हा माझा 'चंद्र' या टॉपिक वर दुसरा लेख.
नो, आय डोंट हॅव कॉपिराईट ऑन दॅट. किंवा माझा त्यात असा काही विशेष इंटरेस्ट ही नाही.
कारण म्हणजे 'चंद्रयान २' 'झेपावले' आहे. आणखी एक उड्डाण यशस्वी झालं आहे. चंद्रावर काय संशोधन करणार आहे ते मला माहीत नाही.
माझा प्रश्न आहे, कि आपल्या देशात, जिथं बेसिक प्रश्न आहेत (अजुन तरी) त्या देशाला चंद्र मोहीमेची सध्या काय गरज आहे ? म्हणजे थोड्क्यात जे ९७८ कोटी रु जे खर्च झालेत, त्याचे एक्सॅक्ट रिटर्न्स काय आणि कुणाला मिळणार आहेत ? स्वतापुरता विचार करायचा म्हटला, तर याचा मला काय फायदा झालाय ?
जिथं सायंटीफीक ब्रेन ची खरच गरज आहे, जिथं पैशांची खरच गरज आहे , तिथं या दोन्ही गोष्टिंचा वापर न करता, असल्या गोष्टींमधे दोन्ही का वापरल्या (वाया घालवल्या) जातायत ? माझ्यामते हे खरं ब्रेन ड्रेन आहे.
'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम कॅन मोस्ट्ली बी कन्सीडर्ड ओन्ली अॅज अ हॉबी, अँड नथींग मोर ..! आता हे असले "शौक' आपल्या देशाला सध्यातरी (त्याची खरच गरज आहे का ही गोष्ट वेगळी ) किंवा आता बेसीक प्रश्न सुटले आहेत, आणि आता काय करायचा टाइमपास अशी वेळ येण्याआधी परवडण्यासारखे आहेत का ?
स्पेस प्रोग्रॅम मधे भारत जर नसेल, तर काय बिघडणार आहे ? बाकीचे जे देश नाही आहेत, ते काय बंद पडलेत का ?
आता, 'इस्रो' ची आणखी एक सर्वीस आहे, सॅटेलाईट लाँचींग. ज्यामधे २६९ सॅटेलाइट्स लाँच झालेत वेगवेगळ्या देशांचे. त्या प्रगत देशांनीही स्वतः खर्च न करता 'इस्रो' ची सर्वीस वापरुन 'कॉस्ट कटिंग' केलंय. तर आता 'इस्रो' ला त्यामधुन बराच आर्थिक फायदा झाला असेल आणि त्यातुन या मोहीमा केल्या असतील तर माहीत नाही. कारण 'इस्रो' ने मग काय करावे मग हा त्यांचा प्रश्न आहे. मग, गो चंद्रयान (२) !
- उन्मेष
प्रतिक्रिया
24 Jul 2019 - 2:32 am | अनन्त अवधुत
isro ला करायला काही नव्हते म्हणून चांद्रयान २ केले!
24 Jul 2019 - 3:12 am | अनन्त अवधुत
for starter इस्रो हि या देशाची गरज आहे. ब्रेन ड्रेन नाही. ह्या अवाढव्य देशाच्या वेगवेगळ्या गरज पूर्ण करायला अवकाश संशोधनाचा हातभार आहे. हि इस्रोने प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांची यादी बघा. ISRO Satellites त्यात अतिशय वेगवेगळ्या उपयोगाचे उपग्रह आहेत नेव्हिगेशन यंत्रणेसाठी IRNSS उपग्रह आहेत. भारताच्या कृषिक्षेत्राचे मापन करणारे risat उपग्रह आहेत, TV साठी आणि फोन्स साठी कम्युनिकेशन उपग्रह आहेत. सो इस्त्रो आणि त्यांचे (आपले) उपग्रह हे ब्रेन ड्रेन नसून आपल्या रोजच्या जीवनाची गरज आहे.
मग आता केवळ उपग्रह का नाही? कशाला चंद्र, मंगळावर जायचे. लक्षात घ्या विज्ञान हे साचून राहणारे नाही. जशी जशी आपली प्रगती होते तसे तसे नवीन नवीन क्षेत्र शोधणे त्यात मूलभूत संशोधन करणे आणि प्रगतीचे नवीन मार्ग शोधणे हे आपल्या मानवी प्रगतीचे गमक आहे.
आणि हे काम इस्रोने का करायचे तर कारण इस्रो त्यात टॉप ऑफ द टॉप आहे
24 Jul 2019 - 4:12 am | वकील साहेब
हे मी लिहिलेलं नाही. कायप्पा फॉरवर्ड आहे. पण माहितीपूर्ण आहे. जसंच्या तसं इथे देत आहे.
इसरो: साधी माणसं, अफाट कर्तृत्व.
ठरलेल्या वेळी म्हणजे 22 जुलै 2019 रोजी दुपारी 2 वाजून ४३ मिनिटांनी इसरोचं चांद्रयान २ आकाशात झेपावलं. १५ जुलैच्या रात्री आढळलेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करून आजच्या दिवशी चांद्रयानाने उड्डाण घेतल्यावर प्रत्यक्षात आणि टीव्हीकडे डोळे लावून बसलेल्या अनेक भारतीयांनी सुटकेचा श्वास टाकला असेल. उड्डाणाच्या आधी काउन्टडाउनच्या वेळी जाणवणारी धडधड उड्डाण झाल्यावर सामान्यांसाठी थांबली असली तरी पुढचे ४८ दिवस चांद्रयान २ चंद्रावर पोहोचेपर्यंत आणि त्यानंतर १५ दिवस अपेक्षित निरीक्षणं हाती येइपर्यंतचा काळ इसरोच्या शास्त्रज्ञांसाठी कसोटीचा असणारे. सव्वातीन लाखा किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर जराही माहिती नसलेल्या 'टोटल ब्लाइंड स्पॉट' असलेल्या चंद्राच्या दक्षिण भागात चांद्रयान २ नेऊन उतरवणे, हे आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. वेगवेगळ्या प्रकारची गणितं करून कमीतकमी इंधन वापरत चंद्राच्या कक्षेत एखादं यान स्थिर करणं आणि नंतर त्याद्वारे माहिती मिळवणं, हे आपल्यासाठी भयंकर अगम्य आहे. बरं गम्मत म्हणजे हे सगळं हाताळणारी इसरोच्या नियंत्रण कक्षातली माणसं ही आपल्याबरोबर टपरीवर चहा पिणाऱ्या माणसांच्या इतकीच साधी दिसत होती. त्यातल्या अनेकांच्या कपाळावर गंध होतं. त्यांची बुद्धी, त्यांचं अफाट काम, त्यांचा आधुनिक विज्ञानाचा मार्ग ह्याच्यात त्यांची श्रद्धा अडसर ठरत नसावी, असा माझा कयास आहे.
ह्या सर्व शास्त्रज्ञांमध्ये कैलासवदीवु अर्थात के सिवन हे एव्हाना सर्वांना परिचित इसरोचे प्रमुखही होते. सिवन हे अत्यंत गरीब आणि सध्या कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे वडील फक्त एकरभर जागेत भातशेती करत. तामिळ मिडीयममधून शिक्षण पूर्ण केलेल्या सिवन ह्यांनी गणितात बीएस्सी केलं. नंतर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरोनॉटिकल इंजिनीरिंग आणि पुढे त्याच विषयात आयआयएससीतुन मास्टर्स केलं. २००६ साली त्यांनी आयआयटी मुंबईतून आपली पीएचडी पूर्ण केलीय. १९८२ साली सिवन इसरोत रुजू झालेत.
उड्डाणाच्या आधी चेहऱ्यावर न काळजी वा भिती आणि पहिल्या महत्त्वाच्या पायऱ्या पूर्ण झाल्यावर ना जल्लोष, ना हर्षोल्लास. परिपूर्ण, परिपक्व आणि विद्वत्तापूर्ण स्थितप्रज्ञता श्री सिवन ह्यांच्यासकट इसरोच्या नियंत्रण कक्षात इतर सर्वांच्या देहबोलीतून दिसत होती.
अमेरिकेच्या नासाप्रमाणेच इसरो ही जगातली एक अत्यंत प्रगत अंतराळ संस्था आहेत. विकिपीडियाच्या माहितीनुसार इसरोत आजमितीला १६,८१५ लोक काम करतात. ही संख्या नासाच्या जवळपास आहे. मात्र इसरोला भारत सरकारकडून मिळणारा निधी १२ हजार चारशे कोटी रुपये आहे तर अमेरिकन सरकार नासाला २ लाख कोटी रुपये पुरवते. दोन्ही संस्थांमधला हा एक मोठा फरक आहे. कमीतकमी पैशात यशस्वी मोहिमा राबवणं ही इसरोची खासियत म्हणायला हवी. मंगलयान मोहीमेचा एकूण खर्च होता ४०० कोटी रुपये जो हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांपेक्षा कमी होता. चांद्रयान २ चं बजेट आहे ९४० कोटी रुपये. म्हण्जेच फक्त बाहुबली २ च्या कमाईमध्ये दोन चांद्रयान मोहिमा होऊ शकतील आणि बीसीसीआयला आयपीएलच्या लिलावातून मिळालेल्या पैशातून तब्बल सोळा चांद्रयान मोहिमा होऊ शकतील. इसरो किती कमी पैशात सगळं भागवते ते कळावं (आणि भारतीय लोक आपला पैसा कुठे ओतत असतात हेही कळावं) ह्यासाठी हे आकडे. त्यामुळे मिळणाऱ्या निधीचा वापर करून इसरोने केलेली वाटचाल ही नक्कीच अभिमानास्पद आहे.
चांद्रयान २ ही भारतासाठी जशी एक मोठी मोहीम आहे, त्याचप्रमाणे इसरोची पुढच्या वर्षीची सुर्यावरची मोहीम ही देखील महत्त्वाची असणारे. त्यासाठी इसरो आदित्य-एल १ ह्या यानावर काम करते आहे. हे यान पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर स्थिरावून आपली निरीक्षणं इसरोकडे पाठवेल. सर्व जगभरातला सूर्य मोहिमेचा हा पहिला प्रयत्न असणार आहे.
मागील वर्षी १५ ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी भारताच्या पहिल्या मानवी मोहिमेची घोषणा केली होती. 'गगनयान' ह्या नावाची ही मोहीम २०२२ पर्यंत अपेक्षित आहे. त्याचबरोबर शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी 'शुक्रयान' ही मोहीमसुद्धा प्रस्तावित आहे.
अंतराळ मोहिमेपेक्षा जास्त काम इसरो इतर उपग्रहांवर करतेय. कारण ती आपल्या देशाची ती गरज आहे. इसरोच्या उपग्रहांनी दिलेली हवामानाची माहिती आणि सुरक्षेसाठीची पडताळणी ही दोन महत्वाची कामं गेल्या काही महिन्यात भारताला अत्यंत उपयोगी पडली आहेत.
स्कॅटसॅट-१, ओशनसॅट-२ आणि पोलार ऑरबीटिंग मिनिएचर सॅटेलाईट ह्यांनी मे महिन्यात ओरिसाच्या किनाऱ्यावर आलेल्या फणी वादळाच्या वेळी दर पंधरा मिनिटाला अचूक माहिती पुरवली होती. त्या माहितीच्या आधारे साडेअकरा लाख लोकांचं सुरक्षित स्थलांतर करून मोठी जिवीतहानी टाळण्यात यंत्रणांना यश मिळालं होतं.
ह्या व्यतिरिक्त कोरसॅट- १ आणि कोरसॅट- २ हे दोन अत्यंत महत्त्वाचे उपग्रह भारताच्या ताफ्यात आहे. ह्यातला कोरसॅट- २ हा उपग्रह साधारण दीडेक तासात पृथ्वीप्रदक्षिणा करतो. ६५ सेंटीमीटर इतकं कमी त्याचं रेझोल्युशन आहे. (चीनच्या उपग्रहाची क्षमता ५ मीटर इतकी आहे.) अगदी पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालयात किती गाड्या आहेत हेही हा उपग्रह टिपू शकतो. पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये ह्या उपग्रहाची फार मोठी मदत भारतीय सैन्याला झाली होती.
सायकलवरून सामान वाहून नेण्यापासून ते सूर्यचंद्रांना गवसणी घालण्यापर्यंतच इसरोचा प्रवास प्रत्येक भारतीयासाठी अभिमानस्पद आहे. अंतराळ आणि अवकाशाच्या संशोधनात भारताची परंपरा फार गौरवशाली आहे. इसरोच्या यशाने ती उत्तरोत्तर उजळत जावो.
24 Jul 2019 - 7:34 am | तुषार काळभोर
मै पयलेईच बोल्या, अजून कुणाला ठसका कसा नाही लागला!
24 Jul 2019 - 11:26 am | डॉ सुहास म्हात्रे
खालील दुव्यावर तुम्हाला, अवकाशसंशोधनामुळे तुमच्या-आमच्या-सकट असंख्य सामान्य माणसांच्या उपयोगी असलेले फायदे मिळालेले दिसतील...
https://www.misalpav.com/comment/1037942#comment-1037942
हे फार बेसिक उत्तर आहे. जालावर जरा खोलवर विचारणा केलीत तर अजून शेकडोंनी फायदे सापडतील.
यामध्ये, "एकातून निघाणारा दुसरा फायदा (रिपल् इफेक्ट)" या प्रकारचे फायदे पकडलेत तर संख्या काही हजारांत किंवा लाखांतही जाऊ शकेल.
24 Jul 2019 - 11:16 pm | उन्मेष दिक्षीत
बघतो.
24 Jul 2019 - 11:55 am | महासंग्राम
उन्मेष सर्वप्रथम ६ वर्षांच्या मिपा कारकिर्दीत तुम्हाला आता लेख लिहायची इच्छा झाली याबद्दल आपले अभिनंदन आणि पुलेशु
आता आपल्या काही प्रश्नांना प्रतिप्रश्न विचारतो उत्तरं मिळतील अशी अपेक्षा न मिळाल्यास हरकत नाही
माझा प्रश्न आहे, कि आपल्या देशात, जिथं बेसिक प्रश्न आहेत (अजुन तरी) त्या देशाला चंद्र मोहीमेची सध्या काय गरज आहे ? म्हणजे थोड्क्यात जे ९७८ कोटी रु जे खर्च झालेत, त्याचे एक्सॅक्ट रिटर्न्स काय आणि कुणाला मिळणार आहेत ? स्वतापुरता विचार करायचा म्हटला, तर याचा मला काय फायदा झालाय ?
सरकार भारतात अश्या ठिकाणी रस्ता बांधते आहे जिथे कधी भविष्यात जाणार नाही म्हणून तिथे रस्ताच बांधायचा नाही असं कसं ?
त्या रस्त्याचा तुम्हाला काहीही फायदा नाही पण दुसऱ्याला तर आहे ना
मुख्य म्हणजे सरकार स्वतःपुरता कधीच विचार करत नाही
जिथं सायंटीफीक ब्रेन ची खरच गरज आहे, जिथं पैशांची खरच गरज आहे , तिथं या दोन्ही गोष्टिंचा वापर न करता, असल्या गोष्टींमधे दोन्ही का वापरल्या (वाया घालवल्या) जातायत ? माझ्यामते हे खरं ब्रेन ड्रेन आहे.
लोकं मोठाल्या पगाराची नोकरी पटकावून दुसऱ्या देशात जातात त्या ब्रेन ड्रेन बद्दल किंवा बॉलिवूड मध्ये मोठ्या मोठ्या खर्चिक बजेटचे चित्रपट बनतात तिथे पैसे वाया घालवल्या जात नाहीत का ? या बद्दल आपण कधी आवाज उठवला अथवा ते थांबवण्यासाठी काही कृती केली आहे का ?
'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम कॅन मोस्ट्ली बी कन्सीडर्ड ओन्ली अॅज अ हॉबी, अँड नथींग मोर ..! आता हे असले "शौक' आपल्या देशाला सध्यातरी (त्याची खरच गरज आहे का ही गोष्ट वेगळी ) किंवा आता बेसीक प्रश्न सुटले आहेत, आणि आता काय करायचा टाइमपास अशी वेळ येण्याआधी परवडण्यासारखे आहेत का
?'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम हि हॉबी आहे हा निष्कर्ष आपण कोणत्या गृहीतकावरून काढला ? ज्या देशात 'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम नाहीये त्यांचे तरी बेसिक प्रश्न पूर्णपणे सुटले आहेत का ?
स्पेस प्रोग्रॅम मधे भारत जर नसेल, तर काय बिघडणार आहे ? बाकीचे जे देश नाही आहेत, ते काय बंद पडलेत का ?
'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम मध्ये जर भारत नसेल जागतिक महासत्ता म्हणून एक गोष्ट असते तिच्यात मागे पडेल आणि ज्या देशात 'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम नाही त्यापैकी किती देश जागतिक महासत्ता आहेत हे हि सांगा ? आता जागतिक महासत्ता म्हणजे काय हे आपल्या सारख्या सुज्ञास काय सांगावे
बघा जमलं तर द्या ऊत्तर नाहीतर बाउन्सर म्हणून सोडून द्या
24 Jul 2019 - 4:32 pm | जॉनविक्क
मंदा सर्वप्रथम आपल्या 4+ वर्षांच्या कालावधीत तुम्हाला इतका अभ्यासपूर्ण प्रतिसाद लिहायची इच्छा झाली याबद्दल अतिशय मनःपूर्वक अभिन्नदन.
अत्यन्त संयत आणि चपखल प्रतिसाद आपण लिहला असल्याने कौतुक केल्या शिवाय रहावले नाही, बघा जमलं तर मोठ्या मनाने स्वीकार करा नाहीतर बाउन्सर म्हणून सोडून द्या.
24 Jul 2019 - 4:39 pm | महासंग्राम
जॉनविक्क राव आपण आमचं कौतूक २ + महिन्याच्या मिपा कारकिर्दीत दुसऱ्यांदा केलं याबद्दल आपले आभार. आपल्या कौतुकाचा स्वीकार चौकार मारून करण्यात आला आहे तसेच पुढील कौतकाच्या वेळी आपण माझं पूर्ण नाव मंदार असं घ्याल अशी आशा बाळगतो.
24 Jul 2019 - 5:03 pm | जॉनविक्क
तुम्ही जसे प्रेमाने मला जानराव म्हटले तसे मंदा मी हि आपणास प्रेमाने मंदा म्हणावे म्हणतो, एक आपलेपणा वाटतो
24 Jul 2019 - 9:43 pm | उन्मेष दिक्षीत
>>> सरकार भारतात अश्या ठिकाणी रस्ता बांधते आहे जिथे कधी भविष्यात जाणार नाही म्हणून तिथे रस्ताच बांधायचा नाही असं कसं ?
त्या रस्त्याचा तुम्हाला काहीही फायदा नाही पण दुसऱ्याला तर आहे ना
मुख्य म्हणजे सरकार स्वतःपुरता कधीच विचार करत नाही
--- मुद्दा समजून घ्या प्लीज. रस्ता बांधण्याला कुठं काय म्हटलं मी ? बेसिक गोष्टीं मध्ये येतच ना ते ? स्वतःपुरता विचार म्हणजे फक्त स्वतःपुरता नाही.
>> 'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम हि हॉबी आहे हा निष्कर्ष आपण कोणत्या गृहीतकावरून काढला ? ज्या देशात 'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम नाहीये त्यांचे तरी बेसिक प्रश्न पूर्णपणे सुटले आहेत का ?
-- स्पेस रिसर्च म्हणजे मला दुसऱ्या ग्रहांचा अभ्यास हे अपेक्षीत आहे. त्यामुळं हॉबी म्हटल्या.
>> 'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम मध्ये जर भारत नसेल जागतिक महासत्ता म्हणून एक गोष्ट असते तिच्यात मागे पडेल आणि ज्या देशात 'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम नाही त्यापैकी किती देश जागतिक महासत्ता आहेत हे हि सांगा
-- महासत्ता बनायला आधी जे मूलभूत प्रश्न आहेत ते सुटायला नकोत असं वाटत नाही का ? की प्रश्नच नाही आहेत असं आहे ? अॅज अ सिटीजन, वाय वुडंट आय बी हॅपी इफ India इज इन दॅट पोसिशन टु डु अॅन आउटर स्पेस रिसर्च ?
माझं म्हणणं आहे, महासत्ता बनण्यासाठी करण्यापेक्षा , महासत्ता आहे (वी आर दॅट एनरिच्ड) म्हणून माज करण्यात मजा आहे.
>> बॉलिवूड मध्ये मोठ्या मोठ्या खर्चिक बजेटचे चित्रपट बनतात तिथे पैसे वाया घालवल्या जात नाहीत का ?
-- दॅट्स अ एंटरटेन्मेंट बिजनेस. आणि ब्रेन ड्रेन म्हणायचं तर मी दरवेळी 'सध्या' असंच म्हटलंय. आणि भारतच काय, तर प्रत्येक देश जरी स्पेस मध्ये असला तरी मूळ गोष्ट बदलत नाही की इट्स अ हॉबी. आणि सध्या आपल्याला त्याची गरज नाही एवढंच म्हणायचं आहे.
25 Jul 2019 - 9:31 am | महासंग्राम
स्वतःपुरता विचार करता देशाचा जरी विचार केला तरी देशाची वाढती लोकसंख्या पाहता बाहेरच्या ग्रहाचा वस्तीस्थान म्हणून विचार करणे गैर कसे
ती हॉबी नक्कीच होऊ शकत नाही कारण काही दशकांनी पृथ्वीवर राहणे खरंच कठीण होणार आहे तेव्हा भविष्याचा विचार करणे केव्हाही श्रेयस्कर.
आपण महासत्ता नाही कारण आपलय मूलभूत गरजा अजून भागल्या नाही म्हणून स्पेस रिसर्च करायचा नाही असं थोडी ना आहे, एक विचार करा या स्पेस रिसर्च मधून बाहेरच्या ग्रहावर जर राहण्यायोग्य वातावरण सापडलं अथवा तयार करू शकलो तर तिथे अन्न, वस्त्र, निवारा या सारख्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी साधने तयार करूच शकतो ना आपण.
स्पेस रिसर्च पेक्षा जास्त खर्च भारत सरकार संरक्षण बजेट (४३१,०११ करोड रुपये ) यावर खर्च करते. जे इस्रो च्या चांद्रयान-२ च्या बजेट पेक्षा कैक पटीने जास्त आहे. आता आपल्या मूलभूत गरजा (अन्न, वस्त्र, निवारा) पूर्ण झालेल्या नाही म्हणून आपण संरक्षण च्या बाबतीत हयगय करणार का तर नाही ना. अगदी त्याच पद्धतीने आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे प्रयत्न आणि स्पेस रिसर्च प्रोग्रॅम एकाच वेळी चालू शकतात.
जे देश आज महासत्ता आहेत त्या देशात सुद्धा सर्व नागरिकांच्या अमेरिकेत सुद्धा २०१७ मध्ये ३९.७ मिलियन लोकं गरीब होते म्हणून त्यांनी स्पेस रिसर्च थांबवला नाही.
संदर्भ : https://idsa.in/issuebrief/indias-defence-budget-2019-20-lkbehera-०८०७१९
https://www.census.gov/library/publications/2018/demo/p60-263.html
24 Jul 2019 - 1:46 pm | महेश हतोळकर
मायकेल फॅरेडेंंना एका बाईंनी विचारले, "तुमच्या शोधांचा सामान्य माणसाला काय उपयोग?"
ते म्हणाले "बाईसाहेब, नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा समाजाला काय उपयोग?"
J Thompson बरोबरही हेच झालं, electron चा समाजाला काय उपयोग?
आज कळतंय, त्यांच्या कामाचा आपल्यावर काय परिणाम होतो आहे.
कायप्पावरून आलेलं इथे चिटकवतोय. मला इतकं चांगलं लिहिता आलं नसतं.
24 Jul 2019 - 11:38 pm | उन्मेष दिक्षीत
फक्त आणि फक्त 'आउटर स्पेस अँड प्लॅनेटरी रिसर्च' (चंद्रयान, मंगळयान) घ्यावी. बाकिच्या गोष्टिंना 'का' विचारायचा प्रश्नच नाही. 'इस्रो' बद्दल बोलायला मला स्वतःला सायन्स घेतलं असुनही फिजिक्स केमिस्ट्री मधे शुन्य इंटरेस्ट होता त्यामुळे मी 'इस्रो' चा उपयोग काय असं काही म्हटलं नाही आहे.
24 Jul 2019 - 2:55 pm | मराठी_माणूस
आजच्या लोकसत्ते मधिल "संशोधनाचे नेमके उद्देश जनतेस कळावेत" ह्या शिर्षकाचे पत्र
https://www.loksatta.com/lokmanas-news/readers-letters-reaction-from-lok...
24 Jul 2019 - 5:05 pm | विजुभाऊ
चंद्रयान हे भारतीय तंत्रज्ञानास एक आव्हान आणि आवाहन आहे.
यामुळे आपण आपली क्षमता शाबीत करतो.
अण्वस्त्र सज्जतेचा वास्तवात काहीही उपयोग नाही हे माहीत असूनही शत्रु राष्ट्राला जरब म्हणून त्याचा अप्रत्यक्ष वापर होतो.
चंद्रयान मिशनचे संशोधन भविष्यात येत असलेल्या आय ओ टी साठी उपयोगी ठरेल
( भारतात मायक्रोसॉफ्ट सारखे संशोधन का होत नाही असे विचारणारेही बरेच आहेत इथे)
24 Jul 2019 - 5:09 pm | जॉनविक्क
असलेल्या आय ओ टी साठी उपयोगी ठरेल
हे जाणून घ्यावेसे वाटते. इंटरनेट ऑफ थिंग्स मधे चांद्रयान मोहिमेचे काय कॉन्ट्रीब्युशन असू शकते ?
24 Jul 2019 - 5:06 pm | गड्डा झब्बू
हि जिलबी इथे का पाडली आहे माहित नाही....
इस्रो ला जे करावेसे वाटले ते त्यांनी केले कि, तुमची परवानगी नाही घेतली म्हणून रागावला आहात का तुम्ही? एक गोष्ट खरी आहे, अंतराळ संशोधनापेक्षा आणखीन एखादी संस्था स्थापन करून आधी देशातील काही लोकांची दळभद्री मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करण्यास प्राधान्य द्यायला हवे.
25 Jul 2019 - 2:18 am | उन्मेष दिक्षीत
एक काम करा, यावेळी यान सुटले आहे, नेक्स्ट मोहिमेत बसा यानात आणि जाउन या चंद्र/मंगळ वगैरे, आणि काय सापडले तर सांगा आम्हाला.
>> हि जिलबी इथे का पाडली आहे माहित नाही....
तुमचं प्रायवेट संस्ठळ आहे का हे ? फालतू प्रतीसाद देणं बंद करा. तुमच्यासारख्या आयडींच्या असल्या प्रतीसादांमुळं एका चांगल्या संस्थळाचं वातावरण दुषीत होतय.
बादवे, तुम्हाला एकाच (डु) आयडी मधे २-२ नावं कशी घेता आली ?
24 Aug 2023 - 12:48 am | उन्मेष दिक्षीत
सध्या कुठे आहात ? गेला नाहीत यानाबरोबर ?
24 Jul 2019 - 5:07 pm | राघव
आता मिपावर असल्या चर्चा उघडून, त्यांवर खल करून तुमचा वेळेचा अपव्यय होण्याव्यतिरिक्त अजून कोणता फायदा तुम्हाला होतो?
आपण भरपूर गोष्टी उगाचच करत असतो.. नकळत. मग आधी तो वेळ वाचवून सत्कारणी लावून मग अशी चर्चा सुरू केली पाहिजे, कसं?
24 Jul 2019 - 9:24 pm | ढब्ब्या
फारच डाव्या विचारसरणीचे विचार वाटले .. माझा पास :)
25 Jul 2019 - 5:32 am | कंजूस
हे कशाला पाहिजे हा विचार तुम्हाला पडला. आता ते पटवण्याचं काम आम्ही करूच . पण सध्यातरी हा वायफळ खर्च आहे हे मत खोडायला जरा अवघडच आहे.
25 Jul 2019 - 7:08 am | प्रियाभि..
महाशयांनी वर पाडलेली जिलेबी कुठून तरी उचलून इथे चीपकवलेली आहे असं वाटलं म्हणून प्रतिक्रिया देणे टाळले होते. (वेळ आली तर तीही दिली जाईल) पण तुमच्याकडून खर्चाच्या मुद्द्यावर असे वक्तव्य अपेक्षित नव्हते म्हणून हा टंकन प्रपंच. एकाच सूत्रात माझे विचार मांडतो मग पहा वायफळ खर्च कोणता आहे.
एकतेचा पुतळा = ३००० कोटी
चांद्रयान २ = ९७८ कोटी
_/\_
25 Jul 2019 - 8:32 am | उन्मेष दिक्षीत
तीही दिली जाईल
>> द्या कि मग. यु आर वेलकम.
बादवे, ते 'चिपकवलेली जिलेबी' वगैरे तुम्हाला वाटतय म्हणजे आणि लेखातल्याप्रमाणे आणखी कुणालातरी असं वाटतयच.
एकतेचा पुतळा = ३००० कोटी
चांद्रयान २ = ९७८ कोटी
>> अँड मेड इन चायना !
हा मुद्दा आहेच. पण तो जरा वेगळा आणि 'सेन्सेटीव' टॉपिक आहे. स्टॅच्यु ऑफ युनिटी हा स्टॅच्यु ऑफ लिबर्टी वर बेस्ड आहे. अमेरिकेने स्व्तः तो बनवलेलाच नाही तर फ्रान्स कडुन त्यांना तो भेट म्हणुन मिळालाय. त्यांना काय अवघ्ड आहे का जर त्यांनी ठरवलं असतं तर ? आपण मात्र ३००० कोटी खर्च केले. खुद्द सरदार पटेलांना ते पटलं असतं की नाही माहीत नाही.
25 Jul 2019 - 7:12 am | सुधीर कांदळकर
वकीलसाहेब, मंदारसाहेब आणि डॉक्टर साहेब यांना धन्यवाद.
25 Jul 2019 - 11:35 am | विनोदपुनेकर
इसरो ची स्थापना सण १९६९ मध्ये झाली तेव्हा तर आपल्या देशाची परिस्तिथी काय असेल आणि कशी असेल (तेव्हा आम्ही या भुतलावर नव्हतो ) पण तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी आणि आपल्या सारखया सजग नागरिकांनी हा प्रश्न उपस्थित केला असता कि कशाला इसरो आणि संशोधन तर .....
25 Jul 2019 - 12:51 pm | पाटीलबाबा
अहो, फक्त 978कोटी आहेत ते. त्यात काय मोठं!
978कोटी÷125कोटी लोक=7.80.
तुमच्या वाट्याला फक्त 7रूपये80पैसे आलेत.
शांत बसा.
26 Jul 2019 - 2:00 am | उन्मेष दिक्षीत
लॉल !
25 Jul 2019 - 1:21 pm | जोन
science वगैरे .....विळी हातोडी पुरेसे आहे जगायला......नाही का? :D .... diesel सायकल शोधली नसती तर एंजिने आज नसती.....थेअरी ऑफ रेलॅटिव्हिटी नसती तर आज GPS पण नसते...अजून बरंच काही काही असेल....संशोधन करणारे प्रॉडक्ट डेव्हलोपमेंट करत नसून फक्त नवं नवीन शोध घेत असतात .....पण मार्केट आणि त्यात काम कारण्यारांची मानसिकता वेगळी असते.....आपण उपयोगिता शोधात असतो आणि त्याचे मूल्य किंवा भाव एवढेच बघतो...संशोधक सर्जनशील वृत्तीने आणि फक्त कुतूहल आणि ध्यासापोटी ते शोध लावत असतो...अर्थात पुढील अर्थ किंवा बाजार व्यवस्था त्याचे उपयोजन करून फायदे सर्वसामान्य माणसं पर्यंत पोचवतेच...
25 Jul 2019 - 2:49 pm | महासंग्राम
हे म्हणजे प्रियांका चोप्राने तिला अस्थमा आहे म्हणून चांद्रयानाला विरोध कारण्यासारखं झालं
25 Jul 2019 - 3:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
हल्लीच्या काळात, हे 'चालतंय की' ! ;)
25 Jul 2019 - 3:19 pm | महासंग्राम
हाहाहाहा
25 Jul 2019 - 8:16 pm | अर्धवटराव
च्यायला... कसली डोक्यालिटी आहे मिपाकरांची =)) =))
25 Jul 2019 - 5:26 pm | रांचो
चांगला प्रश्न आहे. यांच उत्तर आपण स्वतः शोधायचा प्रयत्न केला असेलच. नसेल तर काही लिंका खाली डकवतोय. त्यावरील तुमचे मत वाचायला आवडेल.
ह्या लेखानुसार, स्पेस प्रोग्रामवर खर्च केलेल्या एक डॉलरचा एकूण फायदा $ 8 ते $ 10 दरम्यान आहे.
नासाच्या संकेतस्थळावर हा पेपर आहे.
भारतात असा अभ्यास अजुन एक तर झालेला नसावा किंवा सार्वजनीक केलेला नसावा. मला वयैक्तीक दुसरे कारण असावे असे वाटते.
बाकी तत्वतः भारत सरकार१९९९७-९८ पर्यंत तरी बाह्य अवकाशात कुठलाही उपग्रह पाठवण्यास फारसे आग्रही नव्हतेच. जेंव्हा खर्च आणी (मूर्त आणि अमूर्त) फायद्याचे समीकरण जुळते तेव्हांच अशा प्रकारचे प्रकल्प हाती घेतले जातात. भारता सारख्या लोकशाही असणार्या देशात जिथे कॅग सारखी स्वायत्त संस्था सर्व खर्चाचा आढावा घेते, तिथे सर्वसाधारणपणे कुणा एकाला झटका आला म्हणुन असे प्रकल्प होत नसतात यावर दुमत नसावे.
25 Jul 2019 - 11:19 pm | उन्मेष दिक्षीत
NASA’s 2015 budget is $17.5 billion. It is estimated that the total economic benefit of each dollar spent on the space program has been between $8 and $10.
हे मला खरच कळालं नाही. कसा फायदा झालाय ते पण लिह्लेलं नाही तिथं. प्लीज एक्स्प्लेन.
26 Jul 2019 - 2:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
https://www.misalpav.com/comment/1040223#comment-1040223
येथे दिलेल्या माहितीत असलेल्या आणि जालावरून मिळणार्या माहितीवरून अवकाश संशोधनामुळे, सगळ्या जगाला झालेल्या, सगळ्या फायद्यांची गोळाबेरीज केली तर... दर खर्च झालेल्या $१ चा $८ ते $१० हा परतावा फारच संकुचित पद्धतीने काढलेला आहे आणि प्रत्यक्षात तो दर डॉलरमागे $१०० च्या खूप पुढे गेलेला आहे असे दिसेल.
25 Jul 2019 - 5:48 pm | Rajesh188
भारताची चंद्राच्या न दिसणाऱ्या भु भागावर उतरण्याचा जो प्रयत्न केला आहे ते काम अतिशय अभिमान स्पद आहे ते त्या साठी सर्व संशोधक आणि त्यांचे सहकारी ह्यांचे मनापासून अभिनंदन
पृथ्वी व्यतिरिक्त दुसऱ्या ग्रह गोलांचा अभ्यास करून आपल्याला बरीच नवीन माहिती मिळू शकते आणि त्या माहितीचा भविष्यात मानवी हितासाठी उपयोग करता येवू शकतो.
आकाश संशोधनाच्या मोहिमेत अमेरिकेची नासा ही संस्था आघाडीवर आहे .
चंद्र च काय सूर्य माले तील सर्व ग्रह ,धूमकेतू ह्यांचा अभ्यास कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते करत आहे आणि अत्यंत विस्मयकारी माहिती जगाला देत आहे .
त्यांचे एक यान तर सूर्यमाला भेदून अनंताकडे कडे प्रवास करत आहे .
जपान न तर धूमकेतू वर यान उतरवून जगाला धक्का दिला आहे .
पण अशा मोहीम गरजेच्या आहेत त्या साठी खर्च होणारे पैसे हे बिलकुल पैस्याचा अपवय नाही उलट अजुन बजेट वाढवलं पाहिजे .
देशात अडचणी आहेत ,गरिबी आहे , रस्ता सारखा सुविधा नाहीत हे प्रश्न निर्माण होण्ामागे फक्त विकास योजनांना कमी पैसा मिळतो हे कारण नाही तर त्याला भारतीय लोकांची मानसिकता कारणीभूत आहे .
सार्वजनिक संपत्ती ची हानी पोचवण्यात भारतीय लोकांचा हात कोण्ही धरू शकत नाही .
त्या बरोबर अप्रमनिका पना तर ठासून भरला आहे त्या मुळे रस्ता बनवायला जिथे २ रुपये लागतील तिथे २० रुपये खर्च करावे लागतात आणि सार्वजनिक पैस्याच apvay होतो
26 Jul 2019 - 12:15 am | उन्मेष दिक्षीत
तुमचं खरच म्हणणं आहे ? इथं तुम्ही त्याला विरोध केला होता
इथं जे अवकाश संशोधनाचे (उपग्रह वगैरे मी म्हणत नाही) फायदे (CAT scanner, Cordless tools, Computer microchip,Insulation,Joystick,Memory foam) सांगितलेत ते त्यामुळं झालेले अप्रत्यक्ष फायदे आहेत. ते शोध अवकाश संशोधनातुनच लागले असते असं त्यातुन प्रुव होत नाही. आणि इटओन्ली सपोर्ट्स द फॅक्ट कि 'अवकाश संशोधनाचे' प्रत्यक्ष फायदे असे काहीच नाही आहेत. ते फक्त टाइमपास याच कॅटेगरी मधे मोडते. कारण एक सिंपल फॅक्ट आहे, ज्या ग्रहावर आपण मिपाकर रहातो, तो अवकाशातच आहे ! आणि लाइफ तिथं आहे. तिथंच आपण नीट राहत नाही तर चंद्रावर जिथं लाइफ नाही आहे थोडक्यात झाडं, पाणी, ऑक्सिजन, ग्रॅविटी (कारण नाहीतर तिथंही जीवसृष्टी असतीच) तिथं जाउन काय करणार आहे ? आणि हे सगळ्यांनाच माहीत आहे, फक्त जगाला दाखवाय्ला करतात सगळे. अमेरिका आणि रशिया मधे चंद्रावर पहिला कोण जातो हिच काँपिटिशन होती. 'रिसर्च' वगैरे काही नाही, तिथं जाउन एकदा झेंडा लावायचा होता फक्त.
24 Aug 2023 - 4:58 am | चौकस२१२
'अवकाश संशोधनाचे' प्रत्यक्ष फायदे असे काहीच नाही आहेत. ते फक्त टाइमपास याच कॅटेगरी मधे मोडते
+
फक्त जगाला दाखवाय्ला करतात सगळे.
+
तिथं जाउन एकदा झेंडा लावायचा होता फक्त.
माफ कर या पातळीवर येऊन प्रतिसाद देतो कारण तुमचं विरोधाचा रोख विचित्र आणि अपमानसपदक आहे
अर्थात असे वळवळणारे किडे असणारच
प्रकाश राज चे अनुययी काय हो तुम्ही ?
इसरो च्या आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या सरकारला ( २०१४ आधी आणि नंतर दोन्ही) तुम्ही दोषी ठरवत आहात
असो
- असे यान सोडणे त्यातून ते वाहन उतरवणे आणि सवांद साधने याचे फायदे काय हे कळायला तुम्हाला कुठे पाठवावे याचा विचार करीत आहे .. कदाचित तोपर्यंत गगनयनात एक्सट्रा पे लोड मध्ये २ जागा बुक आहेत एक तो प्रकाश आणि पाकिस्तानी फवाद तिसरी आहे का विचारतो
24 Aug 2023 - 7:38 pm | उन्मेष दिक्षीत
प्रुव्ह मी राँग !
>> वळवळणारे किडे ?
गरळ ओकणारे प्रतीसाद नकोत.
25 Aug 2023 - 12:24 am | उत्खनक
म्हणजे हे तुम्ही स्वतःहून समजून घ्यायला तयारच नाहीत म्हणायचे.
कसंय की -
- दररोज युद्ध होत नाहीत मगे एवढे सैनिक कशाला उभे करायचे सीमेवर...?
- दररोज एवढ्या बंदुका वापरत नाहीत, मग कशाला बंदुका हव्यात..?
.
.
.
- बैलगाड्या, टांगे असतांना इंधनावर चालणारी बस कशाला हवी?
- इतक्या गरीबीत लोकं राहतात.. मी एवढे पैसे कशाला वापरावेत?
- बरेच लोकं फारसं डोकं लावतच नाहीत.. कशाला शिक्षणाचा पसारा मांडावा/किंवा मी का शिकावे?
.
.
.
असले प्रश्न चघळायलाच ठीक. त्यातून कुणाचं काही प्रबोधन होणार असं काही नाही.
विदा मागणं फार सोपं असतं. काहीही प्रश्न मांडायचे, उगाच वाद वाढवायचे आणि कुणी विरोध केला की विदा मागायचा.
=====
तुम्ही जे प्रश्न मांडताहात ते केवळ बालिश नाहीत, तर ते संशोधनाची गरजच काय अशी दळभद्री विचारसरणी दर्शवतात.
त्या हिशोबानं आपण अजूनही पाषाणयुगातच राहणं बरोबर होतं. तेव्हाही जगत होतोच की.. कशाला गरज सोयी सुविधांची?
=====
तुम्हीच वरती एक ओझरता उल्लेख केलेला आहे.. सॅटेलाईट लाँचिंग सर्विस. या सारखे काही फायदे सरळ आहेत. मेजरेबल. $ वॅल्यूज साठी गूगल करावे.
या सॅटेलाईट लाँचिंग साठी जे रॉकेट लागतं तीच टेक्नॉलॉजी काही बदल करून क्षेपणास्त्रांमधेही लागते. आता क्षेपणास्त्रं कशाला असा प्रश्न आला तर वरच्या प्रश्नावली कडे नजर टाकावी.
आज आपल्याला जीपीएस वापरता येतंय.. पण आपल्या सैन्याला कारगिल मधे जीपीएस ची मदत करायला अमेरिकेने नकार दिलेला. त्यानंतर आपण नाविक सिस्टीम बनवली. आता जर का इस्रोची स्थापनाच झाली नसती, रॉकेट्स बनवण्यासाठी बजेट दिलंच नसतं; तर आपण सॅटेलाईट इतर देशांच्या मदतीनं पाठवले असते? तेही आपल्याला संरक्षणासाठी लागणारे? संरक्षणाच्या बाबतीत इतरांवर अवलंबित्व असण्याचे परिणाम आपण अगोदरच भोगत नाही आहोत काय? हे नुकसान मेजरेबल आहे काय? आहे त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग इतर बाबतीत करून केलेली गुंतवणूक भरून काढण्यात गैर ते काय? उलट तेच तंत्रज्ञान आणिक वाजवी दरात वापरण्याबद्दल इस्रोचे आपण अभिनंदन करायला हवे.
जाऊ देत.. तुम्हाला सांगून काही तुम्ही ऐकणार नाहीच आहात.. तुम्हाला समजावणं हा उद्देशही नव्हता. आम्ही आपलं जरा मन शांत करून घेतलं इतकंच.
25 Aug 2023 - 2:00 am | उन्मेष दिक्षीत
एका वाक्यात रिप्लाय
चंद्रावर माणसेच नाहीत!
25 Aug 2023 - 4:29 am | चौकस२१२
तुम्ही जे प्रश्न मांडताहात ते केवळ बालिश नाहीत, तर ते संशोधनाची गरजच काय अशी दळभद्री विचारसरणी दर्शवतात.
अगदी योग्य शब्दात पकडले उदी यांना
आणि तुमच्या वरील वाक्यवरून तुम्हाला फक्त वेळ घालाव्ययचय खोडसाळपणा करायचंय हे सरळ दिसतंय
योग्य टीका कोण्ही कारवी लोकशाही आहे पण टीका करनारयाची हि जबाबदारी असते
25 Aug 2023 - 12:35 pm | उन्मेष दिक्षीत
आधी जरा नीट टाईप करा, बाकीचे राहू दे !
28 Aug 2023 - 7:11 am | चौकस२१२
उन्मेष दिक्षीत
नाही करणार नीट टाईप मला रु सातच मिळतात याचे .. खी खीखी
नहि कर्नर मल रु सात्च मिल्तत यचे
28 Aug 2023 - 10:01 am | उन्मेष दिक्षीत
बसअ बोम्ब्लत
25 Aug 2023 - 4:30 am | चौकस२१२
उत्खनक अगदी योग्य शब्दात तुम्ही मांडले आहेत
25 Jul 2019 - 6:36 pm | ज्ञानोबाचे पैजार
चंद्रावर पोचायला ९७८ कोटी रुपये आणि ४८ दिवस? केवढी ही उधळपट्टी...
हे इस्त्रोवाले आम्हाला भेटले असते तर २० रुपयात आणि १० मिनिटात आम्ही त्यांना चंद्रावरच काय मंगळावर सुध्दा पोचवले असते.
लै कडक माल असतो आपल्याकडचा. आपल्या मिपा मित्रांना तर आम्ही तो फुकट उपलब्ध करुन देउ शकतो.
दोस्तांसाठी कायपन, कालपन, आजपन, उद्यापन
पैजारबुवा,
26 Jul 2019 - 12:20 am | जॉनविक्क
त्यापेक्षाही सरस आहेत हे बघून डोळे पाणावले.
अशा मिपा शास्त्रज्ञाचा उचित सन्मान करणारी एक सरस व सुरस कथा आकुंनी त्वरित प्रसिद्ध करावी अशी विन्नती या औचित्यावर करणेत येत आहे.
26 Jul 2019 - 3:21 pm | इरसाल
मला माझे ७ रु, ८० पैसे जोपर्यंत ते यान फिरेल तितक्या दिवसाच्या व्याजासकट परत पाहिजेत.
26 Jul 2019 - 3:29 pm | अभ्या..
नाही मिळणार.
करा जप्त यान.
25 Jul 2019 - 7:04 pm | प्रसाद_१९८२
चंद्रावर पोचायला ९७८ कोटी रुपये आणि ४८ दिवस? केवढी ही उधळपट्टी...
--
यातील उधळपट्टीचा मुद्दा सोडला तरी,
साठच्या दशकात अमेरिका फक्त चार दिवसात चंद्रावर पोहचली होती मग आज सर्व अत्याधुनिक यंत्रणा सोबतीला असताना भारताला चंद्रापर्यंत पोहचयाला ४८ दिवस का लागणार आहेत ?
26 Jul 2019 - 12:35 am | जॉनविक्क
तर फास्टेस्ट रेकॉर्ड नासाचे आहे, 8.35 तास फक्त :)
बाकी रॉकेट सायन्स आपला विषय नसल्याने पास...
25 Jul 2019 - 7:26 pm | Rajesh188
मला वाटतं आपण जे रॉकेट वापरलं आहे त्याची ताकत कमी असली पाहिजे .
त्या मुळे आपल्याला चंद्रा वर पोचायला जास्त वेळ लागत असावा .
तो काही मोठा प्रश्न नाही प्रचंड ताकत असलेलं रॉकेट सुद्धा बनवू आपण एक दिवस .
आपल्या कौतुक हवे की साधनसामुग्री ची कमतरता असून सुद्धा आपण चंद्रावर यान पाठवतो आहे .
अमेरिकी शी तुलना करून भारता चे यश नाकारत नाव ठेवण्यात काही अर्थ नाही
25 Jul 2019 - 8:35 pm | धर्मराजमुटके
चांद्रयान मोहिमेच्या बाजूने लिहिणार्या बाबांनो आणि बायांनो ! एक गोष्ट ध्यानात घ्या. कोणताही माणूस चर्चा कशाकरता करतो ? बहुतेक माणसे अगोदर बाण किंवा गोळी मारतात आणि मग त्या जागेभोवती वर्तुळ काढत असतात. चर्चा करणार्याचा उद्देश स्वतःचे मत परिवर्तन करायचा नसतो तर स्वतःच्या मताला पाठींबा मिळवायचा असतो. (अपवाद क्षमस्व !) त्यामुळे तुमचे एवढे लांबलचक प्रतिसाद नका लिहू बरे ! आता तुमचे प्रतिसाद वाचून ३ र्या चांद्रयान मोहिमेला पाठींबा मिळणार आहे काय ? त्यामुळे जमले तर लेखकाच्या मताला पाठींबा द्या बरे !
उन्मेष, मी तुमच्या मताशी सहमत आहे. खरोखर चांद्रयान मोहिमेचा काहीच फायदा नाहीये. तसे तर या जगातल्या कोणत्याही कृतीला काही अर्थ नाहिये. जग मिथ्या आहे हे साधू संतांनी सांगूनच ठेवले आहे. त्यामुळे या जगातील कोणत्याही गोष्टीचा तसा काहीच फायदा नाहिये.
25 Jul 2019 - 9:08 pm | प्रसाद_१९८२
धागा लेखकाचे बरोबर आहे.
इथे भारतीय जनता दुष्काळात पाण्यावाचून मरत असताना हे इस्त्रोवाले ९४७ करोड रु. खर्चुन चंद्रावर पाणी शोधत आहेत, काय म्हणावे ह्या दळभद्रीपणाला ! आधी देशात पाण्याचे नियोजन योग्यरितीने करा व मग चंद्रावर पाणी शोधा म्हणावे !
--
भारताची लायकी नसताना चंद्रावर चंद्रयान पाठविले ते काय कमी होते ? आता तर म्हणे अंतराळात स्वत:चे स्पेस स्टेशन उभारणार आहेत. इथे भारतातल्या रिकामटेकड्यांना भारतातच पत्ते पिसायला किती तरी मोकळी ठिकाणे आहेत तेंव्हा स्पेस स्टेशनची काय गरज ?
26 Jul 2019 - 12:25 am | जॉनविक्क
स्पेस स्टेशन फार भयंकर प्रकरण आहे दिवसाला करोडो रुपये खर्च होतात म्हणे ते कार्यन्वित ठेवण्यासाठी.
24 Aug 2023 - 8:13 am | चौकस२१२
खरोखर चांद्रयान मोहिमेचा काहीच फायदा नाहीये असे ज्यांचे म्हणणे आहे / असेल त्यांच्या साठी
अंतराळ प्रवास यासाठी झालेलया संशोधनातून काय लांब पाल्याचे फायदे होतात हे तुम्ही जरा बघा..
अंतराळ यान बांधणी तुन आणि शस्त्र निर्मिती यात अतिशय उच्च दर्जाचे उत्पादन आणि त्याचे डिजाईन लागते त्याचे तुन जे शिकायला मिळते त्याचा फायदा पुढे व्यायसायिक विमान वाहतूक धंदयासाठी होतो मग येतो क्रमांक वाहन / बोटी/ रेल्वे चा आणि मग बाकीची उत्पादने म्हणजे स्मार्ट फोन/ संगणक/ घरातील उपकरणे याशिवाय अनेक इतर " प्रोसेस इंजिनीरिंग " मधील सर्वसामान्यांना ना दिसणार्य गोष्टी ... + हवामान शास्त्र वैगरे
यात भूगोल/ रसायन/ भौतिक / यांत्रिकी / कच्चा माल ( मटेरियल सायन्स " या सगळ्यांचाच समावेश असतो हे हि दिसत नसेल
नॉलेज प्रोसेस इंजिनीरिंग वैगरे
पण या कडे अजिबात लक्ष ना देता " भारतातही गरीबी असताना हे धंदे भारताणें का करावेत असले वांझोटे प्रश्न उभे करणे / विचारणे हा खोडसाळपणा आहे "
नुकताच ऑस्ट्रेलयातील पॅसिफिक एयर शो वागण्याचा योग आला शेवटी त्यातील सुपर हॉरर्नेट चा थरार पाहून चंद्रपर्यन्त जाणारे यान बनवणे किती अवघड असेल याचा अंदाज आला ( भले अमेरिके एवढे "फाष्ट " नसेना का)
मेक इन इंडिया साठी भारताचे अभिनंदन ..
https://www.youtube.com/watch?v=Sz6SJWXk_pk
24 Aug 2023 - 7:43 pm | उन्मेष दिक्षीत
एकंदर तुमचे २ न्ही प्रतीसाद वाचता, मी जे लिहिले आहे ते तुमच्या डोक्याच्या बाहेरचे आहे !
- उन्मेष
25 Jul 2019 - 9:55 pm | उन्मेष दिक्षीत
सगळे 'इस्रो' च कौतुक करत होते. मी पण करतो. वेरी गुड. नथिंग अगेन्स्ट इट. मला याची दुसरी बाजू पण दाखवावी असं वाटलं.
पाठिंबा मिळेलच याची काहीच गॅरेंटी नव्हती. स्पेस प्रोग्रॅम चे फायदे/ तोटे कळाले त्यामुळं.
26 Jul 2019 - 10:55 am | मराठी_माणूस
https://epaper.loksatta.com/2257853/loksatta-nasik/26-07-2019#page/6/2
26 Jul 2019 - 4:47 pm | आदिजोशी
ज्यांना सिविलायझेशन चे वेगवेगळे टाईप्स माहिती आहेत त्यांना असे मूर्खासारखे प्रश्न पडणार नाहीत.
मिपावर असल्या जिलब्या पाडण्यापेक्षा अभ्यास वाढवा जरा. हवी तितकी माहिती आंतरजालावर उपलब्ध आहे.
26 Jul 2019 - 9:05 pm | उन्मेष दिक्षीत
माहिती आहेत त्यांना असे मूर्खासारखे प्रश्न पडणार नाहीत.
तुम्हाला माहिती आहेत. तर कशा आधारे? तर एका अॅस्ट्रोफिजिसिस्ट ने स्वतःची थिअरी मांडली आणि इंटर्नेट वर तुम्ही ती वाचली. एवढंच ? तुमचं स्व्तःचं रिसर्च असेल तर सांगा आवडेल माहिती घ्यायला. या थिअरीच्या मते आपण Type-0 मधे मोडतो म्हणे. तुमच्या पाहण्यात Type-1/Type-2 Cyborg सिविलायजेशन्स वगैरे आली असतील तर सांगा. मी चर्चा मागे घेतो.
The Kardashev Scale
.....To do so, the first step is to preserve our tiny home, extinguish war, and continue to support scientific advances and discoveries.
It was proposed by Soviet astronomer Nikolai Kardashev in 1964
हेच म्हणताय ना ? वाढवला अभ्यास. सायन्स फिक्शन वाटतय. त्या मात्र तुम्हाला जिलब्या वाटत नाहीत कारण अॅस्ट्रोफिजिसिस्ट ने (नुसतं) म्हटलय असं जे कि त्याचं काम होतं या थिअरिज मांडणे. उगाच आपलं इंटरनेट वर काहीही मिळतं म्हणून स्वतःच डोकं वापरायचं नाही असं आहे का ?
अणि हे लिहिलंय Wikipedia वर
>>At the current time, humanity has not yet reached Type 1 civilization status. Physicist and futurist Michio Kaku suggested that humans may attain Type I status in 100–200 years, Type II status in a few thousand years, and Type III status in 100,000 to a million years.[4]
-- Don't you find it Funny at all?
24 Aug 2023 - 7:43 pm | अहिरावण
काय ठरलं मग?
24 Aug 2023 - 7:46 pm | उन्मेष दिक्षीत
आपण कोण असतो ठरवणारे ? चंद्रयान - ३ लँड झाले आता ! पुन्हा आपापल्या कामाला लागायचे ! उद्देश फक्त एवढे सांगणे होता, की आउटर स्पेस रिसर्च इज ओन्ली अ हॉबी अँड नॉट नॅशनल एमर्जन्सी !
26 Aug 2023 - 12:17 pm | अहिरावण
>>उद्देश फक्त एवढे सांगणे होता, की आउटर स्पेस रिसर्च इज ओन्ली अ हॉबी अँड नॉट नॅशनल एमर्जन्सी !
ओक्के. मग जे हॉबी म्हणून चंद्रावर जाऊन पत्ते खेळणार आहेत त्यांना खेळू द्या.
स्वच्छ भारत मिशन ही नॅशनल इमर्जन्सी आहे, हातात झाडु घ्या आणि स्वतःचे घर, मेंदू आधी साफ करा.
26 Aug 2023 - 3:18 pm | उन्मेष दिक्षीत
ही नॅशनल इमर्जन्सी आहे
बरोबर, तेव्हा मला जे सांगीतले ते तुम्हीही करा, आणि मेंदू तर कायमच साफ ठेवा ( असला तर )
26 Aug 2023 - 7:10 pm | अहिरावण
आम्ही करतच आहोत. समस्या तुमच्यात(च) आहे
मोठे व्हा !!
26 Aug 2023 - 12:13 pm | सुबोध खरे
आउटर स्पेस रिसर्च इज ओन्ली अ हॉबी अँड नॉट नॅशनल एमर्जन्सी !
संपूर्णपणे अज्ञानातून केलेलं विधान
26 Aug 2023 - 3:38 pm | उन्मेष दिक्षीत
म्हटले, चंदामामा अब दूर के नही , चंदामामा अब टूर के !
त्यामुळे मोदी आणि मी यांनाच फक्त चंद्रयान मोहीमेचा उद्देश कळलेला आहे. ईट इज जस्ट टाइमपास ज्याच्यावर ९७८ करोड चंद्रयान-२ ला आणि ६०० करोड यावेळी !
26 Aug 2023 - 6:20 pm | सुबोध खरे
PSLV आणि SURYA ICBM,
minimal credible deterrence,
second strike capability
mad ( mutually assured destruction)
The Indian Regional Navigation Satellite System (IRNSS), with an operational name of NavIC (acronym for Navigation with Indian Constellation;
याबाबत थोडं वाचन करून घ्या.
पहा डोळे उघडतात का?
नाही तरी चालू द्या आत्मकुंथन
26 Aug 2023 - 7:36 pm | उन्मेष दिक्षीत
इट इज अबाउट सॅटेलाइट्स आणि डिफेन्स. त्याचा इथे काय संबंध ?
26 Aug 2023 - 7:43 pm | सुबोध खरे
हंगाशी
आता Dual-Use Technologies
Dual-Use of Missile and Space Technologies आणि
Global Positioning System Technology and Third World Missiles
हे पण वाचून घ्या
26 Aug 2023 - 7:45 pm | अहिरावण
असा थोडा थोडा अभ्यास देऊ नका. एकदम देऊन टाक...म्हणजे निदान चंद्रयान ४ पूर्ण होईपर्यंत अडकलेले राहतील.
26 Aug 2023 - 8:03 pm | सुबोध खरे
असा थोडा थोडा अभ्यास देऊ नका
असा थोडा थोडा अभ्यास करण्यासाठी मला काही दशके लागली.
त्यांना काही दिवस तरी लागतील ना?
तोवर मी पण थोडा अभ्यास करून घेतो.
26 Aug 2023 - 8:13 pm | उन्मेष दिक्षीत
आय वील गेट बॅक
26 Aug 2023 - 7:25 pm | अहिरावण
>>>त्यामुळे मोदी आणि मी यांनाच फक्त चंद्रयान मोहीमेचा उद्देश कळलेला आहे.
उत्तम ! चला मोदींनंतर कोण हा प्रश्न सुटला ! अभिनंदन !!
26 Aug 2023 - 8:01 pm | सुबोध खरे
ईट इज जस्ट टाइमपास ज्याच्यावर ९७८ करोड चंद्रयान-२ ला आणि ६०० करोड यावेळी !
३५ हजार कोटी रुपयांची S - ४०० हि क्षेपणास्त्र प्रणाली भारताने रशियाकडून कशासाठी विकत घेतली?
किंवा
५५ हजार कोटी रुपये खर्च करून २७२ सुखोई विमाने कशासाठी विकत घेतली? आणि आता तीच विमाने अद्ययावत करण्यासाठी ३५ हजार कोटी
IAF's Rs 35,000-crore plan to upgrade Su-30 fighter fleet
एवढे पैसे कशाला खर्च केले? दिवाळी ची रॉकेट उडवण्यासाठी एवढा खर्च म्हणजे अतीच झाले.
या पैशात किती शाळा कॉलेजे रुग्णालये बांधता आली असती असा प्रश्न कुणी का विचारत नाही?
चांद्रयान वर फुकटचा खर्च करणारे श्री मोदी याना काही अक्कलच नाही.
On 12 November 2007, representatives of the Roscosmos and ISRO signed an agreement for the two agencies to work together on the Chandrayaan-1's follow-up project, Chandrayaan-2.[18][19] ISRO would have the prime responsibility for the orbiter, rover and the launch by GSLV, while Roscosmos was to provide the lander.[20]
The Indian government approved the mission in a meeting of the Union Cabinet, held on 18 September 2008 and chaired by Prime Minister Manmohan Singh
हायला
डॉ मनमोहन सिंह पण मूर्खच असावेत. त्यांनी चांद्रयान -२ ला मंजुरीचा दिली नसती तर ९७० कोटी वाचले असते आणि चांद्रयान ३ चा प्रश्नच आला नसता( ६१५ कोटी).
( आठव्या हेन्री ने लग्नच केले नसते तर नववा हेन्री जन्मालाच आला नसता)
26 Aug 2023 - 8:57 pm | कर्नलतपस्वी
( आठव्या हेन्री ने लग्नच केले नसते तर नववा हेन्री जन्मालाच आला नसता)
सौ सुनार की.....
26 Aug 2023 - 8:48 pm | चित्रगुप्त
-- एवढा जबरदस्त कॉन्फिडन्स का काय म्हणतात ते असणारे एकमेव मिपाकर म्हणजे संक्षी सरजी. कुठे आहात तुम्ही सरजी ? तुम्ही असताना जी मौज मिपावर होती, ती आता नाही. आजच सकाळी मी बोटात बोट गुंफून निर्देहत्वाचा तडित अनुभव घेतलाय. त्यातून टाईमपास नव्हे तर 'कालातीत' होण्याचा अनुभव मिळतो.
28 Aug 2023 - 7:07 am | चौकस२१२
९७८ करोड चंद्रयान-२ ला
चला मनमोहन सिंगांना पकडू यात आणि जबाब विचारू कारण याची सुरवात २०१४ च्या आधी झाली असावी ना ?
27 Aug 2023 - 2:05 pm | उन्मेष दिक्षीत
ते ही वाचले
आता मी काय म्हणतो ते नीट वाचा
पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर कशाला जायला हवे ?
27 Aug 2023 - 3:07 pm | कंजूस
विरोधी पक्षांची भूमीका काय आहे?
त्यांनी काळे झेंडे दाखवले का?