राम राम मंडळी
तर एकंदरीत आता २०२४च्या निवडणुकांची रणधुमाळी, धुळफेक, चर्चा, उपचर्चा, मारामा-या, हाणामा-या वगैरे जे काही लोकशाही तत्वांना धरुन, अनुसरुन, लोकशाही सुदढ होण्यासाठी आवश्यक असते ते सर्व काही झालेले आहे. यथावकाश कुणीतरी कधीतरी कोणाच्या तरी पाठींब्याने, आशीर्वादाने, प्रेरणेने वगैरे जे काही योग्य असेल त्याच्या सहाय्याने शपथविधी घेऊन कामाला लागतील. देशाची जी काही प्रगती ते असो नसो होईलच त्याचे श्रेय ते घेतील, अपश्रेय विरोधकांना देतील. थोडक्यात काय पहिल्यासारखे नीट सुरळीत रुटीन चालू होईल. हुश्श.
या भानगडीत इव्हीएम बदनाम झाले नाही, इव्हीएमला कुणीही नावे ठेवली नाही, इव्हीएम मुळे आमचे तळपट झाले असे कुणी म्हणाले नाही. थोडक्यात, इव्हीएमचा या निकालामधे काहीही सहभाग नाही. त्याने फक्त प्रामाणिकपणे मते नोंदवली आणि नंतर ती जाहीर केली. जे काम त्याने करायला हवे होते तेच त्याने केले. भलते उद्योग कुणाच्या सांगण्याने, प्रेरणेने, स्वेच्छेने वा अनिच्छेने केले नाहीत.
या सर्वांबद्दल इव्हीएमचे हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन !! अभिनंदन !! अभिनंदन !!
त्याचबरोबर संविधान बदलले जाणार नाही याची खात्री मिळाल्यामुळे संविधान सुद्धा आनंदात असेल. त्यामुळे आम्ही पण आनंदात आहोते. तुम्ही सुद्धा आनंदी झालात तर आमची काहीही हरकत नाही. कुणाचीही नसावी.
प्रतिक्रिया
5 Jun 2024 - 2:09 pm | धर्मराजमुटके
मस्त झाली निवडणू़क
आमच्या मतदार संघात मी मत दिलेले उज्ज्वल निकम पडले मात्र भाजपा ला बहुमत मिळाले त्यामुळे एकाचवेळी माझे मत वाया गेले आणि कामी देखील आले असे म्हणता येईल. आतापर्यंत अनेकवेळा मी मत दिलेला उमेदवार पडला आहे त्यामुळे पुढील निवडणूकीत काँग्रेस ला मत देऊन पाहावे काय असा एक छद्मी विचार मनात येऊन गेला :)
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ७ उमेदवार निवडून आले याचे कौतुक वाटले. केवळ एक-दोन वर्ष जुन्या पक्षाला इतके चांगले यश मिळाले हे पाहून आश्चर्य वाटले. अर्थात विधानसभेला जास्त चुरस असेल म्हणा. पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला त्यामुळे त्यांच्याबद्द्ल थोडेसे वाईट वाटले. यश त्यांना सतत हुलकावण्या देत आहे.
यंदाच्या निवडणूकीचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इवीएम मशीन वर कोणत्याही प्रकारचे आरोप झाले नाही मात्र ते बनविनार्या कंपनीचे शेअर्स काल जोरदार आपटले. अडानी समुहाचे शेअर, हिंदाल्को वगैरे खुप खाली गेले त्यामुळे काल बरीचशी खरेदी केली. महिन्या पंधरा दिवसात पैसे वाढतील असे वाटते. बघूया काय होते ते.
निवडून आलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांचे अभिनंदन आणी हारलेल्या उमेदवारांना पुढील निवडणू़कांसाठी (तिकिट मिळाले तर) शुभेच्छा !
5 Jun 2024 - 2:13 pm | अहिरावण
सहमत.
आणखी एक गंमत म्हणजे काल सकाळ पर्यंत उत्तर भारतातील लोकांना गायपट्टा, शेणपट्टा, मुर्ख वगैरे अशा शेलक्या विशेषणांना नावे ठेवणारे आमचे एक वाममार्गीपंथी मित्र अचानक उत्तर भारतीयांना शहाणे, समजुतदार, राजकीय समज असलेले वगैरे स्तुती करु लागले आणि ओडीसा, आंध्र, दक्षिणेतील लोकांना शिव्या देऊ लागले. मित्राचं नक्की काय बिनसलं ते कळलं नाही पण मी फारसं मनावर घेतलं नाही.
5 Jun 2024 - 2:22 pm | धर्मराजमुटके
त्याचबरोबर संविधान बदलले जाणार नाही याची खात्री मिळाल्यामुळे संविधान सुद्धा आनंदात असेल. त्यामुळे आम्ही पण आनंदात आहोते. तुम्ही सुद्धा आनंदी झालात तर आमची काहीही हरकत नाही. कुणाचीही नसावी.
संविधान बनविणार्या बाबासाहेबांच्या नातवाला निवडणु़कीत पाडतात हे काही चांगले लक्षण नाही. त्यांची खरे तर बिनविरोध निवड व्हायला हवी होती. भाजपा विरोधी विचारधारेचा प़क्ष आहे त्याचे एक सोडा पण काँग्रेसने तिथे आपला उमेदवार द्यायला नको होता.
5 Jun 2024 - 2:38 pm | अहिरावण
>>>संविधान बनविणार्या बाबासाहेबांच्या नातवाला निवडणु़कीत पाडतात हे काही चांगले लक्षण नाही. त्यांची खरे तर बिनविरोध निवड व्हायला हवी होती.
काहीही हं मुटके... ही तर घराणेशाही झाली...
5 Jun 2024 - 2:47 pm | धर्मराजमुटके
मग काय झालं ?
घराणेशाही वाईट आहे काय ? कोणत्या पक्षात घराणेशाही नाही ? संविधानाचा पुळका दाखवायचा पण संविधान निर्मात्यांच्या वंशजांना मान द्यायचा नाही हे मलातरी ठीक वाटत नाही.
5 Jun 2024 - 3:17 pm | कर्नलतपस्वी
महाभारतकार वेदव्यास यांच्या खापर तापर पणतूने महाभारत सिरयल बनवले म्हणून निर्मात्या वर राॅयल्टी साठी सुप्रीम कोर्टात दावा ठोकण्या सारखे आहे.
माझा पणजा, खापर पणजोबा कुणीतरी मोठा सरदार,दरकदार होता म्हणून आज मलाही कुर्निसात करा असेच म्हणणे नाही का......
5 Jun 2024 - 7:41 pm | धर्मराजमुटके
माझा पणजा, खापर पणजोबा कुणीतरी मोठा सरदार,दरकदार होता म्हणून आज मलाही कुर्निसात करा असेच म्हणणे नाही का......
तुमचा पणजा, खापर पणजोबा कुणीतरी मोठा सरदार,दरकदार असता तर तुम्हाला नक्कीच काही लोकांनी तरी कुर्निसात केला असता. त्यात तुम्ही देशासाठी सेवा केलीत म्हणून अजून आदर पण मिळालाच असता. (या कारणामुळे तो अजूनही आहेच म्हणा)
आजही देशात ५-२५ राजघराणी आहेत आणि त्यांच्या वारसांचे काहीही / अल्प कर्तुत्व (अपवाद क्षमस्व) नसताना ते राजे म्हणवून घेत आहेत.
प्रकाश आंबेडकरांच्या तुलनेत काँग्रेसच्या उमेदवाराचे काय कर्तुत्व होते ? प्रकाश आंबेडकर जन्माने व कर्माने ९६ कुळी सेक्युलर आहेत, शिवाय सुशिक्षित आहेत. त्यांना पाठींबा द्यायच्या ऐवजी काँग्रेसने आपला उमेदवार दिला. काँग्रेसला डावे, उजवे चालतात पण सेक्युलर चालत नाहीत असाच याचा अर्थ होतो ना ?
5 Jun 2024 - 8:58 pm | कर्नलतपस्वी
प्रतिसाद ही उपरोधिक.
5 Jun 2024 - 3:55 pm | मुक्त विहारि
जिंकलो तर, लोकं समजूतदार आणि हरलो तर, EVM घोटाळा, हे ब्रीदवाक्य असल्याने, लोकं समजूतदार झाली, हे एकमेव सूत्र उरते....
6 Jun 2024 - 11:54 am | अथांग आकाश
+१
5 Jun 2024 - 5:24 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"ई.व्ही.एम हॅक झाली हो" गेले वर्षभर ह्या आरोळ्यानी बुद्धिमंतांनी इंटरनेट दणाणून सोडले होते. हॉलिवूडच्या कथानकालाही लाजवतील अशा सुरस कथा ह्या पत्रकारांकडुन पसरवल्या जात होत्या. ह्यांना कोणी उलट विचारणारे कोणी नव्हते. दुर्दैव म्हणजे ह्यात आपले मराठी पत्रकार आघाडीवर होते. राजू परुळेकर हा एक शिवाजी पार्कवरचा कथित ज्येष्ठ विचारवंत,पत्रकार. मोदी-शहांनी ई.व्ही.एम्स आधीच 'प्रोग्रॅम करून ठेवली आहेत. जेणेकरून प्रत्येक ई.व्ही.एम मधील ८०% मते ही आपसूक भाजपाला जातील. !! ही ह्या पत्रकाराची थियरी.मग आता जिकडे भाजपा नाही,म्हणजे तामिळ्नाडू, तिकडे कोणती ई.व्ही.एम पाठवतात? ओडिशात गेले २४ वर्षे बीजू जनता दल सत्तेवर आहे.. तिकडे कोणती ई.व्ही.एम्स पाठवली जायची? गेल्या वर्शी कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आली, ईकडे भाजपाही होता मग इकडे काय सूत्र वापरुन ई.व्हि.एम्स पाठवली गेली? हे साधे प्रश्न विचारण्याची अक्कल एकाही चॅनेलवाल्याला नसावी? हे चाय-बिस्कुटवाले पत्रकार एवढे निर्बुद्ध आहेत? नंतर मग ह्या मराठी चॅनेल्वाल्यानी देशपांडे का कुणा अमेरिकेतल्या आय.टी.तज्ञाला मुलाखतीला बोलावले आणि वदवुन घेतले की "ई.व्हि.एम हॅक होऊ शकतात" हा तज्ञही बुद्धिमान . "ई.व्हि एम हातात द्या. मी हॅक करुन दाखवतो" हे म्हणायची हिंमत नाही. नुसतीच थियरी. "मी तुमचा पासवर्ड हॅक करू शकतो" म्हणण्यासारखे.
आता कान पकडुन त्या प्रशांत कदम/परुळेकर्/टकले/वागळेना विचारायला हवे- "ई.व्हि.एम .हॅक झाली का हो? "
5 Jun 2024 - 9:12 pm | पुंबा
इव्हिएम वर प्रश्नचिह्न उपस्थित करणे केव्हाही योग्य नव्हते!
5 Jun 2024 - 10:00 pm | प्रसाद गोडबोले
श्या काहीही .
मोदी शहा आणि आर.एस.एस ने तब्बल २४२ जागांवर ई.व्ही.एम हॅक केले होते .
=))))
6 Jun 2024 - 10:32 am | अहिरावण
आणि ओडीसा, आंध्र वगैरे...ते सुद्धा मोजा की...
6 Jun 2024 - 7:53 am | कानडाऊ योगेशु
एका वृत्तपत्रात वाचण्यात आले कि किरण माने ह्या आक्रस्ताळीपणा करणार्या अभिनेत्याने असे विधान केले आहे कि एन.डी.ए ला जिथे जिथे विजय मिळाला आहे तिथे ई.वी.एम हॅक केल्यामुळे मिळाला आहे.त्याची चौकशी करण्यात यावी.आता बोला.
6 Jun 2024 - 10:33 am | अहिरावण
फार हुशार व्यक्तिमत्वाचा दाखला दिलात तुम्ही... त्यांचे बरोबरच असते !!
6 Jun 2024 - 9:24 am | श्रीरंग_जोशी
समयोचित लेख आवडला.
मतदान यंत्रांबाबत आक्षेप घेणारा राष्ट्रीत स्तरावरचा पहिला राजकीय पक्ष म्हणजे भाजप. २००९-१० दरम्यान त्यांनी मतदान यंत्रांवर आक्षेप घेणारी मोठी मोहिम चालवली होती. त्यांच्या निवडणूकविषयक तज्ञ सदस्याने या विषयावर पुस्तक प्रकाशित केले होते Democracy At Risk! Can We Trust Our Electronic Voting Machines.
सदर पुस्तकास माजी भाजप पक्षाध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांची प्रस्तावना आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे भाजपच्या नेतृत्वात असलेल्या केंद्र सरकारच्या काळात (१९९८ ते २००४) मतपत्रिकांची पद्धत बदलून, मतदान यंत्राचा पूर्ण वापर करून विधानसभा व लोकसभा निवडणूक घेणे सुरू झाले होते.
या मोहिमेनंतरच्या दीड दशकात भाजपने मतदान यंत्रांबाबत संशयकल्लोळ निर्माण केल्याबाबत दिलगिरी व्यक्त केल्याचे माझ्या पाहण्यात नाही.
6 Jun 2024 - 9:28 am | कॉमी
लेखाला अधिक माहितीपूर्ण करणारा पुरवणी प्रतिसाद.
6 Jun 2024 - 10:34 am | अहिरावण
ज्जे बात !! तसेही कॉग्रेसने जिथे आम्ही जिंकलो तिथे इव्हीएम हॅक नव्हते असा दावा केलाच नाही.. ते हरले तिथे हॅक, त्यांची सुद्धा दिलगीरी वाचण्यात नाही.
इव्हीएम हे नावडतीचे मीठ अळणी अशापैकी आहे.