गुंतवणूकीचा गुंता ( डी एस के )

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
24 Apr 2024 - 7:07 am
गाभा: 

डी एस के बांधकाम व्यावसायिकावर ६ वर्षांपूर्वी लोकनचे पैसे बुडवल्याचे आरोप केले गेले आणि त्यावेळी बरीच चर्चा झाली हे आठवत असेल त्याचे मालक , त्यांची पत्नी वैगरे गेली ६ वर्षे तुरंगात होते आणि नुकतेच ते जामिनावर बाहेर आहेत त्यामुळे माध्यमातून यावर चर्चा चालू आहे ... जे काय झाले ते अजून गुंतागुंतीचे होत आहे त्यात त्यांचे ग्राहक आणि ठेवीदार बरेच सर्वसाधारण मध्यम वर्गीय असल्यामुळे त्यांचे हाल चालूच आहेत , मुळात ढिसाळ कायदे , त्यांची ढिसाळ अंमलबाजवणी वैगरे आहेच
शोधपत्रकारिता आणि विशीष्ट आर्थिक घोटाळ्यात या विषयात ज्यांना रस असले त्यांचा साठी हि घटना फार रोचक आहे .. मिपावर कोणी अर्थ आणि कायदे तन्य असल्यास त्यांनी यावर प्रकाश टाकावा हि विनन्ती . माझ्य मनात आलेले काहि प्रश्न ( कृपया यात मराठी गुजराथी / राजकारण वैग्रे आणु नये, केवळ आर्थिक घोटाळा यावर लिहावे हि विनंती )

पैसे अडकले यात ३ प्रकारचे ग्राहक आहेत
१) ज्यांनी घरे विकत घेन्यासाठी आगाऊ रक्कम दिली आणि त्यांना घरे माळली नाहीत
२) ज्यांनी मुदत ठेवित गुंतवले ( डिबेनचर ) घेतले आणि त्यानना मुद्दल आणि व्याज काहीच मिळाले नाही
३) दोन्ही ज्यांनी केले ते
आणि या शीवाय
-या उद्योगाचे सेवक वर्ग आणि कदाचित पुरठवठा करणारे छोटे मोठे वयवसायिक यांची थकबाकी
- वित्तीय संस्था ज्यांनी यांना पैसे दिले होते

हे तर स्पष्ट आहे कि काहीतरी घोळ झालाय तो वेगवेगळ्या कारणांनी, कि डीएस केंच्या चुकीने किंवा त्यांनी घोटाळा केलं आहे का ?
त्यांचा अपघात , अफवा, पडेलला बाजार , हि कारणे एकीकडे दिली जातात पण ते कितीपत खरे आहे ?

- यात दोन वेगले उदोग गुंतलेले दिसतात एक "डी एस के भागीदारी" आणि दुसरी "डी एस के डेव्हलपर "
- ठेवी एका उदोयगाने घेतल्या - त्या उद्योगाला असे डिबेंचर विकण्याची परवानगी होती का?
- हा पैसा त्याच कंपनीत राहिला कि दुसऱ्या कंपनी ला दिला गेला का जिच्या नावावर जमिनी आणि डेव्हलोपमेंट चे काम होते
- आगाऊ पैसे आणि बँकांनी जर अनेक प्रोजेक्त्त ना कर्ज साठी ग्राहकांना हिरवा कंदील दिला होता तर मग त्या वास्तू पूर्ण का
गेल्या नाहीत ?
- मूळ फसवणूक झाली का? व्यासायिकांचा अंदाज चुकलला आणि धंदा गोत्यात आला ( पुरेशी विक्रि ना होणे )

आंतरजालावर डी एस के आणि ज्यांची थकबाकी आहे यांच्या मुलाखती आहेत पण सगळा गोंधळ आणि सनसनाटी बातमी हाच प्रकार, खोलात जाऊन पण सर्वसाधारण माणसाला समजेल असे कोणी काही बोलत नाही नुसता इमोशनल अत्याचार ...

आता अजून एक गुंता झालाय तो म्हनजे बुडीत कंपनी च्या ऍडमिन्सट्रेटर ने हि कंपनी कायदेशीर रित्या ४ व्यासायिकांच्य सन्स्थेला ८२६ कोटी ला विकली आणि डी एस के नि दावा केल आहे कि कंपनी कडे १६,००० कोटी ची मालमत्ता असताना ८२६ कोटी ला विकली कशी... या मागणीत दम तर आहे पण खरे काय आहे ?( हे वयसायिक बुडीत उद्योग स्वस्तात विकत घेण्याचा धंदा करतात आणि त्यात ते अमराठी म्हणून लोक कारण नसताना यात मराठी वैगरे मुद्दा आणतात , असो कोर्टाने या नवीन उद्योगाला ८२६ कोटीत घेऊन ३००० कोटी ना लगेच विकण्याचा - "फ्लीपिंग "त्यांचह्य उपक्रमाला सध्या तरी थांबवले आहे )

आता सर्वसामान्य ठेवीदारांसंबंधी संबंधी
नाण्याची एक बाजू: खाजगी कंपनीत ठेवी ठेवणे हे धोकादायक असते हे त्याना तेवहा दिसले नाही का? तेवहा परतावा जास्त मिळावा या हव्यास ( दुसरे काय) पैसे गुंतवले आणि आता का रडत आहात ?
नाण्याची दुसरी बाजू: दि एस के हा उद्योग त्याआधी बरेच वर्षे अस्तित्वात होता त्यामुले लोकाचा विश्वास बसला .. बरेच फ्लॅट घेणार ग्राहक दुहेरी ग्राहक बनले ठेवी ठेऊन .. त्यामुळे त्यांना हि १००% दोष देणे कठीण आहे

बांधकाम व्यासहयक बुडणे हे भारतात काय इतर देशात हि नवीन नाही ... फरक एवढाच कि काही देशात ग्राहक संरक्षण जास्त चांगले कायदे आहेत आणि त्याची अंमलबजावणी बऱयापैकी होते ..

असो तन्य लोकांनी यावर प्रकाश टाकावा

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2024 - 8:38 pm | अमरेंद्र बाहुबली

माझ्याही एका नातेवाईकांचे ५ लाख अडकलेत डीएसकेत.

चौथा कोनाडा's picture

24 Apr 2024 - 8:50 pm | चौथा कोनाडा

वाचत आहे.

आम्ही पण डीएसकेग्रस्त आहोत (नशीब हे की जास्त रक्कम टाकली नव्हती, त्यामुळं मोठा फटका बसला नाही.. अर्थात जे टाकले ते मिळाले तर झकासपैकी ५-७ पार्ट्या नक्की होऊन जातील)

दरम्यान आम्हास पुढील लघूसंदेश प्राप्त झाला आहे:
for DSK Settlement claim using below mentioned link https:// sequtrization.catalysttrusteeshiplimited.com/dskclaims/Claimlogin.aspx CTL ESCROW Trustee

हे काय करावे हे न कळल्याने या लिंकवर क्लिक केले नाही.

करावे का या बद्द्ल कोणी जाणकार मिपाकर मार्गदर्शन करू शकेल का ?

विअर्ड विक्स's picture

25 Apr 2024 - 5:25 pm | विअर्ड विक्स

मी सुद्धा NCD मध्ये इन्व्हेस्ट केलेले . जा माझी स्मरणशक्ती चांगली असेल तर याला क्रेडिट रेटिंग 'BB " होते . तरीसुद्धा नावावर विश्वास ठेवला चूक झाली.

परंतु कोर्ट प्रकरण चालू आहे पैसे मिळतील हि आशा आहे . मुद्दल मिळाली तरी पुरेसे आहे .

यावरून धडा घेतला " गुंतवणूक करतांना एखाद्या कंपनीत गुंतू नका , क्रेडिट रेटिंग्जवर सिश्वास ठेवला असता तर वाचलो असतो .

DSK खरे का खोटे , त्यांना कोणी अडकवले याच्या सुरस कथा अनेकजण सांगतील पण ज्यांचे पैसे अडकतात त्यांची अवस्था बिकट होते . DSK च्या आधी परांजपे नि सुद्धा अनेकांचे पैसे डुबवले आहेत विरार वाळुंज प्रकल्प . त्यामुळे जात न पाहता पत पाहून व्यवहार करणे

एनसीडी या विषयातील तज्ञ खाजगी कंपनीच्या संदर्भात सामान्य गुंतवणूकदारांनी केवळ एएए आणि सरकारी असेल तर किमान एए मधे गुंतवावे असा सल्ला देतात

चौकस२१२'s picture

26 Apr 2024 - 4:31 am | चौकस२१२

आपली हरकत नसेल तर थोडे विस्तारून सांगता का
- कोणत्या कंपनीत गुंतवले ( किती ते नका सांगू )
- ती लिस्टेड होती कि खाजगी ?
- त्याचे अति आणि नियम आठवत असतील तर काय होते
- त्या कंपनी ला सेबी ची अश्या ठेवी घेण्याहची परवानगी होती का ?
- रिस्क डिस्क्लोजर होते का? यात आपली ठेव हि कंपनी बुडीत गेल्यास कोणत्या क्रमांकावर राहील ( नकारांचे पगार, बँकेची देणी , इतर सिक्युरड क्रेडिटर मग ठेवीदार काई कसे ? इत्यादी

विअर्ड विक्स's picture

26 Apr 2024 - 2:37 pm | विअर्ड विक्स

मी अनेक कंपनीत NCD आणि कंपनी FD मध्ये पैसे गुंतवले आहेत . ह्या कंपनी अर्धा व एक टक्का मार्केट रेटपेक्षा जास्त देतात कारण त्या असुरक्षित असतात म्हणून . मी टाटा मोटर ( जेव्हा ती पार डब्यात जेकी होती ) चे सुद्धा NCD घेतले होते . रिस्क घेऊन रिवॉर्ड घ्यायचा कि सुरक्षितता हा ज्याचा त्याचा निर्णय .
CRISIL नि ICRA या प्रसिद्द क्रेडिट रेटिंग कंपनी आहेत . यातील क्रिसिल हि लिस्टेड कंपनी आहे . त्यामुळे मी क्रिसिल चे उदाहरण देतो. रेटिंग AAA ते D या गटात मोडतात . AAA - सर्वात सुरक्षित त्याखाली बाकी सर्व याप्रमाणे उतरंड आहे . जी सर्वात सुरक्षित ती व्याज सुद्धा कमी देते . उदा. HDFC Ltd जी आधी NBFC होती तिच्या ठेवी सर्वात सुरक्षित त्यामुळे व्याज कमी याउलट किंगफिशर , जेपी असोसिएट्स यांसारख्या कंपनी चढे व्याजदर देत असत. किंगफिशर च्या उमेदीचं काळात मी अनेकदा त्यात गुंतवले होते पैसे. कधीच अडकले नाही, याउलट PDC ( पोस्ट डेटेड चेक ) मिळायचा . त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे .

NCD हे secured लोन मध्ये कन्सिडर होते त्यामुळे कंपनी फड पेक्षा अधिक सुरक्षित , माझ्या माहितीप्रमाणे . जाणकार प्रकाश टाकतील अजून

काही वर्षांपूर्वी कम्पनी FD वर बंदी असल्याने अनेकांचे पैसे अडकलेत छोट्या कंपनीत त्यामुळे कंपनी FD पेक्षा गव्हर्नमेंट कंपनीचे क्रिसील रेटिंग बघून FD घेणे

सुबोध खरे's picture

26 Apr 2024 - 7:21 pm | सुबोध खरे

कंपनी FD पेक्षा गव्हर्नमेंट कंपनीचे क्रिसील रेटिंग बघून FD घेणे

सत्यम या कंपनीस केअर या रेटिंग कंपनीने AAA असे उच्च रेटिंग दिले गेलेलं होते. पण कंपनी डबघाईस येऊन लोकांचे कोट्यवधी रुपये बुडाले हा इतिहास आपल्यास माहित आहे का?

t needs to be found out how the rating agencies rated Satyam Computer at AAA despite all this that was unearthed on Januray 7," IRDA's chairman Mr J. Harinarayan told ET.

Read more at:
https://economictimes.indiatimes.com/tech/software/satyam-saga-irda-blam...

सुबोध खरे's picture

26 Apr 2024 - 7:25 pm | सुबोध खरे

There had been many occasions when credit-rating agencies had proved unequal to their task. There are only a dozen or so internationally-recognised credit-rating agencies. Since they charge a fee from the companies they rate, they are often unable to address the problem of conflict of interest.

Enron had an ‘investment-worth’ rating, four days before it went bankrupt, though the rating agencies were in the know of all the shady goings-on in the company.

Again, it was just three years ago that Moody’s, which had given Freddie Mac a high rating, was forced to downgrade it, when investor Warren Buffett made some disclosures forcing the agency to downgrade it almost overnight

Satyam Computers, whose proprietor is now in jail, proved that crediting agencies and accounting firms were more than willing to fudge figures.

https://www.newindianexpress.com/opinions/editorials/2011/Aug/10/need-fo...

विअर्ड विक्स's picture

3 May 2024 - 11:23 am | विअर्ड विक्स
विअर्ड विक्स's picture

3 May 2024 - 11:05 am | विअर्ड विक्स

Dsk हे आता मुलाखती देऊ लागले आहेत.

चौथा कोनाडा's picture

26 Apr 2024 - 5:41 pm | चौथा कोनाडा

DSK हे आता मुलाखती देऊ लागले आहेत.

मग काय अडचण आहे ?

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2024 - 5:46 pm | अमरेंद्र बाहुबली

मुलाखती denyapekshaq लोकांचे बुडवलेले पैसे द्यावेत.

अमर विश्वास's picture

25 Apr 2024 - 5:53 pm | अमर विश्वास

घरच्यांनी DSK मधे पैसे गुंतवले होते ...

सुदैवाने परत मिळाले ..

सध्या DSK ची ED मार्फत Money laundering act अंतर्तगत चौकशी चालू आहे

अति महत्वाकांशी पण अव्यवहार्य टाउनशिप प्रोजेक्ट अंगाशी आला ...
पण खरा घोटाळा होता : DSK आणि कुटुंबीय यांच्या नावावर असलेल्या कंपन्यांमधे हे पैसे वळवण्यात आले (Siphon off)

त्यामुळेच DSK यांची पत्नी आणि मुलगा हे पण सह आरोपी आहेत (त्यांच्या नावावर प्रचन्ड संपत्ती आहे .. त्यांचे स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत शून्य असतानाही ..

बाकी हे सर्व केवळ राजकीय पंगा घेतल्यामुळे झालय असे समजणाऱ्यांना गोड गोड चॉकलेट ...
काही वर्षांपूर्वी त्यांनी लोकसभा निवणूक लढवली होती .. तेही बसप कडून ..

चौथा कोनाडा's picture

26 Apr 2024 - 12:33 pm | चौथा कोनाडा

घरच्यांनी DSK मधे पैसे गुंतवले होते ...
सुदैवाने परत मिळाले ..

NCDs मध्ये गुंतवले होते का ? ते मिळाले परत ?

स्वधर्म's picture

25 Apr 2024 - 8:23 pm | स्वधर्म

डीएसके यांच्यावर शालेय अभ्यासक्रमात एक धडा होता. तो असाच स्फूर्तीदायक वगैरे विचारांनी भरलेला. डीएसके तुरुंगात गेल्यावर पाठ्यपुस्तक मंडळाने तो काढून टाकला असे आठवते.
तसेच डीएसके हे विविध भारतीवर एक प्रायोजित कार्यक्रम करायचे. अर्थात व्यावसायिक पध्दतीने. त्यात निवेदिका त्यांना अनेक प्रश्न विचारायची. ते स्फूर्तीदायक, नैतिकतेचा मापदंड कसा असतो, अशी उत्तरे द्यायचे. एकणार्यांना मराठी माणूस, त्याच्या स्वप्नांची भरारी व तरीही किती साधे व कमालीची नैतिकता पाळणारे व्यक्तिमत्व असं सगळं दवणीय ऐकून भरून यायचं. मग लोक आपल्या जीवनातील अडचणींवरही प्रश्न विचारायचे व डीएसके त्यांना बहुमूल्य मार्गदर्शन करायचे.
अरेरे… गेले ते दिवस.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Apr 2024 - 12:02 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"राजकीय नेत्यांनी ठरवुन पद्धत्शीर्पणे गेम केला" हे वाक्य हल्ली सर्रास ऐकू येते. पण स्पष्ट नावे घेउन बोला असे म्हंटले तर लोक कानावर हात ठेवतात. त्यांची मुलाखत ऐकली. एकंदरित असे दिसतेय की ते अनेक कायद्यांच्या आणि सरकारी खात्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. ते ३ हजार कोटी देणे लागतात आणी त्यांच्याकडे २१,००० कोटींची मालमत्ता आहे पण गुन्हे दाखल असल्याने विकता येत नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
पण ईतर उद्योगपतींप्रमाणे डी.एस.के पळाले नाहीत हे विशेष. ते अजूनही "मला गुंतवणुकदारांना पैसे द्यायचे आहेत" असेच म्हणत आहेत.
पुण्याचे आणखी एक -कुमार बिल्डरचे ललित कुमार जैन असेच अडकले होते असे वाचले होते.

चौथा कोनाडा's picture

29 Apr 2024 - 2:11 pm | चौथा कोनाडा

"राजकीय नेत्यांनी ठरवुन पद्धत्शीर्पणे गेम केला" हे वाक्य हल्ली सर्रास ऐकू येते. पण स्पष्ट नावे घेउन बोला असे म्हंटले तर लोक कानावर हात ठेवतात.

एकतर कित्येक गोष्टी सिद्ध करणे केवळ अवघड नाही तर जवळजवळ अशक्यच आन त्यात पुन्हा फायनल गेम होण्याची भीती ..... मग कोण नाव घेऊन स्पष्ट बोलायचं धाडस करेल ?

पण ईतर उद्योगपतींप्रमाणे डी.एस.के पळाले नाहीत हे विशेष. ते अजूनही "मला गुंतवणुकदारांना पैसे द्यायचे आहेत" असेच म्हणत आहेत.

हे किती कौतुकास्पद आहे !

प्रशांत हेबारे's picture

2 May 2024 - 8:51 pm | प्रशांत हेबारे

अहो सर्व खोटे आहे. dsk fraud माणूस आहे . पळून चालला होता दिल्ली to नेपाळ अँड देन अमेरिका. एयरपोर्ट वर पकडला त्याला. दोन पासपोर्ट होते. सर्व खोटे बोलतो. मी स्वत फ्लॅट च्या स्कीम मध्ये आडकलो आहोत. कोर्टात केस चालू आहे. We are victim in DSK case. almost 200 to 300 peoples are there who are suffering. With Bank and Finical institute he has done all Fraud. Now he has giving interview . This is all lie. He can sold our his property that time only comeout of situation but it was not possible. As he has stuck up in land litigation also.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2024 - 3:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गवि's picture

30 Apr 2024 - 3:29 pm | गवि
कंजूस's picture

30 Apr 2024 - 5:43 pm | कंजूस
कंजूस's picture

30 Apr 2024 - 5:44 pm | कंजूस