पुणे ते कन्याकुमारी car ने सोलो ट्रीप करायची आहे. आपल्या पैकी कोणी अशी ट्रीप केली आहे का?
सोलो ट्रीप करताना काय काळजी घ्यावी? कोणी मार्गदर्शन करू शकेल का?
प्रवास एकट्यानेच करायचा आहे. एका दिवसात 300-400 किलोमीटर पेक्षा जास्त कधी प्रवास केला नाही. Nexon पेट्रोल कार आहे.
प्रवास किनार पत्ती जवळून करायचा आहे.
प्रवासाची तयारी कशी करावी. माझ्या कडे २ महिन्याचा तयारी साठी वेळ आहे. आधी कोणत्या प्रॅक्टिस साठी ट्रीप कराव्या का? काही suggestion.
एकट्याने का जात आहात.. चार मित्र सोबत घेउन जा. गाडी पंक्चर झाली तर मदतीला कोणीतरी हवे की.. ;)
२०२२ आणि २०२३ ही दोन वर्षे स्वतःच्या कारने ५५०० किमी + असा वेगवेगळ्या रुटने कन्याकुमारी प्रवास केला आहे.
२०१७ साली बुलेटने पुणे ते कन्याकुमारी गेलो होतो...
त्यामुळे तुम्हाला माहिती देऊ शकतो.
पण तुमची एकट्याने कन्याकुमारीला जाण्याची (ती पण कारने!) कल्पना फारच धाडसी वाटत आहे.
निशांतभाऊ ६ वर्ष १० महिणे झाले तुम्हाला मिपावर येऊन.
सहा वर्षात एकतरी भटकंतीचा धागा काढला का तुम्ही?
एक व्हाट्सअँप वरचे फालतू मेसेज जमा करून धागे काढनारा मिपाकर आहे. तुम्ही दुसरे.
रच्याकने तुमचा मित्र लईच डेरिंगबाज ब्वा. मुंबईत रात्री ९ ला उतरून पुण्याला यायला निघायचा म्हंजे लईच हिम्मतवान माणूस.
आता तुम्ही एकटे निघून राहिले कन्याकुमारी साठी? तुमच्या डेरिंबाज मित्राला सोबत घ्या की शेट.
अशे भिकार धागे काढणारे एक बावळट आणि त्यावर प्रतिसाद देणारे हजार बावळट :=)
आता लोक फेसबुक / फेसबुक समुहावर सुद्धा असले घागे काढतात.
पुरेसे वाचन न करता / ट्रॅव्हलॉग व्हिडीओज न बघता थेट माहिती विचारतात.
त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते.
सर तुम्ही फार judgmental comments देत आहात. असो. मी आयुष्यात किती फिरलो किंवा काय काय केलं हे इतरांना सांगायलाच पाहिजे हे गरजेचं नाही.
मुंबई पुणे प्रवास म्हणाल तर बरेच परदेशात राहणारे लोक असा प्रवास करताना थोडा जास्त विचार करतात. आणि थोडी फार मदत घेतली चार लोकांचे अनुभव ऐकून मग निर्णय घेतला तर बिघडले कुठे?
मला स्वतला सुद्धा चार लोकांचे अनुभव ऐकून प्लॅनिंग करायला आवडतं. आणि त्यात गैर काही वाटत नाही.
मी आणि अजून पाच डोकी 'तवेरा' या गाडीने कन्याकुमारीला जाऊन आलोय. पाचमधले दोन ड्रायव्हर होते. पण ८०% ड्रायव्हिंग एकानेच केलेली.
नॅशनल हायवे नंबर १७ तुम्हाला घेऊन जाईल कन्याकुमारीपर्यंत. अगदी किनारपट्टीजवळून जाणारा हायवे आहे. तेव्हा खूपच लहान होता. आताची परिस्थिती माहिती नाही. किनारपट्टीजवळून जातो हे महत्वाचे. केरळातून जाताना एक विशेष गोष्ट जाणवते ह्या हायवेवरून. कोणी गेले असल्यास व्यनि करा. परतीचा प्रवास आम्ही, मदुरै, कोडाईकनाल, उटी, म्हैसूर,असा केलेला, सोबत नकाशे घेऊन. गुगल मॅपची चैन त्याकाळी नव्हती. :)
नशीबवान आहात की २०% ड्रायव्हिंग तरी अन्य कोणी केली होती!
मुंबई ते तिरुपती जाण्याचा अगोचरपणा आम्ही २०१६ मध्ये केला होता, बरोबर ४ जण होते पण ड्रायव्हर एकटा मीच. त्यावेळी 'मांडीला' आलेले मोड आठवले की आज पण हुळहुळते 😀
असो, धागाकर्त्याला सोलोट्रिप साठी शुभेच्छा!
(लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा)
नियंत्रित सुरक्षित वेगाने सकाळच्या वेळी २०० किमि + दुपार नंतर १५०-२०० किमि पेक्षा जास्त वाहन चालवू नका.
यादी प्रमाणे सर्व साहित्य (यात प्रथमोपचार डबा, औषधे आलीच) , थांबायची ठिकाणे, फोन क्र. + आडचणीत हमखास उपयोगी माणसे, भ्र.क्र. इत्यादि हाताशी असेल असे बाळगा. गावोगावच्या मित्रमैत्रीणींना भेटायचे विसरू नका. स्थानिक स्थल दर्शन जरुर करा. दर दोन दिवसांनी एखाद्या ठिकाणी मुक्काम करुन सहल अविस्मरणीय बनवा,
प्रतिक्रिया
29 Oct 2023 - 1:21 pm | अनिकेत वैद्य
मलाही अशी ट्रिप करायची इच्छा आहे.
29 Oct 2023 - 1:36 pm | मोदक
नेमकी काय माहिती हवी आहे?
तुम्ही पूर्वी अशा ट्रिप केल्या आहेत का?
कोणती गाडी आहे? सोबत कोणत्या वयाचे सहप्रवासी आहेत? त्यातले किती जण गाडी चालवू शकतात?
रूट ठरवला आहे का? हाताशी किती दिवस आहेत?
29 Oct 2023 - 8:10 pm | Nishantbhau
प्रवास एकट्यानेच करायचा आहे. एका दिवसात 300-400 किलोमीटर पेक्षा जास्त कधी प्रवास केला नाही. Nexon पेट्रोल कार आहे.
प्रवास किनार पत्ती जवळून करायचा आहे.
प्रवासाची तयारी कशी करावी. माझ्या कडे २ महिन्याचा तयारी साठी वेळ आहे. आधी कोणत्या प्रॅक्टिस साठी ट्रीप कराव्या का? काही suggestion.
8 Nov 2023 - 8:53 pm | मोदक
एकट्याने का जात आहात.. चार मित्र सोबत घेउन जा. गाडी पंक्चर झाली तर मदतीला कोणीतरी हवे की.. ;)
२०२२ आणि २०२३ ही दोन वर्षे स्वतःच्या कारने ५५०० किमी + असा वेगवेगळ्या रुटने कन्याकुमारी प्रवास केला आहे.
२०१७ साली बुलेटने पुणे ते कन्याकुमारी गेलो होतो...
त्यामुळे तुम्हाला माहिती देऊ शकतो.
पण तुमची एकट्याने कन्याकुमारीला जाण्याची (ती पण कारने!) कल्पना फारच धाडसी वाटत आहे.
29 Oct 2023 - 8:01 pm | कंजूस
ट्रिपचा उद्देश काय आहे?
पर्यटन? किंवा दूरवरचे ड्राईविंग ?
किनारपट्टी पकडूनच जायचे आहे का?
गोव्यातील भाग माहीत असेलच.
कर्नाटकसाठी sakre cubes
केरळसाठी Shashank voyages YouTube videos पाहा.
29 Oct 2023 - 8:13 pm | Nishantbhau
सुरक्षित पणे दक्षिण भारत explore करणे. पर्यटन. खूप commercial ठिकाणा मध्ये interested नाही.
29 Oct 2023 - 9:53 pm | रंगीला रतन
निशांतभाऊ ६ वर्ष १० महिणे झाले तुम्हाला मिपावर येऊन.
सहा वर्षात एकतरी भटकंतीचा धागा काढला का तुम्ही?
एक व्हाट्सअँप वरचे फालतू मेसेज जमा करून धागे काढनारा मिपाकर आहे. तुम्ही दुसरे.
रच्याकने तुमचा मित्र लईच डेरिंगबाज ब्वा. मुंबईत रात्री ९ ला उतरून पुण्याला यायला निघायचा म्हंजे लईच हिम्मतवान माणूस.
आता तुम्ही एकटे निघून राहिले कन्याकुमारी साठी? तुमच्या डेरिंबाज मित्राला सोबत घ्या की शेट.
अशे भिकार धागे काढणारे एक बावळट आणि त्यावर प्रतिसाद देणारे हजार बावळट :=)
चालू द्या तुमचा आम्ही मजा घेतो खुफियापंतीची :=)
31 Oct 2023 - 5:13 pm | चौथा कोनाडा
हा .... हा .... हा .... !
29 Oct 2023 - 10:16 pm | कंजूस
पूर्वीच्या आरकुटची आठवण येते.
अशा पोस्टी तिकडे मेन बोर्डावर टाकल्या की कुठून कुठून सल्ले येत असत.
आता reddit आहे. r/Pune thread वर विचारा.
31 Oct 2023 - 5:16 pm | चौथा कोनाडा
आता लोक फेसबुक / फेसबुक समुहावर सुद्धा असले घागे काढतात.
पुरेसे वाचन न करता / ट्रॅव्हलॉग व्हिडीओज न बघता थेट माहिती विचारतात.
त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते.
29 Oct 2023 - 10:23 pm | रंगीला रतन
reddit फालतू आहे हो शेट पण इतके पण फालतू नाही जेवडे निशांतभाऊ चे धागे :=))
31 Oct 2023 - 8:28 am | Nishantbhau
सर तुम्ही फार judgmental comments देत आहात. असो. मी आयुष्यात किती फिरलो किंवा काय काय केलं हे इतरांना सांगायलाच पाहिजे हे गरजेचं नाही.
मुंबई पुणे प्रवास म्हणाल तर बरेच परदेशात राहणारे लोक असा प्रवास करताना थोडा जास्त विचार करतात. आणि थोडी फार मदत घेतली चार लोकांचे अनुभव ऐकून मग निर्णय घेतला तर बिघडले कुठे?
मला स्वतला सुद्धा चार लोकांचे अनुभव ऐकून प्लॅनिंग करायला आवडतं. आणि त्यात गैर काही वाटत नाही.
31 Oct 2023 - 10:20 pm | मुक्त विहारि
सहमत आहे...
आणि तसेही, कठीण समय येता, मिपा कामास येते....
31 Oct 2023 - 2:15 pm | चांदणे संदीप
मी आणि अजून पाच डोकी 'तवेरा' या गाडीने कन्याकुमारीला जाऊन आलोय. पाचमधले दोन ड्रायव्हर होते. पण ८०% ड्रायव्हिंग एकानेच केलेली.
नॅशनल हायवे नंबर १७ तुम्हाला घेऊन जाईल कन्याकुमारीपर्यंत. अगदी किनारपट्टीजवळून जाणारा हायवे आहे. तेव्हा खूपच लहान होता. आताची परिस्थिती माहिती नाही. किनारपट्टीजवळून जातो हे महत्वाचे. केरळातून जाताना एक विशेष गोष्ट जाणवते ह्या हायवेवरून. कोणी गेले असल्यास व्यनि करा. परतीचा प्रवास आम्ही, मदुरै, कोडाईकनाल, उटी, म्हैसूर,असा केलेला, सोबत नकाशे घेऊन. गुगल मॅपची चैन त्याकाळी नव्हती. :)
सं - दी - प
31 Oct 2023 - 9:20 pm | टर्मीनेटर
नशीबवान आहात की २०% ड्रायव्हिंग तरी अन्य कोणी केली होती!
मुंबई ते तिरुपती जाण्याचा अगोचरपणा आम्ही २०१६ मध्ये केला होता, बरोबर ४ जण होते पण ड्रायव्हर एकटा मीच. त्यावेळी 'मांडीला' आलेले मोड आठवले की आज पण हुळहुळते 😀
असो, धागाकर्त्याला सोलोट्रिप साठी शुभेच्छा!
(लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा)
31 Oct 2023 - 5:21 pm | चौथा कोनाडा
नियंत्रित सुरक्षित वेगाने सकाळच्या वेळी २०० किमि + दुपार नंतर १५०-२०० किमि पेक्षा जास्त वाहन चालवू नका.
यादी प्रमाणे सर्व साहित्य (यात प्रथमोपचार डबा, औषधे आलीच) , थांबायची ठिकाणे, फोन क्र. + आडचणीत हमखास उपयोगी माणसे, भ्र.क्र. इत्यादि हाताशी असेल असे बाळगा. गावोगावच्या मित्रमैत्रीणींना भेटायचे विसरू नका. स्थानिक स्थल दर्शन जरुर करा. दर दोन दिवसांनी एखाद्या ठिकाणी मुक्काम करुन सहल अविस्मरणीय बनवा,
ऑल दि बेष्ट !
31 Oct 2023 - 10:00 pm | तुषार काळभोर
गंतव्य ठिकाणाएवढेच, कदाचित अधिक संस्मरणीय अनुभव प्रत्यक्ष प्रवासात मिळतात.
1 Nov 2023 - 8:32 am | राजेंद्र मेहेंदळे
अजुन मजा येईल. निवांतपणे वाटेतील गावे/शहरे अनुभवता येतील, फक्त तितकी सुट्टी असली पाहिजे.
सल्ला फाट्यावर मारायला हरकत नाही, माझे ते स्वप्न आहे म्हणुन बोल्लो.(पुणे-कन्याकुमारी-पुणे सायकल ट्रिप)