साहित्य-
३ कप मखाना
दोन-तीन चमचे प्रत्येकी विविध वनस्पती बिया-भोपळा,सुर्यफुल,तीळ,बदाम ,काजू,अक्रोड,मनुके इत्यादी
२०० ग्रम खजूर
चार –पाच चमचे साजूक तूप
कृती-
१.सर्वात प्रथम मखाना तुपावर कुरकुरीत भाजून घ्यायचे .
२.वरील सर्व सुका मेवा (बिया) तुपात परतून घ्यायचे.
३.तुपात परतलेले मखाना आणि सुका मेवा मिक्सर मधून बारीक कुटून घ्यायचे.
४.सीडलेस खजूर तुपात परतून ,मिक्सर मधून फिरवून त्याची पेस्ट करून घ्यायची.
५.मखाना-सुकामेवा पावडर आणि खजूर पेस्ट एकत्र करून दोन –तीन चमचे तूप टाकून लाडू वळून घ्यायचे.
टीप-१.या मध्ये तूपाचा वापर टाळून शकता.
२.लाडू वळले जात नसल्यास खजूर पेस्टचे प्रमाण वाढवावे.
-भक्ती
प्रतिक्रिया
26 Nov 2023 - 11:23 am | सरिता बांदेकर
मस्तच.
ओट्स भाजून घेऊन हे सगळे पदार्थ घातले तर चिवडासुद्धा चटपटीत छान होतो.म्हणजे गोड खावंसं वाटलं तर लाडू खायचं आणि चटपटीत खावंसं वाटलं तर चिवडा.
भक्ती तुमच्या रेसीपी नेहमीच छान असतात.
26 Nov 2023 - 5:46 pm | कंजूस
डायवर्शन.
क्रमांक (१) आणि (२) नंतर सर्व पदार्थ मिसळून बरणीत भरून ठेवावेत आणि येता जाता खावेत. असं आवडेल.
27 Nov 2023 - 8:29 pm | Bhakti
डायवर्शन -२
कृती क्रमांक ५ नंतर तयार पावडर फ्रीजमध्ये ठेवावी,रोज एक कप दूधात एक चमचा पावडर टाकून ते घ्यावे.
26 Nov 2023 - 10:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लंबर एक. फ़ोटो जीवघेणे. लिहिते राहा तुम्ही. पाकृ असो की लेखन.
पुलेशु.
-दिलीप बिरुटे
27 Nov 2023 - 12:14 pm | जागु
छान रेसिपी. नक्की करणार.
27 Nov 2023 - 2:06 pm | प्रचेतस
भारीच दिसत आहेत हे.
27 Nov 2023 - 8:02 pm | Bhakti
सर्वांचे खूप खूप धन्यवाद!
9 Dec 2023 - 10:14 am | विवेकपटाईत
रेसिपी आवडली
11 Feb 2024 - 2:50 pm | नपा
परवाच बनवलेत.. मखाना शुगर फ्री लाडू. बायको गावाला गेल्याचा लगेच उपयोग करून घेतला.
टीप २ प्रमाणे आधी लाडू वाळले जात नव्हते मग तूप आणि खजूर पेस्ट वापरून मस्त खमंग लाडू झालेत.
धन्यवाद या रेसिपीबद्दल
11 Feb 2024 - 8:08 pm | चामुंडराय
अर्धबरीने केले. पौष्टिक लाडू.
थोडे बदल करून केले.
मखना, डिंक, खजूर पावडर मेजर
तीळ, खसखस, जवस, बदाम पावडर, वेलदोडे पूड मायनर.
साजूक तूप फीलर.
पौष्टिक आहेत असे सांगण्यात आले आहे.