मित्रहो, जगभरातले धर्मग्रंथ, पुराणे इत्यादी प्राचीन साहित्यात, मानव करत असलेल्या विविध 'पुण्यकर्मांचे' तसेच 'पापांचे' ' फळ त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 'स्वर्गसुख' अथवा 'नरकयातना' या स्वरूपात मिळत असते, असे सांगितलेले दिसते.
तसेच त्या त्या देशातील कायद्याप्रमाणे काही 'चांगले' कृत्य केल्याबद्दल बक्षीस, पुरस्कार, सन्मान इत्यादि, आणि 'गुन्हा' किंवा 'दुष्कृत्य' केल्याबद्दल कमीजास्त कठोर शिक्षा दिली जात असते.
याखेरीज आपल्या रोजच्या जीवनात 'आळस' (- जे करायला हवे ते न करणे) किंवा 'प्रमाद' (- जे करायला नको, ते करणे) यातूनही विविध मनो- शारीरिक व्याधी, ताणतणाव, परस्पर संबंध बिघडणे असे परिणाम घडून येत असलेले दिसतात, आणि त्यांच्या कार्य-कारण भावाविषयीही तर्क करता येतो.
परंतु हा काथ्याकूट वरील तिन्ही गोष्टींविषयी नाही. मग कशाविषयी आहे ? तर :
आपल्या माहितीततल्या लोकांवर जेंव्हा काही गंभीर स्वरूपाचे संकट अकस्मातपणे कोसळते, आणि बघता बघता त्या व्यक्तीचे आयुष्य बरबाद होते - तेंव्हा आपण अवाक होतो, आणि हे कशामुळे घडले असावे, यामागील कार्यकारण भाव काय असावा, असा प्रश्न आपल्याला पडतो.
हे संकट आरोग्यविषयक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे असू शकते.
यावर उपाय म्हणून वैद्यकीय उपचार, गंडेदोरे-ताईत, देवाचा धावा, बाबा-स्वामींची काकळूत, मनो-चिकित्सकांचे उपचार, ज्योतिष, राजकीय नेत्यांची लोकांची ओळख-वशिला, वगैरे प्रयत्न करूनही जेंव्हा कशाचाच काही उपयोग होत नाही, तेंव्हा माणूस हतबुद्ध होतो आणि 'नशिबा' ला दोष देत ते सोसण्याचा प्रयत्न करतो.
तर इतर लोक "त्याच्या अमूक तमूक कर्माचे फळ त्याला मिळते आहे" असा निष्कर्ष काढताना दिसतात.
– मोठ्यांचे ऐकले नाही, वडीलधाऱ्यांचा अपमान केला, आई - वडिलांना घराबाहेर काढले, सुनेचा छळ केला, मित्राची फसवणूक केली, लहान मुलांना मारझोड केली, पूज्य विभूतींविषयी अनुद्गार काढले, नादिष्टपणा- छंदिफंदीपणा - बाहेरख्यालीपणा केला, देशद्रोहीपणा केला …. असे विविध प्रकारचे प्रमाद त्या व्यक्तीवर कोसळलेल्या संकटाला कारणीभूत आहेत, असे मानले जाते.
हा काथ्याकूट त्याबद्दलचा आहे.
लहानपणापासून आपल्यावर जे जे 'संस्कार' आपले पालक, शिक्षक, गुरु वगैरे करत असतात, पुस्तके, प्रवचने, चर्चा, वगैरेतून योग्य-अयोग्य वर्तनाबद्दल आपल्याला जो काही बोध होत असतो, त्याचे पालन कळत-नकळत आपल्याकडून जर घडून आले नाही, तर अशा विविध 'चुकांचे' फळ आपल्याला याचि जन्मी - याचि देही सोसावे लागणार आहे का ?
मंडळी, तुम्हाला काय वाटते ?
प्रतिक्रिया
12 Feb 2024 - 7:24 am | कर्नलतपस्वी
पहले रचा प्रारब्ध, पिछे रचा शरीर
तुलसी क्यूं चिंता करे भज ले श्री रघुवीर ||
विषय गहन आहे. पक्षीदर्शन करता निघालोय,रुमाल टाकून ठेवतो.
मी पयला.....
12 Feb 2024 - 10:50 pm | चित्रगुप्त
पहले रचा प्रारब्ध, पीछे रचा शरीर ... म्हणजे मनुष्य (देह) जन्माला येण्यापूर्वीच त्याच्या जीवनात क्षणोक्षणी काय घडणार, हे 'लिहून' ठेवले आहे ... असे आहे तर मग कशाबद्दलच कोणताही प्रश्नच उरत नाही.
-- मला स्वतःला हे मान्य करण्याइतपत अनुभव आलेले आहेत.
6 Mar 2024 - 2:58 pm | शशिकांत ओक
मानवी बुद्धीच्या पलिकडे जाऊन जेव्हा भारतीय प्रज्ञालोकातील माहिती ज्याला प्राचार्य अद्वयानंद गळतगे सर आणि अनेक विचारक ज्याला आकाशिक रेकॉर्ड म्हणतात ते वाचून व्यक्तिच्या जन्माच्या आधीच त्याचे, माता पिता, पत्नी /पतीची नावे जन्मतारीख, शिक्षण, नोकरी, व्यवसाय वगैरे तमिळ भाषेतील ताडपट्ट्यावरील नोंद करण्याची त्यांची क्षमता याचा अभ्यास केला की देवाची लीला, करणी ही अगाध आहे. याचा प्रत्यय येतो.
6 Mar 2024 - 5:51 pm | स्वधर्म
कुणाला पटतील न पटतील, तरी रोचक असतील. लिहा जरूर.
6 Mar 2024 - 8:06 pm | शशिकांत ओक
नाडी ग्रंथ भविष्य - चक्रावून टाकणारा चमत्कार पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे. त्यातील मला आणि इतरांना आलेले अनुभव आणि घटना काही वर्षांपूर्वी मिपावर सादर केलेल्या होत्या. आहेत. शिवाय इथे https://alkaoaksebookshoppy.online/
आता यावर इंग्रजी, हिंदी, गुजराती, तमिळ आणि मराठीत ई बुक्स उपलब्ध आहेत.
12 Feb 2024 - 10:13 am | श्वेता व्यास
आपल्याकडून कमीत कमी चुका व्हाव्यात म्हणून 'याच जन्मात चुकांचे फळ मिळते' असं मानणे सोयीस्कर आहे, आणि आयुष्यात काही संकट आले, कसलीतरी शिक्षा भोगतोय असे वाटले आणि काय चुका केल्या ते आठवत नसेल तर 'मागच्या जन्मीच्या चुकांचे फळ' आहे असं मानणे सोयीस्कर आहे :)
12 Feb 2024 - 9:09 pm | मुक्त विहारि
सहमत आहे
12 Feb 2024 - 10:58 pm | चित्रगुप्त
तुम्ही प्रतिसादात मांडलेला विचार एकदम सोयिस्कर आहे.
'आपल्या बर्या-वाईट कर्मांची फळं आपल्याला याच जन्मी मिळणार' हा विचार (आणि धाक सुद्धा) मनुष्याला औचित्यपूर्ण कर्मे करण्यासाठी आणि अनुचित कर्मे करण्यापासून रोखण्यासाठी प्रेरित करणारा ठरतो, हे खरे.
12 Feb 2024 - 10:27 am | गवि
आपण केलेल्या 'चुकांचे' फळ इतर कोणालातरी , ताबडतोब भोगावे लागते हेही अनेकदा सत्य ठरते.
किमान तेवढे टाळले तरी इतरांवर उपकार होतील.
तशी तर आपल्या अनेक चुकांची फळेही आपल्याला बहुतांश वेळा लवकरच मिळत असतातच, पण आपल्याला ती कळतच नाहीत.
आपले मन आपल्याला खाते, त्यापासून सुटका कधीच नसते. कारण आपल्या आतच तो न्यायाधीश असतो.. त्याला आपण किती काळ दाबून ठेवू शकता यावर आपले पॅरोलचे दिवस ठरतात.
पुढचा जन्म, मागचा जन्म याबद्दल काय बोलावे?
..दिल के खुश रहेने के लिये ए गालिब...
12 Feb 2024 - 11:02 pm | चित्रगुप्त
-- या प्रश्नाबद्दलचा एक वेगळाच आयाम या प्रतिसादातून व्यक्त झाला आहे. झकास.
12 Feb 2024 - 10:39 am | कंजूस
कधीकधी फक्त कळ्यांवर सुटका होते. आपल्या बरोबरच्या इतर व्यक्तींमुळे. म्हणून लोक महाराजांच्या मागे लागतात.
12 Feb 2024 - 11:07 pm | चित्रगुप्त
भल्याची संगती धरीना । आपणासी शाहाणे करीना । तो आपला आपण वैरी जाणा । स्वहित नेणे ..
-- (श्री दासबोधः करंटलक्षणनिरूपण)
12 Feb 2024 - 10:51 am | कॉमी
बहुतांश घडणाऱ्या घटना आपल्या हाताबाहेर असतात. माणसा माणसात न्याय ही कल्पना असते, मानवी विश्र्वासाबाहेर न्याय नावाचे काही अस्तित्वात नसते. कोणतीही कॉस्मिक स्केल अस्तित्वात नाही. पापपुण्याचा हिशोब ठेवणारा कोणताही चित्रगुप्त अस्तित्वात नाही. आपल्या सोबत वाईट का घडले ह्याचे सरळ साधे उत्तर नसते. उत्तर असेलच असेही नाही. दरड कोसळून पूर्ण गाव बेचिराख होते, ह्यात माणसांच्या कर्मफलाचा दुरान्वये संबंध येत नाही. दरड कोसळली फिजिक्स मुळे. त्या दर्डिखली माणसे नसती तरी ती कोसळली अस्तीच. अश्या कितीतरी पॉसिबल दुर्घटना घडत असतील जिथे माणूस असता तर जीवितहानी झाली असती. खाली पापी माणूस असल्याने दरड स्वतःहून कोसळणार नाही की पुण्यवान माणूस आहे म्हणून कोसळायला थांबणार नाही. त्यामुळे, ज्या ठिकाणी दुर्घटनेमुळे जीवित हानी होते तिकडे बघून माणसाच्या कर्माचा त्या घटनांशी संबंध जोडणे हा माणसाचा ego झाला, की आपल्याभोवती जगाच्या घटना घडतात, त्यासाठी माझ्या कर्म परिपाकापुढे दुसरे काही कॉज आणि इफेक्ट नाहीच.
थोडक्यात, ह्या बाबत युनिव्हर्सल सत्य असे काही नाही. तुमच्या वाईट कृतीचे परिणाम कदाचित तुम्हाला चावायला येतील, पण येतीलच असे नाही. तुम्ही कितीही चांगले, परिपूर्ण वागला तरी तुम्हाला कॅन्सर होणार नाही ह्याची खात्री नाही.
12 Feb 2024 - 11:13 pm | चित्रगुप्त
... अगदी. मनुष्याच्या आकलन-क्षमतेच्या मर्यादा यातून स्पष्ट होतात.
21 Feb 2024 - 7:48 am | बाजीगर
पूर्वजन्म, पूर्वसंचित, कर्म, पापपुण्य हे सर्व माणसाच मॅन्यूपुलेटींग वाटतं मला.एखादी गोष्टं का झाली याचा तर्क देता आला नाही की द्या ठोकून मागच्या जन्मातील भोग वगैरे.
दोन दिवसापूर्वी वाचले, पंढरपूरला चालले होते, गाडीचा अपघात झाला.3 मेवे.इथं सरळसरळ वाहनचालन, झोप,वेग,रस्तापरीस्थिती,वाहन परिस्थिती ही कारणं असतात.पण देवाला जातानाही त्यांचच काही चूकलं असं विचार करणारी मंडळी भेटतील.
काही लोक सर्व दुराचार,अन्याय करुनही काही वाईट न होता सुखाने जगून गेली अशी ही उदाहरणे दिसतात.
जगात न्याय नाही.
21 Feb 2024 - 9:37 am | अमरेंद्र बाहुबली
मागच्या एप्रिलमध्ये नानासाहेब धर्माधिकार्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देताना वीसेक लाख लोक जमवले होते, हा संपुर्ण राजकीय खेळ होता, मंडप टाकू शकत असूनही फक्त ज्रोन कॅमेराने गर्दीचे फोटो घेता यावेत म्हणून मंडप टाकला गेला नाही. भर एप्रीलच्या ऊन्हात लाखो लोक दुपारच्या रनरनत्या ऊन्हात एका पक्षाच्या प्रचारासाठी बसवले गेले. तिथे १०० ते १५० लोक मेलो, सरकारी आकडा नेहमीप्रमाणे कमी दाखवला गेला. पण मेलेले लोक हे नशिबवान होते कारण त्यांना अश्या महान कार्यक्रमात मृत्यू आला अश्या गोष्टी पसरवल्या गेल्या. घटनेचे दुःखं म्हणून नानासाहब धर्माधिकारी ह्या माणसाने दारापुढची रांगोळी पूसली. (किती मोठा त्याग करावा एखाद्याने)) मुर्ख लोकांना अक्कल येईल तो सुदीन.
21 Feb 2024 - 10:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भर उन्हा़ळ्यात पुण्य संचय करणा-या लोकांची कीव आली होती. हेच म्हणुन नव्हे, अशा कितीतरी ठिकाणी मेंदू नावाच्या गोष्टींचा किंचितही वापर न करता आपलं भलं होईल या आशेने अशा मेंदुत भुसा भरलेल्या लोकांच्या टोळ्या दिवसेंदिवस वाढत आहेत. सुदीन यावा इतकेच अपेक्षित.
-दिलीप बिरुटे
21 Feb 2024 - 11:20 am | अमरेंद्र बाहुबली
हे तर काहीचनाही, त्या अप्पांच्या शेतात फूकट कामाला जातात, पुण्य जमवण्यासाठी इतके भयानक मेंदू गहाण ठेवलेले लोक आहेत. अप्पांच्या दृष्टाने त्या भक्तांची किंमत किती तर मेलेल्यांना एक रूपडाडी दिला नाही किंवा सरकारलाही द्यायला नाही लावला, फक्त रांगोळी पूसून दुःखं व्यक्त केले.
21 Feb 2024 - 11:21 am | सुबोध खरे
कोणत्याहि धाग्यात आपले पूर्वग्रह आणि राजकारण आणून धाग्याचा विचका कसा करावा हे वरील दोन्ही आय डी परत परत सिद्ध करून दाखवत असतात.
का? कशासाठी ?
21 Feb 2024 - 11:41 am | अमरेंद्र बाहुबली
लोक कसे फसतात हे दाखवले होते. वर कुठल्याही पक्षाचा किंवा व्यक्तिचा ऊल्लेख नाही. मरनार्या लोकांपेक्षा पक्षाची काळजी वाटणे चिंताजनक आहे. आणी अप्पा धर्माधीकारी कुठल्याही पक्षात नाही हे आवर्जून सांगतो.
21 Feb 2024 - 12:11 pm | अहिरावण
>>>अप्पा धर्माधीकारी कुठल्याही पक्षात नाही हे आवर्जून सांगतो.
म्हणजेच ते सर्व पक्षात आहेत.
21 Feb 2024 - 12:13 pm | अहिरावण
>>>का? कशासाठी ?
असते काही जणांना समाजसेवेची आवड. शे दोनशे वर्षानि आपली आठवण काढावी लोकांनी म्हणून जसे देशमुखरानडे खस्ता खात होते त्याच पठडीतले.
त्यांना प्रोत्साहन देणे सोडा... तुम्ही त्यांचे पाय ओढताय... कुठे फेडाल या कर्माची पापे.... !!!!
21 Feb 2024 - 1:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> का? कशासाठी ?
डॉक्टर साहेब, आपला कटाक्ष आमच्या कड़े असेल तर, आम्ही आपल्या निदर्शनास आणु इच्छितो की, महाराष्ट्राला प्रबोधनाची फार थोर परंपरा आहे. आपण जमेल तसं लोकांचे प्रबोधन केले पाहिजे, यात काही चूक आहे असे वाटत नाही.
-दिलीप बिरुटे
22 Feb 2024 - 10:25 am | सुबोध खरे
महाराष्ट्राला प्रबोधनाची फार थोर परंपरा आहे.
हो
पण आपण कीर्तनाला जाऊन तमाशातील शृंगारिक लावणी कशाला बेसुरात गाताय.
फडावर उभे राहा आणि गाजवा की!
कर्म आणि त्याचे फळ इ अध्यात्मात राजकारण आणून कशाला घाण करताय?
22 Feb 2024 - 10:27 am | सुबोध खरे
आणि भुजबळांच्या कुठे नादाला लागताय?
ते फक्त खांद्याखाली बळकट आहेत.
22 Feb 2024 - 10:31 am | अमरेंद्र बाहुबली
अच्छा म्हणजे तुमच्या आवडत्या विचारसरणीला, तुमच्या आवडत्या पक्षाच्या विचारसरणीला विरोध म्हणजे खांद्याखाली बळकट असणे असते व्हय. छान छान.
24 Feb 2024 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कर्म आणि त्याचे फळ अध्यात्मात राजकारण आणून कशाला घाण करताय?
कर्म आणि फळ केवळ अध्यात्मातच नसतं, आता ते तुम्हाला कळत नाही. समजत नाही त्याला आम्ही काही करू शकत नाही.
कारण मेंदुत भुसा भरलेल्या टोळ्यांचा परिणाम केवळ अशिक्षित लोकांवर होत नाही तर, सुशिक्षितावरही व्हायला लागतात तेव्हा असे विचार थोपवणे हे प्रबोधानाचे कार्यआहे.
भगवद्गीतेतील 'कर्मण्येवाधिकारस्ते....' चा विचार केवळ अध्यात्मिक लोकांसाठी नाही तर, सकल मानवासाठी आलेला विचार आहे. 'अध्यात्म असो की राजकारण' फळाची अपेक्षा न करता काम करीत राहा हा संदेश अधिक महत्वाचा आहे. आता कोणते कर्म केले पाहिजेत. त्यावर कधीतरी पुढे सांगेन. आत्ता इतकं पुरे आहे.
-दिलीप बिरुटे
24 Feb 2024 - 10:42 am | अहिरावण
सहमत आहे.
आता आपणच हा प्रबोधनाचा वारसा आणि वसा पुढे चालवावा आणि चुकलेल्या मेंढरांना योग्य दिशा देऊन कळपात आणावे. सर्व मिपा, नव्हे महराष्ट नव्हे भारत नाही नाही अखिल विश्व आपल्याकडे आस लावून पहात आहे.
बोला गु रुदेव प्राडॉ की जै....
आता सगळ्यांनी उभे राहून आरती म्हणावी.
जय देव जय देव जय दिलीप शेट
समोरच्यावर करती वार थेट
दावू योग्य मार्ग मेंढरे हाकलती
कर्माचे फळ याच जन्मी म्हणती
दिसेल कुणी अभिजन चुकार वाह्यात
हाणती लाथा आणि बुक्की पेकाटात
जनहो तुम्ही स्विकारा हाच मार्ग
तत्काळ मिळेल तुम्हा इथेच स्वर्ग
जय देव जय देव जय दिलीप शेट
समोरच्यावर करती वार थेट
गुरुदेवांच्या पाया पडून देणगी माझ्याकडेच द्यावी... गुरुदेवांना जड उचलायची मनाई आहे आणि जडावर त्यांचा लोभ सुद्धा नाही
21 Feb 2024 - 12:10 pm | अहिरावण
>>>सुदीन यावा इतकेच अपेक्षित.
तुमच्या आमच्या हयातीत येईल असे वाटत नाही.
मला वाटते आता तुम्हीच पुढाकार घेऊन प्राडॉ ची झूल काढा आणि तुमची ती फेमस डबल बॅरल घेऊन फायर करा तर काही होईल. फक्त जरा भगवी कापडं अंगावर घेतलीत तर इफेक्ट फास्ट होईल... कसे?
24 Feb 2024 - 6:35 am | बाजीगर
त्या सभेत आणलेली माणसं भाड्याने आणली असणार, पैसे (त्यांच्या भाषेत हजेरी) सभा संपल्यावर मिळणार असेल. उन लागतय हे कळतय पण हजेरी / काम न करता बसून पैसे मिळताहेत हे त्यांना इझीमनी वाटतं असणार. सनस्ट्रोक झाला, रक्तातील प्रथीन उकडून शिजलं,पण हजेरी पाहीजे म्हणून बसून राहीले, मेले.
सभा न सोडण्याची चूक याच जन्मातली, शिक्षा याच जन्मात.
24 Feb 2024 - 8:27 am | अमरेंद्र बाहुबली
नाही. माझी आईपण गेली होती त्या खारघरच्या कार्यक्रमाला. तिने आपबीता सांगातली. खरं तर त्या सेकंदापर्यंत मलाही हे लोक चांगले वाटायचे. त्या दिवसानंतर अप्पांचा खरा चेहरा समोर आला, हे सर्व बंदं करायला सांगीतलं.
24 Feb 2024 - 10:56 am | अहिरावण
तुम्ही पुरोगामी विचारांचे आहात असा डंका सर्वत्र आहे. मग ही घटना घडायची का वाट पाहिली? आईला आधीच योग्य मार्गावर का आणले नाही? एक कुतूहल.
24 Feb 2024 - 12:15 pm | अमरेंद्र बाहुबली
मी पुरोगामी असा डंका आहे???
मोठे व्हा. :)
24 Feb 2024 - 12:15 pm | अहिरावण
बर आजपासून तुम्ही सनातनी.
24 Feb 2024 - 10:55 am | अहिरावण
>>>त्या सभेत आणलेली माणसं भाड्याने आणली असणार
कोण भाड्या?
12 Feb 2024 - 11:32 am | Bhakti
मी आधी असाच विचार करायचे.आपल्यावर संस्कार आहेत आपण चूका करायच्या नाहीत, समजून घ्यायचं.पण हे जग इतकं प्रक्टिकल आहे की खुप थोडे बोटावर मोजता येतील एवढेच तुमच्या चुका पोटात घेतात.बाकी जग चुका न करताही किडकं फळं देऊ शकतं...मग त्यांच्याशी कसं वागायचं?
एखाद्याला गंभीर काही तरी रोग होतो,ते आरोग्य हे जेनेटिक,डिसिप्लिनड असतं त्यात चुका झाल्याने.
नातेसंबंध रूक्षपणाने बिघडतात.आर्थिक संकट लोभीपणा,बावळटपणा,आळशीपणा मुळं येतं.इत्यादी इत्यादी
तेव्हा या जन्मात फळं वगैरे कसं काही असतं,असं वाटतं नाही.
पण संस्कारांच म्हणाल तर मात्र खुप matar करतात.काही गोष्टी विसाव्या वर्षी कान पकडून सांगता येत नाही.
12 Feb 2024 - 11:35 am | अमरेंद्र बाहुबली
पाप पुण्य देखील समजावर अवलंबून असते. ऊदा. एका धर्माच्या दृष्टीने कुठलाही माणूस मारणे पाप तर दुसर्या धर्माच्या दृष्टीने आपल्या देवाला न माननारा माणूस मारला तर ते पुण्य ठरते.
12 Feb 2024 - 12:55 pm | Bhakti
दिलेले उदाहरण चूकलं आहे...आता काय फळ मिळणार अबाला ;);)
कृ.ह.घ्या.
12 Feb 2024 - 1:45 pm | अमरेंद्र बाहुबली
ऊदाहरण चुकलंय? :(
बघतो काय फळ मिळतं ते.
12 Feb 2024 - 2:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्यारे बहनो और भाईयो, आपण केलेल्या 'चुकांचे' फळ आपल्याला 'याच जन्मी' भोगावे लागतात.
>>>का ?
कारण आपण चुका केलेल्या असतात म्हणुन.
-दिलीप बिरुटे
12 Feb 2024 - 3:08 pm | विवेकपटाईत
लग्न झालेल्या व्यक्तीला चांगले माहीत असते या जन्माच्या कर्माचे फळे या जन्मीस भोगावे लागतात. बाकी जे आपल्या दृष्टीने ठीक, दुसऱ्याच्या दृष्टीने चूक आणि जे आपल्या दृष्टीने चूक, दुसऱ्याच्या दृष्टीने ठीक होऊ शकते.
12 Feb 2024 - 4:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
याबाबतीत काय म्हणतात ? अधिक माहिती उपलब्ध असल्यास वाचायला आवडेल.
-दिलीप बिरुटे
12 Feb 2024 - 9:15 pm | अमरेंद्र बाहुबली
हाहाहा.
16 Feb 2024 - 2:21 pm | अहिरावण
मराठीचे प्राध्यापक असून संत रामदासांच्या साहित्याचा अभ्यास नाही हे पाहून ड्वाळे पाणावले.
12 Feb 2024 - 4:32 pm | तिमा
जी अर्भकं/ मुलं, एक वर्षांची व्हायच्या आंत मरतात त्यांनी कुठे चुका केलेल्या असतात ? त्यांना म्रुत्युची शिक्षा का मिळते ?
12 Feb 2024 - 10:20 pm | चौथा कोनाडा
पुर्वसंचित किंवा मागच्या जन्मीचं पाप.
भारतीय संस्कृती फार थोर आहे .... त्यात इतक्या भन्नाट कल्पना इतकी बस !
कधी कधी वेडगळ वाटतात पण नीट तर्क लावून तपासल्या तर्क लावून तर एकदम ओके. त्यामुळे हेच लईच बेस्ट !
उगाच कारण बिरण शोधायला जात नाहीत ... डायरेक्ट "मागच्या जन्मीचं पाप / पूर्वसंचित / पत्रिकेत खोट / पत्रिकाच वाईट / वेळच वाईट / ग्रहमानच वाईट" असली शेकडो कारणं दिली की कुठल्याही सायकॉलॉजिस्टकडे जावं लागत नाही !
आहे ना भन्नाट !
13 Feb 2024 - 9:34 pm | चित्रगुप्त
मानवाला निसर्गाकडून मिळालेले सर्वोत्तम वरदान म्हणजे मृत्यु. त्यात कोणाच्या चुकीचा काही संबंध नाही.
21 Feb 2024 - 12:55 pm | सुबोध खरे
कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण भाव सहजासहजी सापडत नाही.
सोनोग्राफी करताना जन्माला न आलेल्या अर्भकाच्या पोटात असलेला कर्करोग पाहून असा विचा र येतो कि ज्या बाळाचा जन्मही झालेला नाही त्याने असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे जन्माचं अगोदरच त्याला असा भयंकर रोग झाला असावा?
आणि
दुसऱ्या टोकाला समाजात जाती जातीत तेढ निर्माण करून समाजाची वाताहत करणारे हरामखोर राजकारणी सहस्त्र चंद्र दर्शन ( ८० वर्षे पूर्ण) सारखा सोहळा साजरा करतात त्यांनी या जन्मात असे कोणते पुण्य केले आहे कि त्यांना दीर्घायुष्य मिळावे?
किंवा एकाच आजारात (तोंडाच्या कर्करोगामुळे) एकाच पक्षाचे दोन नेते यापैकी श्री आबा पाटील यांचे देहावसान झाले आणि श्री शरद पवार जिवंत आहेत.
यात कुणाचे पूर्वजन्मीचे/ या जन्मीचे पुण्य जास्त कि पाप जास्त याचा हिशेब कसा देणार?
या दोन्ही टोकाच्या उदाहरणावरून असे वाटू लागते कि जर पुनर्जन्म असला तर पूर्वजन्मीचे पाप किंवा पुण्य या जन्मात आपल्याला फळ देत असावे.
अर्थात गदिमा यांनी लिहिले आहे त्याप्रमाणे "मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा" म्हणजेच मृत्यू नंतर काय पुनर्जन्म आहे का याचे उत्तर संत महात्म्याना सुद्धा देता येत नाही. तेंव्हा आपण काय सांगणार?
I AM NEITHER FORWARD NOR BACKWARD, I AM JUST AWKWARD.
सत्कृत्य आणि दुष्कृत्य याची व्याख्या सुद्धा नक्की करता येणार नाही. पाप आणि पुण्याचे फळ मिळेल का याच जन्मात मिळेल का ? किंवा पुनर्जन्म आहे का आणि ते फळ पुढच्या जन्मात मिळेल का?
याचे कोणतेही उत्तर मला माहिती नाही.
पण अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं, परोपकार: पुण्य: पापाय: परपीडनं,-- महर्षी व्यास अठरा पुराणांचे सार दोन वाक्यात सांगतात --
दुसऱ्यावर उपकार करणे हे पुण्य आणि दुसऱ्याला त्रास देणे हे पाप आहे.
याप्रमाणे आपला व्यवहार ठेवला कि निदान आपल्याला मानसिक शांती मिळते असा माझा अनुभव आहे.
शेवटी आयुष्य म्हणजे काय?
ज्याचा त्याचा अनुभवच आहे.
21 Feb 2024 - 2:21 pm | अमरेंद्र बाहुबली
दुसऱ्या टोकाला समाजात जाती जातीत तेढ निर्माण करून समाजाची वाताहत करणारे हरामखोर राजकारणी सहस्त्र चंद्र दर्शन ( ८० वर्षे पूर्ण) सारखा सोहळा साजरा करतात त्यांनी या जन्मात असे कोणते पुण्य केले आहे कि त्यांना दीर्घायुष्य मिळावे?
ऊलटही असू शकतं ना?? अनेक जाती जातीत सामंजस्य तयार करून, कुठलीही जात श्रेष्ठ नाही असं समाजात बिंबवलं. त्यामुळे लोकांच्या प्रेमाने पुण्य कमावून ते सहस्त्र चंद्रदर्शन (८० वर्षे पुर्ण) करू शकले?? जातीवादी जळफळाटाशिवाय काय करू शकले??22 Feb 2024 - 10:30 am | सुबोध खरे
भुजबळ बुवा
कुठल्याही गोष्टीत राजकारण आणून विचका करायची आपण शपथच घेतली आहे का?
तसंही तुम्हाला कोणी सिरियसली घेत नाहीच.
फक्त तुम्ही अट्टाहासाने ते सिद्ध करताय एवढंच.
बघा विचार करून जमतंय का?
नाही तर द्या सोडून
22 Feb 2024 - 10:48 am | कॉमी
बाकी काही म्हणणे नाही, पण इथे राजकारण तुम्ही आणले आहे. तुम्ही पाहिला लिहिले, त्यावर बाहुबलींनी प्रतिक्रिया दिली.
22 Feb 2024 - 11:44 am | सुबोध खरे
कॉमी बुवा
जरा प्रतिसादांच्या कालावधी कडे लक्ष दिलं असतं तर कुणाचे प्रतिसाद पहिले आलेले आपल्याला समजले असते.
पण आपली कट्टर डावी विचारसरणी तसे करायला प्रतिबंध करत असावी असे वाटते.
मागच्या एप्रिलमध्ये नानासाहेब
21 Feb 2024 - 9:37 am | अमरेंद्र बाहुबली
हं.
21 Feb 2024 - 10:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणत्याहि धाग्यात आपले
21 Feb 2024 - 11:21 am | सुबोध खरे
कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण
21 Feb 2024 - 12:55 pm | सुबोध खरे
22 Feb 2024 - 11:54 am | कॉमी
इतरांनी काय लिहिले आणि कधी लिहिले ह्याचा काय संबंध ? तुम्ही एक अत्यंत प्रक्षोभक राजकीय प्रतिसाद दिला. त्याला राजकीय उत्तर आले. मग त्यावर तुम्ही "राजकीय विचका करू नका" म्हणून तक्रार करू लागलात तर तो तुमचा दुटप्पीपणा आहे. प्रा. डॉ. दिलीप बिरुटे किंवा बाहुबली ह्यांनी राजकीय विचका केला असा आरोप कोणावर केला नाही, तो तुम्हीच केला. तुम्हाला जर राजकीय लिहू नये असे मांडायचे होते तर तुम्ही स्वतः न लिहायचे भान ठेवायचे. ते तर तुम्हाला ठेवायचे नाही, अगदी प्रक्षोभक लिहायचे आणि वर तक्रार करायची !
बाकी काही बोलायला सुचत नसले की कडवी डावी विचारसरणी इत्यादी निरर्थक रडगाणे चालू द्या. तुमची साफ सरळ हीपॉक्रसी दाखवणे ह्यात कसलीही कडवी डावी विचारसरणी नाही.
22 Feb 2024 - 11:57 am | सुबोध खरे
तुम्ही पाहिला लिहिले, त्यावर बाहुबलींनी प्रतिक्रिया दिली.
कुणी पहिले लिहिलं आहे हे मी सप्रमाण दाखवलं आहे
तोंडघशी पडल्यावर या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायला डाव्या लोकांकडून शिकावे
22 Feb 2024 - 12:02 pm | कॉमी
धर्माधिकारी ह्यांच्या सत्काराच्या घटनेचा आणि तुम्ही लिहिलेल्या प्रतिसादाचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. तुम्ही पूर्णपणे वेगळा प्रतिसाद दिला. कोण थुंकी इकडची तिकडे करते आहे सरळ दिसते आहे.
22 Feb 2024 - 10:55 am | कॉमी
इतके प्रक्षोभक राजकीय प्रतिसाद लिहून वर दुसऱ्याकडे "राजकारण आणून विचका केला" म्हणून बोटे दाखवत आहात !
22 Feb 2024 - 11:52 am | सुबोध खरे
तुमची डावी विचारसरणी एका विशिष्ट एकांगी तर्हेने चालते म्हणून तुम्ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रापुरते ते सुद्धा श्री शरद पवार यांच्याबद्दल विचार करत आहात. ( त्यांच्या बद्दल वेगळा प्रतिसाद मी लिहिलेला असला तरीही)
श्री विप्र सिंह, मुलायम सिंह,चंद्रशेखर, चरण सिंह, प्रकाश सिंह बादल, एम करुणानिधी, मणिशंकर अय्यर असे असंख्य राजकारणी भारतात आहेत त्यांनी विशिष्ट जातीची आणि धर्माची मते मिळ्वण्यासाठी काय काय केले हे जगजाहीर आहे. त्यात प्रक्षोभक काहीच नाही.
त्याबद्दल लिहिले असताना केवळ द्वेषमूलक प्रतिसाद देण्यासाठी आपली संकुचित वृत्ती आपण सिद्ध करून दाखवलीत.
असो
बाकी भुजबळ बुवांबद्दल काही लिहिण्यात हशील नाहीच. ते अगोदर लिहितात आणि मग कधी कधी विचार करतात. त्यामुळे त्यांना बरेच मिपाकर सिरियसली घेत नाहीतच. तुम्ही पण त्यांच्या नादाला लागलात?
22 Feb 2024 - 11:57 am | कॉमी
काय हास्यास्पद बचाव आहे.
"माझा प्रतिसाद प्रक्षोभक नाही, कारण मी केवळ एका नेत्याला हरामखोर असा शब्द वापरला नाहीये, तर त्यासकट इतर अनेक लोकांना मी हरामखोर म्हणले आहे ! मी अनेकांना शिवी दिली असल्यामुळे, मिलोर्ड, माझा प्रतिसाद प्रक्षोभक नाही."
22 Feb 2024 - 11:58 am | सुबोध खरे
तोंडघशी पडल्यावर या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायला डाव्या लोकांकडून शिकावे
22 Feb 2024 - 12:04 pm | कॉमी
22 Feb 2024 - 1:03 pm | अमरेंद्र बाहुबली
काॅमी जाऊद्या. त्यांची चूक दाखवली की तुन्ही डावे विचारवादी (ज्याचा वास्तवीक इथे चाललेल्या चर्चेशी काहीही संबंधं नाही) अशी वयक्तिक टिका होते, ना माझ्यावरही डाॅ साहेब वयक्तिक ऊतरलेत. वास्तविक मी पवारांचा ऊल्लेख कुठेहा केला नव्हता. तरीही त्यांनी पवारांचे नाव घेतले. पण इथे लाॅजीकला तिलांजली दिली जातेय.
22 Feb 2024 - 11:23 am | अमरेंद्र बाहुबली
व्वा. मानलं तुम्हाला वर एका ८० वर्षीय राजकारण्यावर प्रक्षोभक लिहून आपला द्वेष प्रकट केलात ह्यावर मी ऊलटही असू शकतं इतकं लिहीलं तर मी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणतोय?? व्वाह.
तुम्ही हुशार आहात पण मिपावरील ईतर लोक मुर्ख नाहीत.
23 Feb 2024 - 2:40 pm | कर्नलतपस्वी
मुळ मुद्यापासून धागा भटकणे हे धाग्याचे प्रारब्ध, पुर्वसंचित म्हणायचे का?
21 Feb 2024 - 5:32 pm | चौथा कोनाडा
हे दु:खदायकच म्हणायचे !
12 Feb 2024 - 4:39 pm | कंजूस
संसारातील वाईट घटना मात्र बाजूच्यांना, नातेवाइकांना पिडण्यासाठीच असतात.
12 Feb 2024 - 8:46 pm | तुषार काळभोर
समजा एका मुलावर असे आईवडिलांनी लहानपणापासून संस्कार केले, की चोरी करणे पाप आहे. त्याने चोरी केली तर ते त्याच्यासाठी पाप असेल.
समजा दुसऱ्या घरातील आईवडिलांनी मुलाला चोरी करायला शिकवलं, दरोडा टाकायला शिकवलं. हे आपण आपलं पोट भरण्यासाठी करत आहोत, आपलं पोट भरण्यासाठी आपण जे काम करतो त्यामध्ये कोणी आडवा आल्यास त्याला इजा करणे अथवा मारून टाकणे यात चुकीचं काही नाही, असे संस्कार केले. आणि त्या मुलाने चोरी अथवा खून केला, तर त्याने पाप केले का? आपण करत आहोत, ते चुकीचे आहे, हेच त्याला माहिती नाही. असा दरोडा घालून आपण आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करत आहोत, त्यांना सांभाळत आहोत, त्यांना सुख समाधान देत आहोत, या विचारांनी तो चोरी, दरोडे, खून करत राहिला, तर ते पुण्य आहे का?
आपण कर्म करत राहायचं, ते आपलं काम आहे. ते पाप आहे की पुण्य, त्याचे काय फळ मिळेल, याचा विचार आपण नाही करायचा. फळाच्या अपेक्षेने कर्म करू नये.
13 Feb 2024 - 9:43 pm | चित्रगुप्त
पाप-पुण्य, चूक-बरोबर, चांगले - वाईट वगैरे सर्व मानवी कल्पना. निसर्गचक्रात त्यांचे काहीही स्थान नाही.
ब्रम्हांडाचा गाडा नियत निसर्गनियमांप्रमाणे अव्याहत चालत रहातो, त्यानुसारच मानवी जीवनातल्याही सगळ्या घटना घडत असतात . यालाच 'नियति' म्हणता येईल.
13 Feb 2024 - 12:07 am | रामचंद्र
खरं तर या जन्मात आठवूनही न सापडणारी कुठलीही दुष्कर्मे न करूनही अमर्याद दु:ख ज्यांच्या वाट्याला आलं आहे अशा कितीतरी व्यक्ती आपल्या आजूबाजूला दिसतात. मग हे या जन्मीचं नाही तर मागच्या जन्मीचं पाप एवढाच तर्क लागू होतो. पण जसं चांगल्या कृत्याची अनुभूती येईलच असं नाही पण वाइटाची मात्र लगेच प्रचिती येते हा मात्र बहुतेकदा अनुभव येतोच. एकूण काय, तर कर्म आणि भोग यांची संगती लावता येत नसली तरी त्या भीतीने का होईना सरळ मार्ग अवलंबणेच इष्ट.
13 Feb 2024 - 5:51 am | कर्नलतपस्वी
प्रारब्ध आणी कर्म हा लेख लिहीलाय
https://misalpav.com/node/48505
कार्यकारणभाव न समजणार्या घटनांबद्दल गोविंदाग्रजांची( रामगणेश गडकरी), ‘एखाद्याचे नशीब’ नावाची अर्थपूर्ण कविता.
झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळया पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !
13 Feb 2024 - 10:01 pm | चित्रगुप्त
लेख वाचला. खूपच चांगला आहे.
13 Feb 2024 - 7:45 pm | अहिरावण
ज्यांना आपण चुका समजतो त्या खरोखर चुका असतात का?
जी कृत्ये योग्य समजतो आणि करतो त्यांची फळे खरोखर चांगलीच असतात का?
कर्मे आणि फळे यांचा एकमेकांशी संबंध खरोखर असतो का?
13 Feb 2024 - 9:59 pm | चित्रगुप्त
आपले एकादे कृत्य हे काहीएक विशिष्ट संदर्भात आपण 'चूक' केली असे स्वतःला/ इतरांना वाटत असते. संदर्भ बदलले की तीच गोष्ट 'बरोबर' वाटू शकते.
'योग्य-अयोग्य, चांगले-वाईट याच मुळात मानवी कल्पना आहेत. (असे आम्हास वाटते)
- कोणतेही 'कर्म' घडून आले, की आणि त्याचा कोणता ना कोणता, (कधी ना कधी) 'परिणाम' हाही घडून येतच असतो. अर्थात या दोन्ही गोष्टींचा संबंध असल्याचेच दिसून येते.
14 Feb 2024 - 5:58 pm | टर्मीनेटर
+१०००
मौत को तो युहीं बदनाम करतें हैं लोग... तकलीफ तो जिंदगी देती हैं!
- संत आयुषमान ठाकुर (रोनीत रॉय)
चित्रपट 'बॉस'
18 Feb 2024 - 7:53 am | कर्नलतपस्वी
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी नुसतेच शब्दांचे बहर उधळले होते.....
16 Feb 2024 - 2:45 pm | कंजूस
तोडगा असतो. बटवा सैल करा.
22 Feb 2024 - 2:40 pm | Trump
काही लोकांनी धाग्याची अगदी गटारगंगा केली आहे.
22 Feb 2024 - 9:28 pm | राघव
पुनर्जन्मा बद्दल बोलण्याचा मला तरी बुवा काही अधिकार नाही असं वाटतं.
बाकी कर्मसिद्धांता बद्दल हरिभाई ठक्कर यांचे विचार गहन आणि तर्कपूर्ण वाटले.
इच्छुकांनी जरूर वाचून बघावे - लिंक
24 Feb 2024 - 11:28 am | कॉमी
कर्म आणि फळ
अनेकदा ही विचारसरणी किती घातक आहे, हे लोकांच्या रडार खालून जाते. कर्मविपाक विचारसरणी अतिशय घातक आहे आणि अनेक रिग्रेसिव विचारांचा मुळाशी आहे. त्यात न्याय नाही, उलट जे काय होते आहे ते न्यायच समजून सरळ दिसणाऱ्या अन्यायाला जस्टिफाय करण्याचा प्रयत्न आहे. आधुनिक युगात आपण ज्याला आर्थिक, सामाजिक न्याय म्हणतो त्याच्या संपूर्ण विरोधात जाणारी ही विचारसरणी आहे. समजून घ्या -
27 Feb 2024 - 8:02 am | राघव
हे म्हणणं जरा धारिष्ट्याचं आहे. कर्मविपाकामागील हेतू बघणे महत्त्वाचे आहे.
कर्मविपाक हा स्विकृतीसाठी (Acceptance) बनलेला सिद्धांत आहे. जे आहे, जसं आहे, आपल्या पटो वा न पटो, आवडो वा न आवडो.. ते आहे आणि त्याची स्विकृती गरजेची आहे. तसे केले नाही तर माणूस केवळ चिडचिड करतच जगेल आणि मरेल.
आणि स्विकृती जरी असली तरी जी परिस्थिती आहे ती तशीच रहावी असे कर्मविपाक सांगत नाही. आहे त्यात बदल घडवण्यासाठी हा सिद्धांत नाही म्हणत नाही.
काल्पनिकच असेल असं कशावरून? नसूही शकेल की. केवळ आपल्याला माहीत नाही, समजत नाही किंवा आठवत नाही म्हणून ती गोष्टच नाही असे गरजेचे नाही.
हे पटत नाही. माझ्या पूर्वसुकृताचे पुरावे शोधत बसण्यात माझा वर्तमानकाळ आणि पर्यायानं माझा भविष्यकाळ बुडतो त्याचं काय?
तसेही या धिक्कारातून केवळ असूया आणि द्वेष/तेढ हेच निर्माण होणार. त्यापेक्षा आहे त्यातून चांगलं घडवायचा संकल्प घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करणे सर्वोत्तम.
27 Feb 2024 - 9:23 am | कॉमी
फक्त स्वीकृती नाही, जस्टिफिकेशन सुद्धा. तुम्ही गरीब घरात जन्माला आला. ह्यात चिडचिड करून हातात काही लागणार नाही, परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत इतपर्यंत ठीक आहे. पण ही परिस्थिती तुमच्याच agency मुळे आली, काल्पनिक पूर्वसंचित असल्यामुळे आली हे त्या परिस्थिती चे जस्टीफिकेशन झाले. तुम्ही तुमच्या पूर्वसंचीतामुळे गरीब जन्माला येणे हा सामाजिक डिफेक्ट नसून वैश्विक न्याय आहे असे पटवण्याचा प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे.
वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्थेत कर्मविपाक सिद्धांत असेच सांगतो. त्यात बदल घडवायचा नाहीच.
ज्या गोष्टींचा पुरावा नाही त्या काल्पनिक. एखादी गोष्ट नसल्याचा पुरावा नाही म्हणून त्या गोष्टी आहेत असे होत नाही. जोवर पुरावा मिळत नाही तोवर पूर्वसंचित काल्पनिक आहे. तुम्ही जो बेसिस मांडत आहात त्याच्यात काय खरे काय खोटे तपासण्याची काहीही सोय नाही. काहीही खरे असू शकते, पुरावा गरजेचा नाही.
एक सेकंद केवळ लागतो. पुरावा आहे का ? असे स्वतःला विचारायचे. उत्तर -नाही. संपला विषय. वर्तमान आणि भविष्य बुडत नाही.
द्वेष आणि तेढ कशी काय ? एक चुकीचा विश्वास जर सगळे बाळगत असतील तर त्याबद्दल योग्य तो विचार करून विश्वास काढून टाकण्यात द्वेष आणि तेढ कुठून तयार होईल ? धिक्कार त्या विचारांचा करायचा असे सुचवत होतो.
उलट असे विचार अजूनही जिवंत आहेत त्यामुळे समाजात तेढ आणि द्वेष आहेत. ही गळवे मोकळी केली तर उलट द्वेष आणि तेढ किमान ह्या बाबत तरी कमी होईल.
27 Feb 2024 - 5:40 pm | राघव
बरं. पुर्वी लोकं असंच धरुन चालत असं गृहित धरू. ते चूक आहे असं सरळ सरळ दिसतं. मग आताही तेच करणार काय? वाद घालत बसून त्यातनं चांगल्यात चांगलं निष्पन्न काय म्हणता येईल? कर्मविपाक सिद्धांत चूक, इतकेच. इतके होऊनही त्यामुळे माणसाची परिस्थिती बदलेल काय? त्यासाठीचे प्रयत्न वेगळे लागणारच ना?
माझं इतकंच म्हणणं आहे की कर्मविपाक बरोबर का चूक या वादात न पडता, आहे त्यातून चांगलं घडवण्याचं कर्म करणं जास्त गरजेचं आहे.
इतके ते सोपे नाही. पण त्यावर वाद घालून उपयोगच नाही कारण पुर्वसुकृत शोधत बसणे हेच मुळात चूक आहे.
एखाद्याचं आयुष्य चांगलं आणि दुसऱ्याचं वाईट याचं कारण जर सांगताच येणार नसेल, तर मग ज्याच्या आयुष्य वाईट तो दुसऱ्याच्या आयुष्याकडे बघेल तेव्हा असूया (आणि त्यातूनच पुढे उत्पन्न होऊ शकणारी तेढ) कशी येणार नाही?
पुन्हा सांगतो, कोणताही सिद्धांत चूक वा बरोबर हे मांडत बसल्यानं अडचणी सुटत नाहीत. आधीच्या चुका ओळखण्यापुरतीच त्यांची गरज खरेतर, पण ते तेवढ्यापुरता मर्यादित राहत नाहीत.
भविष्य नीट होण्यासाठी भूतकाळातून शिकून वर्तमानात चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करणं हे ठीक. यापलिकडे यावर मांडण्यासाठी माझ्याकडे काही नाही. त्यामुळे आता थांबतो.
27 Feb 2024 - 9:18 pm | कॉमी
बरोबर, परिस्थिती अशी काही बदलणार नाही. पण ही थियरी कशी चुकीची आहे हे लक्षात आल्यावर जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगलाच बदलेल.
27 Feb 2024 - 7:58 pm | नठ्यारा
कॉमी,
या विधानाशी पार असहमत आहे. हे परिस्थितीचं समर्थन नाही. होऊही शकंत नाही. ते केवळ स्पष्टीकरण आहे. माझ्यावर झालेला अन्याय हा इतरांवर अन्याय करायचा परवाना नव्हे, याचं भान राखण्यासाठी निर्माण केलेली सोय आहे. ती सोय केवळ त्याच कामासाठी वापरायला हवी. परिस्थितीच्या समर्थनासाठी तिचा वापर वर्ज्य आहे.
-नाठाळ नठ्या
27 Feb 2024 - 8:18 pm | कॉमी
एखादा माणूस तुरुंगात आहे. तो त्याच्या पूर्व गुन्ह्यांमुळे तुरुंगात आहे - हे विधान तो माणूस तुरुंगात असण्याला जस्टिफाय करत आहे. त्याने गुन्हा केला म्हणून तो तुरुंगात आहे हे त्या व्यक्तीच्या तुरुंगात असण्याचे समर्थन आहे.
फरक इतकाच की पूर्व गुन्हे कोर्टात सिद्ध व्हावे लागतात. इथे तसा काही विषय नाही, उलट मागून निष्कर्ष काढला जातो, माणूस तुरुंगात आहे म्हणजे त्याने गुन्हा केला असलाच पाहिजे.
हे लॉजिक जेल बाबत चालू शकेल कारण की गुन्हा घडला आहे का, तो त्यानेच केला आहे का हे बघण्यासाठी एक व्यवस्था आपण तयार केली आहे. जर नवीन पुरावे मिळाले तर माणूस जेल मधून बाहेर पण येतो. कर्मविपाक पूर्णपणे काल्पनिक आधारावर आहे. पूर्वसंचित कर्म हेच मुळात काल्पनिक आहे त्यामुळे ते तपासण्यासाठी असलेली यंत्रणा वैगरे तर आणखी दूर.
27 Feb 2024 - 10:35 pm | नठ्यारा
कॉमी,
रोचक विधान आहे. समजा पोलिसी तपास झाल्याखेरीज न्यायालयात गुन्हा शाबीत होणारा नसेल. तर पोलिसी तपासातही संशयित गुन्हेगार आहे हे गृहीत धरूनंच तपास करावा लागतो. त्याच न्यायाने कोण्या माणसाने त्याच्यावरील ओढवलेला अनावस्था प्रसंगासाठी कर्मविपाकास गृहीत धरलं तर काय बिघडलं?
कर्मविपाकास गृहीत धरून स्वस्थ बसायचं नाहीये. परिस्थिती पालटण्यासाठी प्रयत्न तर करावे लागतातच.
-नाठाळ नठ्या
28 Feb 2024 - 6:57 am | कॉमी
तपास वेगळा आणि जजमेंट वेगळे. तुमच्या कर्मविपाक थियरी मध्ये आधी परिस्थिती येते (जजमेंट) आणि मग परिस्थिती अनुकूल संचित असणार असा उलटा निष्कर्ष काढला जातो.
28 Feb 2024 - 7:03 pm | नठ्यारा
अंदाज ( जजमेंट ) बांधल्याशिवाय तपास पुढे सरकू शकंत नाही.
आज असंख्य लोकांना देवतांचा जप केल्याने व्यावहारिक अडचणी दूर झाल्याचे अनुभव आले आहेत. कर्मसिद्धांताशिवाय त्यांचं स्पष्टीकरण अशक्य आहे.
-नाठाळ नठ्या
28 Feb 2024 - 7:24 pm | कॉमी
अंदाज बांधणे वेगळे. कर्मविपाकात अंदाज बांधला जात नाही, तर जी परिस्थिती आहे तो निवाडा आहे, पूर्व कर्मांचा.
बास. शब्द छळ करण्यात रस नाही. माझा मुद्दा पुरेसा क्लियर आहे. तुमची पेटंट स्टाईल आहे वाचून मनाजोगता अर्थ काढण्याची, पुढच्याला अर्थ काय अभिप्रेत आहे ह्याकडे साफ दुर्लक्ष करून.
28 Feb 2024 - 8:36 pm | नठ्यारा
तुम्हांस जो अर्थ अभिप्रेत आहे तो मला अभिप्रेत नाही. त्यामुळे मी देखील थांबतो. तुम्ही दाखवलेल्या समजूतदारपणाबद्दल आभार ! :-)
-ना.न.
28 Feb 2024 - 10:57 am | अहिरावण
हुश्शार लोकांची हुश्शार चर्चा.
काही घंटा कळत नाही कोण योग्य कोण अयोग्य.
सालं पुर्वजन्मातलं पापच आड येतंय.
1 Mar 2024 - 9:09 pm | मुक्त विहारि
अगदी अगदी...
काल आमच्या बाबा महाराज डोंबोलीकर यांना हाच प्रश्न विचारला.
बाबा महाराज म्हणाले की, उत्तम कार्य केले की उत्तम पेय मिळते.
'मुखी कुणाच्या सिंगल माल्ट..
कुणा मुखी पहिली धार."
त्यामुळे हातात आलेले पेय, मुकाट प्यायचे.
हाती कुठलेही पेय असो, स्वर्गसुख हे ठरलेलेच.
तस्मात्, जास्त विचार न करता, आलेला क्षण आनंदाने जगा.
------
त्यामुळे आम्ही पण मध्यमवर्गीय असल्याने, बार्ली वॉटर पितो...
28 Feb 2024 - 5:47 pm | स्वधर्म
धार्मिक ग्रंथातील कर्मविपाक सिध्दांत हा मानवी ज्ञानाची व आयुर्ष्याची मर्यादा लक्षात घेता पडताळून पाहता येत नाही. सबब त्याविषयी आज रोजी कोणीही काहीही बोलले तरी त्यावर ठाम विश्वास ठेवणे शक्य नाही. प्रश्न फक्त इतकाच आहे, की त्यावरील विश्वासामुळे समाजात काय घडले व घडत आहे. वर्णाश्रम व्यवस्था टिकून रहावी, लोकांनी आपआपली विहित कर्मेच करत रहावीत व उतरंडीच्या अन्यायकारक समाजव्यवस्थेशी लढण्याचा विचारही त्यांच्या मनात येऊच नये, यासाठी कर्मविपाक सिध्दांताचा प्रचंड उपयोग झाला. त्यामुळे हिंदू समाजाची प्रचंड हानी झाली, हे मात्र स्पष्ट आहे.
28 Feb 2024 - 7:38 pm | कॉमी
+१
28 Feb 2024 - 8:35 pm | नठ्यारा
अन्यायकारक उतरंड हा काय प्रकार आहे ? आणि तिचा वर्णाश्रमाशी काय संबंध ? विहित कर्मे म्हणजे ज्यातून आत्म्याचं हित होतं अशी कर्मे. ती करायलाच हवीत. ती करायची नसतील तर आळशीपणा गळ्यांत पडेल.
-नाठाळ नठ्या
29 Feb 2024 - 9:26 pm | स्वधर्म
अन्यायकारक उतरंड म्हणजे वर्णव्यवस्था म्हणायचे होते आणि विहित कर्मे म्हणजे प्रत्येकाला आपआपल्या वर्णाप्रमाणे करावयाची कर्मे. वैदिक काळात हीच समाजव्यवस्था होती. मी का म्हणून ही हीन (समजली जाणारी) कामे करायची आणि मला ज्ञानाचा, लढाई करण्याचा अगर व्यापार करण्याचा का अधिकार नाही? हे प्रश्न शूद्र वर्णात जन्मलेल्या व्यक्तीला पडून तो या व्यवस्थेशी भांडायला उठेल ना! ते होऊ नये म्हणून त्याला पूर्वजन्मीच्या कर्मामुळे तुला हा वर्ण मिळाला व म्हणून तुला क्षमता असली तरी दुसरी कामे करण्याचा अधिकार नाही हे समजावणे, कर्मसिध्दांत समाजात सर्वमान्य असल्यामुळे शक्य झाले. हेच उलट पध्दतीने ब्राम्हण वर्णाच्या बाबतीतही झाले असणार. त्याला समजा लढण्याची किंवा व्यापार करण्याची आवड व क्षमता असली तरी काम ते केले तर हीन समजले जाऊ अशी भिती. परकीय मुघल व इंग्रज आल्यावर लढायला आपल्याकडचे फक्त १०% क्षत्रिय! म्हणून त्यांनी कधीही आपल्या धर्मव्यवस्थेत (वर्णव्यवस्था, कर्मसिध्दांत इ.) ढवळाढवळ केली नाही, व त्यामुळेच ते अनेक शतके आपल्यावर राज्य करू शकले. हे आपल्या समाजाचे फार मोठे नुकसान झाले व अजूनही होत आहे.
29 Feb 2024 - 8:14 am | गवि
जर पूर्वसंचित, पूर्वकर्म यांनुसार प्रत्येक व्यक्तीला फळ मिळणारच असेल तर मग पोलीस, न्यायव्यवस्था, तुरुंग, अटक, फाशी असल्या भानगडी निर्माण करून मनुष्य त्यात ढवळाढवळ कशाला करतोय ? ;-)
कॉमी यांची मांडणी अगदी योग्य आहे. आपण जे काही करतो त्याचे शास्त्रीय परिणाम (भौतिक, रासायनिक, जैविक इ) वगळता नैतिक परिणाम किंवा दीर्घकाळ हिशोब ठेवून कोण्या नियतीने त्याचे बक्षीस अथवा शिक्षा, चालू अथवा पुढील जन्मात बहाल करणे .. हे सर्व तर्कदुष्ट असण्याचे मुख्य कारण म्हणजे.. जगाचे (विश्वाचे) रहाट गाडगे चालू ठेवण्यासाठी हे सर्व सव्यापसव्य करण्याची निसर्गाला काही गरज असल्याचे दिसत नाही. कोणी ईश्वर, नियती, निसर्ग किंवा शक्ती असेलच तर तिला काय पडलीय ? नोंदवही ठेवा, फळ द्या. काय फरक पडतो ? कोणी कशाला असला उपद्व्याप करेल?
आपण चांगले काही केले की समाधान देणारा, आणि वाईट काही केले की मनाला कुरतडणारा जो कोणी असतो तो म्हणजे आपणच. आपल्याच आत असतो तो. मानो या न मानो.
29 Feb 2024 - 8:37 pm | नठ्यारा
गवि,
विनोदाचा भाग सोडला तर हा बळी तो कान पिळी या नियमास उत्तेजन देणारा संदेश वाटतो. तुम्ही उपरोधाने लिहिलंय ते कळतंय.
पण नेमक्या याच युक्तिवादाचा आधार घेऊन अनेक नरपशूंनी असंख्य निरपराध्यांवर क्रूर अत्याचार केले आहेत. द्वेष्टे या कथेतला उमराव दु:खाच्या भरात अशीच काहीशी मांडणी करतो आहे.
-नाठाळ नठ्या
29 Feb 2024 - 11:56 am | सुबोध खरे
हे सर्व सिद्धांत आणि काथ्याकूट मला समजत नाही आणि त्याच्यात फारसा रस ही नाही.
पण सिगरेट प्यायल्याने कर्करोग होतो हा कार्यकारण भाव सोपा आहे पण "जीवनभर मैने एक भी सिगरेट नही पिया ना कभी तंबाखू का सेवन किया फार मुझे ये कॅन्सर क्यूँ हुआ हे प्रश्न विचारणाऱ्या रुग्णाला समर्पक उत्तर देणे कठीण आहे.
स्तनाच्या कर्करोगाने नुकतीच माझी पुतणी २५ व्या वर्षी निवर्तली. पैसा असूनही आणि जगातील उत्तमात उत्तम उपचार करूनही काहीही उपयोग झाला नाही. अशा वेळेस प्राक्तन,दुर्दैव सोडून काय सांगणार?
कालच चार वेळेस गर्भपात झाल्यानंतर गरोदर राहिलेल्या मुलीला पाचव्यांदा गर्भ आतच दगावला आहे हे सांगणे आणि तिला ते स्वीकारणे किती कठीण आहे हे दुरून पाहणाऱ्याला समजत नाही. तिच्यात आणि नवर्यात काहीही दोष सकृतदर्शनी दिसत नाही( सर्व उपलब्ध तपासण्या केल्यावरही). random bad luck सोडल्यास कोणतेही कारण देता येत नाही.
असं माझ्याच बाबतीत का घडतंय? आमचं पुण्य कुठे कमी पडतंय? असा टाहो फोडणाऱ्या मुलीला कसं समजवायचं.
प्रत्येक गोष्टीत शास्त्र कामास येत नाही. तेथे अध्यात्मच थोडं फार उपयोगी येतं. ईश्वरेच्छा किंवा पूर्वकर्म हेच सांगावं लागतं. कोणतेही ठोस कारण देता येत नाही.
अगतिक झालेल्या मानवी मनावर फुंकर घालण्यासाठी अध्यात्माचाच आधार घ्यावा लागतो.
फुंकर घातल्याने जखम बरी होण्यात कोणताही हातभार लागत नसला तरी जखमी माणसाच्या मनाचे समाधान तर होते.
29 Feb 2024 - 1:32 pm | अहिरावण
ज्यांना नाही होत जखमा कधी त्यांच्याच कडून दुस-यच्या दु:खाला दिलासा देणा-या गोष्टींची खिल्ली उडवली जाते.
प्रत्येक गोष्ट तरतमभावात बसवण्याचा अट्टाहास असलेल्या लोकांना समजावणे गैर असते.
आपण फुंकर घालून दिलासा द्यावा जसे जमेल तसे.
29 Feb 2024 - 2:36 pm | चौथा कोनाडा
यू सेड इट !
१०१% सहमत !
29 Feb 2024 - 7:26 pm | मूकवाचक
+१
29 Feb 2024 - 7:34 pm | कॉमी
पाचव्यांदा गर्भपात झालेल्या मुलीला असे सांगणे कितपत योग्य,की हा सगळा पूर्वसंचिताचा खेळ आहे म्हणून ?
तात्पुरते "का" ह्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
पण नंतर दुःखातून बाहेर आल्यावर पुन्हा तोच विचार केल्यावर मनावर काय ओरखडा उमटेल ? दोन पर्याय दिले आहेत वरील प्रतिसादात :
१. ईश्वरी इच्छा - ईश्वराने एकदा नाही दोनदा नाही तब्बल पाच वेळा आपल्या गर्भाला मारले, ही कल्पना मनःशांती देणारी असेल का ? त्यामुळे ईश्वराबाबत प्रचंड कडवट होण्याची शक्यता नाही का ? आणि, इश्वरेच्छा हे सुद्धा "अज्ञात" म्हणण्याचा दुसरा मार्ग आहे. ईश्वराची अशी इच्छा का झाली ह्याला तरी कुठे उत्तर आहे ? मग वैद्यकीय गुंतागुंत जी समजावून सांगता येत नाही, ते एक अज्ञात आणि ईश्वर इच्छा हे दुसरे एक अज्ञात. निर्मळ अज्ञाताऐवजी कोणावर तरी दोष टाकणारे अज्ञात मानसिकदृष्ट्या मदत करणारे ठरेल काय ?
२. पूर्वकर्म - आपल्या काही कृती मुळेच आपले गर्भ गेले हे खरोखरी त्या व्यक्तीने मान्य केले तर त्याचे काय मानसिक परिणाम होतील ह्याचा प्रत्येकाने विचार करून पहावा.
ह्याबाबत एक अत्यंत भयाण बंगाली लघुकथा आठवते. सारांश लिहिलेला आत्ताच्या चर्चेच्या तुलनेसाठी पण खोडून टाकला. त्यामानाने सौम्य उदाहरण अमीर खानचा तलाश सिनेमा. अमीर खानचा मुलगा बोटिंग अपघातात बुडून मरतो. अमीर खान रात्रभर आपल्या हालचालींमध्ये कुठे उशीर झाला ह्याचा विचार करत असतो. तर असेच कोणाला तुमच्या पूर्व कर्मांची चूक आहे असे सांगणे long term मध्ये कितपत सांत्वनकारी ठरेल ? ह्यातून फुकाचा अपराधबोध तयार होईल त्याचे काय ?
अर्थात, डॉक्टर साहेब त्यांच्या प्रोफेशनल अनुभवातून बोलत आहेत. माझ्यासारख्या अज्ञानी लोकांनी ह्याबाबत प्रश्न करणे चुकीचे होईल. हे फक्त माझे विचार मांडले आहेत.
29 Feb 2024 - 7:52 pm | गवि
+१
मुळात पराकोटीच्या दुःखाच्या क्षणी कोणी ही तात्विक चर्चा करतच नाही. विचारपद्धती ही सतत विकसित होत जाणारी एक learning method आहे.
वस्तुनिष्ठ विचारपद्धती ही देखील एक जीवन पद्धती असू शकते, आणि पराकोटीच्या दुःखद प्रसंगी देखील त्यातून तरून जाण्यास ती सहाय्यभूत होऊ शकते, किमान अधिक त्रासदायक किंवा वंचना करणारी ठरत नाही अशी कदाचित, ..कदाचित .. शक्यता काही जणांच्या बाबतीत असू शकेल हे साधारणतः अमान्य का ठरावे हे कोडे आहे. वस्तुनिष्ठ विचारपद्धती बाळगणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात विदीर्ण करू पाहणारे दुःख बघितलेच नाही, तो कोरडा पाषाण जणू, असेच जगाला वाटत असावे का?
29 Feb 2024 - 9:59 pm | कॉमी
+१
29 Feb 2024 - 11:05 pm | चित्रगुप्त
कोणताही 'विचार' ( - विचारपद्धती) मुळात 'वस्तुनिष्ठ' असू शकतो का ?
-- मज निरोपावे.
'विचार' म्हटला की 'मन' आलेच, आणि मन हे 'संस्कारित'(च) असते.
1 Mar 2024 - 11:46 am | सुबोध खरे
ईश्वराने एकदा नाही दोनदा नाही तब्बल पाच वेळा आपल्या गर्भाला मारले, ही कल्पना मनःशांती देणारी असेल का
आपण म्हणत आहात त्यातील अनेक गोष्टींचे माझ्या कडे उत्तर नाही.
सामान्य माणसाला टोकाचे बुद्धिप्रामाण्यवादी होणे मानसिक दृष्ट्या झेपणारे नसते.
माझ्याच वाट्याला हे RANDOM BADLUCK का आले याचे उत्तर डॉक्टरांकडेच कशाला शास्त्रज्ञ बुद्धिवंत कुणाकडे नसतेच.
अनेक टोकाचे बुद्धिप्रामाण्यवादी स्वतःचा मृत्यू समोर आल्यावर भीतीने आस्तिक होताना पाहिलेले आहेत.
हृदयाच्या बायपासचा शल्यक्रिया झाल्यावर छातीत पाणी होऊन श्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्यावर एक टोकाचे नास्तिक असणारे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्व तर्हेचे भस्म उदि अंगारा लावून घेत होते आणि कालपर्यंत आमच्यासारख्या डॉक्टरांना कस्पटासमान लेखत होते ते आमच्या पुढे हात जोडून विनवणी करत होते.
नाही देखील पंचानना
तोंवरि जंबुक करी गर्जना.
मृत्यू समोर ठाकल्यावर माणसांचा सर्व आवेश गळून पडतो.
विकोपाला गेलेल्या कर्करोगी माणसाला आपला आजार शल्यक्रिया करण्याच्या पलीकडे गेलेला आहे असे सांगण्यापेक्षा आपल्याला शल्यक्रियेची गरज नाही, औषधी उपचार करू( केमोथेरपी) हे सांगणे जास्त सोपे असते. मग ते संपूर्ण सत्य नसले तरी.
हातपाय गाळून बसलेल्या माणसाचे शरीर सुद्धा उपचारांना नीट साथ देत नाही हा सार्वत्रिक अनुभव आहे.
परमेश्वरावर आणि डॉक्टरांवर भरोसा ठेवा, तुमचा सगळं नीट होईल हे माणसाला दिलासा देऊन उपचाराला तयार करते मग ते असत्य असले तरी ही उपयुक्त असू शकते.
तुमचा रुग्ण बरा होईल कि नाही हे मला माहिती नाही ते अज्ञात आहे हे उत्तर कितीही सत्य असले तरी रुग्णाला किंवा जवळच्या नातेवाईकाला पचणारे असेल का?
रोज मृत्यूला सामोरे जाणारे रुग्ण पाहणारे डॉक्टर आस्तिक नसतील पण नास्तिकही नसतात. याचे कारण श्रद्धा (अंधश्रद्धा) माणसाला बळ देते हे त्यांनी पाहिलेले असते.
6 Mar 2024 - 9:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टर माणसंच अशी देवाळु व्हायला लागली तर अवघड आहे.
-दिलीप बिरुटे
6 Mar 2024 - 10:14 am | अहिरावण
तुम्ही नास्तिक डॉक्टर शोधा... इथे नाही मिळाला तर अम्रेकीत मिळेल...
6 Mar 2024 - 11:09 am | चित्रगुप्त
मानवी जीवनातली, किंबहुना अखिल विश्वातली प्रत्येक लहानमोठी घटना ही असंख्य निसर्गनियम-निसर्गचक्रांच्या परिणामी घडून येत असते. (अमूक एका स्थळी-क्षणी, हे नियम एकत्रितपणे येणे यालाच 'योगायोग' असेही म्हणता येईल)
-- या नियमांपैकी काही नियम मनुष्याला (निरिक्षण, अनुमान, शास्त्रीय कसोट्या इ. तून) ठाऊक झालेले असले तरी त्याखेरीज असंख्य नियम हे नेहमीच मानवी आकलनापलिकडले राहतील. या अज्ञात निसर्गनियमांच्या परिणामी घडून येणार्या घटनांना सुटसुटीत शब्द 'देवाची' इच्छा/लीला/करणी ... असा आहे असे वाटते.
-- अर्थात हा 'देव' म्हणजे राम, कृष्ण, महादेव, खुदा, गॉड, वेताळ, खंडोबा, बहिरोबा .... वगैरेपैकी नाही, तसेच त्याचा विविध कर्मकांडे, उपासना, श्रद्धा, प्रार्थना, बाप्तिस्मा, व्रतवैकल्ये, नमाज, स्तोत्रे, आरत्या, पूजा इत्यादिकांशीही काहीही संबंध नाही. 'देव' या शब्दाऐवजी 'नियती' 'कपाळावर लिहीलेले' वगैरे शब्दप्रयोगही प्रचलित आहेत.
या अर्थाने बघता डॉक्टर किंवा कोणीही आस्तिक-नास्तिक व्यक्ती सुद्धा 'देवाळु' असू शकते. असो.
6 Mar 2024 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या मतांचा आदर आहे.
-दिलीप बिरुटे
6 Mar 2024 - 12:55 pm | चौथा कोनाडा
@ सुबोध खरे,
अगदी यथोचित लिहिले आहे ! १०१+ तंतोतंत सहमत !
या वरून एक कविता आठवली :
(या चर्चेशी संबधित असावी अ थ वा नसावीही :
एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा खरं तर गाभाऱ्यातच भर पडत असते
कि कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना
पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्यायीची
एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा होते निर्माण गरज
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची
एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा कोऱ्या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या जत्रा..
कोणीतरी स्वतःचे ओझे स्वतःच्याच पायावर
सांभाळत असल्याचे समाधान लागते देवालाच
म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित
पण मिळते आकंठ समाधान एक सहकारी लाभल्याचे
देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देऊन
बाहेर तात्कळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, ‘दर्शन देत जा अधून मधून..
तुमचा विश्वास नसेल आमच्यावर पण आमचा तर आहे ना!’
देवळाबाहेर थांबलेला एक खराखुरा नास्तिक
कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे!
- कवि तुम्ही ओळखालच
या कवितेचे प्रत्यक्ष सादरीकरण बहारदार असते.
29 Feb 2024 - 9:31 pm | चित्रगुप्त
https://youtu.be/WP7fJ9Iw3J8?si=qxKbSA4y6GHB89OK
इथे चाललेल्या चर्चेशी एका वेगळ्या दृष्टीने संबंधित असलेला वरील विडीयो अवश्य बघावा.
29 Feb 2024 - 11:26 pm | नठ्यारा
स्वधर्म,
तुमचा इथला संदेश वाचला. एकेक विधानं पाहूया.
१.
हे कुठेही लिहिलेलं वा सिद्ध केलेलं नाही. जुलुमी परकीय राजवटींच्या विरुद्ध सतत उठाव होत आलेले आहेत. बंदा बैरागी तर संन्याशी असूनही हाती शस्त्र धरता झाला.
२.
परकीयांनी अनेक शतके भारतावर राज्य केले, हा निव्वळ गैरसमज आहे. संपूर्ण भारत कधीही कुणाच्याही एक्छात्री अंमलाखाली नव्हता. अगदी सर्वोच्च केंद्रीभूत इंग्रजी सत्तेच्या उत्कर्षकाळातही असंख्य संस्थाने अस्तित्वात होती. त्यांच्यात १/४ जनता व १/३ प्रदेश समाविष्ट होता.
बाकी, कर्मसिद्धांतात ढवळाढवळ करता येत नसते. आणि धर्मव्यवस्था म्हणजे कर्मसिद्धांत नव्हे. हा सिद्धांत अधर्माने वागणाऱ्यासही लागू पडतो. आपल्या समाजाचं नुकसान झालं ते धर्म न पाळल्याने.
३.
वर्ण म्हणजे कल. एखाद्याला ज्या कामाची आवड असेल तो त्याचा वर्ण होय. आवडतं काम करायला मिळणं ही चैन आहे. हिचा अन्यायाशी कसलाही संबंध नाही. वर्णव्यवस्था अन्यायकारक आहे ही इंग्रजी भूलथाप आहे.
४.
वैदिक धर्मानुसार कोणतंही काम हीन नाही. अमुकेक काम हीन आहे हे तुम्ही स्वत:च ठरवलं आहे. याबाबत भंगी समाजाचं उदाहरण ठाशीव आहे. हिंदू राजपुतांचा मानभंग करण्यासाठी म्हणून जेत्या परकीयांनी त्यांना डोक्यावरून मैला वाहून न्यायचं काम करायला लावलं. अशा रीतीने त्या क्षत्रियांचा मानभंग झाला म्हणून त्यांना जुलुमी परकीयांनी भंगी अशी संज्ञा दिली. तरीही त्या शूर राजपुतांनी हिंदू धर्म सोडला नाही. त्यांची धर्माप्रती निष्ठा अभंग व अविचल राहिली म्हणून मी त्यांना अभंगी म्हणतो. वास्तविक सफाई कामगारांना भंगी म्हणायची काहीच गरज नाहीये.
५.
करा की हवा तेव्हढा व्यापार आणि मिळवा की हवं तेव्हढं ज्ञान. कोणी अडवलंय? असं कोणी कोणाला अडवल्याचं काहीतरी उदाहरण आहे का?
६.
शूद्र वर्ण आहे. जन्म नाही.
७.
या अर्थाचा हिंदू धर्मग्रंथात वा इतर पुस्तकांत स्पष्ट उल्लेख आहे का? याउलट महाभारतात युधिष्ठिरास धर्मव्याध या खाटीकाकडून धर्मरहस्य जाणून घ्यायचा उपदेश कोण्या एका ऋषींनी केला. त्याप्रमाणे युधिष्ठिराने खाटकाकडून धर्माची शिकवण घेतली.
८.
असे कितीतरी पोटार्थी जन्मब्राह्मण युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या काळी होते. त्यांना शेतकीचे ब्राह्मण म्हणंत. अशांना त्याने मुख्य वेदीच्या जवळपासही फिरकू दिलं नाही. आणि हेच योग्य आहे.
असो.
धर्म, कर्मसिद्धांत व वर्णव्यवस्था याविषयी गैरसमज जास्त आणि ठोस माहिती कमी आहे. प्रत्यक्षांत परिस्थिती फार वेगळी आहे.
-नाठाळ नठ्या
29 Feb 2024 - 11:34 pm | कॉमी
जवळपास सगळे चुकीचे लिहिले आहे. पुढे मागे वेळ मिळेल तेव्हा ह्यावर लेख टाकतो.
1 Mar 2024 - 7:09 pm | स्वधर्म
नठ्यारा, असल्या चर्चांमधून मला कळलं ते असं की धर्म, कर्मसिद्धांत व वर्णव्यवस्था याविषयीची व्यक्तीची मते ही ती व्यक्ती कोणत्या पार्श्वभूमीतून आली आहे, यावर बव्हंशी अवलंबून असतात. ती सहसा बदलू शकत नाहीत व पुढे जाऊन चर्चेत थांबावे लागते. सहसा व्यक्तीस आहे तीच मते आजूबाजूचा विदा घेऊन बळकट करण्याचा कल असतो. पूर्ण वस्तुनिष्ठ दृष्टीकोन बहुधा कोणालाच घेता येत नाही, असे चित्रगुप्त यांनी वर म्हटले आहेच. पण नविन माहिती आली तर आपले आजवरचे मत दुरूस्त करण्याचा लवचिकपण फार फार थोडे लोक दाखवतात, असा अनुभव आहे.
मी गीता वाचणे, समजून घेणे, चिंतन करणे व आचरणात आणण्णाचा प्रयत्न करणे, हे केले आहे. गीतेच्या सरांना खूप प्रश्न विचारायचो. शेवटी काही कल्पना (उदा. पुनर्जन्म) ‘सबजेक्ट थू व्हेरिफिकेशन’ मान्य केल्याशिवाय कर्मसिध्दांत पटू शकत नाही आणि आपण तो व्हेरिफाय करू शकत नाही. इथे मला थांबावे लागले. त्यानंतरही डॉ. आंबेडकर यांचे अनहिलेशन ऑफ कास्ट वाचण्याएवढे मनाचे दार किलकिले राहिले. त्यांनी वर्णाबद्दल लिहिले असून ते समाजात असू का शकत नाहीत याचे बिनतोड उत्तर दिले आहे.
लोक काय मानतात यापेक्षा कसे जगतात हे जास्त महत्वाचे आणि आपण समाज म्हणून कसे जगलो हे आपल्या समोर आहेच. मग काय, सुटलो तावडीतून धर्म, कर्मसिद्धांत व वर्णव्यवस्था यांच्या. पण तुमचे मत मात्र असेच राहिल असे वाटते. त्याचा आदर आहे.
1 Mar 2024 - 7:56 pm | नठ्यारा
स्वधर्म,
तुम्हांस एक थेट प्रश्न विचारतो. जर पुनर्जन्माचा पुरावा दिला तर तुम्ही कर्मसिद्धांत मानाल काय? हो म्हणायची सक्ती नाही.
-नाठाळ नठ्या
1 Mar 2024 - 8:32 pm | स्वधर्म
ते तुंम्ही पुरावा म्हणून काय देता त्यावर अवलंबून आहे. अन तो पुरावा पुरावा ठरला नाही, तर तुंम्ही तुमचे मत बदलून या श्रध्दांचा त्याग करणार का? माझी साधना/ पुण्याई/ गुरूभक्ती कमी पडल्यामुळे मला पडताळा येत नाही अशी बहुतेक श्रध्दाळूंची समजूत करून दिलेली असते, म्हणून विचारतो.
समजा मला मी स्वत: मागच्या जन्मी कोण होतो व काय कर्मे केली होती हे जाणता आले व त्यानुसार सध्याच्या जन्मातील फळांची संगती लावता आली, तर जरूर विश्वास ठेवता येईल. कुठलातरी ग्रंथ, कुणाचा तरी यू ट्यूब व्हिडिओ ह्याला पुरावा मानता येणार नाही.
1 Mar 2024 - 8:43 pm | कॉमी
1 Mar 2024 - 9:55 pm | नठ्यारा
स्वधर्म,
तुम्ही म्हणता की तुम्हाला मागील जन्म आठवले तर विश्वास ठेवता येईल. तसे कोणालाच आठवंत नसतात. तरीपण काही विशिष्ट व्यक्तींना ते आठवतात. त्यांचा पुनर्जन्म झाला आहे यावर तुम्ही विश्वास ठेवणार का?
-नाठाळ नठ्या
2 Mar 2024 - 7:52 pm | स्वधर्म
>> अन तो पुरावा पुरावा ठरला नाही, तर तुंम्ही तुमचे मत बदलून या श्रध्दांचा त्याग करणार का?
याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? ते सांगा ना आधी.
असो. मी आधी म्हटल्याप्रमाणे पुनर्जन्म ही संकल्पना 'अनव्हेरिफाएबल' न पडताळता येणार्या आहेत. तुंम्ही जर अशा लोकांचे केवळ 'सांगणे' हा पुरावा मानत असाल, तर नाही. त्याची पडताळणी कशी करायची याची व्यक्तीनिरपेक्ष, सर्वांना अवलंबून बघता येणारी पध्दत तुंम्हालाच सुचवावी लागेल. असे करून जर एकच निष्कर्ष आला, तर मग विश्वास ठेवण्याचा विचार करता येईल. पण ते पुढे, आधी वरील प्रश्नाचे उत्तर द्या.
3 Mar 2024 - 7:51 pm | नठ्यारा
स्वधर्म,
जर पुरावा नसेल तर मी माझ्या श्रद्धांचा त्याग करायला तयार आहे. पण ती वेळ येणार नाही कारण की पुरावा सज्जड आहे.
तुम्ही पुनर्जन्म अपडताळणीय म्हणता हे पार चुकीचं आहे. पुनर्जन्माच्या अनेक घटना डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांनी आपल्या पुस्तकांत चर्चिल्या आहेत. पुस्तकाविषयी माहिती इथे आहे : https://www.amazon.co.uk/Children-Remember-Previous-Lives-Reincarnation-...
पडताळणी करूनंच पुनर्जन्म आहे हे सिद्ध केलेलं आहे. अनेक प्रसंगांत सदर बालकाच्या कथनावरून पूर्वजन्मीचे नातेवाईकही शोधण्यांत आले आहेत. आणि त्यांनी पूर्वजन्मीच्या व्यक्तीच्या विदांची पुष्टी केलेली आहे. काही प्रसंगांत पूर्वजन्म हिंसक पद्धतीने संपुष्टात आल्याच्या खुणाही बालकाच्या अंगावर आढळल्या आहेत.
इतका भरभक्कम पुरावा असल्यावर कोण पुनर्जन्म नाकारेल?
-नाठाळ नठ्या
4 Mar 2024 - 10:14 pm | हणमंतअण्णा शंकर...
ही पुनर्जन्माची प्रक्रिया मेकॅनिकल दिसते थोडी. म्हणजे, पुनर्जन्माचे पुरावे ग्राह्य धरले तरी कर्मसिद्धांत सिद्ध होत नाही आणि इयन स्टेव्हनसन यांच्या विद्यामध्ये असा कोणताही पुरावा आढळला नाही जो कर्मसिद्धांत सिद्ध करेल.
यावर लेजली कीन यांचे एक अलिकडेच उत्तम पुस्तक आले आहे.
पुनर्जन्म आणि एकंदरित कॉस्मिक गोष्टी एकमेकांना पूरकच आहेत.
गमंत म्हणजे चरकसंहितेत एकंदरीत सेंटिनेल जीव कोण यावर बराच खल केला आहे.
या मध्ये मानस, शरीर आणि आत्मा/पुरुष या तीनही वेगवेगळ्या गोष्टी मानल्या आहेत. विषेशतः मानवी जन्माची प्रोसेस वाचताना हे लक्षात आले की पुरुष हा गर्भात मिसळतो. (का मिसळला जातो?)
नुकतेच विश्व हे लोकल आणि रियल एकाच वेळेस असू शकत नाहीत या संशोधनाच्या कर्त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला.
यावरून आपल्याला एकंदरीतच काहीही झ्याटभर सुद्धा माहित नाही असे वाटते इतके सगळे बिझार आहे.
कुछ तो गडबड है दया!
5 Mar 2024 - 9:53 am | सतिश गावडे
या पुस्तकाचा संदर्भ/दुवा देता का?
5 Mar 2024 - 4:30 pm | स्वधर्म
तुंम्ही दिलेल्या दुव्यावरून पुस्तकाची माहिती व परिक्षणे वाचली. पुस्तक चांगली भरपूर माहिती गोळा करूनच लिहिले आहे, पण परिक्षणे मात्र संमिश्र आहेत. काही लोकांना हे पुस्तक ‘रोचक’ वाटलेले आहे. काहिंनी त्याला अपूर्व योगायोगांची जंत्री म्हटले आहे तर काहिंनी सदर लेखक हे वैद्यकिय विषयातले एम. डी. आहेत का असा संशय व्यक्त केला आहे. एकूणात, हे पुस्तक हा पुनर्जन्माचा ठोस पुरावा आहे, असे मात्र मानता येणार नाही, असे वाटते. त्याचे कारण म्हणजे या पुस्तकातून पुनर्जन्म हे एक नैसर्गिक फेनॉमेननच आहे, असे सिध्द होत नाही. तो एक वेगवेगळ्या संस्कृतीत आढळणार्या ‘समजां’चा अभ्यास म्हणून फार तर समाजशास्त्रीय किंवा मानसशास्त्रीय घटितांचा अभ्यास म्हणता येईल. अर्थात, मी पुस्तक वाचले नाही, पण पुस्तकातील विभाग व परिक्षणे वाचून असे जाणवते.
समजा पुनर्जन्माची काही जैविक प्रक्रिया किंवा अगदी मानसिक प्रक्रियासुध्दा कुणाला सापडली असती, आणि लोकांना ती अनुभवून अथवा कुणा सब्जेक्टवर सिध्द करून पाहता आली असती, तर पुरावा आहे असे मानता आले असते. तुंम्ही आधीच पुनर्जन्मावर तुमच्या धार्मिक श्रध्देमुळे विश्वास ठेवत असल्यामुळे कन्फर्मेशन बायस तय़ार होऊन हे पुस्तक तुंम्हाला पुरावा वाटत असणे सहज शक्य आहे. सयामी जुळे का होतात अशासारख्या संख्याशास्त्रीय दृष्ट्या अगदी कमी आढळणार्या गोष्टीसुध्दा सिध्द करता येतात. पण ते असते हे प्रत्यक्ष दिसते, व का व कसे होते हे कुणालाही पडताळून पाहता येते. तसा काही पुरावा या पुस्तकात असल्याचे वाचक म्हणत नाहीत. कर्मविपाक कल्पना सिध्द होणे हे तर फार फार पुढचा टप्पा झाला.
कर्मविपाक कल्पना जर हे जर नैसर्गिक घटित असतं तर मानवाला इतक्या लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत त्याचा उलगडा झाला असता, असे ववाते.
4 Mar 2024 - 11:20 pm | राघव
पुरावे कदाचित ढीगभर दिले जातील आणि सरळ नाकारलेही जातील.
कोणतीही गोष्ट आपल्याला अनुभवाला आली नाही/येत नाही म्हणून ती नसतेच ही मानसिकता चुकीची आहे इतकंच.
पुनर्जन्माबद्दल मांडणारी दोन पुस्तकं आहेत. दोन्ही जबरदस्त आहेत.
अर्थात् हे कर्मविपाकाबद्दल बोलत नाहीत पण कर्मफला बद्दल बोलतात. मननीय आहेत.
मेनी मॅन्शन्स - लिंक
मेनी लाईव्ज, मेनी मास्टर्स - लिंक
नाकारायला काहीच लागत नाही. पण पटलं तर मान्य करायला खूप काही लागतं. असो.
1 Mar 2024 - 8:12 pm | Bhakti
चांगला प्रतिसाद.मलापण भारतीय तत्वज्ञान समजून घ्यायला खुप आवडतं.पण कर्मविकाप सिद्धांत आणि पुनर्जन्म आले की बुद्धीभेद होतो.सुवर्णमध्य म्हणतात तो तरी कुठवर साथ देणार?शेवटी मनाशी प्रामाणिक राहत पुढे जायला आवडतं, अवलंबले जाते.
1 Mar 2024 - 11:01 pm | चित्रगुप्त
बहुतांश लोकांना - अगदी लहान मुलांसकट - कुणी उपदेश केलेला सहसा आवडत नाही (अपवादः एकाद्याला अतिशय आदरणीय असलेल्या व्यक्तिकडे मुद्दाम उपदेश ग्रहण करायला म्हणून गेल्यावर लाभणारा उपदेश) परंतु तोच उपदेश अप्रत्यक्ष रीत्या, गोष्टींच्या स्वरूपात सांगितला गेला तर तो भावतो. उदा. इसापनीति, कथासरित्सागर, जातककथा, रामायण, महाभारत वगैरेतील कथांमधून होणारा बोध.
--- याबद्दल माझे अनुभवः माझी सुमारे चार वर्षांची नात कारमधून बाहेर जाताना पट्टा लावणे, रात्री दात घासणे वगैरे अजिबात करायला तयार नसायची. मग मी तिला अमूक नावाची एक मुलगी होती, ती पट्टा लावायची नाही, मग एक दिवस ती गाडीतून पडली, आणि तिला खायला वाघ, सिंह, मगर, कोल्हा, अजगर...... ( लांबलचक यादी) प्राणी जमा झाले आणि तिला चावू लागले, मग बाबांनी येऊन त्या प्राण्यांना हाकलून लावले, दवाखान्यात जाऊन कडू औषध घ्यावे लागले..... मग ती पट्टा लावू लागली... वगैरे लांबलचक गोष्ट सांगायचो. मग तीच गोष्ट अगदी रोज सांगावी लागायची, आणि त्यात माझी जराशी चूक झाली, की ती मला थांबवून आबा, कोल्हा राहिला.. वगैरे दुरुस्ती करायची. मात्र याचा परिणाम म्हणून ती न चुकता पट्टा लावू लागली.
-- मग दात घासण्याबदल आणखी वेगळी गोष्ट (यात दातात अडकलेले अन्न खायला रात्री खूप किडे तोंडात यायचे, आणि ते खाऊन तिथेच शी-सू करायचे त्यामुळे तोंडातून खूप घाणेरडा वास यायचा वगैरे...) रात्री लवकर झोपण्याबद्दल, पौष्टिक खाण्याबद्दल, छोट्या बहिणीला त्रास न देण्याबद्दल अश्या अनेक त्याच त्याच गोष्टी रोज सांगाव्या लागायच्या पण त्या सर्वांचा यथायोग्य परिणाम झाला. माझ्या कल्पकतेलाही अफाट कुरण लाभले.
..... अमूक एक सत्य त्याच्या निखळ स्वरूपात सांगण्यापेक्षा विविध काल्पनिक गोष्टींच्या स्वरूपात रंगवून सांगितले, तर ते अधिक परिणामकारक ठरते, या अनुभवातूनच जगभरातल्या सर्व संस्कृतींमधे विविध पौराणिक/धार्मिक कथा जन्माला आल्या असाव्यात, असे मला माझ्या अनुभवावरून तरी वाटते.
काल्पनिक साहित्य, चित्रे, गाणी वगैरेंचा जनमानसावर किती घट्ट परिणाम होत असतो याचे एक उदाहरण:
माझे लग्न झाले, तेंव्हा माझ्या सुशिक्षित बायकोची अशी समजूत होती, की राम, सीता, कृष्ण, शंकर, लक्ष्मी, सरस्वती वगैरे देव खरोखर अस्तित्वात असून ते कॅलेंडरात वगैरे दाखवतात, हुबेहूब तसेच दिसतात. मग मी सांगितले की ही सगळी चित्रकारांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे रंगवलेली चित्रे असून ती प्रिंटिंग प्रेस मधे छापली जातात. या गोष्टीचे तिला खूप आश्चर्य वाटले होते. 'रामायण' सिरीयलमधील अरूण गोविल वगैरे अभिनेत्यांना लोक देव का मानायचे याचा उलगडा यातून होतो.
माझ्या ओळखीच्या एका सुशिक्षित ख्रिस्ती माणसाची 'गॉड' हा एक पांढरी, भव्य दाढी असलेला वृद्ध असून तो आकाशात खूप उंचावर रहातो, अशी पक्की समजूत अजूनही आहे.
थोडक्यात काय, तर काल्पनिक गोष्टींना सत्य मानणारे लक्षावधी लोक सर्व काळात असतात, आणि त्यांना त्याच स्वरूपात सांगितलेले पटत असते. त्यांना कितीही समजावले तरी उपयोग होत नसतो म्हणून त्यांना पटेल, अशा स्वरूपातच सांगणे आवश्यक ठरते.
2 Mar 2024 - 3:13 pm | मुक्त विहारि
प्रतिसाद आवडला....
2 Mar 2024 - 7:55 pm | वामन देशमुख
सुविचार
"जर ईश्वर अस्तित्वात नसता, तर त्याचा शोध लावणे आवश्यक झाले असते."*
- फ्रेंच तत्त्ववेत्ता व्हॉल्टेअर
"जग हे तर्काच्या कर्कश्यतेवर चालत नसून ते व्यवहाराच्या लवचिकतेवर चालत असते."
- किरकोळ मिपाखरू वामन देशमुख
बोधकथा
"आई, मी बाहेर खेळायला जाऊ?"
"नको बाळा, बाहेर किती ऊन आहे!"
"आई, जाऊ दे नं, मला खेळायचं आहे"
"नको रे बाळा, तुला ऊन लागेल!"
"तू सारखं असंच म्हणतेस, मला खेळूच देत नाहीस! जाऊ दे नं मला."
"जा मर, पुन्हा सांगू नको मला!"
वरील "जा मर" या या शब्दप्रयोगातून, आईला आपले मूल उन्हामुळे मरून जावे असे वाटत असेल का? शब्दकोशाधारित व्याकरण तर तसे सांगते. तुम्हाला काय वाटते?
तत्वविवेचन
ईश्वर आहे की नाही, कर्मविपाक सिद्धांत खरा की खोटा, पुनर्जन्म असतो की नसतो, पाप-पुण्य, नैतिक-अनैतिक या सर्व बाबी सुजाण-अजाण विद्वानांच्या चर्चेचा भाग आहेत. जगाचे व्यवहार त्यावर चालत नाहीत. जगाचे व्यवहार लवचिक, वाजवी, मानवी संवादाधारित देवाणघेवाणीवर चालतात. युक्तिवाद तर्काच्या फूटपट्टीवरच राहून जातो, जगरहाटी मानवी भावनेला धरून पुढे चालत राहते. ईश्वरअस्तित्वाची असत्यता कदाचित तर्क सिद्ध करून दाखवेल, मानवी भावना ते मानेलच याची खात्री नाही. एखाद्या रुग्णाची बरे होण्याची शक्यता, संबंधित औषधोपचाराइतकीच त्या रुग्णाच्या मनाच्या उभारीवरदेखील अवलंबून असते. ती मनाची उभारी येण्यासाठी विज्ञानाकडे ज्ञात उपाय नाही; अध्यात्माकडे अनेक ज्ञात उपाय आहेत. मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे असे विज्ञान म्हणते, "बाबा मी तुला रोज दारू आणून देतो, पण तू आईला मारू नकोस" असे "वास्तव"मधील डेढफुट्या म्हणतो!
हे ज्याला उमगले तो नक्कीच शहाणा, ज्याला उमगले नाही तो कदाचित विद्वान किंवा अविद्वान!
संदर्भ स्पष्टीकरण
*"जर ईश्वर अस्तित्वात नसता, तर त्याचा शोध लावणे आवश्यक झाले असते" हे फ्रेंच तत्त्ववेत्ता व्हॉल्टेअरचे वाक्य आहे. "सामाजिक व्यवस्था सुसंस्कृतपणे चालण्यासाठी ईश्वराचे अस्तित्व आवश्यक आहे" या त्यांच्या व्यापक भूमिकेचा हा सार आहे. व्हॉल्टेअर हे भाषण स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य यांचे पुरस्कर्ते होते व धर्मकारण-राजकारण वेगवेगळे असावे या मताचे होते!
5 Mar 2024 - 7:39 am | Bhakti
पाप एक भास आहे,एखादी गोष्ट एकासाठी सकारात्मक तर दुसर्यासाठी नकारात्मक असू शकते.-स्वामी विवेकानंद
6 Mar 2024 - 8:32 pm | नठ्यारा
स्वधर्म,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला. तुमची एकेक विधानं पाहूया.
१.
यांत अनैसर्गिक काय आहे?
२.
पूर्वजन्मीच्या आघाताची खूण बालकाच्या चालू जन्मातील शरीरावर उमटणे हा समज नव्हे. ते मानसशास्त्रीय घटीतही नव्हे. हे पुनर्जन्माकडे अंगुलीनिर्देश करणारं वास्तव आहे. पुनर्जन्म माना वा ना माना.
३.
नेमक्या अशाच शक्यतांचा मागोवा घेऊन शास्त्रज्ञांनी अनेक रहस्ये उलगडली आहेत. त्यांच्या यादीत पुनर्जन्म का नको? निदान यादीत सामील करायला काय हरकत आहे?
४.
मलातरी कन्फर्मेशन बायसची गरज नाही. कोण्या बालकाच्या मनांत पूर्वजन्मीच्या स्मृती अचानक का जागृत होतात, यावर संशोधन व्हायला हवं. बस इतकंच मला वाटतं. पुनर्जन्म असो वा नसो.
५.
न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतावर आक्षेप असणे म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीवर आक्षेप घेणे नव्हे. न्यूटनचा सिद्धांत अमान्य असला तरी डोंगरावरून दरीत कोणी उडी मारीत नाही. वस्तू खाली पडतात ही सार्वत्रिक अनुभूती आहे. तद्वत कर्मविपाक ही सार्वत्रिक अनुभूती आहे.
६.
तसा झालाय. म्हणूनंच कर्मसिद्धांत विकसित झाला आहे. केवळ हिंदूंतच नाही तर जगातल्या इतर पंथोपपंथांतही कर्मविपाक आहेच.
असो.
या घडीला पुनर्जन्म ही अमन्य वा अमान्य करायची गोष्ट नसून अधिक संशोधन करायचा विषय आहे. बाकी, भूक तहान वगैरे बाबी दिसंत नसल्या तरी अस्तित्वात असतात. तसाच कर्मविपाकही अस्तित्वात आहे. पुनर्जन्म ही त्याची पडछाया आहे.
-नाठाळ नठ्या
8 Mar 2024 - 8:16 pm | स्वधर्म
आपण म्हणता तसे, पुनर्जन्म ही मान्य किंवा अमान्य करण्याचा विषय नसून अधिक संशोधन करण्याचा विषय आहे. असो बापडा, आमच्यासारख्यांची काहीही हरकत नाही. ज्यांना त्यात रस असेल ते करोत की संशोधन त्यात. आमच्यासारख्यांसाठी महत्वाचं हे की त्याचा आंम्हाला (किंवा तुंम्हाला) काही पडताळा येतो का, काही उपयोग होतो का? हे तुमच्या बाबतीत तर तुंम्ही काही सांगितले नाही. पडताळणी शक्य नसल्याने त्यावर घातलेला वाद हा निव्वळ बौध्दिक करमणूक आहे. फक्त कुणी त्याचा आधार घेऊन चुकीच्या समजूतीपायी आपल्या अन्यायकारक परिस्थितीचा दोष मागील जन्मातील कर्मावर ढकलून अन्याय, शोषण याविरूध्द काही करण्याचे टाळू नये. बाकी सकाळी भरपूर नाष्टा केल्यामुळे दुपारी कडकडून भूक लागणार नाही, इतपत कर्मविपाकावर विश्वास आहेच मुळी. फक्त ते आधीच्या जन्मातलं आहे ना, त्याचा प्रॉब्लेम आहे बघा.
माझ्यापुरतं सांगायचं झालं तर, गणितात तीन पेक्षा जास्त व्हेरिएबल आले, तरी ते सोडवणं किती अवघड बनतं. आपण राहतो त्या जगात तर अनंत चल घटक आहेत आणि ते सतत परस्परांवर परिणाम करत राहतात. यामुळे एखादी भाग्य व दुर्भाग्यकारक घटना घडली तर कोणतेतरी अत्यंत गुंतागुंतीचे आपल्या मानवी क्षमतेने उलगडा न होऊ शकणारे कारण असणार, हा विचार पुरेसा आहे. यावर आपल्या मागील जन्मातल्या कर्माचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे, त्यावर फोकस करून चालणंच महत्वाचं आहे.