पुरंदरचा धूर्त तह

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
2 Dec 2023 - 1:15 pm
गाभा: 

इतिहास प्रेमी मिपाकरांसाठी सादर

२

१

3अ

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

19

20

21

प्रतिक्रिया

वाचनीय लेख. आनंद झाला.

या घटनेच्या निमित्ताने गावे, जागा शोधत जा.

हो, नक्की करेन. तुमच्या ओळखीपैकी जर कोणी चित्रफित बनवु शकत असेल तर माहितीचे सादरीकरण अतिशय प्रभावी आणि समजण्यास सुलभ होऊ शकते. अशी चित्रफित बनवायला जास्त खर्च येणार नाही. श्री शिवाजी महाराजांचे अनुयायी असतील तर तेही काम सहज किंवा फुकट होईल.

शशिकांत ओक's picture

4 Dec 2023 - 3:05 am | शशिकांत ओक

मिपाकरांपैकी कोणी अशा प्रस्तूतीची चित्र फीत कशी करायची हे शिकवायला पुढे येत असतील तर काही खर्च करावा लागेल तर तो करायला मला आवडेल.
या शिवाय काही लढायांचे हिंदी, इंग्रजी आणि अन्य भाषात रूपांतर करायची गरज आहे.
पुण्यातील शिवाजी महाराज म्युझियम मधे महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या लढायांवर एका हॉलमध्ये फ्रांसुआ गोतिए यांच्या नेतृत्वाखाली बॅनर्स प्रदर्शन मांडले आहे. तिथे ऑडियो व्हिडिओ चित्रीकरण सादर करता येईल.

धन्यवाद. मदत हवी आहे असा धागा लिहा. होतकरु आणि रसिक लोक पुढे येतील.

मदत हवी आहे असा धागा लिहा. होतकरु आणि रसिक लोक पुढे येतील.

असा वेगळा धागा काढायचा व्यवस्थापन कदाचित मान्यता देईल असे वाटत नाही. म्हणून या ठिकाणी ट्रंप यांच्या म्हणण्यानुसार इथे माझ्या सादरीकरणाची चित्रफीत बनवायला टेक्निकल आणि प्रसार माध्यमांना कसे हाताळावे यासाठी मिपाकरांना मदतीचा हात पुढे करावा ही विनंती करत आहे.

असा वेगळा धागा काढायचा व्यवस्थापन कदाचित मान्यता देईल असे वाटत नाही.

देईल. लिहुन तर बघा. जास्तीत जास्त धागा उडेल.

विजुभाऊ's picture

3 Dec 2023 - 6:26 am | विजुभाऊ

असेच म्हणतो.
या लेखात पुरंदराच्या तहाची इतकी छान माहीती मिळाली. ती देखील दोन्ही बाजूने व्यवस्थित विश्लेषणासहीत.

नठ्यारा's picture

3 Dec 2023 - 4:09 pm | नठ्यारा

नेहमीप्रमाणे शशिकांत ओक श्रींचे सटीक विवरण. विश्लेषण वाचून तहाचा इतक्या बारकाईने वेध घेण्याचे कौतुक वाटते.

-नाठाळ नठ्या

शशिकांत ओक's picture

3 Dec 2023 - 9:55 pm | शशिकांत ओक

धन्यवाद

कर्नलतपस्वी's picture

4 Dec 2023 - 6:57 am | कर्नलतपस्वी

माघार आणी आक्रमण या मुख्य युद्ध कौशल्याचा महाराजानी बखुबी वापर केला.
पुरंदरचा तह याचे उत्तम उदाहरण आहे. माहितीपुर्ण लेख.
आवडला.

पुरंदरचा लढा रणांगणावर कसा लढवला गेला यावर आधारित घटनाक्रम दर्शवला आहे. पुरंदर किल्ला एकाकी पाडला गेला. इतर किल्ल्यावर नाकेबंदी झाली. वेळ घालवला तर बाकीचे गड पडतील या जाणिवेतून महाराजांवर वाटाघाटी करून संकट टाळण्यासाठी तहाची वेळ आली या वर आधारित प्रेझेंटेशन सादर केले आहे.

Bhakti's picture

4 Dec 2023 - 10:22 am | Bhakti

छान सादरीकरण आहे.
शिवाजी महाराजांचा इतिहास नीट शिकवलाच नाही.त्यापेक्षा याबाबत आताची पिढी सुदैवी आहे.पुण्यातली 'शिवसृष्टी' अशाच प्रकारे किल्ले प्रतिकृती, व्हिडिओ ओडिओ द्वारे शिव इतिहास दाखवते.तर 'मावळा' हा अनेक खेळ जसे व्यापार,ट्रमकार्ड इत्यादी द्वारे शिव इतिहास मुलांना शिकवते.
तुम्ही नक्कीच यापुढचा प्रोजेक्ट करावा.

शशिकांत ओक's picture

4 Dec 2023 - 7:51 pm | शशिकांत ओक

भक्ति जी,
म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते...
शिवसृष्टीच्या महत्वाच्या व्यक्तींनी भेटायला बोलावले आहे.
'मावळा'चा टी शर्ट घालून शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांच्या समावेत कुर्ला येथील मैदानावर प्रत्यक्षात सहभागी होऊन जोश कसा निर्माण होतो ते अनुभवले.
साधारण ४थ्या पिढीला या सारख्या प्रेझेंटेशन पहायची मानसिकता तयार होईल.
सॅम बहादूर पहायला बसलोय...
फिनिक्स मॉल सिटीत...

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Dec 2023 - 10:36 pm | ज्ञानोबाचे पैजार

आपण घेत असलेल्या कष्टांना मनःपूर्वक दंडवत
पैजारबुवा,

खुपच छान आणि अभ्यासपुर्ण विश्लेषण !

विवेकपटाईत's picture

7 Dec 2023 - 1:49 pm | विवेकपटाईत

लेख आवडला. बहुतेक पुरंदरे तहाची प्रेरणा घेऊन मोदींनी मेहबूबा मुफ्तीला मूर्ख बनविले. ३७० हटविली. विधान सभेत जम्मूच्या दहा जहा वाढविक्या. ९ जागांचा फायदा झाला.

सिमला करार
कुठल्याही राजकीय करारात अनेक बाजू विचारात घेऊन सत्ताधारींना वागावे लागते. शिवाय सल्लागारांची मदत हवी असते.
सिमला करार पाकिस्तानच्या भुट्टो आणि भारताच्या इंदिरा गांधी यांच्यात चर्चेच्या फेऱ्या होऊन जिंकलेला भू भाग परत करणे, बांगलादेशात शरणागत आलेल्या ९३ हजार पाकिस्तानी सेना व सरकारी लोकांना सोडवून पाकिस्तानात सुखरूप जाऊ देणे ही विनंती मान्य होत नाही असे घटनाचक्र पाहता कळते वाटाघाटी फिस्कटल्या होत्या.
नंतर लोकसभेत कै अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना विचारले होते, 'असे काय घडले की ब्रेक फास्ट घेण्यासाठी बागेत बोलाचाली होऊन एकदम तुम्ही करार करायला मान्यता दिलीत?'
आजवर अनेक कयास केले गेले. असे काही मोठी लालूच दाखवणारे प्रॉमिस केले असावे. 'मी काश्मीर प्रश्न बंद करेन. पण मी असा करार न करता ९३ हजार शरणागतांना परत न आणता गेलो तर मला मारले जाईल. मी मेलो तर काश्मीर प्रश्न तसाच राहील. म्हणून मला पाकिस्तानी जनतेला सांगायला काहीतरी सबब द्या.'
'ठीक आहे आपण तसे करारात लिहू.' गांधी म्हणाल्या असाव्यात.
' हे लिखित स्वरूपात न झालेले बरे. मी आपल्याला शब्द देतोय. मी पाकिस्तानात दिलेल्या गेलो की लगेच रेडिओवर अनौंन्स करतो. की काश्मीर प्रश्न आम्ही निकालात काढला आहे. ' लेखी करारात तसे नको यावर मान्यता देण्यात आली आणि जंटलमन प्रॉमीस म्हणून ते करारावर सही करून मुलीसह निघून गेले. नंतर दिलेल्या प्रॉमिसचे काय झाले ते सर्वांना माहित आहे.
माझे वैयक्तिक मत... जरी करारात लेखी उल्लेख केला नसला तरी एक खेळी म्हणून जो पर्यंत भुट्टो तुम्ही पाकिस्तानात जाऊन रेडिओ वर अनौंन्स करत नाही तोपर्यंत आपली मुलगी बेनझीर भुत्तोला भारतात निसर्ग सान्निध्यात राहू दे, ताजमहाल, अजमेर शरीफ, जुनागढचा तुमच्या पूर्वजांच्या गावाला भेट देत राहील. असे म्हणूनओलीस ठेवून घेता आले असते. कदाचित तसा प्रस्ताव केला असेल पण तो अमलात आणला गेला नाही....!

चौकस२१२'s picture

8 Dec 2023 - 4:45 am | चौकस२१२

एक खेळी म्हणून जो पर्यंत भुट्टो तुम्ही पाकिस्तानात जाऊन रेडिओ वर अनौंन्स करत नाही तोपर्यंत आपली मुलगी बेनझीर भुत्तोला भारतात निसर्ग सान्निध्यात राहू दे,
यावरून आठवले / मनात आलेली एक शंका .... जेव्हा त्या ५ अफगाणी/ पाकिस्तानी कैद्यांना भारत सरकारला सोडून दयावे लागले ( विमान अपहरण नंतर) त्यांना सुमडीत आधी थोडे झोपेचे औषध देऊन काहीतरी भयानक रोग होईल असे काहीतरी रसायन देण्याचे का सुचले नसावे ! कदाचित डोवाल साहेब तेवहा नवहते म्हणून !

सिमला करार
कुठल्याही राजकीय करारात अनेक बाजू विचारात घेऊन सत्ताधारींना वागावे लागते. शिवाय सल्लागारांची मदत हवी असते.
सिमला करार पाकिस्तानच्या भुट्टो आणि भारताच्या इंदिरा गांधी यांच्यात चर्चेच्या फेऱ्या होऊन जिंकलेला भू भाग परत करणे, बांगलादेशात शरणागत आलेल्या ९३ हजार पाकिस्तानी सेना व सरकारी लोकांना सोडवून पाकिस्तानात सुखरूप जाऊ देणे ही विनंती मान्य होत नाही असे घटनाचक्र पाहता कळते वाटाघाटी फिस्कटल्या होत्या.
नंतर लोकसभेत कै अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना विचारले होते, 'असे काय घडले की ब्रेक फास्ट घेण्यासाठी बागेत बोलाचाली होऊन एकदम तुम्ही करार करायला मान्यता दिलीत?'
आजवर अनेक कयास केले गेले. असे काही मोठी लालूच दाखवणारे प्रॉमिस केले असावे. 'मी काश्मीर प्रश्न बंद करेन. पण मी असा करार न करता ९३ हजार शरणागतांना परत न आणता गेलो तर मला मारले जाईल. मी मेलो तर काश्मीर प्रश्न तसाच राहील. म्हणून मला पाकिस्तानी जनतेला सांगायला काहीतरी सबब द्या.'
'ठीक आहे आपण तसे करारात लिहू.' गांधी म्हणाल्या असाव्यात.
' हे लिखित स्वरूपात न झालेले बरे. मी आपल्याला शब्द देतोय. मी पाकिस्तानात दिलेल्या गेलो की लगेच रेडिओवर अनौंन्स करतो. की काश्मीर प्रश्न आम्ही निकालात काढला आहे. ' लेखी करारात तसे नको यावर मान्यता देण्यात आली आणि जंटलमन प्रॉमीस म्हणून ते करारावर सही करून मुलीसह निघून गेले. नंतर दिलेल्या प्रॉमिसचे काय झाले ते सर्वांना माहित आहे.
माझे वैयक्तिक मत... जरी करारात लेखी उल्लेख केला नसला तरी एक खेळी म्हणून जो पर्यंत भुट्टो तुम्ही पाकिस्तानात जाऊन रेडिओ वर अनौंन्स करत नाही तोपर्यंत आपली मुलगी बेनझीर भुत्तोला भारतात निसर्ग सान्निध्यात राहू दे, ताजमहाल, अजमेर शरीफ, जुनागढचा तुमच्या पूर्वजांच्या गावाला भेट देत राहील. असे म्हणूनओलीस ठेवून घेता आले असते. कदाचित तसा प्रस्ताव केला असेल पण तो अमलात आणला गेला नाही....!

मित्रांनो,
ई-बुक १२५ वर आधारित दोन भागात धागा सादर करून काही दिवस उलटून गेले. १५० टिचक्या पडल्या. त्या आधी च्या भागाला ५५० पडल्याचे दिसत होते.
ईबुक १२६ 'शामियान्यातील वाटाघाटी व धूर्त तह' वरील आधारित धागा २९०० टिचक्या पार करून गेलाय.
यावरून वाटते की प्रत्येक धागा आपले भाग्य घेऊन येतो. कदाचित या विषयावर आधीच्या माहितीमुळे नाविन्य घटले असावे. शिवाय नकाशातील माहिती, तपशील शोधून वाचायला वाचकांना रस कमी असावा. असो. दमदमे कसे असतात, तटापर्यंत पोहोचायला करावे लागणारे बोगदे वगैरे बाबी या मोहिमेत प्रकर्षाने दर्शविल्याने त्यावर विचार अपेक्षित होते. असो.
जितक्या टिचक्या पडल्या की तितके मिपाकर वाचकांनी ते वाचले असे मानावे? की पुन्हा पुन्हा टिचक्या मारणाऱ्या काही सदस्यांमुळे ती संख्या कमी असावी. यावर कुणी शोध कार्य केले आहे का? त्यातील निष्कर्ष काय असावे? समजून घ्यायला आवडेल.

मुक्त विहारि's picture

17 Dec 2023 - 1:35 pm | मुक्त विहारि

ह्याचे समीकरण नाही...

त्यामुळे, लिहीत राहणे, इतकेच आपल्या हातात...

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात , प्रत्येक धागा हा पतंग असतो... कधी "कटी पतंग", तर कधी "धूमकेतू"... धाग्याने कुठले रूप घ्यावे? ह्याची नाडी वाचकांच्या हातात.

शशिकांत ओक's picture

23 Dec 2023 - 7:30 pm | शशिकांत ओक

जो तो आपापले दैव घेऊन येतो.

मित्रांनो,
ई-बुक १२५ वर आधारित दोन भागात धागा सादर करून काही दिवस उलटून गेले. १५० टिचक्या पडल्या. त्या आधी च्या भागाला ५५० पडल्याचे दिसत होते.
ईबुक १२६ 'शामियान्यातील वाटाघाटी व धूर्त तह' वरील आधारित धागा २९०० टिचक्या पार करून गेलाय.
यावरून वाटते की प्रत्येक धागा आपले भाग्य घेऊन येतो. कदाचित या विषयावर आधीच्या माहितीमुळे नाविन्य घटले असावे. शिवाय नकाशातील माहिती, तपशील शोधून वाचायला वाचकांना रस कमी असावा. असो. दमदमे कसे असतात, तटापर्यंत पोहोचायला करावे लागणारे बोगदे वगैरे बाबी या मोहिमेत प्रकर्षाने दर्शविल्याने त्यावर विचार अपेक्षित होते. असो.
जितक्या टिचक्या पडल्या की तितके मिपाकर वाचकांनी ते वाचले असे मानावे? की पुन्हा पुन्हा टिचक्या मारणाऱ्या काही सदस्यांमुळे ती संख्या कमी असावी. यावर कुणी शोध कार्य केले आहे का? त्यातील निष्कर्ष काय असावे? समजून घ्यायला आवडेल.

1

औरंगजेबाने पुरंदरच्या तहाच्या प्रस्तावाला आपल्या सहीशिक्क्यानिशी मान्यता दिली होती. यावर आधारित पुस्तक मला शोधून मिळाले. त्यात नाशिकच्या इतिहास शोधक श्री गिरीश टकले यांनी केलेल्या भाष्यातून बराच प्रकाश पडतो.

ते म्हणतात... "काही मुद्यांकडे मी वाचकांचे लक्ष वेधणार आहे.
पहिले म्हणजे जयसिगानी पाठवलेल्या एका महत्त्वाच्या बाबीची बादशहाने नांद घेतली आहे. दक्षिणेमध्ये दहा हजारांची शिबंदी ठेवणे बंधनकारक असताना व त्यासाठी खर्चाची व्यवस्था असताना प्रत्यक्षात पाच हजार पाचशे लोकच उपस्थित मिळाले. याचा अप्रत्यक्ष अर्थ असा आहे की दहा हजाराचा खर्च बादशहांकडून घेऊन यक्षात पाच हजार पाचशे म्हणजे निम्म्यापेक्षा थोडे अधिक लोक नेमले होते. हा एक भ्रष्टाचारच होता सुरतेच्या पहिल्या लुटीच्या वेळीही असाच प्रकार घडला होता मुघल साम्राज्यातील मुलकी चलाकरी व्यवस्थेत कशा प्रकारे ग्रहाचार मुरलेला होता है यावरून समजते.
दुसरे म्हणजे निर्माराजांनी केलेल्या सर्व शिफारसी व नेमणूका झांना बादशहाने संमती दिली आहे यावरून मिर्झाराजाचे बादशहाकडे किती मोठे वजन होते हे ध्यानात येते. या लढाईत बुदेल राजपूत सरदार चपत बुदेला यांच्या बरोबर व्याचा मुलगा (की भाऊ?] छत्रसाल याचा उल्लेख येतो. नंतरच्या काळात सुविख्यात झालेला छत्रसाल बुदेला या पुरंदरच्या सघषांत मुघलाच्या बाजूने लढताना दिसतो. लढ्‌यात दाखवलेल्या शीयांबद्दल त्याची मनसब वाढवण्यात आली आहे.
तिसरे म्हणजे बादशहानी विजापूरच्या मोहिमेकरता आवश्यक तोफांची खानगी मिर्झाराजांच्या मागणीनुसार केली आहे. त्याचबरोबर फर्मानात बंदुकधारी घोडेस्वाराचाही उल्लेख आहे बंदुकधारी घोडेस्वार हे मुळात मंगोल सैन्यामध्ये असत. भारतातही मुघल सैन्यात ते होते हे यातून दिसून येते, पानिपतच्या रणसंग्रामात अब्दालीकडील बंदुकधारी घोडेस्वारामुळेच लढाईचा निर्णय मराठ्‌याच्या विरुद्ध गेला. एकंदरीत मुघल सैन्यात पायदळ बंदुकधारी व घोडेस्वार बंदुकधारी अशी दोन्ही दले होती
पृष्ठ क्र.१४ वर तसेच सोलापूरचा किल्ला आणि निजामुलमुल्कचे अन्य क्षेत्र जसे 'जी होली इत्यादी जे जाफराबादेशी सबंधित आहेत सोपवले जाण्यास सांगितले जाईल,
या मजकुरातील 'जी होली म्हणजे कर्नाटकातील हाल्लीखेडे व जाफराबाद म्हणजे जाहिराबाद (जे तेलंगणात आहे) ही गावे असण्याची शक्यता आहे. सोलापूरहून हाल्लीखेडे सुमारे १५० कि मी वर असून तेथून जाहिराबाद ५० कि. मी. अंतरावर आहे, ही गावे निजामशाही आणि आदिलशाहीच्या सरहद्दीवर असावीत सोलापूरनजिक कोणतेच जाफराबाद नाही मुघल काळात चांदवड (नाशिक जिल्हा) ह्या गावाचे नामकरण जाफराबाद असे झाले होते, पण ते येथे अपेक्षित नाही दुसरे प्रसिद्ध जाफराबाद गुजरातमध्ये आहे
फर्मानातील काही मजकूर विजापूरच्या संबंधात आहे. कारण शिवाजी महाराजांच्या पाडावानंतर मिर्झाराजाचे उद्दिष्ट विजापूर हस्तगत करणे हे होते. अर्थातच ते सोपे काम नव्हते हे पुढील काळातील घटनावरून सर्वज्ञात आहे.
जमानातील शेवटचा परिच्छेद खूप महत्वाचा आहे "हल्ली आपण (राजा जयसिंह) जसा विचार केला आहे त्याच प्रकारे कार्य कराने, मस्तु 'गुकराना' अदा करण्यासाठी (दरबारात येण्याचे) शिवाजीला कष्ट देऊ नये (शुकराना-कृतज्ञता दर्शक नजराणा) यावरून हे स्पष्ट दिसून येते, की शिवाजी महाराजानी दरबारात भेटीला यावे अशी बादशहाची इच्छा, अपेक्षा अगर आज्ञा नाही. ह्या कर्मानाची तारीख ४ सप्टेंबर १६६५ आहे फर्मान दक्षिणेत आल्यावर ३० सप्टेंबरला महाराजांनी ते समारभपूर्वक स्वीकारल्याचा उल्लेख सापडतो म्हणजेच १ ऑक्टोबरपर्यंत महाराजांची आग्रा भेटीला जाण्याची योजना ठरलेली नव्हती.
२५ नोव्हेंबरनंतर जयसिंगांधी विजापूर मोहिम सुरू झाली. त्यात करारानुसार शिवाजी महाराजही ससैन्य दाखल झाले पुढील तीन महिने १५ नोव्हेंबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत ही मोहिम चालली बात मिर्झाराजा जयसिंग अपयशी ठरले. खुद्द महाराजानाही विजापूरकराकडून पराभव पत्करावा लागला, अशातच दिलेरखान व पठाणी सरदाराचा गट महाराजांच्या विरुद्ध होता. ह्या बातावरणात मिझाराजानी महाराजांना पन्हाला मोहिमेवर पाठवले ती मोहिमही अयशस्वी झाली.
दक्षिणेतील मुस्लीम राजवटी संपवणे हे मुघलांचे अकबरापासूनचे ध्येयधोरण होते. औरंगजेबालाही तेच करावयाचे होते. मात्र सन १६६५ त्यादरम्यान आदिलशाही आपले सामथ्र्य बर्यापैकी टिकवून होती. मुघलांकडून आदिलशाही नष्ट होणे किया अति दुबळी होगी प्राप्त परिस्थितीत महाराजाच्या हिताचे नव्हते. पुढील काळातील (सन १६७७) मालोजीराव घोरपडे ह्याना लिहीलेल्या पत्रातही महाराजानी आपले या बाबतीतील धोरण स्पष्ट केले आहे त्यामुळे विजापुरच्या आदिलशाहीला दुबळे करण्यात आपण सहाय्यभूत व्हावे अशी त्याची इच्छा नसावी. म्हणूनच महाराजानी विजापूरच्या मोहिमेत आपली पूर्ण शक्ती पणास लावली नसादी या सर्व परिस्थितीत मिर्झाराजांना शिवाजी महाराज दक्षिणेत असणे मुघलाच्या दृष्टीने बहुदा धोक्याचे वाटू लागले असावे कारण नेताजी असावा का असा प्रश्न पडतो, याकरताच
मागोमाग खुद्द महाराजानीही आदिलशाहीशी हातम्ळवणी केली व या युतीला कुतुबशाहीचाही पाठिंबा मिळाला तर मुघलांचे शिवाजी महाराज बराच काळ आपल्या राज्यापासून दूर राहिले तर दख्खन अमल राहणे अधिक सोपे जाईल असा विचार मिर्झाराजांनी केला असावा का असा प्रश्न पडतो. या करिताच
मुद्याकडे मी वाचकांचे लक्ष वेधणार आहे.
पहिले म्हणजे जयसिगानी पाठवलेल्या एका महत्वाच्या बाबीची बादशहाने नांद घेतली आहे. दक्षिणेमध्ये दहा हजारांची शिबंदी ठेवणे बंधनकारक असताना व व्यासाठी खर्चाची व्यवस्था असताना प्रत्यक्षात पाच हजार पाचशे लोकच उपस्थित मिळाले. याचा अप्रत्यक्ष अर्थ असा आहे की दहा हजाराचा खर्च बादशहांकडून घेऊन यक्षात पाच हजार पाचशे म्हणजे निम्म्यापेक्षा थोडे अधिक लोक नेमले होते. हा एक भ्रष्टाचारच होता सुरतेच्या पहिल्या लुटीच्या वेळीही असाच प्रकार घडला होता मुघल साम्राज्यातील मुलकी चलाकरी व्यवस्थेत कशा प्रकारे ग्रहाचार मुरलेला होता है यावरून समजते.
दुसरे म्हणजे निर्माराजांनी केलेल्या सर्व शिफारसी व नेमणूका झांना बादशहाने संमती दिली आहे यावरून मिर्झाराजाचे बादशहाकडे किती मोठे वजन होते हे ध्यानात येते. या लढाईत बुदेल राजपूत सरदार चपत बुदेला यांच्या बरोबर व्याचा मुलगा (की भाऊ?] छत्रसाल याचा उल्लेख येतो. नंतरच्या काळात सुविख्यात झालेला छत्रसाल बुदेला या पुरंदरच्या सघषांत मुघलाच्या बाजूने लढताना दिसतो. लढ्‌यात दाखवलेल्या शीयांबद्दल त्याची मनसब वाढवण्यात आली आहे.
तिसरे म्हणजे बादशहानी विजापूरच्या मोहिमेकरता आवश्यक तोफांची खानगी मिर्झाराजांच्या मागणीनुसार केली आहे. त्याचबरोबर फर्मानात बंदुकधारी घोडेस्वाराचाही उल्लेख आहे बंदुकधारी घोडेस्वार हे मुळात मंगोल सैन्यामध्ये असत. भारतातही मुघल सैन्यात ते होते हे यातून दिसून येते, पानिपतच्या रणसंग्रामात अब्दालीकडील बंदुकधारी घोडेस्वारामुळेच लढाईचा निर्णय मराठ्‌याच्या विरुद्ध गेला. एकंदरीत मुघल सैन्यात पायदळ बंदुकधारी व घोडेस्वार बंदुकधारी अशी दोन्ही दले होती
पृष्ठ क्र.१४ वर तसेच सोलापूरचा किल्ला आणि निजामुलमुल्कचे अन्य क्षेत्र जसे 'जी होली इत्यादी जे जाफराबादेशी सबंधित आहेत सोपवले जाण्यास सांगितले जाईल,
या मजकुरातील 'जी होली म्हणजे कर्नाटकातील हाल्लीखेडे व जाफराबाद म्हणजे जाहिराबाद (जे तेलंगणात आहे) ही गावे असण्याची शक्यता आहे. सोलापूरहून हाल्लीखेडे सुमारे १५० कि मी वर असून तेथून जाहिराबाद ५० कि. मी. अंतरावर आहे, ही गावे निजामशाही आणि आदिलशाहीच्या सरहद्दीवर असावीत सोलापूरनजिक कोणतेच जाफराबाद नाही मुघल काळात चांदवड (नाशिक जिल्हा) ह्या गावाचे नामकरण जाफराबाद असे झाले होते, पण ते येथे अपेक्षित नाही दुसरे प्रसिद्ध जाफराबाद गुजरातमध्ये आहे
फर्मानातील काही मजकूर विजापूरच्या संबंधात आहे. कारण शिवाजी महाराजांच्या पाडावानंतर मिर्झाराजाचे उद्दिष्ट विजापूर हस्तगत करणे हे होते. अर्थातच ते सोपे काम नव्हते हे पुढील काळातील घटनावरून सर्वज्ञात आहे.
जमानातील शेवटचा परिच्छेद खूप महत्वाचा आहे "हल्ली आपण (राजा जयसिंह) जसा विचार केला आहे त्याच प्रकारे कार्य कराने, मस्तु 'गुकराना' अदा करण्यासाठी (दरबारात येण्याचे) शिवाजीला कष्ट देऊ नये (शुकराना-कृतज्ञता दर्शक नजराणा) यावरून हे स्पष्ट दिसून येते, की शिवाजी महाराजानी दरबारात भेटीला यावे अशी बादशहाची इच्छा, अपेक्षा अगर आज्ञा नाही. ह्या कर्मानाची तारीख ४ सप्टेंबर १६६५ आहे फर्मान दक्षिणेत आल्यावर ३० सप्टेंबरला महाराजांनी ते समारभपूर्वक स्वीकारल्याचा उल्लेख सापडतो म्हणजेच १ ऑक्टोबरपर्यंत महाराजांची आग्रा भेटीला जाण्याची योजना ठरलेली नव्हती.
२५ नोव्हेंबरनंतर जयसिंगांधी विजापूर मोहिम सुरू झाली. त्यात करारानुसार शिवाजी महाराजही ससैन्य दाखल झाले पुढील तीन महिने १५ नोव्हेंबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत ही मोहिम चालली बात मिर्झाराजा जयसिंग अपयशी ठरले. खुद्द महाराजानाही विजापूरकराकडून पराभव पत्करावा लागला, अशातच दिलेरखान व पठाणी सरदाराचा गट महाराजांच्या विरुद्ध होता. ह्या बातावरणात मिझाराजानी महाराजांना पन्हाला मोहिमेवर पाठवले ती मोहिमही अयशस्वी झाली.
दक्षिणेतील मुस्लीम राजवटी संपवणे हे मुघलांचे अकबरापासूनचे ध्येयधोरण होते. औरंगजेबालाही तेच करावयाचे होते. मात्र सन १६६५ व्या दरम्यान आदिलशाही आपले सामथ्र्य बर्यापैकी टिकवून होती. मुघलांकडून आदिलशाही नष्ट होणे किया अतिदुबळी होगी प्राप्त परिस्थितीत महाराजाच्या हिताचे नव्हते. पुढील काळातील (सन १६७७) मालोजीराव घोरपडे ह्याना लिहीलेल्या पत्रातही महाराजानी आपले या बाबतीतील धोरण स्पष्ट केले आहे त्यामुळे विजापुरच्या आदिलशाहीला दुबळे करण्यात आपण सहाय्यभूत व्हावे अशी त्याची इच्छा नसावी. म्हणूनच महाराजानी विजापूरच्या मोहिमेत आपली पूर्ण शक्ती पणास लावली नसादी या सर्व पारी मन्ना जी महाराज दक्षिणेत असणे मुघलाच्या दृष्टीने बहुदा धोक्याचे वाटू लागले असावे कारण नेताजी असावा का असा प्रश्न पडतो, याकरताच
त्यानी महाराजांचे मन वळवून त्यांना प्रत्यक्ष भेटीला जाण्यास राजी केलत्यांवे अर्थात महाराजांसारखा अष्टावधानी राजा जयसिगाच्या आग्रहाला बळी पडले असा याचा अर्थ नाही आग्याला जाणे व प्रत्यक्ष बादशहाची भेट घेणे यात महाराजांचेही काही मनसुबे होतेच. श्री विजयराव देशमुखांनी शककर्ते शिवरायमध्ये असे प्रमेय मांडले आहे की बादशहाकडून दख्खनची सुभेदारी मिळवता येईल अशी आशा मिझाराजानी महाराजाच्या मनात निर्माण केली असावी परतुयात तथ्य वाटत नाही, ज्या व्यक्तीने आपल्या सत्तेविरुद्ध बंड केला आहे त्याचा पराभव केल्यानंतर परत त्याच्याच ताब्यात त्याचा प्रदेश देण्याइतका बादशहा अव्यवहारी नव्हता महाराजांचे राज्य सपूर्ण नाट करणे हाच औरंगजेबाचा मूळ हेतू होता. तह हा त्यातील एक टप्पा होता एक प्रकारे लष्करी कारवाई करून साध्य केलेला राजकीय तोडगा होता
पुरंदरचा तहामागे सर्वनाश होण्यापेक्षा काही काळ नमते घेऊन नव्याने सुसज्ज तयारीसाठी वेळ मिळवणं हा महाराजांचा विचार होता मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाण असल्याचे सांगितले जाते जे माझ्या मते चुकीचे आहे वेळ आली तर वाकेन पण संपणार नाही हे तत्व दीर्घकालीन ध्येयपू‌र्तीसाठी अधिक उपयुक्त असते
मिर्जाराजा जयसिंगाच्या मोहिमेत सुमारे पंचवीस हजाराचे घोडदळ सहभागी होते त्यात सुमारे ६० ते ७०% घोडदल राजपूत सरदारांचे होते, उर्वरित दिलेरखानाचे पठाण सरदार व अन्य आहेत, सुमारे अर्धशतक बघितलेल्या इटालियन निकोलाय मनुचीचे एक निरीक्षण खूप महत्त्वाचे आहे. मनुची प्रत्यक्ष जर करीत असे. जयसिंगाच्या मोहिमेत तोफखाना दलावर प्रमुख होता. हा हरहुन्नरी माणूस अनेक कारनामे करीत असे. मुघल राजवटीबद्दल वर्णनतो म्हणतो...
"त्यांना (मुघल बादशहाना) हवे असेल तेव्हा राजपुत राजाना पर चढवतात आणि राजपूताच्या विरुद्ध लढायचे असल्यास ते (बादशहा) राजपूतांचाच उपयोग करतात राणा (उदयपूर मेवाड), राठोड (बिकानेर-जोधपुर इत्यादी मारवाड), कछवाह (अबर जयपुर), बुंदेले (ओर्च्छा-दांतिया) इत्यादी राजपूत राजे हे जरी एक झाले तरी ते गोगलाना हिंदुस्थानातून सहजपणे हाकलून लागू शकतील. (असे होते मोगल निकोलाव मनुची पृष्ठ क. ३४९) मनुची सारख्या परकीय व्यक्तीचे है निरीक्षण खूपच मार्मिक आहे. अकबराच्या उमेदीच्या काळापासून, सुमारे १५५० पासून राजपूत लोक मुघल साम्राज्याचा कणा बनले होते. मनुचीच्या म्हणण्यानुसार वर उल्लेखलेली चार महत्वाची घराणी एकत्र आली असती री मुघलांना गाशा गुंडाळावा लागला असता हे अगदी खरे आहे.
या निमित्ताने मनात असा प्रश्न उपस्थित होतो की उत्तर भारतातील ही परंपरागत दीरत्व जपणारी महाशक्ती आणि लेवढ्याच ताकदीची दक्षिणेत नव्याने उदयास आलेली मराठ्याची महाशक्ती ह्या एकत्र आल्या असत्या तर १७व्या शतकातचं भारत परकीय आणि परधर्मीय जुलुमी सरोच्या जोखडातून मुक्त झाला असता, १८व्या शतकात आलेले, इराणी नादिरशहा आणि अफगाण अहमदशहा अब्दाली, याच्यासारख्या लुटारू आक्रमकांची ह्या देशावर आक्रमण करण्याची हिम्मतही झाली नसती, सभाजी महाराजांच्या अल्प पण तेजस्वी कारकिदीत द्वह्या दोन्ही शक्ती एकत्र येण्याचा महायोग आला होता, पण तो पूर्णत्वास गेला नाहीं नियतीच्या मनात हा उत्तर दक्षिण सगम होणे मच्हते हेच खरे
- गिरीश टकले (नाशिक) (जेष्ठ इतिहास संशोधक)