ऑलिम्पिक लोगो
२६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ खेळांचा कुंभमेळा पॅरिस, फ्रान्स मधे सुरू आहे. ऑलिम्पिकच्या इतीहासात फ्रान्सला खेळांचे आयोजन करण्याचा तिसऱ्यांदा बहुमान मिळाला आहे.
अधुनिक जगाच्या इतीहासात ६ एप्रिल ते १५ एप्रिल १८९६ मधे अथेन्स, ग्रीस देशात पहिल्यांदाच हे खेळ भरवण्यात आले होते. १४ देशाच्या एकूण २४१ खेळाडूंनी भाग घेतला होता,सर्व पुरूष खेळाडू होते.सर्व मिळून ४३ इव्हेंट ९ प्रकारच्या खेळातील १० वेगवेगळे प्रकार आयोजीत केले होते,टेनिस,स्विमिंग,शूटिंग,ॲथेलेटिक्स, कुस्ती,जिम्नॅस्टिक्स, भार्रत्तोलन तलवारबाजी व सायकलिंग.
किंग जाॅर्ज एक ,ग्रीस ने पहिल्या खेळांचे ग्रीक भाषेत खालील शब्द उच्चारत सोहळ्याचे उद्घाटन केले.
"I declare the opening of the first international Olympic Games in Athens. Long live the nation. Long live the Greek people."
जवळपास ८०,००० प्रेक्षकांनी पहीला सोहळा बघीतला तर Mr. Demetrius Vikelas,पहिले जागतिक ऑलिम्पिक कमीटीचे अध्यक्ष म्हणून पहिल्या गेम ऑफ ऑलिम्पियाड चे यशस्वी पणे आयोजन केले. एकुण १२२ पदक मिळवण्यासाठी २४३ खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले.
===
स्टेडीयम १८९६
SR Nation------------------------G----S-----B----T
1 United States (USA)-----११-----७----२----२०
2 Greece (GRE)---------------१०---१८---१९---४७
3 Germany (GER)------------६------५-----२---१३
4 France (FRA)-----------------४------२---११---१३
5 Great Britain (GBR)--------२------३-----२----७
6 Hungary(HUN)---------------२-----१-----३-----६
7 Austria (AUT)------------------२-----१-----२-----५
8 Australia (AUS)----------------२-----०-----०-----२
9 Denmark (DEN)---------------१-----२-----३-----६
10 Switzerland (SUI)-------------१-----२-----०-----३
11 Mixed team (ZZX)-------------१-----०-----१-----२
12 Total------------------------------४३----४३---३६--१२२
या वर्षी २०६ देश आपल्या १०७१४ खेळाडूंवर बरोबर ३२ खेळां मधील ३२९ प्रकारच्या विविध स्पर्धेत भाग घेत आहेत. भारताने सुद्धा आपले ११७ खेळाडू उतारले आहेत. आपले सर्व खेळाडू अंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च स्थानी आहेत. यांच्या वर अभिमान तर आहेच व देशाला पदक तालिकेत जास्तीतजास्त वर नेण्यासाठी ते आपले कौश्ल्य पणाला लावतील यात शन्का नाही.देशाच्या शुभेच्छाआहेतच. सन १९०० पासून भारताने २४ ऑलिम्पिक खेळांमध्ये एकूण ३६ ऑलिपम्पिक पदके जिंकली आहेत.
२०२० टोकिओ ऑलम्पिक्स मधे पदकांचे मानकरी
Mirabai Chanu Silver Women's 49kg weightlifting
Lovlina Borgohain Bronze Women's welterweight boxing
PV Sindhu Bronze Women's singles badminton
Ravi Kumar Dahiya Silver Men's 57kg wrestling
Indian hockey team Bronze Men's hockey
Bajrang Punia Bronze Men's 65kg wrestling
Neeraj Chopra Gold Men's javelin throw
मनू भाकरने ,१० मिटर एअर पिस्तूल या खेळात कांस्य पदक मिळवून भारताचे खाते उघडले आहे. आतापर्यंत मी पाहीलेल्या खेळातील पि व्ही सिंधू,शिला आकुला, मोनिका बात्रा,रेड्डी,शेट्टी,बलराज पनवर यां व्यक्तिगत स्पर्धेत तर हॉकी मधे विवेक व त्याच्या सह खेळाडूंनी आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.
खेळ बघताना दिवस कसा जात आहे कळतच नाही. खेळाडू आपले कौशल्य पणाला लावत आहेत तर मी सदैव त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे.
मी पाहीलेले काही सुवर्ण क्षण....
मेरा भरत महन्,जयहिन्द्.
प्रतिक्रिया
29 Jul 2024 - 12:49 pm | कर्नलतपस्वी
तकनीकी अज्ञाना मुळे पदक तालीका व पिकांचे मानकरी या डकवताना गडबड झाली आहे . क्षमस्व.
29 Jul 2024 - 12:51 pm | कर्नलतपस्वी
चु भूल दे घे
29 Jul 2024 - 5:45 pm | कंजूस
तालिका टेबल बनवून माहिती टाकायची असेल तर .......
एक रेडिमेड html code मिळतो.
HTML Table Generator
https://www.quackit.com/html/html_table_generator.cfm
तर इथे माहिती भरून तो generate code करून तो कॉपी करून तुमच्या अकाउंटमधून तुम्हालाच व्यक्तीत संदेश करून खात्री करून घ्या. आणि मग इथे पेस्ट करा.
29 Jul 2024 - 6:24 pm | कर्नलतपस्वी
प्रयत्न करतो.
29 Jul 2024 - 5:46 pm | कंजूस
चांगला धागा. धन्यवाद.
ओलिंपिंक्स आणि खेळ यांची फारशी माहिती नाही.
29 Jul 2024 - 6:28 pm | कर्नलतपस्वी
क्रिकेट एवढे आवडत नाही.
बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हाॅकी हे खेळ खेळले असल्याने व बर्यापैकी नियम व पद्धती माहीत आहेत. यात विशेष रूची आहे.
बाकी खेळ कुठलाही बघायला आवडतो..
29 Jul 2024 - 6:17 pm | कर्नलतपस्वी
लक्ष्य सेन विरूद्ध करीग्गा बेल्जियम
सरळ सेट मधे सेन मॅच जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला. २१/१९ व २१/१४
ब्राव्हो.
29 Jul 2024 - 8:03 pm | मुक्त विहारि
वाचत आहे...
29 Jul 2024 - 9:23 pm | Bhakti
चांगला धागा.
रच्याकने चार वर्षे झाली?संपादक मान्यवर तुका यांनी मागच्या ऑलिंपिकचा काढलेला धागा आठवला.ते हल्ली गायब आहेत?
30 Jul 2024 - 11:38 am | कर्नलतपस्वी
भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करून विजयी सलामी दिली. ऑलिम्पिकमधील आकडेवारी पाहता भारतीय संघ अर्जेंटिनाला नेहमीच वरचढ राहिला आहे.
यावेळेस अर्जेंटीना ने पहिल्याच क्वार्टर मधे एक गोल केला. तिसर्या क्वार्टर पर्यंत भारत हा एकमेव गोल फेडू शकला नाही. आता नामुष्की पदरात पडते का काय....
पण भारतीय खेळाडूंनी आपला तोल शेवटपर्यंत राखला. पण पेनल्टी कॉर्नर ची संधी गोल मधे परावर्तित करण्यात अपयश आले. तब्बल ५८ मिनिटे गोलसाठी संघर्ष करणाऱ्या टीम इंडियाने पेनल्टी कॉर्नरमध्ये गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतासाठी एकमेव गोल केला.
सामना बरोबरीत सुटला.
30 Jul 2024 - 2:02 pm | Bhakti
एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही पहिली खेळाडू ठरली आहे.मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
31 Jul 2024 - 3:00 pm | कर्नलतपस्वी
पुरूष,महिला एकल बॅडमिंटन दोन्ही मॅचेस अप्रतिम. मेडल्स चे दावेदार...
शुभेच्छा.
1 Aug 2024 - 10:34 am | कर्नलतपस्वी
मराठी मुलगा स्वप्निल कूसळे नक्कीच पदक आणणार.
शुभेच्छा.
बॅडमिंटन, बॉक्सिंग, हाॅकी ,गोल्फ, २०कि मी चालणे .....इव्हेंट फुल दिवस.
7 Aug 2024 - 2:35 pm | पॅट्रीक जेड
विनेश फोगट अचानक अपात्र?? नाहीतर देशातल्या एका गोटाच्या पोटात दुखत होतच. काहीतरी काळबेर आहे ह्यामागे.
7 Aug 2024 - 2:58 pm | कोण
100 ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. तिचे वजन जास्त असल्याने इतर कोणी कसे जबाबदार आहेत. ??
11 Aug 2024 - 8:52 am | चौकस२१२
तिचे वजन जास्त असल्याने इतर कोणी कसे जबाबदार आहेत.
काय राव विचारता? सगळ्याला चहा विकणारे पंतप्रधानच जबादार असतात ना.. काल मला जुलाब झाले त्याला हि "बुचर ऑफ गुजराथ" जबादार आहेत असे वाटते , हेग मध्ये जाऊन केस करावी कि काय विचार करतोय.... केस असेल ती माझया जुलाबाबद्दल गुजराथ बद्दल नाही !!!!!!!!!!!!!!,
7 Aug 2024 - 2:58 pm | गवि
शंभर ग्रॅम इकडे तिकडे आणि त्यामुळे अपात्र, हे अगम्य आहे. अगदी तोंडाशी आलेला घास गेला. :-(
बातमीत असे वाचले की रात्रभर न झोपता तिच्या सहकारी आणि सहाय्यक टीमने वजन कमी व्हावे म्हणून सतत जॉगिंग व्यायाम वगैरे करवले आणि केस कापणे, रक्त काढणे असे टोकाचे उपाय देखील केले. हे वाचून कसेतरीच झाले.
7 Aug 2024 - 3:31 pm | कोण
7 Aug 2024 - 3:32 pm | कोण
https://www.theweek.in/news/sports/2024/08/07/she-was-2-kg-overweight-ov...
8 Aug 2024 - 1:19 pm | कर्नलतपस्वी
अंतरराष्ट्रीय खेळ आहेत. इकडे तिकडेची अजीबात गुजाईश नाही.
श्री बजरंग पुनिया यांनी आजतक वर दिलेल्या साक्षात्कारात साध्या सोप्या भाषेत यावर टिप्पणी केली आहे.
त्याने असेही म्हणले आहे ज्यांना या मधले काहीच समजत नाही ते सुद्धा अंटशंट वक्तव्य करत आहेत.
वजन वाढणे कमी होणे यावरही संयुक्तिक वक्तव्य केले आहे. इतक्या वरच्या थरावर पोहोचलेला अनुभवी खेळाडू वजन व इतर कायदे कानून बद्दल नेहमीच सजग असतो.
7 Aug 2024 - 4:08 pm | भागो
The games people play!
7 Aug 2024 - 4:32 pm | भागो
<>
11 Aug 2024 - 9:57 am | कर्नलतपस्वी
कुठल्याही खेळाडूच्या आयुष्यातील असा क्षण मृत्युसमानच म्हणला पाहीजे.
खेळाडूला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. लाभान्वीत खेळाडूने आणी सपोर्ट स्टाफने वेळोवेळी घेतलेले निर्णय व खेळाडूने आपले कौशल्य व प्राण पणाला लावून दिलेली लढत यामुळेच ती फायनल पर्यंत पोहोचली. क्षणभर असा विचार करू की जर खेळाडूचे वजन वाढले नसते तर सिल्व्हर किवा सुवर्ण पदक मिळाले असतेच व पूर्णविराम लागला असता.
सरकार कुठलेही आसले तरी विजय,पराजय हा सर्वतोपरी खेळाडू व त्या क्षणी असलेली परिस्थीती कारणीभूत असते.
आता वजन का व कसे वाढले यावर स्वतः खेळाडू, तज्ञ आणी संबधित अधिकारी फक्त सांगू शकतील.
बाकी माझ्यासारखा खेळप्रेमी झालेल्या गोष्टींवर हळहळ व्यक्त करण्यात व्यतिरिक्त काहीच करू शकणार नाही.
खेळाडू व इतर संबधित कर्मचाऱ्यांकडे आणी खेळाडू व कर्मचाऱ्यांनी खेळाकडे केवळ खेळ देशप्रेम इ. भावनेनेच बघावे. राजकारण, राजकारणी यांना दूर ठेवावे व पूर्वग्रहदूषित भावना ठेवू नये.
या प्रकरणात खेळाडूचे स्वताचे आयुष्य भराचे कष्ट व अपरिमित नुकसान झाले आहे.
11 Aug 2024 - 10:01 am | कर्नलतपस्वी
हे काही पहिल्यांदाच घडले नाही.
सदर प्रकरणात मात्र संधी साधू नी राजकारण करून आपली पोळी भाजून घेतली हे खेळाडूना व त्यांच्या परिवारातील सदस्याना कळाले अथवा नाही......