...परवा बाहेर धोधो पाऊस कोसळत होता.. पुण्यातील तुंबलेल्या रस्त्यांमुळे बाहेर जाण्याचा प्रश्र्नच नव्हता. काही दिवसांपूर्वी मॅक्रोसाठी उभा केलेला सेट-अप तसाच ठेवला होता. फुलांचे फोटो काढून कंटाळा आला होता. तेवढ्यात नातवाच्या खेळण्यातील काही गाड्या हाती लागल्या. त्याचे फोटो काढायचे ठरवले, पण नुसते फोटो काढायचे नव्हते तर काहीतरी वेगळे... म्हणजे गाड्या खऱ्यातर वाटल्या पाहिजेत पण लोकेशनवर उभ्या आहेत असेही वाटले पाहिजे. माझ्याकडे असलेली मासिके चाळली पण योग्य अशी बॅकग्राऊंड काही सापडली नाही. तेवढ्यात मला मी काढलेले फोटो आथवले. एक होता गोकाकला काढलेला आणि दुसरा होता गुजरातमध्ये काढलेला. ते फोटो मॉनिटरवर ठेऊन त्याच्या पार्श्र्वभूमिवर फोटो काढण्याचे ठरवले. ते हे फोटो..
एका फुलाचा मॅक्रो..
- जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
20 Aug 2024 - 11:07 am | झकासराव
सुंदर आहेत फोटो
गाड्या मस्त आहेत, डिटेलिंग छान केलंय त्यात खेळणी असूनही.
20 Aug 2024 - 11:41 am | Bhakti
मस्त!
20 Aug 2024 - 1:04 pm | प्रचेतस
एकदम सुरेख आलेत. त्या गाड्या अगदी खरोखरच्या वाटत आहेत.
20 Aug 2024 - 1:13 pm | गोरगावलेकर
आवडले .
21 Aug 2024 - 6:52 pm | सविता००१
फारच सुंदर फोटो , खर्या वाटत आहेत गाड्या
31 Aug 2024 - 10:11 pm | किल्लेदार
चांगला उद्योग आहे :)...