#केरळीफूड
#मोरमिलागाई
#ताकातलीमिरची
काल हरभरा डाळ आणि तांदळाची इडली पाहिली.खुप दिवसांची आणलेली हरभरा डाळ तशीच होती.
तेव्हा ही इडली करण्यासाठी उदीड वाटी हरभरा डाळ आणि दोन वाटी तांदूळ रात्री भिजत ठेवले.उडीद डाळ अजिबात वापरली नाही. दीड डाळीशिवाय इडली कशी होईल याची उत्सुकता होती.
सकाळी मिश्रण वाटून घेऊन बाजूला ठेवलं.संध्याकाळी घरी आल्यावर पाहिलं तर मिश्रणाला पिवळसर रंग आला.नेहमी पांढरं फटक मिश्रण पाहायची सवय असलेल्या घरी सगळ्यांना वाटलं मिश्रण खराब झालं 😂
मी म्हटलं कूल डाऊन 😀 हरभराडाळीचा रंग उतरला आहे.चवीपुरते मीठ,चिमूटभर सोडा घातला.
इडली पात्रात इडल्या लावल्या.मस्त टम्म फुगल्या.रंगही फिकट पिवळा जसं बागेतलं एखादं फुलच ...आता या फुलाबरोबर हिरवी पानं नको का ;)).. मग दोन चमचे उडीद डाळ,हिरव्या मिरच्या,जिरे,तीळ,कडीपत्त्यासह कमी तेलात परतली.साखर व ओल्या खोबऱ्यासह मिक्सरमधून चटणी पाणी टाकून बारीक वाटली.दह्यात मिक्स केली.हिरवी चटणी साथीला तयार!!
फोडणीसाठी तेलात मोहरी आणि केरळी मोर मिलागाई म्हणजे ताकातल्या वाळवलेल्या मिरच्या चांगल्या तळल्या.चटणीला चुरचुरीत फोडणी दिली.
या ताकातल्या मिरच्यांची चव तिखट ही तरीही सुसह्य मस्तच होती.
याच मिरच्या तळून भाताबरोबर,उपम्यात वापरू शकतो.
प्रतिक्रिया
30 Jul 2024 - 7:48 pm | श्वेता२४
या पिठाचा आम्ही ढोकळा करतो. तांदूळ असल्यामुळे पोट गच्च होत नाही. हलकाफुलका नाश्ता होतो.
31 Jul 2024 - 11:25 am | Bhakti
धन्यवाद!मला ढोकळा विकतचाच आवडतो.
31 Jul 2024 - 9:47 am | कांदा लिंबू
इडली म्हणजे माझा जीव की प्राण! पिवळसर इडलीचा फोटो मस्त दिसतोय.
पण उडीदडाळीऐवजी चणाडाळीची इडली होऊ शकते असा कधी विचार केला नव्हता.
आता करून पाहीन.
म्हणजे विचार आणि प्रत्यक्ष इडली दोन्ही करून पाहीन!
;-)
---
This isn't fair! इडलीच्या पिठात सोडा घालावा लागणे हे इडली फसल्याचे लक्षण आहे.
हघ्याहेवेसांन.
---
अवांतर:
भूतझलकियां मिरची कधी try केलीय का?
---
झैरात: जागतिक इडली दिन । ३० मार्च २०२४ । वाफाळता खाद्योत्सव!
31 Jul 2024 - 11:23 am | Bhakti
माझे पाकशास्त्र गुरू क्रिश अशोक यांनी चिमूटभर सोड्याचे महत्व अधोरेखित केल्याने मला असे वाटत नाही.Baking soda is superhero of ur Kitchen.
https://youtu.be/NSFxir6EsKk?si=dBR8Kfmn4Fve3sIZ
31 Jul 2024 - 11:27 am | Bhakti
अजूनतरी नाही... डोळ्यांसमोर तारे पाहायचे असतील तेव्हा मिळाली तर बरं होईल ;)
31 Jul 2024 - 12:53 pm | कंजूस
चांगली झाली आहे.
31 Jul 2024 - 2:29 pm | गवि
छान. करून बघितले पाहिजे.
साधारण अशाच साहित्यातून आप्पे अनेकदा होत असतात घरी.
31 Jul 2024 - 7:36 pm | मुक्त विहारि
करून बघतो...