मला बातमीपत्र आठवले की नवाकाळ वाचायची सवय आहे. म्हणुन आजचा नवाकाळ उघडला, म्हणजे पीडीएफ फाईल. बातम्या टीव्हीवर कींवा ऑनलाईन फारच कमी बघतो, बघितले तर फक्त विओन न्युज वगैरे तेही वरच्यावर.
पण काही वर्षांपुर्वी पेपर, टिव्ही पाहत, वाचत असल्याने नितीन देसाई हे नाव ऐकले होते कित्येक वर्षांपासुन. आजच्या नवा़काळ मध्ये ह्यांच्या आत्महत्येची हेडलाईन म्हणुन आलेली बातमी वाचुन मला धक्का बसला. चित्रपटांचे सेट तयार करण्यात नैपुण्य असलेल्या ह्या यशस्वी व्यक्तिने आत्महत्या करावी ह्याचे फार आश्चर्य वाटले. आणि कित्येक दीवसांनंतर हे नाव वाचायला मिळाले आणि तेही असे म्हणुन अचंबा वाटला.(?)
असो, तर ह्यांच्यावरती २४९ करोडचे लोन होते, मुळ लोन १५० करोड घेतले होते, ते वाढुन २४९ करोड झाले, म्हणजे खुप थकबाकी असणार. त्यांनी तारण म्हणुन त्यांच्या
४ मालमत्ता ठेवल्या होत्या. हे वाचुन मनात प्रश्न आला की मग अशीच वेळ आलेली तर त्या मालमत्ता विकल्या का नाहीत? १५० करोडचे लोन एखादा व्यक्ती चित्रपट तयार करण्यासाठी घेतोच कशाला आणि ह्यांनाच एवढे मोठे लोन मिळतेच कसे?
मला अण्णासाहेब पाटील महामंडळाचा (ह्याबद्दलही मी लेख लिहला होता) जो अनुभव आला आहे त्याने तर मला अजुनच कसेतरी झाले. असो तर लेख लिहायचा उद्देश हा की मला ह्य बातमीने फार धक्का बसला, ह्या घटनेशी संबंधीत ईतर काही माहीती ईथे मिळावी ही अपेक्षा. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
नितीन देसाई ह्यंची आत्महत्या!
गाभा:
प्रतिक्रिया
3 Aug 2023 - 5:07 pm | अमर विश्वास
कला दिग्दर्शक म्हणून मोठा माणूस ...
पण आर्थिक व्यवहार कधीच जगासमोर येणार नाहीत ... त्यामुळे आत्महत्येचे खरे कारण कळण अवघड आहे
3 Aug 2023 - 5:23 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
का बुवा? सध्याच्या काळात ते येतातच. कर्ज एडेल्विस कंपनीकडुन घेतले होते.
Rashesh Shah and his firm to be probed over art director Nitin Chandrakant Desai’s suicide: Fadnavis
https://indianexpress.com/article/cities/mumbai/rashesh-shah-probe-art-d...
जास्त तगादा लावला असेल म्हणून मग आत्महत्या केली असावी.
3 Aug 2023 - 5:17 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
नितीन ह्यांचा स्टुडियो काही वर्षपुर्वी आगीत जळाला होता रे शानबा , असे वाचले होते. त्यानंतर त्यांनी नविन स्टुडियो उभारण्यासाठी कर्ज घेतले होते.
अरे बाबा, त्यांचा त्या क्षेत्रातील अनुभव पहा ना. परिंदा(१९८९) पासुन ते कला दिग्दर्शनात होते. कहाणी कशीही असो, पण १९४२ लव्ह स्टोरी/ह.दि.चु.सनम्/देवदास्/लगान ह्यांचे भव्य सेट्स्,मांडणी अफलातून होती. बालगंधर्वमधील कला दिग्दर्शनही त्यांचेच होते.
कहाणी/संगीत वगैरे जुळुन आले चित्रपट(विशेष करुन हिंदी) करोडोची कमाई करतात. गुंतवणुकीच्या २० ते ३०% परतावा मिळतो.
3 Aug 2023 - 5:32 pm | चौथा कोनाडा
मराठी -हिंदीच नव्हे तर जागतिक पातळीवरच्या सिनेमातले कला-दिग्दर्शन क्षेत्रातील मराठी अस्मिता मिरवणारे नाव !
त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे !
प्रतिभावान विश्वकर्म्यास भावपुर्ण श्रद्धांजली !
VFX / कृबु (AI) क्रोम तंत्रज्ञान त्यांना आर्थिक फटका बसला असावा का ?
काळाची अर्थात तंत्रज्ञानाची पावले त्यांना ओळखता आली नसावीत ?
3 Aug 2023 - 6:00 pm | कर्नलतपस्वी
काळाच्या पडद्याआड गेला.
कलाकार जास्त संवेदनशील आणी हिशोबात कमी पडत असावेत. नाहीतर कित्येक कर्ज बुडवे विदेशात पळुन गेलेत.
दुःखदायक आहे.मृतात्म्यास विनम्र श्रद्धांजली.
3 Aug 2023 - 6:11 pm | चित्रगुप्त
काही काळापूर्वी 'रंगा येई वो' मधे देसाईंचा इंटरव्ह्यू बघून भारल्यासारखे झाले होते.
मोठे कर्ज वगैरे तर असेलच, पण असे यशस्वी लोक नेहमीच 'वसुली' वाल्या गुंडांना आकर्षित करत असतात. त्यापैकी तर हा प्रकार नव्हे ? तसेच "मिलॉर्ड, ये खुदखुशी नही, कत्ल है" असे तर नाही ?
-- एका प्रतिभासंपन्न कलावंताचा आकस्मिक मृत्यु चटका लावून गेला.
मृत्य न म्हणे देसाई । मृत्य न म्हणे वेवसाई ।
मृत्य न म्हणे ठाई ठाई । पुंड राजे ॥
मृत्य न म्हणे हा विख्यात । मृत्य न म्हणे हा श्रीमंत ।
मृत्य न म्हणे हा अद्भुत । पराक्रमी ॥
( श्री दासबोध, दशक तिसरा, समास नववा : मृत्युनिरूपण)
5 Aug 2023 - 11:26 am | रामचंद्र
यावरूनच बहुतेक गदिमाकृत
मृत्यू न म्हणे हा नेहरू
मृत्यू न म्हणे हा डेंगरू
मृत्यू न म्हणे हा कांगारू
ऑस्ट्रेलिया देशाचा
हे आठवलं.
3 Aug 2023 - 6:38 pm | टर्मीनेटर
चित्रपटसृष्टीत येण्याआधी ज्यांचे सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी उमेदवारी केली होती त्या व्यक्तीमुळे परिचय झालेलया व्यक्तींपैकी एक असे हे व्यक्तिमत्व. राजीव गांधींच्या लाल किल्यावरील भाषणाच्या सेटचे कलादिग्दर्शन ज्यांनी केले होते त्या वयोज्येष्ठ व्यक्तीने, त्यावेळचे त्यांचे सहाय्यक असलेल्या नितीन देसाईंची प्रत्यक्ष ओळख काही वर्षांपूर्वी करून दिली होती. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर टीका करणे अत्यंत चुकीचे असले तरी, "मी आणि माझे" असा (संकुचित) दृष्टिकोन ठेवल्यास मोठे व्यवसाय यशस्वी होत नाहीत एवढेच सांगून माझे श्रद्धांजलीपर दोन शब्द संपवतो!
नितीन देसाईंना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
3 Aug 2023 - 7:15 pm | कंजूस
श्रद्धांजली.
बाकी व्यवसाय वेगळा आणि कला वेगळी.
3 Aug 2023 - 9:01 pm | राजेंद्र मेहेंदळे
लालबागच्या राजाची आणि पुण्याच्या बाबु गेनु मंडळ गणपतीची सजावट ही त्यांची खासियत होती.
कर्ज प्रचंड होते, समजु शकतो, पण सगळे विकुन ते फेडता नसते आले? बॉलिवुड लॉबिंगमुळे स्टुडिओ पाहीजे तसा चालत नव्हता, या मागे कोण असावे? ईतक्या मोठ्या ओळखी--मोदी/शहा/ठाकरे--कोणीच मध्यस्थी वगैरे करुन काही मार्ग काढु शकले नसते का? एकदम आत्महत्या का बरं?
3 Aug 2023 - 9:35 pm | चित्रगुप्त
आत्महत्येपूर्वी स्टुडियोतील जमिनीवर धनुष्यबाणाची आकृती काढून त्याच्या मधोमध फास लावून घेतला, असे वाचले.
'धनुष्यबाण' ही कुणाचे निवडणूक चिन्ह किंवा लोगो वगैरे आहे का ? असल्यास त्याचा काय संबंध असावा ? सुशांतसिंगासारखे काही रहस्य असावे का ? असल्यास त्याचा योग्य दिशेने तपास होईल का ?
रात्री मदिरापान केल्याने (अर्थात तशी सवय असल्यास) सारासार विवेक लयाला जाऊन भावनेच्या भरात असा निर्णय घेतला असावा का ? आत्महत्या ही डिप्रेशनची अंतिम परिणिती असते असे मानले जाते. त्यांना तसे डिप्रेशन आलेले असल्याचे परिवार आणि मित्रांना ठाऊक होते का ? 'ये खुदकुशी नही, कत्ल है' ची शक्यता कितपत ?
'सगळे विकून कर्ज फेडणे' वगैरेविषयी आर्थिक तज्ञ सांगू शकतात, पण त्यातून होणार्या संभावित 'नामुष्की' चा धसका जबर असणार.
4 Aug 2023 - 9:15 am | कंजूस
कर्ज वसूली
मोकळ्या जमिनीचे खूप पैसे येतील. कर्ज फिटेल.
4 Aug 2023 - 10:39 am | टर्मीनेटर
माझे बरेचदा त्या रस्त्यावरुन जाणे-येणे होते. गेल्या काही वर्षांपुर्वी रिलायन्स एंटरटेंमेंटचे एन. डि. स्टुडीओ बरोबर काहीतरी जॉईंट व्हेंचर झाले आहे हे तिथले बोर्ड्स बघुन लक्षात येते. त्यांच्यातल्या व्यवहाराचे तपशील माहिती नाहित, पण अनिल अंबानी ती जमीन हाततुन जाऊ देतील अशी शक्यता वाटत नाही त्यापेक्षा देसाईंच्या वारसदारांना मोबदला देउन ते हा स्टुडीओ / जमिन ताब्यात घेण्याची शक्यता अधिक वाटते.
4 Aug 2023 - 8:11 pm | मुक्त विहारि
हिंदी सिनेमांची आर्थिक सूत्रे वेगळीच असावीत आणि त्यांची उत्तरे पण अनंत असावीत...
4 Aug 2023 - 9:19 pm | चित्रगुप्त
'हिंदी सिनेमांची आर्थिक सूत्रे' याच क्षेत्रात कार्यरत असलेला एक माणूस बरेच वर्षांपूर्वी ट्रेनीत भेटला होता, त्याने बरीच माहिती सांगितली होती. त्यातला एक टप्पा म्हणजे बराच काळ ही सुत्रे दुबईतून हलत आणि त्यांना हवे तसेच सिनेमे बनवावे लागत (आठवा 'सबका मालिक एक' हे कोणत्यातरी सिनेमात परेश रावलच्या तोंडी वारंवार येणारे वाक्य)-- उदाहरणार्थ पोलीस भ्रष्ट असलेले दाखवणे, डॉन मंडळींची मोठमोठी साम्राज्ये, भर कोर्टात मुडदे पाडणे, शेवटी नायिका वा नायक स्वतःच रक्तरंजित 'बदला' घेतात वगैरे. त्याने सांगितल्याप्रमाणे नंतरच्या काळात सिनेमा निर्मितीसाठी बँका कर्ज देऊ लागल्या वगैरे.
एकदा तर रेल्वे प्रवासात एक वसुलीवाला गुंडच शेजारी बसला होता, (तो कोणत्यातरी बाबा-स्वामीच्या दर्शनाला जात होता) त्याने सुद्धा मोकळेपणाने त्याच्या धंद्याविषयी सांगितले होते (माझा 'वेष असावा गबाळा' बघून सगळे सांगायला काही डेंजर वाटत नसावे)
-- मला पण कोणाशी नवीन ओळख झाली की त्यांची इत्थंभूत चवकश्या करण्याची खोड असल्याने शेतकर्यांकडून 'कर्जवसुली' करण्यातल्या अडचणी, 'मच्छर भगाओ' उपकरणे कितपत सेफ असतात, गावोगावचे छोटे किराणावाले दिल्लीच्या 'खारी बावली' मधून कशी खरेदी करतात, गिरणीतून निघणारे कापड रंगवण्याचे-प्रोसेसिंगचे तंत्र, अमूक तमूक व्रताच्या पुस्तक प्रकाशनातील धंद्याचे गणित वगैरें अनेक गोष्टींबद्दल ज्ञानप्राप्ती होऊन 'सफर का टैम आराम से गुजर' झालेला आहे. त्याशिवाय अंतरराष्ट्रीय विमान प्रवासात काही विवाहित स्त्रियांच्या तोंडून ऐकलेल्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग लिहायचे तर तो एक लेखच होईल. मला खरेच आश्चर्य वाटते, की अनोळखी लोक इतक्या मोकळेपणाने माझ्याशी कसेकाय बोलतात. असो. बरेच विषयांतर झाले.
-- बहुतांश कलावंतांना आर्थिक विषयात गति नसल्याने त्यातली गुंतागुंत समजणे कठीण जात असावे, त्यातून भरीस घालणारे खुषमस्करे, मोठ्या फायद्याचे प्रलोभन, वसुली गँगला हप्ते द्यावे लागणे वगैरे दुष्चक्रात ते अडकत असावेत. (हा आपला माझा अंदाज -- हल्ली मराठीत खुशाल "कॅटरीनाचा कातिल अंदाज" वगैरे लिहीले जाते, तसला 'अंदाज' नव्हे बरे)
5 Aug 2023 - 7:04 am | मुक्त विहारि
ऐकीव बातम्या भरपूर आहेत ...
त्यामुळे, चित्रपट गृहात जाऊन, हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे....
5 Aug 2023 - 11:53 am | शानबा५१२
सर्वांचे प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. प्रतिक्रिया वाचुन खुपसे माहीती पडले व काहीठीकाणी खात्री झाली.
@चित्रगुप्त ; आपण जे धनुष्यबाणचे लिहले होए ते पहीले मला मजेत लिहलेय असे वाटले पण नंतर मी खरच ते बातमीत वाचले. मी टिव्ही कधीह बघत नसल्याने शिळ्या बातम्या नवा़काळ म्हणुन. अग्रलेखाचे बादशहा आहेत ते म्हणलं!
आज नवाकाळ मध्ये पाचजणांवर गुन्हा दाखल केल्याची बातमी वाचलि, अगदी त्यांच्या पत्नीवरही 'नितीन देसाई' हे चित्रपट क्षेत्रातले खुप मोठेनाव होते ह्यात शंका नाही. वरुन ते कोकणमध्ये जन्मले होते. ठाण्याला त्यांचा खुप वावर असल्याचे आठवते (मी तेथे रहायचो) खासकरुन राजकरणी लोकांशी.
ईथे फार रसिक, कविता, चित्रपट, गाणी आवडणारे लोक आहेत, कुणी कधीच अरुण दाते ह्यांच्या दुर्दैवाबद्दल चर्चा केली नाही ह्याचे आश्चर्य वाटते, म्हणुन मी लिहेन आज कींवा उद्या त्याबद्दल.
असो ह्या मृत्युचे खरे कारण समजावे असे वाटते, पण ईथे कुठेतरी 'उन्नाव बलात्कार केस' कुणीतरी अनुभवलेला आहे हे विसरुन चालणार नाही.
5 Aug 2023 - 2:02 pm | कर्नलतपस्वी
कोव्हीड मधे त्यांचा मुलगा फुटपाथ वर मरणासन्न अवस्थेत आढळला. त्याच्या बद्दल ऐकीव माहीती. ती इथे लिहीणे प्रशस्त वाटत नाही. आपण माहीती असल्यास जरुर लिहा.
5 Aug 2023 - 12:39 pm | चित्रगुप्त
@ शानबा५१२: अरूण दातेंबद्दल अवश्य लिहावे. माझी त्यांचेशी प्रत्यक्ष भेट त्यांचेच घरी झालेली होती, तसेच त्यांचा इंदूरचा एक बालमित्रही त्यांच्याबद्दल आठवणी सांगत असे. मात्र त्यांच्या दुर्दैवाबद्दल वगैरे काहीच ठाऊक नाही.
5 Aug 2023 - 12:49 pm | विवेकपटाईत
कर्ज घेऊनी महाल बांधला
कर्जापोटी तो बुडाला.
जे कधीच नव्ह्ते
त्याचे दुःख कशाला.
मायेच्या पाशात अडकुनी
विनाकारण जीव दिला
बाकी आपल्या पराजयाचा आणि आत्महत्येचा दोष दुसऱ्यांना देणे परमेश्वराच्या दरबारात हा निश्चितच गुन्हा आहे .
5 Aug 2023 - 2:39 pm | कर्नलतपस्वी
त्यालाच कळते.
यापेक्षा मोठ्ठी कर्जे बुडवून पळून गेल्याची उदाहरणे आहेत. यांना सुद्धा परदेशात जाऊन राहाता आले असते.
खरे काय खोटे काय बाहेर येईल का? याबद्दल शंका वाटते.
कठीण समयी कोणी कामास का आले नाही? असे अनेक प्रश्न आहेत.
उठतील बसतील हसून खिदळीतलं यांच्या सारखा कांकणभर सरस कलाकार पुढे येईल. टोकाच्या घेतलेल्या निर्णयांमुळे कै नितीन देसाई व कुटुंबातील सदस्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे.
6 Aug 2023 - 8:18 am | शेर भाई
कुणी तरी म्हणून गेलय कि जेव्हा आपले पोट भरलेले असते तेव्हाच असल्या चर्चा कराव्यात. नाहीतर गुमान आपल्या घाण्याला जुंपून घावे.
मी म्हणतो का सुचू नयेत? यामुळेच तर "तुम होती तो............" सारख्या अजरामर (माणूस मर्त्यच आहे) गोष्टी निर्माण होतातच नाही.
6 Aug 2023 - 9:17 am | कंजूस
मुलाखत
माझा कट्टा
https://youtu.be/l_NJXPeeeck
7 Aug 2023 - 2:09 am | चित्रगुप्त
आत्महत्येपूर्वीच्या ऑडिओ क्लिपमधील नितीन देसाईंचा संवाद
https://www.youtube.com/watch?v=bYBIEL7UiiI
(मी पूर्ण ऐकलेले नाही, खखोदेजा)
7 Aug 2023 - 5:56 pm | चौथा कोनाडा
ही बातमी पण हळू हळू विरून जाईल !
हा तोच लोकशाही मराठी टीव्ही चॅनेल आहे ज्याने किरीट सोमैय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओज प्रचंड बोंबाबोंब केली होती. छापील वृत्तपत्र जगाने या बातमी ला फारसा थारा दिल नव्हता ! फक्त लोकशाही मराठी टीव्ही चॅनेलने आठवडा भर तेच ते दळण दाखवत मोठा दंगा केला होता .... पुढे काय झाले ? त्याचे पुरावे कुठे गेले ? मांडवली झाली असेल का ? कोण असतात या चॅनेलचे मालक ? सामान्य लोकाना मूर्ख बनवण्याचा धंदा !
11 Aug 2023 - 11:21 am | कपिलमुनी
अशी अर्धवट बातमी ऐकून लिहू नये..
ते सगळे पुरावे पोलिसांकडे दिलेत , पोलिसांनी व्हिडिओ मोर्फ नाहीत हे पण तपासले आहे. विधानसभा , विधान परिषद दोन्ही ठिकाणी यावर चर्चा झाली आहे. अजून त्या चॅनेल ने काय करायला हवे?. सुशांत सिंग सारखे दळण दळायला हवे का .?
आता भाजप सरकार आपल्याच नेत्यावर कारवाई कसे काय करेल ??
मग खोटे आरोप करायला नवीन माणूस शोधायला लागेल..
11 Aug 2023 - 8:37 pm | चौथा कोनाडा
अशी माहिती प्रेक्षकांपर्यन्त परिणाम कारक पद्धतीने पोहोचत नाही तो पर्यन्त केलेले आरोप फुकाचे होते असेच मत बनणार.
इतर कोणत्या चॅनेल ला काहीच पुरावे मिळाले नसतील का ?
या बाबतचा पाठपुरावा (अधून मधून करणे ही त्याच चॅनेल ची जबाबदारी नाही का ?
मा मुमंत्री साहेबांनी चौकशी केली जाईल असे आदेश दिल्याचे वाचले होते.
महिलांवरील अत्याचारचे शोषणाचे आरोप गंभीर होते .. पुढे कुणीच कसे महणजे विरोधी पक्ष, महिला नेत्या यांचे काही भाष्य ऐकिवात आले नाही !
या बद्दल कोणी खटला दाखल केला आहे का .. किंवा सुनावणी सुरू होणार का ? यावर जास्त प्रकाश टाकलात तर बरे होईल !
8 Aug 2023 - 3:06 am | चौकस२१२
सनसनाटी बातमी ... कारेन हा एकमेव उद्योग दिसतोय या "चॅनल" चा हा आवाज त्यांचाच स्वतःचा आहे का ?शंका वाटते नाट्यमय रूपांतर वाटतंय
7 Aug 2023 - 5:41 am | कंजूस
मुलाखत विठ्ठल कामत या हॉटेल व्यावसायिकांची आहे. विषय हाच होता की धंद्यात झालेलं कर्ज फेडणे. आत्महत्या हा उपाय आहे का,इतर काय उपाय.
मोठ्या उद्योजकांमध्ये दुसऱ्या उद्योग न करणाऱ्या आमच्यासारख्यांनी मत देणे आणि इतर उद्योजकाने मत देणे यात फरक होतो. कामत तर अशा कर्जातही अडकले होते. त्यांनी खूप मुद्दे सांगितले. शिवाय ते देसाईंना ओळखतही होते.
बाकी काही गोष्टी इथे लिहिता येत नाहीत.
8 Aug 2023 - 9:21 am | निनाद
प्रत्येकाला काही वेगळ्या बाजू असतात.
या संदर्भात https://www.maayboli.com/node/47097 हा धागा वाचनिय आहे.
मुखवट्याआडचे चेहरे भलतेच काही सांगतात असे वाटते.
7 Aug 2023 - 8:01 am | कंजूस
विचित्र घटना आणि सरकारने ते प्रकरण का घ्यावं?
कर्ज करून ठेवलेले स्टुडिओ वगैरे सरकारने अंगावर का घ्यावेत? कलाकारांना मदत इत्यादी ठीक पण इतके कोटींची? प्रत्येक कलाकार मागे लागेल.
7 Aug 2023 - 9:13 am | शानबा५१२
@चित्रगुप्त : त्या क्लीप साठी खुप खुप धन्यवाद. पत्रकारांनी अशी क्लीप मिळवणे म्हणजे खुप आश्चर्यकारक वाटले मला. त्यांच्या मुलीच्या बीबीसी मराठी वरील मिडीयाला उद्देशुन केलेला संवाद (https://www.youtube.com/watch?v=UsQOIPfE0ow&ab_channel=BBCNewsMarathi) व हे क्लीप...............
असो.....ऑफेन्सिव्ह मोड मध्ये माणसाने सारखेच रहावे असा जमाना आहे, अशा परीस्थितीत तर नक्कीच. आणि ते दाते-पुराण नको...जास व्हल!
7 Aug 2023 - 9:22 am | विवेकपटाईत
आत्महत्या करणाऱ्यांशी मला मुळीच सहनभूती नाही.२०१६ चां दिवाळखोर कायदा नसता आला तर स्व .नितीन देसाईने हे कर्ज पचवून टाकले असते. तुम्ही मूळ तर सोडा व्याज ही देणार नाही तर देणारा तुमच्या मागे लागेलच. कायद्यानुसार वसूली करण्याचा प्रयत्न करणे गुन्हा नाही. बाकी सरकारचे काम स्टुडिओ चालविणे नाही. सरकारने अडीचशे कोटी खर्च करून तो घेतला तर घोटाळ्याचा आरोप सरकारवर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
8 Aug 2023 - 3:03 am | चौकस२१२
झाले ते अर्थातच दुर्दवी झाले ...
पुढील दुर्दैव म्हणजे अश्या मामल्यात दोन्ही बाजू ना विचारात घेता काही लोक नेहमीचे खेळ खेळत आहेत
- मराठी गुजराथी वाद काढणे ( जणू कर्ज देणारा मराठी असता तर त्याने जणूकाही दिलदार पाने करंज माफ केलं असते )
-वित्तपुर्वठा देणारी कंपनी म्हणजे गुन्हा त्यांचाच असणार असे गृहीत धरणे
- यालाही सरकारच कसे जबाबदार?
- आज हजारो कंपनी कर्ज घेतात ते धंदा वाढवण्यासाठी काही ठरतात काही बुडतात पण लोकं भावनेच्या भरात एकांगी का बोलू लागतात !
ऑर्किड हॉटेल चे मालक विठ्ठल कामत पण त्रासातून गेले होते फेडले ना पैसे
असो देसाईंना श्रद्धांजली पण ते मराठी असल्याचे भांडवल करू नये लोकांनी स्वतःची पोळी भाजण्यासाठी
8 Aug 2023 - 9:12 am | कंजूस
कर्ज देणाऱ्या माणसाच्या मागे चौकशी लावून दिली की मिळाला मराठी माणसाला न्याय. पत्राचा डेवलपिंगचा घोळ कुठवर कोणी नेला? त्यांना (२७८) घरं द्या बांधून पहिली.
8 Aug 2023 - 9:13 am | कंजूस
दुरुस्ती.
*पत्राचाळ*
8 Aug 2023 - 11:53 am | शानबा५१२
@चौकस२१२ -
पोईंट छे!
आणि जस काय मराठी नाव फसवणुकीशी जोडलेच जात नाही. डी.एस. कुलकर्णी.
@कंजुस
त्यांचाबद्दलचे विविध युट्युब वाहीन्यांनी पोस्ट केलेले व्हीडीओज बघा. ह्यात आहे का गुजराती-मराठी वाद. ती सर्व बाधित मराठी मंडळी अगदी कळकुतीला आलेत वर्षानुवर्ष. काहींनी तर दागिने विकुन...........असो. कसल न्यायालय, कसल्या चौकश्या, कसले राजकारण न काय!
8 Aug 2023 - 5:40 pm | कंजूस
कर्ज परत करण्याबाबत एक मुद्दा कामतांनी बरोबर सांगितला. कर्जाचा थोडा भाग जरी परत करत गेलात तरीही पत विश्वसनीयता राहते.
DHFL ने बिल्डरला लगेच मोठं कर्ज दिलं,मग त्यांनी प्रापर्टी डेवलप करणाऱ्या कडे पास केलं. त्याने पत्राचाळच्या भाडेकरूंना शेंडी लावली. (थोडी तुटक माहिती देत आहे.) तर झालं काय की बातमी फुटली DHFL संशयात. माझ्या इन्वेस्टमेंट एजंटने सांगितले की एफडी लवकर काढून घेऊ. काय आश्चर्य फॉर्म दिला आणि दुसरे दिवशी मला इसीएसने मुद्दल (कमी केलेला रेटने कापून) बँक अकाऊंटला आलेसुद्धा. ते कापलेले पैसे एजंटने मला लगेच चेकने दिलेही. म्हणजे बघा विश्वास कसा वाढत जातो. हा मुद्दाही कामतांनी सांगितला. देसाईंचं नाव (brand name)होतंच मग त्यांनी ती जागा विकून टाकली आणि दुसरीकडे स्वस्तात घेतली असती तरी धंदा येतच राहिला असता.
9 Aug 2023 - 2:35 pm | चौथा कोनाडा
मुद्दा अ ति शय समर्पक.
पहिला स्टुडीओ उभा करण्यासाठी जन्म घालवला त्यांनी .. हे रोपटे एका ठिकाणहुन काढून दुसरी कडे रुजवणे एवढे सोपे असेल ?
10 Aug 2023 - 3:51 pm | कंजूस
१)जागा दूर गेली की स्थानिक दबाव(असला तर) निघून जातो. कामगार नवीन जागेत जातातच असं नाही.
२)कर्ज कमी होतं
३)बांधलेल्या इमारती,वाडे हे दीडशे ,साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक घटनांसाठी योग्य होते तसलेच सिनेमे येतील असं नाही.
४)तमिळ,तेलगू वाल्यांनी धार्मिक ठिकाणांच्या हॉटेलांमध्ये भरपूर कमवले आहे,कमवत आहेत ते पैसे स्टुडिओत गुंतवले असतील. आणि त्याची चलती आहेच. चोप्रांचं महाभारत सुरू झाल्यावर तेलगूंनी नंतर विश्वामित्र लगेच बनवलं आणि ते अधिक चांगलं होतं.
10 Aug 2023 - 7:18 pm | सुबोध खरे
किंमत फक्त जमिनीची आली असती.
तीसुद्धा एवढी मोठी जमीन जी तारण म्हणून वित्त संस्थेकडे अडकलेली आहे ती एकरकमी कोण कशाला घेईल
त्यावर असलेले हत्ती, रस्ते, राजवाडे इ आता कोण विकत घेणार होतं?
कवडीमोलाने विकावे लागले असते ते सुद्धा कुणी घेतले असते तर अन्यथा या वस्तु नेण्यासाठीच पैसे द्यावे लागले असते.
जमीन विकून कदाचित ६०-७० कोटी आले असते. वरचे पैसे कसे आणि कुठून आणणार?
11 Aug 2023 - 7:18 am | कंजूस
बरोबर.
कोणत्यातरी एका टप्प्यावर 'नवीन सिनेमासाठी नवीन इमारती' हे वाढवत नेले असावे. तेच परत करताना 'अगोदरच्या इमारतींचं काय हा विचार केला नसावा.
इमारती बांधकाम खर्चाच्या दहा टक्के (असं धरू) रक्कम सिनेमा निर्मात्याने दिल्यावर उरलेले नव्वद टक्के assets झाले. पण त्यानंतर पुढील दोनतीन वर्षे कुणीच त्यांचा वापर न केल्यास ते dead assets झाले. म्हणजे तोटा.
कामत मुलाखतीत म्हणतात "मलाही कित्येक गोष्टी कळत नाहीत पण त्यासाठी त्या जाणणाऱ्या लोकांचा सल्ला घेतो. "
तर अशी परिस्थिती आल्यावर भावनात्मक गुंतवणुकीत न अडकता वळणनिर्णय आवश्यक असतात.
11 Aug 2023 - 10:34 am | शानबा५१२
ह्या प्रकरणाबाबत एक स्फोटक मुलाखत म्हणता येईल. लिंक देण्याचे अजुन एक कारण हे की, काही वर्षांपुर्वी एकदा एका व्यक्तिकडुन मी एक नाव ऐकले होते, त्यांचा आकडा होता साडे सहा लाख रुपये. ज्यांचे पैसे डुबले होते ते स्वःता माझ्याशी बोलत होते....ही मुलाखत बघुन मला ते आठवले, मुलाखतमध्ये जे बोलतायत त्यात त....असो.
https://www.youtube.com/watch?v=VW64n-9su40&ab_channel=MuddaBharatka