मनातंल -आतलं.. एक विचार प्रवर्तक लेख.

प्राजु's picture
प्राजु in काथ्याकूट
6 May 2009 - 8:18 pm
गाभा: 

आपण मराठी संस्कृतीत वाढतोय याचा अभिमान जरूर बाळगूया, पण आपल्या मराठी पणा विषयी ओव्हर पझेसिव्ह नको होऊया. कारण याचा फायदा फक्त राजकारण्यांना होतो. राजकारण खेळण्यासाठी त्यांना नवे मुद्दे हवे असतात. उद्या मराठी विरूद्ध बिगर मराठी हा वाद मिटला तर काही नाही उरलं तर विलेपार्ले(पूर्व) आणि विलेपार्ले(पश्चिम)हाही वाद निर्माण करायला ही माणसे मागेपुढे पाहणार नाहीत..
अख्ख्या जगात दहशत वाद्यांनी थैमान घातलंय, जगाला आपल्या रक्तातला शिवाजी हवाय!
सारं जग 'ग्लोबल वॉर्मिंग" मुळे हैराण झालंय, जगाला आपल्या कोकणची हिरवीगार वनश्री हवी आहे!
जगातल्या एकाकी वृद्धांच्या सुरकुतल्या चेहर्‍यावर हास्य उमटवायला या जगाला आपले पुलं हवे आहेत!
सारं जग असमाधान्-तणाव्-नैराश्यानं ग्रासलंय- जगाला आपलं 'पसायदान' हवंय!

ही वाक्य आहेत नविन काळे यांच्या या लेखातली. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती चा अस्त होत आहे अशी चर्चा होते आहे. संस्कृती म्हणजे काय.. ती लोप पावते म्हणजे काय? याची उत्तरं या लेखातून मिळतील. आपण मराठी असल्याचा अभिमान नक्की आहे, पण त्याचं भांडवल करून राजकारणी लोक फायदा उठवतात आणि सामान्य माणूस मात्र स्वतःची बुद्धी राजकारण्यांच्या हाती गहाण टाकून मराठी-बिगरमराठी अशा वादात लढतच राहतो.
मला हा लेख खूप आवडला. नविन काळे यांनी मांडलेले मुद्दे खरंच विचार करण्याजोगे आहेत. एक विचार प्रवर्तक लेख असेच मी म्हणेन.

- प्राजु

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

6 May 2009 - 10:01 pm | प्रकाश घाटपांडे

अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणे हा स्थायी भाव आहे. काळाच्या उदरात काय गडप होईल हे सांगता येत नाही. २०८० साली हे चित्र मराठीचे नसले तरी जी भाषा जास्त बोलली जाते तीच टिकणार हे उघड आहे. कालाय तस्मै नम:
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

दशानन's picture

7 May 2009 - 3:32 pm | दशानन
चिरोटा's picture

7 May 2009 - 4:24 pm | चिरोटा

२०८० साली हे चित्र मराठीचे नसले तरी जी भाषा जास्त बोलली जाते तीच टिकणार हे उघड आहे

सहमत. शेकडो वर्षे पालटून ही ,अनेक आक्रमणे पचवूनही आपल्या भारतिय भाषा अस्तित्व टिकवून आहेत.२०८० साली मराठी कदाचित वेगळी असेल.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

अजय भागवत's picture

7 May 2009 - 7:13 pm | अजय भागवत

मला प्रतिसाद म्हणून ही एक फित येथे द्यायची आहे-

प्राजु's picture

7 May 2009 - 7:21 pm | प्राजु

चित्रफीत खूप आवडली अजय.
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

7 May 2009 - 10:06 pm | रेवती

एका चांगल्या लेखाशी भेट घडवल्याबद्दल प्राजुचे आभार!
खूप वर्षापूर्वी आदरणीय कै. शांताबाई शेळके यांचा लेख वाचला होता त्यातला संदर्भ आठवला.
त्यांचेही म्हणणे काहीसे असेच होते. भाषा, मग ती कुठलीही असो, आसपासच्या अनेक भाषांमधले शब्द
आपल्यात सामावून घेत पुढे जाते त्यामुळेच टिकते. भाषा बदलते पण नष्ट होत नाही.
वरील लेखामधेही असेच म्हटले आहे. भाषा ही प्रवाही असली पाहिजे.
आपल्याला मराठी नष्ट होउ द्यायची नसेल तर थोडे शब्द बदलले तरी चालतील पण मराठी टिकून राहील.

रेवती

धनंजय's picture

8 May 2009 - 10:37 pm | धनंजय

लेखाचा परिचय करून दिल्याबद्दल प्राजु यांना धन्यवाद.

बेसनलाडू's picture

8 May 2009 - 10:52 pm | बेसनलाडू

(आभारी)बेसनलाडू