शटल ट्रेन्स बाराही महिने धावतात. पंधरा मिनिटांचे ४५ रू तिकिट आहे पण ते एक दीड तास रांगेत उभे राहून घ्यावे लागते कदाचित गाडी सुटतानाच तिकिट मिळाले तर आनंदच. पण एकूण ट्रेनचा नाद सोडावा.

नेरळ - माथेरान टॅक्सी - या दिवसाचे अठरा तास उपलब्ध असतात व फक्त पंधरा मिनिटांत माथेरानला नेतात. प्रत्येकी शंभर रुपये प्रमाणे चौघांना नेतात. परंतू शनिवार रविवार सोडल्यास यांना गिर्हाईक कमी असते व प्रत्येकी पन्नास रुपये घेऊन वर नेतात. सध्या स्वत:च्या दुचाकी चारचाकीने येणारे पर्यटक असंख्य आहेत. (पार्कींग भरपूर वाढवले आहे.) हे पर्यटक मुंबई ठाणे पुणे कडून येतानाच वाटेतच खाणे करतात त्यामुळे वरच्या खानावळींचाही धंधा बसला आहे. उन्हाळ्यात बर्फाचे गोळे, थंड पेये मात्र भरपूर खपतात.

कर्जत- नेरळ -माथेरान जाणारी एसटीची मिनी बस चार खेपा करते. पस्तीस आणि पंचवीस रु तिकीट आहे. माथेरानच्या स्थानिक गाववाल्यांची कामाची बस. विद्यार्थीही असतात.

कोरोना काळात माथेरान बंद नव्हते आणि तेव्हापासून माथेरानचे पर्यटक वाढतच आहेत. म्हणजे लहान मुले नाही. त्यांना विशेष आवडत नाही. मोबाईल विडिओ गेम्सपुढे त्यांना काही नको असते. तर एकूण कर्जत परिसर भटकंतीसाठी बोलावत आहे.

१)स्लाइड शो
Bhivpuri falls or Ashane falls

Bhivpuri falls or Ashane falls. Recorded on August 13, 2024. स्लाइड शो
https://youtu.be/_iUb78C45iE?si=ZssOAWB8CQvZ8dzY

२)स्लाइड शो
भिवपुरी धबधबा आणि परिसर स्लाइड शो.

भिवपुरी धबधबा आणि परिसर, स्लाइड शो. २०२४_०८_१३

https://youtube.com/shorts/Qy6d5l6e1Y4

३)video
https://youtu.be/D9uz0J3gy-E?feature=shared

माथेरान विडिओ
१) celia point . हा पॉईंट म्हणजे शार्लोट लेकचे वाहणारे पाणी इथून खाली दरीत कोसळते. पडणारे पाणी पाहण्यासाठी पिसरनाथमागच्या लॉर्ड्स पॉईंटकडे ज वेळ लागते. पण पूर्ण दिसत नाही.
https://youtu.be/g8AIrTptdos?feature=shared

२)शार्लोट लेक.
https://youtu.be/39d80HObqts

३) शार्लोट लेक ३६०
https://youtu.be/2-ISwMmjwNQ

४) लॉर्डझ पॉईंट माथेरान_20240812
https://youtu.be/s4jDUgYVuNw

(काही विडिओ SD शुटिंग मुळे धूसर दिसतील.)
________________________
मजा घ्या आणि तुमचेही पावसाळी भटकंती फोटो टाका.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Aug 2024 - 8:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एखाद्या पर्यटनस्थळी जाण्यापूर्वी पर्यटनस्थळी जाण्या-येण्याच्या सोयी-सुविधा या अ त्यंत आवश्यक असतात त्याची माहिती आवश्यक असते आपलं लेखन ती माहिती अद्यावत आणि तपशीलवार पुरवते. पर्यटनस्थळी साध्या साध्या पण काही सुविधा अ त्यावश्यक असतात. छायाचित्र पुरक व्हीडीयो सर्व पाहिले छान झाले आहेत.

पुढील पर्यटनस्थळी प्रवासासाठी शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

20 Aug 2024 - 7:05 am | प्रचेतस

उत्तम लेखन.
माथेरान आता बरंच बदललेलं दिसतंय. पुण्यावरून येताना माथेरानला येणे थोडे गैरसोयीचे ठरते. एक्सप्रेसने कर्जत आणि तिथून लोकल पकडावी लागते, परतीचा प्रवास तर अजून त्रासदायक होतो. एकदा टॅक्सीने आणि एकदा मिनी ट्रेनने माथेरानला गेलो होतो, भरपूर भटकलोय तिथं. सुंदरच आहे. भिवपुरी पण मस्त. भिवपुरी घाटमाथ्यावरून पाहिली आहे, खांडीच्या पुढे डांबरी रस्ता आहे पॉवरप्लान्टला उतरायला.

पुण्याहून एका दिवसात माथेरान - प्रगती एक्सप्रेसने ( 7:50 - 09:10)कर्जत - लोकलने नेरळ- टॅक्सीचे माथेरान. बारापर्यंत पोहचाल.. संध्याकाळी पावणेसहाची माथेरान-कर्जत बस सात पर्यंत थेट कर्जत स्टेशनला सोडेल. साडेसातची सिंहगड मिळेल.

राहायचं झाल्यास सकाळी लवकर चेकाउट केल्यावर टॅक्सीने नेरळला आठपर्यंत येणे. साडे आठची डेक्कन एक्सप्रेस नेरळ वरूनच मिळेल.

गोरगावलेकर's picture

20 Aug 2024 - 1:23 pm | गोरगावलेकर

उपयुक्त माहिती आणि सुंदर फोटो/व्हिडीओ

मजा घ्या आणि तुमचेही पावसाळी भटकंती फोटो टाका.

हे घ्या काही फोटो
रानसई धरण
मित्र परिवारासहित छोटेखानी भटकंतीकरीता नव्या मुंबईकरांसाठी जवळचे आणि कमी गर्दीचे ठिकाण.
शिडीवरून धरणाच्या भिंतीवर गेल्यास जलाशय आणि कर्नाळा सुळक्याचे मनोहारी दर्शन घडते .

किल्लेदार's picture

31 Aug 2024 - 10:16 pm | किल्लेदार

मागचा कर्नाळा किल्ला दिसतोय...

माझ्याही काही आठवणी

https://www.misalpav.com/node/13247

Bhakti's picture

20 Aug 2024 - 2:25 pm | Bhakti

मस्त!

श्वेता२४'s picture

22 Aug 2024 - 8:26 am | श्वेता२४

रेल्वेच्या वेळा, तिकीट दर , त्याच्या वेळा , स्थानिक वाहतुकीच्या सोयी, अशा बारीकसारीक गोष्टी प्रवास नियोजनासाठी अत्यंत आवश्यक असतात. मुंबईला येऊन इतकी वर्ष झाले तरी माथेरानला जाणे मात्र झाले नाही. आता जायला हवे असे वाटते.

चौथा कोनाडा's picture

2 Sep 2024 - 7:22 pm | चौथा कोनाडा

झकास पावसाळी भटकंती..
प्रचि सुंदर आहेत..

तापशिलवार माहिती खूपच उपयोगी आहे..
कंजूस जी तुमचे भटकंती धागे परिपूर्ण असतात