फलज्योतिष्य कुठे जन्मले?

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
31 Jul 2023 - 1:37 pm
गाभा: 

फलज्योतिष्य हे भारतात निर्माण झालेले नसून ते इजिप्त किंवा ग्रीस या देशांमध्ये पहिल्यांदा जन्माला आले. त्यानंतर काही ग्रीक अभ्यासक भारतीय राजांकडे आले त्यांनी आपले ज्योतिषी विषयक ग्रंथ सादर केले त्यानंतर त्या ग्रंथांचे संस्कृतमध्ये रूपांतर करण्यात आले अशा प्रकारे फलज्योतिष हे भारतात आले. पण काही भारतीयांचाच असा समज आहे की फलज्योतिष हे भारतातच निर्माण झाले आहे. तर फलज्योतिष हे नक्की कुठे जन्मले याचा खल करण्यासाठी आणि त्यातून काही ठाम निष्कर्ष काढण्यासाठी हा धागा काढला आहे.खाली काही लिंक आणि एका पुस्तकातील फोटो जोडत आहे जाणकारांनी यावर आपले मत द्यावे.

https://youtu.be/FvMEEn3Lhx4

प्रतिक्रिया

भारतात,चीनमध्ये,असिरिया इथे सुरू झाले. नंतर एकमेकांच्या कल्पना मिसळल्या.

उपयोजक's picture

31 Jul 2023 - 2:46 pm | उपयोजक

चीनमध्ये,असिरिया

काही पुरावे?

उपयोजक's picture

31 Jul 2023 - 2:00 pm | उपयोजक

f

उपयोजक's picture

31 Jul 2023 - 2:09 pm | उपयोजक

f1

उपयोजक's picture

31 Jul 2023 - 2:11 pm | उपयोजक

उपयोजक's picture

31 Jul 2023 - 2:30 pm | उपयोजक

फ१

उपयोजक's picture

31 Jul 2023 - 2:31 pm | उपयोजक

f2

उपयोजक's picture

31 Jul 2023 - 2:32 pm | उपयोजक

f3

उपयोजक's picture

31 Jul 2023 - 2:40 pm | उपयोजक

४

उपयोजक's picture

31 Jul 2023 - 2:41 pm | उपयोजक

5

उपयोजक's picture

31 Jul 2023 - 2:43 pm | उपयोजक

६

उपयोजक's picture

31 Jul 2023 - 2:44 pm | उपयोजक

७

तुम्ही जे ग्रीक/यवन म्हणता ते व्यापारी होते. त्यांनी असेरिअन लोकांचे ज्योतिष इकडे पोहोचविले. कोणत्या राशीचा स्वामी कोणता ग्रह हे दाखवणारे शिल्प अजूनही आहे. ( Time Life books series मधील stars ,Time ही पुस्तके पाहावीत)
भारतीय ज्योतिष हे चंद्राचा सत्तावीस नक्षत्रातून प्रवास यावर आधारित आहे. जन्मकाळी चंद्र कोणत्या नक्षत्राच्या कोणत्या चरणात (४चरण) यावर महादशा आणि साडेसाती ठरते. हा विचार आपलाच फक्त.

चीनमध्ये हूऐनसआंगचे भविष्य लहानपणी वर्तवले होते. 'हा गाढवावर बसून दक्षिणेकडे मोठ्या प्रवासाला जाईल. '
गौतम,सिद्धार्थाचे कपिलवस्तू/लुंबिनीमधले भविष्य माहिती असेलच.

कर्नलतपस्वी's picture

31 Jul 2023 - 5:54 pm | कर्नलतपस्वी

गती नाही. भविष्यात डोकवायचा प्रयत्न करत नाही.
पण सामान्य ज्ञान म्हणून वाचायला नक्कीच आवडेल.

तुमच्या दृष्टीने फलज्योतिषाचा उपयोग काय?
तुम्ही फलज्योतिषाचा उपयोग भाकीते करण्यासाठी करता का? ती भाकिते बरोबर येतात का?
ती बरोबर येत असली किंवा येत नसली, तर त्याचा फलज्योतिष भारतीय आहे किंवा नाही याच्याशी काही संबंध आहे का?

ती बरोबर येत असली किंवा येत नसली, तर त्याचा फलज्योतिष भारतीय आहे किंवा नाही याच्याशी काही संबंध आहे का?

-- निव्वळ जिज्ञासेपोटी शिकलेल्या, जणलेल्या, केलेल्या अनेक गोष्टींतून मानवानला असंख्य उपयोगी गोष्टींचा बोध झालेला आहे/शोध लागलेला आहे.

कर्नलतपस्वी's picture

2 Aug 2023 - 9:15 am | कर्नलतपस्वी

काम होत नाही.त्यावर उपाय सात पावले मागे यायचे व मगंच पुढे जायचे.

असेच फलज्योतिष म्हणावे का?

कर्नलतपस्वी's picture

2 Aug 2023 - 9:10 am | कर्नलतपस्वी

दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

अंत उन्‍नतीचा पतनीं होइ या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्‍निंच्या फळांचा?

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा

जर गदिमा च्या या अजरामर गीत प्रमाणे सर्व पूर्वनियोजित आहे तर फलज्योतिषाने सांगितलेले भविष्य आणी हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज एक सारखाच म्हणावा लागेल.

यंदा पाऊस समाधानकारक असेल पण अल निनो सक्रीय झाल्यास दुष्काळ संभवतो.

चित भी मेरी और पट भी मेरा.

या मुळे भामट्यांचे फावते.

असे जर असेल तर फलज्योतिष कुठे जन्मले त्याचे संगोपन कुठे झाले ही चर्चा निरर्थक म्हणायची का?

चौकस२१२'s picture

3 Aug 2023 - 10:34 am | चौकस२१२

या मुळे भामट्यांचे फावते.

१००% सहमत ...

फलज्योतिष कुठे जन्मले त्याचे संगोपन कुठे झाले ही चर्चा निरर्थक म्हणायची का?

ज्यांची यावर श्रद्धा आहे त्यांना हि चर्चा उपयोगी बाकिच्याना काय उपयोग !

कलह कुठे होतो कि ज्याचा यावर विश्वास आहे तो सार्वजनिक किंवा भागीदारी असलेल्या एखाद्या उपक्रमात ते घुसवू लागला कि मग बाकिच्यांना ते आवडेलच असे नाही

माझ्य सारख्याची गोची कुठे होते कि ... माझा पूजा अर्चा आणि काही सणातील चालीरीती यावर काह्ही आक्षेप नसतो ... पण " कोणी जर अडून बसला " कि हे तुम्ही जोयोतिषप्रमाणे केलं नाहीत म्हणून यश नाही " तर मग "आता तर माझी सटकली होते" : सटकते यासाठी कि असे बोलून हा "विश्वास" ठेवणारा माणूस समोरच्या च्या प्रामाणिक प्रयतनानचा अपमान करीत असतो ....
अश्या वेळी मला तरी त्या माणसाने केलेले प्रामाणिक प्रयत्न आणि त्याचा मान ठेवणे हे जास्त महत्वाचे वाटते फलज्योतिषाची तुणतुणे मग अनाठायी ठरते

कर्नलतपस्वी's picture

3 Aug 2023 - 11:06 am | कर्नलतपस्वी

लवकर मेला बाप
म्हणून दृष्टी झाली साफ
कोण सुखाचे कोण फुकाचे
अर्थ कळले नात्यांचे

ना लोटा ना थाली
सारे कमंडल खाली
नाही कुणाची साथ
आपणच आपला जगन्नाथ

काही घडले चांगले
काही घडले वाईट
आपणच ठरवणार
काय चुक अन काय राईट

हा का ना का

चौथा कोनाडा's picture

3 Aug 2023 - 6:06 pm | चौथा कोनाडा

माहितीपुर्ण धागा.
पन ....
या विषयाशी फारसा संबंध येत नाही माझा.
या बद्दलच्या चर्चा / लेख याकडे कोरडेपणाने पाहिले जाते !

फलज्योतिष खरे ठरो, खोटे ठरो, ते हजारो वर्षे टिकून आहे, कारण त्याची एक महत्वाची उपयोगिता आहे. लाखो लोकांना त्यामुळे मानसिक दिलासा मिळत आलेला आहे, दुखः, त्रास, निराशा झेलण्याचे बळ तसेच काही प्रमाणात उचित मार्गदर्शनही मिळत आलेले आहे. याबद्दल माझे स्वतःचे अनुभव यापूर्वीही इथे विविध लेखात, प्रतिसादात दिलेले आहेत. आता पुन्हा ते टंकवत बसण्याचा उत्साह नाही.

मूकवाचक's picture

5 Aug 2023 - 1:52 pm | मूकवाचक

फलज्योतिष्य विषयक पुस्तके वाचली, ग्रहांचे कारकत्व वगैरे वाचले तर फलादेश ज्यांनी निश्चीत केले त्या लोकांचा मानवी मन, गुंतागुंतीचे सामाजीक/ कौटुंबिक संबंध आणि नैराश्य, दु:ख, विकृती या मागची मूळ कारणे यांचा सखोल अभ्यास असल्याचे लक्षात येते.

आयुष्यातले खाचखळगे अनुभवून तटस्थपणे पाहिले तर 'मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार, लाथ मारीन तिथे पाणी काढीन' हे एक टोक आणि 'जे काही होते ते प्रारब्धाने होते, नियतीच्या रेट्यापुढे माणूस हतबल आहे' हे दुसरे टोक याच्या मधे कुठेतरी वस्तुस्थिती असते. प्रयत्नांचे महत्व न नाकारताच निव्वळ प्रयत्नाने यश मिळण्याची खात्री नसून यशात सुदैव साथ देत असते तसेच अपयशाला काही अंशी तरी दुर्दैव कारणीभूत असते हे मान्य करावे लागते. यशस्वी व्यक्ती दैवाची साथ मान्य करत नसेल तर तो अहंकाराचा परिणाम असतो, आणि अयशस्वी व्यक्ती सगळे खापर दुर्दैवावर फोडत असेल तर ते वैफल्यग्रस्त झाल्यामुळे होत असते. असो.

ज्योतिषविषयक सल्ला देत असलेल्या लोकांमधे सगळेच फसवणूक करणारे असतात असा कुणी आग्रह धरत असेल, तर ते अर्धसत्य आहे. चित्रगुप्त यांनी लिहील्याप्रमाणे दु:ख, नैराश्य, वैफल्यग्रस्ततेने ग्रासलेल्या अवस्थेत मानसिक दिलासा, उचित मार्गदर्शन मिळवत असलेल्या लोकांचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. कित्येकांची डुबती नैय्या अस्पस्वल्प मूल्य घेऊन किंवा प्रसंगी विनामूल्य मिळालेल्या ज्योतिष्याच्या मार्गदर्शनामुळे पार झालेली असते.

ज्योतिष्याचा सल्ला घेणारे लोक अकर्मण्य, कर्तृत्वशून्य, दुबळे, भित्रे असतात असे सरसकट विधान करणे देखील दुर्दैवी ठरेल. तटस्थपणे पाहता प्रत्यक्षात तसे दिसून येत नाही. एकंदर उपयोगितेच्या निकषावर ज्योतिष्य आणि ज्योतिषी दीर्घ काळ टिकून राहतील असेच चित्र आहे.

उपयोजक's picture

6 Aug 2023 - 11:08 pm | उपयोजक

धन्यवाद. संतुलित प्रतिसादाबद्दल

दीपक११७७'s picture

4 Aug 2023 - 5:59 pm | दीपक११७७

@उपयोजक

आपण दिलेल्या पुस्तकाच्या पाना वर कोठेही तक्षशिले चा उल्लेख आढळत नाही . त्याच काळात तक्षशिला भर-भराटीला होती.
त्यावरुन हे पुस्तक दोन-चार ज्ञात गोष्टी मध्ये

वैयक्तिक ज्ञानाच्या आधारे

वैचारीक रेघोट्या मारुन, चित्रपट / पटकथा पुर्ण केली आहे असे भासते.