रेव्हेन्यू स्टँप

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in काथ्याकूट
7 May 2009 - 6:23 pm
गाभा: 

अनेकदा आपल्याला पावती देताना घेताना रेव्हेन्यू स्टँप लावावा लागतो.

याचे नियम कोणाला माहिती आहेत का?
किती रुपयाच्या वरच्या व्यवहारावर रेव्हेन्यू स्टँप लावावा लागतो?
कोणत्या प्रकारच्या व्यवहारात?
फक्त रोखीने व्यवहार केल्यास की चेकने केल्यावर पण?
राज्याराज्यात नियम वेगवेगळे असतात की देशभर एकच?

आगाऊ आभार मानीत आहे.

प्रतिक्रिया

कपिल काळे's picture

7 May 2009 - 7:04 pm | कपिल काळे

रोख किंवा चेक कसल्याही रु ५००० च्या वरील व्यवहाराच्या पावतीवर रेव्हेन्यू स्टँप लावावा लागतो.
देशभरात एकच नियम आहे.

अजून एक नियमः
रेव्हेन्यू स्टँप जीभेवर अर्धा मिनिट ठेवून तिरका, आडवा, कसाही चिकटवावा लागतो.

रोख किंवा चेक कसल्याही रु ५००० च्या वरील व्यवहाराच्या पावतीवर रेव्हेन्यू स्टँप लावावा लागतो.
देशभरात एकच नियम आहे.

तेलगी महाशयांच्या कृपेमुळे इथे कर्नाटकात - किमान बंगळुरात तरी - घरभाडे पावती वर वा अन्य व्यवहारांवर रेव्हेन्यू स्टँप लावणे बंधनकारक नाहिये...
साध्या कागदावरची सही पण ग्राह्य धरली जाते. स्टँप्स चा भारी तुटवडा की घोटाळ्यामुळे खरा व खोटा स्टॅम्प ओळखण्याचा घोळ माहित नाही कशामुळे पण बंगळुरात तरी रेव्हेन्यू स्टँप वापरला गेलेला मी पाहिला नाही...

हा माझा स्वतःचा अनुभव आहे, अन्य कोणाला कसा अनुभव आहे मला माहित नाही...
माझी घर भाडे पावती रेव्हेन्यू स्टँप शिवाय अधिकृत भाडेपावती म्हणून इन्कम टॅक्स करिता ग्राह्य धरली गेली आहे.

सागर

मराठी_माणूस's picture

11 May 2009 - 8:32 am | मराठी_माणूस

चेक साठी गरज नाही

यन्ना _रास्कला's picture

7 May 2009 - 7:31 pm | यन्ना _रास्कला

रु. ५००/- च्या वरच्या कोनत्या पन व्यवहरासाठी.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

प्रमोद देव's picture

10 May 2009 - 1:26 pm | प्रमोद देव

रुपये पाच हजार नव्हे तर पाचशे रुपयांपासूनच्या व्यवहारावर(पावतीवर) एक रुपयांचा रेव्हेन्यू स्टँप लाववा लागतो.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

नितिन थत्ते's picture

7 May 2009 - 7:46 pm | नितिन थत्ते

माहितीबद्दल धन्यवाद
खराटा
(रंग माझा वेगळा)

सुहास's picture

8 May 2009 - 11:53 pm | सुहास

रु. ५००/- च्या वरच्या कोनत्या पन व्यवहरासाठी.

रु. ५००/- नव्हे... रु. ५०००/- च्या पुढच्या व्यवहारासाठी...

---सुहास

हेरंब's picture

10 May 2009 - 10:48 am | हेरंब

आणि तो रेव्हेन्यू स्टँप हा जुना १० पैशांचा आहे की नवीन एक रुपयाचा हे भिंग लावून तपासावे लागते.

स्वप्नयोगी's picture

10 May 2009 - 10:53 am | स्वप्नयोगी

आणि तो रेव्हेन्यू स्टँप स्वत:च्या पैशाने

(आता रुपयाने )

विकत घ्यावा लागतो.

पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.

टारझन's picture

10 May 2009 - 12:08 pm | टारझन

रेव्हेण्यू स्टँप फार सुंदर दिसतो , मला त्यावरची णक्षी आवडते ... मला रेव्हेण्यू श्टँप लै लै आवडतो

- टारझन

अनंता's picture

10 May 2009 - 12:48 pm | अनंता

छान प्रतिक्रिया !!!

नितिन थत्ते's picture

10 May 2009 - 2:06 pm | नितिन थत्ते

:)

खराटा
(रंग माझा वेगळा)