गाभा:
मुकुल शिवपुत्रांसंदर्भातील ही बातमी वाचली नि खूप त्रास झाला.
http://marathi.webdunia.com/newsworld/news/national/0905/12/1090512038_1...
मुकुल शिवपुत्रांसंदर्भातील ही बातमी वाचली नि खूप त्रास झाला.
http://marathi.webdunia.com/newsworld/news/national/0905/12/1090512038_1...
प्रतिक्रिया
12 May 2009 - 4:36 pm | परिकथेतील राजकुमार
एखाद्याच्या खाजगी आयुष्याची चर्चा आपण करु नये तो आपला अधिकार नाही हे माझे वैयक्तीक मत.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
12 May 2009 - 4:49 pm | अमोल खरे
ट्रॅजिडी आहे खरीच. इतक्या थोर माणसाचा मुलगा दारुच्या इतक्या आहारी गेला हे वाचुन वाईट तर वाटलेच. पण ह्यावर चर्चा न करणंच बरं.
12 May 2009 - 4:39 pm | अनंता
शीर्षक वाचून गैरसमज झाला! म्हटलं कुणी अंगारकीच्याच दिवशी गणपतीबद्दल वाईटसाईट लिहीलं की काय?
13 May 2009 - 1:28 am | ब्रिटिश टिंग्या
हा हा हा!
एल ओ एल!
12 May 2009 - 4:41 pm | उमेश__
परिकथेतील राजकुमार + अनंता , सहमत...........
12 May 2009 - 5:16 pm | विसोबा खेचर
दुर्दैव! दुसरं काय?
त्या शापित यक्षाच्या काही सुरेख मैफलींचा मी साक्षिदार आहे..
असो..!
तात्या.
12 May 2009 - 8:37 pm | तिमा
तो शापित यक्ष गायला लागला की याला १०० गुन्हे माफ असे मनापासून वाटते. अशा दुर्दैवी गोष्टींवर चर्चा नको.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
12 May 2009 - 8:57 pm | मेघना भुस्कुटे
खरंय. असंच म्हणते.
12 May 2009 - 9:07 pm | मानस
खरोखरच शापित यक्ष. कोणाच्या आयुष्यात काय घडामोडी होतील ते सांगता येत नाही, त्यामुळे एखाद्याच्या खाजगी जीवनाबद्दल चर्चा न करणे हेच शहाणपणाचे ठरते.
मुकुल शिवपुत्रना कधी ऐकण्याचा योग आला नाही, मात्र एका जेष्ठ्य मित्राने त्यांना नर्मदेच्याकाठी सलग ४ तास भैरवी सादर करताना अनुभवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ४ तास समाधी अवस्थेत मुकुल गात होते.
असो, फार मोठा माणूस ...... पण तात्यांनी म्हण्टल्याप्रमाणे "शापित यक्ष". त्यांच्या प्रतिभेला सलाम .......
12 May 2009 - 9:22 pm | प्राजु
+१
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 May 2009 - 9:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एखाद्याच्या खाजगी जीवनाबद्दल चर्चा न करणे हेच शहाणपणाचे ठरते.
12 May 2009 - 5:39 pm | यशोधरा
ही बातमी वाचली होती, खूप वाईट वाटले होते वाचून..
12 May 2009 - 7:03 pm | नीधप
अश्या माणसांना आपल्या फुटपट्ट्या लावू नयेत आणि आपण या गोष्टीची चर्चाही करू नये.
असामान्य माणूस, असामान्य गायकी तेव्हा दुर्दैव आणि भोगही असामान्यच.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
12 May 2009 - 7:05 pm | श्रावण मोडक
चांगला प्रतिसाद. समंजस. इथेच विषय थांबवावा असा.
12 May 2009 - 7:17 pm | छोटा डॉन
मोडकसाहेबांशी आणि नीधपशी सहमत ...
चर्चा करणारे आपण कोण ? फुटपट्ट्या लावणारे आपण कोण ?
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
12 May 2009 - 9:09 pm | सँडी
बातमी वाचली होती, त्यांच्यावर दारु आणि ती पिण्यासाठी पैसे मागण्याची वेळ का यावी याचं आश्चर्य वाटलं!
-संदीप.
काय'द्याच बोला.
13 May 2009 - 1:26 am | हरकाम्या
मोठ्या झाडाच्या छायेत लहान झाडे वाढत नाहीत हेच खरे.