लोकशाही - स्वतंत्र भारतातील एक शोकांतिका..

आर्यन मिसळपाववाला's picture
आर्यन मिसळपाववाला in काथ्याकूट
29 Aug 2023 - 9:33 pm
गाभा: 

माझा भारत देश स्वतंत्र होऊन ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
सामान्य नागरिकांच्या आयुष्यात काय ठळक बदल झाला आहे.

सरकारी हॉस्पिटल मध्ये आयुष्याच्या उतारवयात खात्रीशीर उपचार मिळतील का .
नवीन पिढी सरकारी शाळेत जाण्याचा विचार करू शकेल.
शहरी नागरिकांचे आयुष्य प्रदूषण आणि ट्रॅफिक मुक्त झालेय.
ग्रामीण भागात बेसिक सोयी सुविधांची ऑन ग्राउंड परिस्थिती काय आहे.

अखेर काय झालेय मागच्या ७६ वर्षात सामान्य माणसा साठी …

धाग्यावर सर्व सामान्य माणसाला केन्द्रस्थनि धरुन प्रतिकिर्य अपेक्शित आहेत.

प्रतिक्रिया

पण तुमच्या प्रतिक्रिया आणि मतं अगोदर लिहा ही विनंती.

तुमच्या धाग्याचे शीर्षक आणि त्यातील प्रश्न याचा मेळ लागत नाहीये

१)भारतातही लोकशाही म्हणाल तर ती जिवंत आहेच ... फक्त घड्याळाच्या पेन्डूलम सारखी २ टोकाला जाते , सबळ सत्ताधारी - विरोधी असे निर्माण होत नाहीयेत
कधी काँग्रेस ला ४०० च्या वर तर कधी भाजप ला ३००!
टोकाची व्यक्तिपूजा ( इंदिरा असो नाहीतर मोदी )
घराणेशाची ( यादी देत नाही)
एका क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती लगेच राजकारणात चांगली असेलच असे नाही याचे भान नसणे ( अमिताभ ने निवडणूक लढवणे ) लगेच रोनाल्ड रेगन चे उदाहरण देऊन कोणी टपली मारू नये ( तो अपवाद होता )
या गोष्टी सुधृढ लोकशाहीला मारक आहेत ..
२) बाकी "सामान्य नागरिकांच्या आयुष्यात काय ठळक बदल झाला आहे."
तर बऱ्याच चांगल्या आणि बऱ्याच वाईट गोष्टी आहेत यादी फारच लांब होईल ( अर्थात भारतात नसल्यमुळे त्यात खोल लिहिणे योग्य नाही )

कॉमी's picture

1 Sep 2023 - 12:06 am | कॉमी

Trump सुद्धा रेगन सारखाच सेलेब्रिटी. त्याचाही २०१६ पूर्वी राजकारणाचा अनुभव शून्यच.
Arnold आहे.

( अर्थात भारतात नसल्यमुळे त्यात खोल लिहिणे योग्य नाही )

असे का? भारतात असा काही नियम झाला आहे का?
असे असेल तर किती तरी संकेतस्थळे ओस पडतील. तो श्री रघुराम राजन, श्री अशोक स्वान इ. नेहमीच भारतीय विषयावर टिप्पणी करत असतात.

माझा भारत देश स्वतंत्र होऊन ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
सामान्य नागरिकांच्या आयुष्यात काय ठळक बदल झाला आहे.

सरकारी हॉस्पिटल मध्ये आयुष्याच्या उतारवयात खात्रीशीर उपचार मिळतील का .
नवीन पिढी सरकारी शाळेत जाण्याचा विचार करू शकेल.
शहरी नागरिकांचे आयुष्य प्रदूषण आणि ट्रॅफिक मुक्त झालेय.
ग्रामीण भागात बेसिक सोयी सुविधांची ऑन ग्राउंड परिस्थिती काय आहे.

अखेर काय झालेय मागच्या ७६ वर्षात सामान्य माणसा साठी …

धाग्यावर सर्व सामान्य माणसाला केन्द्रस्थनि धरुन प्रतिकिर्य अपेक्शित आहेत.

माझा भारत देश स्वतंत्र होऊन ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत.

सगळे भारतीय नागरीक कधी प्रामाणिकपणे कर भरतील का? कर न भरता ढिगभर पोरे जन्माला घालुन सरकारकडुन फुकट मदत मागतील का? शहरी भागातील लोक वाहने नीट चालवतील का?

सुबोध खरे's picture

30 Aug 2023 - 9:56 am | सुबोध खरे

सरकारी हॉस्पिटल मध्ये आयुष्याच्या उतारवयात खात्रीशीर उपचार मिळतील का .

सर्व गोष्टी सरकारने आमच्यासाठी फुकट केल्या पाहिजेत या ७० वर्षे पोसलेल्या दळभद्री मनोवृत्तीतून माणसं बाहेर येतील तेंव्हा भारत खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर जाईल.

मुळात शोकांतिका ( जिचा अंत शोकात होतो अशी) याचा अर्थच आपल्याला समजलेला नाही.

कपिलमुनी's picture

11 Sep 2023 - 7:08 pm | कपिलमुनी

नागरिक आयुष्यभर टॅक्स भरतो .. फुकट पाहिजे कोण म्हणताय ??

सरकार काय स्वतःच्या खिशातून देतात का काय ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2023 - 11:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्या भारतात टॅक्सच्या माध्यमातून जी भरमसाठ लूटमार चालू आहे, त्याबद्दल न बोललेलं बरं.

टॅक्सच्या माध्यमातून मिळालेला कर सुरत गुहाटी आणि तत्सम सहलींसाठी आणि
पक्ष फोडाफोडीलाच वापरायचा असा त्यांचा शुद्ध हेतू असावा.

-दिलीप बिरुटे

अहिरावण's picture

14 Sep 2023 - 2:27 pm | अहिरावण

खरे आहे हो तुमचे .... कर सग़ळा असाच वापरला जातो... किती हुशार आहात हो तुम्ही...

असल्या तर्काला विशेष अर्थ नाही. फुकट आरोग्यसेवा सरकारी माध्यमातून का पाहिजे ? त्याऐवजी कर कमी करा आणि आम्ही आमचे आरोग्य पाहून घेऊ अशी भुमीका का मांडत नाही ? आज पर्यंत देशांत कुठे कुठली सरकारी सेवा चांगली आहे ? कचरा व्यवस्थापन पासून ते कायदा आणि सुव्यवस्था पर्यंत सगळीकडे जिथे जिथे सरकार गुंतलेले आहे तिथे फक्त बोंब आहे. मग आरोग्य सारखी महत्वाची सेवा ह्या रक्तपिपासू लोकांच्या घशांत का ?

जे लोक देशांत कर भारतात ते सरकारी इस्पितळांत क्वचितच पाय ठेवतील. जे लोक भारत नाहीत त्यांनाच सरकारी इस्पितळांत जायचे आहे.

टीप : आरोग्य सारख्या निरर्थक आणि चैनीच्या गोष्टीवर खर्च केल्यास, अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजना, अन्नदाता शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुल्ला मौलवींना पगार, हुनर हाथ चे अनुदान, लादली लक्ष्मी, IAS लोकांचा पगार असल्या महत्वाच्या गोष्टींसाठी पैसा कुठून येणार ?

अहिरावण's picture

14 Sep 2023 - 2:26 pm | अहिरावण

बिनडोक प्रतिसाद

लोकशाही आणि तुम्ही जी मते व्यक्त केली आहेत त्यांचा काडीचाही संबंध नाही. लोकशाही आणि इस्पितळांत आला मिळणे ह्यांचा काहीही संबंध नाही, सरकारी शाळांचा सुद्धा काहीही संबंध नाही. सॉक्रेटिस ला देहदंडाची शिक्षा हि लोकशाहीने दिली होती, निर्णय पराकोटीचा चुकीचा असला तरी तो १००% लोकशाही मार्गाने दिला होता.

दुर्दैवाने "फर्स्ट प्रिन्सिपल्स" म्हणजे मूळ तत्वे ओळखून त्यावरून तर्क करण्याची भारतीयांची क्षमता लोप पावली आहे.

खालील गोष्टींचा आणि लोकशाहीचा संबंध काय ?

--

सरकारी हॉस्पिटल मध्ये आयुष्याच्या उतारवयात खात्रीशीर उपचार मिळतील का .
नवीन पिढी सरकारी शाळेत जाण्याचा विचार करू शकेल.
शहरी नागरिकांचे आयुष्य प्रदूषण आणि ट्रॅफिक मुक्त झालेय.
ग्रामीण भागात बेसिक सोयी सुविधांची ऑन ग्राउंड परिस्थिती काय आहे.

--

खालील गोष्टींचा आणि लोकशाहीचा संबंध काय ?
हो सहमत म्हणूंच म्हणले त्यांच्या धाग्यचे शीर्षक आणि आतील भाग हे गंडलेले दिसते
बहुतेक करून त्याना फक्त " भारतातील ७६ वर्षातील चढाव उतार " यावर चर्चा करायाची असावी पण शिरक्षकात लोकशाही चा का उल्लेख केलं हे काही कळत नाही

>>माझा भारत देश स्वतंत्र होऊन ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत.

तुमचे आकलन बरोबर आहे.

>>सामान्य नागरिकांच्या आयुष्यात काय ठळक बदल झाला आहे.
बराच झाला आहे. तुम्ही सामान्य असाल तर तुम्हाला तो जाणवेल, नसाल तर तसाही तुम्हाला फरक काय पडतो !

>>सरकारी हॉस्पिटल मध्ये आयुष्याच्या उतारवयात खात्रीशीर उपचार मिळतील का .
खाजगी इस्पितळात मिळतो का? मिळत असेल तर तिकडे जा, नसेल तर देवाचे नाव घ्या ! व्हाल बरे किंवा सुटाल !!

>>नवीन पिढी सरकारी शाळेत जाण्याचा विचार करू शकेल.
नव्या पिढीच्या आईबापांनी करायला हवा. मुलांचे काय ते शाळेत जात नसतात, त्यांना पाठवले जाते.

>>शहरी नागरिकांचे आयुष्य प्रदूषण आणि ट्रॅफिक मुक्त झालेय.
आधी तुमच्या पासून सुरुवात करा. एक गाडी कमी करा

>>ग्रामीण भागात बेसिक सोयी सुविधांची ऑन ग्राउंड परिस्थिती काय आहे.
मस्त आहे.

>>अखेर काय झालेय मागच्या ७६ वर्षात सामान्य माणसा साठी …
बरंच काही

>>धाग्यावर सर्व सामान्य माणसाला केन्द्रस्थनि धरुन प्रतिकिर्य अपेक्शित आहेत.
मी सामान्य माणुस आहे असे माझे मत आहे. त्यामुळे मला केंद्रस्थानी धरुन प्रतिक्रिया दिली.

कर्नलतपस्वी's picture

30 Aug 2023 - 1:42 pm | कर्नलतपस्वी

सहा वर्षापुर्वी आपण डकवलेल्या धागा सांगतौय की तुम्ही ऑस्ट्रेलिया,कॅनडा आशा प्रदेशात स्थलांतरित झाले असावेत.

https://www.misalpav.com/node/37287
जर झाले असाल तर आमची लोकशाही आमच्या कडेच राहू द्यात. नसाल झाला तर पुढे लिहीन.

सध्या मिपावर राजकारण व तत्सम विषयावर बोलण्यास कर्फू आहे. या धाग्यावर गुप्त राजकारण उघडपणे दिसत आहे म्हणून पास.

अहिरावण's picture

30 Aug 2023 - 1:45 pm | अहिरावण

>>तुम्ही ऑस्ट्रेलिया,कॅनडा आशा प्रदेशात स्थलांतरित झाले असावेत.

आयला ! मी शिकलेल्या भुगोलात ऑस्ट्रेलिया,कॅनडा बरेच लांब आहेत. एकावेळि हे दोन्ही ठीकाणी कसे काय? म्हणजे एक पाय इकडे आणि एक पाय तिकडे? आणि तरी विचार मात्र भारताचा? गंमत आहे सगळी.. धोबीका कुत्ता झालेला दिसत आहे..

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Aug 2023 - 2:34 pm | अमरेंद्र बाहुबली

स्वातंत्र्य मिळवण्यामागे प्रेरना काय होती हो मला अजूनही कळले नाहीये. आज भारत इंग्रजांच्या ताब्यात असता तर फार प्रगत असता. इंग्रजांमूळेच भारतात आर्थीक, राजकीय, धार्मीक ना सामाजीक सूधारणा झाल्या. पाकिस्तान निर्मान करून इंग्रजांनी भारतीयांच्या मानेवरील इस्लामचं जोखड इंग्जांनीच सैल करून दिलं. भारतीयांच्या मागच्या २० पिढ्यांना ते जमले नव्हते. अनेक समाजसुधारकांना इंग्रजांनी सढळ हाताने शासकीय मदत केली. इंग्रज न्याय प्रिय होते. असे देवा सारखे अवतरलेले इंग्रज भारतीयांनी का घालवले हा माझा प्रश्न अजूनही सूटला नाहीये.

अहिरावण's picture

30 Aug 2023 - 2:54 pm | अहिरावण

तुमच्या सारखे विद्वान त्याकाळी नव्हते हे भारताचे दुर्देव ! अन्यथा काय बिशाद होती गांधी, नेहरु, सावरकर, बोस, टिळक इत्यादींची की इंग्रजांना चालते व्हा म्हणून सांगायाची?

चुकलंच त्यांच ! त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो.

खुश?

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Aug 2023 - 3:40 pm | अमरेंद्र बाहुबली

प्रश्न काय? ऊत्तर काय? त्यांची बिशाद होती की नव्हती हा प्रश्न नाहीये. वाचायचा किंवा समजून घ्यायचा प्रोब्लेम असेल तर मग कठीण आहे.

अहिरावण's picture

30 Aug 2023 - 7:23 pm | अहिरावण

ओक्के

सदर प्रतिसाद वाचून फार पूर्वी वाचलेले लोकहितवादींचे लेख आठवले. (कै. गोपाळ हरी देशमुख - १८२३ - ९२)

आज भारत इंग्रजांच्या ताब्यात असता तर फार प्रगत असता. इंग्रजांमूळेच भारतात आर्थीक, राजकीय, धार्मीक ना सामाजीक सूधारणा झाल्या.

-- याबद्दल जरा सविस्तर विवेचन करावे ही विनंती. विशेषतः इंग्रजांमुळे भारतातः
१. आर्थिक सुधारणा: ....अमूक अमूक.
२. राजकीय सुधारणा:... "
३. धार्मिक सुधारणा: ......"
४. सामाजिक सुधारणा: .."
५. इंग्रजांच्या न्यायप्रियतेची दहा उदाहरणे: ... अमूक अमूक.
६.ज्या समाजसुधारकांना सढळ हाताने शासकीय मदत केली, त्यांची नावे: ..... अमूक अमूक.
हे सगळे निर्भिडपणे स्पष्ट करावे. भारतात पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर आहेच, आणि मिपा आपलेच आहे.

कदाचित तुम्ही म्हणता त्यात बरेच तथ्य असण्याचीही शक्यता आहे. 'स्वातंत्र्यसमर' म्हणजे उगाचच 'स्वतंत्रता सेनानी' म्हणून पेन्शन खाण्यासाठी रचलेला तो सगळा कावा पण असू शकतो. कुणी सांगावे ?
एखाद्या अत्यंत विद्वान, निष्णात, अनुभवी, आपल्या विद्येत पारंगत असलेल्या वैद्यराजाने अंथरुणाला खिळून गेलेल्या रोग्याची तपासणी करावी व सूक्ष्म चिकित्सा करून रोगनिदान करावे आणि मग त्याला रोगमुक्त करण्यासाठी प्रभावी औषधयोजना करावी, त्याचप्रमाणे रुग्ण अशा भारतीयांच्या बाबतीत आपण करावेत ही विनंती.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Sep 2023 - 10:27 pm | अमरेंद्र बाहुबली

सहमत. मीही लोकहीतवादींचे बरेच लेख वाचलेत. त्यात त्यांनी इंग्रज आल्यामूळे किती सुधारणा झाल्या ह्या बद्दल लिहीलंय.

१. आर्थिक सुधारणा: ....
२. राजकीय सुधारणा:... "
३. धार्मिक सुधारणा: ......"
४. सामाजिक सुधारणा: .."
५. इंग्रजांच्या न्यायप्रियतेची दहा उदाहरणे: ... अमूक अमूक.
६.ज्या समाजसुधारकांना सढळ हाताने शासकीय मदत केली, त्यांची नावे: ..... अमूक अमूक

ह्या साठी लोकहीतवादींचेच लेख वाचावेत. त्यांनी त्यात सर्व लिहीलेय. कुणी विद्वान असेल तर त्याने लोकहीतवादींचे दावे खोडबन काढावेत. बाकी वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांच्या बाजूचा निकाल, सती प्रथा बंदी नी तत्सम प्रथा बंदी ह्या धार्मीक/सामाजीक सुधारणा म्हणायला हव्यात. बाबासाहेबांना गोलमेज परिषदेत बोलावणे ह्या राजकीय सुधारणा मी तरी मानतो.
महात्मा फुलेंना, ना इतर समाज सुधारकांना शाळा वगैरे काढण्यास शासतीय मदत करणे. बर्याच गोष्टी आहेत.

चौकस२१२'s picture

1 Sep 2023 - 10:33 am | चौकस२१२

स्वातंत्र्य मिळवण्यामागे प्रेरना काय होती हो मला अजूनही कळले नाहीये
हे आपण भर चौकात जाऊन म्हणून दाखवा
अमरेंद्र बाहुबली आपण त्या चर्चिल चे आत्तेभाऊ कि काय? त्याने पण असे काही म्हणले होते कि भारत स्वतन्त्र होण्याच्या लायकीचा नाही !
गुलाम हा शेवटी गुलाम असतो ऐकलेलं दिसत नाही का तुम्ही

आणि स्वराज्य या शब्दाचा पूर्ण अर्थ सांगायला प्रत्यक्ष छत्रपतींना परत जन्म घयावा लागेल बहुतेक तुम्हाला समजवायला !

( अर्थात स्वतःचे शासन सोप्पे व्हावे / चालावे म्हणून ज्या काही गोष्टी इंग्रजाणे भारतात गोष्टी आणल्या त्या त्याने उपकारी म्हणून आणल्या असे म्हणायचे असले तर काय बोलणेचं खुंटले )

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Sep 2023 - 10:30 pm | अमरेंद्र बाहुबली

सर नमस्कार,
भर चौकात नक्कीच बोलू शकत नाही, कारण इंग्रजांनी राज्य केले मिहणजे ते वाईटच असं आपण ठरवलंय ना!
चर्चील “मी इंग्लंड ला भिकारी बनवायला पंतप्रधान झालेलो नाही“ असं बोलल्याचंही वाचलंय. तो माणूस हरला ते बरेच झाले.

आणि स्वराज्य या शब्दाचा पूर्ण अर्थ सांगायला प्रत्यक्ष छत्रपतींना परत जन्म घयावा लागेल बहुतेक तुम्हाला समजवायला !

सर छत्रपतींचं स्वराज्य ही तसं होतं अशी बजबजपूरी नव्हती.
मूघल आणी इंग्रजात फरक होता.

मूघल आणी इंग्रजात फरक होता.
कोणता ते नंतर बघू पण गुलामी ती गुलामी हे मान्य आहे कि नाही? विचारण्याचे कारण कि तुम्हाला .."स्वातंत्र्य का मिळवल" हा प्रशन पडला आहे म्हणून

कर्नलतपस्वी's picture

6 Sep 2023 - 5:30 pm | कर्नलतपस्वी

स्वातंत्र्य मिळवण्यामागे प्रेरना काय होती हो मला अजूनही कळले नाहीये.

बरे झाले तुम्ही स्वातंत्र्य पुर्व काळात जन्माला आला नाहीत,. नाहीतर इग्रजांचे पित्तू मधे एक आणखी भर पडली असती.

आपल्या प्रतिसादाबद्दल बोलायचे म्हणले तर आपण इतिहास वाचलाच नाही,वर्तमानाचे आकलन करणे आपल्याला जमले नाही.

भारत इंग्रजांच्या ताब्यात असता तर फार प्रगत असता. इंग्रजांमूळेच भारतात आर्थीक, राजकीय, धार्मीक ना सामाजीक सूधारणा झाल्या.

गुलामगिरीची मानसिकता.

पाकिस्तान निर्मान करून इंग्रजांनी भारतीयांच्या मानेवरील इस्लामचं जोखड इंग्जांनीच सैल करून दिलं

आहो चौदा ऑगस्ट १९४७ पर्यंत एकाच झेंड्याखाली खांद्याला खांदा लावून लढणारी सेना फाळणी होताच एकमेका समोर कुणी उभी केली. काय उद्देश होता ,दोन्ही सैन्याचे कमांडर कोण होते?

जाऊ द्यात , नाही कळणार तुम्हाला.

अनेक समाजसुधारकांना इंग्रजांनी सढळ हाताने शासकीय मदत केली.

कुणाचे पैसे? कुठून आणले आणी का दिले? राणीने आपला खजाना खाली केला होता का गरीब बिचार्‍या भारतीयांवर ?

आमचेच पैसे, लुटले व कुत्र्यासमोर तुकडा टाकावा तसे, आमच्याच टाळूवरचे लोणी खाऊन ते माजले. सुधारणा केल्या कुणा करता,स्वताचे साम्राज्य वाढावे म्हणून होत्या त्या. इतिहास वाचा कळेल सर्व.

इंग्रजांना त्याचा आपला देश होता तरीही भारत मागासवर्गीय समाज आहे चला आपण त्यांना मदत करूया या परोपकारी भावनेतून ते आले होते आसे म्हणायचे आहे का तुम्हांला?

त्यांनी निस्वार्थ बुद्धीने या देशावर राज्य केले व आपणच भारतवासी कृतघ्न आहोत आसे म्हणायचे आहे का?

आरा रा रा.......

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Sep 2023 - 1:07 pm | अमरेंद्र बाहुबली

माफ करा कर्नल साहेब. पण मला म्हणायचंय की अशी कूठली गोष्ट होती प्रशासकीय दृष्ट्या जी चांगली नव्हती इंग्रजांची? इंग्रज न्याय प्रिय होते, शिस्तबध्द होते. व्यापारी वर्ग सुखी होता. अनेक गोष्टी इंग्रजांच्या चांगल्या होत्या. तरीही भारतीयांना स्वातंत्र्य का हवे होते?

अहिरावण's picture

7 Sep 2023 - 1:50 pm | अहिरावण

>>> तरीही भारतीयांना स्वातंत्र्य का हवे होते?

काय आहे काही जणांना गुलामगिरी सहन होत नाही. सोन्याची असली तरी ती बेडीच असते.

बंगालचा दुष्काळ हे एक .. अशीच शेकडो कारणे आहेत इंग्रजांच्या न्यायप्रियतेची

कोण रे तो जालियानवाला, प्लेग, १८५७, विदर्भातील कापुस उपादक शेतकरी, मीठ वगैरे बरळत आहे.. मुर्ख कुठला.

कर्नलतपस्वी's picture

7 Sep 2023 - 3:17 pm | कर्नलतपस्वी

हम पंछी उन्मुक्त गगन के
पिंजरबद्ध न गा पाएँगे,
कनक-तीलियों से टकराकर
पुलकित पंख टूट जाएँगे।
हम बहता जल पीनेवाले
मर जाएँगे भूखे-प्यासे,
कहीं भली है कटुक निबौरी
कनक-कटोरी की मैदा से।
स्वर्ण-श्रृंखला के बंधन में
अपनी गति, उड़ान सब भूले,
बस सपनों में देख रहे हैं
तरु की फुनगी पर के झूले।
ऐसे थे अरमान कि उड़ते
नीले नभ की सीमा पाने,
लाल-किरण सी चोंच खोल
चुगते तारक-अनार के दाने।
होती सीमाहीन क्षितिज से
इन पंखों की हो‌ड़ा-होड़ी,
या तो क्षितिज मिलन बन जाता
या तनती साँसों की डोरी।
नीड़ न दो, चाहे टहनी का
आश्रय छिन्न-भिन्न कर डालो,
लेकिन पंख दिए हैं तो
आकुल उड़ान में विघ्न न डालो।
-दिनकर

व्यापार करायला आले होते. सर्व राज्ये खालसा केली. राजां महाराजांना घरी बसवले.ज्यांनी आवाज उठवला तर साम दाम दंड भेद करून खच्ची केले.लुटालूट करून स्वताचे घर भरले.कोहिनूर काय राणीला आहेर दिला होता? आमची भवानी तलवार का परत करत नाहीत?

न्याय प्रिय, मायफुट, दत्तक विधान कायदा का बदलला? कारण वारस नाही,दत्तक पुत्राला मान्यता नाही,राज्य खालसा.

किती लिहू तेव्हढे थोडेच.

वरील कविता वाचा,पक्षी सुद्धा गुलामीत राहू इच्छित नाही आपण तर माणसं आहोत.

अबा म्हणून म्हणतो इतिहास वाचा.

सुभाषचंद्र बोस यांनी केलेला सशस्त्र उठाव, राॅयल नेव्ही मधे झालेला सशस्त्र उठाव 18 फरवरी 1946 मुंबई बंदरात भारतीय नौसैनिक न्याय प्रिय सरकार विरूद्ध......काय लिहू आणी किती लिहू.

या सर्व गोष्टींमुळे इंग्रज सरकार समजले की या देशावर राज्य करणे म्हणजेच सर्वनाश. सर्व काही लिहीत नाही इतिहास वाचा.

बई) के इसी बंदरगाह पर ब्रिटिश भारतीय नौसेना, यानी रॉयल इंडियन नेवी के भारतीय नौसैनिकों ने घटिया खाने के विरोध में अंग्रेजों के खिलाफ बगावत कर दी

चौकस२१२'s picture

11 Sep 2023 - 6:17 am | चौकस२१२

गुलामी ती गुलामी

आम्ही आमच्या वरील प्रतिसादात ज्या लोकहितवादींचा उल्लेख केला आहे, त्यांजविषयी सांप्रतकाळी फारसे कानावर येत नाही. जेथे पहावे तेथे गांधी, नेहरू आणि अलिकडे सरदार पटेल, बोस इत्यादिकांचाच बोलबाला दृष्टोत्पत्तीस येत असतो.
वाचकांची जर अनुज्ञा असेल, तर जेणेकरून मशारनिल्हे लोकहितवादी यांच्या क्रांतिकारी विचारांशी अल्प परिचय घडून येऊन वाचकांचे उद्बोधन होईल असे आम्हास खातरीने वाटते, ते कार्य- अर्थात त्यांचे लेखनातील काही उतारे येथे देणे - आम्ही हाती घेऊ शकतो. अनुज्ञा असावी ही विनंती.

तुमची मतं सांगायला वेळ काढा लवकर.

तुमची मतं सांगायला वेळ काढा लवकर.

--हा प्रतिसाद कुणासाठी आहे, हे स्पष्ट केल्यास बरे होईल.

गेल्या शहात्तर वर्षांचा धांडोळा घेण्यापेक्षा आठ दहा वर्षांचा घेणे थोडेसे सोपे वाटते. सहज जाणवलेल्या काही गोष्टी.
प्रत्येक घराला शौचालय असावं असं जाणवणारा पंतप्रधान भारताला मिळाला. केवळ आधार कार्डाच्या पुराव्यावर सामान्य माणसाला बँकेत खाते उघडता येऊ लागले. शासनाकडून सामान्य माणसाला मिळणारे अर्थ सहाय्य थेट त्याच्या खात्यात जमा होऊ लागले. भ्रष्टाचारी मंत्र्यांना पण तुरुंगाची हवा खावी लागते हे दिसू लागले.
अतिरेक्यांचे बॉम्बस्फोट बंद झाले. घटनेची ३७० वी दुरुस्ती (जी तात्पुरती होती ती) रद्द झाल्याने काश्मीर मधील पाकिस्तान धार्जिणे सरकार जाऊन काश्मीर पुनः पर्यटकांचे नंदनवन होऊ लागले.
बरंच काही लिहिण्यासारखं आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Sep 2023 - 10:17 pm | अमरेंद्र बाहुबली

गेल्या शहात्तर वर्षांचा धांडोळा घेण्यापेक्षा आठ दहा वर्षांचा घेणे थोडेसे सोपे वाटते. सहज जाणवलेल्या काही गोष्टी.>>>

प्रत्येक घराला शौचालय असावं असं जाणवणारा पंतप्रधान भारताला मिळाला.>>

ह्या आधीच्या सरकारांनी सार्वजनीक शौचालये तसेच घरांसाठी शौचालये असावे की नसावे ह्याच्या योजना जाहीर केल्या होत्या की नाही ह्याची कृपया माहीती घ्यावी. हगनदारीमूक्त गाव वगैरे ऐकले असेलच.

केवळ आधार कार्डाच्या पुराव्यावर सामान्य माणसाला बँकेत खाते उघडता येऊ लागले. >>>
आधार योजना ही कुणाच्या काळात आली नी कुणी त्याला विरोध केली हा माहीती घ्यावी. तसेच बॅंकाचे राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेऊन गरीबांना कर्ज कुणी ऊपलब्ध करून दिला ह्याचीही माहीती घ्यावी.

शासनाकडून सामान्य माणसाला मिळणारे अर्थ सहाय्य थेट त्याच्या खात्यात जमा होऊ लागले. भ्रष्टाचारी मंत्र्यांना पण तुरुंगाची हवा खावी लागते हे दिसू लागले.>>>

सामान्य माणसाला भरमसाठ कर वाढवून ३५ चे पेट्रोल ११० ला देऊन त्याच्यात खात्यात पैसे आले. आवडली योजना.
तसेच भ्रष्टाचारी मंत्र्यांना तुरूंगाची हवा खावा लागली (जर ते विशीष्ट पक्षात आले नाहीत तर) ह्या बाबत सहमत.

अतिरेक्यांचे बॉम्बस्फोट बंद झाले. >>
पूलवामा, ऊरी, बालाकोट वगैरेत अतिरेक्यांनी सूतळी बाॅब फोडले पण देशद्रोही मिडीयाने बाॅबस्फोट, आरडीएक्स हल्ला वगैरे केला असं खोटं पसरवलं. त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाय.

घटनेची ३७० वी दुरुस्ती (जी तात्पुरती होती ती) रद्द झाल्याने काश्मीर मधील पाकिस्तान धार्जिणे सरकार जाऊन काश्मीर पुनः पर्यटकांचे नंदनवन होऊ लागले.>>>> _/\_ दंडवत.

बरंच काही लिहिण्यासारखं आहे.>>>
लिहीत रहा.

चौकस२१२'s picture

6 Sep 2023 - 3:53 pm | चौकस२१२

गेल्या शहात्तर वर्षांचा धांडोळा घेण्यापेक्षा आठ दहा वर्षांचा घेणे थोडेसे सोपे वाटते
वाटणारच कारण अजेंड्यात बसतेय !

कर्नलतपस्वी's picture

6 Sep 2023 - 5:35 pm | कर्नलतपस्वी

वरीष्ठ अधिवक्ता सर्वोच्च न्यायालय श्री राकेश दिवेद्वी यांनी व इतर वकिलांकडून केलीली विधाने वाचा.

* ब्रिटिश लोक देशासाठी चांगले नसले तरी त्यांच्या आगमनाने भारतीय समाजाला अनेक फायदे झाले.
* इस्लामिक आक्रमणाला थोपवण्याचा नादांत ज्या विविध गोष्टी देशांत लोप पावल्या होत्या त्या ब्रिटिश सत्तेमुळे पुन्हा देशांत आणणे शक्य झाले.
* भारत इंग्लंडचा भाग राहिला असता तरी भारतीयांना ब्रिटिश नागरिकांच्या बरोबरीने हक्क मिळणे शक्य नव्हते कारण भारतीय लोक तेंव्हा आणि आज सुद्धा खूप पटीने मागासलेले, फुकटे, असुसंस्कृत होते/आहेत.
* बरोबरीचे हक्क नसतील तर शोषण जास्त होते.
* भारतीयांचे स्वातंत्र्य हे लढा वगैरे देऊन मिळाले नव्हते तर ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने प्लॅन केले त्याच पद्धतीने झाले. ब्रिटिश लोकांनी सत्ता भारतीयांना नाही दिली तर आपल्या चट्ट्याबॅट्या लोकांना दिली.
* अमेरिकेत म्हण आहे गोर्या मालकापेक्षा असत जुलुमी हा काळा मालक असतो. म्हणजे आपल्याच लोकांवर अत्याचार करण्यात गुलाम लोक जास्त क्रूर असतात. त्याच न्यायाने भारतीय सरकार हे ब्रिटिश सरकारपेक्षा जास्त जुलुमी, कामचुकार, दुष्ट आणि अत्याचारी आहे. भारतीय सरकार आणि त्याची विविध पाळे मुळे भारतीय लोकांवर आणि विशेषतः गरीब लोकांवर प्रचंड अत्याचार करतात.
* ब्रिटिश सरकारने जितक्या भारतीयांना मारले आणि गरिबीत खितपत ठेवले त्यापेक्षा कितीतरी जास्त भारतीयांना भारत सरकारने गरिबीत खितपत पाडले आहे.
* भारतीय समाज मागासलेला आहे, governance च्या दृष्टीने अकार्यक्षम आहे हे चर्चिल ह्यांचे भाकीत खरे आहे. म्हणूनच स्वातंत्र्यानंतर भारतीय लोक ब्रिटिश, अमेरिकन दूतावासापुढे लाचार भावाने रांग लावून राहतात.
* इतके असून सुद्धा भारत स्वतंत्र आहे हि चांगली गोष्ट आहे. वेळ लागला तरी भारतीय लोक सुधारतील आणि हळू हळू प्रगत होतील असा माझा विश्वास आहे.

* ब्रिटिश किंवा कुणालाही भारतावर राज्य करणे शक्य नव्हते. इतक्या कोटी लोकांना कोण आणि कसे पोसेल ? का म्हणून ? भारत सरकारच्या सध्याच्या आकडेवारी प्रमाणे ८० टक्के जनता सरकारी खिरापतीवर जगते. म्हणजे २०% जनतेची GST वगैरे लावून पिळवणूक करून हा कारभार केला जातो. ह्या फुकट्यांची संख्या आणि त्यांची खिरापत दिवसेंदिवस वाढत आहे. ब्रिटिश काय किंवा आणखीन कुणी असल्या फुकाटयांना पोसायच्या नादाला अजिबात लागले नसते.

* ह्याच्या उलट म्हणजे भारताने अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप मधील काही मोठी बेटे अमेरिका किंवा इंग्लंड ला १०० वर्षे लीज वर द्यावीत. तो मॉडेल जास्त चांगला आहे. मुख्य जमिनीवर सुद्धा जर बॉर्डर योग्य पद्धतीने निर्माण केली तर काही भाग इतर देशांना विशेषतः युरोपियन देशांना देऊन स्पेशल झोन निर्माण केल्यास तिथे जास्त प्रगती होईल.

एकूणच गव्हर्नन्स क्षेत्रांत भारतीय लोक अत्यंत मागासलेले आणि अकार्यक्षम आहेत ह्याला पुरावा सुद्धा नको. आम्ही ४ वर्षांत चंद्रावर यान पाठवू शकतो पण एक साधी कोर्ट केस १० वर्षे झाली तरी संपत नाही. एक साधा रस्ता चांगल्या दर्जाचा बनवू शकत नाही. साध्या प्राथमिक शाळेचे रेग्युलेशन काय असावे ह्यावर सुद्धा एकमत आणि स्पष्टता नाही. जात आणि धर्म फक्त राजकीय चर्चेत नाही तर आपल्या घटनेत आणि कायद्यांत सुद्धा खोलवर घुसली आहे. अमुक जातीने तमुक जातीवर चोरीचा आरोप केल्यास वेगळी शिक्षा. तमुक धर्माला अमुक करणे गुन्हा नाही पण फलाना धार्मिक लोकांना मात्र तो गुन्हा ! स्वातंत्र्यानंतर जर भारताचे काही घोर अपयश असेल तर ते हेच. बाकी इतर सर्व समस्या ह्या ह्याच एका मूळ कारणाचे साईड इफेक्त्त आहेत.

आणि हे अपयश कुणा राजकीय पक्षाचे किंवा नेत्याचे नाही. मूळ तत्व First Principles च गंडलेले आहेत कारण समाज अत्यंत मागासलेला आहे. First Principles समजण्यासाठी बौद्धिक कुवत आवश्यक असते जी सर्वसामान्य भारतीयांकडे नाही कारण त्यांना आज रात्री खायला काही असेल कि नाही हा प्रश्न भेसडावतो आहे.

भारतीय लोक हे जन्मजात मागासलेले आहेत असे अजिबात नाही. उलट भारतीय लोक हे खूप चांगले आहेत. मॉरिशस मधील ७०% जनता भारतीय वंशाची आहे आणि त्यांचे पोर्ट लुईस शहर त्यांनीच वसवले आहे, कुठल्याही जागतिक शहराच्या दर्जाचे असावे असे शहर आहे. आता सिंगापुर चा प्रमुख सुद्धा भारतीय आहे. इंग्लंड चा पंतप्रधान भारतीय वंशाचा आहे. विविध देशांत विविध नेते भारतीय वंशाचे आहेत आणि त्यांनी त्या देशांच्या तुलनेने चांगले काम केले आहे.

इथे समस्या हि संस्कृतीची आहे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Sep 2023 - 9:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सार्वजनिक दळनांची विचारपीठं म्हटले की मत-मतांतरे चालायचीच. फक्त 'भारतीयांचे स्वातंत्र्य' हे 'लढा' वगैरे देऊन मिळाले नव्हते, या ओळी समस्त भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी लढा उभारणा-या, लढा देणा-या आणि स्वांतंत्र्यासाठी प्राण अर्पण करणा-यांच्या अपमान करणा-या आहेत, भारतीय स्वांतंत्र्य लढ्याचं आणि स्वातंत्र्याचं मोल समस्त भारतियांना माहिती आहे.

बाकी चालू द्या..!

-दिलीप बिरुटे
(भारतीय)

'भारतीयांचे स्वातंत्र्य' हे 'लढा' वगैरे देऊन मिळाले नव्हते
या विधानाशी मीही सहमत नाही अनि हे विधान बेजाबदार आणि असत्य आहे
पण प्रोफेश्वर पुढील वेळी जेवहा "स्वातांत्र्य कोणी मिळवले" यात महात्मा गांधीं बरोबर सावरकरांचे हि नाव घेतील अशी अशा करतो .. हो तेच ते सावरकर ज्यांनी त्याकाळी दलित मंदिर प्रवेशासाठी प्रयत्न केले आणि ज्यांनी हे "नृसिंह प्रभो शिवाजी राजा" हे गीत लिहिले तेच

अहिरावण's picture

6 Sep 2023 - 1:56 pm | अहिरावण

आजपर्यंतचा मिपावरील सर्वोत्कृष्ट प्रतिसाद.

हीच भुमिका साहना यांची आयुष्यभर राहो आणि ईश्वराच्या कृपेने त्यांच्यावर भारतीय भुमीवर पाय ठेवण्याचे आणि भारतीय लोकांसोबत उर्वरीत आयुष्य काढायचे दुर्देव त्यांच्यावर येऊ नये. आणि त्यांच्या आवडत्या अभारतीयांसोबत त्यांचे सुखात जीवन जाओ तसेच तिकडेच त्यांना सुखाने भारतीयांना शिव्या देत देत भरपुर आयुष्य मिळून मगच मरण येवो ही सदिच्छा !

अजुन काय ? गच्छ ... भद्रं ते !

कर्नलतपस्वी's picture

6 Sep 2023 - 5:37 pm | कर्नलतपस्वी

+१

अहिरावण's picture

6 Sep 2023 - 3:01 pm | अहिरावण

इथे म्हणतात -

१०० वर्षांनी इंग्रजांनी भारतांत बऱ्यापकी बस्तान बसवले होते आणि मराठा सैन्याने इंग्रजांविरुद्ध तथाकथित बंड पुकारले. आधुनिक भारतीय इतिहासांत ह्या युद्धाला बंड म्हणून संबोधिले जातेच पण त्याशिवाय हे युद्ध काही तरी शुल्लक कारणावरून झाले होते अशी बतावणी केली जाते. हे युद्ध प्रत्यक्षांत अत्यंत चाणाक्ष पणे प्लॅन केले गेले होते आणि नशिबाची थोडी जरी साथ असती तर ब्रिटिशाना पूर्ण पणे हाकलून लावणे शक्य होते.

आणि इथे म्हणतात -

भारतीयांचे स्वातंत्र्य हे लढा वगैरे देऊन मिळाले नव्हते तर ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने प्लॅन केले त्याच पद्धतीने झाले.

दोन वर्षांमधे इतके मत परीवर्तन ?? की थेट ब्रिटीशांची चाटु गिरी?

आकलन शक्ती कमी आहे कि आपले पूर्वग्रह इतरांवर ढकलत आहात हे समजत नाही.

दोन्ही मतांत काहीही तर्कदुष्टता नाही.

भारतीयांनी लढा पुकारला नव्हता असे मी म्हटले नाही. भारतीयांनी खूप मोठा लढा पुकारला होता आणि खूप प्रयत्न केले होते. त्यांना सुद्धा मी कमी लेखले नाही. पण १९४७ जेंव्हा ब्रिटिशांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला हा त्यांचा राजकीय निर्णय होता. आम्ही त्यांना हाकलून लावले नाही ज्या पद्धतीने पोर्तुगीज किंवा डच मंडळींना आम्ही हाकलले. १९४७ चे स्वातंत्र्य हे ब्रिटिश आणि त्यांच्या भारतीय एजेंट नि प्लॅन केले होते. देशाची फाळणी, काश्मीर प्रश्न धुमसत ठेवणे इत्यादी इत्यादी हि ब्रिटिश आणि त्यांचे भारतीय हस्तक ह्यांचे प्लॅनिंग होते.

१८५७ चे स्वातंत्र्य समर जर यशस्वी ठरले असते तर स्वातंत्र्य आणि भारतीय भविष्याची दिशा दोन्ही गोष्टी पूर्णतः वेगळ्या असत्या.

अहिरावण's picture

7 Sep 2023 - 12:59 pm | अहिरावण

>>१९४७ चे स्वातंत्र्य हे ब्रिटिश आणि त्यांच्या भारतीय एजेंट नि प्लॅन केले होते. देशाची फाळणी, काश्मीर प्रश्न धुमसत ठेवणे इत्यादी इत्यादी हि ब्रिटिश आणि त्यांचे भारतीय हस्तक ह्यांचे प्लॅनिंग होते.

बरं मग? असु दे. आपण त्यांचे घर उन्हात बांधु हं.

जा आता खेळायला खुप अभ्यास केलास हो आज.

चौकस२१२'s picture

8 Sep 2023 - 6:16 am | चौकस२१२

बरं झालं तुम्ही यांचा ऊले ख केलात
या याबाबत ऐकिवात आलेले वाक्य

भारतात ब्रिटिश होते म्हणून शेवटी का होईन एक प्रकारे शांततेने निघून गेले .. डच किंवा पोर्तुगीज असते तर ससेहोलपट केली असती
ब्रिटिश क्रूर होतेच पण , एकतर धर्मांध क्रूरता नवहती आणि अन्यायी असले तरी एक विचित्र अशी न्या भावना होती !

सद्य काळातील उदाहरण देतो म्हणजे कोणाला पटतंय का बघा ,, विषय आहे स्थलांतर
देश १) ऑस्ट्रेल्या/ नऊ झीलंड इतयादी ब्रिटिश वसाहत असलेले देश असलेले, तिथे जर तुही स्थलांतर साठी अर्ज केलात आणि असफल झालात तर का असफल झालात याचे कारण दिले जाते आणि त्याच बरोबर पुढे फेरविचार करणायचा अर्ज हि दिला जातो .

देश २) आशियाई देश आणि देश १) पेक्षा कदाचित सधन पण "परोपकारी पण एकाधिकार सरकार " असलेला, तिथे स्तलांतरासाठी अर्ज केलात आणि असफल झालात तर का असफल झालात याचे कोणतेही कारण दिले जात नाही .

या लिहिण्यामागे असा कोणताही हेतू नाही कि "ब्रिटिशांचे भारतावरील राज्य हि भारतीयांसाठी काही चांगली घटना होती "

इस्लामिक आक्रमणाला थोपवण्याचा नादांत ज्या विविध गोष्टी देशांत लोप पावल्या होत्या त्या ब्रिटिश सत्तेमुळे पुन्हा देशांत आणणे शक्य झाले.

-- त्या विविध गोष्टी नेमक्या कोणत्या? आणि त्या 'आक्रमण थोपवण्याच्या नादात देशात लोप पावल्या' होत्या की इस्लामी आक्रमण कर्त्यांनी जाणून बुजून उध्वस्त केल्या होत्या? इंग्रजांनी सुद्धा अनेक देशी उद्योग-धंदे नष्ट केले नव्हते का? उदा. ढाक्याची मलमल, विणकरांचे हात छाटणे वगैरे ?

भारतीयांचे स्वातंत्र्य हे लढा वगैरे देऊन मिळाले नव्हते तर ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने प्लॅन केले त्याच पद्धतीने झाले.

-- म्हणजे टिळक, सुभाषचंद्र बोस, गांधी, सावरकर, भगतसिंह आणि अनेक स्वातंत्र्यवीरांनी जे जे केले ते निष्फळच म्हणायचे का ? ब्रिटिशांनी नेमके काय प्लॅन केले होते ? त्या प्लॅनबद्दल भारतातले ब्रिटिश व्हॉईसरॉय, गव्हर्नल जनरल्स वगैरेंचे काही दस्तावेज, ब्रिटिश पार्लमेंट वगैरे मधील भाषणे, राणीचे फर्मान वगैरे कोणते पुरावे उपलब्ध आहेत ? ही हे सगळे प्लॅनींग वगैरे तोंडीच चालायचे ?

भारतीय सरकार हे ब्रिटिश सरकारपेक्षा जास्त जुलुमी, कामचुकार, दुष्ट आणि अत्याचारी आहे.

-- याची आठदहा नेमकी उदाहरणे कोणती ? १९४७ पासून नंतरच्या काळात आजतागायत भारत सरकारने कोणकोणते जुलूम्, अत्याचार, दुष्टपणा जनतेवर केलेला आहेत ?

स्वातंत्र्यानंतर भारतीय लोक ब्रिटिश, अमेरिकन दूतावासापुढे लाचार भावाने रांग लावून राहतात.

गेल्या पन्नास-साठ वर्षांत जे उच्चशिक्षित, हुशार भारतीय लोक (अगदी तुमच्यासकट) यूके, अमेरिका, युरोपमधे गेले सगळे "लाचार भावाने" गेलेले आहेत का ? असे असल्यास आता ते परत का येत नाहीत ? (रच्याकने आता 'लाचारीने रांगा लावाव्या' लागत नाहीत, सगळे काम ऑनलाईन आणि VFS Global मधे appointment घेऊन व्यवस्थितपणे करता येते)

८० टक्के जनता सरकारी खिरापतीवर जगते. म्हणजे २०% जनतेची GST वगैरे लावून पिळवणूक करून हा कारभार केला जातो.

कायदेशीर नोकरी करून आयकर देणारे वगळून भारतातले अन्य किती टक्के लोक प्रामाणिकपणे आयकर भरतात ? छोटे छोटे दुकानदार सगळा धंदा रोखीत करून करोडो रुपये कमावत असून टॅक्स भरत नाहीत, त्यांचा काहीच दोष नाही का?

भारताने अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप मधील काही मोठी बेटे अमेरिका किंवा इंग्लंड ला १०० वर्षे लीज वर द्यावीत.

हे कशासाठी म्हणे ? उलट भारतच आता अशी बेटे लीजवर घेऊ शकतो.

मूळ तत्व First Principles च गंडलेले आहेत कारण समाज अत्यंत मागासलेला आहे. First Principles समजण्यासाठी बौद्धिक कुवत आवश्यक असते जी सर्वसामान्य भारतीयांकडे नाही

बौद्धिक कुवतीअभावी मागासलेल्या भारतीयांना समजत नसलेली , ती First Principles नेमकी कोणकोणती, हे मिसळपाववर का होईना, व्यवस्थितपणे तुम्ही उलगडून सांगितल्यास 'बहुत लोकांसि आधारू' मिळेल.
त्याबरोबरच "इथे समस्या हि संस्कृतीची आहे !" याचाही उलगडा करावा.
अनेक आभार.

मी सविस्तर प्रतिसाद देऊ शकते पण फायदा काय ?

माझ्या टीकेला लोक चितनं करून उत्तर देण्यापेक्षा सोयीस्कर पणे भारताला दूषणे देऊन मला काही तरी सुख प्राप्त होते असा तर्क काढत आहेत. भारतीय शिक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था इत्यादींवर मी सविस्तर आणि अत्यंत खोल लेखन केले आहे इथे आणि इतर स्थळांवर सुद्धा. देशबांधवांवर आणि इतरांवर प्रेम नसते किंवा न्यायाची चाड नसती तर मी त्यांत कशाला वेळ घालविला असता ?

> -- त्या विविध गोष्टी नेमक्या कोणत्या? आणि त्या 'आक्रमण थोपवण्याच्या नादात देशात लोप पावल्या' होत्या की इस्लामी आक्रमण कर्त्यांनी जाणून बुजून उध्वस्त केल्या होत्या? इंग्रजांनी सुद्धा अनेक देशी उद्योग-धंदे नष्ट केले नव्हते का? उदा. ढाक्याची मलमल, विणकरांचे हात छाटणे वगैरे ?

अनेक गोष्टी आहेत. इस्लामिक आक्रमणकर्त्यानी अमानुष हत्या केली, राष्ट्रातील शिक्षणाच्या स्थळाचे निर्मूलन केले, महिलांवर अत्याचार केले इत्यादी इत्यादी. हे सर्वानाच ठाऊक आहे. इस्लामिक आक्रमणाच्या आधी प्रत्येक शतकांत भारतीयांनी खूप काही शोध लावले होते. स्टील काम पासून अर्थशास्त्र पर्यंत. पण १२व्या शतका नंतर तुम्हाला त्या गोष्टींचा सतत ह्रास झालेला दिसून येतो. इंग्रजांनी सुद्धा अनेक गोष्टी नष्ट केल्या पण हिंसेच्या बाबतीत ते इस्लामिक लोकांचा हात धरू शकत नाहीत. इंग्रजांनी विणकरांचे हात छाटले ह्याला काहीही आधार नाही. त्यांनी इतर अत्याचार नक्कीच केले.

इंग्रज भारतात आले आणि त्यांचे साम्राज्य वाढले तेंव्हा नष्ट करण्यासारखे भारतांत विशेष काही राहिलेच नव्हते. बहुतेक विद्यापीठे नष्ट झाली होती. भारतीय जहाज बांधणी वेगाने मागे पडत होती. कोळसा हे इंधन इतर ठिकाणी लोकप्रिय होत असले तर हवामानामुळे भारतांत ते वापरणे किंवा ते वापरून नवीन मशिन्स चा शोध लावणे कठीण होते. सुदैवाने भारतीय जमीन सुपीक असल्याने शेती चांगली होती, पण तो काळ औद्योगिक क्रांतीचा होता. त्यामुळे शेतीचे महत्व दिवसेंदिवस कामी होत जाणार होते.

> -- म्हणजे टिळक, सुभाषचंद्र बोस, गांधी, सावरकर, भगतसिंह आणि अनेक स्वातंत्र्यवीरांनी जे जे केले ते निष्फळच म्हणायचे का ?

प्रयन्त निष्फळ होते असे नाही फक्त अमेरिकन रेव्होल्यूशन प्रमाणे भारतीयांनी सशस्त्र लढा देऊन ब्रिटिश मंडळींना हाकलून लावले नाही. बहुतेक सशस्त्र लढे हे निष्फळ ठरले आणि ब्रिटिश लोकांनी आपल्या अटींवर देश शांतता पूर्वक सोडला. देश सोडताना तो आपल्याला अनुकूल लोकांच्या हाती जाईल, काश्मीर प्रमाणे विषय भारत - पाकिस्तान चघळत राहतील, इत्यादी अनेक समस्या ब्रिटिश लोकांनीच निर्माण केल्या. इतकेच नव्हे तर पोलीस व्यवस्था, कायदे, कोर्ट व्यवस्था हि सर्व व्यवस्था ब्रिटिश पद्धतीचीच राहिली. स्वातंत्र्य म्हणजे काय, नवीन देश कसा असावा ह्यावर कुठेही चारचा किंवा विचार मंथन झाले नाही आणि जिथे झाले तिथे ते ब्रिटिश लोकांनी चाणाक्ष पणे निवडलेल्या लोकांनीच केले.

> त्या प्लॅनबद्दल भारतातले ब्रिटिश व्हॉईसरॉय, गव्हर्नल जनरल्स वगैरेंचे काही दस्तावेज, ब्रिटिश पार्लमेंट वगैरे मधील भाषणे, राणीचे फर्मान वगैरे कोणते पुरावे उपलब्ध आहेत ? ही हे सगळे प्लॅनींग वगैरे तोंडीच चालायचे ?

भारत देश आपल्याला सोडावा लागणार ह्याची जाणीव ब्रिटिशाना आधीपासून होती. मेकॉले ह्यांचे सुप्रसिद्ध "मिनिट" आहे त्यांत ह्यावर भरपूर चर्चा आहे. पण त्यापेक्षा मेकॉले ह्यांच्या बहिणीचा पती जो अवघ्या २० व्य वर्षी मुंबईत आला आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शेवटी भारतचा अर्थमंत्री झाला तो चार्ल्स एडवर्ड ट्रेविलीन ह्याने सुद्धा ह्या विषयावर "भारतीय शिक्षण पद्धती आणि ब्रिटिश सरकारचे राजकीय फायदे" अश्या विषयावर पुस्तक लिहिले. त्यांत सुद्धा त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्था वापरून भारतीय जनतेला ब्रिटिश धार्जिणे केले पाहिजे म्हणजे स्वातंत्र्य मागण्याची वेळ येईल तेंव्हा जनता हिंसा करणार नाही आणि ब्रिटिश लोकांना शांतपणे देश सोडणे शक्य होईल ह्या तत्वावर भारतीय शिक्षण व्यवस्थेत बदल सुचवले. ट्रेव्हलीन हे ब्रिटिश सिविल सर्व्हिस चे जनक मानले जातात. त्याशिवाय १७००स मध्ये सुद्धा ऍडम स्मिथ, डेव्हिड ह्यूम ह्यांनी ह्याच विषयावर ब्रिटिश राणीला सल्ला दिला होता.

ब्रिटिश सरकारचे अधिकारीक "प्लॅन" हे १९३० पासून सुरु झाले होते पण १९४३ मध्ये तुम्हाला त्यांच्या पार्लमेंट मध्ये जास्त सविस्तर पणे चर्चा पाहायला मिळेल. त्याच्या आधी १९४१ मध्ये क्रिप्स कमिशन सुद्धा भारतांत येऊन गेले होते. ब्रिटिश धार्जिण्या भारतीय नेत्यांनी (गांधी नेहरू पटेल वगैरे) ब्रिटन ला द्वितीय महायुद्धांत मदत करावी आणि बदल्यांत त्यांना स्वतंत्र्या सारखे काही मिळेल अशी ऑफर होती.

निव्वल एक सॅम्पल म्हणून तुम्ही हे भाषण वाचू शकता. किंवा तुम्हाला असत पुरते हवे असतील तर तुम्ही अरुण शौरी ह्यांचे मिशनरीं इन इंडिया हे पुस्तक वाचू शकता.

https://api.parliament.uk/historic-hansard/commons/1943/jul/13/colonial-...

> -- याची आठदहा नेमकी उदाहरणे कोणती ? १९४७ पासून नंतरच्या काळात आजतागायत भारत सरकारने कोणकोणते जुलूम्, अत्याचार, दुष्टपणा जनतेवर केलेला आहेत ?

भारतीय सरकारने भोपाळ गॅस दुर्घटना अशी निर्माण केली होती ह्यावर मी इथेच लिहिले आहे. ते वाचावे. पण भारतीय दर डोई उत्पन्न हे जगांत सर्वांत कमी आहे. फक्त काही आफ्रिकन देशच भारताच्या खाली आहेत. ह्यामुळे असंख्य भारतीय भूकमरी, साधे रोग, अश्यानी मेले आहेत. त्याला भारतीय सरकार आणि त्यांचे जाचक आणि जुलुमी कायदे थेट जबाबदार आहेत. हेच भारतीय इतर ठिकाणी जातात तेंव्हा प्रामाणिक पणे काम करून पोट तरी भरतात.

> गेल्या पन्नास-साठ वर्षांत जे उच्चशिक्षित, हुशार भारतीय लोक (अगदी तुमच्यासकट) यूके, अमेरिका, युरोपमधे गेले सगळे "लाचार भावाने" गेलेले आहेत का ? असे असल्यास आता ते परत का येत नाहीत ? (रच्याकने आता 'लाचारीने रांगा लावाव्या' लागत नाहीत, सगळे काम ऑनलाईन आणि VFS Global मधे appointment घेऊन व्यवस्थितपणे करता येते)

बहुतांशी होय. नाहीतर कशाला जातात ? ज्या पद्धतीने बिहारी मजूर बिहार मध्ये अत्याचार आणि गरिबीला कंटाळून मुंबईत येतात त्याच प्रमाणे भारतीय लोक इतर देशांत जातात.

> हे कशासाठी म्हणे ? उलट भारतच आता अशी बेटे लीजवर घेऊ शकतो.

आणि घेऊन काय करेल ? कचरापेटी ? कि गांधी परिवाराच्या साठी हॉलिडे होम कि मोदी साहेबांचा लेझर शो चा पुतळा निर्माण करेल ?

> बौद्धिक कुवतीअभावी मागासलेल्या भारतीयांना समजत नसलेली , ती First Principles नेमकी कोणकोणती, हे मिसळपाववर का होईना, व्यवस्थितपणे तुम्ही उलगडून सांगितल्यास 'बहुत लोकांसि आधारू' मिळेल.

गरज नाही. तत्वे काय असावीत हे महत्वाचे नाही. "असावीत" हे महत्वाचे आहे. मूळ तत्वे असली तर मग त्यावर चारचा करता येते. नाहीतर आंधळ्याला रंग समजावून सांगण्यासारखे आहे. दुर्दैवाने भारतीय लोक त्या लेव्हल वर नाही आहेत. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे काही आठवडे मागे श्री बिबेक देबरॉय हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीवर आहेत त्यांनी आपल्या व्ययैक्तिक स्तरावर एक लेख लिहिला होता आणि जो मुद्दा मी इथे मांडला आहे तोच त्यांनी अत्यंत सौम्य भाषेंत मांडला होता :
https://presidentialsystem.org/2023/09/03/we-the-people-have-to-give-our...

ह्यावर त्यांना इतक्या शिव्या खावया लागल्या कि आपल्याच मंडळींनी त्यांना माफी मागायला भाग पाडली.

कर्नलतपस्वी's picture

8 Sep 2023 - 8:00 am | कर्नलतपस्वी

पण मत पुर्वग्रहदुषीत असल्या सारखे वाटते. भारतीय समाज, सरकार इत्यादींवर भाष्य एकांगी वाटते.

इंग्रज प्लॅन करुन चुपचाप निघुन गेले म्हणणे हा भारतीय स्वातंत्र्या साठी जो संघर्ष केला ,ज्यांनी केला त्यांचा सरासर अपमान आहे.

दुसऱ्यां महायुद्धात आझाद हिंद सेनेचा सशस्त्र संग्राम, १९४६ मधे राॅयल नौदलात भारतीय नौसैनिकांनी केलेला उठाव,काळ कोठडीत जाणूनबुजून डांबलेले राजकीय कैदी. ब्रिटिश सरकारला सतत वाढत आसलेल्या भारतीयांच्या देशभरातील विरोधाला तोंड देणे अशक्य झाले होते. जास्त काळ टिकून राहाता येणार नाही अशी खात्री झाल्याने ब्रिटिश इथून निघून गेले.

फाळणीनंतर लगेचच पाकिस्तान चा काश्मीर वर हल्ल्यात इंग्रजांची कूटनीती याबाबत काहीच म्हणायच नाही.१४ ऑगस्ट ४७ पर्यंत खांद्याला खांदा लावून लढणारे सैन्य अचानक एकमेका विरुद्ध कुणी उभे केले. त्यावेळेस कर्ताधर्ता ब्रिटिश होते ना!काय नाही त्यावेळेस झालेला नरसंहार रोखला,

आता परदेशात जाऊन नोकरी करण्याचा मुद्दा, ही लाचारी नाही तर व्यक्तिगत पातळीवर घेतलेला निर्णय आहे. काही वर्षापुर्वी इंग्रज, डच,फ्रेंच लोक भारत,चिन,बर्मा इं. देशात आले ते त्यांच्या लाचारी मुळे किवा त्यांच्या समाजाचे, सरकार चेअपयश म्हणायचे का? इथे लुटालूट करून राणीचा खजिना भरला,साम,दाम, दंड आणी भेद करून राज्ये खालसा केली ही कुठली न्याय प्रियता झाली. शिखांचे राज्य खालसा केले,बारा वर्षाच्या महाराजा दिलीप सिहांचा कोहिनूर लुटून राणीच्या मुगुटात चढवला. दत्तक पुत्र राज्याचा वारस मान्य नाही म्हणून राज्य खालसा हा कुठला न्याय.

इतिहास आपल्या जागी,जो जिता वो सिकंदर.

उत्तर देणे आणी संतुलित भाषा प्रयोग करुन तर्कशुद्ध, तर्कसंगत प्रतीसाद यात फरक आहे.

काल इंग्रज, डच फ्रेंच भारतात आले कारण इथे संधी होती.
आज भारतीय तरूण, मजुर परदेशात जातो आहे कारण आज तिकडे संधी आहे.

उद्या पुन्हा चित्र पालटू शकेल.

मी शिपाई गडी,माझा जास्त अभ्यास नाही.

> दुसऱ्यां महायुद्धात आझाद हिंद सेनेचा सशस्त्र संग्राम, १९४६ मधे राॅयल नौदलात भारतीय नौसैनिकांनी केलेला उठाव,काळ कोठडीत जाणूनबुजून डांबलेले राजकीय कैदी. ब्रिटिश सरकारला सतत वाढत आसलेल्या भारतीयांच्या देशभरातील विरोधाला तोंड देणे अशक्य झाले होते. जास्त काळ टिकून राहाता येणार नाही अशी खात्री झाल्याने ब्रिटिश इथून निघून गेले.

बरोबर आहे. मी ते नाकारत नाही. पण इंग्रंज कंटाळून , फायदा नाही, म्हणून गेले. त्यांना परास्त करून आम्ही त्यांच्या इच्छेविरुद्ध नाही हाकलले. दोन्ही गोष्टींत खूप फरक आहे आणि भारतीय भविष्यावर त्याचा फार मोठा परिणाम झाला. इंग्रज कंटाळून गेले तेंव्हा त्यांनी आपल्या चाव्या आपल्याच चट्ट्या बट्ट्यांच्या हातात दिल्या. त्यामुळे देशांतील सर्व "सिस्टम" हि आज सुद्धा इंग्रजी वसाहत वादाची आणि जुलूमाची आहे. तुम्हाला तसे वाटत नाही तर सांगा. किमान भारतातील हिंदुत्व-वादी लोकांचे तरी हेच म्हणणे आहे.

अमेरिकन क्रांती, जपानी मेजी पुनर्स्थापना, कौटिल्याचे नंद कुळाचे निर्मुलन इत्यादी गोष्टी ह्याच्या उलट होत्या त्यामुळे त्या समाजाला "पुढे काय" हा महत्वाचा प्रश्न सोडवावा लागला, त्यातून जे विचार आले त्यातून समाजाची घडी पुन्हा बसवली गेली जी त्या लोकांस पूरक होती.

> फाळणीनंतर लगेचच पाकिस्तान चा काश्मीर वर हल्ल्यात इंग्रजांची कूटनीती याबाबत काहीच म्हणायच नाही.१४ ऑगस्ट ४७ पर्यंत खांद्याला खांदा लावून लढणारे सैन्य अचानक एकमेका विरुद्ध कुणी उभे केले. त्यावेळेस कर्ताधर्ता ब्रिटिश होते ना!काय नाही त्यावेळेस झालेला नरसंहार रोखला,

दोन आठवडे आधी ३७० च्या संदर्भांत महेश जेठमलानी ह्यांनी सरकारच्या वतीने जो युक्तिवाद केला आहे त्यांत त्यांचा उहापोह आहे. त्या वेळी भारत आणि पाकिस्तान दोन्हीचे ४ जनरल्स ब्रिटिश होते.

> ही लाचारी नाही तर व्यक्तिगत पातळीवर घेतलेला निर्णय आहे.

लाचारी हि व्यक्तिगतच असते.

> काही वर्षापुर्वी इंग्रज, डच,फ्रेंच लोक भारत,चिन,बर्मा इं. देशात आले ते त्यांच्या लाचारी मुळे किवा त्यांच्या समाजाचे, सरकार चेअपयश म्हणायचे का?

होय. इंग्रजी वसाहतवादातून तुम्हाला हेच दिसून येईल. अमेरिकेत स्थायिक होणारे लोक त्या काळी युरोप मधील रांजेलेले गांजलेले आणि अत्यंत गरीब आणि हलाकीचे लोक होते. प्युरिटन मंडळी, नंतर आलेले इटालियन कॅथॉलिक, आयरिश बटाट्याच्या दुष्काळाने आलेले आयरिश. इत्यादी हे सर्व त्याकाळचे युरोप मधील लाचार लोक होते.

म्हणूनच लिबर्टीच्या पुतळ्याखालील वाक्य आहे : "Give me your tired, your poor, your huddled masses yearning to breathe free." अनेक गोरे लोक तर स्वतःहून "गुलाम" म्हणून कॉन्ट्रॅक्ट करून अमेरिकेत येत कारण युरोप मधील त्यांची अवस्था आणखीन खराब होती.

ब्रिटिश सिव्हिल सर्व्हिस चे जनक ज्यांना मानले जाते ते चार्ल्स एडवर्ड ट्रेव्हलीन हे अत्यंत गरीब टिनएजर म्हणून मुंबईत कारकून म्हणून आले, आपल्या बुद्धिमत्तेने आणि कंपनीचा भ्रष्टचार उघड पडत ते शेवटी भारताचे अर्थमंत्री झाले.

ईस्ट इंडिया कंपनीतील बहुसंख्य गोरे सैनिक हे अत्यंत गरीब म्हणजे भारतीय सैनिकांपेक्षा गरीब होते. त्याकाळी पेशवा मराठा सैन्याचा पगार हा ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांच्या पगारापेक्षा साधारण ३०% जास्त होता.

> इथे लुटालूट करून राणीचा खजिना भरला,साम,दाम, दंड आणी भेद करून राज्ये खालसा केली ही कुठली न्याय प्रियता झाली. शिखांचे राज्य खालसा केले,बारा वर्षाच्या महाराजा दिलीप सिहांचा कोहिनूर लुटून राणीच्या मुगुटात चढवला. दत्तक पुत्र राज्याचा वारस मान्य नाही म्हणून राज्य खालसा हा कुठला न्याय

इंग्रज लोक न्यायप्रिय होते असे मी म्हटले नाही, तो मुद्दा आणखीन कुणाचा होता.

--

माझा मुद्दा हा होता कि इंग्रज लोक वाईट असले तरी ज्या काळी ते आले तेंव्हा त्यांच्या आगममानाने काही फायदे झाले तो म्हणजे हिंदू समाजाला इस्लामिक आक्रमणातून खाई काळ उसंत मिळाली. ह्या वेळेचा फायदा करून ज्या गोष्टींचा ऱ्हास झाला होता त्या पुन्हा निर्माण करणे शक्य होते, स्वातंत्र्य म्हणजे काय, देश म्हणजे काय समाज निर्माणाची मूळ तत्वे काय ह्यावर उहापोह करणे आवश्यक होते. पण भारतीयांचा बौद्धिक र्हास इतका होता कि ते शक्य नाही झाले आणि अजून सुद्धा ते दृष्टिक्षेपांत नाही.
थोडक्यांत चर्चिल ह्यांनी भारताच्या बद्दल जे म्हटले होते ते भारतीयांनी सत्य करून दाखवले.

Trump's picture

8 Sep 2023 - 9:37 am | Trump

श्री साहना,
तुम्ही दिलेल्या दुव्यासाठी धन्यवाद. लिहीत रहा.

कर्नलतपस्वी's picture

6 Sep 2023 - 5:48 pm | कर्नलतपस्वी

भारतावरच गरळ ओकणाऱ्या बद्दल काय बोलायचे.

गेल्या पन्नास-साठ वर्षांत जे उच्चशिक्षित, हुशार भारतीय लोक (अगदी तुमच्यासकट) यूके, अमेरिका, युरोपमधे गेले सगळे "लाचार भावाने" गेलेले आहेत का ? असे असल्यास आता ते परत का येत नाहीत ?

भारता बाहेर गेल्यावर शिंगे फुटतात का काय.....

@संपादक महोदय आपले लक्ष या धाग्यावर देऊन उचित कारवाई करावी. गोड गोजिरवाण्या धाग्यामागे एक लबाड उद्देश साफ दिसत आहे.

* भारताच्या विरोधांत कुठे गरळ ओकली आहे हे दाखवून द्या !

> गेल्या पन्नास-साठ वर्षांत जे उच्चशिक्षित, हुशार भारतीय लोक (अगदी तुमच्यासकट) यूके, अमेरिका, युरोपमधे गेले सगळे "लाचार भावाने" गेलेले आहेत का ? असे असल्यास आता ते परत का येत नाहीत ?

बहुतांशी होय. देशांत ह्यांना संधी असत्या आणि जीवनमानाचा दर्जा चांगला असता तर इथे कोण राहणार नाही ?

भारतातील बहुसंख्य मजूर हे आखाती देशांत काम करायला जातात. हे भारतांत गरीब असतात आणि इतर काहीही संधी नसल्याने त्यांना लाचार भावाने अत्यंत धोकादायक स्थितीत इतर देशांत जावे लागते. हि नामुष्कीची गोष्ट नाही का ?

आखाती देशांत दररोज १-२ भारतीय काम करताना मरतात हि लाचारी नाही तर काय आहे ?

सुबोध खरे's picture

7 Sep 2023 - 9:55 am | सुबोध खरे

@साहना

आपले संपूर्ण प्रतिसाद भंपक एकांगी आणि विशिष्ट अजेंड्याने लिहिलेले आहेत हे स्पष्ट आहेत. तेंव्हा प्रत्येक मुद्द्याचा प्रतिवाद करण्यात काहीच हशील नाही.

भारतातील बहुसंख्य मजूर हे आखाती देशांत काम करायला जातात. हे भारतांत गरीब असतात आणि इतर काहीही संधी नसल्याने त्यांना लाचार भावाने अत्यंत धोकादायक स्थितीत इतर देशांत जावे लागते. हि नामुष्कीची गोष्ट नाही का ?

आखाती देशांत दररोज १-२ भारतीय काम करताना मरतात हि लाचारी नाही तर काय आहे ?

बाकी आखाती देशातच मजूर मरतात का? भारतात सुद्धा सफाई कर्मचारी, बांधकाम मजूर एवढेच कशाला सैनिक आणि डॉक्टर सुद्धा रोज मरतात. ते काही केवळ लाचारी म्हणून नव्हे. गरीबी, लाचारी, कामात असलेला धोका इ अनेक गोष्टी त्यात येतात.

798 doctors died during second wave of Covid-19 across country

343 workers died each day from hazardous working conditions. 5,190 workers were killed on the job in the United States. An estimated 120,000 workers died from occupational diseases.

हि आपल्याच स्वप्न देशातील २०२१ ची आकडे वारी आहे.

डोळे उघडा आणि पायाखाली काय जळतंय ते पहा

साहना's picture

8 Sep 2023 - 2:23 am | साहना

सुबोधजी,

आपण सुज्ञ आहात त्या मुळे आपल्या तर्कांत आणि माझ्या मुद्द्यात काहीही फरक नाही असे तुम्हाला जाणवून येईल त्याशिवाय माझा मुद्दा काय आहे ह्यावर चिंतन केल्यास त्यातील सत्यता सुद्धा समजण्याची क्षमता आपल्या कडे आहे !

भारतीय मजूर आणि आखाती देशांत त्यांची स्थिती हा सध्या एक आंतरराष्ट्रीय विषय आहे आणि त्यावर भरपूर सार्वजनिक डेटा उपलब्ध आहे. भारतीय (पाकिस्तानी, केनिया, नेपाळी सुद्धा) मजुरांना तिथे फक्त धोकादायक स्थिती विना सुरक्षा काम करावे तर लागतेच पण अनेक वेळा त्यांची मृत शरीरे गायब सुद्धा केली जातात. आता भारत देशांत सुद्धा असेच होते असे तुम्हाला म्हणायचे असेल तर माझा आक्षेप नाही.

पण अश्या कामासाठी हे मजूर जातातच का ? तर देशांत त्यांच्या पुढील पर्याय आणखीन खराब आहेत. संपूर्ण परिवाराचा जीव धोक्यांत घालण्यापेक्षा फक एकाच जीव धोक्यांतघालून परिवाराला वाचविणे हि त्यांची लाचारीची भूमिका असते. ह्या लोकांची तुलना कोविड मधील डॉक्टर्स किंवा सीमेवरील सैनिकांशी करणे चुकीचे आहे.

काही लोकांनी कदाचित मला ह्या देशबांधवांचा अपमान करण्याचा उद्द्येश आहे असा तर्क काढला असेल पण प्रत्यक्षांत उलटे आहे, अश्या मेहनती आणि कठोर परिश्रम करण्याची क्षमता असलेल्या आमच्या देशबांधवांना आम्ही देशांत काहीही संधी उपलब्ध करून देऊ शकत नाही हे भारतीय समाजाचे अपयश आहे. त्यावर चिंतन व्हावे.

चौकस२१२'s picture

8 Sep 2023 - 6:04 am | चौकस२१२

मी साहना यांच्या प्रत्येक मताशी सहमत नाही परंतु त्यांच्या वर सतत जो "तुम्ही बाहेर राहता म्हणून तुम्ही देशविरोधी बोलता" हा आरोप हि योग्य नाही
काही कठोर सत्य त्यांचं लेखनात आहे हे many करावे लागेल
" दुरून डोंगर साजरे" हि जशी म्हण आहे तसेच "दूर गेल्यावर दिसत असलेला घरचा डोंगर हा हिमालय आहे कि टेकडी हे हि दिसते "

काही बाबतीत तो डोंगर हिमालय असतो पण काही बाबतीत टेकडी ,, पण तसे दाखवले आणि तो दाखवणारा घरचाच असला कि लगेच त्यावर असा ह्ल्ला हि करणे योग्य नाही

नाण्याची दुसरी बाजू : मी हे हि म्हणू इच्छितो कि साहना जी आपण खूप अभ्यास पूर्वक लिहीत असलात तरी एक प्रकारचा भांडकुदळ पण का जाणवतो?

कठोर परिश्रम करण्याची क्षमता असलेल्या आमच्या देशबांधवांना आम्ही देशांत काहीही संधी उपलब्ध करून देऊ शकत नाही हे भारतीय समाजाचे अपयश आहे. त्यावर चिंतन व्हावे.
यात एक कडू पणा ( बिटर्नेस ) जाणवतो
अर्थात संधी आहे की नाही हे काळाप्रमाणे आणि वयवसाया प्रमाणे बदलत गेलाय .. त्यामुळे प्रत्येक स्थांतराची कारणे वेगवेगळी होती
सरसकटपण करणे योग्य नाही
प्रत्येक जण काही फक्त पैशाचे साठी जात नाही आणि प्प्रदेशात गुलामच असतो हि भारतात राहणाऱ्यांची भाबडी समजूत आहे ( हय्ला स्वतःचं देशात धर्म आणि जातीवरून जीवावर उठेल जाते तर "लाथाच खायच्या तर जरा चांगल्या वातवरणात बसून खाऊ असे कोणी म्हणले तर! भारत निवासीयांनी वाईट वाटून घेऊ नये
(अर्थात तुम्हाला फट्य्वर मारतो/ तिकडे बसून ढुगन कागदाने पुसा वैगरे प्रतिक्रिया अपेक्षित आहेतच म्हणा )

> यात एक कडू पणा ( बिटर्नेस ) जाणवतो

का नसावा ? कारण असंख्य लोकांना विनाकारण दारिद्र्यात खापर ठेवण्यात भारत सरकार आणि त्यांचे धोरणे ह्यांचा खूप मोठा वाटा आहे. आमचे आई वडील किंवा आजोबा ह्यांचे जीवन विनाकारण कष्टप्रद करण्यात भारत सरकारची स्वातंत्र्यानंतरची धोरणे कारणीभूत आहेत.

ज्यांना समाजाबद्दल प्रेम असेल त्यांच्यात हा कडवट पणा असेलच. पण आम्हीच विश्वगुरू, आमचाच भारत श्रेष्ठ, कधी तरी भविष्यांत आम्ही "सुपर पावर" बनू असल्या "दिल को बेहलाने के लिये" वाल्या गोष्टींनी छाती भरून घेणे सोपे आहे पण तो पलायनवाद किंवा मूर्खपणा आहे.

आजानुकर्ण's picture

9 Sep 2023 - 10:11 am | आजानुकर्ण

इंगजांनी भारताला किती नागवले आहे याची माहिती दादाभाई नौरोजी, भीमराव आंबेडकरांपासून ते शशी थरुरांपर्यंत अनेकांनी सविस्तर दिली आहे. अगदी साधं गूगल केलं तर हा लेख मिळाला. https://www.aljazeera.com/opinions/2018/12/19/how-britain-stole-45-trill... त्या इंग्रजांचा पुळका येऊन गेल्या ७० वर्षात असंख्य भारतीयांना दारिद्र्यातून वर आणून आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न केलेल्या काँग्रेस, जनता पक्ष आणि भाजपाच्या सरकारांच्या धोरणावर काहीही आकडेवारी न देता शेरेबाजी करणारे तुमचे प्रतिसाद अत्यंत हास्यास्पद आहेत.

सॉरी ! काँग्रेस पक्षाबद्दल आणि त्यांच्या नेत्याबद्दल मला काडीमात्र सहानुभूती किंवा आदर नाही. त्यामुळे अश्या लोकांवर मी माझे ५ सेकंड्स सुद्धा दवडणार नाही.

चौकस२१२'s picture

11 Sep 2023 - 6:00 am | चौकस२१२

समजतंय हो पण कडु पणा मुळे तुम्ही अभ्यासून लिहिलेल्या चांगलया मुद्यांचा सुद्धा काही परिणाम होत नाही.. असो तो तुमचा प्रश्न ... अभ्यासून लिहिता म्हणून आदर आहे म्हणून सांगण्याचा प्रयतन केला

चौकस२१२'s picture

11 Sep 2023 - 6:02 am | चौकस२१२

"असंख्य लोकांना विनाकारण दारिद्र्यात खापर ठेवण्यात भारत सरकार"
"सुपर पावर" बनू असल्या "दिल को बेहलाने के लिये" वाल्या गोष्टींनी छाती भरून घेणे सोपे आहे पण तो पलायनवाद किंवा मूर्खपणा आहे.

चला हे वाचून हे कळले कि तुमचा राग नेहरू आणि मोदी या दोघांवर आहे तर,, बर, जबाबदारी ना घेणाऱ्या जनतेचे काय ?

साहना's picture

11 Sep 2023 - 1:30 pm | साहना

नेहरू, काँग्रेस पार्टी इत्यादींचा हात ह्यांत आहेच पण शेवटी मूळ कारण हे नेहरू, मोदी, काँग्रेस नाहीत. हे फक्त सिम्प्टोम आहेत. मूळ रोग आहे तो बहुसंख्य जनता हि अत्यंत मागासलेली आहे, संस्कृतिक तसेच बौद्धिक दृष्टया त्यामुळे नापीक जमिनीतून ह्या प्रमाणे जास्त पीक येत नाही त्याच प्रमाणे ह्या समाजातून येणारे नेते मंडळी सुद्धा नेहरू आणि मोदी छापच असेल. खापर त्यांच्यावर फोडणे सोपे आहे पण मूळ कारण समाजच आहे.

A nation of sheep will beget a government of wolves

कर्नलतपस्वी's picture

11 Sep 2023 - 3:13 pm | कर्नलतपस्वी

बहुसंख्य जनता हि अत्यंत मागासलेली आहे, संस्कृतिक तसेच बौद्धिक दृष्टया त्यामुळे नापीक जमिनीतून ह्या प्रमाणे जास्त पीक येत नाही त्याच प्रमाणे ह्या समाजातून येणारे नेते मंडळी सुद्धा नेहरू आणि मोदी छापच

आपली अभ्यासू वृत्ती चुकतीयं असे वाटते.

सर्व प्रथम ही भूमी नापीक वगैरे काही नाही. आपल्या सारखे प्रज्ञावंत याच भूमीतून उगवले नाहीत का?

स्वातंत्र्य पुर्व काळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेस ही पार्टी अग्रणी होती व बहुसंख्य जनता त्या विचारधारे बरोबर जोडली होती. गांधी नेहरू यांना मानणारे लोक पुष्कळ होते.तुलनात्मक जहाल विचारांचे पक्षधर कमी होते.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस च्या पक्षधरांनी भरभरून मते दिली.

काळ पुढे जात असताना शिक्षणाचा टक्का वाढला. स्वातंत्र्य पुर्व पिढी हळुहळू काळाच्या पडद्याआड गेली. नव्य दमाची नवी पिढी पुढे आली व काँग्रेस ला पहीला झटका आणीबाणी नंतर मिळाला व सांझा सरकार आले. ते अपयशी झाले वगैरे वेगळा विषय आहे पण एक गोष्ट मानावी लागेल की बदलाचा बिगुल वाजला. पुढे अनेक बदल झाले. आजचे सरकार याच बदला मुळे आहे.

नेहरू,प्रातिनिधिक स्वरूपात, यांनी चुका केल्या तशाच काही चांगल्या गोष्टीही केल्या. कोणत्या ?तो इथला विषय नाही. बासष्ट मधे झालेली चुक पासष्ट ,एक्काहत्तर मधे सुधारली.

पारतंत्र्यातून स्वातंत्र्य आणी स्वातंत्र्यानंतर ची वाटचाल कुठल्याही देशाची अशीच आसते.

एका रात्रीत रोम बांधता येत नाही. अमेरिके सारखे देश सुद्धा बराच काळ गेल्यावर सद्यस्थितीत पोहोचले आहेत.

सर्वगुणसंपन्न कोणी नसते. चुका होतात सुधारणा होते.विकासाकडे निरंतर वाटचाल सुरू असते.

नेहरू,इंदिराजी,राजीव यांनी काही चांगल्या गोष्टी केल्या तशाच अटलजी आणी मोदींनी ही केल्यात. तेव्हां वाईट म्हणणे बरोबर नाही. टक्के कमी जास्त एवढेच.

एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे झालं राजकारण पण सामान्य जनता काय चांगले काय वाईट याचा आढावा घेते व मतदान करते.असे नसते तर सत्तापालट कधीच झाला नसता. शिक्षण वाढले की बदलाव नक्कीच.

शेवटचे,आय आय टी वाले आमेरिकेला गेले व सी ई टी वाले चंद्रावर.

लोकशाही परिपक्व होत आहे.

अमरेंद्र बाहुबली यांना जसे प्रश्न पडलेले आहेत, तसे आजच्या तरूण पिढीलाच काय, पण स्वातंत्र्यापूर्वीचा काळ प्रत्यक्ष न बघितलेल्या आम्हा सर्वांपैकी अनेकांना वाटत असण्याची शक्यता आहे. हल्लीच्या समाजमाध्यमांच्या गदारोळात आणि व्यग्र जीवनात कुणी मुद्दाम बसून एकाद्या विषयावरील साहित्याचा धांडोळा स्वतः घेऊन सगळे नीट समजून घेईल, ही शक्यता मुळातच कमी. त्यातून आता तो काळ आता इतिहासजमा झालेल्या असल्याने त्याविषयी फारशी चर्चाही घडून येताना दिसत नाही.
तात्पर्य, मिपाकरांसठी उपयुक्त अशी एकाद-दोन मराठी पुस्तके इथे कुणी सुचवल्यास या विषयीची व्यवस्थित माहिती होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होईल. 'लोकहितवादी' हे स्वतः ब्रिटिश सरकारचे सनदी अधिकारी (चू.भू. द्या.घ्या.) असल्याने त्यांनी त्यांची महती गाणे, यात आश्चर्य नाही.

कंजूस's picture

10 Sep 2023 - 8:43 am | कंजूस

पुस्तके
मराठी
मिपाकरांसठी उपयुक्त अशी एकाद-दोन मराठी पुस्तके इथे कुणी सुचवल्यास

मिपाकरांसठी म्हणण्यापेक्षा मराठी वाचकांना उपयुक्त अशी .... १९४७ नंतर लगेचच अशी पुस्तके प्रकाशित होण्यास अडचण नसावी. परंतू मराठी पुस्तके वाचकांची आवड लक्षात घेता प्रकाशकांनी पुढाकार घेतला नसावा. अगदी थेट ब्रिटिशांमुळे झालेले फायदे तोटे असा विषय नाही परंतू एकूण लोकांच्या जीवनात काय उजेड/अंधार पडत होता हे काही चरित्रे कादंबरीत दिसून येईल. गो.ना.माडगावकरांचे मुंबईचे वर्णन.

दोन गोष्टी आपल्या पराभवाला,मागासलेपणाला कारण पूर्ण भारतात होत्या त्या -(१) बेशिस्तपणा,मन मानेल तसा व्यवहार, करार पाळण्याची बांधिलकी न ठेवणे.
(२) जाती व्यवस्थेवर आधारित शिक्षण आणि व्यवसाय.

Bhakti's picture

11 Sep 2023 - 2:34 pm | Bhakti

डी डी कोसंबी यांचे
प्राचीन भारतीय समाज-संस्कृति संवर्धन : एतिहासिक रूपरेखा यातील पहिलेच प्रकरण ऐतिहासिक भारत वाचतेय चांगलाच प्रकाश पडतोय.ब्रिटीशांची काळी कुटनिती, भारतीयांना गुलाम बनविण्याची रणनिती.
टीप-हे पुस्तक ओनलाईन मोफत आहे,सहज डाऊनलोड करू शकता.

साहना's picture

14 Sep 2023 - 3:41 am | साहना

कदाचित मीच ह्या विषयावर पुस्तक लिहिले पाहिजे असे वाटते.

लक्ष्मी अय्यर ह्या अर्थतज्ञ महिलेने ह्या विषयावर इंग्रजी भाषेतून एक शोध प्रबंध लिहिला होता आणि त्यावरून इतर अनेक लोकांनी त्याच प्रकारचा आभास मांडला. त्याचे काही ठळक मुद्दे खालील प्रमाणे. ज्यांना आवड आहे त्यांनी मूळ शोध प्रबंध वाचावा.

* ब्रिटिश कालीन भारत दोन भागांत विभागाला जाऊ शकतो. थेट ब्रिटिश अंमल असलेला भाग आणि संस्थानिकांचा भाग. संस्थानिक लोकांचे जिथे राज्य होते तिथे विदेश नीती सोडल्यास इतर सर्व गोष्टींसाठी संस्थानिकांना मुभा होती.
* ह्या दोन्ही विभागांचा अभ्यास केल्यास त्या काली ब्रिटिश आणि संस्थानिक ह्यांच्यांत कोण जास्त प्रभावी राज्यकर्ते होते ते समजून येऊ शकते.
* ब्रिटिश लोकांनी सुपीक प्रदेश आपल्या ताब्यांत घेतला असल्याने तो भाग संस्थानिकांच्या परंपरागत मिळालेल्या भागापेक्षा अर्थी दृष्टीकोनातून जास्त चांगला होता असे आम्ही समजू शकतो त्यामुळे हे आकडे त्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे.
* ब्रिटिश लोकांनी चालवलेले प्रदेश त्या काली भारतीय संस्थानिकांच्या प्रदेशापेक्षा जास्त प्रगत होते. बाळ मृत्यू दर, शिक्षण, रस्ते, कायदा इत्यादी सर्व क्षेत्रांत ब्रिटिश प्रदेश जास्त पुढे होतेच. पण स्वातंत्र्यानंतर सुद्धा ब्रिटिश लोकांनी जिथे जिथे इन्स्टिट्यूशन्स निर्माण केली होती ते प्रदेश सतत आणि वेगाने जास्त प्रगत होत गेले.
* म्हैसूर, बडोदा आणि केरळ मधील एक राज्य ह्यांना अपवाद होते, ह्या राज्यांतील व्यवस्था आणि रहाणीमान ब्रिटिश नियंत्रित भागांपेक्षा जास्त चांगले होते.
* जास्त खोल अभ्यास केला असता असे दिसून येते कि "संस्था" निर्माणात ब्रिटिश खरोखर चांगले होते आणि त्यांनी घालून दिलेल्या संस्थांमुळे त्या भागांचा विकास स्वातंत्र्यानंतर सुद्धा जास्त वेगाने झाला.
* जिथे जिथे भारतीय संस्थानिक थेट कर वसुली करत होते तिथे तिथे भारतीय संस्थानिकांनी अत्यंत उत्कृष्ट सेवा दिली. पण जिथे जिथे ब्रिटिश किंवा संस्थानिक स्थानिक जमीनदारांवर अवलंबून राहून कर वसुली करत होते तिथे तिथे भारतीय प्रदेश जास्त मागासलेले राहिले.
* त्रावणकोर, मैसूर आणि बरोडा सर्वच बाबतीत ब्रिटिशाना मागे टाकत होती. लसीकरण, सार्वजनिक शिक्षण, रस्ते, आरोग्य ह्या बाबतीत हि संस्थाने ब्रिटिशा पेक्षा साधारण ३० वर्षे आघाडीवर होती.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Sep 2023 - 11:40 pm | अमरेंद्र बाहुबली

तुमचा अभ्यास खरच दांडगाय.

अहिरावण's picture

15 Sep 2023 - 10:41 am | अहिरावण

उत्तर आधी तयार करुन तसा प्रश्न करायचा आणि उत्तर लिहायचे याला अभ्यास म्हणत नाहीत.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Sep 2023 - 1:39 pm | अमरेंद्र बाहुबली

साहेब प्रतिसाद खोडायला तसाच अभ्यासपुर्ण प्रतिसाद देत चला.

खोडण्यासाठी तो अभ्यासपूर्ण प्रतिसाद असावा लागतो

साहना यांच्या वरील प्रतिसादांतील मुद्दे खालील नकाशांवरून समजण्यास मदत होईल असे वाटते.

.

.

.

मूळ पेपर ची ओपन आवृत्ती इथे मिळाली, जो नकाशा तुम्ही दिलाय तोच इथे देण्यात आला आहे. ज्यांना आवड आहे ते इथे वाचू शकतात.

https://dash.harvard.edu/bitstream/handle/1/33785664/rest_a_00023.pdf?se...

हा सुद्धा अतिशय छान पेपर आहे. उपग्रह रात्रीच्या छायाचित्रावरून देशांतील भागांत किती प्रगती काळाच्या ओघांत झाली आहे आणि त्याचा संबंध ब्रिटिश सत्ता आणि संस्थानिक ह्यांचा प्रभावाशी आहे कि नाही हि माहिती इथे आहे.

टीप: भारतीय समाज मागासलेला आहे अशी कडू टिप्पणी मी केली असली त्याचे मूळ कारण इथे आहे. हा अभ्यास भारतीयांनी केला आहे. पण अमेरिकन विद्यापीठांत. कुठल्याही भारतीय विद्यापीठांत ह्या दर्जाचा अभ्यास होत नाही. हेच भारतीय लोक देशांत असते तर कुठे तरी आधार कार्ड चष्म्याच्या नंबर ला लिंक करण्याच्या लायिनीत ह्यांचे आयुष्य गेले असते. खरे तर ब्रिटिश सरकारच्या गुन्ह्याचा पाढा अभ्यासपूर्ण पद्धतीने वाचण्यात भारतीय विद्यापीठे आघाडीवर असली पाहिजे होती.

https://www.cato.org/research-briefs-economic-policy/impact-colonial-ins...

>>>हेच भारतीय लोक देशांत असते तर कुठे तरी आधार कार्ड चष्म्याच्या नंबर ला लिंक करण्याच्या लायिनीत ह्यांचे आयुष्य गेले असते.

१) चष्म्याचा नंबर आधारला लिंक करावा अशा पद्धतीची योजना अजुन आणलेली नाही. अशी योजना आणण्यात काही फायदा नाही हे कळणारी मंड्ळी शासनात आहेत.
२) आधार अपडेट ऑनलाईन सुद्धा करता येते. ज्या गोष्टी प्रत्येक्ष जाऊन करावे लागते अशा कामाला फार वेळ लागत नाही. आणि हे काही रोजचे काम नसते. एखाद वेळेस वेळ लागला तर त्याने आभाळ कोसळत नसते.

>>>खरे तर ब्रिटिश सरकारच्या गुन्ह्याचा पाढा अभ्यासपूर्ण पद्धतीने वाचण्यात भारतीय विद्यापीठे आघाडीवर असली पाहिजे होती.
भारतीय समाज जुने जाऊ द्या मरणालागुनी म्हणून पुढे जातो... ब्रिटीश, तुर्क, मुघल नालायक होते एवढी माहीती त्यांना पुरेसी असते. आयुष्यात ते त्यांच्यपासुन दुर रहातात. त्यांच्याशी व्यवहार करतांना काळजीपूर्वक करतात. त्यांचा उगा उदो उदो करत बसत नाहीत. भविष्याकडे नजर लाऊन स्वतःची, समाजाची, देशाची त्यांच्या परीने उन्नती करण्याचा प्रयत्न करतात. हे ज्यांना समजत नाही... त्यांचे देव भले करो !

सामान्य नागरिकांच्या आयुष्यात काय ठळक बदल झाला आहे.
एकाच वाक्यात सांगता येईल
" आज भारतात भिकारी सुद्धा क्यू आर कोड कि काय ते वापरून भीक मागतो "
यात
प्रगती कि
जैसे थे कि
अधोगती
हे ज्याचे त्याने ठरवावे

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Sep 2023 - 11:40 pm | अमरेंद्र बाहुबली

क्यू आर कोड ने पैसे दिले घेतले तर पैसे वाढतात काय? काय कौतूक त्याचं? रोख दिले काय नी क्यू आर ने दिले काय काहीही फरक पडत नाही सरकारला ट्रॅक ठेवता येत असला तरी काळा पैसा करनारे करतातच.

चौकस२१२'s picture

11 Sep 2023 - 5:41 am | चौकस२१२

माझ्य म्हण्यातील गोम कळली नाही बहुतेक
इस्कटून सांगतो
- एकीकडे क्यू र कोड साठी लागणारे मोबाईल फोन भिकाऱ्या कडे आले आणि दुसरीकडे आज हि भिकारी आहेत हा या देशातील केवढा मोठा विरोधाभास
यात कौतुक पण आहे आणि वैषमय पण आहे असे मला म्हनयायचे होते
जसे चांद्रयान पण आहे आणि प्रचंड गरिबी पण आहे हाच तो विरोधाभास हेच ७६ वर्षाचे फलित १ वाक्यात
अजून "सुन्यास जास्त सांगणे ना लागे "

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Sep 2023 - 11:51 pm | अमरेंद्र बाहुबली

मी साहना ह्यांच्या प्रत्येक प्रतिसादाशी सहमत आहे. साहना ह्यांचे प्रतिसाद आरसा दाखवनारे असतात. आपण देशाबद्दल दवनिय लिहीले म्हणजे देश चांगला होत/ठरत नाही. देशाबद्दल गोड गोडच बोलावे तरच देशप्रेमी असेही काही नाही, सुधारणे साठी कटू सत्य ऐकावेच. साहनांनी जे काही मूद्दे मांडलेत ते बिनतोड आहेत. भलेही इंग्रज गेले पण ते त्यांच्या “मर्जीने” गेले. हे काही खोटे नाही ह्यात स्वातंत्र्य सैनिंकांचा अपमान येतो कूठे? इंग्रजांनी ठरवले असते तर अजून लाखो मूडदे पाडून काही वर्षे भारतात राहू शकले असते ते त्यांना कठीण नव्हते. आणी खरंच जर त्यांना शक्य नव्हते तर त्यांचे खरे कंबरडे हिटलर ने मोडले असे म्हणावे लागेल.
बाकी खराब रस्ते, निकृष्ठ ऊपचार सेवा, भरमसाठ लाच खानारी बाबूशाही, घाणेरडी शहरे, बकाल वस्त्या, तुंबलेल्या गटारी, लोकसंख्येवर नियंत्रण नसणे, गरीबी, भूकबळी, काहीही विचार न करता घेतलेली आर्थीक धोरणे, छोटे रस्ते, ट्राफीक हे सगळं खोटं आहे का? इंग्लंड, युरोपच्या तूलनेत आपण कितीतरी मागे आहोत नी हेच साहना सांगताहेत तर मान्य करायला जड का जातंय? बरं आता पर्यंत कोंग्रेसच्या नावाने बोंबलता येत होते पण भाजप सरकार येऊन ९ वर्षे झाली तरी परिस्थीती सारखीच आहे. आता कुणाच्या नावाने बोंबलायचं? लोक देशाबाहेर पळताहेत कारण इथे परिस्थीती चांगली नाही हे खोटंय का? स्वतः मी सुध्दा बाहेर पळून जायचा विचार दुसर्या धाग्यात बोलून दाखवलाय.

इंग्रजांनी ठरवले असते तर अजून लाखो मूडदे पाडून काही वर्षे भारतात राहू शकले असते ते त्यांना कठीण नव्हते. आणी खरंच जर त्यांना शक्य नव्हते तर त्यांचे खरे कंबरडे हिटलर ने मोडले असे म्हणावे लागेल.

श्री हिटलर यांनी अगोर्‍यांच्या स्वातंत्र्यलढ्याला केलेल्या प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष मदतीला मान्यता दिल्याबद्दल धन्यवाद.

सहमती दर्शवायला कुणाची हरकत असण्याचे कारण नाही. या सर्व परीस्थितीला कुठे तरी आपणच जबाबदार आहोत आणि जबाबदारी केवळ दिखावू देशप्रेमापोटी आपण नाकारत असू तर आपल्या करंटेपणाला काही सीमाच राहणार नाही. फक्त असं करतांना काँग्रेसला अतिशय अश्लाघ्य भाषेत दूषणं देणं आणि त्यापेक्षा कठोर टीका ज्यांच्यावर करावी अशा मोदी आणि भाजपवर किरकोळ टीका करावी असा दुजाभाव चांगला नाही. त्यावर कडी म्हणजे मी खूप काही लिहू शकते परंतू माझे विचार समजण्याची तुमचीच कुवत नाही असा आव आणायचा. हे कुणाला आवडेल?

चौकस२१२'s picture

11 Sep 2023 - 6:15 pm | चौकस२१२

काँग्रेसला अतिशय अश्लाघ्य भाषेत दूषणं देणं आणि त्यापेक्षा कठोर टीका ज्यांच्यावर करावी अशा मोदी आणि भाजपवर किरकोळ टीका करावी
. का? काँन्ग्रेस पेक्षा जास्त शिव्या खाण्याच्या लायकीचा भाजप आहे हा तुमचा पण एकांगी पणा

सर टोबी's picture

11 Sep 2023 - 7:57 pm | सर टोबी

माझ्या एकांगीपणाचं सोडा. भक्तांची ज्या कडक शब्दात मी निर्भत्सना करतो तशी तुमची करू नये यासाठी तुमची काय पुर्वपिठीका आहे ते सांगा.

चौकस२१२'s picture

11 Sep 2023 - 5:50 am | चौकस२१२

हो आम्ही हि "पळून" गेलोय पण ते
- भारताचा दुस्वास म्हणून नाही
- तर फक्त स्वतःचं स्वार्थसाठी ,,,

पण पळून गेल्यार जी काही वर्षे झाली त्यात भारतात राहून जे काय अर्थवयवहाराला हात भार लावला असता तेवढा तरी एकूण सर्व भेटीतून लावला आहे
बाकी राहिले ब्रेन ड्रेन वैगरे आपण काही हुशार कॅटॅगिरीतील नाही त्यामुळे तो आरोप आपल्यावर तरी होऊ शकत नाही
आणो तसेच भारतात राहिलेले कितीतरी आय आय टी चे विंजिनियर शेवटी बँकेतून काम करताना दिसतात ..

बरं आता पर्यंत कोंग्रेसच्या नावाने बोंबलता येत होते पण भाजप सरकार येऊन ९ वर्षे झाली तरी परिस्थीती सारखीच आहे.
निदान काँग्रेस येवधी वर्षे तरी द्या मग बोला?
काय जादूची कांडी आहे का कोणाकडे
आणि भाजप काय काँग्रेस चा बाप आला तरी लोकांनी आधी मनावर घेतले पाहिजे ना ?
अनेक प्रश्न शेकडो वर्षाचे आहेत .. उदय राहुलजींचा नातू गादीवर आला तरी त्यातील किती सुटतील?
मर्सिडीज घ्य्याची ऐपत असते / शिक्षण असत पण रस्त्याचे नियम पाळत नाहीत हि आहे परिस्थितीती.. काँग्रेस काय किंवा भाजा काय करणार डोंबल

स्वतः मी सुध्दा बाहेर पळून जायचा विचार दुसर्या धाग्यात बोलून दाखवलाय.

कधी जातायं त्या वंडरलॅण्ड मधे?लवकर निघा नाहीतर तिथेही गर्दी होईल.

सहाना यांच्यी मते पुर्वग्रहदुषीत आहेत असा निष्कर्ष त्यांच्याच एका प्रतिसादांतून निघू शकतो.पण तुमचे काय?

अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली,तेथील लोकसंख्या किती,नैसर्गिक संसाधने किती व तुलनात्मक दृष्टीकोनातून भारताची काय परिस्थिती?
याचा विचार कधी केलात का?

युरोपियन औद्योगिक क्रांतीचे पडसाद जसे इतर देशावर पडले तसे भारतावरही पडले.फायदा मात्र सायबाला झाला.

सुधारणा फक्त जिथे सायेब रहात होते तिथेच झाल्या. १८९० किंवा त्याच्या आसपास पुण्यात विज,आगगाडी,पोस्ट ऑफिस होते पण थोड्याच अंतरावर आमचे गाव तीथे मात्र १९६० उजाडले का बुवा....

दीडशेहून अधिक काळ या देशावर राज्य करून येथील अर्थ व्यवस्था खिळखिळी केली,जाती,धर्म यांची भुतावळ व दोन फाळण्या करून या देशाला पंच्याहत्तर वर्षात चार युद्ध करावी लागली.

तुम्हांला काय सांगायच तुम्ही ज्या आरशात बघतायं त्याचा दोष नाही म्हणता येणार कारण शेवटी डोळे तुमचे आहेत.

जयचंद होता म्हणून घोरी आला,नजीब खान होता म्हणून अब्दाली आला. असेच काही लोक होते म्हणून साहेब रुजला, फोफावला. दुसर्‍या महायुद्धात सायबाला मदत करा म्हणजे स्वातंत्र्य मिळेल म्हणण्या पेक्षा सुभाषचंद्र बोस यांना साथ द्या म्हणले असते तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते.

जाऊ द्यात, तुम्ही काय ते काय आपलेच दात आणी आपलेच ओठ.

रात्रीचे चांदणे's picture

10 Sep 2023 - 8:28 am | रात्रीचे चांदणे

खर तर आपल्यात आणि युरोप - अमेरिकेत राहणीमानाचा दृष्टीने भरपूर दरी आहे हे कोणीही मान्य करेल. पण कदाचित २०-३० वर्षांपुर्वी ही दरी मोठी असेल. मला आजही आठवतंय माझ्या गावाहून पुण्याला यायला अख्खा एक दिवस जायचा, अत्ता एका दिवसात जाऊन येऊन होतय. गावाहून तालुक्याला जायला तासन् तास एसटी ची वाट बघायला लागायची आज कोणीही एसटी साठी थांबत नाही. माझ्या लहानपणी परीक्षा असली की पोरांच्या नाकात काजळी जमा होत असे कारण लाईट ही नसायचीच. आज गावात २४ तास लाईट असती. सणाच्या दुसऱ्या दिवशी गावातील काही आया बाया भिक मागायला नक्कीच येत असत आज तसा विचारही कोणी करत नाही कारण गावातच रोजगाराच्या संधी तयार झाल्यात. उन्हाळा आला किंवा घरी कोणी पाहूणा आला की आमच्या अंगावर काटे येत असत कारण पाण्याची सोय नव्हती आज घरा घरात पाणी आलय.
सगळेच प्रश्न संपलेत असं नाही आजही आपण बऱ्याच गोष्टीत मागे आहोत पण हळू हळू आपलीही प्रगती चालू आहे. त्यामुळे आजचा भारत आणि प्रगत देशामधील की दरी आहे कदाचित काही दशकात नक्कीच कमी झालेली असेल.

कर्नलतपस्वी's picture

10 Sep 2023 - 10:40 am | कर्नलतपस्वी

खर तर आपल्यात आणि युरोप - अमेरिकेत राहणीमानाचा दृष्टीने भरपूर दरी आहे हे कोणीही मान्य करेल. पण कदाचित २०-३० वर्षांपुर्वी ही दरी मोठी असेल.

अतिशय कठीण परिस्थितीत संघर्ष करुन आयुष्य या टप्प्यावर पोहचले. कधी वाटले नव्हते अम्रीका,फ्रान्स बघायला मिळेल. प्रथमदर्शनीच काय कळाले...

आई बाप मुला नातवंडांना भेटायला आली की यांना भिती वाटते. बेबी सिटींग करता आलात का म्हणून चौकशी करायला घरी येतात. यांना यांच्या डे केअर व्यवसायाचे नुकसान दिसते.

कधी कधी तुम्ही खरचं नोकरी करता का म्हणून घर तपासायला येतात.

कोण कधी कुठे बंदूक काढेल सांगता येत नाही. शेव रेवड्या घ्याल तसे तिथे बंदूक मिळतात.

मांजर हरवली तर सगळ्या पंचक्रोशीत हॅण्ड बिल्स लावतात. आईबाप मात्र मुलांना भेटायला आल्यावर हॉटेलात रुम घेऊन राहातात.

१०४ ताप आल्याशिवाय दवाखान्यात येवू नका म्हणून सांगतात.

फुकट हेल्थ केअर म्हणून दामदुप्पट विमा उकळतात.

मुलांना थोडे जरी रागावलात तर पोलिसांना फोन करेन म्हणून धमकी मिळते.

लहान अबोध बाळक काही कारणास्तव रात्री अपरात्री यदाकदाचित रडले तर कडक सुटाबुटात काॅप्स दारात हजर.

आमच्याकडं बघा सगळंच मोकळं ढाकळं.

आणखीन असे कितीही लिहू शकतो.

आता यावर कडाडून हल्ला होण्याची शक्यता नाकारत नाही. पण अम्रीके व भारत यांची तुलना करणे म्हणजे संत्रे इक्वल टू एपल म्हणण्या सारखे आहे.

चांदणे भौ,आपल्या मताशी मी सहमत आहे. काँग्रेस, जनता,भाजप्पा कोणीही असो देश पुढे नेत आहेत. जनता जागृत होत आहे. स्वातंत्र्य पुर्व पिढी संपत आली आहे. नव्या पिढीने अटकेपार नव्हे तर चंद्रावर झेडें लावलेत. सुंदर पिचई,नडेला आणी अनेक भारतीय विद्वान कित्येक परदेशीयांना आपल्या पंखा खाली घेऊन आकाश भ्रमंती करता आहेत.

आता, उडदा माजी काळे गोरे असणारच.

थोडा वेळ द्या. उल्टी गंगा वाहाण्यास सुरवात झाली आहे.

१०४ ताप आल्याशिवाय दवाखान्यात येवू नका म्हणून सांगतात.
याचा अर्थ निशाकाळजी पणा असतो असे म्हणेन बरोबर नाही
येथेही डॉक्टर किरकोळ तापला उगाच औषध देत नाही . पाणी / अर्रम आणि पॅरासिटोमॉल वर भागवा म्हणतो

नाण्याची दुसरी बाजू पण बघा
सार्वजनिक आरोग्य यासाठी सरकार जागरूक असते ,, उदाहरण आपली पॅथॉलॉजिकल चाचणी मधून काही सार्वजनिक आरोग्यास धोकादायक जसे कि लिजीनर्स डिसीज वैगरे तटी बी तर इ चहसानी हि खाजगी असली तरी सरकारी + खाजगी यंत्रणा अशी आहे कि लगेच नोंद होते आणि बुलावा येतो

अर्थात हे मी ऑस्ट्रेल्या तील वैद्यकीय अनुभवातून सांगतोय .. अमेरिकेच्या वैद्यकीय क्षेत्राचे काम कदाचित वेगळे असावे ..
( हायला अमेरिकेचं मानाने मग आमची / इंग्लंड ची सिस्टीम म्हणजे कम्युनिस्ट कि )

मुलांना थोडे जरी रागावलात तर पोलिसांना फोन करेन म्हणून धमकी मिळते.
इथे मात्र पाश्चिमात्य देशात "फ्रीडम ऑफ .. चा गैरवापर "असे मान्य आहे

चित्रगुप्त's picture

10 Sep 2023 - 2:49 pm | चित्रगुप्त

माझ्या भारतातल्या, अमेरिकेतल्या आणि फ्रान्समधल्या (दीर्घ म्हणता येईल अश्या) वास्तव्यातून जाणवले ते असे, की आपापल्या दृष्टीकोणातून अनुकूल आणि प्रतिकूल गोष्टी (चांगल्या - वाईट म्हणा हवेतर) सगळीकडेच असतात. आपले वय, संस्कार, व्यवसाय, आवडीनिवडी, मनोभूमिका, जबाबदार्‍या, वगैरेनुसार आपले मत बनत जाते. मी वयाच्या चौतिसाव्या वर्षी अमेरिकेतील एका संग्रहालयात चित्रकार म्हणून काम केले होते, पण तेंव्हा आपण तिथे कायमचे रहावे, असे वाटले नाही. तरूण वयातही तिथले मला आकळलेले जीवन आपल्याला मानवणार/झेपणार नाही, असे वाटले. दिल्लीत रहाणे आणि अमेरिकेत रहाणे, यात त्याकाळी जो फरक होता, त्यात मला दिल्लीत रहाणेच जास्त पसंत होते. मात्र पुढे दिल्लीतली गर्दी, प्रदूषण बेसुमार वाढल्यावर मात्र ते नकोसे झाले.
-- आता सगळ्या व्यापातून मुक्त झाल्यावर मला कुठेही राहिले तरी फारसा फरक पडत नाही. काही मिळवण्याची इच्छा आणि जबाबदारी काहीच नसल्याने आपली तब्येत चांगली राहिली पाहिजे,आणि छंद चालवता आले पाहिजेत, येवढेच पुष्कळ वाटते. लोकांचे म्हणाल तर मला सगळीचकडे चांगले लोक भेटतात, किंवा कशाचा आग्रह नसल्याने सगळेच चांगले वाटतात असेही म्हणता येईल.
-- बाकी राजकीय सत्ता मिळवणे, ती टिकवून ठेवणे, सरकार चालवणे हा वेगळाच प्रकार असतो, त्याविषयी काहीच बोलायची माझी कुवत नाही, आणि आवडही नाही. माध्यमातून जे काही आपल्याला खरे-खोटे कळत असते, त्यातून आपली मते बनत असतात, त्यांनाही खरेतर आपल्या वैयक्तिक जीवनात काहीच अर्थ नसतो. उगाचच्या टिवल्याबावल्या, तात्पुरते मनोरंजन एवढेच.

अहिरावण's picture

10 Sep 2023 - 2:50 pm | अहिरावण

भारताला स्वातंत्र्य मिळाले हे चांगले का वाईट?

कंजूस's picture

10 Sep 2023 - 5:51 pm | कंजूस

यात करायचं/ठरवायचं काय?
चांगलंच.

आता तुमचीच लोकं तुम्हाला फसवू लागली किंवा अप्रामाणिक झाली तो तुमचा दोष. दोन घरं पुढे आणि तीन घरं मागे अशी चाल सुरू होते. चाललेल्या दोन घरांचा डांगोरा पिटतात. (डंका वाजवतात).

अहिरावण's picture

11 Sep 2023 - 10:10 am | अहिरावण

यावर सोप्पा उपाय आहे. तोंड फिरवून उभे रहा.
दोन घरं पुढे हे आता दोन घरे मागे होईल आणि तीन घरे मागे हे तीन घरे पुढे होईल.

हाकानाका.... कसे !

भारताला स्वातंत्र्य मिळाले हे चांगले का वाईट?
हा काय खोडसाळ प्रश्न, चांगले कि ,,,,शेवटी स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य .. गुलामी ती गुलामी
च्यामारी आमचं आजा / पंज्यानी नि राणी ला "राम राम ठोकला" आणि काही वर्षांनी देश बदलल्याने आम्हाला राणीला "राम राम " करावं लागतो ( दोष आमचा ) २००० साली प्रयत्न झाला राणीला येथूनही "राम राम टाटा करण्याचा.".. पण हरलो
तुम्ही भारतवासी जिकलात तर करा कि आनंद .. कशाला असले दळभद्री प्रश्न विचारताय ?

अहिरावण's picture

11 Sep 2023 - 10:13 am | अहिरावण

यात काय खोडसाळपणा ते कळाले नाही. अहो वरती अनेक जण त्यांचे आईवडील आजोबा नाकर्ते होते त्याचे खापर सरकारवर फोडत होते म्हणुन विचारले की नक्की काय समजायचं आमच्यासारख्या दरिद्री भारतीयांनी ते परदेशात राहून श्रीमंत झालेल्या महान लोकांना विचारत होतो. तुम्ही नका फार मनावर घेऊ.. :)

स्वातंत्र्य मिळाले ? गोरा साहेब गेला आणि आपला साहेब आला. सामान्य जनतेला किती फरक पडला हे आपण कोण आहात ह्यावर अवलंबून आहे. सामान्य जनतेचा मानेवरील जोखडाचे नाव फक्त बदलले. लगान दुगना नाही तरी GST तिप्पट झाला !

भारत इंग्रजाच्या गुलामीत जास्त काळ राहणे शक्यच नव्हते आणि असला तरी भारतीयांना ब्रिटिश नागरिकांच्या बरोबरीने हक्क मिळणे सुद्धा कमीच शक्य होते. ब्रिटिश सत्तेखाली भारतीय नागरिकांना कमी राजकीय हक्क असते पण जास्त अभिव्यक्ती आणि आर्थिक हक्क असते असे मला तरी वाटते. सध्या देशांत जे कायदे आहेत उदाहरणार्थ आरक्षण, RTE, SC/ST कायदे इत्यादी असणे शक्य झाले नसते.

भारतीय लोकांना सध्या जास्त राजकीय हक्क आहेत आणि कमी अभिव्यक्ती तसेच आर्थिक हक्क आहेत. राजकीय हक्कांचा वापर करून इतर हक्क मिळवता येतात पण त्यासाठी समाज प्रगल्भ असणे गरजेचे आहे. भारतीय समाज तसा अजून तरी नाही. पण आर्थिक हक्क जास्त मिळाले म्हणून जनता राजकीय हक्क मिळवू शकत नाही. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे.

अहिरावण's picture

13 Sep 2023 - 8:15 pm | अहिरावण

आपल्या एकंदर आकलनशक्तीचे कौतुक वाटते.... लगे रहो !!

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Sep 2023 - 6:45 pm | अमरेंद्र बाहुबली

कुणाला फ्रेंच गुएना बद्दल माहीती आहे का? तिथल्या नागरीकांना फ्रेंचचं नागरीकत्व असते नी सर्व सुविधा असतात असे वाचले होते, त्याचे काही फायदे तोटे?

तसे तर फ्रान्समधील नागरीकांणा पण फ्रेंच नागरीकत्व असते म्हणे. तिथे काही दिवसांपूर्वी सरकारविरुध्द लोक बोंब मारत होते. त्यांना सांगायला पाहिजे असं नका करु म्हणून.

चित्रगुप्त's picture

11 Sep 2023 - 4:01 pm | चित्रगुप्त

फ्रान्समधील नागरीकांणा पण फ्रेंच नागरीकत्व असते म्हणे. तिथे काही दिवसांपूर्वी सरकारविरुध्द लोक बोंब मारत होते.

पुष्कळ गुंतागुंतीचा विषय आहे, आणि त्यामागे गेल्या काही शतकातल्या विविध गोष्टी आहेत. ब्रिटिश, युरोपियन, अमेरिकनांनी केलेल्या अगणित जुलूमांचे परिणाम आता प्रकट होऊ लागलेले आहेत. त्यांचा सर्वशक्तीमान, परम दयाळू गॉड आता त्यांचे रक्षण करणार की सर्वशक्तिमान परमदयाळू खुदा त्यांचा बळी घेणार देवाक ठाऊक.

अहिरावण's picture

12 Sep 2023 - 12:45 pm | अहिरावण

>>>त्यांचा सर्वशक्तीमान, परम दयाळू गॉड आता त्यांचे रक्षण करणार की सर्वशक्तिमान परमदयाळू खुदा त्यांचा बळी घेणार देवाक ठाऊक.

कोणास ठाऊक सर्वशक्तीमान, परम दयाळू गॉड आता सर्वनाश करणार की सर्वशक्तिमान परमदयाळू खुदा वाचवणार !!

ण अम्रीके व भारत यांची तुलना करणे म्हणजे संत्रे इक्वल टू एपल म्हणण्या सारखे आहे.
एकतर अशी तुलना करणे योग्य नाही ,,दोन केवढे वेगळे देश
मूल्यमापन कराय चे दोन्हीकडे काही वर्षे तरी घालवून मग करावी !