* विवाहासाठी मानसशास्त्रीय चाचणी बाबत आवाहन*

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
11 Oct 2023 - 9:53 am
गाभा: 

* विवाहासाठी मानसशास्त्रीय चाचणी बाबत आवाहन*
वधूवरांच्या पत्रिका या विवाहाच्या अनुषंगाने एकमेकींशी किती जुळतात हे ज्योतिषकीय निकषांवर पहाणे म्हणजे गुणमेलन. गुणमेलन ही संकल्पना वैवाहिक जीवनासाठी वधू-वर एकमेकास अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी निर्माण झाली. फलज्योतिष हा श्रद्धेचा भाग आहे त्याला आधुनिक विज्ञानाच्या निकषांचा आधार नाही. पण जवळपास ९० टक्के लोक विवाहाच्या वेळी पत्रिका पहातात असे आढळून आले आहे. एक प्रथितयश ज्योतिषी श्री.श्री. भट हे आपल्या 'ज्योतिषाच्या गाभाऱ्यात` या पुस्तकात म्हणतात, '' विवाह पहाताना ठरविताना पत्रिका पाहणार नाही असा प्रचार केला जातो. तरुणांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. वैवाहिक जोडीदार कोण असणार हे अटळ प्रारब्ध असते त्यात ज्योतिष हे निमित्त असते. `` तर दुसरे मान्यवर ज्योतिषी श्री. व.दा.भट 'भाग्य` दिवाळी ९७ च्या अंकात म्हणतात, '' मी स्वत: ज्योतिषी असलो तरी एक गोष्ट प्रांजलपणे कबूल केली पाहिजे की वधूवरांची कुंडली जुळते अगर जुळत नाही या बद्दल हमखास अनुभवास येतील असे, ज्यावर पूर्ण विसंबून रहावे असे कोणतेही नियम नाहीत. पत्रिका जुळते अगर जुळत नाही या शब्दांना वास्तविक अर्थ नाही.
मग विवाहासारखा आयुष्यातील एक मोठा निर्णय घेताना वधूवरांची व्यक्तिमत्वे परस्परांशी पूरक आहेत की नाहीत हे आधुनिक विज्ञानाच्या आधारे कसे ठरवायचे? विवाहपूर्व वैद्यकीय तपासणी करुन काही शारिरिक बाबी समजू शकतात पण मानसिक पिंड/ प्रकृती समजण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्यांची मदत होउ शकते. वैवाहिक आयुष्याचा दीर्घ काळ असलेल्या टप्प्यात व्यक्तिमत्वांमधे बदल होणे ही स्वाभाविक असते. ते बदल जर परस्परांना पूरक राहिले नाहीत तर मग सहजीवन अवघड बनत जाते. मग गुणमेलनाला सक्षम पर्याय म्हणुन वधूवरांसाठी / विवाहेच्छुक स्त्री पुरुषांसाठी कोणती मानसशास्त्रीय चाचणी विकसित करावी? अशा प्रश्नांवर मला सामाजिक जाणीवा असलेल्या मानसतज्ञांची वेळोवेळी मदत हवी आहे. मानसतज्ञ म्हणजे मुख्यत्वे कौन्सिलर, सायकॉलॉजिस्ट व सायकियाट्रिस्ट, मानसशास्त्राचे प्राध्यापक. कृपया आपल्यापैकी कुणी वा परिचितांमधे कुणी मानसतज्ञ असल्यास कुठलाही पूर्वग्रह वा संकोच न बाळगता माझ्याशी इन बॉक्स, ईमेल वा थेट संपर्क करण्यास विनंती आहे.
प्रकाश घाटपांडे
,डी २०२, कपिल अभिजात, डहाणुकर कॉलनी, कोथरुड, पुणे ४११०३८
https://faljyotishachikitsa.blogspot.com/
E-mail:- prakash.ghatpande@gmail.com

प्रतिक्रिया

घाटपांडेकाका, उपक्रम स्त्युत्य आहे. शुभेच्छा.
आणि सगळी माहीती जमली की सारांश येथे लिहा.

खरोखर आजच्या काळाची गरज असलेल्या या महत्वाच्या विषयाची दखल घेत, त्याबद्दल जागरूकतेने प्रयत्न करत असलेल्या घाटपांडे सरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांना कार्यसिद्धीसाठी शुभेच्छा.
व्यावसायिक - धंदेवाईक मनोचिकित्सकांनी अशा बाबतीत सहकार्य करण्याची शक्यता कमी वाटते. ते होईपावेतो मिपाकरांनीच अशी चाचणी-प्रश्नावली विकसित करण्याचा प्रयत्न केला तर कसे ?

टर्मीनेटर's picture

16 Oct 2023 - 2:46 pm | टर्मीनेटर

व्यावसायिक - धंदेवाईक मनोचिकित्सकांनी अशा बाबतीत सहकार्य करण्याची शक्यता कमी वाटते. ते होईपावेतो मिपाकरांनीच अशी चाचणी-प्रश्नावली विकसित करण्याचा प्रयत्न केला तर कसे ?

+१
कल्पना आवडली आहे!

घाटपांडे साहेब, तुमच्या उपक्रमासाठी उपयोगी पडु शकेल असे वाटलेली काही माहिती (अ‍ॅटॅचमेंट सुद्धा असल्याने व्य.नि. न करता) तुमच्या ईमेल आयडी वर पाठवली आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Oct 2023 - 2:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

घाटपांडेकाका, तुम्हाला शुभेच्छा!!

>>> विवाहासारखा आयुष्यातील एक मोठा निर्णय घेताना वधूवरांची व्यक्तिमत्वे परस्परांशी पूरक आहेत की नाहीत हे आधुनिक विज्ञानाच्या आधारे कसे ठरवायचे?

खरोखर असे किती जणांना स्वारस्य असते? बहुतांश विवाहाचे निर्णय मुलगा मुलगी कडे प्रॉपर्टी किती, पगार किती, भाऊ बहीण किती? आईवडीलांना फाटयावर मारणार ना? या आणि अशा मुद्यांभोवती घेतले जातात.

कुंडली जुळत नाही, गुण कमी पडतात हे नकार देण्याची सभ्य कारणे आहेत, बाकी काही नाही.

प्रसाद गोडबोले's picture

20 Oct 2023 - 10:46 pm | प्रसाद गोडबोले

खरोखर असे किती जणांना स्वारस्य असते? बहुतांश विवाहाचे निर्णय मुलगा मुलगी कडे प्रॉपर्टी किती, पगार किती, भाऊ बहीण किती? आईवडीलांना फाटयावर मारणार ना? या आणि अशा मुद्यांभोवती घेतले जातात.

>>>
+१ अगदी हेच लिहिणार होतो .

खरोखर असे किती जणांना स्वारस्य असते? बहुतांश विवाहाचे निर्णय मुलगा मुलगी कडे प्रॉपर्टी किती, पगार किती, भाऊ बहीण किती? आईवडीलांना फाटयावर मारणार ना? या आणि अशा मुद्यांभोवती घेतले जातात.

+१
हल्ली भारतीय मुलींपेक्षा परदेशी मुलींची स्थळे जास्त आकर्षक वाटतात. परदेशी मुलींना पैशात जास्त आकर्षण नसते, माणुस म्हणुन जास्त प्रेम असते.

एक निरिक्षणः भारतीय स्त्रीया जोपर्यंत फायदा होत असतो तोपर्यंत त्यांना समानता हवी असते. नुकसान व्ह्यायला लागले की त्यांना स्त्रीचे फायदे हवे असतात.

चित्रगुप्त's picture

20 Oct 2023 - 9:19 pm | चित्रगुप्त

खरोखर असे किती जणांना स्वारस्य असते? बहुतांश विवाहाचे निर्णय मुलगा मुलगी कडे प्रॉपर्टी किती, पगार किती, भाऊ बहीण किती? आईवडीलांना फाटयावर मारणार ना? या आणि अशा मुद्यांभोवती घेतले जातात.

-- वस्तुस्थिती जवळजवळ अशीच असते. लग्नानंतर मुलीची आई मोबाइलवरून मुलीला क्षणोक्षणी 'मार्गदर्शन' करत असल्याची उदाहरणे भरपूर असतात. हिंदी लोक ज्याला 'लव मैरिज' म्हणतात, ती पण लवकरच तुटत असल्याचीही उदाहरणे मिळतात. तिशी-पस्तिशीपर्यंत मुला-मुलींना लग्नच करायचे नसते, ते झाल्यावर अनेक वर्षे (किंवा कधीच) मूल नको असते. लहानपणी कानावर पडणारे गाणे: "देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इन्सान" हे प्रकर्षाने जाणवते.
--- अर्थात हे महानगरात जास्त. ग्रामीण संस्कृती अजून जिथे टिकून आहे, तिथे हे प्रकार आढळत नाहीत, याचे एक उत्तम उदाहरण असलेल्या एका मराठी कुटुंबाशी नुक्तीच ओळख झाली आहे. असो.

.

>>>ग्रामीण संस्कृती अजून जिथे टिकून आहे, तिथे हे प्रकार आढळत नाहीत

असहमत. महानगरांपेक्षा अधिक घाणेरडेपणा महाराष्ट्रात (विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सधन पट्टा) पहायला मिळतो. किळस वाटावी अशी देणी घेणी, मानपान, रुसवे फुगवे आणि टोमणे, प्रसंगी खुनखराबा पहायला मिळतो.

चित्रगुप्त's picture

21 Oct 2023 - 1:21 pm | चित्रगुप्त

विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सधन पट्टा) पहायला मिळतो. किळस वाटावी अशी देणी घेणी, मानपान, रुसवे फुगवे आणि टोमणे, प्रसंगी खुनखराबा पहायला मिळतो.

हे ठाऊक नव्हते. माहितीबद्दल अनेक आभार. एकंदरित लग्नानंतरचे जीवन (दोन्हीकडल्यांना) सुखाचे जाणे हे नशीबच म्हणायचे.

>>>एकंदरित लग्नानंतरचे जीवन (दोन्हीकडल्यांना) सुखाचे जाणे हे नशीबच म्हणायचे.

म्हणूनच घटस्फोटांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत चालले आहे.
मागचे दशक घरटी एक माणुस परदेशात.
हे दशक घरटी एकदा तरी घटस्फोट.
पुढील दशक... देव जाणे !!

चित्रगुप्त's picture

20 Oct 2023 - 9:21 pm | चित्रगुप्त

प्रतिसाद दोनदा प्रकाशित झालाय. जमल्यास एक उडवावा.

बरोबर,विवाह आधीचे समुपदेशन एकदा नाही अनेकदा आवश्यक आहे.Pre marriage counseling संकल्पना पुढील काही काळात वाढीस जाईल.नाहीतर लग्नाआधी ८-१० वर्षांचे तरी रिलेशनशिप पाहिजे.

अहिरावण's picture

21 Oct 2023 - 7:54 pm | अहिरावण

>>लग्नाआधी ८-१० वर्षांचे तरी रिलेशनशिप पाहिजे.

बाब्बो!! म्हणजे २६ चा पोरगा आणि २४ ची पोरगी लग्न करायचे असेल तर अनुक्रमे १६ आणि १४ पासून रिलेशनशिपमधे?

आणि ग्रामीण भागात २१ चा पोरगा आणि १८ ची पोरगी लगीन करते तर ११ आणि ८ व्या वर्षी रिलेशनशिपमधे?

बापरे ! जग खरेच बदलत चालले आहे.

नाहीतर लग्नाआधी ८-१० वर्षांचे तरी रिलेशनशिप पाहिजे.

हा हा.
आता वधुवर जाहिरातीत, 'अनुभव असल्यास प्राधान्य' असे मथळे दिसणार बहुदा.

उशिरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व. माझ्या वैयक्तिक कारणामुळे काही दिवस मिपावर हजेरी नव्हती. मी स्वतः व्यवसायाने डेंटिस्ट आहे आणि मानसतज्ञ म्हणूनही अधिकृत विद्यापीठातून मानसशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. मी समुपदेशक मानसतज्ञ अर्थात कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट म्हणून म्हणून काम करते. आपल्याला माझी मदत झाल्यास मला नक्कीच आवडेल. काही यासंबंधीच्या चाचण्या माझ्याकडे उपलब्धही आहेत.. त्याही मी देण्यास तयार आहे. माहितीचा सदुपयोग व्हावा इतकीच प्रामाणिक आणि प्रांजळ अपेक्षा आहे आणि तुम्ही ती पूर्ण कराल याची खात्रीही आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Nov 2023 - 5:31 pm | प्रकाश घाटपांडे

संपर्क करतो

अशा मानसशास्स्त्रीय चाचण्यांची मर्यादा व वैधता लक्शात घेउन सुद्धा या क्षेत्रातील लोकांनी compatibility test ही विकसित केली पाहिजे असे मला वाटते. फलज्योतिष हा श्रद्धेचा भाग असूनही गाईडलाईन म्हणुन वापरला जातो तर विकसित होत जाणारे मानसशास्त्र गाईडलाईन म्हणुन का वापरात येवू नये? मी अन्य समाजमाध्यमातून यावर फीडबॅक घेण्याचा प्रयत्न करत आहे.interpersonal relationship हा डायनॅमिक मुद्दा मानला तरी व्यक्तिमत्वाचे प्रकार म्हणुन काही मूलभूत गोष्टी असतीलच ना? त्या मूलभूत चौकटी पासून किती दूर जाउ शकतात? गुण मेलन व personality tests हे सगळच मंबोजंबो असेल तर हाही जुगार व तो ही जुगार!
आयपीएच ठाणॆ व पुणे या आनंद नाडकर्णी यांच्या संस्थेत अशी compitability test आणि विवाह्पुर्व समूपदेशन आहे अशी माहिती प्रतिक्रियेत मिळाली. ती मी तपासली तर त्यात फक्त विवाहपूर्व समुपदेशन वा व्यक्तिमत्व चाचणी अशा स्वतंत्र गोष्टी आहेत

https://archive.org/search?query=subject%3A%22%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%B... या लिंकवर
अनिल भागवतांच्या विवाह अभ्यास मंडळाची पुस्तके आहेत तीच मला तशी महत्वाची वाटली अनिल भागवतांच्या जीवनसाथ या 12 पुस्तकांचा मालिकांचा दस्तऐवज खूपच महत्वाचा आहे.. त्यात टेस्ट नाहीये पण चाचपणी करण्यास प्रश्नावली आहे.
मानवी नात्यांची गुंतागुंत तर्कबुद्धी व विवेकाच्या आधारे सोडवणे खरच कठीण काम आहे. कदाचित भविष्यात ए आय च्या मदतीने व्यक्तिमत्वे एकमेकांशी जुळतात की नाही? हे भारतीय पार्श्वभूमीवर सांगणारी प्रणाली तयार होईल.मानवी नातीच जिथे वेगाने बदलत आहेत तिथे कशा कशाचे अंदाज बांधणार असा प्रश्नही पडतोच.

पत्रिका पाहून विवाह करतात , बहुतेकजण . हे तितकेसे खरेही नाही. कारण मी स्वता पाहिलंय पत्रिकेचा आग्रह हा काही मुलांकडे ढाली सारखा म्हणून करतात ,कारण, काही मुलिकडचे लोक मुलगी पहाण्याचा फारच आग्रह करतात व पिच्छा सोडत नाहीत पण मुलगी किंचितही आम्हाला असलेल्या अपेक्षांची उदा.__नोकरी करणारी ,पदवीधर, कमीतकमी बांधेसूद अति लठठ व अति बारीक मुलगीही असते. तसेच व्यंग असलेली पण थोड्या बर्या नोकरीवर खपवू पहाणारेही असतात मुलगा दिसण्यात गोरा भरलेल्या अंगाचा मध्यम उंची बरयापैकी छान दिसणारा असला तरी त्याची घरची परिस्थिती , राहणीमान सरासरी चार लोकांसारखे नसल्यास व्यंग व दिसण्यात काळया कुरुप. मुलीही चांगलया दिसणयरया मुलाला. खपविणस पण घरदार घाणेरडे , जबाबदारी असलेल्या मुलाला खपविणयास बघतात , त्यासाठी पत्रिकेच्या कुबड्या बाळगावया लागतात.महणजे पत्रिका जमत नाही हे उत्तर द्यायला वाईटपणा न येता व उगाच कशाला लोकांचया मुली पहायला जायचे हे त्रास वाचावालाही पत्रिका व फोटो ठेवून जा सांगायला बरे पडते. हा अगदी जवळच्या नात्यातील अनुभव आहे.

पत्रिका पाहून विवाह करतात , बहुतेकजण . हे तितकेसे खरेही नाही. कारण मी स्वता पाहिलंय पत्रिकेचा आग्रह हा काही मुलांकडे ढाली सारखा म्हणून करतात ,कारण, काही मुलिकडचे लोक मुलगी पहाण्याचा फारच आग्रह करतात व पिच्छा सोडत नाहीत पण मुलगी किंचितही आम्हाला असलेल्या अपेक्षांची उदा.__नोकरी करणारी ,पदवीधर, कमीतकमी बांधेसूद अति लठठ व अति बारीक मुलगीही असते. तसेच व्यंग असलेली पण थोड्या बर्या नोकरीवर खपवू पहाणारेही असतात मुलगा दिसण्यात गोरा भरलेल्या अंगाचा मध्यम उंची बरयापैकी छान दिसणारा असला तरी त्याची घरची परिस्थिती , राहणीमान सरासरी चार लोकांसारखे नसल्यास व्यंग व दिसण्यात काळया कुरुप. मुलीही चांगलया दिसणयरया मुलाला. खपविणस पण घरदार घाणेरडे , जबाबदारी असलेल्या मुलाला खपविणयास बघतात , त्यासाठी पत्रिकेच्या कुबड्या बाळगावया लागतात.महणजे पत्रिका जमत नाही हे उत्तर द्यायला वाईटपणा न येता व उगाच कशाला लोकांचया मुली पहायला जायचे हे त्रास वाचावालाही पत्रिका व फोटो ठेवून जा सांगायला बरे पडते. हा अगदी जवळच्या नात्यातील अनुभव आहे.

तुषार काळभोर's picture

11 Nov 2023 - 8:12 am | तुषार काळभोर

जर सर्व जुळणाऱ्या गोष्टी असतील, स्थळ अपेक्षेप्रमाणे किंवा अपेक्षेहून जास्त चांगले असेल तर अगदी मुलाला/मुलीला कडक मंगळ आहे, यालाही उपाय काढले जातात.

अवांतर: पत्रिका जुळणे किंवा न जुळणे, हे दोन्ही बाजूंनी सेम असायला पाहिजे ना! म्हणजे पत्रिका जुळत नाही असं कारण एका पक्षाने दिले, तर खरोखर पत्रिका जुळते की नाही हे दुसऱ्या पक्षाला माहिती असतेच की!

प्रकाश घाटपांडे's picture

11 Nov 2023 - 11:05 am | प्रकाश घाटपांडे

पत्रिका जुळणे किंवा न जुळणे, हे दोन्ही बाजूंनी सेम असायला पाहिजे ना! म्हणजे पत्रिका जुळत नाही असं कारण एका पक्षाने दिले, तर खरोखर पत्रिका जुळते की नाही हे दुसऱ्या पक्षाला माहिती असतेच की!

यात वस्तुनिष्ठता नसते. अधिक माहिती साठी आपण माझे यंदा कर्तव्य आहे? हे पुस्तक जरुर वाचावे.