गाभा:
विश्वचषकाचा खरा रोमांच आजपासून सुरु होत आहे. रोहीटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाशी आज भारतीय प्रमाण वेळीस भिडली.ऑस्ट्रेलियाचा संघ १९९ वर कोसळला आणि भारतीय संघ सहज जिंकेल असे वाटले होते. पण ०२ धावांवर आपण ०३ विकेट्स गमावल्यावर भारतीय संघाच्या नावाने बोटे मोडली पण पुढे कोहली आणि के.एल.रावल्याने डाव सांभाळलाच नाही तर विजयाच्या दिशेने संघाला घेवून निघाले आहेत. ३३ षटकात १३९ धावांवर ०३ बाद ही संख्या आहे. संघ विजयी होईल त्यासाठी शुभेच्छा.
वेळापत्रक संपादक धाग्यात टाकतील आणि मिपाकर रनींग कॉमेंट्री करीत धाग्याला क्रिकेट विश्वविजेता होईपर्यंत धावता ठेवतील अशी अपेक्षा.
गुणतालिका अपडेट दि. १३-११-२०२३
Teams | Mat | Won | Lost | Tied | NR | Pts | NRR |
---|---|---|---|---|---|---|---|
India (Q) | 9 | 9 | 0 | 0 | 0 | 18 | 2.57 |
South Africa (Q) | 9 | 7 | 2 | 0 | 0 | 14 | 1.261 |
Australia (Q) | 9 | 7 | 2 | 0 | 0 | 14 | 0.841 |
New Zealand (Q) | 9 | 5 | 4 | 0 | 0 | 10 | 0.743 |
Pakistan (E) | 9 | 4 | 5 | 0 | 0 | 8 | -0.199 |
Afghanistan (E) | 9 | 4 | 5 | 0 | 0 | 8 | -0.336 |
England (E) | 9 | 3 | 6 | 0 | 0 | 6 | -0.572 |
Bangladesh (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.087 |
Sri Lanka (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.419 |
Netherlands (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.825 |
प्रतिक्रिया
8 Oct 2023 - 9:12 pm | प्रचेतस
भारताचा पहिलाच सामना चुरशीचा होतोय, चेन्नईच्या मैदानात पडणाऱ्या दवामुळे कांगारूंना फिरक मिळत नाहीये, पिच थोडे सोपे झालेय असे दिसते.
8 Oct 2023 - 9:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारताची विजयी सुरुवात. धाग्यावर येत राहीन...भारताला विजेता होण्यासाठी शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
8 Oct 2023 - 9:58 pm | अमरेंद्र बाहुबली
क्रिकेट विश्वचषक सुरू झालाय (खरं तर अडाच तीनशे देशातील इन मीन दहा पंधरा देश खेळतात त्याला विश्वचषक म्हणावे का? असो.) ह्यावेळेस हवी तशी क्रेझ पहायला मिळत नाहीये ह्याचा आनंदं आहे. लोकांना स्वतचा वेळ वाया घालवून क्रिकेटरांना पैसे कमावून देण्यापेक्षा स्वत पैसे कमवावे हे कळू लागलेय. हे क्रिकेटर कठीण काळात लोकांना किती मदत करतात हे कोरोना काळात दिसलेच. तथाकथीत देवाने बरीच टीका झाल्यावर नाईलाजाने पन्नास लाख दिले होते.
क्रिकेट भक्तांनी क्रिकेट चा आनंदं स्वत पुरता ठेवावा, पण तसं होत नाही, ऊगाच परिसनल मॅसेज पाठवून क्रिकेट न आवडनार्यांना त्रास देणे, सोमीवर क्रिकेट शी संबंध नसलेल्या समुहात ऊगाच वाह्यात सारखे मॅसेज टाकणे, कुणीही दिसलं की स्कोर विचारणे, अमूक अमूक खेळाडून ह्या मैदानात अमूक अमूक काहीतरी फालतू रेकोर्ड केला असं पर्सनला पाठवणे, ह्यामुळे कधी एकदा ही स्पर्धा संपते किंवा भारतीय संघं बाहेर पडतो असे होते. भारतीय संघं बाहेर पडला की शांतता होते असा अनूभव आहे. काहींना क्रिकेट खेळाच्या वेळेस देशप्रेमाच्या ऊबाळ्या येतात. इतर खेळ चालू असतील तर हे देशप्रेम कुठे जाते कळत नाही. ओलींपींक मध्ये पदकं मिळाले नाही तरी अनेक क्रिकेट भक्तांना काहीही फरक पडत नाही. ना त्याचं दुख असतं ना शरम.
असो. ह्या धाग्याला शुभेच्छा. ज्यांना आवडतं त्यांनी नक्की आनंदं घ्यावा फक्त इतरांना ऊगाच त्राय देऊ नये.
9 Oct 2023 - 9:37 pm | कानडाऊ योगेशु
सहमत. ह्यावेळीला एशियन गेम्स ही सुरु असल्याने नीरज चोप्राचा खेळ पाहत होतो.
पारुल चौधरी ची धाव परत परत पाहिली.
क्रिकेट च्या कोणत्या मॅचेस सुरु आहेत ह्याबाबत काहीही उत्सुकता नव्हती.
९२ च्या ऑस्ट्रेलियातिल विश्वचषकाच्या वेळी पहाटे उठुन सामना पाहत असायचो पण आता क्रिकेट बद्दल तितकीशी आस्था उरली नाहीये.
9 Oct 2023 - 11:14 pm | कर्नलतपस्वी
Crickets are orthopteran insects which are related to bush crickets, and, more distantly, to grasshoppers.
मला यांना बघायला आवडते.
10 Oct 2023 - 10:05 am | अमरेंद्र बाहुबली
खिक्क.
8 Oct 2023 - 10:23 pm | कर्नलतपस्वी
शानदार, धुवाधार.
पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा.
9 Oct 2023 - 12:03 am | पर्णिका
भारताची मस्त शानदार सुरुवात !
के एल राहुलचे शतक झालं असतं तर अजून छान वाटले असते :)
9 Oct 2023 - 11:12 am | साहना
वर्ल्ड कप असणारे लोकप्रिय खेळ मोजकेच आहेत आणि त्यांत क्रिकेट वरच्या नंबरवर आहे. क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये १० टीम्स असतात तर फिफा मध्ये ३२. पण क्रिकेट मध्ये अनेक प्रकारचे वर्ल्ड कप आहेत. बेसबॉल मध्ये एकूण १६ टीम्स वर्ल्ड कप मध्ये भाग घेतात. क्रिकेट खेळाचे मॅनजेमेंट आणि खर्च अवाढ्यव्य आहे त्यामुळे योग्य ते स्पॉन्सर्स नाहीत तर आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅच ठेवणे अशक्य आहे. स्पॉन्सर्स हवे तर खूप लोकांनी तो सामना पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे वर्ल्ड कप हा फक्त दहा टीम्स चा ठेवला जातो.
मला क्रिकेट खेळ आवडत नाही पण भारत देशांत ज्या काही सर्वोत्कृष्ट गोष्टी आहेत त्यांत क्रिकेट आणि BCCI छान गोष्ट आहे. जाणकारांच्या मते बाळ हिप्पो ने BCCI ची बऱ्यापैकी वाट लावली आहे पण लोक त्याबद्दल बोलायला घाबरतात. (राजकीय विषयास बंदी असल्याने इथे नाव घेत नाही).
ह्या वर्षाचा वर्ल्ड कप सर्वांत मोठा फ्लॉप ठरेल असे भाकीत ads क्षेत्र बोलून दाखवत आहे. सर्वप्रथम म्हणजे चुकीचा दिवशी आणि चुकीच्या स्थानी सामने खेळवले जात आहेत. ओपनिंग चा सामना सुट्टीच्या दिवशी ठेवला नाही. ओपनिंग सेरेमनी ठेवला नाही. व्यवस्थित संगीत, नृत्य वगैरे ठेवून ओपनिंग केले नाही. (ह्याची कारणे राजकीय मानली जात आहेत). ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांतून भरपूर पर्यटक यावेत ह्यासाठी योग्य पद्धतीने मार्केटिंग केले नाही , विमानसेवा सोबत काम करून चार्टर प्लेन्स , हॉटेल पॅकेजेस वगैरे सर्व काही किमान एक वर्ष आधी केले पाहिजे होते. ह्या सर्व गोष्टींसाठी ह्या कन्सल्टिंग कंपन्या कामाला लावल्या पाहिजे होत्या त्या न लावता आपल्या धंदोमॅक्स मंडळींना पुढे काढण्यात आले. ह्या वर्ल्ड कप चे मास्कोट अत्यंत भिकार आहेत. कुणी तरी शालेय गॅदरिंग मधील पोरांनी विचित्र कपडे घालावेत असले काही.
ज्यांना खेळाची आवड आहे त्यांना शुभेच्छा, मी ads क्षेत्राशी संबंधित असल्याने भरपूर धन प्राप्ती व्हावी हीच मनीषा.
9 Oct 2023 - 12:19 pm | अमरेंद्र बाहुबली
वरील प्रतिसादाशी काहीसा असहमत.
वर्ल्ड कप असणारे लोकप्रिय खेळ मोजकेच आहेत आणि त्यांत क्रिकेट वरच्या नंबरवर आहे. >>>>>
भारतीय ऊपखंड सोडला तर इतर देशात क्रिकेटला फारसा जनाधार नाही. तथाकथीत देवाला ही मारीया शारापोवा ने “हा कोण?“ असं विचारून दाखवलं होतं क्रिकेटचं महत्व. त्यामुळे वरच्या नंबरवर ह्या शब्दास आक्षेप.
क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये १० टीम्स असतात तर फिफा मध्ये ३२.
>>क्रिकेट मधल्या दहा टिम्स मध्ये अनेक टिम्स काहीही कामाच्या नसतात. सध्या फक्त द. आफ्रीका, न्यूझीलॅंड, इंडीया, पाक, लंका, इंग्लंड, ओस. ह्या ७ टीम फक्त खेळण्यालायक आहेत. इतर टीम गर्दी वाढवावी म्हणून आणल्या जातात. ह्याऊलट फूटबोलच्या ३२ टीम मध्ये पात्र व्हायला प्रचंड स्पर्धा असते. भारत आजपर्यंत पात्र झाला नाहीये. अमेरीकेच्या बाजूला फक्त ६० हजार लोकसंख्या असलेला देशही पात्र झाला होता.
क्रिकेट खेळाचे मॅनजेमेंट आणि खर्च अवाढ्यव्य आहे त्यामुळे योग्य ते स्पॉन्सर्स नाहीत तर आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅच ठेवणे अशक्य आहे.
फुटबाॅलच्या तुलनेत नगण्य खर्चय. परत मध्ये मध्ये प्रत्येक ओवर नंतर, विकेट नंतर जाहीरात दाखवता येते. खरंतर स्पोन्सर्स नाहीत कारण खेळाला भारत सोडला तर इतर देशात कुत्रं विचारत नाही.त्यामुळे वर्ल्ड कप हा फक्त दहा टीम्स चा ठेवला जातो.
चुक. दहाच्या वर टीम्स घ्यायला देशही ऊत्सूक हवेत खेळायला. इतर देशात ह्या खेळाबद्दल जराही ऊत्सूकता नसते. ते संघच पाठवत नाहीत. त्यामुळे इच्छा असूनही आयसीसी १० च्या वर संघं आणू शकत नाही. त्यामुळे आयर्लंड, अफगानीस्तान असले पांचट संघ आणून मॅचेस भरवल्या जातात.मला क्रिकेट खेळ आवडत नाही पण भारत देशांत ज्या काही सर्वोत्कृष्ट गोष्टी आहेत त्यांत क्रिकेट आणि BCCI छान गोष्ट आहे.
आजीबात नाही. क्रिकेट ही भारताला लागलेली कीड आहे. क्रीकेटमुळे इतर खेळांना नी खेळाडूंना प्रसिध्दी मिळत नाही. धनराज पिल्लेंना तर घरासाठी वनवन फिरावं लागलं होतं. सरकारने पदक जिंकल्यावर धोषणा केली होती पण घर काही दिलं नाही. त्यांना घर बाळासाहेबांनी मिळवून दिले. त्यामुळे इतर क्षेत्रात खेळाडू करीअर करण्यास धजावत नाही. त्या मुळे चार दोन पदकं मिळाले तरी आपण ऊड्या मारतो.
बाकी बाळ हिप्पो तिथे समाजसेवा, देशसेवा,खेळसेवा करायला गेलेला नाहीये. त्यामुळे त्याच्या कडून अपेक्षा ठेऊ नयेत. तसेच पवार बीसीसीआय चे अध्यक्ष झाल्यावर “राजकारणई खेळात नको“ म्हणबन ओरडनारे आता बाळ हिप्पोला पाहून वाळूत मान खुपसून बसलेत.
10 Oct 2023 - 10:51 am | विजुभाऊ
क्रिकेट चा समावेश अशा स्पर्धांमधे व्हावा अशी आय सीसी चीच इच्छा नाहिय्ये.
यात आर्थीक हितसंबंध गुंतलेले आहेत.
आयपील च्या स्पर्धा भरवता याव्यात म्हणून या एशियाड मधे २०-२० चा समावेश केला गेला नाही.
आयसीसी चे सोडा पण जी बीसीसीआय भारताचे प्रतिनीधीत्व करते ती खाजगी संस्था आहे. सरकारचे ( खेळ मंत्रालयाचे ) त्यावर काहीच नियंत्रण नाही
10 Oct 2023 - 1:22 pm | अमरेंद्र बाहुबली
प्रतिनीधीत्व करते ती खाजगी संस्था आहे. सरकारचे ( खेळ मंत्रालयाचे ) त्यावर काहीच नियंत्रण नाही
हेच. बीबीसीआय चा संघ जिंकला किंवा हरला तर देशप्रेमाच्या ऊबाळ्या येनार्यांना हो लक्षात येत नाही.
12 Oct 2023 - 6:03 am | साहना
> आयसीसी चे सोडा पण जी बीसीसीआय भारताचे प्रतिनीधीत्व करते ती खाजगी संस्था आहे. सरकारचे ( खेळ मंत्रालयाचे ) त्यावर काहीच नियंत्रण नाही
म्हणूनच क्रिकेट हा खेळ भारतांत लोकप्रिय आहे, लक्षावधी लोकांना रोजगार पुरवतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा आहे. मंत्रालयाच्या नादि असता तर कधीच हॉकी प्रमाणे खेळाडू भीक मागताना दिसत आले असते.
भारताचे जितके खेळ बजेट नाही त्या पेक्षा जास्त कर BCCI भरते. त्याशिवाय भारत सरकार दूरदर्शन साठी फुकट हक्क घेऊन काही हजार कोटी लुबाडते ते वेगळे.
9 Oct 2023 - 4:41 pm | नठ्यारा
साहना,
माहितीबद्दल धन्यवाद ! जाल शोधल्यावर हा एक इंग्रजी लेख मिळाला : https://www.aljazeera.com/sports/2023/10/2/fans-frustrated-icc-cricket-w...
- नाठाळ नठ्या
12 Oct 2023 - 6:10 am | साहना
बाळ हिप्पोने बरीच वाट लावली आहे. मैदाने अत्यंत खराब स्थितीत आहेत. अनेक ठिकाणी खुर्च्या पक्ष्यांच्या विष्ठेने भरलेली आहेत. काही ठिकाणी खुर्च्या अश्या जागी आहेत जिथून मैदान ठीक दिसत सुद्धा नाही.
पाकिस्तान ने भारतांत येऊच नये अशी काही लोकांची भूमिका होती. बाळ हिप्पो हा तथाकथित राष्ट्रवादी प्रखर देशभक्त पार्टीचा असल्याने त्यांच्यावर बरीच टीका होत होती तेंव्हा बाळ हिप्पोच्या PR तंत्राने अशी अफवा पसरवली होती कि ICC इव्हेंट असल्याने भारत पाकिस्तान संघाला प्रवेश नाकारू शकत नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांना घ्यावे लागले. पण आता अत्यंत महत्वप्रयासाने भारत पाकिस्तान सामना हा महामानवाच्या नावावर निर्माण केलेल्या मैदानावर ठेवला आहे. त्याशिवाय उद्धघाटनाला काहीही समारोह नसला तरी हाय सामन्याला मोठा अरिजित वगैरे लोकांना बोलावून कोर्क्येष्ट्रा, थोर सनातन संस्कृतीला साजेसा नेहमीचा लेझर शो, अमिताभ, रजनीकांत इत्यादींना बोलावून दिवाळी दसरा असल्या प्रमाणे मॅच साजरी होणार आहे.
ह्या मैदानावर पाकिस्तान ने भारतीय संघाचा धुव्वा उडवून विजय मग काश्मीर साठी डेडिकेट नाही केला म्हणजे मिळवली.
12 Oct 2023 - 8:11 am | रात्रीचे चांदणे
दर्जा chyaa बाबतीत भारतीय संघ फारच उजवा आहे. पण तरीही कोणीही जिंकू शकतो. पाकिस्तानी नी विजय विजय काश्मीर साठी डेडिकेट केला तर वर्ल्ड कपच्या तिकिंसाठी तो turning point ठरेल. त्यांनी श्रीलंके विरुद्धचा विजय गाझा ला डेडिकेट केलाच आहे. आजच्याच टाइम्स मधली बातमी आहे टीव्ही चा खप भरपूर वाढला आहे तोही पितृपक्ष असताना.
हिप्पो साठी काहीही सहानुभूती नसली तरीही मैदानात खुर्च्या कशा आणि कुठे लावाव्यात ह्यात तो लक्ष घालित असेल असे वाटत नाही.
12 Oct 2023 - 11:57 am | अमरेंद्र बाहुबली
हिप्पो साठी काहीही सहानुभूती नसली तरीही मैदानात खुर्च्या कशा आणि कुठे लावाव्यात ह्यात तो लक्ष घालित असेल असे वाटत नाही.
हाॅस्पीटलमध्ये पेशंट मेले तर डीन किंवा आरोग्य मंत्रालयाला थोडीच जबाबदार धरायचे असते. ते स्वतः थोडीच येऊन ऊपचार करतात.
लोजीक वारले.
12 Oct 2023 - 1:54 pm | रात्रीचे चांदणे
हेच लॉजिक असेल तर रोज राजीनामेच घ्यावे लागतील. पोलिसांनी लाच घेतली घ्या ग्रह आणि मुखमंत्रीचा राजीनामा आणि घ्या निवडणुका.
12 Oct 2023 - 3:09 pm | अमरेंद्र बाहुबली
पोलिसांनी लाच घेतली घ्या ग्रह आणि मुखमंत्रीचा राजीनामा आणि घ्या निवडणुका.
मुख्यमंत्र्याने राजीनामा दिला तर निवडणूका घ्याव्या लागतात? विचीत्रच प्रकार म्हणायचा हा.
11 Oct 2023 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या सामन्यांमध्ये श्रीलंकेचे दोन शतक झाल्यानंतर श्रीलंखेचा पराभव शक्य नाही असे वाटले. ३४३ मोठा स्कोर होता. हसन आली आणि समर विक्रा यांची शतकं जबरा होती. पाकिस्तान जिंकणार नाही असे समजून चाललो पण अब्दुल्ला शफिक आणि रिजवान यांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने लीलया विजय मिळवला अर्थात श्रीलंकेची सुमार गोलंदाजी आणि सुमारक्षेत्ररक्षणाचा यात फार मोठा हातभार होता यात काही शंका नाही
आज आपण अफगाणिस्तान बरोबर भिडणार आहोत आपण त्यांच्या लेव्हलवर जाऊन खेळतो की एकतर्फी विजय मिळवतो हे आज दुपारच्या सामन्यात कळेलच तेव्हा भेटूया दुपारी.
-दिलीप बिरूटे
11 Oct 2023 - 5:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण त्या त्या संघाच्या लेवलवर जाऊन खेळतो हे मला फार्फार आवडे. अफगानिस्थान २३७ वर ०७ आंणि ४५. ५ षटकं झालेली आहेत. आपण जिंकु पण आपला गोलंदाजीचा सराव सुरु असल्यासारखी गोलंदाजी वाटली. सामना जिंकूच असे वाटते.
-दिलीप बिरुटे
11 Oct 2023 - 5:47 pm | रात्रीचे चांदणे
एकदमच पाटा पीच बनवलं तर गोलंदाज तरी काय करणार. कदाचित आपण ४० ओवर्स मध्येच मॅच जिंकू. ह्याच स्टेडियमवर आफ्रिकेने ४२८ केले होते.
11 Oct 2023 - 6:15 pm | प्रचेतस
अफगाण संघ जिद्दीचा आहे. ,प्रयत्न करतील पण शेवटी जिंकणार तर भारतच.
11 Oct 2023 - 7:25 pm | प्रचेतस
हाणतोय रोहित
12 Oct 2023 - 1:22 pm | प्रचेतस
आजची दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मालिका एकदम उत्कंठावर्धक होईल असे वाटते. दोन्ही संघ जवळपास तुल्यबळ आहेत.
12 Oct 2023 - 8:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दक्षिण आफ्रिका एकतर्फी जिंकतेय असे वाटते. ३१७ च्या धावसंखेला लढतांना ऑस्ट्रलिया थकून गेली आहे. ३३ षटकात,१३४ धावसंख्या गाठतांना ६ मोहरे गळाले आहेत.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची तिकीट संपूर्ण विकल्या गेली आहेत. आणि मैदाने रिकामे आहेत. विश्वचषकाचं वातावरण अजिबात वाटत नै ये..
-दिलीप बिरुटे
(विश्वचषक क्रिकेटमधील मरगळ आलेला रसिक)
13 Oct 2023 - 5:40 am | प्रचेतस
एकेकाळच्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाची फारच वाईट स्थिती झालेली दिसते. एकतर्फी हरताहेत.
14 Oct 2023 - 3:14 pm | प्रचेतस
पाकडे ७५/२
14 Oct 2023 - 4:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाबरचा खेळ पाहता पाक संघ पाश्शे करतो की काय असे वाटत आहे. पाटा पीचेस आहेत. १५४ धावसंखेवर ०२ बाद आहेत. आपली गोलंदाजी म्हणजे सगळं देवभरोसे आहे.
बात करते रहेंगे.
-दिलीप बिरुटे
14 Oct 2023 - 4:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद पूर्वप्रकाशन मोड़ मधे होता तेव्हाच बाबरची ५० वर दांडी गुल झाली. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
-
14 Oct 2023 - 5:15 pm | प्रचेतस
नऊ गेले, पाकड्यांकडे आज टीव्ही फुटतील काय,?
14 Oct 2023 - 6:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१९२ च्या किरकोळ धावसंखेसाठी आपण किती आणि कोणत्या मोहरे डावावर लावतो ते आता कळेलच. प्रतिसाद लिहितांना गील १६ धावांवर, गुलगुले खाण्यासाठी पॅव्हेलियनमधे परतला आहे.
उग्रसेन आपल्याला कामाला लावून मस्त मजा पाहात आहे. अवघड आहे.
-दिलीप बिरुटे
14 Oct 2023 - 6:34 pm | प्रचेतस
रोहित आणि कोहली चांगले खेळताहेत, तुम्हाला टीव्ही बघत बघत न जेवता आरामात घरच्यांशी गप्पा मारत जेवण करता येईल असे दिसते.
14 Oct 2023 - 6:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोली, धावबाद होता होता वाचला होता. मस्त लालीपॉक दिला. ८५/०२ आता श्रेयस... श्रेयसला सुरुवातीलाच अवघड प्रश्न आल्यामुळे गडबड़तोय. श् देहबोली पाहता याचं ग्राउंडवर काही मन लागेल असे दिसत नै. उभा राह आणि धीर धर रे भावा.
-दिलीप बिरुटे
14 Oct 2023 - 6:55 pm | प्रचेतस
श्रेयस कधीच भरवशाचा वाटत नै. रोहितने लवकर मॅच संपवावी, सॅटर्डे नाइट आउटचा प्लान आहे.
14 Oct 2023 - 6:35 pm | प्रचेतस
तरीही धागा काढल्याबद्दल उग्रसेन यांचे आभार.
14 Oct 2023 - 7:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
के एल रावल्या आणि श्रेयस लैच टुकुटुकु खेलू लागले. २० धावा विजयासाठी हव्या आहेत.
-दिलीप बिरुटे
14 Oct 2023 - 8:26 pm | मुक्त विहारि
हिंदुस्तान जिंकला
पाकडे हरले
कप मिळो की न मिळो, आतंकवादी हरले
14 Oct 2023 - 9:04 pm | अमरेंद्र बाहुबली
इतक्या पांचट सामन्याला मुर्ख मिडीया महायुधदध्द म्हणतंय.
14 Oct 2023 - 9:22 pm | मुक्त विहारि
तुम्ही नका लक्ष देऊ...
14 Oct 2023 - 9:26 pm | धर्मराजमुटके
तरी बरं ! आजचा सामना नरेंद्र मोदी स्टेडीयम वर झाला म्हणून पाकीस्तान हारले. तोच सामना राजीव गांधी स्टेडीयमवर खेळला असता तर पाकीस्तानी संघ नक्कीच जिंकला असता :)
हा प्रतिसाद तिकडे १०१ वा प्रतिसाद म्हणून टाकावा काय :)
14 Oct 2023 - 9:29 pm | अमरेंद्र बाहुबली
हसून हसून वाट लागली. बर्याच दिवसांनी पोटभर हसलो. नक्की टाका तिकडे. :)
14 Oct 2023 - 10:35 pm | मुक्त विहारि
आतंकवादी पाकिस्तान हरल्याशी मतलब..
19 Oct 2023 - 8:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज होणा-या भारत आणि बांग्लादेश लढतीत आपण जिंकू असे वाटते. आपली विश्वचषक क्रिकेट सामन्यात दिसावी अशी विशेष चुनुक अजुनही दिसत नाही. विश्वचषकाकड़े जायचं तर, स्तर सामनागणिक उंचावला पाहिजे, असे वाटते.
-दिलीप बिरुटे
19 Oct 2023 - 4:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बांग्लादेश १३६ वर ०४ ..अजुन १५० धावा झाल्या तर रंगतदार सामना होईल...
-दिलीप बिरुटे
19 Oct 2023 - 4:15 pm | तुषार काळभोर
पहिल्या तेरा चौदा ओव्हर्स.
20 Oct 2023 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इतिहासातील आठवण म्हणायची तर, भारतीय संघाचं वर्ल्डकपमधलं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आणलेल्या बांगलादेशाला त्या घटनेला आता सोळा वर्ष झाली. मात्र, किरकोळ वाटणारे संघ जेव्हा असे, मुक्कामार देतो त्याचे व्रण-वळ अनेक वर्ष जात नाहीत. बाय द वे, काल मात्र बांग्लादेशाची वाट लागली. पन्नास षटकात आठ फ़लंदाजाच्या बदल्यात २५६ हा काही फ़ार मोठा स्कोर नव्हता. क्रिकेट अनिश्चिताओ का खेल जरी असला तरी, आपली फ़लंदाजी पाहता हे सहज जमून जाईल म्हणुन आपण निवांत होतो. आणि तसेच झाले.
रोहीट ४८, गिल, ५३, कोल्याच्या विराटची शतकी फ़लंदाजी नाबाद १०३, अय्यर १९, आणि लोकेश रावल्या नाबाद ३४ ने आपण सहज जिंकलो. विराट कोल्याने शेवटी शंभरला घेतलेला वेळ आणि तगमगीने आमच्या मिपाकर मित्राने संघ भावना महत्वाची की व्यक्तीगत फलंदाजी रेकॉर्ड महत्वाचे यावर दळण टाकलं पण मी काही लक्ष दिलं नाही. विजय महत्वाचा.
तर, चार सामने जिंकून आपण नेट-रनरेटात दुस-या स्थानावर आहोत. न्युझीलंड पहिल्या स्थानावर आहे. इंडिया, न्युझीलंड, द. आफ्रिका, पाकिस्तान, इग्लंड आणि नेदरलँडस हे टॉपवर राहतील असे वाटते. बाकी सविस्तर अधुन मधून बोलत राहूच.
-दिलीप बिरुटे
20 Oct 2023 - 10:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिंक.
च्यायला, संपादकांनी टेबलं, तक्ते, खेळाडू, छायाचित्रे, असे दलन मुख्य धाग्यात टाकायला पाहिजे. मान्य की लै कामं असतात. आणि मोफतच्या संस्थळावर फार अपेक्षा ठेवू नये वगैरे. पण लाजे काजे काही गोष्टी काही केल्या पाहिजेत असे वाटते. :/
-दिलीप बिरुटे
(स्पष्ट)
20 Oct 2023 - 10:20 am | गवि
छान आहे प्रतिसाद.
या कपच्या आतापर्यंतच्या सामन्यांत चुरशीची किंवा "नेल बायटिंग" असे ज्याला आंग्ल भाषेत म्हणतात तशी मॅच भारताची तरी एकही झाली नाही. सर्व वेळी सहज, निश्चित आणि एकतर्फी मॅच झाली. समोरच्याचा धुव्वा.
अर्थात अटीतटीची मनोरंजक मॅच बघायला मिळावी म्हणून पराभवाच्या जवळ जाऊन रिस्क नकोच. त्यापेक्षा आपली पोझिशन अधिकाधिक मजबूत करत जाणारी सध्याची तुफानी खेळी चांगलीच.
भारतीय संघ unstoppable म्हणतात तसा घोडदौड करत निघाला आहे. आनंदपूर्वक शुभेच्छा.
वैयक्तिक विक्रम विरुद्ध संघाचे हित हा मुद्दा आहेच महत्वाचा. "चक दे इंडिया" मधील कोमल चौताला आणि प्रीती सब्रवाल अशा वेळी नेहमी आठवतात. जेव्हा शेवटी कोमल स्वतःच्या वैयक्तिक गोलसंख्येचा मोह सोडून भारताच्या हितासाठी प्रीतीकडे बॉल पास करते तेव्हा अक्षरशः आनंदाश्रू येतात डोळ्यात.
कालच्या मॅचशी थेट तुलना होऊ शकत नाही. पण कोहलीने हा बॅलन्स साधण्याचा काहीसा प्रयत्न केला. एकीकडे व्यक्तिगत शतक हुकते की काय ही अस्वस्थता दिसत होती. असा हुकमी सिक्स दोन्हीपैकी नेमका कोणत्या हेतूने आला ते आता सांगणे कठीण. पण त्याने इतर टीमसोबत मिळून मोठा विजय साध्य केला. अभिनंदन.
20 Oct 2023 - 4:16 pm | प्रचेतस
कांगारुंनी पाकड्यांना चांगलंच झोडलेलं दिसतंय.
22 Oct 2023 - 10:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आफ्रिकेने काल इंग्लंडला धु धु धुतले. आफ्रिकेने पन्नास षटकात सात बाद ३९९ धावांचा डोंगर उभा केला आणि प्रत्युत्तरात इंग्लंड १७० धावात झोपले. आफ्रिकेच्या क्लासेनचं क्लास शतक पाहण्यासारखं होतं.
आज धरमशालात आपण न्युझीलंडला भिडू आज आपली खास परिक्षा आहे. इतक्या दिवस सोपे पेपर होते आज खरी परिक्षा असेल. आपला संघ सध्या फार्मात आहे. चार-पाचशे धावा काढू शकतो असे वाटत असते. ( खयाली पुलाव) त्यामुळे आज न्युझीलंडला आपण कसे धुतो आणि आपली गोलंदाजी चोपून चापून टाकतो त्यावर सर्गळं अवलंबून असेल. फलंदाजीत रोहीट, कोली, रावल्या बरे चालू राहीले. बुमरा, कुलदीप आणि जड्डू धावा कंट्रोल मधे देत आहे.
लग तो रहा है, की इंडिया जितेगा. अपनी तरफसे ६-४ अंदाज.
-दिलीप बिरुटे
22 Oct 2023 - 4:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारणा-या भारतीय संघाने सुरुवातीला दोन फलंदाज बाद (१९ /०२ ) केल्यावर जरा निवांत झालो होतो. पण मिचल ५० आणि रविन्द ५९ यांनी डाव सावरला. २७ षटका १३० धावा झाल्या आहेत.
हे दोघे असेच खेळले आणि टीकले तर ३०० च्या पुढे जातील असे वाटते. आणि आपल्याला नखं कुरतुडत देवाचा धावा देव काहीही मदत करीत नसला तरी, त्याचा धावा करावा लागेल असे वाटते.
-दिलीप बिरुटे
22 Oct 2023 - 4:43 pm | प्रचेतस
तिसरा तर गेला आता तरी तीनशे पार करतील असे दिसतेय. किवीज मात्र खूपच सभ्य खेळाडू आहेत. मगाशी ओव्हरथ्रोचा रन होत असूनही परत फिरले,
22 Oct 2023 - 4:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तिस-या पंचास,चेंडू जर सरळ स्टांपवर जातांना दिसत असेल आणि तो दांडी उड़वत असेल तर फलंदाज सरळ बाद दिला पाहिजे. आऊट साइड दी पीच, अंपायर डिसीजन... साला चांगल्या खेळाचं वाटोळं आहे.
-दिलीप बिरुटे
22 Oct 2023 - 4:44 pm | प्रचेतस
बाकी काही असो, धागालेखक मात्र धागा टाकून गायब झाले ते झालेच.
22 Oct 2023 - 4:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बुमराने एक झेल सोडला आणि सुमार क्षेत्ररक्षण आज बोंगाड्या बुमरा कडून बघायला मिळत आहे.
१८७ / ०३ ( ३५ Overs )
-दिलीप बिरुटे
22 Oct 2023 - 4:49 pm | प्रचेतस
तीन कॅच सोडले हो एकूण
22 Oct 2023 - 4:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तिन्ही बुमराने ? अवघड आहे. विश्वचषकाचा दर्जाचा खेळ बघायला कधी मिळणार ?
-दिलीप बिरुटे
22 Oct 2023 - 5:32 pm | प्रचेतस
तिन्ही बुमराने नै हो, भारतीय संघाने मिळून
22 Oct 2023 - 5:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिचेलची जबरा फलंदाजी १०० नाबाद. भारी खेळतोय. २२२/ ०४ [ ४१ Overs₹]
-दिलीप बिरुटे
22 Oct 2023 - 6:37 pm | गवि
टार्गेट फार अवघड नाही. फार सोपेही नाही.
होईल. भारतीय संघ जोमात आहे सध्या.
22 Oct 2023 - 6:53 pm | तुषार काळभोर
पावणे तीनशे जास्त चांगले.
पण धर्मशाला सारख्या थंड ठिकाणी रात्रीची फलंदाजी कितपत चांगली होईल ते बघू..
22 Oct 2023 - 6:57 pm | गवि
चार सहा चार सहा असे हाणत आहेत (तूर्त).
22 Oct 2023 - 7:54 pm | प्रचेतस
रात्रीच्या धुक्यामुळे खेळ बंद पडल्याची घटना पहिल्यांदाच घडली असावी.
22 Oct 2023 - 8:22 pm | तुषार काळभोर
आता २३ ओवर्स झाल्या आहेत आणि ESPNcricinfo दोन्ही संघांना जिंकण्याची शक्यता ५०-५०% दाखवत आहे.
दर षटकामागे एकतरी ४-६ चालू असल्याने दबाव येत नाहीये, पण तिघेही चांगल्या सुरुवातीनंतर आऊट झालेत.
22 Oct 2023 - 9:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इंडिया १८२ वर ०४ आणि बत्तीस षटकं संपली आहेत. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
22 Oct 2023 - 9:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोहलीचे पन्नास धावा झाल्यानंतर एका उत्तम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर कोहलीशेठने सुर्यकुमारचा धावबाद देऊन बळी घेतला.
भावा आता विजयाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी तुझी.
-दिलीप बिरुटे
22 Oct 2023 - 9:16 pm | प्रचेतस
क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत असतात. संतनरची उत्तम फिल्डिंग. बाकी तुम्ही हल्ली बॅडमिंटन खेळता की नै?
22 Oct 2023 - 9:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
२०१ वर ०५ आणि ओवर्स झाल्या ३६
८४ चेंडुत ७३ धावा.
>> बाकी तुम्ही हल्ली बॅडमिंटन खेळता की नै ?
आता बंद के बराबर. :(
-दिलीप बिरुटे
22 Oct 2023 - 9:26 pm | प्रचेतस
अजूनही जिंकू असे वाटते, कोलीला तर आता जिंकून देण्याशिवाय पर्याय नै. बाकी खेळत राहा भो तुम्ही अधूनमधून
22 Oct 2023 - 9:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोली है तो मुमकीन है. ६६ चेंडुर ५२ धावा हव्यात विजयासाठी.
कोहली ७० तर, जडू १६ धावांवर खेळत आहेत.
धावसंख्या २२३.
-दिलीप बिरुटे
22 Oct 2023 - 9:39 pm | प्रचेतस
फिल्डिंग जबरदस्त करताहेत किवी.
22 Oct 2023 - 9:54 pm | प्रचेतस
अचानक लैच टुकूटुकू खेळायलेत
22 Oct 2023 - 9:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खेळु दे....टुकूटुकू...मागं कोणी नै ये.
मागं बुमरा आहे.
२८ मधे २४ लागतात. चांगला सांभाळला डाव.
आणि विजयाच्या जवळ जडू आणि कोहली घेवून जात आहेत.
-दिलीप बिरुटे
22 Oct 2023 - 10:05 pm | प्रचेतस
अहो आता कोळीचं शतक होतं।की नै हाच मुद्दाय
22 Oct 2023 - 10:12 pm | प्रचेतस
गड आला पण सिंह गेला, शुरा ऑल
22 Oct 2023 - 10:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> गड आला पण सिंह गेला
हम्म.
शुरा.
- दिलीप बिरुटे
22 Oct 2023 - 10:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोहली आणि जड़ू यांची अतिशय सूजबुझ की बारी. कोहलीचं शतक हुकलं. मोठा फटका मारण्याच्या नादात झेल गेला पण विजयाचं श्रेय कोहलीचं.
चला सामना मस्त झाला. भारत जिंकला तरी मनं न्यूझीलंडनेही जिंकली. न्यूझीलंडने मस्त झुंजवलं. शिस्तबद्ध संघ, उत्तम गोलंदाजी क्षेत्ररक्षण आणि उत्तम संघ.
-दिलीप बिरुटे
23 Oct 2023 - 7:56 am | उग्रसेन
वर्ल्ड कप क्रिकेट धागा काढ़लेला परंतु कामामुळे सहभागी
होता येत नाही. माफ़ी असावी.धागा काढून टाकला तरी चालेल.
23 Oct 2023 - 9:11 am | Bhakti
मला एक सांगा कोहली कोण कोणते रेकोर्ड यंदाच्या वल्डकपला मोडू शकतो? खुपच फिट आहे तो.ब्राव्हो!
23 Oct 2023 - 4:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अशी त्याची फलंदाजी पाहतांना वाटते. जुने कोणते रेकॉर्ड मोडेल हे इतकं करेक्ट माहिती नाही.
-दिलीप बिरुटे
23 Oct 2023 - 4:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाक १८९ वर ०४ बाद. ४० ओवर्स.
-दिलीप बिरुटे
23 Oct 2023 - 6:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाकच्या २८३ ला अफगानने चांगली सुरुवात केलीय.
०७ षटकात ३८ धावा. आजचा धक्कादाय विजय होतो का ते बघावे लागेल.
-दिलीप बिरुटे
23 Oct 2023 - 7:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाकिस्तान हरतंय वाटतं आज. १२८ वर ०
वीस षटकं संपली आहेत.
-दिलीप बिरुटे
23 Oct 2023 - 8:06 pm | तुषार काळभोर
असाच एक दोन धक्कादायक निकाल आणि एक दोन लकी बहिष्कार यांच्या बळावर केनियाचा संघ २००३ वर्ल्डकप मध्ये उपांत्य फेरीत पोहचला होता!
23 Oct 2023 - 10:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अफगानी संघाने पाकिस्तानचा गड़ी राखून धुव्वा उडवला. जब्राट सामना.
विश्वचषकातला धक्का देणारा सामना. अफगानी संघाने चिवट फलंदाजी करुन विजय मिळवला
-दिलीप बिरुटे
23 Oct 2023 - 10:08 pm | अमरेंद्र बाहुबली
बीसीसीआय चा संघ ( ज्याला अनअधिकृत रित्या भारतीय संघ संबोधलं जातं) सर्व मॅच जिंकलाय वगैरे असं कलीग्स सोबत जेवायला बसल्यावर त्यांच्या क्रिकेटचा चर्चातून कळलंय. नी ते फार खुश होत होते. असे अनेक लोक असतील. मुळात भारतीय संघं सेमीफायनल पर्यंत पोहोचला नाही तर किती कोटींचं नूकसान होईल ह्याचा अंदाज लावनं अनेकांच्या कुवतीबाहेर आहे, भारतीय संघं हरनं हे आर्थीकदृष्ट्या स्पर्धेला परवडनारं नाहीये, त्यामुळे भारतीय संघं सुरवातीच्या मॅच जिंकनारच हे गृहीत धरूनच चालायला हवं, जर बाहेर पडला तर ही स्पर्धा आर्थीकदृष्ट्या तिथेच संपेल ना मैदानात कूत्रं येईल ना जाहीरातदार ढूंकून पाहतील. क्रिकेट हा खेळ आहे असं समजनार्यांनी नोकरीच करावी, धंद्यात काही यश येत नाही लेकाहो तुम्हाला. :)
भारतीय संघं जिंकतोय हे पाहून आनंदं वाटनार्यांबद्दल मला आश्चर्य नी कौतूक वाटतंय. :)
24 Oct 2023 - 11:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्रिकेटचे आम्ही लोक पंख्या कल्बात मोडतो. कधी काळी क्रिकेटच्या सामना फिक्सींगच्या काळातल्या घटना ऐकून निराश झालो होतो. आपण जीवतोडून त्या खेळाचा आनंद घेतो आणि आपल्या भावनांचा चुराडा झालेला पाहुन क्रिकेट पाहु वाटत नव्हते, कितीतरी दिवस कोण खेळाडु येतो कोण खेळतो हे बघत पण नव्हतो. पण, पुढे आयपीएलच्या सामन्याने ती मरगळ झटकली. आता ती पूर्वीची उत्कंठा नसली तरी क्रिकेट वेड मात्र कमी झालं नाही.
क्रिकेट, क्रिकेटचं राजकारण, खेळाडुंचं राजकारण, निवड समित्या, त्याचबरोबर येणारा सट्टा बाजार, आर्थिक उलाढाली, भारतीय क्रिकेटचा धंदेवाईकपणा हा सगळं क्रिकेटमधे असेलही पण खेळ म्हटला की त्यातली हारजीत उत्कंठा असते तेव्हा क्रिकेटचं जे काय असेल ते मान्य करुनही क्रिकेटचा आनंद सोडता येत नाही.
-दिलीप बिरुटे
24 Oct 2023 - 2:38 pm | अमरेंद्र बाहुबली
डेलीसोपचं ही असंच असतं, सर्व काही आपल्याला माहीत असते पण तरी ऊत्कंठा असते. कारण एक्टर्स ची एक्टींग, स्क्रिप्ट रायटरचा जबरजस्त स्क्रिप्ट ह्या सर्वाला आपण भूलतो. :)
24 Oct 2023 - 5:37 pm | मुक्त विहारि
सहमत आहे...
अजून एक गोष्ट म्हणजे, कुणाला तरी एकाला हीरो बनवायचे..
सध्या विराट हीरो आहे.
कुठल्याही संघाची मॅच असो... समालोचक ,विराट बद्दल काही ना काही बोलणारच...
आजची मॅच, बांगलादेश आणि साऊथ आफ्रिका, यांच्यात असून देखिल, विराट बद्दल बोलत होतेच..
तेच कालच्या मॅच बाबतीत...
उद्या जर, टिंबक्टू आणि मालदीव, यांच्यात मॅच झाली तरी, येन केन प्रकारेण, विराटचे नाव घेतील...
व्यक्ती पूजा भारताला नेहमीच घातक ठरत आली आहे...
24 Oct 2023 - 6:19 pm | अमरेंद्र बाहुबली
एकंदरीत भारतीयांना ऐनकेन प्रकारे क्रिकेटशी बांधुनच ठेवतात लेकाचे. मुळात भारतीय संघ जिंकवायचा तर कुणाला तरी चांगलॅ खेळावंच लागनार. (खेळवावंच लागनार) मग भारतीय खुश होनार नी विराट विराट करत सुटनार. भारतीय क्रिकेट फॅन्स फारच भोळे असतात.
24 Oct 2023 - 6:34 pm | मुक्त विहारि
सहमत आहे...
आधी कपिलदेवचा उदो केला मग सचिन आणि आता विराट...
शिवाय, उदारमतवादी क्रिकेटर असेल तर मग सोन्याहून पिवळे... मग रिटायरमेंट नंतर, समालोचक म्हणुन वर्णी लागायची शक्यता जास्त..
बेदी पण कमी न्हवता... ड्रॉ होत असलेली मॅच, पाकिस्तानला जिंकायला दिली...
आधी मी पण ह्याला भुललो होतो... सध्या दूरच राहतो... गुंतत नाही...
24 Oct 2023 - 11:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार, सत्तरच्या दशकात फ़िरकी गोलंदाजीचा धुरा सांभाळणारा महान फ़िरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं काल ७७ व्या वर्षी निधन झालं. बिशन सिंग बेदी यांनी १९६७ ते १९७९ या काळात ६७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या १३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी २६६ विकेट्स घेतल्या. त्याशिवाय तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्यांच्या नावावर सात विकेट्स आहेत.भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डशी त्यांचे कायम मतभेद राहीले आपली ठाम मतं मांडत राहीले. अनेक नवोदित खेळाडु त्यांनी तयार केले.
इरापल्ली प्रसन्ना, बी. एस. चंद्रशेखर आणि एस. वेंकटराघवन यांच्यासह बिशन सिंग बेदी ही चार नावं भारतीय फिरकीच्या इतिहासात अजरामर झाली आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये फिरकीचं एक नवं युग या चौघांनी सुरू केलं. त्यात बिशन सिंग बेदी यांचा वाटा मोठा होता. भारताच्या पहिल्या वहिल्या एकदिवसीय सामन्यात बिशन सिंग बेदी यांच्या अद्भुत अशा स्पेलमुळे भारतानं विजय साकारला होता. (लोकसत्ता)
क्रिकेट जगतातील महान खेळाडुस. आदरांजली.
-दिलीप बिरुटे
24 Oct 2023 - 6:01 pm | मुक्त विहारि
हिंदू धर्म के खिलाफ अभद्र टिप्पणी पड़ी भारी, भारत से भगाई गई ये पाकिस्तान महिला एंकर
https://navbharattimes.indiatimes.com/sports/cricket/icc-world-cup/news/...
-----
मोहम्मद रिजवान के खिलाफ मैदान पर नमाज पढ़ने के लिए शिकायत दर्ज, मुश्किल में पड़ सकते हैं पाकिस्तानी कीपर
https://navbharattimes.indiatimes.com/sports/cricket/icc-world-cup/news/...
-------
27 Oct 2023 - 10:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाकच्या २७० धावांचा पाठलाग करीत दमछाक झालेल्या आफ्रिकेने शेवटपर्यन्त झुंज देत एक विकेट राखून पाकचा पराभव केला.
-दिलीप
28 Oct 2023 - 5:59 am | प्रचेतस
आता पाकडे बाहेर पडले की कसं?
28 Oct 2023 - 7:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाकिस्तानचे अजून तीन सामने बाकी आहेत. या तीन्ही सामन्यांमध्ये जर पाकिस्तानने विजय मिळवला तर त्यांचे १० गुण होतील. सध्या दक्षिण आफ्रिका रनरेटच्या जोरावर टॉपवर आहे, भारत अनुक्रमांक दोनवर आहे. दोघाचे १० गुण झालेले आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अजूनही पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे,असे वाटते.
-दिलीप बिरुटे
28 Oct 2023 - 7:20 am | Bhakti
हे राम आहे का चान्स अजून, घरांच्याना सांगावं लागलं.काल भारताच्या सामान्यपेक्षा जास्त टेन्शन पाक हरावा म्हणून घेतलं होतं ;)
28 Oct 2023 - 6:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऑस्ट्रेलियाच्या ३८८ धावांचा पाठलाग करत ३८३ धावा न्यूझीलंडने केल्या. रोमांचकारी सामना. असे सामने झाले तर विश्वचषक सामने रंगत जातील. न्यूझीलंडने दिल जीत लिया...
-दिलीप बिरुटे
29 Oct 2023 - 4:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजच्या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी ढासळली आहे. १५६ धावांवर ०४ फलंदाज परतले आहेत ३५ .४ ओव्हर्स संपल्या आहेत. रोहिट ८७ तर, सूर्यकुमार २३ धावांवर खेळत आहेत.
२७० तरी व्हावेत असे सध्याची परिस्थिती पाहता वाटत आहे.
-दिलीप बिरुटे
29 Oct 2023 - 4:52 pm | प्रचेतस
खेळपट्टी खूपच खराब आहे, दोनशे धावाही आव्हानात्मक ठरतील असे दिसते.
29 Oct 2023 - 5:03 pm | गवि
२०५-२१० होतील. पण आपले बॉलर्स वचपा काढतील. दीडशेच्या आत इंग्लंड घरात. खेळपट्टी अशीच असणार त्यांना पण.
29 Oct 2023 - 5:05 pm | प्रचेतस
२४० विनिंग स्कोअर होईल असा अंदाज
29 Oct 2023 - 5:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पडली विकेट. आता अवघड हे.. २५० झाले तरी पुष्कळ आहेत आता.
-दिलीप बिरुटे
29 Oct 2023 - 8:01 pm | गवि
आपले अंदाज योग्य ठरत आहेत. स्कोरचा अंदाज दहानेच चुकला आणि बॉलर्स वचपा काढतील हा अगदी अचूक ठरला.
29 Oct 2023 - 8:05 pm | प्रचेतस
अगदी. पिच लैच खराब झालंय,
29 Oct 2023 - 8:13 pm | गवि
हो. अर्थात याबद्दल काही नशिबाचा भाग मानण्याची गरज नाही. इंग्लंडने पहिली बॅटिंग घेतली नाही. त्यांना चॉईस होता. आपल्याला देखील काही प्रमाणात तो फटका बसलाय.
आपल्या बॉलर्सना श्रेय आहेच.
29 Oct 2023 - 8:51 pm | Bhakti
Man of the match रोहित होईल बहूतेक.
29 Oct 2023 - 5:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेवटच्या धा ओव्हर्समधे ८० तरी धावा व्हाव्यात.
-दिलीप बिरुटे
29 Oct 2023 - 7:18 pm | तुषार काळभोर
इंग्लंड ३३/३(८)
आता स्टोक जसा आऊट झाला, त्यावरून इंग्लंड कदाचित २०० पर्यंत जाऊ शकणार नाही.
30 Oct 2023 - 10:27 am | योगेश कोलेश्वर
इंडिया जितला
31 Oct 2023 - 10:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तर, अशा त-हेने श्रीलंकेच्या 241/10 (49.3 Overs) या धावसंखेचा पाठलाग करीत अफगान संघाने (45.2 Overs) मधे सात गडी राखून निर्वीवाद धडाकेबाज विजय मिळवला.
गुणतालिकेत इंडिया १२ गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर आहे तर, दुस-या क्रमांकावर १० गुण घेऊन द. अफ्रिका रनरेटाने अग्रक्रमावर आहे. न्युझिलंड आष्ट्रेलिया अनुक्रमे तीन आणि चार क्रमांकावर आहेत. मला वाटतं, या चार संघात अजून काही क्रमांक बदलतील का ते येत्या राहीलेल्या प्रत्येकाच्या तीन सामन्यांमधील निकालांनी कळेलच. काळात कळेलच.
-दिलीप बिरुटे
2 Nov 2023 - 7:44 pm | Bhakti
भारताचा ३३३ स्कोर पाहून म्हटलं होतं श्रीलंका ३३ रन पण करणार नाही, आणि ते खरं होईल बहूतेक ;)
3 Nov 2023 - 1:13 am | योगेश कोलेश्वर
श्रीलंका 55 वर ओल आऊट..फारच एक तर्फी मॅच झाला..
5 Nov 2023 - 6:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज भारत आणि द. अफ्रिका यांच्यातील सामन्यातील पहिल्या पन्नास षटकातला खेळ संपला आहे. भारताने नाणेफेक जिंकून पन्नास षटकात ३२६ धावा ०५ गड्यांच्या मोबदल्यात केल्या आहेत. आजच्या सामन्याचं वैशिष्ट्ये म्हणजे विराट कोहलीचं शतक आणि सचिनच्या ४९ शतकांची बरोबरी झाली. विराटच्या १०१ संयमी फलंदाजी. सोबत रोहीटच्या वेगवान ४० धावा, गील, अय्यर, राहुल आणि शेवटी जडेजाच्या सोबत आणि गतीमुळे ३२६ धावांवर भारताची धावसंख्या पोहचली. पीच स्लो असले आणि वाढदिवसाचं गीफ्ट चांगलं असलं तरी, स्वार्थी फलंदाजीच आज पुन्हा दिसली,असे वाटून गेले. मैदानावर तग धरणे आणि संयमाने फलंदाजी महत्वाची असली तरी. मागील काही सामन्यात जाणवावा अशी ती व्यक्तीगत फलंदाजी दिसत आहे, असे मला वाटते. अर्थात, विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शतकी फलंदाजीबद्दलही अभिनंदन.
अफ्रिकेला आपले गोलंदाज कसे गुंडाळतात त्यावर विजय अवलंबून आहे. अफ्रिकेची फलंदाजी बहरलेली आहे. विश्वचषक क्रिकेट २०२३ मधे डीकॉक फलंदाजीत अग्रक्रमावर आहे, त्यामुळे भारताचा विजय इतका सोपा नाही असे वाटते. देखेंगे आगे आगे होता है क्या.
-दिलीप बिरुटे
5 Nov 2023 - 6:14 pm | प्रचेतस
अहो मुख्य म्हणजे टिकला, विकेट घालवली नाही आणि त्यामुळे दुसऱ्या बाजूने श्रेयस, सूर्या आणि जडेजाला मुक्तपणे फलंदाजी करता आली, ह्या पिचवर हा विनिंग स्कोअर आहे.
5 Nov 2023 - 6:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपलं म्हणनं खरं असलं तरी संघाच्या चाळीस धावा त्याच्यामुळे कमी झाल्या आहेत असे वाटते. एकही षटकार नाही आजच्या शतकी १०१ धावांसाठी १२१ चेंडु घेतले हे अजिबात झेपलं नाही.
>>> ह्या पिचवर हा विनिंग स्कोअर आहे.
अफ्रिकेची फलंदाजीही भक्कम आहे. बुमरा-बीमरा, शमी, सिराज, कुलदीप कसे चालतात त्यावर आपला विजय अवलंबून आहे. अधुन-मधुन धाग्यावर येत राहु. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
5 Nov 2023 - 6:32 pm | प्रचेतस
आफ्रिका दबावाखाली ढेपाळते हे तर आपल्याला माहितंच आहे, तेव्हा आजचा दिवस आपलाच.
5 Nov 2023 - 7:36 pm | Bhakti
अंपायर का विनाकारण व्हिलनसारखे वागत आहेत ;)
१०० च्या आत गुंडाळतो वाटतं अफ्रिकेला.आपले बोलर कमालीची गोलंदाजी करत आहेत.
5 Nov 2023 - 7:51 pm | गवि
भारताने इतर सर्व टीम्सची शोचनीय अवस्था करून टाकली.
आणखी एक गेला.
6 Nov 2023 - 9:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या संघाचा खेळ पाहता आता विश्वचषक २०२३ दूर नाही असे वाटायला लागले आहे. काल अफ्रिकेचीही गोलंदाजांनी वाताहात केली. फलंदाजांची उत्तम सुरुवात, मधल्या फळीची जवाबदारीची फलंदाजी आणि मग गोलंदाजीत कमाल होऊन जाते आणि विजय सहज दृष्टीक्षेपास येतो. अर्थात, एखाद्या दिवशी ही सर्व एखाद्या संघाविरुद्ध मोडतोड व्हायला वेळ लागत नाही, अर्थात एक भारतीय क्रिकेट प्रेमी म्हणून असे होऊ नये इतकीच अपेक्षा आपण करुया.
-दिलीप बिरुटे
7 Nov 2023 - 10:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल बांगलादेश आणि श्रीलंकेच्या सामन्यात विश्वचषकीय वेगळ्याच घटनेची नोंद झाली. खेळ भावना आणि नियमांच्या बाबती कोणी नियमांच्या बाजूने असेल तर कोणी खेळभावनेच्या बाजूने. बांग्डाने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेची टीम काय तशीही नीट खेळत नै ये. पंचवीसाव्या षटकाट समरविक्रमाने शकीब अल हसनला एक चौकार मारला आनि त्यानंतरच्याच चेंडूवर शकीबच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्यानम्तर अँजेलो मॅथ्यूज मैदानात आला होता मॅथ्यूजच्या हेल्मटची पट्टी तुटली होती तो दुस-या हेल्मेटची वाट पाहात थांबला. बांग्लाच्या कर्णधार शकीबने उशिर झाल्यामुळे टाइम-आउटच्या नियमांचा आधार घेत पंच एरास्मूस आणि रीचर्ड इलिंगवर्थन यांच्याकडे दाद मागितली त्यांनीही त्याबद्दल मॅथ्यूजला विचारणा केली, पण त्याला बाद दिले.
एकही चेंडू न खेळता मॅथ्यूज तंबूत परतला. श्रीलंकेने ४९.३ षटकात २७९ धावा केल्या प्रत्युतरात बांगलाने ४१.१ षटकात ७ बाद २८२ धावा करीत विजय संपादन केला आणि श्रीलंकेचं आव्हानही संपूष्टात आणलं.
-दिलीप बिरुटे
7 Nov 2023 - 3:57 pm | विजुभाऊ
बांगला देश ही खेळी रडकी खेळले आहेत.
आता अफगाणीस्तान ने ऑस्ट्रेलिया ला हरवले आणि न्यूझिलंड ने श्रीलंकेला हरवले तर आपले आशाळभूत शेजारी गप्प बसु शकतील
7 Nov 2023 - 3:59 pm | विजुभाऊ
पाकडे हरावेत यासाठी रविवारी इंग्लंडला पाठिंबा द्यायचीही तयारी आहे.
7 Nov 2023 - 5:09 pm | राघव
भारतानं सर्व सामने जिंकल्यामुळे आणि २-३ अगदीच एकतर्फी जिंकल्यामुळे सध्या मीम्स ना ऊत आला आहे! कल्पनाभराऱ्या जोरदार चालू आहेत! खास करून वेलकम सिनेमातील सिक्वेन्स चा वापर करून तयार केलेले २ मीम्स अगदी धुमाकूळ घालताहेत! :-)
7 Nov 2023 - 9:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अफगाणिस्तान आणि ऑष्ट्रेलिया सामन्यात अफगाणिस्तान प्रथम फलंदाजी करीत २९२ धावा केल्या प्रत्युतरात ऑष्ट्रेलियाचा संघ गडगडला होता पण मॅक्सवेल तीन जीवदानाच्या बळावर १२६ धावांवर खेळतोय २१६ धावांवर ७ बाद आहेत. मॅक्सवेल सामना जिंकून देईल अशी परिस्थिती आहे, ७३ मधे ७६ धावा हव्या आहेत, सामन्याचा नूर थोड्याच वेळात कळेल पण मॅक्सवेलने गेलेला सामना ओढला अशी तरी आत्ता स्थिती आहे.
-दिलीप बिरुटे
7 Nov 2023 - 10:18 pm | Bhakti
मॅक्सवेल शो!ब्राव्हो!
7 Nov 2023 - 10:18 pm | तुषार काळभोर
ग्लेन मॅक्सवेल...
7 Nov 2023 - 10:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मॅक्सवेल २०१ धावा. अद्भूत खेळला. ९१ धावांवर ७ विकेट्स पडलेल्या होत्या आणि १८ षटक चालू होतं तेव्हापासून तो खेळत होता. अद्भूत फटकेबाजी केली. पाय आखडून गेलेला होता. तीन झेल सोडले अफगाण्यांनी एक तर हातातला सोड्ला त्या मूझीबने. आणि अफगाणि संघाची गोलंदाजीच्या मर्यादा उघड पडल्या. बरं असं म्हणावं तर, सुरुवातीला विकेट्स काढल्या त्यांनी. पण, त्यानंतर मॅक्सवेल पुढे हतबल झाले सर्व गोलंदाजी नंतर सुमार झाली आणि क्षेत्ररक्षणही सुमार झालं.
अफगानी जिंकावे वाटत होते. :/ असो.
-दिलीप बिरुटे
8 Nov 2023 - 5:51 am | प्रचेतस
अफगाणांनी सामना गमावला, जखमी मॅक्सवेल नुसता जागेववर उभं राहून टोलवत होता. अफगाण अगदी केविलवाणे झाले होते. झेल तर सोडलेच अफगाणांनी पण स्ट्रॅटेजीमध्ये कमी पडले, मोहम्मद नबीला खूप उशिरा बॉलिंगला आणले, फिल्डिंग चेंजेस, बॉलिंग चेंजेस त्यांना नीट जमले नाही.
8 Nov 2023 - 6:09 am | विजुभाऊ
अफगाणीस्तानकडे स्पिन अॅटॅक असता किंवा त्यानी ऑफस्टंपबाहेर गोलंदाजी केली असती तर बराच फरक पडता.
पण हे आपण मैदानाबाहेर उभे राहून बोलतोय. काही म्हणा अफगाणी पोरांची जिगर मानायला हवी. नवे आहेत. डावपेचात जर्रा कमी पडले इतकेच.
8 Nov 2023 - 10:13 am | सौंदाळा
भारत पाक उपांत्य फेरीत परत भिडणार की काय?
13 Nov 2023 - 10:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इंडियाचा फार्म बघता आपण न्युझीलंडला हरवतो. जिंकण्याची शक्यता. ८५ -१५ अशी आहे. अफ्रिका ऑष्ट्रेलियात ऑष्ट्रेलिया फार्मात आलाय त्यामुळे त्यांची जिंकण्याची शक्यता ६०-४० अशी वाटते.
भारतीय संघाच्या उपांत्यफेरीच्या सामन्याला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
13 Nov 2023 - 10:09 am | प्रचेतस
फायनल भारत दक्षिण आफ्रिका व्हावी असे वाटते. ऑस्ट्रेलियन एकदम त्वेषाने खेळतात. मात्र सध्याचा आपला फॉर्म बघता कोणत्याही संघाला आपण हरवू शकतो ह्याची खात्री वाटते.
13 Nov 2023 - 10:29 am | तुषार काळभोर
यंदा तरी ते बाद फेरीत चांगला खेळ करतील का?
ते जेव्हा चांगला खेळ खेळतात, तेव्हा त्यांना नशीब दगा देते. आणि नशीब चांगले असेल तर ते ऐनवेळी कच खातात.
15 Nov 2023 - 8:48 am | उग्रसेन
भारत विश्वविजेता होईल. शुभेच्छा.
ड्यूटीमुळे धाग्यावर येऊ शकलो नाही.
सर्वांचे आभारी आसे.
दिवाळीच्या सगल्यांना शुभेच्छा.
15 Nov 2023 - 3:21 pm | प्रचेतस
नाणेफेक जिंकून उत्तम सुरुवात झाली आहे, ३५० च्या वर धावा होतील असा अंदाज.
15 Nov 2023 - 4:03 pm | तुषार काळभोर
मग एकीकडे बॉल ओला होऊन फिरकी गोलंदाजी अवघड होणार, दुसरीकडे बॉल व्यवस्थित बॅट वर न येणं आणि सीमापार जाताना हळू जाणं हे प्रकार झाल्याने ३५० कदाचित चांगले टार्गेट असेल. ३०० पेक्षा कमी म्हणजे खूपच कमी होईल.
(मॅक्सवेलचा चमत्कार झाला नसता तर ऑस्ट्रेलियाला देखील येथे पाठलाग अवघड गेला होता)
15 Nov 2023 - 4:17 pm | प्रचेतस
वानखेडेवर पाठलाग करताना पहिल्या 15/20 ,ओव्हर्स खूपच अवघड जाणार किवींना. बॉल वेड्यासारखा मूव्ह होत असतो.
15 Nov 2023 - 6:08 pm | तुषार काळभोर
फक्त चमत्कार झाला तरच किवी जिंकू शकतील
15 Nov 2023 - 11:23 pm | तुषार काळभोर
३२ ओवर्स मध्ये २२०/२ असताना न्यूझीलंडला बऱ्यापैकी संधी होती. दव न पडल्याने आणि चेंडू हवेत मूव्ह होणं बंद झाल्याने 18 षटकात 180 असं अवघड पण प्रयत्न करता येईल असं टार्गेट होतं. पण शमीने दोन विकेट घेतल्या आणि तो प्रयत्न अवघड होईल, याची तजवीज केली. पुढे फिलिप्स आऊट झाला आणि सगळं संपलं.
70-80 च्या दशकात वेस्टइंडीजच्या फास्ट बॉलर चौकडीचा जो दरारा होता तसा या वर्ल्डकप मध्ये बुमरा, शमी आणि सिराज या भारतीय तिकडीचा आहे.
16 Nov 2023 - 6:22 pm | तुषार काळभोर
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली, पण २१२ असा सामान्य स्कोर करता आला. नेहमीप्रमाणे चोकर्स हे बिरूद सार्थ करतात की काय आता?
17 Nov 2023 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपांत्यफेरीचा पहिला सामना भारत आणि न्युझीलंड हाही रंगतदार तर चोकर्स म्हणून प्रसिद्द असलेले अफ्रिका आणि ऑष्ट्रेलिया यांचाही सामना छानच झाला. न्युझीलंडबरोबर खेळतांना भारताने टॉस जिंकून फलंदाजी घेतली इथेच आपल्या विजयाने पाया रचायला सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे सुरुवात रोहीटने धुवाधार सुरुवात केली. २९ चेंडुत ४७ धावा, शुभमन ६५ मधे ७९, कोहल्याचे ११३ मधे ११७ ( चालु दे तुझं टुकुटुकु ) श्रेयस तर जब्रा खेळला ७० मधे १०५ आणि के एल रावल्या २० मधे ३९ सगळेच चांगले खेळले पण अजून वीस तीस धावा वाढल्या असत्या जर कोहल्या शतकाजवळ आल्यावर टुकुटुकु नसता खेळला तर, ५० षटकात ३९७ चांगला स्कोर होता.
न्युझीलंड एक सज्जन आणि शिस्तीवाली टीम. पहिल्या दोन विकेट्स ३९ धावांवर गेल्या तेव्हा आपण रीलॅक्स झालेलो. पण २०० धावा झाल्या तरी विकेट्स पडेना देवाचा धावा करावा लागलेला. मैदानावरील प्रेक्षकांचा आणि आपला आवाज म्यूट झाला होता. तिसरी आणि चौथी विकेट पडली २२० धावांवर आणि मग पुढे 'शमीने' केलेली अफलातून गोलंदाजी त्याच्या सात विकेट्सने आपण फायनलला पोहचलो आपण निश्चिंत झालो. आपण जिंकल्याचा आनंद आहे, तसा न्युझीलंड हरल्याचे दु़;ख आहेच.
ऑष्ट्रेलिया आणि अफ्रिकेच्या सामन्यात सुरुवातीपासुनच फलंदाजी घेवून अफ्रिकेने माना टाकायला सुरुवात केली. चोकर्स म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या अफ्रिकेनं आपलं काम सार्थ केलं. 212/10 (49.4 Overs) हा काही सामना जिंकवणारा स्कोर नव्हता. पण, पुढे जिद्दीने अफ्रिकेने सामना खेचायचा प्रयत्न केला अजून दोन एक विकेट्स लवकर मिळवल्या असत्या तर कदाचित अफ्रिका जिंकलीही असती. क्रिकेट अनिच्छिताओ का खेल म्हणून प्रसिद्ध त्यामुले जर तर क्रिकेटमधे चालत नाही.
तर, २०२३ विश्वचषक क्रिकेट अंतिम सामना भारत आणि ऑष्ट्रेलियात रविवारी होतोय. मला तर, अफ्रिका न्युझीलंड आणि इतर संघापेक्षा भारतीयभारतीय संघ चोकर्स वाटतो, अजिबात विश्वासू टीम वाटत नाही. न्युझीलंडने आपला घसा कोरडा पाडला होता. आपला संघ लै भारी वगैरे मान्य तरीही भारतीय संघाला विजयी होण्यासाठी शुभेच्छा. रंगतदार सामना बघायला मिळावा.
एवढे बोलून उपांत्यफेरीचं मनोगत पूर्ण करतो.
-दिलीप बिरुटे
17 Nov 2023 - 9:40 am | प्रचेतस
कोल्याचे हे स्वार्थी शतक होते.
17 Nov 2023 - 10:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला अज्याबात सैन नै होऊ राहिला तो आता. :(
-दिलीप बिरुटे
17 Nov 2023 - 10:25 am | गवि
शतक होण्याच्या जस्ट आगोदर आणि नंतर यातील त्याच्या फटकेबाजीतला फरक नेहमीच ढळढळीत असतो. त्याच्या टॅलेंटबद्दल कोणताच वाद नाही. पण आधी उल्लेख केल्याप्रमाणे चक दे इंडिया चित्रपटातल्या कोमल चौताला आणि प्रीती सबरवाल यांची आठवण होतेच. इथे सुदैवाने अटीतटीची वेळ नव्हती. एकेक बॉल तितकासा किंमती नव्हता. खरे तर कोणताच बॉल स्वस्त नसतो. पण असो.
17 Nov 2023 - 1:08 pm | रात्रीचे चांदणे
अय्यर मूळे ३५० चे ३९८ झाले. ३५० च्या आसपास चा स्कोअर त्यांनी आरामात केला असता.
19 Nov 2023 - 8:38 am | Bhakti
यंदाचा भारतीय संघ एकदम परफेक्ट वाटते.शमी,जडेजा,सिराज आणि फलंदाजांची मोठी फळी.आजही ८०% पारडं आपलंच जड आहे फक्त २०% मनोवृत्ती नुसार ओस्ट्रेलियाचे फायनलचे रेकॉर्ड पाहून थोडं डामाडौल आहे . अर्थात यंदाची ओस्ट्रेलिया तो 'दरारक' संघ वाटतच नाही.
भारतीय संघाला विजयासाठी खुप खुप शुभेच्छा!!
19 Nov 2023 - 9:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारत आणि ऑष्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी तयार झाले आहेत. आपणही तयार झालेलो आहोत. दुपारी सामन्यादरम्यान अधुन-मधुन इकडे दळन टाकू. भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक विजेता २०२३ होण्यासाठी शुभेच्छा.
जुडेगा इंडिया तो जितेगा भारत.
-दिलीप बिरुटे
19 Nov 2023 - 4:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तीनशे प्लस तरी धावा व्हाव्यात. आता रावल्या आणि जड्डू टीकून आहेत १७० -०४ in ३४. ४
-दिलीप बिरुटे