गाभा:
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार म्हणजे केंद्रशासित करणार का ?
मुंबई केंद्रशासित केली तर मुंबई मध्ये दारू चे दर गोवा / दमण सारखे स्वस्त होतील का ? कि गुरुग्राम ( गुरगाव ) सारखे स्वस्त होतील ( अधिक माहिती साठी - मला गुरुग्राम चे दर गोव्या हुन कमी वाटले )
मुंबई केंद्रशासित म्हणजे नवी मुंबई , ठाणे पण त्या मध्ये येणार का ? की ती मानखुर्द , मुलुंड , भांडुप , दहिसर मधीलच होईल ?
जर
मुंबई वेगळी होवून स्वस्त दारू झाली
आणि नवी मुंबई , ठाणे तीत नसेल
तर चेक अप जोरदार होईल का ?
रेल्वे मध्ये पण बाटल्या चेक करतील का ?
अशी चेक अप जवळपास अशक्य नाही का ?
बॉर्डर वर स्वस्त बार उघडतील किंवा लोक रेडोमिक्स करून पितील आणि सेप्रेट मुंबई ची बॉर्डर क्रॉस करतील त्यांस कसे थांबवणार ?
प्रतिक्रिया
22 Mar 2024 - 10:57 pm | अमरेंद्र बाहुबली
मुंबईची काळजी नवी मुंबईत राहनार्यांनाच का असते??
(काही लोक तर नवी मुंबईत राहून मुंबईत राहतो सांगतात, असा एक सानपाड्यात राहनारा पण मुंबईत राहतो सांगनार्याला मी रंगेहात पकडले होते.) :)
23 Mar 2024 - 7:15 am | अहिरावण
कर्जत खोपोली खर्डी कसारा रहाणारे लोक सुद्धा आम्ही "मुंबईत" रहातो असे म्हणतांना ऐकले आहे. तीच गोष्ट राजगुरुनगर, चाकण, लोणावळा, कात्रज बोगद्यापलीकडले लोक आम्ही "पुण्यात" रहातो असे म्हणतात.
23 Mar 2024 - 7:25 am | मुक्त विहारि
ही फक्त फोर्ट विभागा पूरतीच
आता,
जिथ पर्यंत लोकल जाते, तिथ पर्यंत मुंबई....
23 Mar 2024 - 10:37 am | अहिरावण
घ्या ! म्हणजे आता मेमू कल्याण ते पुणे आणि कल्याण ते नाशिक चालवायचा घाट चालला आहे तर पुणे आणि नाशिक सुद्धा मुंबईतच येईल की...
23 Mar 2024 - 12:47 pm | मुक्त विहारि
तशीही, मुंबई आणि पुणे, ही सख्खी भावंडे आहेतच आणि नाशिक हे, मुंबई आणि पुण्याचे सावत्र भावंडं
23 Mar 2024 - 7:28 am | मुक्त विहारि
सागरली, पाथरली, ह्या गावातली माणसे देखील, आम्ही डोंबिवलीत राहतो, असेच म्हणतात...
23 Mar 2024 - 7:22 am | मुक्त विहारि
निवडणुका जवळ आल्या की हे प्रश्न ऐरणीवर येतो.
आणि
जी गोष्ट कधीच होणार नाही, त्या गोष्टीवर फुकाची चर्चा कशाला?
23 Mar 2024 - 8:50 am | कर्नलतपस्वी
ची बस सेवा देते तेथपर्यंत पुणे. या न्यायाने राजगुरुनगरकर असुनही प्रसंगी पुणेकर.
23 Mar 2024 - 8:51 am | कर्नलतपस्वी
पुण्यात राहून आम्ही पुणेकर नाही असे छातीठोक पणे सांगतात.
23 Mar 2024 - 10:40 am | अमरेंद्र बाहुबली
एम एच १४ वालेही पुण्याचे आहोत असे छातीठोकपणे सांगतात. :)
23 Mar 2024 - 12:29 pm | भागो
कांदा पोह्यावर सांबार मारून खाणारे तेथे पुणेकर जाणावा.
23 Mar 2024 - 1:06 pm | अहिरावण
आणी इडलीवर केचप !!
23 Mar 2024 - 10:42 am | अहिरावण
हळू हळू मुंबई वरुन पुणे विरुद्ध इतर असा सामना होणार !!
23 Mar 2024 - 10:45 am | सर टोबी
शिवाजी पार्कच्या एका टोकाच्या कट्ट्यावर बसून “आज दादरला जाऊन येणार आहे” असे बाणेदार वाक्य ऐकले आहे.
23 Mar 2024 - 10:48 am | अहिरावण
सहमत आहे. माझा एक मित्र दादरमधे रहायचा. त्याला कधी चल जरा कुलाब्याला जाऊन येऊ म्हटले की कशाला मरायला मुंबईत जायचंय? जा तु एकटा मी नाही येत असं म्हणून वाटी लावायचा.
23 Mar 2024 - 2:42 pm | कर्नलतपस्वी
केन्द्रशासीत होऊ शकेल काय?
दारू,कार सारख्या मुलभूत गरजा स्वस्त होतील.......
23 Mar 2024 - 2:53 pm | नठ्यारा
आम्ही ठाण्यात राहतो असं ओवळ्याची लोकं म्हणतांना ऐकलंय. हां, तो ठाणे महापालिकेचा भाग आहे हे खरंय. पण घोडबंदर मार्गास ठाणं म्हणणं कसंसंच वाटतं. आगरा रोड आणि हायवे एक झाले की ठाणं संपलं अशी आमची लहानपणी समजूत होती.
घोडबंदर रोडाच्या पत्त्यांचा पिन ४००६०७ लिहिला तर पत्र येत नसे. पण ठाणे मुख्य कार्यालयाचा पिन ४००६०१ लिहिला तर बरोबर पोहोचंत असे. यावरून घोडबंदर मार्गास ठाणे म्हणण्यास टपालखात्याचा छुपा पाठिंबा होता असं दिसतंय. स्वकीयांचा घाव अधिकंच वर्मी लागतो, नाही? ;-)
-ना.न.
23 Mar 2024 - 3:17 pm | टर्मीनेटर
केजरीवाल वाला धागा वाचनमात्र केल्याचे बघून वाईट वाटले…
असो… आता इथे यायचे की नाही हा विचार करण्यास प्रवृत्त झालो आहे!
जय हिंद! जय महाराष्ट्र!
23 Mar 2024 - 3:30 pm | मुक्त विहारि
केजरीवाल, राहूल गांधी, ममता आंटी, ही काही मिपा सोडण्याची कारणे नाहीत....
23 Mar 2024 - 3:38 pm | टर्मीनेटर
तरी पण मिपा भ्रष्टाचाऱयांचे समर्थन करणाऱ्यांसाठीचे व्यासपीठ ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत असेल तर ते स्विकारणे मला तरी अशक्य आहे…
कळावे, लोभ असावा.
23 Mar 2024 - 4:14 pm | अमरेंद्र बाहुबली
असे एकांगी कसे काय तुम्ही?? कशा वरून डायरेक्ट भ्रष्टाचारी ठरवले त्यांना? असो. इथे अवांतर नको.
23 Mar 2024 - 5:55 pm | मुक्त विहारि
अगदी अगदी....
न्यायालयाचा अंतिम निर्णय, बाकी आहे...
23 Mar 2024 - 8:13 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
बीफ निर्यात करणारे शिवसेना-भाजपाला देणग्या देत होते आणि ह्यांचे कार्यकर्ते कोणीतरी बीफ खल्ले म्हणुन टाळकी फोडतात. गंंम्मत म्हणजे बीफ निर्यात करणारे जेवणात कांदा-लसूण न खाणार्या कॅटॅगरीमधील आहेत.
निवड्णुक रोखे प्रकरणात सुप्रिम कोर्टाने सगळ्यानाच उघडे पाडले.
24 Mar 2024 - 12:41 am | मुक्त विहारि
न्यायालय, ह्या संस्थेवर माझा , पूर्ण विश्वास आहे
24 Mar 2024 - 10:41 am | अहिरावण
पुर्णपणे सहमत.
24 Mar 2024 - 10:42 am | अहिरावण
आणि
या दोन वाक्यांचा संबंध लावून देणा-यास बिनालसुनकांद्याचे चविष्ट जेवण लाभेल असा आशीर्वाद.
23 Mar 2024 - 5:11 pm | अहिरावण
काहीही हं.. टार्मीनेटर. असे टर्मिनेट होऊ नका..
भ्रष्टाचार सिद्ध होऊन अशा भ्रष्टाचा-यांना शिक्षा झाल्याचे शुभवर्तमान मिपावर आपल्या आयडी मार्फत मिळावे असा दैवी संकेत आहे हे विसरु नका. उज्वल भविष्याकडे पाहून सध्या शांत रहा !
26 Mar 2024 - 7:54 pm | अहिरावण
काय ठरलं मग?
27 Mar 2024 - 11:17 am | विवेकपटाईत
मुंबई वेगळी झाली की इमानदार माणसाला मुख्यमंत्री करा. एकावर एक दारूची बाटली फ्री मिळेल. शेकडो दारूची नवीन दुकाने उघडली जातील. काही म्हणा दिल्लीकर पिलेल्या दारूला जगत नाही. लाखो लोकांनी फ्री ची दारू प्राशन केली असली तरीही ईमानदार माणसाच्या समर्थांनात रस्त्यावर उतरले नाही.
27 Mar 2024 - 11:45 am | माईसाहेब कुरसूंदीकर
पण त्याला जेलमध्ये टाकायचे तर ई.डी.चे 'प्रामाणिक' आणि 'कनवाळू' अधिकारीही हवेत. 'कंबर दुखतेय' म्हणून शरद रेड्डीसारख्या माणसाला सोडणारे ई.डी.चे अधिकारी असले तर उद्धव, शरद पवार.. आदित्य.. कोणालाही निवड्णूकीच्या काळात तुरुंगात टाकता येईल.